Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/15/2014 - 14:39
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते. तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात : . त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन. त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं! तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू. मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!). साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला. वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स. (तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!) (केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
  • Log in or register to post comments
  • 52527 views

प्रतिक्रिया

Submitted by सौंदाळा on Tue, 12/16/2014 - 14:44

Permalink

वाह,

वाह, बार्बेक्यु नेशन स्टाईलने प्रतिसादांचे स्टार्टर्स चालु झाले (चिंचवड बार्बेक्यु नेशनच्या उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला) सौंदाळा
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 12/16/2014 - 14:50

Permalink

नवी माहीती मिळाली. सगळ्यांना

नवी माहीती मिळाली. सगळ्यांना एकत्र जायला मिळालं की नक्की जाउ.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Tue, 12/16/2014 - 15:00

Permalink

(इथले काही सदस्य/(सदस्या)

(इथले काही सदस्य/(सदस्या) पुन्हा नाराज होतील, तरीही) सन्दर्भ समजला नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 12/16/2014 - 15:05

Permalink

हिंजवडी भागात काम करणार्‍या

हिंजवडी भागात काम करणार्‍या प्रत्येकाला माहिती असणार्‍या हॉटेलचे कोलंबसाने अमेरिका शोधण्याच्या धर्तीवर केलेले ग्लोरीफिकेशन वाचून अंमळ मौज वाटली. हेवन वगैरे काही नाही. खिशाला परवडणार असेल तर एकदा जेवण्यासाठी ठीक ठाक असे हॉटेल आहे हे. अशा पद्धतीची हॉटेल्स पुण्यात ढीगाने आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 12/16/2014 - 15:11

In reply to हिंजवडी भागात काम करणार्‍या by सतिश गावडे

Permalink

अशा पद्धतीची हॉटेल्स पुण्यात ढीगाने आहेत?

क्या बात है! किमान तीन नांव सांगा नक्की ट्राय करायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 12/16/2014 - 15:18

In reply to अशा पद्धतीची हॉटेल्स पुण्यात ढीगाने आहेत? by संजय क्षीरसागर

Permalink

इथे पहा.

इथे पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 12/16/2014 - 19:34

In reply to करेक्ट! by संजय क्षीरसागर

Permalink

केलेलं जेवण (जे बहुदा

केलेलं जेवण (जे बहुदा ऑफिसच्या वेळात आणि ऑफिसच्या खर्चानं असण्याची शक्यता आहे)...
त्यात गैर काय आहे?
आणि स्वतःच्या प्रिय व्यक्तीबरोबर (स्वतःच्या पैश्यानं, मनमुराद आणि निवांतपणे केलेलं) सहभोजन, यातला फरकच तर स्वर्ग आहे!
जगाच्या पाठीवर फक्त तुम्हाला एकटयालाच
स्वतःच्या प्रिय व्यक्ती
आहेत आणि बाकीचे सारे अनाथ आहेत असं म्हणणं आहे का तुमचं. या मिपावरच आमचे जीव ओवाळून टाकावेत असे जीवाभावाचे मित्र आहेत आणि तुमच्या या तथाकथित हेवनला आणि तत्सम हॉटेल्समध्ये निवांत आणि स्वतःच्या खर्चाने जेवलो आहोत.
अनुभव असेल तर तो शब्दातून सहजपणे व्यक्त होतो, त्याला अभिव्यक्ती म्हणतात. जर आडातच नसेल तर पोहोर्‍यात येत नाही. अर्थात, दुसर्‍याच्या अनुभवाला कमी लेखायला प्रतिभा कशाला हवी? पुरेशी जळजळ असली की झालं!
जगाकडे पाहण्याचा चष्मा बदला. तुम्हाला आलेला अनुभव जसा तुम्ही "हेवन" म्हणून लिहिलात तसं मी माझे मत प्रतिसादात लिहिले. तुमचे शब्दबंबाळ टंकन ही सहज शब्दातील अभिव्यक्ती आणि आमचे मोजक्या शब्दातील टंकणे प्रतिभाहीन. असे का?
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 12/16/2014 - 19:39

In reply to केलेलं जेवण (जे बहुदा by सतिश गावडे

Permalink

कारण तू वेडायस!!

कारण तू वेडायस!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by vikramaditya on Tue, 12/16/2014 - 22:56

In reply to केलेलं जेवण (जे बहुदा by सतिश गावडे

Permalink

सतीश

बरोबर बोललात. ह्याच न्यायाने, जरा कोणी पैश्याचा विषय काढला तर तो "पैसा वर्सेस काय ते स्वर्गीय सहभोजन वगैरे" मुद्दा होतो. पण स्वतः मात्र फिक्स्ड पैशात अनलिमिटेड खायला मिळणार म्हणुन सकाळपासुन उपासमार करुन ३ तास खात बसले, तर त्याला "डुईंग जस्टीस टु फुड" वगैरे भारदस्त नाव द्यायचे!!! जावु दे... त्यांचे सगळेच स्वर्गीय, दिव्य वगैरे असते, इतर मर्त्य मानवांना हे कसे कळणार? आपलेच नशीब थोर कि असे ज्ञान मिळत राहते.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 12/17/2014 - 01:27

In reply to हिंजवडी भागात काम करणार्‍या by सतिश गावडे

Permalink

हिंजवडी भागात काम करणार्‍या

हिंजवडी भागात काम करणार्‍या प्रत्येकाला माहिती असणार्‍या हॉटेलचे कोलंबसाने अमेरिका शोधण्याच्या धर्तीवर केलेले ग्लोरीफिकेशन वाचून अंमळ मौज वाटली
मग 99% पुस्तक परिक्षणे, सिनेमा परीक्षणे, हॉटेल्स चे reviews बाद की. ____संपादित____
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Tue, 12/16/2014 - 16:14

Permalink

संक्षी सुंदर ओळख त्याहुन सुंदर फोटो पण हाय रे किस्मत

मी पापी पुण्य नगरी त कधी जाणार कधी हेवन इनसाइड हेवन मध्ये मला हि संधी मिळ्णार ? पण आता जेव्हा कधी आयुष्यात पुण्यात येईल तेव्हा नक्की ट्राय करणारच योगायोगाने प्रिय फार च प्रिय व्यक्ती आहेच पुण्यात तोपर्यंत एक दिर्घ उसासा.................................................................
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 12/16/2014 - 17:24

Permalink

आज दोन लग्नाला हजेरी लावायचा

आज दोन लग्नाला हजेरी लावायचा योग आला. त्यामुळे जेवणाला बर्यापैकी चॉईस व्हता. फुकटात गिळायला मिळाल्यामुळे I WAS/IS (काय असेल ते) in HEAVEN.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Tue, 12/16/2014 - 17:53

Permalink

संक्षीसर वर सगाने

संक्षीसर वर सगाने म्हटल्याप्रमाणे अशी बरीच हॉटेल्स पुण्यात आहेत. सिगरी (ढोले पाटील रोड) : इथे बारबेक्यु आणि अल-कार्ते दोन्ही ओप्शन्स आहेत. बार्बेक्युपेक्षा ओर्डर करुन पंजाबी जेवण मागविण्याचा अनुभव जास्त चांगला आहे. येलो चिलीज - कोरेगाव पार्क रॉयल ओर्किड - विमाननगर परत बारबेक्यु नेशनला जाण्यापेक्षा वरील पर्यायांचा विचार जरुर करा
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 12/16/2014 - 20:50

In reply to संक्षीसर वर सगाने by सौंदाळा

Permalink

पुढल्या वेळी या पर्यायांचा

पुढल्या वेळी या पर्यायांचा नक्की विचार करेन, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 12/16/2014 - 21:05

In reply to संक्षीसर वर सगाने by सौंदाळा

Permalink

लिटल इटली ब्येष्ट.

लिटल इटली ब्येष्ट. ७५० रू. प्रत्येकी अमर्यादित औथेंटीक इटालियन. पण हे फ़क्त रविवारी लंचलाच. प्रचंड व्हरायटी असते. इतर वेळी म्हणजे सोम ते शनि बुफे लंच ला पदार्थ कमी असतात आणि डिनर ला अ ला कार्ते जे अति प्रचंड महाग असते
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 12/16/2014 - 21:53

In reply to लिटल इटली ब्येष्ट. by प्रचेतस

Permalink

क्याफे मेझुना नामक हाटिल हाही

क्याफे मेझुना नामक हाटिल हाही चांगला ऑप्शन आहे अमर्याद इटालियन खायला. बिना दारू माणशी ८००. त्यात अमर्याद मॉकटेल्सही. बोट क्लब रोडावर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 12/16/2014 - 21:58

In reply to क्याफे मेझुना नामक हाटिल हाही by अनुप ढेरे

Permalink

जायलाच हवे तिकडे

जायलाच हवे तिकडे
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 12/16/2014 - 18:01

Permalink

माझ पुण्यातील आवडत ठिकाण MP

माझ पुण्यातील आवडत ठिकाण MP garden . लै बिल नाही .थाळी टैप व्हेज,नॉन चापयच. मजेत राहायच.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 12/16/2014 - 22:29

