Skip to main content

PK च्या प्रतीक्षेत...

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 19/12/2014 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली . उद्या १९ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून हिरानीच्या पूर्वीच्या "थ्री इडियट्स" प्रमाणेच हा सिनेमा हिन्दी चित्रसॄष्टीतील "माइलस्टोन " ठरेल असा कयास आहे याचे कारण आमिर म्हणजे मुख्य नायक हा "एलियन" असल्याची वदन्ता असून "पीके"ची स्टोरी सर्वार्थाने निराळी आणि "युनिक" आहे ,असे समजते. http://www.ibtimes.co.in/pk-movie-review-by-viewers-live-update-617664 pk

वाचने 39661
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

पांडु मोड ऑन >>> बरं मssssग!? . . पांडु मोड ऑफ >…> :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

पांडू मोडमधील डिफॉल्ट कमेंट 'अच्चा, असं जालं तर' ही आहे.

संजय दत्त सारख्या देश्द्रोह्याने ह्यात काम केले असल्यामुळे चित्रपटावर फुली मारण्यात आली आहे , अगदी डाऊनलोड करून सुद्धा बघणार नाही

In reply to by खबो जाप

याच्या देशद्रोह्याला विस्मृतीते घालवणे यासरखे दुसरे शासन नाही. मी तर टीव्हीवरही तो दिसल्यास च्यानेल बदलतो. आपल्याला जे जमेल ते करावेच. उगीच माझ्या एकट्याकडुन काय होणार असे म्हणू नये. असे सगळ्यांनी केल्यास त्याला कळेल. तुरुंगवास हे त्याच्या साठी लोकप्रियता वाढवण्यचे साधन बनले आहे. तो तिथे काय करतो/नाही याने च्यानेले भरलेली असतात ! आणि आपण प्रेक्षकच ते वाढवतो.

In reply to by सामान्यनागरिक

सहमत. हेच आपण सलमान च्या चित्रपटांबाबत केले पाहीजे. पण होते काय तर प्रेक्षकच गर्दी करतात ह्यांच्या चित्रपटा साठी. मोठ्या कंपन्या ह्यांचा जाहीराती साठी उपयोग करतात. समाज परीपक्व होण्याची गरज आहे.

ज्यांनी फॉरेस्ट गंप बघितला असेल ते लगेच ओळखतील की अमीर खान सरळ सरळ टॉम हँकची नक्कल करतोय. कोणी नसेल बघीतला तर अवश्य बघा. http://putlocker.is/watch-forrest-gump-online-free-putlocker.html

माझ्या एका नातेवाईकाने स्पेशल शो कालच पाहिला. त्याची प्रतिक्रिया.. "चित्रपट ठिकठाक आहे. स्टोरी जरा हटके आहे. पण ३ इडीयट किंवा तारे जमीनपर ची सर नाही." spoileralert (not sure if this is true as message is received on whatsapp). वॅट्सअ‍ॅप वरून आलेल्या मेसेज मध्ये असे लिहीले आहे. "अमिरखान हा या चित्रपटात एक एलियन आहे आणि त्याचा रिमोट शोधण्याची स्टोरी म्हणजे हा चित्रपट आहे. त्याला तो रिमोट शोधून परत आपल्या जगात जायचे असते.."

राजू हीरानी आणि आमीर खान च्या आधीच्या तद्दन सिनेमांप्रमाणे हा पण तितकाच फाल्तू असणार, पण दुर्दैवाने सगळीकडे ग्रेट सिनेमा असल्याचे छापून येइल.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रपट पाहिला नसल्यामुळे फालतू आहे की नाही हे माहिती नाही मात्र सगळीकडे ग्रेट सिनेमा असल्याचे छापून मात्र आले आहे. :)

राजकुमार हिराणीला कमोड व कमोडवर बसलेल्या मंडळींचे खूप आकर्षण आहे. तो बहुतेक कमोडचा अ‍ॅडीक्ट असावा. त्याच्या प्रत्येक चित्रपटात कमोडवर बसलेल्या व्यक्तींचे एक तरी दृश्य असतेच. याही चित्रपटात ते असेल याची खात्री आहे.

In reply to by बॅटमॅन

त्याणा व्हर्बल/व्हिजुअल डायरिया झालेला असावा त्यामुळे अश्या चित्रपटांची निर्मीती होत असावा !

In reply to by बॅटमॅन

मिपाच्या लोकप्रियतेबाबतचा गुप्त निर्देश वाचून अभिमानाने उर भरून आला आनि ड्वाळेबिळे पन पान्नाव्ले  मिपावरिल अश्या आयड्या चोरणार्‍यांवर विवक्षित आयड्यांनी आयपीआर चोर्ल्याचा खटला दाखल करावा ;)

आणि तरी आपले समीक्षक म्हणतात की हिंदी चित्रपट वास्तवाला सोडून असतात! कमोड आणि त्यावर बसून केली जाणारी क्रिया या दोन्हीही वास्तवाचा भाग आहेत. बरं, देशद्रोहाचा काय मुद्दा आहे? संजय दत्तने केलेला गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन त्याला शिक्षाही झालेली आहे. आपण जर न्यायालयाने शिक्षा दिलेल्या लोकांना मत देऊन विधिमंडळात पाठवू शकतो तर चित्रपट बघायला काय हरकत आहे? शिवाय आपण ज्यांचे चित्रपट पाहतो त्यांच्यापैकी कुणी देशद्रोह केलेलाच नाही असं आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? माझ्या मते देशद्रोही मानला गेलेला कलाकार आहे म्हणून चित्रपट पाहू नये असं म्हणणं हे जरा मजेशीर आहे. अर्थात, चित्रपट पाहण्याचं आणि न पाहण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे!

In reply to by बोका-ए-आझम

आपल्याला हे विचार पटले त्यामुळे आपण हा चित्रपट बघणार नाही; प्रत्येकाला आपली मते आहेत त्यमुळे मी कुणालाही जावू नका असे म्हणालो नाही. जरूर जा आणि आनंद घ्या.

In reply to by टवाळ कार्टा

चित्रपट मला आवडला पण सहकुटूंब म्हणणे अवघड आहे. (मुलांना घेऊन जायच्या लायकीचा चित्रपट नाही , कंडोमचा आणि बर्‍याच वेळा दाखवला गेलेला कार हलण्याचे सिन्स मुलांसाठी निश्चितच नाहीत.). बाकी एक गोष्ट मला कळली नाही की हिंदू नायिका आणि मुसलमान नायक लग्न करण्यासाठी चर्च मध्ये का जातात? बर्‍याच हिंदी चित्रपटात (यश चोप्रा/करण जोहर प्रभूतींच्या) नायक/नायिकेंचा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा (भले ते दोघेही हिंदू असले तरीही) एखादा सीन असतोच.

In reply to by योगी९००

बाकी एक गोष्ट मला कळली नाही की हिंदू नायिका आणि मुसलमान नायक लग्न करण्यासाठी चर्च मध्ये का जातात?
याचे कारण तो सीन बेल्जियममधला दाखवला आहे.तिथे मॅरेज रजिस्ट्रार जर चर्चमध्येच येत असेल तर लग्न तिथेच जाऊन करावे लागत असावे. माझ्याही नात्यात अमेरिकेत लग्न झाले ते चर्चमध्ये जाऊनच तिथे रजिस्ट्रारच्या रजिस्टरमध्ये सही करून झाले होते. तिथला रजिस्ट्रार हिंदू देवळांमध्ये येत नाही का वगैरे प्रश्न विचारायच्या भानगडीत मी पडलो नव्हतो :)
बर्‍याच हिंदी चित्रपटात (यश चोप्रा/करण जोहर प्रभूतींच्या) नायक/नायिकेंचा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा (भले ते दोघेही हिंदू असले तरीही) एखादा सीन असतोच.
कोण यश चोप्रा? कोण करण जोहर? :)

In reply to by किल्लेदार

काय फाल्तु आहे त्यात? मी आजच बघून आलोय...मला काही फालतू मिळाले नाही पण तुमची बाजू जाणून घ्यायची आहे

ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत (उदा. बॉम्बस्फोटाचा सीन). ओ माय गॉंड सारखा प्लॉट आहे. संकलन करतांना बऱ्याच त्रुटी आहेत. आणखी एक गंमत वाटली. अनुष्का सोबत जी चर्च मध्ये असते (जिच्यामुळे कन्फ्यूजन होते) ती अजिबात हिंदी वाटत नाही तरीही तिला कोणीतरी हिंदीतून चिठ्ठी पाठवते. मला स्पष्टपणे वाटतं की राजू ने बिगार टाळली आहे.

