Skip to main content

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 19/12/2014 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही. ते का? हे समजावून घेत असता प्रथम हे जाणणे आवश्यक आहे की अशी कारवाई एक सरळ सरळ क्ष विरुद्ध य असे युद्ध नसेल तर ते "राष्ट्रसंघ" विरुद्ध "खालील अनेक उघड आणि छुपे शत्रू / विरोध" असे असेलः १. अतिरेकी, हे तर मुख्य लक्ष्य आहेत आणि त्यांच्यासाठी हे जीवनमरणाचे युद्ध असणार आहे. मुख्य म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीतही स्वतःच्या म्हणण्यासाठी कोणतीच नीतिमात्ता न पाळणारे हे लोक, कोणत्याही थराला जाउन नीचतम पातळी गाठतील हे सांगायची गरज नाही. असे असले तरी अंतरराष्ट्रिय सैन्यावर सर्व खर्‍या आणि मानलेल्या नितीमत्तेने वागण्याची नैतिक जबाबदारी असेल. २. अतिरेक्यांच्या देशातील सरकार आणि सैन्यदले देशाच्या सौर्वभौमतेचा मुद्दा पुढे करून विरोध, छुपे/प्रत्यक्ष युद्ध (आताही पाकिस्तानचा अमेरिकेशी डबल गेम चालू आहेच) करण्याचीच दाट शक्यता आहे. ३. त्या देशातील अतिरेक्यांचे हितसंबंधी, जे मुलकी नागरिक असल्याने त्यांच्यावर सरळ कारवाई साधी गोष्ट नाही, ही एक मोठी आणि धोकादायक डोकेदुखी असेल. ४. परकिय सैन्य आपल्या देशात घुसल्याने रागावलेले मुलकी नागरिक गुप्त कारवाया करू शकतात किंवा सरळसरळ अतिरेक्यांच्या गटात जाउ शकतात. ५. इस्लामी देशात परकिय सैन्य नेण्यास इतर इस्लामी देशांचा विरोध असेल (लिबियामधिल कारवायांच्या वेळी एका बाजूने पाश्चिमात्य देश तेथे "नो फ्लाय झोन करण्यासाठी काहीच करत नाहीत" अशी तक्रार करतानाच त्याच श्वासात "बूट्स ऑन ग्राऊंड" ला झालेला प्रखर विरोध आणि नंतर नो फ्लाय झोन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाँबिंग्मघ्ये काही नागरिकांचा मृत्यु झाला म्ह्णून निषेधही केला गेला, ते आठवा). ६. अतिरेक्यांवर कारवाई केली म्हणुन आणि त्या देशात परकिय सैन्य नेल्याची प्रतिक्रिया म्हणून जगातल्या सर्व अतिरेकी संघटना एकजूटीने / स्वतंत्रपणे जगभर अतिरेकी कारवाया करणार हे नक्की... यामुळे हा संघर्ष एका देशाच्या एका प्रांतापुरत्या न राहता सर्व जगच रणांगण बनेल आणि या बाबतीत जगभर युद्धपातळीवर खबरदारी न घेणे किती आत्मघातकी ठरेल हे नुकत्याच झालेल्या सिडनी प्रकरणासारख्या घटनांवरून समजणे सोपे होईल. ७. तालिबान असलेला भाग अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम आहे, तो पाकिस्तान-अफगाण सीमेच्या दोन्ही बाजूस आहे, तेथे या दोन्हीही देशांच्या सरकारांचे नाही तर स्थानीक टोळ्यांचे आणि अतिरेकी संघटनांचे नियंत्रण आहे. या संघटनांचे सदस्य मनाला येईल तेव्हा कोणत्याही आडकाठीशिवाय तेथिल आंतरराष्ट्रिय सीमा ओलांडतात. एका देशात गुन्हा करून दुसर्‍या देशात पळून जाणे हा त्यांचा नेहमीच डावपेच आहे. तेव्हा युद्ध करणार्‍या आंतरराष्ट्रिय सैन्याला अतिरेक्यांचा पाठलाग (हॉट परस्युट) करताना पाकिस्तान-अफगाणीस्तानची सरहद्द ओलांडण्याची परवानगी असायला हवी. हे आधुनिक काळात केवळ महायुद्धांच्या वेळी शक्य झालेले आहे. म्हणजे ही कारवाई एका देशातील स्थानीक ऑपरेशन न राहता अनेक देश सामील असलेले आंतरराष्ट्रीय युद्ध होईल. ८. अतिरेक्यांच्या विभागाची भौगोलिक परिस्थिती सामान्य युद्ध (conventional warfare) नाही, ते डोंगराळ, दर्‍याखोर्‍यांनी भरलेल्या भागातले गनिमी काव्याचे युद्ध असणार आहे. अश्या युद्धात रणगाडे, तोफा, आर्मर असे ते वापरणार्‍या बाजूचे पारडे वर ठेवणारे मोठे युद्धसाहित्य (हेवी वेपन्स) निरुपयोगी ठरते (तेथे पोहोचू शकत नाही). इतकेच काय तर दर्‍याखोर्‍यांत आणि डोंगरांतील गुहांत लपून राहणार्‍या आणि कोणतेही उघडे मोठे तळ (कँप्स) नसलेल्या शत्रूवर हल्ला करण्यास वायुदल परिणामकारक ठरत नाही. कारण विमानुड्डाणाला बिकट भौगोलिक परिस्थिती बरोबरच एवढ्या मोठ्या भागावर कारपेट बाँबिंग करायला दशलक्ष टनांनी बाँब्ज लागतील. त्याची किंमत मोजणे कठीण तर आहेच पण या कृतीचा बेनेफिट-कॉस्ट रेशो ती कृती वेडेपणाची ठरावी इतका कमी असतो. म्हणूनच अश्या परिस्थितीत ड्रोन वापरून सर्जीकल ऑपरेशन्स केली जातात... परंतु अश्या कृतीचीही किंमत कोलॅटरल डॅमेजने मोजावी लागते, जी स्थानीक जनतेला विरोधी गटात ढकलते आणि काम अधिक कठीण करते. ९. वर सांगितलेली भौगोलिक परिस्थिती अतिरेक्यांना तळहाताच्या रेषांसारखी माहित आहे, पण आंतरराष्ट्रिय सैन्याकरिता अनोळखी जागा असेल. त्यामुळे, केवळ सैन्याची हालचालच नाही तर त्याला लागणारी वाहने, हत्यारे, दारूगोळा, अन्न, इत्यादींचा पुरवठा करणे हे किती कठीण असेल हे सांगायला नकोच... आणि हे अतिरेक्यांच्या सतत होणार्‍या गनिमी आणि आत्मघातकी हल्ल्यांच्या छायेखाली करायला लागेल हे पाहिल्यावर परिस्थितीचे गांभिर्य ध्यानात यावे. अनेक दशके चाललेली यमुनेच्या बिहडांतील दरवडेखोरी आणि मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करी (त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही) आठवली तर किंsssचीत कल्पना यावी... मात्र या तुलनेत फार मोठे फरक असे की, (अ) येथे एका देशातील आंतरराज्य सीमेऐवजी आंतरराष्टिय सीमा ओलांडायची आहे, (आ) बिहड अथवा जंगलांऐवजी येथे हिमालयाच्या (किंवा त्याच्या उपरांगांच्या) दर्‍याखोरी आहेत, (इ) जुन्यापुराण्या बंदूक-रायफल वापरणार्‍या दरवडेखोरांच्या ऐवजी अत्याधुनिक शस्रास्त्रांनी (उखळी तोफा, रॉकेट्स, विमानवेधी तोफा, इ ने सज्ज आणि (ई) अनेक दशके त्याच परिसरात युद्ध करणारे, मरणाला न घाबरणारे माथेफिरू, आत्मघातकी, अतिरेकी आहेत, इ इ इ. या सर्व आणि इतर अनेक गोष्टींमुळे या युद्धात होणारे फायदे व सोसायला लागणारे तोटे (आर्थिक, राजकिय, मानवहानीच्या स्वरुपातील, इ) यांचा "बेनेफिट-कॉस्ट रेशो" परवडणारा रहात नाही... निदान दर चार-पाच वर्षांनी येणार्‍या निवडणूकीतल्या हार-जीतीचा विचार करणार्‍या राजकारण्यांसाठी तर नव्हेच ! हुश्श्य ! आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे... पडद्यामागचे स्थानिक-प्रादेशिक-आंतरराष्ट्रिय राजकारणाचे गोडाउन उघडले तर वरच्या विश्लेषणात झालेली दमछाक म्हणजे सकाळच्या गुलाबी थंडीत रमतगमत केलेला बागेतला फेरफटका ठरावा !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26804
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

>>> मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती. छातीचा साईझ नाही हो, 'वरून' आदेश नसल्याने कृती केली जात नव्हती. आणि 'साधनसंपत्ती'वर पहिला हक्क ज्यांचा आहे त्यांच्याविरूद्ध कृती करण्याचा आदेश 'वरून' कसा येणार?

In reply to by श्रीगुरुजी

बॉर्र..... वरून आदेश देणार्‍यांच्या* छातीचा साईझ कमी असल्याने असं म्हणू !!! *हा प्रतिसाद अश्लील नाही याची नोंद घ्यावी.

* From Jinping to Obama: Here's how the world still hyphenates India with Pakistan * Pakistan faces risks if economic reforms slip: IMF * Barack Obama signs massive defence budget; $1 billion to Pakistan * China-Pakistan Economic Corridor — A new vista of development in South Asia (पाकीस्तान टुडे डॉट्कॉमवर) * Socio-economic impact of terrorism on Pakistan डेली टाईम्स डॉट्कॉम डॉत पीके ऑनलाईन पाकीस्तानी वृत्तपत्र

सैन्य शक्तीने पाकिस्तान प्रॉब्लेम निर्णायकरित्या सोडवणं भारताला प्रॅक्टीकली शक्य असतं तर मला वाटतं भारताने ते एव्हाना केलं असतं. पण भारत तसं करत नाहि याचं कारण आपण फार सहिष्णु आहोत किंवा आपल्या नेत्यांमधे तेव्हढी धमक नाहि असं काहि नाहि (आपण थोडेफार सहिष्णु नक्कीच आहोत, व आपले बरेचसे नेते संसदेत बसायच्या लायकीचे नाहित हे खरे आहे). पण आपण तसं करत नाहि याचं कारण तसलं काहि करण्याची गरज नाहि, आणि करतो म्हटलं तरी ते शक्य नाहि. लमहोंने खता कि और सदियोंने भुगतान किया हे आपल्याला परवडणारं नाहि.