Permalink

दर वेळी सयाजीतल्या त्या

दर वेळी सयाजीतल्या त्या बार्बेक्यू नेशनच्या वेटरांना आणि मॅनेजरला झाडल्याशिवाय तिथले जेवण पचतच नाही. स्टार्टर्स बरे असतात. पण तिथल्या ग्रिल्ड फिश कबाबांची चव पूर्वीसारखी राहिलेली नाही. क्रॅब करी तर इतकी फालतू मिळाली की आता आहुप्याला डोंगरयात्रेला गेल्यावरही खेकड्यांच्या वाटेला जात नाही. ओपन अँबियंसची एका धुवाधार पावसाळी संध्याकाळी गळून गळून वाट लागलेली. नेमके आमच्या टेबलाशेजारचे कूलर एका उन्हाळ्यातल्या दुपारी चक्क बिघडले होते. मेन कोर्स तिथले कधीच धड नसते. नॉट अप टू माय टेस्ट. डेझर्ट ठीकठाक. त्यापेक्षा जास्त चांगले स्टार्टर्स 'कॅफे पॅपरिका' हॉट रॉक इथे, तर चांगले मेन कोर्स 'आउट ऑफ ब्लू' इथे मिळतात. बंगळूर आणि मुंबईतील काही बीबीक्यूज् मात्र अपेक्षेपेक्षा चांगले निघाले. असो. ह्या अ‍ॅव्हरेज हॉटेलचे एवढे गुणगाण पाहून त्याची दुसरी बाजूही मांडाविशी वाटली. उगाच पैसे खर्च करण्यात अर्थ नाही, विशेषतः स्वतःचे काबाडकष्टाचे असतील तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 12/16/2014 - 22:35

In reply to दर वेळी सयाजीतल्या त्या by एस

Permalink

>> ह्या अ‍ॅव्हरेज हॉटेलचे

>> ह्या अ‍ॅव्हरेज हॉटेलचे एवढे गुणगाण पाहून त्याची दुसरी बाजूही मांडाविशी वाटली. उगाच पैसे खर्च करण्यात अर्थ नाही, विशेषतः स्वतःचे काबाडकष्टाचे असतील तर नाहीच नाही. मी ही दोन वाक्यात हेच लिहिले होते तर संक्षीनी मुळ मुद्दा सोडून "प्रिय व्यक्ती" चा भलताच मुद्दा लावून धरला आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 12/16/2014 - 23:57

In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर

Permalink

प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊन

मला वाटतं तुम्ही चूकताय संक्षी. इथे समोरचा काय म्हणतोय यापेक्षा तुम्हाला तिथे मिळालेला अनूभव कसा होता हे महत्वाचं आहे, आणि मला वाटतं तुम्ही तो व्यवस्थित मांडलाय. थांबायचं कि नाही हे मी सांगू शकत नाही, पण धाग्यावर चाललेल्या चर्चेतून तुम्हाला जे सांगायचंय तो उद्देश बाजूलाच राहीलेला दिसतोय. बाकी याउप्पर तुमची मर्जी!!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 12/17/2014 - 00:06

In reply to प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊन by किसन शिंदे

Permalink

ओके!

आय स्टॉप.... अँड ऑफकोर्स थँक्स!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 12/17/2014 - 13:53

In reply to दर वेळी सयाजीतल्या त्या by एस

Permalink

राजस्थानातले उंट आता बंगलोरला

राजस्थानातले उंट आता बंगलोरला जातात.यावर वीसएक वर्षांपूर्वी इंडिआटुडे मासीकात लेख आला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 12/17/2014 - 05:10

Permalink

येथे पाहिजे जातीचे खवय्ये

येथे पाहिजे जातीचे खवय्ये हे काम नव्हे येर्या गबाळ्याचे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 12/17/2014 - 15:12

Permalink

मी काय म्हन्ते

जास्त पैसे टाकले तरच हेवन मिळतो असं थोडंच आहे! कॉलेजात खिशात ५/१० रुपये असायचे तेव्हा कॉलेजात मैत्रिणीबरोबत एक वडा आणि कटिंग चहा डिसेंबरात सकाळी साडेसात वाजता मिळणे म्हणजे साक्षात स्वर्गप्राप्तीच की! तसंच नवरा किंवा एखाद्या मित्रासोबत एखाद्या चांगल्या पुस्तकाबद्दल, लेखाबद्दल डोकं चालायला लागेपर्यंत चर्चा करणे म्हणजे स्वर्ग. एखाद्या संध्याकाळी एकट्यानेच घराच्या गॅलरीत कसलाही विचार न करता निवांतपणे केवळ पाऊस बघणे किंवा बाकीबाब अथवा कुसुमाग्रजांचे पुस्तक वाचणे म्हणजे स्वर्ग. आईच्या हातचा गरमागरम तूपमेतकूटभात म्हणजे स्वर्ग. तसंच निष्कारण हिंदी/ऊर्दू/इंग्रजी शब्द न घुसडता शुद्ध मराठीत लिहिलेले एखादे सुंदर स्फुट वाचायला मिळणे म्हणजे स्वर्ग. असे कितीतरी लहान सहान स्वर्ग आपल्या आजूबाजूला विखुरलेले असतात. त्यासाठी ना कोणाच्या सहवासाची गरज असते ना पैशांची. समजायची दृष्टी हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Wed, 12/17/2014 - 15:21

In reply to मी काय म्हन्ते by पैसा

Permalink

+१ सुरेख

+१ सुरेख
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 12/17/2014 - 15:28

In reply to मी काय म्हन्ते by पैसा

Permalink

प्रवचन देण्याची ऊर्मी दाबल्या

प्रवचन देण्याची ऊर्मी दाबल्या गेली आहे. ;) बाकी झेंडा खाली पाडला गेला आहे की काय? गाडी आता सगळे स्टार्टर संपून आता मेन कोर्स वर आलेली दिसते. :) (१५८ चे ७६ म्हणजे सगळे डेड बॉल झाले की!)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 12/17/2014 - 16:31

In reply to प्रवचन देण्याची ऊर्मी दाबल्या by प्यारे१

Permalink

अवांतर

अवांतरः ते तुमचं इंग्लिस विंग्लिस आपल्याला कळत नै ओ प्यारे काका! सहसा असे लेखाशी सहमती नसलेले प्रतिसाद धागालेखकांना एकूणच आवडत नैत असा पूर्वानुभव असल्याने एवढा वेळ लिहायचे टाळत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 12/17/2014 - 15:30

In reply to मी काय म्हन्ते by पैसा

Permalink

असे कितीतरी लहान सहान स्वर्ग

असे कितीतरी लहान सहान स्वर्ग आपल्या आजूबाजूला विखुरलेले असतात. त्यासाठी ना कोणाच्या सहवासाची गरज असते ना पैशांची. समजायची दृष्टी हवी.
हे वाक्य फेसबूक स्टेटस ठेवण्याची परवानगी द्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 12/17/2014 - 16:14

In reply to असे कितीतरी लहान सहान स्वर्ग by सूड

Permalink

धन्यवाद रे!

धन्यवाद रे सुड! बिनधास्त घे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 12/17/2014 - 15:31

In reply to मी काय म्हन्ते by पैसा

Permalink

खरंतर सगळाच प्रतिसाद छान आहे,

खरंतर सगळाच प्रतिसाद छान आहे, पण सगळाच टाकला तर माताय चेपुवरल्या लोकांना रेफेरेन्चे लागणार नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/17/2014 - 19:47

In reply to मी काय म्हन्ते by पैसा

Permalink

+१००

+१००
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Wed, 12/17/2014 - 23:45

In reply to मी काय म्हन्ते by पैसा

Permalink

+१

एकदम पटलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 12/17/2014 - 17:34

Permalink

बार्बेक्यु घरातील स्वर्ग......

खालील फोटो पाहिलयावर हा कसा करावा याची कल्पना येईलच. फक्त जाळी अशा व्यासाची घ्यायची की आग (मंद विस्तव) हा पदार्थाच्या खाली ४ इंच राहिली पाहिजे. जाळी कुठल्याही हार्डवेरच्या दुकानात मिळते. घमेले पण....उरल्या सळया...त्याला मात्र लाकडी मुठी बसवून घ्याव्यात म्हणजे हाताला चटके बसत नाहीत....अर्थात आधी हाताला चटके मग मिळती कबाब असा अनुभव हवा असल्यास त्याची आवश्यकता नाही.... :-) Image removed. यातच भाजलेले मटन/चिकन कबाब.... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 12/17/2014 - 18:21

In reply to बार्बेक्यु घरातील स्वर्ग...... by जयंत कुलकर्णी

Permalink

दिलकष

अहाहा! स्वर्गनिर्वाणप्राप्त्यरोमांच वगैरे वगैरे!...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 12/17/2014 - 23:32

In reply to बार्बेक्यु घरातील स्वर्ग...... by जयंत कुलकर्णी

Permalink

वा घरच्या घरी बार्बेक्यू !!

वा घरच्या घरी बार्बेक्यू !! (पण वासाने बाजुचा गुजराती भडकेल)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 12/18/2014 - 08:24

In reply to वा घरच्या घरी बार्बेक्यू !! by खटपट्या

Permalink

(पण वासाने बाजुचा गुजराती भडकेल)

साहजीकच आहे.... हा असा पदार्थ एकटा खाल्ला तर कुणीही भडकणारच...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 12/18/2014 - 09:42

In reply to (पण वासाने बाजुचा गुजराती भडकेल) by मुक्त विहारि

Permalink

अहो तो शाकाहारी आहे. त्याची

अहो तो शाकाहारी आहे. त्याची बायको माझ्या बायकोला विचारत होती की तुम्ही मच्छी सोडू शकत नाही का? त्यावर माझ्या बायकोचे बाणेदार उत्तर - "नवरा सोडेन पण मच्छी खायची सोडणार नाही"
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 12/18/2014 - 11:16

In reply to अहो तो शाकाहारी आहे. त्याची by खटपट्या

Permalink

तुम्ही पण बाणेदार पणा दाखवा..

तुम्ही पण बाणेदार पणा दाखवा.. आणी बार्बेक्यु करुन खावा.. (ह घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 12/18/2014 - 11:29

In reply to तुम्ही पण बाणेदार पणा दाखवा.. by जेपी

Permalink

नवरा सोडून देइन वगैरे

नवरा सोडून देइन वगैरे बोलण्याची गोष्ट झाली. जर कुणी असा बाणेदारपणा दाखवला तर त्याची "प्रिय व्यक्ती" त्याला ग्रिलवर भाजून खाण्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 12/18/2014 - 11:38

In reply to नवरा सोडून देइन वगैरे by सतिश गावडे

Permalink

असेलही.

असेलही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 12/18/2014 - 08:54

In reply to बार्बेक्यु घरातील स्वर्ग...... by जयंत कुलकर्णी

Permalink

लै भारी!

लै भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 12/18/2014 - 12:43

Permalink

घरोघरी मातीच्याच चुली

"नवरा सोडेन पण मच्छी खायची सोडणार नाही"
जवळपास अशीच म्हण गुजराती भाषेत पण आहे. गुजरातच्या काही भागात तरुणांमधे गुटखा आणि वयस्कर व्यक्तीमधे बिडीचे फार व्यसन आहे. कुणी त्यांना बिडी सोडायला सांगीतली की ते म्हणतात "बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे." आणि खरोखर वेळ पडली तर बायडी सोडली पण बिडी न सोडलेली कैक उदाहरणे देखील प्रत्यक्ष अस्तित्त्वात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 12/19/2014 - 08:11

In reply to घरोघरी मातीच्याच चुली by धर्मराजमुटके

Permalink

बाप्रे !!!

बाप्रे !!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 12/19/2014 - 15:01

In reply to घरोघरी मातीच्याच चुली by धर्मराजमुटके

Permalink

"बायडी मुकू पण बिडी न मुकू.

"बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे."
अगागागागागागा _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Fri, 12/19/2014 - 14:55

Permalink

.

मुंबैत कुठे आहे असले ?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/19/2014 - 17:37

Permalink

डेक्कनलाही आहे बार्बेक्यू

डेक्कनलाही आहे बार्बेक्यू नेशन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 01/17/2016 - 06:40

Permalink

मजा आली

प्रचेतस, धन्या, आणि प्रशांत बरोबर बार-बे-क्यू नेशनचे सर्व व्हेज पदार्ध इंजॉय करता आले. तृप्त जाहलो. भन्नाट अनुभव होता. पाहुणचाराबद्द्ल आभार दोस्तहो. फोटो निवांत डकवतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 01/17/2016 - 06:42

In reply to मजा आली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

खरंच.

खरंच. काल अक्षरश: हेवनवासी जाहलो.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 01/17/2016 - 12:35

In reply to खरंच. by प्रचेतस

Permalink

आयला !

म्हणजे हा प्रतिसाद : हिंजवडी भागात काम करणार्‍या प्रत्येकाला माहिती असणार्‍या हॉटेलचे कोलंबसाने अमेरिका शोधण्याच्या धर्तीवर केलेले ग्लोरीफिकेशन वाचून अंमळ मौज वाटली. हेवन वगैरे काही नाही. खिशाला परवडणार असेल तर एकदा जेवण्यासाठी ठीक ठाक असे हॉटेल आहे हे. अशा पद्धतीची हॉटेल्स पुण्यात ढीगाने आहेत. बोगस होता. लोकांची दिशाभूल करून त्यानं स्वतः मात्र तिथे हजेरी लावली! आणि कंपूबाजांच्या मत्सरामुळे संकेतस्थळानं एक आयडी गमावला.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com