In reply to by किल्लेदार

ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत >> काही ठिकाणी झालेय तसे ... पण कमी वेळा अनुष्का सोबत जी चर्च मध्ये असते (जिच्यामुळे कन्फ्यूजन होते) ती अजिबात हिंदी वाटत नाही तरीही तिला कोणीतरी हिंदीतून चिठ्ठी पाठवते. >> ती चिट्।ट्।ई हिंदीत आहे??? अनुश्काकडे पहाताना इतके लक्षात आले नाही ;) पण तरीही....आजकालचे बाकी खानावळीच्या पिच्चार्पेक्षा खुपच चांगला आहे

In reply to by किल्लेदार

अनुष्काची-सुशांतची love story च फालतु आहे. त्यात पण भारत-पाकिस्तान घुसडवलाय. मुस्लीम धर्मावर ते bomb blast करतात व मूलींना शाळेत पाठवत नाहीत. असली नेहमीची चावून चोथा झालेली टीका आहे. बुरखा, स्त्रियांच्या अधिकार ,polygamy याविषयी काहीही नाही. मदरशातलं शिक्षीण वगैरेंवर टीका नाही. हिंदू वर नेहमीची मंदीर वा बाबा टाईप टीका आहे. ही जशीच्या तशी oh my god मधे होती. Oh my god मध्ये तर मुर्ती तोडतानाचे पण सीन आहेत. Christian missionary च्या conversion वर टीका करणारा एक सीन आहे. बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे? ज्यु आहे बहुधा. जैनांवर टीका नाही. एक श्रवणबेळगोळच्या मुर्तीचा अभिषेक करतानाचा सीन आहे. जेजुरीचा पण एक सीन आहे. सौरभ शुक्लाच्या बाबापेक्षा oh my god मधील मिथूनचे-गोविंद नामदेवचे महाराज चांगले होते. बाकी socrates type येडा बनून प्रश्न विचारण्याचे तंत्र आवडले. राजूभाईंची हीच तर खासी यत आहे प्रचारकी थाटात उपदेश न करता वेड पांघरुन विचार करायला लावायचा. Alien च्या दृष्टिकोनातून बघणेसुद्धा जाम आवडले.

In reply to by येडाफुफाटा

बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे?
...इस्लाम धर्मात मोहरमच्या वेळेस जुलुस काढतात तेव्हा असे अघोरि उद्योग करतात

In reply to by खटपट्या

ओठ सर्जरी जमली नाही आहे. तरी अंग प्रत्यंगाच प्रत्यकारी दर्शन घडविलय. आत्मा तृप्त होईल. पण एखादाच kiss scene आहे. If thats what your looking for.

In reply to by येडाफुफाटा

नाय वो आमास्नी तसलं काय बगाय नाय आवडत !! आमी आपले चेहर्‍याच्या सौंदर्यात समाधानी असतो.

In reply to by जेपी

काय बी का जेपी राव . हिराणी इतरांच्या चित्रपटा नि influence होत असला तरी ३ इडिअट्स हा dead poets society वरून नाही ढापलेला काही . आदित्य चोप्राचा मोहोबत्ते ढापला आहे त्या विंग्रजी चित्रपटावरून . बाकी पीके हा K -Pax या चित्रपटावरून उचलला आहे . इच्छुकांनी या चित्रपटाची कथा आंतरजालावर शोधून बघावी

In reply to by पिंपातला उंदीर

हम्म...आवरत घेतो. पुन्हा मोहब्बते,3 इडीयट,बघा. मला 3 इडीयट मध्ये dead poets socity दिसला. चित्रपटाच ग्यान फक्त तुम्हालाच नाही.

