रोचक अनुभवकथन आहे. मागच्या डिसेंबरात भारतात येतेसमयी कोकीळकूजन वगैरे काही जाणवले नव्हते; मात्र मुंबई विमानतळावर विमानाची चाके लागून जाग आली, आणि खिडकीतून बाहेर पाहिले असता दोन कावळे उडताना दिसले; शेजारच्या धावपट्टीवर काही पोरे पतंग उडवताना, काटाकुटी लावताना दिसली. तेव्हा आपण खरोखरच मुंबईत पोचलो आहोत, यावर विश्वास ठेवला(च!)
(मुंबईकर)बेसनलाडू
बेसनलाडू म्हणतो त्याप्रमाणे साधे सोपे परंतु चांगले अनुभवकथन..
मनोगत या थोरामोठ्यांच्या संकेतस्थळाच्या बरोबरीने हाच लेख आमच्या क्षुल्लक मिसळपाववरही प्रकाशित केल्याबद्दल आपले आभार...!
तात्या.
आजपर्यंत मी केलेल्या विमान प्रवासांमध्ये उत्तम लँडींग आणि टेक ऑफ आनुभवलं ते एअर इंडियाचं. टेक ऑफ करताना जमिनीपासून चाक कधी अलग झालं ते कळत नाही आणि लँडिंग करताना रन-वेला चाक कधी टेकलं हे ही कळत नाही.
बरेच वेळा आंतरराष्ट्रीय प्रवास घडला आहे. प्रत्येक प्रवासात काहीतरी अनपेक्षित पण वेगळा अनुभव येतो. ऐर इंडिया म्हणजे तर दिव्यच. पण जर सरकारच्या च्या वतीने परदेशी जायचे असले तर ऐर इंडिया ला पर्याय नसतो . त्यांच्या अनेक अनुभवापैकी एक साङ्गतो.
* हैदराबाद-मुंबई- प्यारीस-नेवार्क-प्यारीस-मुंबई-हैदराबाद असे तिकीट होते . जाताना हैदराबाद मध्ये emigration वगैरे सगळे सोपस्कार झाले. परत ऐर इंडिया ने प्यारिस ला पोहोचलो. तेथून पुढील प्रवासासाठी आम्हाला ऐर फ्रांस च्या विमानाने पाठवले. ह्या विमानाला हैदराबाद पर्यंत जाण्याची परवानगी नसल्याने ते मुंबईतच थाम्बले. ऐर इंडिया च्या अधिकार्यांशी या बद्दल बोलायला गेलो तर आमच्याशी चर्चा करत बसलात तर पुढचे हैदेराबाद चे ऐर इंडिया चे विमान चुकेल कारण तुम्हाला immigration चे सोपस्कार आता इथेच उरकावे लागणार आहेत असे त्यांनी सांगितले. ते उरकून दुसर्या terminal ला दोन ब्यागा उचलून, लिफ्ट चालू नसल्याने, दोन जिने चढून वेळेवर पोहोचावे लागले .
प्रतिक्रिया
रोचक
चांगले कथन..
मस्त !
धन्यवाद..
सहमत
ऐर इंडिया म्हणजे दिव्यच.
छान लेखन