अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते.
तरीही अशी कृती केली जात नाही. ते का?
हे समजावून घेत असता प्रथम हे जाणणे आवश्यक आहे की अशी कारवाई एक सरळ सरळ क्ष विरुद्ध य असे युद्ध नसेल तर ते "राष्ट्रसंघ" विरुद्ध "खालील अनेक उघड आणि छुपे शत्रू / विरोध" असे असेलः
१. अतिरेकी, हे तर मुख्य लक्ष्य आहेत आणि त्यांच्यासाठी हे जीवनमरणाचे युद्ध असणार आहे. मुख्य म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीतही स्वतःच्या म्हणण्यासाठी कोणतीच नीतिमात्ता न पाळणारे हे लोक, कोणत्याही थराला जाउन नीचतम पातळी गाठतील हे सांगायची गरज नाही. असे असले तरी अंतरराष्ट्रिय सैन्यावर सर्व खर्या आणि मानलेल्या नितीमत्तेने वागण्याची नैतिक जबाबदारी असेल.
२. अतिरेक्यांच्या देशातील सरकार आणि सैन्यदले देशाच्या सौर्वभौमतेचा मुद्दा पुढे करून विरोध, छुपे/प्रत्यक्ष युद्ध (आताही पाकिस्तानचा अमेरिकेशी डबल गेम चालू आहेच) करण्याचीच दाट शक्यता आहे.
३. त्या देशातील अतिरेक्यांचे हितसंबंधी, जे मुलकी नागरिक असल्याने त्यांच्यावर सरळ कारवाई साधी गोष्ट नाही, ही एक मोठी आणि धोकादायक डोकेदुखी असेल.
४. परकिय सैन्य आपल्या देशात घुसल्याने रागावलेले मुलकी नागरिक गुप्त कारवाया करू शकतात किंवा सरळसरळ अतिरेक्यांच्या गटात जाउ शकतात.
५. इस्लामी देशात परकिय सैन्य नेण्यास इतर इस्लामी देशांचा विरोध असेल (लिबियामधिल कारवायांच्या वेळी एका बाजूने पाश्चिमात्य देश तेथे "नो फ्लाय झोन करण्यासाठी काहीच करत नाहीत" अशी तक्रार करतानाच त्याच श्वासात "बूट्स ऑन ग्राऊंड" ला झालेला प्रखर विरोध आणि नंतर नो फ्लाय झोन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाँबिंग्मघ्ये काही नागरिकांचा मृत्यु झाला म्ह्णून निषेधही केला गेला, ते आठवा).
६. अतिरेक्यांवर कारवाई केली म्हणुन आणि त्या देशात परकिय सैन्य नेल्याची प्रतिक्रिया म्हणून जगातल्या सर्व अतिरेकी संघटना एकजूटीने / स्वतंत्रपणे जगभर अतिरेकी कारवाया करणार हे नक्की... यामुळे हा संघर्ष एका देशाच्या एका प्रांतापुरत्या न राहता सर्व जगच रणांगण बनेल आणि या बाबतीत जगभर युद्धपातळीवर खबरदारी न घेणे किती आत्मघातकी ठरेल हे नुकत्याच झालेल्या सिडनी प्रकरणासारख्या घटनांवरून समजणे सोपे होईल.
७. तालिबान असलेला भाग अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम आहे, तो पाकिस्तान-अफगाण सीमेच्या दोन्ही बाजूस आहे, तेथे या दोन्हीही देशांच्या सरकारांचे नाही तर स्थानीक टोळ्यांचे आणि अतिरेकी संघटनांचे नियंत्रण आहे. या संघटनांचे सदस्य मनाला येईल तेव्हा कोणत्याही आडकाठीशिवाय तेथिल आंतरराष्ट्रिय सीमा ओलांडतात. एका देशात गुन्हा करून दुसर्या देशात पळून जाणे हा त्यांचा नेहमीच डावपेच आहे. तेव्हा युद्ध करणार्या आंतरराष्ट्रिय सैन्याला अतिरेक्यांचा पाठलाग (हॉट परस्युट) करताना पाकिस्तान-अफगाणीस्तानची सरहद्द ओलांडण्याची परवानगी असायला हवी. हे आधुनिक काळात केवळ महायुद्धांच्या वेळी शक्य झालेले आहे. म्हणजे ही कारवाई एका देशातील स्थानीक ऑपरेशन न राहता अनेक देश सामील असलेले आंतरराष्ट्रीय युद्ध होईल.
८. अतिरेक्यांच्या विभागाची भौगोलिक परिस्थिती सामान्य युद्ध (conventional warfare) नाही, ते डोंगराळ, दर्याखोर्यांनी भरलेल्या भागातले गनिमी काव्याचे युद्ध असणार आहे. अश्या युद्धात रणगाडे, तोफा, आर्मर असे ते वापरणार्या बाजूचे पारडे वर ठेवणारे मोठे युद्धसाहित्य (हेवी वेपन्स) निरुपयोगी ठरते (तेथे पोहोचू शकत नाही). इतकेच काय तर दर्याखोर्यांत आणि डोंगरांतील गुहांत लपून राहणार्या आणि कोणतेही उघडे मोठे तळ (कँप्स) नसलेल्या शत्रूवर हल्ला करण्यास वायुदल परिणामकारक ठरत नाही. कारण विमानुड्डाणाला बिकट भौगोलिक परिस्थिती बरोबरच एवढ्या मोठ्या भागावर कारपेट बाँबिंग करायला दशलक्ष टनांनी बाँब्ज लागतील. त्याची किंमत मोजणे कठीण तर आहेच पण या कृतीचा बेनेफिट-कॉस्ट रेशो ती कृती वेडेपणाची ठरावी इतका कमी असतो. म्हणूनच अश्या परिस्थितीत ड्रोन वापरून सर्जीकल ऑपरेशन्स केली जातात... परंतु अश्या कृतीचीही किंमत कोलॅटरल डॅमेजने मोजावी लागते, जी स्थानीक जनतेला विरोधी गटात ढकलते आणि काम अधिक कठीण करते.
९. वर सांगितलेली भौगोलिक परिस्थिती अतिरेक्यांना तळहाताच्या रेषांसारखी माहित आहे, पण आंतरराष्ट्रिय सैन्याकरिता अनोळखी जागा असेल. त्यामुळे, केवळ सैन्याची हालचालच नाही तर त्याला लागणारी वाहने, हत्यारे, दारूगोळा, अन्न, इत्यादींचा पुरवठा करणे हे किती कठीण असेल हे सांगायला नकोच... आणि हे अतिरेक्यांच्या सतत होणार्या गनिमी आणि आत्मघातकी हल्ल्यांच्या छायेखाली करायला लागेल हे पाहिल्यावर परिस्थितीचे गांभिर्य ध्यानात यावे. अनेक दशके चाललेली यमुनेच्या बिहडांतील दरवडेखोरी आणि मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करी (त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही) आठवली तर किंsssचीत कल्पना यावी... मात्र या तुलनेत फार मोठे फरक असे की, (अ) येथे एका देशातील आंतरराज्य सीमेऐवजी आंतरराष्टिय सीमा ओलांडायची आहे, (आ) बिहड अथवा जंगलांऐवजी येथे हिमालयाच्या (किंवा त्याच्या उपरांगांच्या) दर्याखोरी आहेत, (इ) जुन्यापुराण्या बंदूक-रायफल वापरणार्या दरवडेखोरांच्या ऐवजी अत्याधुनिक शस्रास्त्रांनी (उखळी तोफा, रॉकेट्स, विमानवेधी तोफा, इ ने सज्ज आणि (ई) अनेक दशके त्याच परिसरात युद्ध करणारे, मरणाला न घाबरणारे माथेफिरू, आत्मघातकी, अतिरेकी आहेत, इ इ इ.
या सर्व आणि इतर अनेक गोष्टींमुळे या युद्धात होणारे फायदे व सोसायला लागणारे तोटे (आर्थिक, राजकिय, मानवहानीच्या स्वरुपातील, इ) यांचा "बेनेफिट-कॉस्ट रेशो" परवडणारा रहात नाही... निदान दर चार-पाच वर्षांनी येणार्या निवडणूकीतल्या हार-जीतीचा विचार करणार्या राजकारण्यांसाठी तर नव्हेच !
हुश्श्य ! आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे... पडद्यामागचे स्थानिक-प्रादेशिक-आंतरराष्ट्रिय राजकारणाचे गोडाउन उघडले तर वरच्या विश्लेषणात झालेली दमछाक म्हणजे सकाळच्या गुलाबी थंडीत रमतगमत केलेला बागेतला फेरफटका ठरावा !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अभ्यासपूर्ण विवेचन
धन्यवाद !
दक्षिण भारत?
>>> एवढे अवांतर सांगत
एक शंका...
तेलाचे राजकारण आहे.
मदतीला भारत जाऊ नये म्हणुन
अतिरेक्यांची...
जगभरातील प्रमुख देश अण्वस्त्र
आप्ल्याला काय त्याचे
चांगले विश्लेषण.
आवडला
नैतिकता आणि डार्विनचा सिद्धांत
समतोल लेख
>>> तरीही अशी कृती केली जात
कंटेनमेंट डॉक्ट्रीन...
तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही.जेव्हा एखादी गोष्ट समोरासमोर (हेड ऑन) हल्ला करून ("एक घाव दोन तुकडे" अशी) नष्ट करणे शक्य नसते अथवा तसे करण्याची किंमत अवास्तवी जास्त असते; तेव्हा "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" म्हणजे "त्या गोष्टीचा प्रभाव शक्य तेवढा ताब्यात ठेवत वेळकाढू धोरण स्विकारणे" हे वास्तविकतेला जास्त धरून असते. याचा अर्थ तिकडे दुर्लक्ष करणे असा नाही; याउलट सतत बारीक निरिक्षण चालू ठेवून जरूर तेव्हा व जरूर तेवढाच हस्तक्षेप करणे असा आहे. या डॉक्ट्रीनची परिणती दोनपैकी एकाने होणे अपेक्षित असते: १. ताब्यात ठेवलेल्या अनेक गोष्टींचा प्रभाव वेळेबरोबर कमी होऊन त्या नष्ट पावतात अथवा अतिशय कमकुवत होतात. २. सतत लक्ष ठेवून असल्याने योग्य मोक्याचा फायदा घेऊन मर्माघाती वार करून ती गोष्ट नष्ट अथवा अतिशय कमकुवत करता येते. सरळ सरळ उत्तर देण्याच्या कृतीला खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर (बेनेफिट्/कॉस्ट रेशो) असल्यास "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" वापरून केलेल्या कृती जास्त फायदेशीर असतात. भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे.माहीतगार--
काही शंका
रोचक लेख व चर्चा. वाचतोय.
दहशतवादी संपविण्यासाठी
कोलॅटरलची काळजी नं करता ह्या
तुमाला गुडघेदुखी सुरु झाली तर
कुठलातरी बादरायण संबध जोडु
तसही त्यांच्याकडे
तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात.परवाच प्रकाश आमटेंवरचा चित्रपट पाहिला. नक्षलवाद्यांच्या बाबतीत पण अगदी असंच चाल्लंय. सामान्य नागरिकाच्या कानाजवळ एके-४७ धरल्यावर त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देण्यावाचून पर्याय काय राहतो बॉस्स?ऩक्षलवाद्यांना कानापाशी
रोगापेक्षा उपाय जास्त घातक...
तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे.:) अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे.अणुबाँबचे परिणाम स्थानिक न
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…टॅक्टिकल न्युक्लीयर वेपन्स
तुम्ही म्हणताय त्याच्यात
काहीही झाले तरी त्याला भारतच
अगदी अगदी. आणि आमचं ** मिडीया
पाकिस्तान हा जागतिक सुरक्षेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…काही अधिक माहिती / बातम्या
.भारताची जी काही सामरीक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…एकदाच काही तरी परिणामकारक
मिपावर बर्याच जणांचे मत काही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…+५०००००
-१
क्लिंटनराव... अहो अणू युद्ध
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…आपण म्हणता तसे फिजीबल
त्यांचे एकही मिसाईल भारतीय
त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी.असे विधान करण्याअगोदर उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती चेर्नोबिलच्या घटनेवरून येउ शकेल.दगडापेक्षा वीट मऊ
अजिबात चूक. पाकिस्तान वर
अर्थातच जर अशा प्रकारच्या
>>> बाकी पाकिस्तानातल्या
सर्वात प्रथम आपण हे लक्षात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…यासाठी भारत किती सक्षम आहे
धन्यवाद. आपण दिलेला दुवा इकडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015कारगील?
मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015