In reply to by जेपी

अवो ३ इडियट चेतन भगत च्या five point someone या कादंबरीवर आधारित होता . चित्रपटाच्या credit मध्ये पण त्याला श्रेय दिल होत . आम्ही पण आवरत घेतो तुम्हाला आवडत नसल तर अवो ३ इडियट चेतन भगत च्या five point someone या कादंबरीवर आधारित होता . चित्रपटाच्या credit मध्ये पण त्याला श्रेय दिल होत . आम्ही पण आवरत घेतो तुम्हाला आवडत नसल तर . बाकी dead poet society -मोहोब्बते साठी हे पण बघून घ्या http://mtv.in.com/blogs/parent/just-in/9-absolutely-shocking-bollywood-…

In reply to by पिंपातला उंदीर

हम्म... ते आंतरजालीय मत वाचत नाही. भग्गु जिथे स्वत:च चोरी करत फिरतो तिथे five point someone च काय घ्या. ( यापेक्षा जास्त न सांगणारा) जेपी

In reply to by जेपी

चेतन भगत स्वतः आयाआयटी दिल्ली मध्ये शिकत असताना त्याना आलेल्या अनुभवावर आधारित असलेली ती कादंबरी आहे .

In reply to by मंदार कात्रे

चेतन भगत ज्या प्रकारचे साहीत्य पाडतो, त्यानी आयआयटीच्या निवड आणि शिक्षणपद्धातीच्या दर्जा बद्दल च शंका निर्माण होतात. त्याला आयआयटीने डीग्री काढुन घेउन बेदखल करावे, नाहीतर जगभरात आयआयटीची पत अजुन कमी होइल.

मी काल थिएटर मध्ये पाहिला. सुमारे ६००/- रुपये तिकीट होते. बरा वाटला . एकदा पाहण्याच्या लायकीचा आहे. पण मीच मूळ पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे "माइल्स्टोन" वगैरे नाही. एलियन ची स्टोरी अधिक चांगल्या प्रकारे खुलवता आली असती. त्याऐवजी उगाचच देवा-धर्मावर घसरला आहे हिरानी! एडिटिंग चा गोन्धळ आहेच! पण आमिर आणि इतरांची कामे चांगली झाली आहेत . माझ्यातर्फे ३ / ५ स्टार्स

किंबहुना कन्सेप्ट सॉलीड गंडला आहे. आमिरभौने अभिनय उत्तम केला आहे मात्र. पेशावर कांडाचा काहि परिणाम होईल काय क्लायमॅक्सवर ? माहित नाहि.

मी अत्ताच सिनेमा पाहून आलो. ओमायगॉड सारखाच आहे. नवीन काहीच नाही. परत हींदू मुस्लीम...... आमीर खाननी हींदू धर्मातल्या अनीष्ट रुढी, परंपरा, बुवाबाजीवर ताशेरे ओढले आहेत. पण मुस्लीम धर्मामधली बुवावाजी पधद्तशीर पणे टाळली आहे. "मुसलमान धोका नही देता" हे तो ठासून सांगतो. मान्य आहे पण तो मुसलमान पाकीस्तानातील दाखवायची काय गरज होती ? भारतातील दाखवला असता तरी चालले असते. उगाच पाकीस्तानचे उदात्तीकरण कशाला ? पटला नाही. उगाच सर्वधर्मसमभावाच्या तासाला बसल्यासारखे वाटले.

१. पाकिस्तानी वकिलातीचे लोक उगाचच प्रेमळ, हसरे, नर्म विनोदी वगैरे दाखवलेत. २. हिंदू बाबा मात्र व्हिलन दाखवलाय. ३. हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीवर टीका दाखवलीय. उदा: देवाच्या मूर्तीची बॅटरी लो झाल्यामुळं ती चमत्कार दाखवू शकत नाहीय, हिंदू पुजारी १०० रुपये काढून घेवून मग पर्स परत करतो, हिंदूंच्या मंदीरात चपला चोरीला जातातच, बाबाचे भक्तगण गुंड दाखवणे वगैरे. मुसलमानांचा व ख्रिस्च्नांचा उल्लेख फक्त हिंदूंकडून टीका होवू नये म्हणून वाटतो आणि अगदी तुरळक आहे. ४. "मुसलमान धोका नही देता!". हे कोण सांगतोय? एक एलियन. हिंदुस्तानला. काय जोक आहे. ५. हिंदूं गझनीच्या आक्रमणाचा उल्लेख करतात त्याची थट्टा दाखवलीय. बाकी आठवलं तर लिहिनच. या चित्रपटावरून आमीरखान बद्दल मत एकदम वाईट झालं. सेन्सॉर नं याला कसं पास केलं असंही वाटलं.

In reply to by काळा पहाड

असल्या सिनेमांचे फायनांनसिंग कुठुन होते त्याचा शोध घेतला तर असे हिंदूंना खाली दाखवणारे सिनेमे का निघतात त्याचे उत्तर मिळेल.

आणि हो, त्यात आमिर्खान विचारतो की जर परमेश्वर आकाशात आहे आणि मूर्तीत नाही तर मूर्ती करण्याची गरज काय आहे. अर्थातच हिंदू मूर्तीकार मूर्ख आणि दुष्ट असल्यानं उत्तर देवू शकतच नाहीत.

In reply to by काळा पहाड

जर का अल्लाह सगळीकडे आहे तर मुळात (१) मशीदी असण्याची गरजच काय (२) मक्केकडे तोंड करुन नमाज पढण्याची गरज काय? कुठल्याही दिशेकडे तोंड करुन कुठेही उभे/बसून नमाज पढावा.

In reply to by मंदार दिलीप जोशी

ही एक प्रकारची मूर्तीपूजाच नव्हे का? इस्लामला मूर्तीपूजा मान्य नसेल तर मग हे का?

In reply to by मंदार दिलीप जोशी

त्यांनी त्यांच्या धर्माचे काहीही करावे, पण टिंगल मात्र आमच्याच धर्माची का करावी ? एखाद्या मशिदीच्या बाबतीत काही दॄष्य असते तर आत्ता पर्यंत फतवा निघाला देखील असता... आमचे हिंदू मूळातच सोशिक { की नेभळट ? } कोणीही या... राम , शंकर, गणपती इं देवतांची घंटी वाजवुन जा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मंदार दिलीप जोशी

सायबांनू, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आहे.. तेव्हा जरा तेवडं बघून टीका करावी. बाकी आमीरएवजी समजा र्हितिक किंवा तो धाकटा बच्चन असता तर आपण काय त्याला पाखंडी वगैरे म्हणणार होता का?

धन्यवाद... आम्ही तसेही हिंदी सिनेमा बघत नाही.... आणि हे वाचले की, आपला निर्णय किती बरोबर आहे, हे पण समजते.

आमीर खान एका शंकरासारख्या ड्रेस परिधान केलेल्या व्यक्तीला कुल्फी खाताना पहातो आणि त्याला शंकर भगवान समजतो. नंतर शंकर भगवान टॉयलेटमध्ये शिरतो. आमीरखान त्याचा पाठलाग करत टॉयलेटमध्ये जातो आणि आतून कुलूप घालतो. नंतर आपला रिमोट देण्यासाठी शंकराचा पिच्छा पुरवतो. त्याची बखोटी पकडून त्याला जाब विचारतो. शंकर जवळच्या त्रिशूलाने कुलुप तोडतो आणि पळून जातो. नंतरची दृष्ये अशी आहेतः १. शंकर ज्या स्टेज शो वर 'सर्वशक्तिमान' शंकर भगवान म्हणून जाणार असतो, तिथे तो धडपडत पोचून स्टेज वर साष्टांग नमस्कार घालतो. आमीरखान त्याचा पाठलाग चालू ठेवतो. २. एका बाबाच्या प्रवचनात शंकर पाठलाग टाळण्यासाठी खुर्च्यांखालून लोकांच्या पायाखालून वाट काढताना दाखवलाय. आणि हा शॉट बराच चवीचवीने घेतल्यासारखा तब्बल मिनिटभर घेतलाय.

सर्च करत असताना सापडलेली लिंकः आमीरखान विरूद्ध एफ आय आर.: शिवाला दोन मुसलमान स्त्रियांना बसलेली रिक्षा ओढताना दाखवलं. http://indiatoday.intoday.in/story/fir-against-aamir-khan-for-hurting-r…

http://5forty3.in/2014/12/pk-why-is-hinduism-a-blot-on-the-idea-of-indi… “Indian voting rights (given to Hindus) must be reconsidered” – Zoya Hasan, a professor of political science in JNU, had thundered in NDTV studios on the morning of May 16th this year when it was quite apparent that Narendra Modi would be the new Prime Minister of India. These days the only noise one hears from the opposition in Rajya Sabha, since the opposition is absent in Lok Sabha, is on topics concerning some “reconversions” by a vague Hindu outfit or about a stray ruling party MP making some bombastic comments on some trivial religious matters. Over the last month, maximum airtime on various media platforms was allocated to a ‘colloquial’ mis-comment by a junior minister in the central government which was a classic case of making a mountain out of a molehill. For the last 2-odd years there has been this constant theme running in the background which keeps harping about the “Idea of India”. There have been various subtle, not-so-subtle and in-your-face attempts to constantly remind us that either Hinduism is rogue or that ordinary Hindus need to be apologetic about the supposed ‘excesses’ of their religion on the whole and certain co-religionists in particular. Over the last few years, especially under constant ridicule and persistent attack have been religious figures, Hindu Matths and those termed derisively as ‘Godmen’ by the media. This continuous messaging is having little impact as urban middle classes have not yet developed a ‘healthy’ distaste towards Hindu religious symbols, especially the so-called ‘Godmen’. Realizing that relentless bombardment on 24/7 news channels against various babas from Nithyanandas to Asharam Bapus to Rampals is not enough to change the Hindu psyche, more creative folks are now getting into this business of dissing Hindu systems. Now the messaging is more subtle, underplayed and laced with humour so that it makes a deeper impact on urban India. pk_motion_amir_khan_poster An alien who looks exactly like us humans lands in the deserts of Rajasthan only to be robbed of his “remote”, which connects him to his mother ship. Meanwhile an Indian girl falls in love with who else but a Pakistani boy in Belgium – this is an important template for Bollywood to show its proverbial middle finger to all those ‘silly Hindu fanatics’ who harp about LOVE JIHAD, so every right thinking, no strike that, every Left-thinking Indian woman must dutifully fall in Love with a Pakistani guy. The girl’s father objects to this union because, hold your breath, he is an undying bhakt of a Hindu Godman who keeps lecturing about Mohammad Ghazni’s invasion of India. Our poor Godmen simply refuse to understand that Hindu girls have this ‘inherent craving’ for Pakistani men who are such nice, soft spoken, caring gentlemen without a religiously violent hair on their waxed and tanned bodies. Can’t these Godmen see how we as a nation collectively trend #IndiaWithPakistan when those non-violent Pakistani men murder 150 young kids in a school in Peshawar? Due to a tragic twist of fate, the unsuspecting Indian girl believes that her Pakistani boyfriend has ditched her at the altar, so she returns back home to the big bad lands of India infested with too many Hindu temples and Hindu Godmen and, well, Hindu men and women (oh why can’t India just be another Pakistan with those nice, non-violent Pakistani men?). Here in India the alien (played by the redoubtable host of Satya Meva Jayate) has started circulating “Missing” pamphlets with pictures of various Hindu Gods because he believes the Hindu Gods are responsible for his missing remote. He even visits Hindu temples but chain locks his slippers at the gates because, you guessed it right, all Hindu devotees are thieves who rob slippers – in the Rajkumar Hirani universe Hinduism is totally infested with thievery and nothing but thievery, everything else is merely the figment of Hindu imagination. Over the next 2 hours, PK keeps going in circles just to progressively caricaturize Hindu temples, Hindu Gods and Hindu Godmen (to be sure, there are but some fleeting references to other religions too but then you would have missed them by the time you would have blinked and yawned in between). Then, after every aspect of Hinduism is ridiculed and the audience is sufficiently frustrated with the religion to dash out of the cinema hall and race into the nearest church/masjid to immediately get converted, we unhurriedly reach the climax when there is finally a bomb blast and the TV newscaster informs us that some people of an unknown “kaum” (religion) have taken the responsibility for the blast. What religion could that be? Shhh! don’t ask, some questions are best kept under wraps… okay, let’s get back to Hindu bashing then. So, in the climactic TV studio confrontation between a Hindu Godman and the alien… wait, by the way, did we tell you that the left-thinking woman who returned back from Belgium after her supposedly “failed” love affair with that nice, non-violent Pakistani boy has now joined a TV news channel as an anchor? Oh she has, and, now we know why our TV News anchors have such a tender soft spot for anything that has a Pakistani label on it. Anyway, so, in the climactic TV studio confrontation between a Hindu Godman and the alien, the alien emerges victorious!!! What a relief! In fact, the alien defeats the Godman by telling the whole truth to the girl (who is now the TV news anchor and had fallen in love in Belgium with a soft spoken, nice, non-violent… okay fine, it was Anushka Sharma with her recently acquired shark-like lips, there I said it finally!). The whole but simple truth is this – the Pakistani boy hadn’t ditched her after all, and, has been in fact waiting for 2 years in Lahore with bated breath for a call from her. Moral of the story? It’s simple you idiots, all Hindu Godmen, Hindu Gods (and Hindu men for that matter) are thugs and thieves, so in Pakistanis we must trust.

