✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

स
संजय क्षीरसागर यांनी
Mon, 12/15/2014 - 14:39  ·  लेख
लेख
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते. तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात : . त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन. त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं! तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू. मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!). साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला. वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स. (तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!) (केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
52527 वाचन

💬 प्रतिसाद (255)

प्रतिक्रिया

व्यंजनांचा हा शब्द खटकला

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 14:42 नवीन
व्यंजनांचा हा शब्द खटकला
  • Log in or register to post comments

रेसिपीजसाठी तो हिंदी शब्द आहे

संजय क्षीरसागर
Mon, 12/15/2014 - 14:53 नवीन
लिहिणाच्या ओघात मला अचूक मराठी (खरं तर तितका तरल) शब्द सुचला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सामिष पदार्थ

टवाळ कार्टा
Mon, 12/15/2014 - 15:41 नवीन
सामिष पदार्थ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संक्षी, व्यंजनं हा तरल शब्द

होकाका
Tue, 12/16/2014 - 17:49 नवीन
संक्षी, व्यंजनं हा तरल शब्द आहे काय? बरं झालं, समजलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

फारच आवडलंय .

कंजूस
Mon, 12/15/2014 - 15:06 नवीन
फारच आवडलंय .
  • Log in or register to post comments

वा

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 12/15/2014 - 15:08 नवीन
मस्तच रे संजय."तरूणांनी चांगले दोनशे जोर बैठका माराव्यात, एक दिवस उपाशी रहावे व मग येथे भेट द्यावी" असे हे म्हणतात.
  • Log in or register to post comments

बार्बेक्यू नेशन

सुनील
Mon, 12/15/2014 - 15:11 नवीन
ठाण्याच्या दुकानात गेलोय. तब्येतीने खाणारे असाल तर पैसे वसूल अन्यथा पैसे फुकट!!
  • Log in or register to post comments

ठाण्याच्या दुकानात गेलोय.

मदनबाण
Mon, 12/15/2014 - 15:56 नवीन
ठाण्याच्या दुकानात गेलोय. तब्येतीने खाणारे असाल तर पैसे वसूल अन्यथा पैसे फुकट!! अगदी ! माझ्या मनात इथे जाण्याचा विचार आहे, पण प्रति माणशी ७६४ रु खर्च करुन किती चरणार ? शिवाय शाकाहारी मंडळींना जास्त काही चॉइस दिसत नाही ! जास्तीत जास्त पनीर मी चरु शकीन ! पण मग फक्त पनीर ,टॅमॅटो इं चरण्यासाठी आकारण्यात आलेला दर फारच जास्त वाटतो. थाळी जेवण घेतले { राजधानीची थाळी मला सर्वात जास्त आवडली, मध्यंतरी विष्णुजीकी रसोई मधे सुद्धा जाउन आलो होतो पण जास्त आवड्या नयं } तरी प्रति माणशी ४५०- ते ५५० च्या वर दर नाहीत...यात सुद्धा हवे तितके घ्या आहेच.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मदनबाण साहेब,

बॅटमॅन
Mon, 12/15/2014 - 16:04 नवीन
मदनबाण साहेब, शाकाहारी लोकांना एकदम खुंदल खुंदल के खाण्यासाठी ही अनलिमिटेड थाळीवाली हाटेले एक नंबर. बार्बेक्यू अथवा तत्सम हाटिलांमध्ये तुमच्यासाठी डेझर्ट सोडल्यास काहीच खास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बार्बेक्यू अथवा तत्सम

मदनबाण
Mon, 12/15/2014 - 16:06 नवीन
बार्बेक्यू अथवा तत्सम हाटिलांमध्ये तुमच्यासाठी डेझर्ट सोडल्यास काहीच खास नाही. थान्क्स... चला पैसे वाचले ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरं आहे.. ग्रील मधे चीज़ ,

पद्मश्री चित्रे
Mon, 12/15/2014 - 16:50 नवीन
खरं आहे.. ग्रील मधे चीज़ , बटाटे आणि पनीर खूप असतं.. त्यानेच पोट भरतं.. मग मेन कोर्स बघुनच समाधान मानावं लागतं.. एवढं 764/- ला न्याय देणारं जेवणं कठीण आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सरुटॉबाने

कपिलमुनी
Mon, 12/15/2014 - 15:41 नवीन
पैल्यापास्न मिपावर फेमस ! आवडता ठिकाण !
  • Log in or register to post comments

बार्बेक्यू नेशन खरंच छान आहे.

प्रचेतस
Mon, 12/15/2014 - 16:28 नवीन
बार्बेक्यू नेशन खरंच छान आहे. २/३ मिपाकट्टेही सयाजीमध्ये झालेत. आता परवाच सिंहगड रोडच्या तसल्याच ऑन टेबल ग्रिल वाल्या शोरबात मिपाकरांसोबतच जाणे झाले.
  • Log in or register to post comments

बारबेक्यु नेशनपेक्षा

बाळ सप्रे
Mon, 12/15/2014 - 16:36 नवीन
बारबेक्यु नेशनपेक्षा सिगरीच्या (मेन लँड चायना) लाईव्ह ग्रिलमध्ये पदार्थांचे वैविध्य जास्त आहे..
  • Log in or register to post comments

इथे बहुदा बुधवारी ७.३० च्या

पिलीयन रायडर
Mon, 12/15/2014 - 16:59 नवीन
इथे बहुदा बुधवारी ७.३० च्या आधीचे बुकिंग केले असल्यास "अर्ली बर्ड ऑफर मिळायची" - ५५०/- मध्ये शाकाहारी लोकांना चांगली ऑफर होती.. अर्थात न्याय देण्यासाठी तशी भुक असणारे लोक हवेत हे नक्की.. डेक्कनच्या BBQ मध्ये मागच्या नाताळात गेलो होतो.. डान्स करत होता एक ग्रुप.. टिपीकल गोवन गाणे.. काय नाचलो आम्ही.. जबरदस्त मजा आली.. तसंच कल्याणीनगरला आफ्रिकन जंगल थीम होती.. तशा टोप्या घालुन जेवायलाही मजा आली होती..!!
  • Log in or register to post comments

बार्बेक्यु ला शाकाहार्यांची

स्मिता श्रीपाद
Mon, 12/15/2014 - 17:20 नवीन
बार्बेक्यु ला शाकाहार्यांची अगदीच उपासमार होत नाही.... पनीर, सोया, ब्रोकोली, कॉर्न...ई ई ग्रील असतंच..पण त्यासोबत कॅजुन स्पाईस्ड पोटॅटो....क्रिस्पी कॉर्न...कसले तरी कबाब ई असतातच...चाट न पास्ता चं लाईव्ह काउंटर... बाकी मेन कोर्स, भरपुर गोड असतातच... निवांत गप्पा मारायच्या असतील तर एकदा नक्की जा... कोठ्ल्याही थाळी वाल्या होटेल मधे आरामत २-३ तास नक्कीच बसु देणार नाहीत.. :-)
  • Log in or register to post comments

निवांत गप्पा मारायच्या असतील

बॅटमॅन
Mon, 12/15/2014 - 17:31 नवीन
निवांत गप्पा मारायच्या असतील तर एकदा नक्की जा... कोठ्ल्याही थाळी वाल्या होटेल मधे आरामत २-३ तास नक्कीच बसु देणार नाहीत..
हे बाकी खरं हां!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद

चला आता एकदा जायलाच हवे

दिपक.कुवेत
Mon, 12/15/2014 - 17:21 नवीन
ईथे....
  • Log in or register to post comments

शाकाहारींसाठी एकच उपाय इंदूर

कंजूस
Mon, 12/15/2014 - 17:44 नवीन
शाकाहारींसाठी एकच उपाय इंदूर ट्रीप करणे, चरणे, फिरणे आणि गंमत बघणे.
  • Log in or register to post comments

इंदूर खरंच इतकं भारी आहे का

असंका
Mon, 12/15/2014 - 18:06 नवीन
इंदूर खरंच इतकं भारी आहे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

शाकाहारींचा विचार हो आमचा आणि

कंजूस
Mon, 12/15/2014 - 19:40 नवीन
शाकाहारींचा विचार हो आमचा आणि खांडव्याची /ओंकारेश्वरची थंडी खाणे हा एक अनुभव. फक्त शाकाहारींसाठी हॉटेल कोण काढेल हो एवढे भारी आणि सुसज्ज. @संक्षि तुमच्या रिपोर्टिँगला(महत्त्वाचे आहे) अगोदरच + दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

हो

टीपीके
Tue, 12/16/2014 - 19:13 नवीन
हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

.

गवि
Mon, 12/15/2014 - 18:21 नवीन
नकोतच आता ते इंदूर कट्ट्याचे प्लॅन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बहुतेकांचा `पैसा आणि वसुली' असा दृष्टीकोन आहे

संजय क्षीरसागर
Mon, 12/15/2014 - 18:39 नवीन
आणि तो एका मर्यादेपर्यंत योग्य सुद्धा असतो. पण एकतर पत्नीची खास फर्माईश होती आणि (इथले काही सदस्य/(सदस्या) पुन्हा नाराज होतील, तरीही), वी लव्ह इच-अदर्स कंपनी. आम्ही घरातनं बाराच्या सुमारास निघालो असू आणि जेवणानंतर अर्धा-पाऊण तास पूल-साइड, लॉबीत बसणं असा रम्य टाईमपास करुन घरी आलो तेंव्हा पाच वाजले होते. सो इट वॉज नॉट अ क्वेस्ट्शन ऑफ मनी. इतक्या सुरेख जेवण प्लस टाइमपाससाठी पंधराशे रुपये काहीच नाहीत (खरं तर अशी कंपॅरिजनच (मी सीए असलो तरी) करु शकत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही फक्त खाणं हा दृष्टीकोन ठेवलात तर नॉन-वेजवाले आम्हाला लै मजा येते (फिश-बार्बेक्यूमुळे) असं म्हणतात. पण इट इज नॉट ओन्ली मनी वर्सेस फूड; तिथलं बेतहाशा वातावरण, तिचा सहवास, आणि अर्थात तिथली अप्रतिम फूड क्वालिटी या सगळ्यांचा मेळ जमत असेल तर नक्की जावं असं ते रेस्टॉरंट आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कधीही घेऊन जा, तुम्हाला हमखास मजा येईल आणि ते सांगण्यासाठीच केवळ ही पोस्ट लिहिलीये. ती केव्हांही म्हणाली तर मी पुन्हा जाईन हे निश्चित. माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा मात्र योग्य आहे. यू नीड इन्टेंस हंगर टू जस्टीफाय द फूड आणि ती अट मी पूर्ण केली होती. सकाळी साडेपाचला उठून एक तास योगा प्लस प्राणायाम आणि नंतर दोन तास टेबल टेनीस अँड ऑफकोर्स नो ब्रेकफस्ट!
  • Log in or register to post comments

वातावरण वैगैरे सगळ भ्रम आहे,

जेपी
Mon, 12/15/2014 - 18:45 नवीन
वातावरण वैगैरे सगळ भ्रम आहे, मुळ उद्देश पोट भरणे आहे. (ह घ्या) *biggrin*
  • Log in or register to post comments

वातावरण वैगैरे सगळ भ्रम आहे,

मदनबाण
Mon, 12/15/2014 - 20:16 नवीन
वातावरण वैगैरे सगळ भ्रम आहे, मुळ उद्देश पोट भरणे आहे. काय जेपी बोगद्यात जाउन आलास वाट्ट... :D

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हाहा!

पैसा
Mon, 12/15/2014 - 20:28 नवीन
१) भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा २) जेवीन तर तुपाशी नायतर राहीन उपाशी या दोन म्हणी आठवल्या. तुम्ही कोणत्या क्याटेगरीत बसता बाणभट्टा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्ही कोणत्या क्याटेगरीत

मदनबाण
Tue, 12/16/2014 - 10:53 नवीन
तुम्ही कोणत्या क्याटेगरीत बसता बाणभट्टा? पहिल्या... फक्त धोंड्या च्या जागी उशी असा बदल केल्यास जरा सोय होइल ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks rise
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धागा आवडला. व्हेजवाल्यांसाठी

रेवती
Mon, 12/15/2014 - 18:59 नवीन
धागा आवडला. व्हेजवाल्यांसाठी ग्रिल्ड गोष्टींचे कमी पर्याय असतील पण मुख्य जेवण तरी (म्हणजे व्हेज) चांगले असते का? फक्त पैशांचा विचार करत नाही पण तरीही अ‍ॅम्बिअन्स आणि खाणे मिळून हे बरे दिसतेय. भरपूर भूक असल्यास ठीक आहे. उगीच हाताओठावर जेवणार्‍यांसाठी उपयोगाचे नाही.
  • Log in or register to post comments

कोणत्याही हाटेलात गेलात तरी

सुबोध खरे
Mon, 12/15/2014 - 19:54 नवीन
कोणत्याही हाटेलात गेलात तरी त्याच्या पेक्षा घरी गोष्टी नेहमी स्वस्तच पडतात. दोन महिन्यांपूर्वी आम्ही चर्चगेटच्या सम्राट हाटेलात जाऊन थाळी खाल्ली. ३७५ रुपये ची थाळी यात पुरणपोळी( हवी तितकी) आणि दोन पक्वान्ने एक एक वाटी. यात आम्ही दोन वाट्या फ्रुट सलाड, एक वाटी गुलाब जम आणी एक वाटी श्रीखंड असे घेतले. पहिल्यांदा जेवढे वाढले ते खाऊनच आमचे पोट भरले. म्हणजे आमच्या सारखी बारीक माणसे हाटेलात जाऊन पैसे "वसूल" करू शकत नाहीत. मग मी हाटेलात का जातो? १) एवढ्या तर्हेचे पदार्थ आपण घरी एकदम कधीच करत नाही. २) आपले एवढे आदरातिथ्य फक्त सासरी होऊ शकते (ते सुद्धा लग्न ठरल्या पासून ते फार तर वर्ष सण होई पर्यंत) अन्यथा वातानुकुलीत खोलीत सुग्रास भोजन छान पैकी मांडणी हि सणासुदीला सोडून आपल्या घरांमध्ये होत नाही ३) घरी स्वयंपाक करा किंवा बाहेरून अन्न मागवा जेवण पूर्ण झाल्यावर मागचे सर्व बायकांनाच आवरायला लागते. घरी स्वयंपाक करताना सारखा तो जेवणाचा वास घेतल्याने बायकांची भूक थोडीशी कमी होते. त्यामुळे त्या तितक्या आनंदाला मुकतात. यास्तव हाटेलात जेवणाचा आनंद बायकांना जास्त होतो. ४) बायको आनंदात असेल तर घर दार सुद्धा आनंदी राहते.
  • Log in or register to post comments

अरेच्चा!

भाते
Mon, 12/15/2014 - 20:18 नवीन
इथे आपण रोज थोडेच जाणार आहोत? फारतर वर्षातुन एकदोनदा! मग या सर्व सुखांसाठी काही पैसे मोजावे लागणारचं ना! यावर माझ्याकडे एक पर्याय आहे. ऊसगावातुन/राणीच्या (आणि इतर) देशातुन ऊत्सवमुर्ती आला/आली कि 'आपला मिपा कट्टा' तिकडे करायचा! मस्त आपल्याला निवांत गप्पा मारायला मिळतील. 'ऊत्सवमुर्ती' याला नक्कीच नकार देणार नाही. :) ऊत्सवमुर्ती, ह. घ्या. :)
  • Log in or register to post comments

आवडल

पिंपातला उंदीर
Mon, 12/15/2014 - 20:38 नवीन
आवडल
  • Log in or register to post comments

पुण्यातले सयाजी

इडली डोसा
Mon, 12/15/2014 - 22:02 नवीन
आम्ही पुण्यातल्या सयाजीला गेलो होतो... फार काही विशेष नव्हते आवडले तेंव्हा... कदाचित विमान नगर पासुन ड्राईव करत गेल्यामुळे असेल..
  • Log in or register to post comments

मुंबईकर असूनसुद्धा सयाजीला

विअर्ड विक्स
Mon, 12/15/2014 - 23:34 नवीन
मुंबईकर असूनसुद्धा सयाजीला गेलेलो आहे. buffet चांगला आहे. सिगरी म्हणा वा baebequ nation अशी हॉटेल हि जेवणापेक्षा starter नी desert चीच पेटपूजा करण्यासाठी प्रसिद्ध असतात. सयाजीत झेंडा पाडायची तर सिगारीमध्ये striker ठेवायची पद्धत आहे. ती का व कशासाठी हे तिथे गेल्यावर अनुभवा. केकवर आईस्क्रीम , अननस ग्रील असे अचाट पदार्थ घरी करण्यापेक्षा अश्या ठिकाणीच चांगले लागतात. सयाजीत म्हणे व airport पिक अप साठी ऑडी आहे. ऑडी गाड्यांची रांग बघून माझे डोळे खरेच दिपले होते. रात्रीवेळेस highway पलीकडील परिसर मस्त दिसतो.
  • Log in or register to post comments

दोघांचं एकूण बील फॉर वेज

खटपट्या
Mon, 12/15/2014 - 23:46 नवीन
दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८
रेट वाढलाय वाटतं
  • Log in or register to post comments

आमचा (याच) बारबे क्यु नेशन'चा

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/16/2014 - 00:05 नवीन
आमचा (याच) बारबे क्यु नेशन'चा रणसंग्राम आठवला. :D
  • Log in or register to post comments

सं.क्षी...

मुक्त विहारि
Tue, 12/16/2014 - 01:00 नवीन
मस्त लेख... आवडला.....
  • Log in or register to post comments

उत्तम ओळख

श्रीरंग_जोशी
Tue, 12/16/2014 - 01:44 नवीन
या उपहारगृहाचे नावच केवळ ऐकले होते. या लेखामुळे त्याची उत्तम ओळख झाली. पुढील भारत वारीत येथे नक्की जाईन.
  • Log in or register to post comments

सिगडी - ग्लोबल ग्रिल

वेल्लाभट
Tue, 12/16/2014 - 11:33 नवीन
पवईला असलेल्या या उत्तम हॉटेलात जाऊन बघा. बारबेक्यू नेशनचाच कॉन्सेप्ट आहे. परंतु जबर क्वालिटी आहे. टेस्ट सुस्साट ! आणि व्हेज ना व्हरायटीही चांगली आहे माझ्यामते. जाम धमाल आली होती मी गेलेलो तेंव्हा. फुल आडवा हात !
  • Log in or register to post comments

गोड आवडणा-यांनो

वेल्लाभट
Tue, 12/16/2014 - 11:37 नवीन
सिगडी मधे बख़लावा खायला विसरू नका. काहींना तुपाच्या वासामुळे हा पदार्थ आवडत नाही. मिपावर याची कृतीही पोस्ट झालेली असं कळलं गुगलताना. www.misalpav.com/node/8376 पण हा आउट्ट ऑप्फ द वर्ल्ड लागतो ब्वा. लई फेवरेट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

http://chefinyou.com/2009/11/baklava-recipe/

मुक्त विहारि
Tue, 12/16/2014 - 12:01 नवीन
http://chefinyou.com/2009/11/baklava-recipe/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मध्यंतरी माझे रमाडा { Ramada

मदनबाण
Tue, 12/16/2014 - 11:56 नवीन
मध्यंतरी माझे रमाडा { Ramada } मधे जाणे होते...मस्त जेवण आणि पोटभर चरणे झाले. वेगवेगळे मॉकटेल सुद्धा यावेळी प्यायला घेतले... खाणे आणि मोजतो ते याचा संबंध असावाच असे माझे स्पष्ट मत आहे. Image removed. http://www.ramadanavimumbai.com/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks rise
  • Log in or register to post comments

खाणे आणि मोजतो ते पैसे याचा

मदनबाण
Tue, 12/16/2014 - 11:57 नवीन
खाणे आणि मोजतो ते पैसे याचा संबंध असावाच असे माझे स्पष्ट मत आहे. असे वरील वाक्य आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks rise
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

स्वसंपादन हवेच हवे...

मुक्त विहारि
Tue, 12/16/2014 - 12:02 नवीन
असे वाटायला लागते... मी पण मध्यंतरी अशीच गंमत केली होती... ऐनवेळी संपादकांनी सांभाळून घेतले... एखादा कान्हा, मात्रा, वेलांटी चुकली की अनर्थ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कान्हा नाई हो .. काना ..

हाडक्या
Tue, 12/16/2014 - 17:52 नवीन
कान्हा नाई हो .. काना .. अर्थाचा अनर्थ करतेत पोट्टे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

छान...!!!

योगी९००
Tue, 12/16/2014 - 12:41 नवीन
मस्त वर्णन केले आहे... परत एकदा जायचा मोह होतोय पण खिश्याकडे नजर गेल्यावर मान खालतीच राहीली. ठाण्याच्या या या उपहारगृहात जाण्याचा दोन वेळा योग आला होता (कोणाची ना कोणाची पार्टी होती). स्टार्टर्स इतके खाल्ले गेले की मला चालवत सुद्धा नव्हते...पण एकदम मोहात पाडणारे उपहारगृह आहे.
  • Log in or register to post comments

फोटो हेझी झाल्यामुळे बदलायला इमेजेस पाहात होतो तर,

संजय क्षीरसागर
Tue, 12/16/2014 - 13:28 नवीन
ही नवी माहिती मिळाली. Image removed. (अर्थात, ज्याचा त्याचा विचार आहे पण) रविवारसोडून केव्हाही लंचला गेलो तर आणखी ३०० रुपये कमी! _______________________ (आणि वार मग तो कोणताही असो, (असा एखादा सुरेख प्लान मिळायचा फक्त आवकाश की) त्याचा फुल `रविवार' करणं जमून गेलंय ! Image removed.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

च्यॅ!! जाऊन आलोय आधी सगळ्या

सूड
Tue, 12/16/2014 - 13:53 नवीन
च्यॅ!! जाऊन आलोय आधी सगळ्या मिपाकरांसोबत. नवीन ते काय ह्यात !! *SCRATCH*
  • Log in or register to post comments

बहुदा त्या रेस्टॉरंटकडे

संजय क्षीरसागर
Tue, 12/16/2014 - 14:25 नवीन
फक्त `पैसे वर्सेस खाणं' असं न बघण्याचा नवा नज़रीया !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>फक्त `पैसे वर्सेस खाणं' असं

सूड
Tue, 12/16/2014 - 14:41 नवीन
>>फक्त `पैसे वर्सेस खाणं' असं न बघण्याचा नवा नज़रीया ! त्याचं अप्रूप `पैसे वर्सेस खाणं' असं बघणार्‍यांना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा