✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Fri, 12/19/2014 - 00:05  ·  लेख
लेख
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही. ते का? हे समजावून घेत असता प्रथम हे जाणणे आवश्यक आहे की अशी कारवाई एक सरळ सरळ क्ष विरुद्ध य असे युद्ध नसेल तर ते "राष्ट्रसंघ" विरुद्ध "खालील अनेक उघड आणि छुपे शत्रू / विरोध" असे असेलः १. अतिरेकी, हे तर मुख्य लक्ष्य आहेत आणि त्यांच्यासाठी हे जीवनमरणाचे युद्ध असणार आहे. मुख्य म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीतही स्वतःच्या म्हणण्यासाठी कोणतीच नीतिमात्ता न पाळणारे हे लोक, कोणत्याही थराला जाउन नीचतम पातळी गाठतील हे सांगायची गरज नाही. असे असले तरी अंतरराष्ट्रिय सैन्यावर सर्व खर्‍या आणि मानलेल्या नितीमत्तेने वागण्याची नैतिक जबाबदारी असेल. २. अतिरेक्यांच्या देशातील सरकार आणि सैन्यदले देशाच्या सौर्वभौमतेचा मुद्दा पुढे करून विरोध, छुपे/प्रत्यक्ष युद्ध (आताही पाकिस्तानचा अमेरिकेशी डबल गेम चालू आहेच) करण्याचीच दाट शक्यता आहे. ३. त्या देशातील अतिरेक्यांचे हितसंबंधी, जे मुलकी नागरिक असल्याने त्यांच्यावर सरळ कारवाई साधी गोष्ट नाही, ही एक मोठी आणि धोकादायक डोकेदुखी असेल. ४. परकिय सैन्य आपल्या देशात घुसल्याने रागावलेले मुलकी नागरिक गुप्त कारवाया करू शकतात किंवा सरळसरळ अतिरेक्यांच्या गटात जाउ शकतात. ५. इस्लामी देशात परकिय सैन्य नेण्यास इतर इस्लामी देशांचा विरोध असेल (लिबियामधिल कारवायांच्या वेळी एका बाजूने पाश्चिमात्य देश तेथे "नो फ्लाय झोन करण्यासाठी काहीच करत नाहीत" अशी तक्रार करतानाच त्याच श्वासात "बूट्स ऑन ग्राऊंड" ला झालेला प्रखर विरोध आणि नंतर नो फ्लाय झोन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाँबिंग्मघ्ये काही नागरिकांचा मृत्यु झाला म्ह्णून निषेधही केला गेला, ते आठवा). ६. अतिरेक्यांवर कारवाई केली म्हणुन आणि त्या देशात परकिय सैन्य नेल्याची प्रतिक्रिया म्हणून जगातल्या सर्व अतिरेकी संघटना एकजूटीने / स्वतंत्रपणे जगभर अतिरेकी कारवाया करणार हे नक्की... यामुळे हा संघर्ष एका देशाच्या एका प्रांतापुरत्या न राहता सर्व जगच रणांगण बनेल आणि या बाबतीत जगभर युद्धपातळीवर खबरदारी न घेणे किती आत्मघातकी ठरेल हे नुकत्याच झालेल्या सिडनी प्रकरणासारख्या घटनांवरून समजणे सोपे होईल. ७. तालिबान असलेला भाग अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम आहे, तो पाकिस्तान-अफगाण सीमेच्या दोन्ही बाजूस आहे, तेथे या दोन्हीही देशांच्या सरकारांचे नाही तर स्थानीक टोळ्यांचे आणि अतिरेकी संघटनांचे नियंत्रण आहे. या संघटनांचे सदस्य मनाला येईल तेव्हा कोणत्याही आडकाठीशिवाय तेथिल आंतरराष्ट्रिय सीमा ओलांडतात. एका देशात गुन्हा करून दुसर्‍या देशात पळून जाणे हा त्यांचा नेहमीच डावपेच आहे. तेव्हा युद्ध करणार्‍या आंतरराष्ट्रिय सैन्याला अतिरेक्यांचा पाठलाग (हॉट परस्युट) करताना पाकिस्तान-अफगाणीस्तानची सरहद्द ओलांडण्याची परवानगी असायला हवी. हे आधुनिक काळात केवळ महायुद्धांच्या वेळी शक्य झालेले आहे. म्हणजे ही कारवाई एका देशातील स्थानीक ऑपरेशन न राहता अनेक देश सामील असलेले आंतरराष्ट्रीय युद्ध होईल. ८. अतिरेक्यांच्या विभागाची भौगोलिक परिस्थिती सामान्य युद्ध (conventional warfare) नाही, ते डोंगराळ, दर्‍याखोर्‍यांनी भरलेल्या भागातले गनिमी काव्याचे युद्ध असणार आहे. अश्या युद्धात रणगाडे, तोफा, आर्मर असे ते वापरणार्‍या बाजूचे पारडे वर ठेवणारे मोठे युद्धसाहित्य (हेवी वेपन्स) निरुपयोगी ठरते (तेथे पोहोचू शकत नाही). इतकेच काय तर दर्‍याखोर्‍यांत आणि डोंगरांतील गुहांत लपून राहणार्‍या आणि कोणतेही उघडे मोठे तळ (कँप्स) नसलेल्या शत्रूवर हल्ला करण्यास वायुदल परिणामकारक ठरत नाही. कारण विमानुड्डाणाला बिकट भौगोलिक परिस्थिती बरोबरच एवढ्या मोठ्या भागावर कारपेट बाँबिंग करायला दशलक्ष टनांनी बाँब्ज लागतील. त्याची किंमत मोजणे कठीण तर आहेच पण या कृतीचा बेनेफिट-कॉस्ट रेशो ती कृती वेडेपणाची ठरावी इतका कमी असतो. म्हणूनच अश्या परिस्थितीत ड्रोन वापरून सर्जीकल ऑपरेशन्स केली जातात... परंतु अश्या कृतीचीही किंमत कोलॅटरल डॅमेजने मोजावी लागते, जी स्थानीक जनतेला विरोधी गटात ढकलते आणि काम अधिक कठीण करते. ९. वर सांगितलेली भौगोलिक परिस्थिती अतिरेक्यांना तळहाताच्या रेषांसारखी माहित आहे, पण आंतरराष्ट्रिय सैन्याकरिता अनोळखी जागा असेल. त्यामुळे, केवळ सैन्याची हालचालच नाही तर त्याला लागणारी वाहने, हत्यारे, दारूगोळा, अन्न, इत्यादींचा पुरवठा करणे हे किती कठीण असेल हे सांगायला नकोच... आणि हे अतिरेक्यांच्या सतत होणार्‍या गनिमी आणि आत्मघातकी हल्ल्यांच्या छायेखाली करायला लागेल हे पाहिल्यावर परिस्थितीचे गांभिर्य ध्यानात यावे. अनेक दशके चाललेली यमुनेच्या बिहडांतील दरवडेखोरी आणि मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करी (त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही) आठवली तर किंsssचीत कल्पना यावी... मात्र या तुलनेत फार मोठे फरक असे की, (अ) येथे एका देशातील आंतरराज्य सीमेऐवजी आंतरराष्टिय सीमा ओलांडायची आहे, (आ) बिहड अथवा जंगलांऐवजी येथे हिमालयाच्या (किंवा त्याच्या उपरांगांच्या) दर्‍याखोरी आहेत, (इ) जुन्यापुराण्या बंदूक-रायफल वापरणार्‍या दरवडेखोरांच्या ऐवजी अत्याधुनिक शस्रास्त्रांनी (उखळी तोफा, रॉकेट्स, विमानवेधी तोफा, इ ने सज्ज आणि (ई) अनेक दशके त्याच परिसरात युद्ध करणारे, मरणाला न घाबरणारे माथेफिरू, आत्मघातकी, अतिरेकी आहेत, इ इ इ. या सर्व आणि इतर अनेक गोष्टींमुळे या युद्धात होणारे फायदे व सोसायला लागणारे तोटे (आर्थिक, राजकिय, मानवहानीच्या स्वरुपातील, इ) यांचा "बेनेफिट-कॉस्ट रेशो" परवडणारा रहात नाही... निदान दर चार-पाच वर्षांनी येणार्‍या निवडणूकीतल्या हार-जीतीचा विचार करणार्‍या राजकारण्यांसाठी तर नव्हेच ! हुश्श्य ! आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे... पडद्यामागचे स्थानिक-प्रादेशिक-आंतरराष्ट्रिय राजकारणाचे गोडाउन उघडले तर वरच्या विश्लेषणात झालेली दमछाक म्हणजे सकाळच्या गुलाबी थंडीत रमतगमत केलेला बागेतला फेरफटका ठरावा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
समीक्षा
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
26690 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