In reply to by वेल्लाभट

अगदी असेच म्हणतो. शेवटी आरूनफिरून फक्त हिंदू धर्मावरच टीका असेल तर बघण्यात वट्ट काही प्वाइंट नाही.

पीके हा चित्रपट परवा पाहिला. मुळातच या चित्रपटाकडून माझ्या काही खास अश्या अपेक्षा नसल्याकारणाने खूप जास्ती निराशा होणार नव्हती. तरीही थोडीबहुत निराशा झालीच. मध्यंतरापर्यंतचा चित्रपट उत्तम नसला तरी बरा नक्कीच आहे. पीके उभा करण्यामध्ये यातील बराच वेळ जातो. छोट्या छोट्या गोष्टी आवडत जातात. पण एकंदरीत परिणाम कमीच होतो. मध्यंतरानंतर चित्रपट कोणत्या दिशेला चालला आहे याची जाणीव होतेच. पण त्यातही एवढे नाट्य करायची गरज होती का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. Oh! My God आपण परत पाहत तरी नाही ना असा काहीसा फील येत राहतो. चित्रपटाचा climax इतका नाट्यपूर्ण आणि अतिरंजित असेल असे त्या क्षणाला येईपर्यंत सुद्धा वाटत नाही. नंतर कधी एकदा चित्रपट संपतो असे होत राहते. एकंदरीतच संकलन करताना कमी पडले आहेत असे वाटले. अभिनयाचे बोलायचे झाले तर आमिर खान ने चांगला अभिनय केला आहे. चित्रपटातील गाणी चांगली असली तरी अश्याच चाली आपण राजकुमार हिरानी यांच्या इतर चित्रपटामध्ये ऐकल्या आहेत. झुबी झुबी आणि लव इस भेस्ट ऑफ टाईम याच्या मुखड्या मध्ये खूपच सारखेपणा जाणवतो. मला अजूनही कळत नाही कि एखाद्या live show मध्ये लोक अगदी बेल्जिअम पासून ते पाकीस्तान पर्यंत एकमेकांना फोन कसे काय करू शकतात? हे सर्व टीवी वरती सुरु असताना सगळ्या शहरांमधून लोक टीवीच्या दुकानाबाहेर हा कार्यक्रम पाहत उभे आहेत. हे तरी का सगळ्या चित्रपटातून दाखवतात? टीवी हे एकच माध्यम आहे का जे चित्रपटामधून दाखवले जाऊ शकते? आम्ही काही तरी 'वेगळे' करत आहोत असे म्हणणारे दिग्दर्शक शेवटी 'तेच तेच' तर करत नाहीत ना असा एक प्रश्न पडला आहे की वेगळेपणा एक नवा cliche झालाय?