In reply to by अर्धवटराव

सहमत. मात्र आतापर्यंतचा पाकिस्तानचा विरोध फक्त "हातावर हात ठेऊन फक्त निषेध नोंदवणे" या जगभर हास्यास्पद समजल्या गेलेल्या पद्धतीने होत होता. सिमेवरच्या गोळीबाराचे सोडा, पाकिस्तानने आयोजित केलेल्या कोणत्याही भारत-पाकिस्तान व्दिपक्षीय चर्चेच्या स्थानी भारताचा ध्वज उलटा लावला नाही तर आश्चर्य व्यक्त केले जात होते; आणि भारताची त्याप्रसंगी "अश्या चुका होत असतात, त्यांना फार महत्व देउ नये" अश्या प्रतिक्रिया गृहित होत्या. अश्या मुळमुळीत भारताला मित्र मानणे म्हणजे आपले हसे करून घेणे असे जागतिक मत झाले याचे आश्चर्य ते काय ? १. घट्ट आणि विश्वासू राजकारणी संबंध (अ) तो असल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना फायदा होणार असला तर किंवा (आ) तो नसल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना धोका होणार असला तर किंवा (इ) वरच्या दोन्ही शक्यता असल्या तर आणि तरच प्रस्थापित होतात. २. मुळमुळीत धोरण असलेल्या आणि केवळ नीतिमत्तेच्या गप्पा मारणार्‍या देशांना फारसे महत्व मिळ्त नाही. याचे कारण जेवढा वरचा १ क्रमांकाचा मुद्दा असतो तेवढाच असे देश बेभरवश्याचे असतात (वेळप्रसंगी कच खाऊन पाठीराख्या देशाला अडचणीत आणतात) हे ही असते. आंतरराष्ट्रिय राजकारणात भित्र्याचा कोणीच मित्र होऊ इच्छित नाही आणि जो घाबरवू शकतो त्याची मैत्री सगळ्यांना हवी असते किंवा कमीत कमी त्याला उघड विरोध तरी केला जात नाही, हे एक नग्न सत्य आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या अणूकार्यक्रमाला असलेला अमेरिकेचा पायओढा कारभार आणि ऑस्ट्रेलियाचा (ज्यांच्याकडे जगातला विक्रीसाठी उपलब्ध असलेला सर्वात मोठा युरेनियमचा साठा आहे) सबळ विरोध लक्षणियरित्या बदलून त्यांत कृतिशीलता आलेली दिसत आहे. यामागे गेल्या काही महिन्यात "भारतामध्ये पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची राजकिय इच्छाशक्ती असल्याची" आंतरराष्ट्रिय समुदायात झालेली जाणीव आहे. याची मुख्य कारणे : अ) पाकिस्तानला सीमेवरच्या गोळाबरी व इतर कुरापतींची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा कृतिशील संदेश आ) तसे करण्याबरोबरच राजकिय भेटींत पडद्यामागे करण्यात आलेल्या अनेक विश्वासदर्शक खलबते... ज्याची परिणती अशी झाली की, पाकिस्तानने केलेल्या कांगाव्यांचा उपयोग आतापर्यंत भारताला दाबून ठेवण्यात कसा वापरता येईल हे पाहिले जात होते त्याऐवजी त्या कांगाव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आणि पाकिस्तान एकाकी पडण्यात झाली. दुसरी राजकिय खेळी राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार म्हणून श्री अजित दोवाल यांच्या निवडणूकीने खेळली गेली आहे. या पूर्व आयबी संचालकाचे जागतिक व प्रादेशिक गुप्तहेर कारवायांचे ज्ञान आणि पूर्वकर्तृत्व वादातीत आहे... या एकाच घटनेने आयएसआयची झोप बर्‍यापैकी उडाली आहे असे म्हटले जाते. नुकतेच ISIS ने इराकमधे बंदी केलेले भारतिय नागरिक सुखरूप परत आले त्यामध्ये दोवाल यांचे बरेच योगदान होते. आजपर्यंत भारताच्या कोणत्याही निषेधाकडे हास्यास्पद कारणे देत दुर्लक्ष करणार्‍या पाकिस्तानाला तोंडदेखला मान देत का होईना पण मुंबई हल्ल्याचा आरोपी लष्करे तोयबाच्या झाकी उर रहमानला परत नजरकैदेत ठेवावे लागले. या झाल्या उघड कृती. पडद्यामागे याच्या अनेक पटींनी हालचाली सुरू नसल्या तर आश्चर्य असेल. त्या जरी वर दिसत नसल्या तरी उघड कृतींपेक्षा जास्त परिणामकारक असतात. युद्धतंत्राचे सर्वात मोठे तत्व असे आहे की, गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळून मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. कारण थोड्या कालावधित पूर्ण विजय मिळविण्याच्या भरात जेत्यालाही पराभवाचा धोका अथवा अश्या युद्धाची तात्कालिक व/किंवा दीर्घकालीन न परवडणारी किंमत चुकवावी लागते. उदा : १. मराठे आणि अबदाल्ली यांच्यातल्या पानिपतच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांचा पराभव होऊन मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली असली तरी अबदाल्लीचेही इतके नुकसान झाले की त्याला सैन्याच्या विरोधामुळे आणि बंडाळीमुळे अफगाणीस्तानात परतणे भाग पडले. २. इराक आणि अफगाणिस्तानमधल्या युद्धांत झालेला खर्च हे सुद्धा अमेरिकेच्या १८ ट्रिलियन डॉलर इतक्या महाप्रचंड राष्ट्रिय कर्जाचे कारण आहे; आणि त्यामुळे अमेरिकेच्या जागतिक राकारणातल्या वजनात लक्षणिय घट झालेली आहे. ३. दुसरे महायुद्ध जिंकूनही आर्थिक आणि सामरिक रित्या खिळखिळे झालेल्या ब्रिटनला पुढ्च्या पाच-दहा वर्षांत त्याच्या सर्व महत्वाच्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडले आणि जागतिक महासत्तेचा मुकुट अमेरिकेकडे गेला. असो. ही केवळ सुरुवात आहे. (अ) सद्या योग्य दिशेने चाललेल्या भारताच्या आंतरराष्ट्रिय पटलावरच्या वाटचालीने भविष्यात वेग पकडला, (आ) तिला देशांतर्गत सबळ विकासाचे पाठबळ मिळाले आणि (इ) "भारताशी दुष्मनी फारच महागात पडते" हे भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. इतके सर्व असले तरी पाकिस्तानच्या संबंधात (अ) हातावर हात ठेऊन बसणे किंवा (आ) सर्वशक्तीनिशी हल्ला हे दोनही पर्याय सद्यकाळात व्यवहार्य नाहीत. मात्र पाकिस्तानला त्याच्या दु:साहसांची सामरिक, आर्थिक आणि राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे अशी लक्षणे दिसत आहेत.

अणु शक्ती हे दुधारी शास्त्र आहे आणी अणुयुद्ध आतापर्यंत न होण्याचे कारण म्हणजे MAD (mutually assuared destruction) म्हणजे उभयपक्षी विनाश हा ठरलेला असल्याने सहसा कोणी अणु युद्धास धजावलेले नाही. राहिली गोष्ट प्रथम हल्ला करणार नाही (NO FIRST USE) हे लोढणे सुद्धा कागदी आहे. एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. जर यदाकदाचित पाकिस्तानचा समूळ नाश झाला नाही तर वाचलेल्या अणु शस्त्रानी त्यांनी प्रतिहल्ला केला तर दोन तृतीयांश भारत नष्ट होईल. वरील भीती मुळेच पाकिस्तान काही शे अणुशस्त्रे निर्माण करण्याच्या मागे आहे. भारत अणु पाणबुडीतून( चक्र आणी अरिहंत ) डागण्याची आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी याच साठी करीत आहे कि जर जमिनीवरील सर्व शस्त्रे अणूहल्ल्यात नष्ट झाली तरी पाणबुडीतील वाचलेल्या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तान किंवा चीनचा संपूर्ण विध्वंस करता यावा. http://en.wikipedia.org/wiki/Second_strike http://en.wikipedia.org/wiki/Sagarika_(missile) http://en.wikipedia.org/wiki/K-4_%28SLBM%29

In reply to by सुबोध खरे

सहमत. पारंपारिक युद्ध आणि अगदी सुक्ष्म (लो की) अणूयुद्ध यांच्यातही जमीन-अस्मानाचा फरक आहे. अणूयुद्ध म्हणजे एकाच बाँबने एक शहर उद्ध्वस्त करून युद्ध जिंकणे असा समज दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेल्या अणूबॉंब्जमुळे आणि त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाचे पारडे दोस्तराष्ट्रांच्या बाजूने झुकण्यात झाल्याने झाला आहे. सद्याच्या बदललेल्या राजकिय आणि सामरिक वस्तुस्थितीत हे शक्य नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ एक्का काका आपले घटनांचे विश्लेषण आवडले ! गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळूण मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. हा विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. पाकिस्तानचे अस्तित्व हे फक्त आपल्या द्वेषावर अवलंबुन आहे...इथे राज्य करणार्‍याला / नियंत्रण ठेवणार्‍याला हिंदूस्थान्द्वेषाचा एक कलमी कार्यक्रम राबवण्या शिवाय पर्याय नाही,हा त्यांचा इतिहास सुद्धा सांगतो आणि वर्तमान सुद्धा. त्यांची आपल्याशी सरळ युद्ध करण्याची क्षमता नाही हे ते स्वतः जाणुन आहेत त्यामुळेच त्यांनी आपल्या विरुद्ध thousand cuts निती अवलंबली. ते आपल्याशी शांततेने राहु शकत नाहीत कारण प्रचंड हिंसाचार होउनच त्यांच्या या राष्ट्राची निर्मीती झाली आहे.त्यामुळे Pakistan isn't ready for peace with India हेच सत्य आहे आणि आपण हे सत्य कायम ध्यानात ठेवले पाहिजे. राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू अशी लक्षणे दिसत आहेत. +१ @ डॉक एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). हा दॄष्टीकोन लक्षात आला... यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. होय... याचे सध्याचे उदाहरण आपल्या नजरे समोर येत आहे { अर्थात अणूबॉम्बच्या जागी रिअ‍ॅक्टर आहेत.} ११ मार्च २०११ साली जपानच्या फुकुशिमा दायची रिअ‍ॅक्टर अपघात झाला आणि सुनामी बरोबरच जगाने नूक्लिअर रिअ‍ॅक्टर ब्लास्ट सुद्धा पाहिला. या घटनेचे परिणाम आता युएस च्या वेस्ट कोस्ट मधे दिसायला लागले आहेत... Fukushima radation त्यामुळे तुमचे प्रतिपादन योग्यच आहे आणि पाकिस्तानवर असा हल्ला करणं आपल्या हिताच नाही हेच खरं आहे...पण मग सतत न्यूक्लिअर वेपन्स /मटेरिअल जिहादींच्या हाती लागण्याची भिती आहे त्याच काय करायच ? आता अफगाणिस्तान मधुन अमेरिकेचे सैन्य माघारी जायला सुरु होइल आणि या जिहादींना काही काम उरणार नाही,पाकिस्तान आता त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या सारखे भासवेल नंतर याच मंडळींना आपल्या विरुद्ध जुंपतील त्याचे काय ? कारण जे नवाझ शरिफ आज आतंकवादाच्या विरोधात सुर आळवत आहेत त्यांनीच काही दिवसां पूर्वीच हाफिद सईदच्या सभेला जनसागर पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती.त्यामुळे ह्यांच्याकडुन आपल्याला त्रास आहेच ! येत्या वर्षात काय घडामोडी होतात ते पहायला हवे... जाता जाता :- हे दुवे हिंदूस्थान-पाकिस्तानशी संबंधीत नसुन रेडियेशनशी संबंधीत मुद्धाशी असल्याने माहितीसाठी देउन ठेवत आहे. http://www.netc.com/ Tiny amounts of Fukushima radiation found in California Fukushima Radioactivity Detected Off West Coast Sickened by service: More US sailors claim cancer from helping at Fukushima मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

In reply to by मदनबाण

एक्का कांकाचा चेर्नोबिल वरचा प्रतिसाद आणि डॉक यांचा किरणोत्साराचा प्रादुर्भावाचे थोडक्यात विष्लेषण मला या विषयावर अधिक विचार आणि वाचन करण्यास प्रवॄत्त करणारे ठरले.., यातील चेर्नोबिल घटना मला माहित होती आणि त्याबद्धल थोडी फार माहिती होती आणि त्यामुळेच पटकन Bitter butter चा दुवा मला देता आला... यावर अजुन विचार करतोय कारण आपली एनर्जीची गरज आहे आणि न्यूक्लिअर पावरची गरज आणि सेटअप वाढणार आहे. खालील दोन्ही व्हिडीयो नीट ऐकण्या सारखे आहेत...कारण फुकुशिमाचा परिणाम हा चेर्नोबिल पेक्षा जवळपास ८५% जास्त आहेत म्हणतात... आणि ही कधीही न-संपणारी दुर्घटना आहे. ! न्यूक्लिअर वेपनचा वापर करणे हे किती भयानक आहे याचा अंदाजा आला ! Fukushima Forever मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- नायक नही, खलनायक हुं मै :- खलनायक

आमचा एक्स (सर्वार्थानं) मित्र परा म्हणतो तसं खरंच भारतीय च नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची सगळी सूत्रं मिपावरुनच हलतात असा भास होत आहे. :)