कारण पाकिस्तानी सैन्य हे

काळा पहाड
Tue, 12/23/2014 - 17:43 नवीन
कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं. कारगिल हा सैन्य मोहिमेच्या दृष्टीनं अतिशय अवघड प्रदेश आहे. वर असलेल्याला फक्त प्रचंडच नव्हे तर संपूर्ण अ‍ॅडव्हान्टेज आहे. वरच्या बंकरमध्ये बसलेला पाकिस्तानी हा अतिशय सुरक्षीत अशा दगडी कवचात होता आणि खालून वर चढाई करताना झाडांचा किंवा दगडाचा आडोसा नव्हता. खालून वर मोहीम ही जवळ जवळ आत्महत्या या सदरात येते. चिलखती गाड्या वापरता येत नाहीत. अशा ठिकाणी माणसं तर सोडाच, यंत्रं सुद्धा दमतात. त्यातून पाकड्यांजवळ अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पण होती. कारगिलचा विजय हा खरोखरच मानवी बळापलिकडे जावून मिळवलेला विजय होता. बाकी जाणकार सांगतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१११

श्रीगुरुजी
Tue, 12/23/2014 - 20:18 नवीन
+१११ आणि मुख्य म्हणजे वाजपेयींनी पायदळाला व हवाई दलाला सीमारेषा न ओलांडण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळेही भारतीय मोहिमेला मर्यादा आल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

??

क्लिंटन
Tue, 12/23/2014 - 20:38 नवीन
कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं.
आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही. आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही. बाकी आपल्या हवाईदलाकडील नक्की किती विमाने शत्रूने पाडली आहेत आणि किती विमाने अपघाताने पडली याविषयी काही आकडेवारी आहे का?त्यात आपले किती शे वैमानिक मारले गेलेत? इतकी वर्षे नुसती मीग विमाने पडत होती.मध्यंतरी सुखोई विमानही पडले म्हणून सुखोई विमानांची फ्लिट ग्राऊंड केली.आपल्या नक्की किती पाणबुड्या आग लागून बुडल्या आहेत आणि नक्की किती शत्रूने बुडविल्या आहेत? मध्यंतरी आपल्याकडे १५ दिवस (की महिनाभर) पुरेल इतकाच दारूगोळा आहे असे सैन्यप्रमुखांनी म्हटले होते असे वाचल्याचे आठवते. सैन्याचा अभिमान आणि कृतज्ञता वाटणे वगैरे सगळे ठिक आहे पण अशा प्रकारच्या बेभरवशाच्या शस्त्रांनिशी आपण सहजासहजी कसे काय जिंकणार आहोत? जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला

काळा पहाड
Tue, 12/23/2014 - 22:19 नवीन
आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही.
युद्धाचा एक महत्वाचा नियम हा कि शत्रूला सोयिस्कर नव्हे, तर आपल्याला सोयिस्कर जागी युद्ध करण्यासाठी शत्रूला भाग पाडा. इथे भारतीय सैन्याचे हात दगडाखाली होते. दुसरी कुठलीच आघाडी उघडण्यासारखी नव्हती. आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडण्याची दक्षता घ्यायची होती आणि सैन्याच्या तुकड्या शत्रूच्या टप्प्यात होत्या. लक्षात ठेवा की बरचसं सैन्य हे शत्रू च्या लेह हायवे माराच्या टप्प्यात असल्यानं मारलं गेलं (वरची मदनबाण यांची दुसरी लिंक पहा). परिस्थीती किती गंभीर आहे याची कल्पना राजकीय नेतृत्वाला दिली गेली नव्हती आणि हा एक स्थानिक प्रश्न आहे असं गृहीत धरलं गेलं आणि त्याप्रमाणं निर्णय घेतले गेले, त्याप्रमाणं सैन्याला आज्ञा दिल्या गेल्या. या चुका मुख्यतः राजकीय आणि स्ट्रॅटेजिक होत्या आणि सैन्याच्या कार्यक्षमतेचा त्यात काही संबंध नव्हता.
आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही.
मला असं म्हणायचंय की त्यामुळे एअरफोर्स च्या हालचालींवर बंधनं आली. ही शिखरं ज्या उंचीवर आहेत तिथे मुळातच मर्यादित हालचाली होवू शकतात. शिवाय एअरफोर्स सुद्धा सीमा पार करू शकत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अ‍ॅप्रोच रूटवर पण बंधनं असणार. आपण अशा युद्धाबद्दल बोलतोय जिथे आपला एक हात पाठिमागे बांधलेला होता.
जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.
तुम्ही जे सांगताय त्यातल्या बर्याच (बहुतांश) घटना या सुट्ट्या भागांच्या कमतरतेमुळे, मनमोहन सरकारच्या नवीन शस्त्रे व टेक्नॉलोजी घेण्याबद्दलच्या धरसोड धोरणामुळे आणि राजकीय निर्णयक्षमतेच्या अभावामुळे घडलेल्या आहेत. त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

त्या आपलं सैन्य कमी शिक्षित

क्लिंटन
Tue, 12/23/2014 - 22:26 नवीन
त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.
अहो वैयक्तिक शौर्याच्या जोरावर युध्द जिंकायचे दिवस मागे पडून कित्येक दशके झाली. सैन्याचे शौर्य हवेच त्यात शंकाच नाही.पण नुसते तितके पुरेसे नाही.त्याबरोबरच शस्त्रास्त्रे गरजेची असतात.जर आपली विमाने इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततेच्या काळात पडत असतील तर युध्दाच्या वेळी नुसत्या सैन्याच्या शौर्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

क्लिंटनराव मिलेटरी

मदनबाण
Wed, 12/24/2014 - 00:09 नवीन
क्लिंटनराव मिलेटरी मॉर्डनायझेशनची अत्यंत गरज आहे या बद्धल काही वादच नाही ! सध्याचं सरकार काय निर्णय घेतय त्या बद्धल उत्सुकता आहेच... काही घेतले गेले आहेत, काही लवकरच घेतले जातील ही अपेक्षा ! बाकी काही व्हिडीयो देण्याची इच्छा तीव्र झाल्याने इथे देत आहे :- १}कारगिल मधील भारतीय सैन्याची मुव्हमेंट आणि बोफोर्सची फायरिंग २} मध्यंतरी पाकिस्तानने सातत्याने फायरिंग केल्यावर आपल्या मिलेटरी ने दिलेले घाणाघाती प्रतिउत्तर ! ३} पाकिस्तानच्या नूक्लिअर ब्लॅकमेलिंगवर चाललेली चर्चा ४} माझ्या मते ही India's Multi-Barrel Rocket Launchers - BM-21 / 30 आहेत. कारगिल युद्धात टायगर हिल वर यांचा मारा करण्यात आला होता. ५}Indian Army - Artillery of India मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

इथे जे जनरल व्ही के सिंह

मदनबाण
Sat, 05/09/2015 - 23:09 नवीन
इथे जे जनरल व्ही के सिंह म्हणाले होते, त्याच बद्धल आता CAG रिपोर्ट सांगत आहे ! संदर्भ :- Army ammo reserves may last just 20 days of intense fighting: CAG India faces severe ammunition shortage, can fight war for only 20 days: CAG India faces acute shortage of ammunition: CAG tells Defence Ministry in report आपल्या देशाची अशी लष्करी दुरावस्था का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आई शपऽऽथ्थ साडी मधे दिसते झकाऽऽऽस्स्स तू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आपल्या देशाची अशी लष्करी

काळा पहाड
Sat, 05/09/2015 - 23:14 नवीन
आपल्या देशाची अशी लष्करी दुरावस्था का ?
मां-बेटा-पिता-नानी--नानी के पिता-सरदार-इत्यादी इत्यादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ऐला, एवढं सगळं कॉम्प्लिकेशन

नितिन थत्ते
Mon, 12/22/2014 - 16:08 नवीन
ऐला, एवढं सगळं कॉम्प्लिकेशन आहे होय ? मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती.
  • Log in or register to post comments

केम छो चच्चा ! मला वाटायचं की

मदनबाण
Mon, 12/22/2014 - 16:16 नवीन
केम छो चच्चा ! ;) मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती. तमारो टेलरिंग नो साईड बिझनेस छे के ? ;) मने तो खात्रीच हती, की तमे आ धागाना प्रतिसाद देवा माटे जरुर आवशे... [ मदन शहा ] ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

@थत्ते-

पिंपातला उंदीर
Mon, 12/22/2014 - 16:22 नवीन
@थत्ते- :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अंध राजकारण बाजूला ठेऊन

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/22/2014 - 17:06 नवीन
अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या... भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. शिवाय, पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे. (सर्व प्रकारच्या नजरांना दिसायला सोपे जावे म्हणून महत्वाचा भाग येथे उठावदार केलेला आहे :) ) ...या वाक्यांचा अर्थ कळेल. नाहीतर "सर्वात पहिले स्वार्थी राजकारण, देशकारण गेले चुलीत" या मंत्राचा जप करणे काही जण चालू ठेवतीलच म्हणा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

भलत्या अपेक्षा

क्लिंटन
Mon, 12/22/2014 - 17:25 नवीन
अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या...या वाक्यांचा अर्थ कळेल.
छे बुवा भलत्याच अपेक्षा तुमच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

चिल् ....

नितिन थत्ते
Mon, 12/22/2014 - 17:36 नवीन
चिल् .... प्रतिसाद हा धागालेखकाच्या धाग्यातल्या मुद्द्यांसाठी नव्हता. तो ज्यांच्यासाठी होता त्यांना कळला असेल. धाग्यातल्या प्रतिपादनाशी सहमतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गेल्या काही महिन्यांत भारताने

अनुप ढेरे
Tue, 12/23/2014 - 09:52 नवीन
गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे
एक्का साहेब, गेल्या सहा सात महिन्यांत काय काय वेगळं झालय याचा काही संदर्भ मिळेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सार्वजनिकरित्या उपलब्ध

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/23/2014 - 12:14 नवीन
सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या छापील आणि एलेक्ट्रॉनिक स्रोतांवर यासंबंधात असंख्य संदर्भ उपलब्ध आहेत... यात रोजची वर्तमानपत्रे आणि टी व्ही आहेतच. त्यांचा प्रामाणिक विचार पुरेसा आहे. कोणताही राजकारणी चष्मा न वापरता ते वाचले/ऐकले तर मग मी काही न सांगताही सर्व समजेल. त्याविना इथे किती वादविवाद केले तर केवळ बँड्विड्थ खर्च होण्यापलिकडे काहिही होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

उगीच का वैतागताय एक्का साहेब.

अनुप ढेरे
Tue, 12/23/2014 - 13:44 नवीन
उगीच का वैतागताय एक्का साहेब. मी फक्त एवढं विचारलं की नव्या सरकारमुळे काश्मिर आणि इतर ठीकाणी ताबारेषेवरील धोरणात झालेल्या बदलांचा आणि त्याच्या परिणामांचा कोणी अभ्यास केलाय का आणि उत्सुकता म्हणून संदर्भ मागितले. ते न देता उगाच राजकीय चष्मा, प्रामाणिक विचार, बँडविड्थ वगैरे मध्येच का आणताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ओके

अनुप ढेरे
Tue, 12/23/2014 - 13:59 नवीन
हे एक आर्टिकल मिळालं. http://indiatoday.intoday.in/story/loc-firing-ceasefire-violations-pakistan-rangers-indian-army/1/394785.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बघा एक लेख मिळाला ना पटकन !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/23/2014 - 14:44 नवीन
बघा एक लेख मिळाला ना पटकन ! थोडेसे अजून उत्खनन केले तर अजून बरेच "विश्वासू" धागेदोरे मिळतिल :) . शिवाय माझे निरिक्षण एकाच लेखावरून अथवा एका बातमीवर केलेले नसून; गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान बरोबरच्या व्यवहारात सद्याच्या सरकारने केलेल्या "नो नॉनसेन्स" कारवाया आणि त्यामुळे आंतरराष्ट्रिय राजकारणात मोदी आणि भारताला मिळणारी वागणूक खालील गोष्टींवरून स्पष्ट होईल : १. पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत झालेली फजिती, २. त्यानंतर एकामागोमाग एक सर्व महत्वाच्या देशांनी पाकिस्तानच्या काश्मीर बद्दलच्या तक्रारीं/रडगाण्यांकडे केलेली डोळेझाक, ३. मोठा अडसर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाने भारतात येऊन अणुकरावर सह्या करणे, ४. WTO मध्ये भारताने हट्ट धरलेली (आणि भारताच्या सद्यस्थितीत महत्वाची सबसिडीबद्दलची सुधारणा, जी न करण्याचे पूर्वीच्या सरकारने मान्य केले होते) अमेरिकेने प्रथम प्रखर विरोध करून नंतर भारताच्या आग्रहाखातर मान्य करणे, ५. याशिवाय आंतरराष्ट्रिय राजकारणात सहसा न दिले जाणारे / आतापर्यंत न दिले गेलेले जवळिकेचे / मानाचे संदेश; उदा. कार्यक्रमपत्रिकेत नसताना प्रे ओबामाने मोदींना स्वतः बरोबर मार्टिन ल्युथर किंगचे स्मारक पहायला नेणे; अमेरिकेच्या प्रेसिडेंटने २६ जानेवारीच्या समारंभाला मुख्य आतिथीचे आमंत्रण स्विकारणे, भारताच्या पंतप्रधानाचे जपानच्या पंतप्रधानाने (हे जपानच्या इतिहासात प्रथमतः झाले आहे) आणि इतर प्रेसिडँट्स/पंतप्रधानांनी (हे अगोदर झाले असलेच तर अत्यंत विरळा असेल) आलिंगन देऊन स्वागत करणे, इ. वरवर या गोष्टी साध्यासरळ वाटल्या तरी सर्वसाधारण आंतरराष्ट्रिय सभ्यतेच्या फार पुढे जाऊन जवळीक साधण्याचे संकेत आहेत आणि ते उगाचच / उथळपणे दिले जात नाहीत. या आणि इतर गोष्टी (अ) मुळातून, (आ) त्यांचे स्वतःचे आकलन आणि (इ) त्यांचे "विश्वासू" स्त्रोतांतून मिळणारे विश्लेषण; या सर्वांच्या समन्वयाने मी माझे मत बनवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

इतर परराष्ट्रीय धोरणाबद्दल

अनुप ढेरे
Tue, 12/23/2014 - 20:53 नवीन
इतर परराष्ट्रीय धोरणाबद्दल सहमत आहे. मला उत्सुकता सीमारेषेवरच्या बदलांबद्दल होती. त्याचा एकच संदर्भ मिळाला आहे अजुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

>>> मला वाटायचं की आधीच्या

श्रीगुरुजी
Mon, 12/22/2014 - 20:25 नवीन
>>> मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती. छातीचा साईझ नाही हो, 'वरून' आदेश नसल्याने कृती केली जात नव्हती. आणि 'साधनसंपत्ती'वर पहिला हक्क ज्यांचा आहे त्यांच्याविरूद्ध कृती करण्याचा आदेश 'वरून' कसा येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बॉर्र.....

नितिन थत्ते
Mon, 12/22/2014 - 21:57 नवीन
बॉर्र..... वरून आदेश देणार्‍यांच्या* छातीचा साईझ कमी असल्याने असं म्हणू !!! *हा प्रतिसाद अश्लील नाही याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पाकिस्तान आधी उडवून द्या....

चेतन677
Mon, 12/22/2014 - 22:09 नवीन
सगळ्याची मुळे पाकिस्तानात आहे.लादेनलाही जाणुन बुजून सहारा दिला होता.
  • Log in or register to post comments

काही बातम्यांचे दुवे

माहितगार
Tue, 12/23/2014 - 11:50 नवीन
* From Jinping to Obama: Here's how the world still hyphenates India with Pakistan * Pakistan faces risks if economic reforms slip: IMF * Barack Obama signs massive defence budget; $1 billion to Pakistan * China-Pakistan Economic Corridor — A new vista of development in South Asia (पाकीस्तान टुडे डॉट्कॉमवर) * Socio-economic impact of terrorism on Pakistan डेली टाईम्स डॉट्कॉम डॉत पीके ऑनलाईन पाकीस्तानी वृत्तपत्र
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

पैसा
Tue, 12/23/2014 - 22:37 नवीन
उत्तम लेख आणि चर्चा
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 00:51 नवीन
सहमत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भारत पाकिस्तानवर आक्रमण का करत नाहि... वगैरे....

अर्धवटराव
Wed, 12/24/2014 - 01:40 नवीन
सैन्य शक्तीने पाकिस्तान प्रॉब्लेम निर्णायकरित्या सोडवणं भारताला प्रॅक्टीकली शक्य असतं तर मला वाटतं भारताने ते एव्हाना केलं असतं. पण भारत तसं करत नाहि याचं कारण आपण फार सहिष्णु आहोत किंवा आपल्या नेत्यांमधे तेव्हढी धमक नाहि असं काहि नाहि (आपण थोडेफार सहिष्णु नक्कीच आहोत, व आपले बरेचसे नेते संसदेत बसायच्या लायकीचे नाहित हे खरे आहे). पण आपण तसं करत नाहि याचं कारण तसलं काहि करण्याची गरज नाहि, आणि करतो म्हटलं तरी ते शक्य नाहि. लमहोंने खता कि और सदियोंने भुगतान किया हे आपल्याला परवडणारं नाहि.
  • Log in or register to post comments

हे पटतयं..

शलभ
Wed, 12/24/2014 - 18:37 नवीन
हे पटतयं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/25/2014 - 15:39 नवीन
सहमत. मात्र आतापर्यंतचा पाकिस्तानचा विरोध फक्त "हातावर हात ठेऊन फक्त निषेध नोंदवणे" या जगभर हास्यास्पद समजल्या गेलेल्या पद्धतीने होत होता. सिमेवरच्या गोळीबाराचे सोडा, पाकिस्तानने आयोजित केलेल्या कोणत्याही भारत-पाकिस्तान व्दिपक्षीय चर्चेच्या स्थानी भारताचा ध्वज उलटा लावला नाही तर आश्चर्य व्यक्त केले जात होते; आणि भारताची त्याप्रसंगी "अश्या चुका होत असतात, त्यांना फार महत्व देउ नये" अश्या प्रतिक्रिया गृहित होत्या. अश्या मुळमुळीत भारताला मित्र मानणे म्हणजे आपले हसे करून घेणे असे जागतिक मत झाले याचे आश्चर्य ते काय ? १. घट्ट आणि विश्वासू राजकारणी संबंध (अ) तो असल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना फायदा होणार असला तर किंवा (आ) तो नसल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना धोका होणार असला तर किंवा (इ) वरच्या दोन्ही शक्यता असल्या तर आणि तरच प्रस्थापित होतात. २. मुळमुळीत धोरण असलेल्या आणि केवळ नीतिमत्तेच्या गप्पा मारणार्‍या देशांना फारसे महत्व मिळ्त नाही. याचे कारण जेवढा वरचा १ क्रमांकाचा मुद्दा असतो तेवढाच असे देश बेभरवश्याचे असतात (वेळप्रसंगी कच खाऊन पाठीराख्या देशाला अडचणीत आणतात) हे ही असते. आंतरराष्ट्रिय राजकारणात भित्र्याचा कोणीच मित्र होऊ इच्छित नाही आणि जो घाबरवू शकतो त्याची मैत्री सगळ्यांना हवी असते किंवा कमीत कमी त्याला उघड विरोध तरी केला जात नाही, हे एक नग्न सत्य आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या अणूकार्यक्रमाला असलेला अमेरिकेचा पायओढा कारभार आणि ऑस्ट्रेलियाचा (ज्यांच्याकडे जगातला विक्रीसाठी उपलब्ध असलेला सर्वात मोठा युरेनियमचा साठा आहे) सबळ विरोध लक्षणियरित्या बदलून त्यांत कृतिशीलता आलेली दिसत आहे. यामागे गेल्या काही महिन्यात "भारतामध्ये पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची राजकिय इच्छाशक्ती असल्याची" आंतरराष्ट्रिय समुदायात झालेली जाणीव आहे. याची मुख्य कारणे : अ) पाकिस्तानला सीमेवरच्या गोळाबरी व इतर कुरापतींची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा कृतिशील संदेश आ) तसे करण्याबरोबरच राजकिय भेटींत पडद्यामागे करण्यात आलेल्या अनेक विश्वासदर्शक खलबते... ज्याची परिणती अशी झाली की, पाकिस्तानने केलेल्या कांगाव्यांचा उपयोग आतापर्यंत भारताला दाबून ठेवण्यात कसा वापरता येईल हे पाहिले जात होते त्याऐवजी त्या कांगाव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आणि पाकिस्तान एकाकी पडण्यात झाली. दुसरी राजकिय खेळी राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार म्हणून श्री अजित दोवाल यांच्या निवडणूकीने खेळली गेली आहे. या पूर्व आयबी संचालकाचे जागतिक व प्रादेशिक गुप्तहेर कारवायांचे ज्ञान आणि पूर्वकर्तृत्व वादातीत आहे... या एकाच घटनेने आयएसआयची झोप बर्‍यापैकी उडाली आहे असे म्हटले जाते. नुकतेच ISIS ने इराकमधे बंदी केलेले भारतिय नागरिक सुखरूप परत आले त्यामध्ये दोवाल यांचे बरेच योगदान होते. आजपर्यंत भारताच्या कोणत्याही निषेधाकडे हास्यास्पद कारणे देत दुर्लक्ष करणार्‍या पाकिस्तानाला तोंडदेखला मान देत का होईना पण मुंबई हल्ल्याचा आरोपी लष्करे तोयबाच्या झाकी उर रहमानला परत नजरकैदेत ठेवावे लागले. या झाल्या उघड कृती. पडद्यामागे याच्या अनेक पटींनी हालचाली सुरू नसल्या तर आश्चर्य असेल. त्या जरी वर दिसत नसल्या तरी उघड कृतींपेक्षा जास्त परिणामकारक असतात. युद्धतंत्राचे सर्वात मोठे तत्व असे आहे की, गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळून मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. कारण थोड्या कालावधित पूर्ण विजय मिळविण्याच्या भरात जेत्यालाही पराभवाचा धोका अथवा अश्या युद्धाची तात्कालिक व/किंवा दीर्घकालीन न परवडणारी किंमत चुकवावी लागते. उदा : १. मराठे आणि अबदाल्ली यांच्यातल्या पानिपतच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांचा पराभव होऊन मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली असली तरी अबदाल्लीचेही इतके नुकसान झाले की त्याला सैन्याच्या विरोधामुळे आणि बंडाळीमुळे अफगाणीस्तानात परतणे भाग पडले. २. इराक आणि अफगाणिस्तानमधल्या युद्धांत झालेला खर्च हे सुद्धा अमेरिकेच्या १८ ट्रिलियन डॉलर इतक्या महाप्रचंड राष्ट्रिय कर्जाचे कारण आहे; आणि त्यामुळे अमेरिकेच्या जागतिक राकारणातल्या वजनात लक्षणिय घट झालेली आहे. ३. दुसरे महायुद्ध जिंकूनही आर्थिक आणि सामरिक रित्या खिळखिळे झालेल्या ब्रिटनला पुढ्च्या पाच-दहा वर्षांत त्याच्या सर्व महत्वाच्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडले आणि जागतिक महासत्तेचा मुकुट अमेरिकेकडे गेला. असो. ही केवळ सुरुवात आहे. (अ) सद्या योग्य दिशेने चाललेल्या भारताच्या आंतरराष्ट्रिय पटलावरच्या वाटचालीने भविष्यात वेग पकडला, (आ) तिला देशांतर्गत सबळ विकासाचे पाठबळ मिळाले आणि (इ) "भारताशी दुष्मनी फारच महागात पडते" हे भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. इतके सर्व असले तरी पाकिस्तानच्या संबंधात (अ) हातावर हात ठेऊन बसणे किंवा (आ) सर्वशक्तीनिशी हल्ला हे दोनही पर्याय सद्यकाळात व्यवहार्य नाहीत. मात्र पाकिस्तानला त्याच्या दु:साहसांची सामरिक, आर्थिक आणि राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे अशी लक्षणे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

