Skip to main content

जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 23/12/2014 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे. या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..

वाचने 42453
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

सकाळी ८.५८ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: २६ भाजप: ८ (+३) कॉंग्रेस: ६ (०) नॅशनल कॉन्फरन्स: ६ (-३) पीडीपी: ५ (-१) इतर: १ झारखंड एकूण कल: २३ भाजप: १२ (+५) झामुमो: ४ (०) कॉंग्रेस: २ (-२) झाविमो: ३ (-१) इतर: २ भाजप उमेदवार हिना भट काश्मीर खोऱ्यातील अमीरकदल मतदारसंघातून आघाडीवर.

सकाळी ९.०३ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: २७ भाजप: ९ नॅशनल कॉन्फरन्स: ६ कॉंग्रेस: ५ पीडीपी: ५ इतर: १ झारखंड एकूण कल: ३० भाजप: १७ झामुमो: ६ झाविमो: ३ कॉंग्रेस: २ इतर: २ भाजप उमेदवार हिना भट काश्मीर खोऱ्यातील अमीरकदल मतदारसंघातून आघाडीवर.

सकाळी ९.०९ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ३० भाजप: १० पीडीपी: ८ नॅशनल कॉन्फरन्स: ६ कॉंग्रेस: ५ इतर: १ झारखंड एकूण कल: ३४ भाजप: १९ झामुमो: ८ झाविमो: ३ कॉंग्रेस: २ इतर: २

झारखंडमध्ये भाजपने आता ४१ पैकी २३ ठिकाणी आघाडी घेतली आहे. झारखंडमध्ये भाजपला बहुमत मिळणार असे दिसते. झारखंड मुक्त्ती मोर्चा आणि काँग्रेसमधील युती तुटल्याचा फायदा भाजपला होणार होता हे नक्कीच. जसे अधिकाधिक निकाल येऊ लागतात त्याप्रमाणे आघाडीवरच्या पक्षाला अजून जास्त फायदा होताना दिसतो असे अनेकवेळा बघायला मिळाले आहे. त्यानुसार ८१ पैकी ४७-४९ जागा पक्षाला मिळायला हव्यात.

सकाळी ९.१७ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ४१ भाजप: १५ पीडीपी: १० नॅशनल कॉन्फरन्स: ६ कॉंग्रेस: ६ इतर: ४ झारखंड एकूण कल: ४६ भाजप: २५ झामुमो: १० झाविमो: ५ कॉंग्रेस: ४ इतर: २

एन.डी.टी.व्ही वरील नकाशा बघता भाजपला ज्या १७ जागी आघाडी आहे त्यापैकी १५ जागा जम्मू भागात, १ जागा लडाखमध्ये तर १ जागा काश्मीर खोर्‍यात (श्रीनगर शहरातील अमीरकदाल) आहे. अपेक्षेप्रमाणे जम्मूमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर खोर्‍यामध्ये मात्र पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात टक्कर आहे. जर भाजपने जम्मू भागात स्वीप केले आणि खोर्‍यात इतर तीन पक्षांमध्ये लढत राहिली तर जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत-- साधारण २६ ते २८ जागा जिंकून.

सकाळी ९.१७ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ५३ भाजप: २१ पीडीपी: १४ नॅशनल कॉन्फरन्स: ८ कॉंग्रेस: ६ इतर: ४ झारखंड एकूण कल: ५५ भाजप: २८ झामुमो: १४ झाविमो: ५ कॉंग्रेस: ५ इतर: ३

सकाळी ९.१७ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ८४ भाजप: २३ पीडीपी: २३ नॅशनल कॉन्फरन्स: १७ कॉंग्रेस: १४ इतर: ५ झारखंड एकूण कल: ८० भाजप: ३९ झामुमो: २० झाविमो: ८ कॉंग्रेस: ६ इतर: ७

सकाळी १०.१० वाजता : जम्मू काश्मीर ८४/८७: भाजप : २३ पीडी पी:२३ एनसी : १७ कॉंग्रेस : १४ इतर : ७ झारखंड : ८०/८१ भाजप : ३८ झामुमो : २१ जेविएम : ८ कॉंग्रेस : ६ इतर : ७

झारखंडमध्ये भाजपा सरकार स्वबळावर येणार असं दिसतय. काश्मिरमध्ये पीडीपी+ कॉन्ग्रेस अस येण्याची चिन्ह.

