मी जन्मांचा विचार केला ,तुझी धाव पण वर्षांपुरती
कसे निभावू नाते अपुले ,परतुनी आले अर्ध्यावरती …
किती विनवण्या, किती अबोले, एका छोट्या पत्रासाठी
हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती…
शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती
फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती …
उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले ,
कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3529
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा! ! गज़ल छान जमली आहे.
छान आहे कविता,वाचायची राहुन
धन्यवाद!!:):)
कविता आवडली.
@शब्द असे तू उधळीत जाशी, जशी
हम्म
ओढ नभाची कधीच विरली
In reply to हम्म by चाणक्य
वा!क्या बात!!
In reply to ओढ नभाची कधीच विरली by चुकलामाकला
ओढ नभाची कधीच विरली, उंच उंच
In reply to ओढ नभाची कधीच विरली by चुकलामाकला
भावना शब्दांमधे अचुक पकडल्या
खूप छान आणि हळवी !!
नीटशी कळली नाही...
हं ! कवितेचा अर्थ
क्या बात!