...@...इस्पीकचा एक्का !!!

विनोद१८
Fri, 12/26/2014 - 13:14 नवीन
१००% सहमत, अप्रतिम विवेचन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विश्लेषण..

शलभ
Fri, 12/26/2014 - 16:05 नवीन
सुंदर विश्लेषण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अणु शक्ती हे दुधारी शास्त्र

सुबोध खरे
गुरुवार, 12/25/2014 - 12:25 नवीन
अणु शक्ती हे दुधारी शास्त्र आहे आणी अणुयुद्ध आतापर्यंत न होण्याचे कारण म्हणजे MAD (mutually assuared destruction) म्हणजे उभयपक्षी विनाश हा ठरलेला असल्याने सहसा कोणी अणु युद्धास धजावलेले नाही. राहिली गोष्ट प्रथम हल्ला करणार नाही (NO FIRST USE) हे लोढणे सुद्धा कागदी आहे. एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. जर यदाकदाचित पाकिस्तानचा समूळ नाश झाला नाही तर वाचलेल्या अणु शस्त्रानी त्यांनी प्रतिहल्ला केला तर दोन तृतीयांश भारत नष्ट होईल. वरील भीती मुळेच पाकिस्तान काही शे अणुशस्त्रे निर्माण करण्याच्या मागे आहे. भारत अणु पाणबुडीतून( चक्र आणी अरिहंत ) डागण्याची आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी याच साठी करीत आहे कि जर जमिनीवरील सर्व शस्त्रे अणूहल्ल्यात नष्ट झाली तरी पाणबुडीतील वाचलेल्या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तान किंवा चीनचा संपूर्ण विध्वंस करता यावा. http://en.wikipedia.org/wiki/Second_strike http://en.wikipedia.org/wiki/Sagarika_(missile) http://en.wikipedia.org/wiki/K-4_%28SLBM%29
  • Log in or register to post comments

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/25/2014 - 15:48 नवीन
सहमत. पारंपारिक युद्ध आणि अगदी सुक्ष्म (लो की) अणूयुद्ध यांच्यातही जमीन-अस्मानाचा फरक आहे. अणूयुद्ध म्हणजे एकाच बाँबने एक शहर उद्ध्वस्त करून युद्ध जिंकणे असा समज दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेल्या अणूबॉंब्जमुळे आणि त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाचे पारडे दोस्तराष्ट्रांच्या बाजूने झुकण्यात झाल्याने झाला आहे. सद्याच्या बदललेल्या राजकिय आणि सामरिक वस्तुस्थितीत हे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@ एक्का काका