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे असे दिसते. तर पीडीपीने अपेक्षेपेक्षा थोडी वाईट कामगिरी केली आहे. हे लिहित असताना पीडीपी २४ तर भाजप २३ जागांवर आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र येणे कठिण आहे. काँग्रेस पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्सबरोबर गेला तरी आकडे ४४ पर्यंत जात नाहीत. इतरांना ७ जागांवर आघाडी आहे.त्यापैकी सज्जद लोन सारखे लोक भाजपबरोबर येऊ शकतील.पॅन्थर पार्टीला किती जागा आहेत हे बघायला हवे. सध्यातरी असे चित्र आहे की भाजप+पीडीपी किंवा भाजप+नॅशनल कॉन्फरन्स असे सरकार येईल. भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स पूर्वी एकत्र होते आणि पीडीपीबरोबर जाणे भाजपला महाग पडू शकेल.तेव्हा असे दिसते की भाजप+नॅशनल कॉन्फरन्स असे सरकार येईल. बघू काय होते ते. हे लिहित असताना झारखंडमध्ये ८० पैकी ३८ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. इतरांना ७ जागा आहेत. तेव्हा राज्यात भाजपचे सरकार येणार हे नक्की दिसते. झारखंडमध्ये ही तिसरी निवडणुक आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. २००५ मध्ये भाजपला २९ जागा ही आतापर्यंतची कोणत्याही पक्षाची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यापेक्षा भाजपला जास्त जागा मिळत आहेत तरीही लोकसभा निवडणुकांमधला स्वीप लक्षात घेता सहा महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळण्यास अपयश येणे हे भाजपसाठी चांगले चिन्ह नक्कीच नाही. बाबूलाल मरांडींना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर यापुढे झारखंडमध्ये अस्थिरता कायमच राहिल असे दिसते.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात असे काँग्रेसने म्हटले आहे असे एन.डी.टी.व्ही वर आले आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवायला इतर सगळ्यांनी एकत्र येणे हा प्रकार जम्मू-काश्मीर या राज्यातही होईल असे पूर्वी कोणाला वाटलेही नसेल :) हे टाईप करताना भाजप आणि पीडीपी दोन्ही २३ तर झारखंडमध्ये भाजप ४०.

सकाळी १०.२६ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ८७ भाजप: २४ पीडीपी: २३ नॅशनल कॉन्फरन्स: १७ कॉंग्रेस: १५ इतर: ८ झारखंड एकूण कल: ८१ भाजप: ४३ झामुमो: १९ झाविमो: ९ कॉंग्रेस: ५ इतर: ५

काँग्रेसचे प्रवक्ते पवन वर्मा म्हणतात-- बघा भाजपने मिशन ४४+ असे लक्ष्य जम्मू-काश्मीरात ठेवले होते.आता त्यांना त्याच्या अर्ध्याच जागा मिळताना दिसत आहेत.म्हणजे बघा नरेंद्र मोदींचा प्रभाव नाहीच मुळी :) म्हणजे भाजपने आमचे मिशन आमचे डिपॉझिट वाचविणे आहे असे म्हणत निवडणुकांना सामोरे जायला हवे होते की काय? हे लिहित असताना: भाजप आणि पीडीपी दोन्ही २३, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स दोन्ही १७, इतरः ७

अजूनही नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला १७ अधिक १६ बरोबर ३३ जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे ओमर अब्दुल्लांचे सरकार लोकप्रिय नसूनही आणि नुकत्याच झालेल्या पुरात मोठे नुकसान होऊनही जर हे दोन पक्ष एकत्र लढले असते तर ही युती बहुमताच्या बरीच जवळ गेली असती. तीच गोष्ट झारखंडमध्ये. झामुमो आणि काँग्रेस या दोन पक्षांना आता २०+७=२७ जागा मिळताना दिसत आहेत. हे दोन पक्ष एकत्र लढले असते तर अजून काही जागांचा फायदा झाला असता. काँग्रेसचा अभूतपूर्व असा मोठा पराभव लोकसभा निवडणुकांमध्ये झाल्यावर आणि गेल्या सहा महिन्यात पक्ष कमबॅक करत आहे असे चित्र दिसत नाही. तरीही या दोन्ही राज्यांमध्ये युती तोडून स्वबळावर लढायचा निर्णय पक्षाला महाग पडला असे दिसत आहे.

In reply to by क्लिंटन

स्वबळावर लढायचा निर्णय
भाजपाचे स्वबळावर लढून मिळालेले यश पाहून हा निर्णय घेतलेला असू शकतो. याने आमचा पक्ष कुठल्या प्रादेशिक पक्षासमोर लोळणार नाही असा ताकदीचा संदेश जात असावा.

सकाळी ११.०० वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ८७ भाजप: २४ पीडीपी: २४ नॅशनल कॉन्फरन्स: १७ कॉंग्रेस: १६ इतर: ६ झारखंड एकूण कल: ८१ भाजप: ४० झामुमो: २१ कॉंग्रेस: ८ झाविमो: ७ इतर: ५

गेल्या १५ मिनिटात परिस्थिती आणखी बदलली आहे. झारखंडमध्ये भाजप ३७ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात भाजप बहुमतापेक्षा ३-४ जागा कमी पडत असतील तर ते पक्षासाठी नक्कीच काळजी करण्यासारखे आहे. खरे सांगायचे तर भाजपला सुशासन आणि स्थैर्य या मुद्द्यावर कुठचे राज्य जिंकणे सर्वात सोपे होते तर ते म्हणजे झारखंड. तरीही स्वबळावर बहुमत मिळवता येत नसेल तर मात्र नक्कीच चिंतेची गोष्ट आहे. काश्मीरात आता पीडीपीला २७ तर भाजपला २३ जागा मिळाल्या आहेत.

सकाळी ११.०१ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ८७ पीडीपी: २९ भाजप: २५ कॉंग्रेस: १५ नॅशनल कॉन्फरन्स: १२ इतर: ६ झारखंड एकूण कल: ८१ भाजप: ३८ झामुमो: २२ कॉंग्रेस: ८ झाविमो: ८ इतर: ५

जम्मू-काश्मीरमध्ये २००२ ची पुनरावृत्ती व्हायची शक्यता दिसत आहे. सध्या पीडीपीला ३० तर काँग्रेसला १४ ठिकाणी आघाडी आहे.म्हणजे हे दोन पक्ष एकत्र आले तर बहुमत होईल.परत एकदा मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्री होतील ही शक्यता सर्वात जास्त. २००२ मध्ये काँग्रेसला २० तर पीडीपीला १६ जागा होत्या.तेव्हा पहिली ३ वर्षे मुफ्ती महंमद सईद तर नंतरची ३ वर्षे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला होता. यावेळी पीडीपीला बर्‍याच जास्त जागा आहेत. तेव्हा पीडीपी काँग्रेसला अर्धा काळ मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होईल असे वाटत नाही.

जम्मू काश्मिरमध्ये या वेळी मतदानाची टक्केवारी बरी होती म्हणतात. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळतात हे बघणे रोचक असू शकेल. या क्षणाला भाजपा सर्वाधिक म्हणजे २४.३ % मते घेऊन टक्केवारीत पुढे आहे. पिडीपी २२.१ टक्के घेउन दुसर्‍या क्रमांकावर , नॅशनल कॉन्फरन्स २०.५% काँग्रेस १७.९ टक्के उर्वरीत टक्केवारी इतर छोट्या पक्षांमध्ये. अजुन मत मोजणी चालू असली तरी ट्रेंडचा अंदाजा येण्यास पुरेसे असावे. (संदर्भ) ढोबळ मानाने पहावयाचे झाल्यास या चारी पक्षांचे मिळून ८५ % होतात १५% मते उर्वरीत छोट्या पक्षांकडे म्हणजे बर्‍यापैकी आहेत असे दिसते.

दुपारी १२.३८ वाजता जम्मू काश्मीर एकूण कल: ८७ पीडीपी: २९ भाजप: २५ कॉंग्रेस: १५ नॅशनल कॉन्फरन्स: १२ इतर: ६ झारखंड एकूण कल: ८१ भाजप: ३९ झामुमो: २० कॉंग्रेस: ७ झाविमो: ७ इतर: ८

In reply to by टवाळ कार्टा

मजा येईल म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल असा दावा नाहीये, तर विचारजंतांची अवस्था बघायला मजा येईल असा अंमळ स्वार्थी इ. विच्यार आहे.

In reply to by बॅटमॅन

चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच जम्मू-काश्मिरात तर लय मजा येईल.
सध्या तरी तसे होताना दिसत नाही. भाजपला २६ तर पीडीपीला ३० जागांवर आघाडी आहे.जर हे आकडे उलटे असतील तर भाजपचा मुख्यमंत्री व्हायची जरा तरी शक्यता असेल अन्यथा नाही. त्यासाठी जम्मूमधून आणखी ३-४ जागा जिंकायला हव्यात. मलाही जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा हिंदू नेता मुख्यमंत्री व्हावा असे फार वाटते.मग कळेल कोण खरे सेक्युलर आहे ते. तसेही २००८ मध्ये अमरनाथ बोर्डाला श्रीनगरमध्ये जागा देण्यावरून जे घमासान झाले त्यावरून ही स्वयंघोषित सेक्युलर मंडळी किती हलकट आहेत ते समजले होतेच.

In reply to by बॅटमॅन

ओमार अब्दुल्ला ने भाजपला ऑफर दिली आहे म्हणे...फक्त ३७० चा आग्रह सोडण्याची अट ठेवलीय.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

४ वाजेपर्यंत थांबा. झारखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसेल. आताची परिस्थिती: भाजप - ४०, झामुमो - १८, झाविमो - ७, काँग्रेस - ७, इतर - ९ जम्मू-काश्मिरमध्ये (१) पीडीपी + काँग्रेस किंवा (२) पीडीपी + भाजप अशा दोनच शक्यता आहेत. नॅकॉ कोणत्याही परिस्थितीत सत्तेत नसेल. आताची परिस्थिती: भाजप - २५, पीडीपी - ३२, नॅकॉ - १२, काँग्रेस - १२, इतर - ६

झारखंडमध्ये आता भाजप ४१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या आघाडीचा आकडा ३६ ते ४२ मध्ये वरखाली होत आहे. मागच्या वर्षी छत्तिसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जबरदस्त चुरस चालू होती त्याची आठवण होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आताच राजदीप सरदेसाईने हेडलाईन्स टुडेवर जाहीर केले की ओमर अब्दुल्लाचा बिरवामधूनही पराभव झाला आहे. २००२ मध्ये त्याचा गंदरबाल या अब्दुल्ला कुटुंबियांच्या तथाकथित बालेकिल्ल्यातूनही पराभव झाला होता.

In reply to by क्लिंटन

हुर्रे! या अब्दुल्ला कुटुंबियांनीच जम्मू-काश्मिरचे वाटोळे केले आहे. दोन्हीकडून पराभव ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. झारखंडमध्ये मात्र मधू कोडा सोडला तर फारसे खळबळजनक निकाल नाहीत.

In reply to by क्लिंटन

हेडलाईन्स टुडेवर एक तासापूर्वी ओमर अब्दुल्लाचा बिरवाहमध्ये पराभव झाला असे जाहिर केले होते.पण आताच एन.डी.टी.व्ही वर ओमर अब्दुल्ला इतका वेळ बिरवाहमध्ये मागे होता पण आता १०० मतांनी आघाडीवर आहे असे जाहिर केले. निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावही ओमर १०८ मतांनी आघाडीवर आहे असे दिले आहे.

जम्मू लोकसभा मतदारसंघात २० विधानसभा जागा आहेत. २००८ मध्ये त्यापैकी ८ मतदारसंघांमध्ये भाजपने, ५ मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसने, ४ मतदारसंघांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने, २ मतदारसंघांमध्ये पीडीपीने तर एका मतदारसंघात बसपाने विजय मिळविला होता. सध्या उपलब्ध असलेल्या कलांनुसार १३ जागांवर भाजप, ३ जागांवर नॅशनल कॉन्फरन्स, ३ जागांवर पीडीपी तर एका जागेवर आघाडीवर आहे. भाजपने जम्मू शहरामधील सर्व मतदारसंघांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. काही मतदारसंघांमध्ये (उदाहरणार्थ कालाकोट आणि अखनूर) भाजपने आश्चर्यकारक आघाडी मिळवली आहे.या दोन मतदारसंघांमध्ये भाजपला २००८ मध्ये बरीच कमी मते मिळवली होती. तरीही जम्मूमध्ये २० पैकी १३ हा आकडा अजून तरी कमी वाटत आहे. किमान १६ ते १७ जागा भाजप जम्मू लोकसभा मतदारसंघातून जिंकेल असे वाटले होते. नागरोटा या मागच्या वेळी जिंकलेल्या जागेवर भाजप पिछाडीवर आहे. तरीही ठिक आहे. २० पैकी १३ हा आकडा तितकाही वाईट नाही.

उधमपूर लोकसभा मतदारसंघात १७ विधानसभा जागा आहेत. २००८ मध्ये त्यापैकी ५ मतदारसंघांमध्ये भाजपने, ८ मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसने, १ मतदारसंघांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने, २ मतदारसंघांमध्ये पॅन्थर्स पार्टीने तर १ मतदारसंघात बसपाने विजय मिळवला होता. सध्या उपलब्ध असलेल्या कलांनुसार १२ जागांवर भाजप, ४ जागांवर कॉंग्रेस तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. भाजपला उधमपूरमध्ये चांगले यश मिळत आहे. म्हणजे जम्मू विभागातील ३७ जागांपैकी २६ जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे.

झारखंडमध्ये याक्षणाला लालूंचा राष्ट्रीय जनता दल दोन जागांवर तर नितीश कुमारांचा जनता दल (संयुक्त) एकाही जागेवर आघाडीवर नाही. गेल्या काही महिन्यात मुलायम,लालू आणि नितीश कुमार एकत्र येऊन आणखी एका जनता दलाचे लोणचे घालणार अशा बातम्या आल्या आहेत. ही समाजवादी मंडळी किती वेळा एकत्र आली आहेत आणि किती वेळा फुटली आहेत याची गणतीच नाही. तरीही झारखंडमध्ये या लोणच्याचा जो धुव्वा उडत आहे त्यावरून सुरवात तर खूपच चांगली होत आहे असे दिसते.

झारखंड आताची परिस्थिती: भाजप - ४२, झामुमो - १७, झाविमो - ६, काँग्रेस - ८, इतर - ८ भाजपचा माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा पडलेला आहे आणि आधी भाजप व नंतर झारखंड विकास मोर्चाचा माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी मागे आहे. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन एका मतदारसंघातून जिंकला आहे व दुसर्‍या मतदारसंघात मागे आहे. जम्मू-काश्मिर परिस्थिती थोडी बदलली आहे. आताची परिस्थिती: भाजप - २५, पीडीपी - २९, नॅकॉ - १५, काँग्रेस - १२, इतर - ६

झारखंड आताची परिस्थिती: भाजप - ४०, झामुमो - १९, झाविमो - ६, काँग्रेस - ८, इतर - ८ जम्मू-काश्मिर आताची परिस्थिती: भाजप - २५, पीडीपी - २९, नॅकॉ - १६, काँग्रेस - ११, इतर - ६

झारखंड (एकूण जागा - ८१) भाजप+ : ४२, झामुमो - १९, झाविमो - ८, काँग्रेस - ६, इतर - ६ जम्मू-काश्मिर (एकूण जागा - ८७) भाजप - २५, पीडीपी - २८, नॅकॉ - १५, काँग्रेस - १२, इतर - ७ मोदी पंतप्रधान झाल्यावर एकूण ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापैकी २ रा़ज्यात भाजपला बहुमत मिळाले, एका राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष ठरून भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि एका राज्यात भाजप दुसर्‍या क्रमांकावर आहे. यापूर्वी या चारपैकी ३ राज्यात भाजप ३ र्‍या क्रमांकाचा किंवा त्यापेक्षा खालचा क्रमांक असलेला पक्ष होता. झारखंडमध्ये मात्र भाजप व झामुमो प्रत्येकी १८ जागा मिळवून प्रथम क्रमांकावर होते. या चारही राज्यात भाजप सत्तेवर नव्हता. परंतु आता ३ राज्यात भाजप सत्तेवर असेल व कदाचित काश्मिरमध्येही सत्तेत सहभागी असेल. २००८/०९ च्या तुलनेत भाजपने मोठी झेप घेतलेली आहे. २००८/०९ मध्ये काँग्रेस हरयाना व महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर होती आणि झारखंड व काश्मिरमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होती. हरयाना व महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होता व इतर दोन राज्यात काँग्रेस सत्तेत सहभागी होती. २०१४ मध्ये काँग्रेस दोन राज्यात ४ थ्या क्रमांकावर गेली आहे आणि हरयाना व महाराष्ट्रात काँग्रेस ३ र्‍या क्रमांकावर घसरली आहे. कोणत्याही रा़ज्यात काँग्रेस सत्तेत नाही. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या काही रा़ज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून राजकीय पंडीतांनी मोदीलाट संपली असा निष्कर्ष काढून आनंद व्यक्त केला होता. या चार राज्यांचे निकाल पाहून आपलेच शब्द गिळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या काही रा़ज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून राजकीय पंडीतांनी मोदीलाट संपली असा निष्कर्ष काढून आनंद व्यक्त केला होता. या चार राज्यांचे निकाल पाहून आपलेच शब्द गिळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
+१. आता यापुढे २०१५ मध्ये सुरवातीला दिल्ली आणि नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका ही दोन मोठी आव्हाने मोदींपुढे आहेत. दिल्लीच्या निवडणुका वाटतात तितक्या सोप्या जाणार नाहीत.लोकसभेत भाजपने दिल्लीत पूर्ण स्वीप केला पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी परत आआप डोके वर काढेल ही शक्यता आहेच. तसेच बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमार यांचे संयुक्त आव्हान परतवून लावणे तितके सोपे जाणार नाही. या दोन्ही निवडणुका भाजपने जिंकल्यास मात्र पक्षात, संसदेत आणि राज्यांमध्येही एकहाती वर्चस्व असलेल्या पंतप्रधानांमध्ये इंदिरा गांधींनंतर मोदी त्या लीगमध्ये सामील व्हायच्या बरेच जवळ जातील.

In reply to by क्लिंटन

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला झारखंड मध्ये ६० विधानसभा क्षेत्रामधून आघाडी होती. आता फक्त ३७ जागा भाजप स्वतः जिंकू शकली. पण त्यामुळे भाजपला अपयश आले असे म्हणणे मला चुकीचे वाटते. मला वाटते विधानसभेचे dynamics पूर्णत: वेगळे असतात. त्यामुळे बरेच पत्रकार लोकसभेसारखे यश का मिळाले नाही असा प्रश्न करताना हा मुद्दा विसरत आहेत. बाकी बिहार आणि दिल्ली मध्ये नेमके काय होते हे पाहण्यासारखे आहे.

In reply to by सव्यसाची

झारखंडमध्ये मित्रपक्षांसह ८१ पैकी ४२ जागा जिंकून भाजपने बहुमत मिळविले.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मते देताना मतदार वेगळ्या मुद्द्यांचा विचार करून मते देतात हा माझा अत्यंत आवडता हायपोथिसिस आहे.झारखंड हे राज्य त्याचे बर्‍यापैकी चपखल उदाहरण आहे असे म्हटले तरी चालेल. २००४ मध्ये भाजपचा राज्यात धुव्वा उडाला होता. १४ पैकी अवघी १ जागा (बाबूलाल मरांडींची कोदरमा) भाजपने जिंकली होती. त्या निवडणुकांमध्ये यशवंत सिन्हांचाही पराभव झाला होता.पण त्यानंतर ९ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपने २९ तर मित्रपक्ष जनता दल (युनायटेड) ने ६ अशा ३५ जागा जिंकल्या. लोकसभेत २००९ मध्ये भाजप आघाडीने १४ पैकी ८ जागा जिंकल्या पण त्यानंतर ७ महिन्यातच विधानसभेत प्रचंड प्रमाणावर फ्रॅक्चर्ड जनादेश लोकांनी दिला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात किती मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती हा नक्की आकडा मला माहित नाही. पण तरीही नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे प्रस्थापित राजकारणातील आडाखे बदलून टाकणारे नेते आहेत असे चित्र आतापर्यंत उभे राहिले आहे. झारखंडने असा प्रचंड वेगळा कौल देणे हे आतापर्यंतचे प्रस्थापित राजकारण झाले.ते मोदी बदलू शकतात का हा प्रश्न होता. त्यामुळे पत्रकार असे प्रश्न विचारत आहेत. तरीही भाजपने काठावरचे का होईना बहुमत मिळवले त्यामुळे मोदींच्या प्रस्थापित राजकारण बदलायच्या क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहावे असे काही झाले नाही. पण गाडी तर ३४-३५ मध्ये अडकली असती तर मात्र मोदींच्या त्या क्षमतेवर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले असते.

In reply to by क्लिंटन

>>> २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात किती मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती हा नक्की आकडा मला माहित नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने झारखंडमध्ये ५६ मतदारसंघामध्ये व काश्मिरमध्ये ४४ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती.

In reply to by श्रीगुरुजी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने झारखंडमध्ये ५६ मतदारसंघामध्ये व काश्मिरमध्ये ४४ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती.
काश्मीरमध्ये ४४? जम्मू विभागात (जम्मू आणि उधमपूर लोकसभा मतदारसंघ) ३७ तर लडाखमध्ये ४ जागा आहेत. म्हणजे भाजपला काश्मीर खोर्‍यातील ३ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती?

In reply to by क्लिंटन

>>> लोकसभेत भाजपने दिल्लीत पूर्ण स्वीप केला पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी परत आआप डोके वर काढेल ही शक्यता आहेच. तशी शक्यता कमी आहे. मुख्यमंत्रीपद सोडून पलायन करणार्‍या केजरीवालांना दिल्लीकर अजूनही क्षमा करण्याच्या मनस्थितीत नाहीत. गेल्या २ महिन्यात ३-४ मतदान सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. सर्व सर्वेक्षणात भाजप ४०+, आआप २५ च्या आसपास व काँग्रेस ५-६ असा अंदाज आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आआपचे अनेक नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. जशी निवडणुक जवळ येईल तसे आआपला अजून मोठे भगदाड पडेल. >>> तसेच बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमार यांचे संयुक्त आव्हान परतवून लावणे तितके सोपे जाणार नाही. लालू, नितीश व काँग्रेस नुकत्याच झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत एकत्र आले होते. राजद ४, संजद ४ व काँग्रेस २ असे जागावाटप होते. राजदने ३, संजदने २ व काँग्रेसने १ जागा जिंकली होती. परंतु डिसेंबर २०१५ असणार्‍या विधानसभा निवडणुकीत हे पक्ष एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. वरील फॉर्म्युलाप्रमाणे बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी राजद व संजद च्या वाट्याला प्रत्येकी ९७-९८ जागा येतील व काँग्रेसच्या वाट्याला ४८ जागा येतील. सध्याच्या विधानसभेत संजदचे १२३ आमदार आहेत. इतके आमदार असताना संजद फक्त ९७-९८ जागा लढविणे अशक्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे असल्याने राजद देखील निम्म्यापेक्षा कमी जागा लढविणे शक्य नाही. जरी काँग्रेसला बाजूला ठेवले तरी राजद व संजदच्या वाट्याला जेमतेम १२१-१२२ जागा येतील व त्यामुळे दोन्ही पक्षांना इतक्या कमी जागा लढविणे मान्य होणार नाही. जर संजदने ९७-९८ जागाच लढविल्या तर किमान २५ आमदारांचे तिकीट कापावे लागेल व ते आमदार तातडीने भाजपमध्ये जातील. त्यामुळे या तीन पक्षांची भविष्यात युती अशक्य आहे. राजद + काँग्रेस किंवा संजद + काँग्रेस अशी युती मात्र नक्की होऊ शकते. अशा परिस्थितीत तिरंगी लढत होऊन फायदा भाजपचाच होईल. जातीयवादी पक्षांविरूद्ध एकजूट करून लढण्याच्या गप्पा मारणे सोपे असते. प्रत्यक्षात कोणताही पक्ष कमी जागांवर लढायला तयार होत नाही. सर्वांचाच तोटा होत आहे हे लक्षात येऊनसुद्धा कोणताही पक्ष दुसर्‍या पक्षाला जास्त जागा देण्यास तयार नसतो. महाराष्ट्रात सेना-भाजपच्या बाबतीत असेच झाले होते. एकटे लढल्यावर आपले खूप नुकसान होईल हे माहीत असूनसुद्धा सेनेच्या ताठरपणामुळे युती होऊ शकली नव्हती व सेना १०० च्या पुढे जाण्याऐवजी ६३ वरच अडकली.

In reply to by श्रीगुरुजी

जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे, नाहितर या देशाने तेरा दिवसाच्या सत्तेसाठी पिपासु असलेले व ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करुन निवडणुक जिंकली, त्यांच्याशी निर्लज्ज युती करणारे भाज्यपेही पाहिले आहेत. उठसुठ नैतिकतेचा राग आळवणारे संघी सत्तेसाठी कुणाशीही युती करु शकतात हेच सांप्रत सत्य आहे

In reply to by ग्रेटथिंकर

जर केजरीवालांनी नैतिकता दाखवली होती तर आता परत एकदा संधी द्या, त्यावेळी राजीनामा दिला ही चूक झाली असं म्हणून जनतेसमोर भीक का मागत आहेत? तेव्हा लोकसभा निवडणुकीत हीरो बनून आपल्याला राष्ट्रीय पातळीवर प्रोजेक्ट करण्याची त्यांना घाई झाली होती हेच खरं. बरं, निवडणूक लढवून मग पद सोडणं हेही केजरीवाल करू शकले असते पण आम आदमी पार्टी म्हणजे आपणच असा त्यांचा भ्रम होता.बरं, त्या ४९ दिवसांत काय दिवे लावले? जनता दरबार गुंडाळावा लागला, सोमनाथ भारतींनी अधिकार नसताना किरकी एक्स्टेन्शन भागात परकीय नागरिकांवर दादागिरी करुन स्वत:चं हसं करुन घेतलं. त्यामुळे सत्ता संभाळणं वाटतं तितकं सोपं नाही हे केजरीवालांना कळलं आणि त्यांनी जनलोकपाल विधेयकाची संधी साधून पलायन केलं. नैतिकता? My Foot!

In reply to by बोका-ए-आझम

बाकी माहीत नाही , पण स्थानिक मित्राच्या महिती नुसार त्या भगात राहणारे नायजेरियन आणि इतर परदेशी मुले ड्रग्स आणी देहविक्रय या मध्ये गुंतले होते आणि त्यांच्या पार्टीज , व्यवसाय यांचा त्रास सोसायटी मधे सर्वांना व्ह्यायचा. पोलिस हप्ता घेउन गप्प बसायचे , त्या मुळे य कारवाईला स्थानिक पाठिंबा मिळाला .

In reply to by कपिलमुनी

सोमनाथ भारतींना अशी 'टिप' मिळाली होती की हे परकीय नागरिक अशा प्रकारच्या गोष्टी करतात. त्याची शहानिशा न करताच त्यांनी धाड टाकली. बरं, ते ठीक आहे पण तिथे त्यांची झडती घेण्याचा आणि त्यांना (अगदी स्त्रियांनाही) लघवीचा नमुना देण्याचा अधिकार पोलिसांशिवाय कोणालाही नव्हता. शिवाय दिल्लीमध्ये पोलिस हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात त्यामुळे त्यांनी भारतींनी केलेल्या ' कारवाई' बद्दल नापसंती व्यक्त केली आणि त्यामुळे दुस-या दिवशी लगेचच दिल्लीचे मुख्यमंत्री धरणं धरून बसले. सोमनाथ भारतींच्या या कृत्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आणि त्यांना नोटिस पाठवली जिला भारतींनी उत्तर पाठवलं नाही आणि नंतर आपल्याला ही प्रक्रिया माहीत नव्हती अशी सारवासारव केली. रच्याकने, हा माणूस वकील आहे. ही केजरीवाल आणि त्यांच्या कंपूची 'नैतिकता' आहे.

In reply to by ग्रेटथिंकर

>>> जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे, हहपुवा :YAHOO:

In reply to by ग्रेटथिंकर

>>> जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे नानासाहेब, तुम्ही तुमच्या पूर्वीच्या "टॉपगिअर्ड फिलॉसॉफर" या अवतारात असताना केजरीवालांविषयी खालील भाष्य केले होते. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ ________________________________________________________________________________ आता अचानक केजरीवाल तुम्हाला नैतिकतेचे प्रदर्शन करणारे वाटायला लागले काय. कमाल आहे तुमच्या कोलांट्या उडीची.

In reply to by श्रीगुरुजी

इतके आमदार असताना संजद फक्त ९७-९८ जागा लढविणे अशक्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे असल्याने राजद देखील निम्म्यापेक्षा कमी जागा लढविणे शक्य नाही. जरी काँग्रेसला बाजूला ठेवले तरी राजद व संजदच्या वाट्याला जेमतेम १२१-१२२ जागा येतील व त्यामुळे दोन्ही पक्षांना इतक्या कमी जागा लढविणे मान्य होणार नाही.
ही शक्यता आहेच. नोव्हेंबर २०१५ पर्यंत काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणावर मार खायला सुरवात होऊन २ वर्षे झाली असतील. बिहारमध्ये सत्तेत येणे पक्षाच्या भवितव्यासाठी अगदीच महत्वाचे असेल.२००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लालू-काँग्रेस आणि पासवान अशी महायुती होती.त्यात काँग्रेसने ४० पैकी ४ जागा लढवायला तयार होऊन पडती बाजू स्विकारली होतीच.त्याची पुनरावृत्ती अगदीच अशक्य नाही. दुसरे म्हणजे लालूंच्या राजकिय भवितव्याचा प्रश्न असल्यामु़ळे तडजोड करायला ते तयार होऊ शकतील ही पण शक्यता आहेच. २०१० मध्ये नितीश कुमारांनी भाजपसाठी ११० जागा सोडल्या होत्या.तितक्या जागांवर लालू तयार होणारच नाहीत असेही नाही.शेवटी राजदचे विधानसभेत २२ आमदारच आहेत.त्या तुलनेत ११० जागा मिळणार असतील तर राजदला अगदीच चालणार नाही असेही नाही.तसेच या ११० जागांवर गेली कित्येक वर्षे नितीश कुमारांचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनाही या जागा राजदसाठी सोडायला हरकत असेल असे वाटत नाही. १९९० च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि जनता दलाने गुजरात आणि राजस्थानात सीट अ‍ॅडजस्टमेन्ट केले होते. म्हणजे बहुसंख्य जागांवर सहमती झाली तिथे एका पक्षाचाच उमेदवार होता.तर उरलेल्या तीसेक जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले होते.तसे बिहारमध्ये होऊच शकणार नाही असेही नाही. मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूध्द आपलाच एखादा बंडखोर उभा करायचा आणि तो जिंकल्यास त्याला "सन्मानाने" स्वगृही परत घेऊन आपले बळ एकने वाढवायचे असे प्रकारही युती करणारे पक्ष करत असतातच. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुका हा लालू आणि नितीश या दोघांसाठीही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र लढणार असे गृहित धरूनच भाजपने व्यूहरचना केली पाहिजे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे महागात पडू शकते.

In reply to by क्लिंटन

>>> दुसरे म्हणजे लालूंच्या राजकिय भवितव्याचा प्रश्न असल्यामु़ळे तडजोड करायला ते तयार होऊ शकतील ही पण शक्यता आहेच. २०१० मध्ये नितीश कुमारांनी भाजपसाठी ११० जागा सोडल्या होत्या. २०१० मध्ये भाजप १०२ व संजद १४१ असे जागावाटप होते. >> तितक्या जागांवर लालू तयार होणारच नाहीत असेही नाही.शेवटी राजदचे विधानसभेत २२ आमदारच आहेत.त्या तुलनेत ११० जागा मिळणार असतील तर राजदला अगदीच चालणार नाही असेही नाही.तसेच या ११० जागांवर गेली कित्येक वर्षे नितीश कुमारांचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनाही या जागा राजदसाठी सोडायला हरकत असेल असे वाटत नाही. राजदचे फक्त २२ आमदार असले व संजदचे १२३ असले तरी मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजदचे ४ खासदार निवडून आले आहेत तर संजदचे फक्त २ आले आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत आपलीच ताकद जास्त असल्याची लालूची समजूत आहे. दुसरीकडे १२३ सिटिंग आमदार असताना संजद १५० पेक्षा कमी जागा मान्य करणे शक्य नाही. तसे झाले तर राजद व काँग्रेससाठी एकत्रित जेमतेम ९३ जागा उरतात. काँग्रेस आघाडीत आले नाही तरी राजद फक्त ९३ जागा लढविणे मान्य करणार नाही. संजदपेक्षा कमी जागा लढविणे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून देण्यासारखे आहे. लालू हे कधीच मान्य करणार नाही. लालू आणि नितीशकुमार सध्या कितीही प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारत असले तरी मनातून दोघेही एकमेकांवर डूख धरून आहेत. निव्वळ पोटनिवडणुकीसाठी दोघे एकत्र होते. प्रत्यक्ष निवडणुकीत ते एकमेकांविरूद्धच असतील. >>> २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुका हा लालू आणि नितीश या दोघांसाठीही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र लढणार असे गृहित धरूनच भाजपने व्यूहरचना केली पाहिजे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे महागात पडू शकते. राजद व संजद एकत्र येणे अशक्य आहे. राजद + काँग्रेस किंवा संजद + काँग्रेस अशी युती नक्कीच होईल. काँग्रेसला ७०-८० जागा सोडून उरलेला पक्ष १६०-१७० जागा लढवेल.

In reply to by श्रीगुरुजी

२०१० मध्ये भाजप १०२ व संजद १४१ असे जागावाटप होते.
हो बरोबर. त्यावेळी भाजपचा स्ट्राईक रेट ९०% पेक्षा जास्त होता.
लालू आणि नितीशकुमार सध्या कितीही प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारत असले तरी मनातून दोघेही एकमेकांवर डूख धरून आहेत. निव्वळ पोटनिवडणुकीसाठी दोघे एकत्र होते. प्रत्यक्ष निवडणुकीत ते एकमेकांविरूद्धच असतील.
तसे झाले तर अति उत्तम.

In reply to by क्लिंटन

जर बिहार विधानसभेत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तरच हे घडू शकते असं मला वाटतं. आत्ता दोघंही परस्परांची गरज म्हणून एकत्र आले आहेत. पण जर पराभव झाला तर सच्च्या समाजवाद्यांप्रमाणे एकमेकांवर दोषारोप करुन ते वेगळे होतील.

In reply to by क्लिंटन

दोन पक्षांची युती झाल्याने त्यांना मिळालेल्या मतांची पण बेरीज होते हा चुकीचा समज आहे. बर्‍याच वेळेला युती करुन नुकसानच होत असते. ज्या प़क्षाला दुसर्‍या प़क्षासाठी जागा सोडायला लागते त्या प़क्षाचे बरेसचे लॉयल मतदार हे एक तर मतदानच करत नाहीत किंवा विरुद्ध पक्षाला करतात. युती करुन मतांची बेरीज होत असती तर आठलल्यांच्या आरपीआय ला २-४ जागा तरी मिळाल्या असत्या आत्ताच्या निवडणुकीमधे.

In reply to by प्रसाद१९७१

कोथरुड मधल्या भाजपाच्या नेहमीच्या मतदारांनी २००९ मधे मनसे चा पर्याय उपलब्ध झाल्यावर मनसेला मतदान केले. पण २०१४ मधे भाजप पण रींगणात आल्यामुळे कोथरुड मधले भाजपीय मतदार पुन्हा भाजप कडे आले. कोथरुड मधे ह्या वेळेस पण युती असती तर कदाचित मनसे निवडुन आली असती.

In reply to by प्रसाद१९७१

हो बरोबर. ही गोष्ट महाराष्ट्रात नक्कीच लागू पडते.पण बिहारसारख्या राज्यात मतदान जातीनिहाय होत असल्यामुळे दोन अधिक दोन चार हे आतापर्यंत बघायला मिळाले आहे. (२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वेगळे निकाल लागले). यापुढचे सांगता येत नाही.

आजच्या लोकसत्तेच्या अग्रलेखात काही गंभीर म्हणता येतील अशा चुका आहेत . छत्तिस गड च्या अजित जोगी ना त्यांनी झारखंड मध्ये नेउन टाकले आहे . नुकत्याच झालेल्या झारखंड निवडणुका मध्ये त्यांनी कॉंग्रेस च नेतृत्व केल असा जावई शोध त्यांनी लावला असून वर कॉंग्रेस च्या पराभवाच खापर पण जोगी यांच्या डोक्यावर फोडलं आहे . तसच अब्दुल्ला घराण्यां मधल यापूर्वी कोणीही निवडणुकीत पडल नाही अस विधान बेधडक पण केल आहे . वास्तविक पाहता उमर अब्दुल्ला एकदा यापूर्वी पण निवडणुकीत पडले आहेत . ज्या गोष्टी राजकारणात रस असणारया सर्वसामान्य लोकाना पण माहित असतात त्या गांजलेल्या शेतकऱ्यापासून देशाच्या पंतप्रधाना ना उपदेशाचे डोस पाजणार्या लोकसत्ता काराना माहित नसाव्यात याचे अमळ आश्चर्य वाटून राहिले भौ