Skip to main content

बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 15/12/2014 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते. तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात : . त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन. त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं! तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू. मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!). साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला. वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स. (तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!) (केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 52836
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

मला वाटतं तुम्ही चूकताय संक्षी. इथे समोरचा काय म्हणतोय यापेक्षा तुम्हाला तिथे मिळालेला अनूभव कसा होता हे महत्वाचं आहे, आणि मला वाटतं तुम्ही तो व्यवस्थित मांडलाय. थांबायचं कि नाही हे मी सांगू शकत नाही, पण धाग्यावर चाललेल्या चर्चेतून तुम्हाला जे सांगायचंय तो उद्देश बाजूलाच राहीलेला दिसतोय. बाकी याउप्पर तुमची मर्जी!!

In reply to by एस

राजस्थानातले उंट आता बंगलोरला जातात.यावर वीसएक वर्षांपूर्वी इंडिआटुडे मासीकात लेख आला होता.

जास्त पैसे टाकले तरच हेवन मिळतो असं थोडंच आहे! कॉलेजात खिशात ५/१० रुपये असायचे तेव्हा कॉलेजात मैत्रिणीबरोबत एक वडा आणि कटिंग चहा डिसेंबरात सकाळी साडेसात वाजता मिळणे म्हणजे साक्षात स्वर्गप्राप्तीच की! तसंच नवरा किंवा एखाद्या मित्रासोबत एखाद्या चांगल्या पुस्तकाबद्दल, लेखाबद्दल डोकं चालायला लागेपर्यंत चर्चा करणे म्हणजे स्वर्ग. एखाद्या संध्याकाळी एकट्यानेच घराच्या गॅलरीत कसलाही विचार न करता निवांतपणे केवळ पाऊस बघणे किंवा बाकीबाब अथवा कुसुमाग्रजांचे पुस्तक वाचणे म्हणजे स्वर्ग. आईच्या हातचा गरमागरम तूपमेतकूटभात म्हणजे स्वर्ग. तसंच निष्कारण हिंदी/ऊर्दू/इंग्रजी शब्द न घुसडता शुद्ध मराठीत लिहिलेले एखादे सुंदर स्फुट वाचायला मिळणे म्हणजे स्वर्ग. असे कितीतरी लहान सहान स्वर्ग आपल्या आजूबाजूला विखुरलेले असतात. त्यासाठी ना कोणाच्या सहवासाची गरज असते ना पैशांची. समजायची दृष्टी हवी.

In reply to by पैसा

प्रवचन देण्याची ऊर्मी दाबल्या गेली आहे. ;) बाकी झेंडा खाली पाडला गेला आहे की काय? गाडी आता सगळे स्टार्टर संपून आता मेन कोर्स वर आलेली दिसते. :) (१५८ चे ७६ म्हणजे सगळे डेड बॉल झाले की!)

In reply to by प्यारे१

अवांतरः ते तुमचं इंग्लिस विंग्लिस आपल्याला कळत नै ओ प्यारे काका! सहसा असे लेखाशी सहमती नसलेले प्रतिसाद धागालेखकांना एकूणच आवडत नैत असा पूर्वानुभव असल्याने एवढा वेळ लिहायचे टाळत होते.

In reply to by पैसा

असे कितीतरी लहान सहान स्वर्ग आपल्या आजूबाजूला विखुरलेले असतात. त्यासाठी ना कोणाच्या सहवासाची गरज असते ना पैशांची. समजायची दृष्टी हवी.
हे वाक्य फेसबूक स्टेटस ठेवण्याची परवानगी द्या. :)

खालील फोटो पाहिलयावर हा कसा करावा याची कल्पना येईलच. फक्त जाळी अशा व्यासाची घ्यायची की आग (मंद विस्तव) हा पदार्थाच्या खाली ४ इंच राहिली पाहिजे. जाळी कुठल्याही हार्डवेरच्या दुकानात मिळते. घमेले पण....उरल्या सळया...त्याला मात्र लाकडी मुठी बसवून घ्याव्यात म्हणजे हाताला चटके बसत नाहीत....अर्थात आधी हाताला चटके मग मिळती कबाब असा अनुभव हवा असल्यास त्याची आवश्यकता नाही.... :-) Simple, Free Image and File Hosting at MediaFire यातच भाजलेले मटन/चिकन कबाब.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire

In reply to by मुक्त विहारि

अहो तो शाकाहारी आहे. त्याची बायको माझ्या बायकोला विचारत होती की तुम्ही मच्छी सोडू शकत नाही का? त्यावर माझ्या बायकोचे बाणेदार उत्तर - "नवरा सोडेन पण मच्छी खायची सोडणार नाही"

In reply to by जेपी

नवरा सोडून देइन वगैरे बोलण्याची गोष्ट झाली. जर कुणी असा बाणेदारपणा दाखवला तर त्याची "प्रिय व्यक्ती" त्याला ग्रिलवर भाजून खाण्याची शक्यता जास्त आहे.

"नवरा सोडेन पण मच्छी खायची सोडणार नाही"
जवळपास अशीच म्हण गुजराती भाषेत पण आहे. गुजरातच्या काही भागात तरुणांमधे गुटखा आणि वयस्कर व्यक्तीमधे बिडीचे फार व्यसन आहे. कुणी त्यांना बिडी सोडायला सांगीतली की ते म्हणतात "बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे." आणि खरोखर वेळ पडली तर बायडी सोडली पण बिडी न सोडलेली कैक उदाहरणे देखील प्रत्यक्ष अस्तित्त्वात आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

"बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे."
अगागागागागागा _/\_

मुंबैत कुठे आहे असले ?

प्रचेतस, धन्या, आणि प्रशांत बरोबर बार-बे-क्यू नेशनचे सर्व व्हेज पदार्ध इंजॉय करता आले. तृप्त जाहलो. भन्नाट अनुभव होता. पाहुणचाराबद्द्ल आभार दोस्तहो. फोटो निवांत डकवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंच. काल अक्षरश: हेवनवासी जाहलो.

In reply to by प्रचेतस

म्हणजे हा प्रतिसाद : हिंजवडी भागात काम करणार्‍या प्रत्येकाला माहिती असणार्‍या हॉटेलचे कोलंबसाने अमेरिका शोधण्याच्या धर्तीवर केलेले ग्लोरीफिकेशन वाचून अंमळ मौज वाटली. हेवन वगैरे काही नाही. खिशाला परवडणार असेल तर एकदा जेवण्यासाठी ठीक ठाक असे हॉटेल आहे हे. अशा पद्धतीची हॉटेल्स पुण्यात ढीगाने आहेत. बोगस होता. लोकांची दिशाभूल करून त्यानं स्वतः मात्र तिथे हजेरी लावली! आणि कंपूबाजांच्या मत्सरामुळे संकेतस्थळानं एक आयडी गमावला.

In reply to by विवेक ठाकूर

हो ना! काय हे कंपूबाजांनो? शोभतं का हे तुम्हांला? हा हंत! हंत! तुमच्यामुळे एक आयडी गमाबला बरं मिपाने! दुत्त कुठले!! आणि जाउद्या हो ठाकूरसाहेब, पुन्हा आलाय ना तोच आयडी! झालं तर.

In reply to by पैसा

त्या अहंगंडानं पछाडलेल्या व्यक्तीचं एकमेव गोष्टीसाठी कौतुक वाटायचं - संस्थळावरून हाकलला गेल्यावर परत आला नव्हता डु-आयडी घेऊन. आता तेही नाही राहिलं. मातीचे पाय याचेपण... अरेरे!

In reply to by एस

मराठी संकेस्थळावरुन कोनाला ब्लॉक केलं म्हणजे त्याला हाकलून दिलं असं म्हनू नये असे वाटते. कोणी संकेतस्थळाचे काही नियम भंग केले म्हणून ती मालकांनी ती केलेली कार्यवाही असते त्यात सदस्यांना फार आनंद होऊ नये असे वाटते आणि त्यामुळे कोणी कोंणाला हिनवू नये असेही वाटते. आज कोणी सदस्य सुपात आहे तर कोणी सदस्य जात्यात आहे. एक सदस्य म्हणून माझं मत व्यक्त केलं आपल्याला अशा गोष्टीचं कौतुक असेल, आनंद होत असेल तर मी आपल्या मताचा आदर करतो. वाटलं ते बोललो कदाचित मी चुकही असेन. :) -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

मराठी समीक्षा किती थिटी ? किती संपन्न. या दुपारी बारा वाजता सुरु झालेल्या परिसंवादास मी उपस्थित होतो. जेष्ठ समीक्षक प्रा. दीगंबर पाध्ये होते तर डॉ.दिलीप धोंडगे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. महेश खरात, डॉ. मिना गोखले, डॉ. रणधीर शिंदे या परिसंवादात सहभागी होते. समीक्षा म्हटली की बा.सी. मर्ढेकर यांच्या नावाची चर्चा होणारच होती. सौंदर्यशास्त्र या विषयावर चर्चा झाली. समीक्षकांनी त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोण अमान्य होता. मर्ढेकरांची भूमिका होती की प्रत्येक कलेला शब्दांचे माध्यम असते, कुठल्याही कला ह्या संवेदनेचे माध्यम वापरतात. ललित वाडःमयात शब्द ही महत्वाची गोष्ट असते, ते रुपवादी कवी कसे होते. मर्ढेकरांनी लयसिद्धांत तपशीलवार कसा मांडला नाही त्यांच्या भूमिकेत अस्पष्टता आहे. नंतर रा.भा.पाटणकर यांची समीक्षा, जीवनवादी, कलावादी समीक्षक, वा.ल.कुलकर्णी, सुधीर रसाळ, बाळकृष्ण कवठेकर, यांच्या समीक्षेवरही चर्चा झाली. प्रसिद्ध लेखकांच्याच लेखनाचीच आजचे समीक्षक समीक्षण करतांना दिसतात. पॉप्युलर लेखक जे आहे त्या मागे समीक्षकांनी जाणे चांगलं नाही. द.भी.कुलकर्णी यांच्या समीक्षेबद्दल विचार मांडण्यात आले. नव लेखक आणि नव समीक्षक यांचा विचार प्रामुख्याने पुढे येत नाही असा सूर जाणवला. लेखक समीक्षक यांचे नात्याच्यापुढे समीक्षा जावी. पुस्तक आणि समकाली लेखन यांचा विचार समीक्षकांनी केला पाहिजे. डॉ. महेश खरात यांचं विवेचन अतिशय सुरेख झालं. ललित वाडःमयाचे मुल्यमापन कसे करावे, तुलना, कसोट्या, साहित्यकृती चांगली आणि श्रेष्ठ, हे ठरवितांना समीक्षक थिटे पडत आहेत ते कसे याबाबतीत सखोल विचार मांडले, सैद्धांतिक समीक्षा, वाड:मय समीक्षा, त्याच्या पाय-या असा मस्त विषय होता. बाकीच्यांनी मात्र परंपरावादी समीक्षकांप्रमाणे आपले विचार मांडले. मजा आली. सुत्र संचलन सो सो होतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कृपया वरील वाक्यात 'संस्थळावरून कारवाई झाल्यामुळे आयडी ब्लॉक झाल्यावर' असे वाचावे. संस्थळावरील औचित्य राखणे एक सदस्य म्हणून आपले कर्तव्यच असते.

In reply to by आदूबाळ

ते दोन वेगवेगळे आहेत असे समजत होतो. अति अवांतर : नाखु तुम्हाला विस्मरणाचा आजार जडलाय वयामुळे. अति दूर अवांतर : हा एक मोहमायेचा प्रताप तर नाही !!! बुवांनी खुलासा करावा "मांतीक " नाहीत नाहेतर त्यांनीच केला असता आणि तुडतुडींना विहारून उपयेओग नाही प्रतिसाद नको पण खुलासा आवर अशी वेळ यायची माझ्यावर. अति दूर (गामी) अवांतर : कोण कुणाचा डु आयडी याची संदर्भ पुस्तीका आहे का साहेत्य संमेलनात , जरा पहायला हवे !!!!

बार-बे-क्यू नेशनला पूर्वी भरपूर गर्दी असे. मागच्या आठवड्यात मी सह कुटुंब गेलो तर तेथे फारशी गर्दी होती. मी गाडी पार्क करून येईस्तोवर सौ. ने त्यांचे मेन्यु कार्ड पाहीले आणि त्याच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली. आता त्यांचे दर रुपये ९९९ अधिक कर असे आहेत. आम्ही हिशेब केला चार जणांच्या जेवणाचे साडे चार हजार रुपये पेक्षा जास्त होतील. मुळात आम्ही चौघे( मी, बायको आणि दोन मुले) बारीक कॅटेगरीतील आहोत. आम्ही खाऊन खाऊन किती खाणार. साडे चार हजार रुपये एका जेवणासाठी हे न पटण्यासारखे असल्यामुळे ते सोडून आम्ही "पॉपटेटस" मध्ये गेलो पोटभर जेवूनही बिल १७००/- आले. आता लक्षात आले की त्यांची गर्दी कमी का झाली. एक बैठकीत एकट्याने रु. १२००/- चे खाणारी माणसे किती असतील. मुंबईत हे पैसे परवडणारी माणसे भरपूर आहेत पण भारतीय माणूस हा पैशाचे मूल्य जाणणारा आहे.

In reply to by सुबोध खरे

ह्यांची एक शाखा नुकतीच घोडबंदर रोडवरही सुरू झालेली आहे. त्यांचे दर हे शाकाहारी-मांसाहारी, दिवस-रात्र आणि विविध वार यांच्याप्रमाणे बदलतात. सोमवार-मंगळवारचे, दुपारच्या शाकाहारी जेवणाचे ५६० रुपयांपासून ते रविवारी संध्याकाळच्या मांसाहारी जेवणाचे ९९१ रुपयांपर्यंत विविध आहेत!! दरांप्रमाणे जेवणाची प्रत बदलले किंवा कसे, हे ठाऊक नाही!

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे डाॅ खरे. कमी खाणारे तर लागोपाठ येणारे खाद्यपदार्थ बघुनसुध्दा गांगरतात! इतकं खाऊ शकतच नाही.व्हॅल्यू फाॅर मनी नाहीच अशा लोकांसाठी. त्यात तिथे माझ्यासारख्या शाकाहारी लोकांना एक प्राॅब्लेम जाणवतो.शेजारी मांसाहारी मित्रमंडळी असतील तर ते ग्रील करत असलेल्या मांसाचा वास आणि धूर तिथे कोंडला जातो.मागच्या एका अशाच पार्टीला मी शेवटी थोड्या थोड्या वेळाने बाहेर उठून जाऊन श्वास घेत होते!

In reply to by सुबोध खरे

बाबौ! मग मी जाणार नाहीच. तसंही या धाग्यावरील उपहारगृहांमधील पदार्थांचे दर पाहून जायलाच नको वाटते. त्यातून आपण खाणार्‍यातले नसलो तर नकोच! आणखीही मनात बरेच प्रश्न सतत असतात. अशी उपहारगृहे स्वत:ची जाहिरात करताना काहीवेळा पाहण्यात येते की शांत परिसर, हायवेलगत, डोंगरात वगैरे शब्द वापरले की या जागी आधी कोणाची शेती असेल? मग आता तो मनुष्य काय करत असेल? या व्यवहारात कोणाला जिवाला मुकावे लागले असेल का? हे कधी बोलून दाखवले गेले नाहीत कारण सगळे हसतात व फार विचार न करण्याबद्दल नेहमीचे सल्ले देतात. पॉपटेटसचे नाव वाचून गविंचीच आठवण आली व त्यांचा प्रतिसादही आला होता. त्यांचे आवडते ठिकाण, जिथून कट्ट्याचे समालोचन होत होते. ;)

आपण धन्याला उद्देशुन लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्या मत मांडेलच पण धन्या त्याच्या मतावर ठाम आहे. मित्रांसाठी आणि मित्रांच्या आनंदासाठी धन्या बार बे क्यु नेशनला आला होता एवढेच सांगू इच्छितो. :) पण, संक्षीसेठ खरं सांगतो आम्हाला तुमची प्रत्येक क्षणाला आठवण येत होती अगदी बुकींग पासून तुम्हीच आमच्या स्मरणात होता. पायनपल भट्टीतून काढल्याबरोबर काट्या चमच्यांना तुम्हीच लगडलेला होता. कोणी तरी असंही म्हणालं की विवेक ठाकूर या आयडीत संक्षीचा लिहिण्याचा फील येत नाही. कोणी तरी असंही म्हणालं की संजय क्षीरसागर या आयडीत एक खास पंच होता. कोणी तरी असंही म्हणालं की संजय क्षीरसागर हा आयडी त्यांना परत दिला आहे तर त्यांनी त्याच आयडीने लिहिलं पाहिजे. पण लोकांना का वाट्तं की विठा हे संक्षी आहेत म्हणुन. ;) [ह्लकेच घ्या हं] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षींचं म्हणणं असं होतं की जगण्याचा एक वेगळा नजरीया आहे. जवळच्या जवळचं ठिकाण, बेहतहाशा अँबियन्स, प्रिय व्यक्तीचा सहवास, वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत, अनिर्बंध वेळ या सगळ्या गोष्टी जमल्यातर बीबीक्यू जन्नत आहे. आणि एखादेवेळी पैश्याकडे न पाहता असा आनंदोत्सव साजरा करण्यात मजा आहे. तुम्हाला तो आनंद गवसला याचं कारण तुम्ही ओपन मांइडेडली तिथे गेलात आणि ती दोस्तांची मैफिल होती, इतक्या आनंदात बील ही गोष्ट दुय्यम होते हे कुणीही मान्य करेल. मला व्यक्तिशः लोकांच्या पैश्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचं कायम नवल वाटत आलं आहे. बर्फाच्या घरात झोपण्यासारख्या विक्षिप्त कल्पनेसासाठी एखादा लाखो रुपये खर्च करतो आणि लोकांना ते ग्रेट वाटतं. हजारो मैलांचा प्रवास, कमालीचं विपरित हवामान, अत्यंत काँप्लिकेटेड व्यवस्था, त्यात कुठे काही चुकलं तर नाहक जीवावर बेतण्याची शक्यता, खाण्यापिण्याच्या गैरसोयी ... आणि मजा म्हणजे शेवटी आनंद तोच ! पण असं म्हटलं की लोक म्हणतात वडापाव आणि कटींग चहामधे आम्हाला मजा येते कशाला हवा तो बीबीक्यू ! लोकांची विचारसरणी एक्स्ट्रीम वाटते. असाच अनुभव मला स्प्लेंडर कंट्रीच्या लेखावर आला. लोक पर्यटनासाठी किंवा दुर्गम तिर्थक्षेत्री जायला, कितीही हजार खर्च करतील, काहीही खातील, अशक्य वणवण करतील पण एखाद्या जवळच्या लोकेशनला, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन-चार दिवस रमायचं म्हटलं तर हॉटेलचं टॅरीफ बघतील ! संक्षींसारख्या माणसाचे विचार हाणून पाडायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याला अहंकारी ठरवायचं, तो स्वतःला शहाणा समजतो अशी आवई उठवून द्यायची आणि प्रस्थापित विचारसरणीवर पुन्हा चालू पडायचं की काम झालं.... पण त्यांच्या लेखनाची कुणाला न कुणाला केंव्हा न केंव्हा खूणगाठ पटेल आणि तुमच्यासारखी दिलदार व्यक्ती तो धागा परत वर आणेल. या धाग्याला वर यायला एक वर्ष लागलं. इतर धागेही असेच कुठे तरी, कुणाला तरी अनुभव आला की वर येत राहातील. आयडी असला किंवा नसला... काही फरक पडत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

संक्षीसेठ, आपला प्रतिसाद आवडला. आपल्या प्रतिसादावर माझं लव आहेच. बाकी, महाग आहे म्हणून जात नाही वगैरे हे या धाग्यातील प्रतिसाद मलाही पटत नाहीत. अनपेक्षित खर्च आपला कुठे होत नाही ? अचानक कुठलं बाहेरचं पाणी पिण्यात येतं. अंगात ताप भरतो, सर्दी, खोकला, लूज मोशन झाले की हजार रूपयाची वाट लागुन जाते. सालं मित्रांनी खर्च केलेला असला तरी मला जेवनाचा आनंद खुपच झाला. साहित्य संमेलनापेक्षा मला जेवनाचाच आनन्द जास्त झाला. तुम्ही म्हणता तसं पुढच्या वेळी मी आणि माझी प्रिय मैत्रीण फक्त. संक्षीसेठ मला आनंद जास्त होतोय का ? प्रचेतस, धन्या, प्रशांत आपल्याकडे खुप मागनं नाही फक्त तिकडे आलो की तिथे जेवू घालत जा ब्वा ! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येस सर ! मग बघा काय धमाल येतेयं ती. संक्षीसेठ मला आनंद जास्त होतोय का ? संक्षी असते तर म्हणाले असते : आनंदात जगणं म्हणजे पब्लिकला अपराध वाटतो म्हणून लोक संभाळून संभाळून जगतात. तुम्ही आपले तुमच्या नेहेमीच्या स्टाइलनं बिनधास्त जगा.

In reply to by विवेक ठाकूर

ठाकूर साहेब या गोष्टीचा एक वेगळा पैलू पण आहे. मी माझ्या कुटुंबा बरोबर( बायको मुलगा १८ वर्षे आणि मुलगी २१ वर्षे) गेलो होतो. मुलांना केवळ एखाद्या ठिकाणी गेलो आहोत आणि भीड पडते म्हणून पैसे खर्च करून यायचे हे न सांगता आपल्या पैशाचे पूर्ण मूल्य कसे मिळवता येईल हेही शिकवणे आवश्यक आहे. "भीड भिकेची बहिण" असे आमची आई म्हणते. विशेषतः पंचतारांकित ठिकाणी "इंग्रजी बोलता येणार्या माणसांसमोर नाही कसे म्हणायचे" हि भीड बाळगून ते म्हणतील ते पैसे वळते करून यायचे हे करण्यापेक्षा अशा ठिकाणी स्पष्ट नकार देत आला पाहिजे हि शिकवण मुलांना देत यावी हा त्यातील हेतू होता. विचार सरणी स्पष्ट असावी हे माझे मत मुलांच्या मनात रुजवावे हि त्या मागची विचारधारा आहे. अवांतर -- हॉटेलात हजारो रुपये खर्च करणारे लोक जेंव्हा भाजीवाल्याशी पाच रुपयांसाठी हुज्जत घालताना पाहतो तेंव्हा जरूर वाईट वाटते.

In reply to by सुबोध खरे

मलाही मुलगा आहे आणि पैश्याचं मूल्य त्याला कळावं अशी इतर पालकांप्रमाणे अपेक्षा असतेच. तरीही आपण आणि आपली अर्धांगिनी हे एक वेगळं नातं आहे, ती एक वेगळीच दुनिया आहे. तिच्या बरोबर एकांतात घालवलेला वेळ आणि सर्व कुटुंबाबरोबर साजरे केलेले प्रसंग यात फरक आहे हे तुम्हालाही मान्य होईल. तुम्ही वेगळ्या प्रसंगात होतात आणि तुमच्या जागी मी असतो तरी तसाच पर्याय निवडला असता. या लेखात पत्नीनं प्रपोजल दिलं होतं आणि तो केवळ दोघातला सोहळा होता. शिवाय मुंबईतलं बीबीक्यू आणि सयाजीचं बीबीक्यू यात अँबियन्सचा फरक आहे. कधी पुण्याला, फक्त पत्नी बरोबर येणार असाल तर नक्की बघा, तुम्ही दोघं खूष व्हाल .

In reply to by सुबोध खरे

अत्यंत सुरेख लेख आहे. तुम्हा दोघांच्या रसिकतेला दाद देतो. तुम्ही म्हटलंय : यासाठी लग्नानंतर प्रत्येक थोड्या फार कालावधी नंतर प्रत्येक युगुलाने स्वतःसाठी थोडासा वेळ काढून ठेवला पाहिजे. आपल्यातील या प्रियकराला किंवा अवखळ प्रेयसीला वर आणले पाहिजे आणी आपल्या फिकट होत चाललेल्या चित्रात नवे रंग भरले पाहिजेत. संक्षींचा हा लेख तेच तर सांगतोयं! व्यक्तीश: विचाराल तर मला प्रत्येक दिवसच हनिमून असल्यासारखा वाटतो, फक्त संधी मिळण्याचा आवकाश ! कारण सारं तारुण्य मी ओशोंना आत्मसात करण्यात घालवलं आणि जीवनाचा उत्सव करायला शिकलो, आय हॅव फिनिश्ड विथ टुमारो. त्यात तुम्ही म्हटलंय तो फिटनेस तर आहेच. आणि त्याच्या जोडीला संगीत, योगा आणि प्राणायाम, बेभान व्हावं असा खेळ, जोडीला मदीरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळच वेळ आहे ! माझ्या दृष्टीनं सारं जीवन म्हणजे प्रत्येक पैलूत प्रणय शोधण्याची किमया आहे. भोजन हा कडाडून लागलेली भूक आणि एकसोएक पदार्थांचा समागम आहे. खेळ हा विश्राम आणि विहार यांचा प्रणय आहे. संगीत हा शांतता आणि स्वर यांचा मिलनोत्सव आहे. मदीरा ही सजगता आणि बेहोशी यांची जुगलबंदी आहे. आणि इतकं जगल्यावर प्रियेशी प्रणय म्हणजे तिला आपल्या आनंदात सामिल करून घेण्याचा एक उत्कट बहाणा आहे.

In reply to by विवेक ठाकूर

मला फँटसी वाचायला खूप आवडतात. बाकी प्रत्येक दिवस हनीमून कल्पना छान आहे.आमच्याकडे प्रत्येक दिवशी दूधवाला पेपरवाला कचर्याची घंटा गाडी कामवाली किराणा भाजीपाला आणणे अशीही कामं असतात. आम्ही सामान्य आहोत.बाई आली की जीवनाचा उत्सव साजरा करतो. टुमाॅरो फिनिश करताच येत नाही.टुमाॅरोची भाजीची तयारी करावी लागते.

In reply to by अजया

तुमच्यासारख्या दुत्त, अरसिक मिपाकरांमुळेच तर सरे प्रॉब्लेम्स होताहेत! ह्या अरसिक वृत्तीमुळेच तुमाला जीवनाचे सौंदर्य कळत नाई अज्जिबात! :D

In reply to by यशोधरा

ते जीवनाचे आरस्पानी सौंदर्य का? तेही आम्हाला नीट दिसत नाही.आरशाला टिकलीचे डाग पडले आहेत.

In reply to by यशोधरा

खूप कामं असतात हो.नवरा फॅन्टसीमग्न मग बायकोला टिकली आरशाला लावून कचरा गाडीला डबा द्यायला जावे लागते:( सामान्य अरसिकांच्या सामान्य व्यथा.तुम्ही युटोपियात रहाणारे काय जाणणार?

In reply to by अजया

आमाला सामान्य काईच समजत नै. तुम्हांला इतके सुद्दा कळू नये ह्याचे वैषम्य वाटू लागलेय. ह्यामुळेच तुमच्या आयुष्यरुपी आरशाचा पारा उडून जातो आहे, त्याला डाग पडत आहेत.. पण असू द्या. डाग अच्छे हैं असं कोणतीशी झ्यायरात सांगते खरी.

In reply to by सस्नेह

थोडक्यात तुमाला अस्वच्चच रहायचे आहे तर. अशानेच पुढे समश्या निर्माण होतात, नव्हे, नव्हे तुमीच त्या निर्माण करता आणि मग जगाला बोल लावता. तुमाला जगात यत्र तत्र असलेला आनंद या अस्वच्चतेमुळेच दिसत नाई.

In reply to by यशोधरा

मुझे "बेपनाह मोहब्बत के सिवा कुछ नहीं आता" चाहो तो मेरी "साँसो की तलाशी ले लो...!!! -दिलीप बिरुटे