मदनबाण
Fri, 12/26/2014 - 00:06 नवीन
@ एक्का काका आपले घटनांचे विश्लेषण आवडले ! गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळूण मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. हा विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. पाकिस्तानचे अस्तित्व हे फक्त आपल्या द्वेषावर अवलंबुन आहे...इथे राज्य करणार्‍याला / नियंत्रण ठेवणार्‍याला हिंदूस्थान्द्वेषाचा एक कलमी कार्यक्रम राबवण्या शिवाय पर्याय नाही,हा त्यांचा इतिहास सुद्धा सांगतो आणि वर्तमान सुद्धा. त्यांची आपल्याशी सरळ युद्ध करण्याची क्षमता नाही हे ते स्वतः जाणुन आहेत त्यामुळेच त्यांनी आपल्या विरुद्ध thousand cuts निती अवलंबली. ते आपल्याशी शांततेने राहु शकत नाहीत कारण प्रचंड हिंसाचार होउनच त्यांच्या या राष्ट्राची निर्मीती झाली आहे.त्यामुळे Pakistan isn't ready for peace with India हेच सत्य आहे आणि आपण हे सत्य कायम ध्यानात ठेवले पाहिजे. राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू अशी लक्षणे दिसत आहेत. +१ @ डॉक एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). हा दॄष्टीकोन लक्षात आला... यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. होय... याचे सध्याचे उदाहरण आपल्या नजरे समोर येत आहे { अर्थात अणूबॉम्बच्या जागी रिअ‍ॅक्टर आहेत.} ११ मार्च २०११ साली जपानच्या फुकुशिमा दायची रिअ‍ॅक्टर अपघात झाला आणि सुनामी बरोबरच जगाने नूक्लिअर रिअ‍ॅक्टर ब्लास्ट सुद्धा पाहिला. या घटनेचे परिणाम आता युएस च्या वेस्ट कोस्ट मधे दिसायला लागले आहेत... Image removed. त्यामुळे तुमचे प्रतिपादन योग्यच आहे आणि पाकिस्तानवर असा हल्ला करणं आपल्या हिताच नाही हेच खरं आहे...पण मग सतत न्यूक्लिअर वेपन्स /मटेरिअल जिहादींच्या हाती लागण्याची भिती आहे त्याच काय करायच ? आता अफगाणिस्तान मधुन अमेरिकेचे सैन्य माघारी जायला सुरु होइल आणि या जिहादींना काही काम उरणार नाही,पाकिस्तान आता त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या सारखे भासवेल नंतर याच मंडळींना आपल्या विरुद्ध जुंपतील त्याचे काय ? कारण जे नवाझ शरिफ आज आतंकवादाच्या विरोधात सुर आळवत आहेत त्यांनीच काही दिवसां पूर्वीच हाफिद सईदच्या सभेला जनसागर पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती.त्यामुळे ह्यांच्याकडुन आपल्याला त्रास आहेच ! येत्या वर्षात काय घडामोडी होतात ते पहायला हवे... जाता जाता :- हे दुवे हिंदूस्थान-पाकिस्तानशी संबंधीत नसुन रेडियेशनशी संबंधीत मुद्धाशी असल्याने माहितीसाठी देउन ठेवत आहे. http://www.netc.com/ Tiny amounts of Fukushima radiation found in California Fukushima Radioactivity Detected Off West Coast Sickened by service: More US sailors claim cancer from helping at Fukushima मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक्का कांकाचा चेर्नोबिल वरचा

मदनबाण
Fri, 12/26/2014 - 12:31 नवीन
एक्का कांकाचा चेर्नोबिल वरचा प्रतिसाद आणि डॉक यांचा किरणोत्साराचा प्रादुर्भावाचे थोडक्यात विष्लेषण मला या विषयावर अधिक विचार आणि वाचन करण्यास प्रवॄत्त करणारे ठरले.., यातील चेर्नोबिल घटना मला माहित होती आणि त्याबद्धल थोडी फार माहिती होती आणि त्यामुळेच पटकन Bitter butter चा दुवा मला देता आला... यावर अजुन विचार करतोय कारण आपली एनर्जीची गरज आहे आणि न्यूक्लिअर पावरची गरज आणि सेटअप वाढणार आहे. खालील दोन्ही व्हिडीयो नीट ऐकण्या सारखे आहेत...कारण फुकुशिमाचा परिणाम हा चेर्नोबिल पेक्षा जवळपास ८५% जास्त आहेत म्हणतात... आणि ही कधीही न-संपणारी दुर्घटना आहे. ! न्यूक्लिअर वेपनचा वापर करणे हे किती भयानक आहे याचा अंदाजा आला ! Fukushima Forever मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- नायक नही, खलनायक हुं मै :- खलनायक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

http://en.wikipedia.org/wiki

सुबोध खरे
गुरुवार, 12/25/2014 - 12:29 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Nuclear_triad
  • Log in or register to post comments

....डॉ. सुबोध खरे....!!

विनोद१८
गुरुवार, 12/25/2014 - 12:38 नवीन
उत्तम व अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

आमचा एक्स (सर्वार्थानं) मित्र

प्यारे१
गुरुवार, 12/25/2014 - 13:44 नवीन
आमचा एक्स (सर्वार्थानं) मित्र परा म्हणतो तसं खरंच भारतीय च नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची सगळी सूत्रं मिपावरुनच हलतात असा भास होत आहे. :)
  • Log in or register to post comments

कोई शक ? हाँ...

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/25/2014 - 15:49 नवीन
कोई शक ? हाँ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा