✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

PK च्या प्रतीक्षेत...

म
मंदार कात्रे यांनी
Fri, 12/19/2014 - 00:59  ·  लेख
लेख
गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली . उद्या १९ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून हिरानीच्या पूर्वीच्या "थ्री इडियट्स" प्रमाणेच हा सिनेमा हिन्दी चित्रसॄष्टीतील "माइलस्टोन " ठरेल असा कयास आहे याचे कारण आमिर म्हणजे मुख्य नायक हा "एलियन" असल्याची वदन्ता असून "पीके"ची स्टोरी सर्वार्थाने निराळी आणि "युनिक" आहे ,असे समजते. http://www.ibtimes.co.in/pk-movie-review-by-viewers-live-update-617664 pk
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39575 वाचन

💬 प्रतिसाद (142)

प्रतिक्रिया

हिंदी सिनेमा.....

मुक्त विहारि
Fri, 12/19/2014 - 01:23 नवीन
असो, ------
  • Log in or register to post comments

चांगला संदेश, चांगला चित्रपट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/07/2015 - 17:21 नवीन
चांगला चित्रपट आहे, धन्स. बाकी, चालु द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आमिरखान करता नाहि,

अर्धवटराव
Fri, 12/19/2014 - 02:56 नवीन
पण राजु साहेबांचा म्हणुन सिनेमा पहायलाच हवा.
  • Log in or register to post comments

पांडु मोड ऑन >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/19/2014 - 07:37 नवीन
पांडु मोड ऑन >>> बरं मssssग!? . . पांडु मोड ऑफ >…> :-D
  • Log in or register to post comments

चुकलात.

बॅटमॅन
Fri, 12/19/2014 - 18:42 नवीन
पांडू मोडमधील डिफॉल्ट कमेंट 'अच्चा, असं जालं तर' ही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

संजय दत्त सारख्या

खबो जाप
Fri, 12/19/2014 - 07:45 नवीन
संजय दत्त सारख्या देश्द्रोह्याने ह्यात काम केले असल्यामुळे चित्रपटावर फुली मारण्यात आली आहे , अगदी डाऊनलोड करून सुद्धा बघणार नाही
  • Log in or register to post comments

संजय दत्त ! हे एकच कारण पुरेसे आहे हा सिनेमा नबघण्यासाठी

सामान्यनागरिक
Sat, 12/20/2014 - 14:04 नवीन
याच्या देशद्रोह्याला विस्मृतीते घालवणे यासरखे दुसरे शासन नाही. मी तर टीव्हीवरही तो दिसल्यास च्यानेल बदलतो. आपल्याला जे जमेल ते करावेच. उगीच माझ्या एकट्याकडुन काय होणार असे म्हणू नये. असे सगळ्यांनी केल्यास त्याला कळेल. तुरुंगवास हे त्याच्या साठी लोकप्रियता वाढवण्यचे साधन बनले आहे. तो तिथे काय करतो/नाही याने च्यानेले भरलेली असतात ! आणि आपण प्रेक्षकच ते वाढवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

सहमत. हेच आपण सलमान च्या

मराठी_माणूस
Sat, 12/20/2014 - 15:16 नवीन
सहमत. हेच आपण सलमान च्या चित्रपटांबाबत केले पाहीजे. पण होते काय तर प्रेक्षकच गर्दी करतात ह्यांच्या चित्रपटा साठी. मोठ्या कंपन्या ह्यांचा जाहीराती साठी उपयोग करतात. समाज परीपक्व होण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

ज्यांनी फॉरेस्ट गंप बघितला

खटपट्या
Fri, 12/19/2014 - 08:16 नवीन
ज्यांनी फॉरेस्ट गंप बघितला असेल ते लगेच ओळखतील की अमीर खान सरळ सरळ टॉम हँकची नक्कल करतोय. कोणी नसेल बघीतला तर अवश्य बघा. http://putlocker.is/watch-forrest-gump-online-free-putlocker.html
  • Log in or register to post comments

पीके विषयी..

योगी९००
Fri, 12/19/2014 - 09:13 नवीन
माझ्या एका नातेवाईकाने स्पेशल शो कालच पाहिला. त्याची प्रतिक्रिया.. "चित्रपट ठिकठाक आहे. स्टोरी जरा हटके आहे. पण ३ इडीयट किंवा तारे जमीनपर ची सर नाही." spoileralert (not sure if this is true as message is received on whatsapp). वॅट्सअ‍ॅप वरून आलेल्या मेसेज मध्ये असे लिहीले आहे. "अमिरखान हा या चित्रपटात एक एलियन आहे आणि त्याचा रिमोट शोधण्याची स्टोरी म्हणजे हा चित्रपट आहे. त्याला तो रिमोट शोधून परत आपल्या जगात जायचे असते.."
  • Log in or register to post comments

राजू हीरानी आणि आमीर खान च्या

प्रसाद१९७१
Fri, 12/19/2014 - 13:24 नवीन
राजू हीरानी आणि आमीर खान च्या आधीच्या तद्दन सिनेमांप्रमाणे हा पण तितकाच फाल्तू असणार, पण दुर्दैवाने सगळीकडे ग्रेट सिनेमा असल्याचे छापून येइल.
  • Log in or register to post comments

चित्रपट पाहिला नसल्यामुळे

सतिश गावडे
Sun, 12/21/2014 - 12:25 नवीन
चित्रपट पाहिला नसल्यामुळे फालतू आहे की नाही हे माहिती नाही मात्र सगळीकडे ग्रेट सिनेमा असल्याचे छापून मात्र आले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

राजकुमार हिराणीला कमोड व

श्रीगुरुजी
Fri, 12/19/2014 - 14:32 नवीन
राजकुमार हिराणीला कमोड व कमोडवर बसलेल्या मंडळींचे खूप आकर्षण आहे. तो बहुतेक कमोडचा अ‍ॅडीक्ट असावा. त्याच्या प्रत्येक चित्रपटात कमोडवर बसलेल्या व्यक्तींचे एक तरी दृश्य असतेच. याही चित्रपटात ते असेल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत

बॅटमॅन
Fri, 12/19/2014 - 18:42 नवीन
हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत कोण बरं असतील ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

(No subject)

प्रचेतस
Fri, 12/19/2014 - 18:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

अजया
Sat, 12/20/2014 - 09:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत

सामान्यनागरिक
Sat, 12/20/2014 - 14:05 नवीन
त्याणा व्हर्बल/व्हिजुअल डायरिया झालेला असावा त्यामुळे अश्या चित्रपटांची निर्मीती होत असावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हिराणीसाहेब मिपा वाचतात असा

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/22/2014 - 11:24 नवीन
मिपाच्या लोकप्रियतेबाबतचा गुप्त निर्देश वाचून अभिमानाने उर भरून आला आनि ड्वाळेबिळे पन पान्नाव्ले Image removed. मिपावरिल अश्या आयड्या चोरणार्‍यांवर विवक्षित आयड्यांनी आयपीआर चोर्ल्याचा खटला दाखल करावा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सर्वश्रुत आहे ते, प्रश्न

सूड
Tue, 12/23/2014 - 15:35 नवीन
सर्वश्रुत आहे ते, प्रश्न पडलाच कसा तुला?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे तो र्‍हेटॉरिकल क्वेश्चन

बॅटमॅन
Wed, 12/24/2014 - 11:50 नवीन
अरे तो र्‍हेटॉरिकल क्वेश्चन होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कमोड आणि वास्तव

बोका-ए-आझम
Fri, 12/19/2014 - 17:30 नवीन
आणि तरी आपले समीक्षक म्हणतात की हिंदी चित्रपट वास्तवाला सोडून असतात! कमोड आणि त्यावर बसून केली जाणारी क्रिया या दोन्हीही वास्तवाचा भाग आहेत. बरं, देशद्रोहाचा काय मुद्दा आहे? संजय दत्तने केलेला गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन त्याला शिक्षाही झालेली आहे. आपण जर न्यायालयाने शिक्षा दिलेल्या लोकांना मत देऊन विधिमंडळात पाठवू शकतो तर चित्रपट बघायला काय हरकत आहे? शिवाय आपण ज्यांचे चित्रपट पाहतो त्यांच्यापैकी कुणी देशद्रोह केलेलाच नाही असं आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? माझ्या मते देशद्रोही मानला गेलेला कलाकार आहे म्हणून चित्रपट पाहू नये असं म्हणणं हे जरा मजेशीर आहे. अर्थात, चित्रपट पाहण्याचं आणि न पाहण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे!
  • Log in or register to post comments

आपल्याला हे विचार पटले

खबो जाप
Sat, 12/20/2014 - 06:55 नवीन
आपल्याला हे विचार पटले त्यामुळे आपण हा चित्रपट बघणार नाही; प्रत्येकाला आपली मते आहेत त्यमुळे मी कुणालाही जावू नका असे म्हणालो नाही. जरूर जा आणि आनंद घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आत्ताच पाहुन आलो...अगदी छान

टवाळ कार्टा
Fri, 12/19/2014 - 23:23 नवीन
आत्ताच पाहुन आलो...अगदी छान चित्रपट आहे...सहकुटुंब बघण्यासारखा
  • Log in or register to post comments

सहकुटूंब...??

योगी९००
Mon, 12/22/2014 - 10:02 नवीन
चित्रपट मला आवडला पण सहकुटूंब म्हणणे अवघड आहे. (मुलांना घेऊन जायच्या लायकीचा चित्रपट नाही , कंडोमचा आणि बर्‍याच वेळा दाखवला गेलेला कार हलण्याचे सिन्स मुलांसाठी निश्चितच नाहीत.). बाकी एक गोष्ट मला कळली नाही की हिंदू नायिका आणि मुसलमान नायक लग्न करण्यासाठी चर्च मध्ये का जातात? बर्‍याच हिंदी चित्रपटात (यश चोप्रा/करण जोहर प्रभूतींच्या) नायक/नायिकेंचा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा (भले ते दोघेही हिंदू असले तरीही) एखादा सीन असतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बेल्जियम

क्लिंटन
Fri, 12/26/2014 - 17:58 नवीन
बाकी एक गोष्ट मला कळली नाही की हिंदू नायिका आणि मुसलमान नायक लग्न करण्यासाठी चर्च मध्ये का जातात?
याचे कारण तो सीन बेल्जियममधला दाखवला आहे.तिथे मॅरेज रजिस्ट्रार जर चर्चमध्येच येत असेल तर लग्न तिथेच जाऊन करावे लागत असावे. माझ्याही नात्यात अमेरिकेत लग्न झाले ते चर्चमध्ये जाऊनच तिथे रजिस्ट्रारच्या रजिस्टरमध्ये सही करून झाले होते. तिथला रजिस्ट्रार हिंदू देवळांमध्ये येत नाही का वगैरे प्रश्न विचारायच्या भानगडीत मी पडलो नव्हतो :)
बर्‍याच हिंदी चित्रपटात (यश चोप्रा/करण जोहर प्रभूतींच्या) नायक/नायिकेंचा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा (भले ते दोघेही हिंदू असले तरीही) एखादा सीन असतोच.
कोण यश चोप्रा? कोण करण जोहर? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

भ्रमनिरास झाला........

किल्लेदार
Fri, 12/19/2014 - 23:42 नवीन
तद्दन फालतू चित्रपट....
  • Log in or register to post comments

काय फाल्तु आहे त्यात? मी आजच

टवाळ कार्टा
Fri, 12/19/2014 - 23:52 नवीन
काय फाल्तु आहे त्यात? मी आजच बघून आलोय...मला काही फालतू मिळाले नाही पण तुमची बाजू जाणून घ्यायची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

कालच पाहीला.

शिद
Mon, 12/22/2014 - 18:34 नवीन
कालच पाहीला.
तद्दन फालतू चित्रपट...
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

राजू ने बिगार टाळली आहे....

किल्लेदार
Sat, 12/20/2014 - 00:04 नवीन
ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत (उदा. बॉम्बस्फोटाचा सीन). ओ माय गॉंड सारखा प्लॉट आहे. संकलन करतांना बऱ्याच त्रुटी आहेत. आणखी एक गंमत वाटली. अनुष्का सोबत जी चर्च मध्ये असते (जिच्यामुळे कन्फ्यूजन होते) ती अजिबात हिंदी वाटत नाही तरीही तिला कोणीतरी हिंदीतून चिठ्ठी पाठवते. मला स्पष्टपणे वाटतं की राजू ने बिगार टाळली आहे.
  • Log in or register to post comments

ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत

टवाळ कार्टा
Sat, 12/20/2014 - 00:16 नवीन
ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत >> काही ठिकाणी झालेय तसे ... पण कमी वेळा अनुष्का सोबत जी चर्च मध्ये असते (जिच्यामुळे कन्फ्यूजन होते) ती अजिबात हिंदी वाटत नाही तरीही तिला कोणीतरी हिंदीतून चिठ्ठी पाठवते. >> ती चिट्।ट्।ई हिंदीत आहे??? अनुश्काकडे पहाताना इतके लक्षात आले नाही ;) पण तरीही....आजकालचे बाकी खानावळीच्या पिच्चार्पेक्षा खुपच चांगला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

खानावळीच्या पिच्चार्पेक्षा खुपच चांगला आहे..

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 00:20 नवीन
तरी पण शेवटी खानावळ ती खानावळच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चिठ्ठी english मध्येच आहे

येडाफुफाटा
Sat, 12/20/2014 - 01:57 नवीन
चिठ्ठी english मध्येच आहे फक्त आपल्याला हिंदीत ऐकवले जातै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अनुष्काची-सुशांतची love story

येडाफुफाटा
Sat, 12/20/2014 - 02:27 नवीन
अनुष्काची-सुशांतची love story च फालतु आहे. त्यात पण भारत-पाकिस्तान घुसडवलाय. मुस्लीम धर्मावर ते bomb blast करतात व मूलींना शाळेत पाठवत नाहीत. असली नेहमीची चावून चोथा झालेली टीका आहे. बुरखा, स्त्रियांच्या अधिकार ,polygamy याविषयी काहीही नाही. मदरशातलं शिक्षीण वगैरेंवर टीका नाही. हिंदू वर नेहमीची मंदीर वा बाबा टाईप टीका आहे. ही जशीच्या तशी oh my god मधे होती. Oh my god मध्ये तर मुर्ती तोडतानाचे पण सीन आहेत. Christian missionary च्या conversion वर टीका करणारा एक सीन आहे. बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे? ज्यु आहे बहुधा. जैनांवर टीका नाही. एक श्रवणबेळगोळच्या मुर्तीचा अभिषेक करतानाचा सीन आहे. जेजुरीचा पण एक सीन आहे. सौरभ शुक्लाच्या बाबापेक्षा oh my god मधील मिथूनचे-गोविंद नामदेवचे महाराज चांगले होते. बाकी socrates type येडा बनून प्रश्न विचारण्याचे तंत्र आवडले. राजूभाईंची हीच तर खासी यत आहे प्रचारकी थाटात उपदेश न करता वेड पांघरुन विचार करायला लावायचा. Alien च्या दृष्टिकोनातून बघणेसुद्धा जाम आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे?

भुमन्यु
Tue, 12/23/2014 - 15:31 नवीन
बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे?
...इस्लाम धर्मात मोहरमच्या वेळेस जुलुस काढतात तेव्हा असे अघोरि उद्योग करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडाफुफाटा

ते सगळं जाउदे ! अनुष्का नव्या

खटपट्या
Sat, 12/20/2014 - 02:41 नवीन
ते सगळं जाउदे ! अनुष्का नव्या अवतारात कशी दिसलेय ते सांगा !
  • Log in or register to post comments

अनुष्का नव्या अवतारात कशी दिसलेय ते सांगा !

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 02:59 नवीन
कितीही सुंदर दिसली तरी... मधुबालेची सर नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओठ सर्जरी जमली नाही आहे. तरी

येडाफुफाटा
Sat, 12/20/2014 - 03:37 नवीन
ओठ सर्जरी जमली नाही आहे. तरी अंग प्रत्यंगाच प्रत्यकारी दर्शन घडविलय. आत्मा तृप्त होईल. पण एखादाच kiss scene आहे. If thats what your looking for.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

नाय वो आमास्नी तसलं काय बगाय

खटपट्या
Sat, 12/20/2014 - 04:13 नवीन
नाय वो आमास्नी तसलं काय बगाय नाय आवडत !! आमी आपले चेहर्‍याच्या सौंदर्यात समाधानी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडाफुफाटा

अनुश्काला ओठ नसून चोच आहे असे

मंदार दिलीप जोशी
Mon, 12/22/2014 - 15:01 नवीन
अनुश्काला ओठ नसून चोच आहे असे वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

चार्ली चापलिनचं भूत राजकफुरने

कंजूस
Sat, 12/20/2014 - 12:46 नवीन
चार्ली चापलिनचं भूत राजकफुरने नाचवलं आता आणखी एक सुपरस्टार तेच करतोय .
  • Log in or register to post comments

राजु हिराणी कॉपी मारतो.त्याचा

जेपी
Sat, 12/20/2014 - 14:15 नवीन
राजु हिराणी कॉपी मारतो.त्याचा 3 इडीयट dead poets socity चा बॉलीवुडी रिमेक आहे.
  • Log in or register to post comments

काय बी का जेपी राव .

पिंपातला उंदीर
Sat, 12/20/2014 - 16:29 नवीन
काय बी का जेपी राव . हिराणी इतरांच्या चित्रपटा नि influence होत असला तरी ३ इडिअट्स हा dead poets society वरून नाही ढापलेला काही . आदित्य चोप्राचा मोहोबत्ते ढापला आहे त्या विंग्रजी चित्रपटावरून . बाकी पीके हा K -Pax या चित्रपटावरून उचलला आहे . इच्छुकांनी या चित्रपटाची कथा आंतरजालावर शोधून बघावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हम्म...आवरत घेतो.

जेपी
Sat, 12/20/2014 - 17:33 नवीन
हम्म...आवरत घेतो. पुन्हा मोहब्बते,3 इडीयट,बघा. मला 3 इडीयट मध्ये dead poets socity दिसला. चित्रपटाच ग्यान फक्त तुम्हालाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अवो ३ इडियट चेतन भगत च्या

पिंपातला उंदीर
Sat, 12/20/2014 - 17:40 नवीन
अवो ३ इडियट चेतन भगत च्या five point someone या कादंबरीवर आधारित होता . चित्रपटाच्या credit मध्ये पण त्याला श्रेय दिल होत . आम्ही पण आवरत घेतो तुम्हाला आवडत नसल तर अवो ३ इडियट चेतन भगत च्या five point someone या कादंबरीवर आधारित होता . चित्रपटाच्या credit मध्ये पण त्याला श्रेय दिल होत . आम्ही पण आवरत घेतो तुम्हाला आवडत नसल तर . बाकी dead poet society -मोहोब्बते साठी हे पण बघून घ्या http://mtv.in.com/blogs/parent/just-in/9-absolutely-shocking-bollywood-ripoffs-52190826.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हम्म...

जेपी
Sat, 12/20/2014 - 17:56 नवीन
हम्म... ते आंतरजालीय मत वाचत नाही. भग्गु जिथे स्वत:च चोरी करत फिरतो तिथे five point someone च काय घ्या. ( यापेक्षा जास्त न सांगणारा) जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

माझ्या,माहितीप्रमाणे...

मंदार कात्रे
Sun, 12/21/2014 - 12:12 नवीन
चेतन भगत स्वतः आयाआयटी दिल्ली मध्ये शिकत असताना त्याना आलेल्या अनुभवावर आधारित असलेली ती कादंबरी आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

चेतन भगत ज्या प्रकारचे

प्रसाद१९७१
Mon, 12/22/2014 - 09:50 नवीन
चेतन भगत ज्या प्रकारचे साहीत्य पाडतो, त्यानी आयआयटीच्या निवड आणि शिक्षणपद्धातीच्या दर्जा बद्दल च शंका निर्माण होतात. त्याला आयआयटीने डीग्री काढुन घेउन बेदखल करावे, नाहीतर जगभरात आयआयटीची पत अजुन कमी होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

पीके

मंदार कात्रे
Sun, 12/21/2014 - 12:18 नवीन
मी काल थिएटर मध्ये पाहिला. सुमारे ६००/- रुपये तिकीट होते. बरा वाटला . एकदा पाहण्याच्या लायकीचा आहे. पण मीच मूळ पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे "माइल्स्टोन" वगैरे नाही. एलियन ची स्टोरी अधिक चांगल्या प्रकारे खुलवता आली असती. त्याऐवजी उगाचच देवा-धर्मावर घसरला आहे हिरानी! एडिटिंग चा गोन्धळ आहेच! पण आमिर आणि इतरांची कामे चांगली झाली आहेत . माझ्यातर्फे ३ / ५ स्टार्स
  • Log in or register to post comments

काहि खास नाहि सिनेमा.

अर्धवटराव
Sun, 12/21/2014 - 12:43 नवीन
किंबहुना कन्सेप्ट सॉलीड गंडला आहे. आमिरभौने अभिनय उत्तम केला आहे मात्र. पेशावर कांडाचा काहि परिणाम होईल काय क्लायमॅक्सवर ? माहित नाहि.
  • Log in or register to post comments

मी अत्ताच सिनेमा पाहून आलो.

खटपट्या
Sun, 12/21/2014 - 14:17 नवीन
मी अत्ताच सिनेमा पाहून आलो. ओमायगॉड सारखाच आहे. नवीन काहीच नाही. परत हींदू मुस्लीम...... आमीर खाननी हींदू धर्मातल्या अनीष्ट रुढी, परंपरा, बुवाबाजीवर ताशेरे ओढले आहेत. पण मुस्लीम धर्मामधली बुवावाजी पधद्तशीर पणे टाळली आहे. "मुसलमान धोका नही देता" हे तो ठासून सांगतो. मान्य आहे पण तो मुसलमान पाकीस्तानातील दाखवायची काय गरज होती ? भारतातील दाखवला असता तरी चालले असते. उगाच पाकीस्तानचे उदात्तीकरण कशाला ? पटला नाही. उगाच सर्वधर्मसमभावाच्या तासाला बसल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा