भारत चीन : अमेरिकेचा आगाऊपणा
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्याचे संचालक जेम्स क्लीपर यांनी भारताची चीन शी लढण्याची तयारी असल्याची बातमी करून विनाकारण खळबळ माजवली आहे. आमच्या घरात आम्ही कसली तयारी करतो आहे आणि काय करतो आहे हे आमच्या परवानगी शिवाय जगभर बोंबलून सांगण्याची यांना काय आवश्यकता आहे ? भारतचे धोरण स्पष्ट आहे. सामंजस्याचे आहे. कुठल्याच शेजाऱ्याशी कुरापत काढून देशवासियांना विनाकारण युद्धाच्या खाईत लोटण्याचा भारताचा इतिहास नाही. कुणी कुरापत काढली तर संरक्षण करण्याचे सामर्थ्य ठेवणे या पलीकडे आम्हाला काही करायचे नाही. आपले अन्य प्रश्न देशाला महत्वाचे वाटतात हे स्पष्ट दिसते आहे. स्वत:च्या घरात लागलेली आग विझवायचे सोडून नस्ते उचकविण्याचे रिकामे धंदे हे करतात कशाला ? आता यातुन ही यांना कोणता धंदा करायचाय ?
वाचन
5618
प्रतिक्रिया
20