गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले..
प्रसंग एक :
हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले.
खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही.
प्रसंग दोन:
वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला).
वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय?
तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल.
यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
वाचने
102604
प्रतिक्रिया
313
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक
आमच्या बाबतीत असा किस्सा झाला
आणखी अवांतरः Shopping men versus shopping women
In reply to आमच्या बाबतीत असा किस्सा झाला by शिद
अजिबात सोडायचा नव्हता त्याला.
+ १०००
In reply to अजिबात सोडायचा नव्हता त्याला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
गायकवाड साहेबांनी त्या वेटर
In reply to + १००० by सुबोध खरे
गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतलीया प्रकाराच्या अनुषंगाने माझा अनेकदा गोंधळ उडतो. वेटर, सेल्समन किंवा आपण ज्याची तक्रार करत असतो त्या व्यक्तीचे "या प्रसंगामुळे पुढे काय होणार..?" असा विचार केला तर.. १) त्यांना वॉर्नींग मिळेल किंवा जास्तीत जास्त आपण गेल्यानंतर आणखी एकदा मॅनेजर झाडेल.. असे.. किंवा २) त्यांच्या नोकरीवर गदा येईल अथवा आर्थिक दंड होईल (इन्सेंटीव्ह मधून कापून अथवा एखादे इन्क्रीमेंट कमी % ने झाल्याने...) पहिला मुद्दा असेल तर ठीक आहे.. पण जर या प्रकारामुळे जर आर्थिक दंड किंवा नोकरीवर गदा येत असेल तर विनाकारण वाईट वाटत राहते. उदा. - आमच्या कंपनीच्या कॅब ड्रायव्हर्सना AC कायम ऑन ठेवावा अशी सूचना असताना (आणि AC हा ३ किंवा ४ वरच असावा, २ वर असू नये इतक्या स्पष्ट सूचना असताना) एखादा ड्रायव्हर मुद्दाम २ वर AC चालवतो. त्यामुळे किती फरक पडतो हा वेगळा प्रश्न पण "कंपनीने आखून दिलेला नियम पाळला जात नाहीये हे उघड असते." (कंपनीचे सगळे नियम आपण पाळतो का हा एक मुद्दा आहेच!) याची तक्रार केली तर या ड्रायव्हरला पहिल्यावेळी ५००/- रू नंतर ७००/- रू असा दंड होतो. अनेकदा सांगूनही भरधाव वेगाने आणि धोकादायकरीत्या गाडी चालवणे हाही असाच एक प्रश्न. तक्रार केली तर त्याची कॅब काढून टाकतात तक्रार नाही केली तर आपण जीव मुठीत धरून प्रवास करत असतो.. व्यवस्थीत न वागणारा वेटर - जेवणाच्या कितीतरी आधी मागवलेला मसाला पापड जेवण सुरू झाल्यानंतर आणून देणे, कांदा लिंबू किंवा टिश्यू पेपर्स आणण्यास वेळ लावणे, चाट मसाला मागितला असताना तिखट आणून देणे आणि चाट मसाला संपला असे सांगणे.. अशा वेळी तक्रार करणे योग्य असते परंतु आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याची शिकार होईल ही भावना टोचत राहतेच. :(अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा
In reply to गायकवाड साहेबांनी त्या वेटर by मोदक
१ शंका...हे असे प्रसंग
In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?हेच नाही पण एक दोनदा असे प्रसंग झाले होते. सध्याचे माहिती नाही. आपण पैसे देवून त्यांचा माज सहन करणे जमत नसल्याने चितळ्यांच्याऐवजी काका हलवाईला पसंती दिली जाते.१ शंका...हे असे प्रसंग
In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?कोणत्या ग्रहावरून आला आहात ? चितळ्यांच्या दुकानांत असे प्रसंग झाले नाही तर सूर्य पश्चिमेला उगयला सुरूवात करेल! "ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत. ग्राहक यायचे बंद झाले तर इथल्या मालकाचा धदा बंद होईल आणि कर्मचार्यांची नोकरी जाईल." असे दोन-तीनदा तेथिल कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालक यांना सांगून झाले आहे. प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !प्रत्येक वेळेला त्या
In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
परंपरा...
In reply to प्रत्येक वेळेला त्या by टवाळ कार्टा
पैजारबुवांना चितळेंची सुपारी
In reply to परंपरा... by डॉ सुहास म्हात्रे
आयड्याची कल्पना ब्येष्ट आहे !
In reply to पैजारबुवांना चितळेंची सुपारी by मोदक
आख्खी मिपाग्यांग घेउन आत
In reply to पैजारबुवांना चितळेंची सुपारी by मोदक
आग बुझवायला
In reply to प्रत्येक वेळेला त्या by टवाळ कार्टा
"आग बुझवणे" हे कदाचित
In reply to आग बुझवायला by हाडक्या
>>> एकदा दुपारी ११:५५ am
In reply to "आग बुझवणे" हे कदाचित by टवाळ कार्टा
आय माय स्वारी... १ ते ४ असेच
In reply to >>> एकदा दुपारी ११:५५ am by प्यारे१
रच्याकने पुण्याचा तो वल्डफेमस
In reply to आय माय स्वारी... १ ते ४ असेच by टवाळ कार्टा
असाच रजनीकांतचा किस्सा वाचला
In reply to रच्याकने पुण्याचा तो वल्डफेमस by टवाळ कार्टा
तुमची चिवचिव समझली
In reply to असाच रजनीकांतचा किस्सा वाचला by प्यारे१
आग विझवण्यासाठी अग्निशमन
In reply to >>> एकदा दुपारी ११:५५ am by प्यारे१
(No subject)
In reply to "आग बुझवणे" हे कदाचित by टवाळ कार्टा
तरी पण चितळे ची सर्व दुकाने
In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
शेवटी ते "चितळे" आहेत. सोने
In reply to तरी पण चितळे ची सर्व दुकाने by प्रसाद१९७१
शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.मान्य आहे पण म्हणून मालकांनी डोळे झाकून बसू नये असे वाटते. गाडगीळांच्याकडे असा कधीही अनुभव येत नाही - कोणाला आला असल्यास वाचण्यास उत्सुक.दादूस +१
In reply to शेवटी ते "चितळे" आहेत. सोने by मोदक
जागो ग्राहक जागो वर टाका
In reply to दादूस +१ by नाखु
सोने घेताना "गाडगीळ", घर बूक
In reply to तरी पण चितळे ची सर्व दुकाने by प्रसाद१९७१
डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे
In reply to सोने घेताना "गाडगीळ", घर बूक by बॅटमॅन
डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे
In reply to डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे by प्रसाद१९७१
मराठी कळते ओ आम्हांला.
In reply to डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे by बॅटमॅन
पुण्यनगरीतले पुण्यवान काय
In reply to सोने घेताना "गाडगीळ", घर बूक by बॅटमॅन
जिथे बाजूला काहीच नाही तिथे
In reply to पुण्यनगरीतले पुण्यवान काय by काळा पहाड
प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
In reply to जिथे बाजूला काहीच नाही तिथे by प्रसाद१९७१
नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू
In reply to जिथे बाजूला काहीच नाही तिथे by प्रसाद१९७१
पर्फेक्ट पकडलाय!
In reply to नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू by थॉर माणूस
एकमेकांची लाल करणे
In reply to पर्फेक्ट पकडलाय! by आनंदी गोपाळ
फक्त डॉक्टर साहेबांना खरा
In reply to पर्फेक्ट पकडलाय! by आनंदी गोपाळ
ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या
In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
चला त्या दुकानात सरळ साधे
In reply to ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या by अनुप ढेरे
कित्ती नशीबवान आहे मी!
In reply to चला त्या दुकानात सरळ साधे by डॉ सुहास म्हात्रे
त्याला पाटी नाही, टोकन
In reply to कित्ती नशीबवान आहे मी! by पैसा
काय हे ! आज मागोमाग दोन धक्के
In reply to कित्ती नशीबवान आहे मी! by पैसा
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या
In reply to चला त्या दुकानात सरळ साधे by डॉ सुहास म्हात्रे
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते.आम्ही स्वकष्टाने कमावलेले पैसे देऊन कोणतीही सेवा/वस्तू खरेदी करत असल्याने कोणताही दुकानदार/सेवा देणारा आमच्यावर कृपा करत नाही. अर्थात, प्रत्येकाला ज्याचा त्याचा योग्य तो मान मिळालाच पाहिजे या तत्वाशी आमची बांधिलकी असल्याने कोणाबरोबर शिरजोरी करत नाही आणि दुसर्या कोणी केली तर त्याच्या पदरात त्याचे माप घातले नाही असे सहसा होत नाही. दुकानदाराने माजाने दुकान बंद केले तरी आम्हाला काही फरक पडेल इतके कोणत्याच दुकानदारावर अवलंबून न राहण्याएवढे मनोबल राखून आहोत :) ;)बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे.असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या दुकानदाराची अब्रू वेशिवर टांगली जाते असे समजण्याएवढे आम्ही कोणत्याच दुकानदाराच्या आहारी गेलेलो नाही ;) :) छे, छे, किती ते परावलंबित्व ?... बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे अश्या गोष्टींची आवड असणे ठीक... पण ते विकत देणार्याचे उपकार वाटण्याइतके त्यांचे व्यसन ??? *dash1* (वरचे सगळे खरोखरच खरे आहे... पण तरीसुद्धा ह घ्या ;) )चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज
In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
चितळ्यांकडून पुपो विकत
In reply to चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज by रेवती
धंधा वाढला की 'बाहेरून
In reply to चितळ्यांकडून पुपो विकत by रेवती
हो. ते आहेच!
In reply to धंधा वाढला की 'बाहेरून by कंजूस
मोदक साहेब
In reply to गायकवाड साहेबांनी त्या वेटर by मोदक
वस्तू घेतांना त्याची किंमत,
योगीराज!
_/\_
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही,
In reply to _/\_ by योगी९००
योगीराज, ज्यांना जमत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा!
In reply to दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही, by संजय क्षीरसागर
आणि आता पहिला मुद्दा किती योग्य होता ते पण पाहा!
In reply to योगीराज, ज्यांना जमत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा! by संजय क्षीरसागर
मी सगळ्यात पहिल्यांदा हेच
In reply to आणि आता पहिला मुद्दा किती योग्य होता ते पण पाहा! by संजय क्षीरसागर
शक्यव्च नाही!!
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
अगागागा!
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको
In reply to अगागागा! by पैसा
एक
In reply to तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको by स्पंदना
संवाद असा असेल का?
In reply to एक by vikramaditya
हाहाहाहा!
In reply to संवाद असा असेल का? by vikramaditya
बेक्कार टोलावलाय.
In reply to तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको by स्पंदना
योगी आहात, जमले तुम्हाला. गुड
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
२००+
धागा वाचून होईतोवर २००
अजून चितळेंकडे जाण्याचा योग
+१
In reply to अजून चितळेंकडे जाण्याचा योग by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'या फोटोमधे आहेत त्या कोण ?
In reply to +१ by मदनबाण
तुमची वहिनी. माझी सून.
In reply to या फोटोमधे आहेत त्या कोण ? by खटपट्या