✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुकानदाराकडून अपमान..

य
योगी९०० यांनी
Tue, 12/09/2014 - 12:42  ·  लेख
लेख
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले.. प्रसंग एक : हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले. खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही. प्रसंग दोन: वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला). वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय? तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल. यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101942 वाचन

💬 प्रतिसाद (313)

प्रतिक्रिया

कित्ती नशीबवान आहे मी!

पैसा
गुरुवार, 12/11/2014 - 17:49 नवीन
मी एकदा डेक्कनवरच्या चितळ्यांकडे गेले होते. तिथे हातात ती जगप्रसिद्ध पाटी ठेवली. साहजिकच मी गोंधळले. आणि कॅश काउंटरच्या माणसालाच विचारलं, "हे प्रकरण कसं वापरायचं आणि दुकानात खरेदी कशी करायची?" त्यावर त्याने चक्क सहास्य वदनाने ती पाटी कशाकरता ते नीट सांगितलेच, एवढेच नव्हे तर बाकरवडीचा काउंटर कुठे तेही व्यवस्थित दाखवले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्याला पाटी नाही, टोकन

मोदक
गुरुवार, 12/11/2014 - 18:32 नवीन
त्याला पाटी नाही, टोकन म्हणतात. सोबत वल्ली होता काय..? चितळे त्याला घाबरले असतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काय हे ! आज मागोमाग दोन धक्के

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/11/2014 - 19:49 नवीन
काय हे ! आज एका मागोमाग दोन धक्के ?! जगबुडी जवळ येत असल्याची लक्षणे हो सगळी ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/11/2014 - 19:47 नवीन
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते. आम्ही स्वकष्टाने कमावलेले पैसे देऊन कोणतीही सेवा/वस्तू खरेदी करत असल्याने कोणताही दुकानदार/सेवा देणारा आमच्यावर कृपा करत नाही. अर्थात, प्रत्येकाला ज्याचा त्याचा योग्य तो मान मिळालाच पाहिजे या तत्वाशी आमची बांधिलकी असल्याने कोणाबरोबर शिरजोरी करत नाही आणि दुसर्‍या कोणी केली तर त्याच्या पदरात त्याचे माप घातले नाही असे सहसा होत नाही. दुकानदाराने माजाने दुकान बंद केले तरी आम्हाला काही फरक पडेल इतके कोणत्याच दुकानदारावर अवलंबून न राहण्याएवढे मनोबल राखून आहोत :) ;) बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे. असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या दुकानदाराची अब्रू वेशिवर टांगली जाते असे समजण्याएवढे आम्ही कोणत्याच दुकानदाराच्या आहारी गेलेलो नाही ;) :) छे, छे, किती ते परावलंबित्व ?... बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे अश्या गोष्टींची आवड असणे ठीक... पण ते विकत देणार्‍याचे उपकार वाटण्याइतके त्यांचे व्यसन ??? *dash1* (वरचे सगळे खरोखरच खरे आहे... पण तरीसुद्धा ह घ्या ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज

रेवती
गुरुवार, 12/11/2014 - 18:26 नवीन
चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज टंकता येत नाहॆये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चितळ्यांकडून पुपो विकत

रेवती
गुरुवार, 12/11/2014 - 22:02 नवीन
चितळ्यांकडून पुपो विकत घेतल्या. दोन दिवसात संपवावे हा नियम लिहिलेल्या असतो असे अंधुकसे आठवते. ३०तासात बुरशी आली. फोन केला. नाव लिहून घेतले त्यांनी व येऊन घेऊन जावा म्हणाले. त्यानंतर भारतात जायला जमले नाही. पण आता त्यांच्याकडून घेणार नाही. त्यापेक्षा चाम्गली पुपोवाले आहेत. शिवाय आपणही करू शकतोच. इस्पिक एक्काजी म्हणतात तसे अवलंबित्व कामाचे नाही. त्याने दुकानदार माजतात. लोकही राम्गेत दरवेळी येतातच असे नाही. मग ते लोक वसवस करतात. (१० मिनितात एवढे ट्म्कले). जौदे राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

धंधा वाढला की 'बाहेरून

कंजूस
Sat, 12/13/2014 - 10:32 नवीन
धंधा वाढला की 'बाहेरून खात्रीशीर व्यक्तीकडून करून आणणे '(आईटसोर्सिँग) सुरू करतात. आणखी धंधा वाढला की खात्री॰ इतकेजण मिळत नाहीत अथवा तो आणखी दुसऱ्या पातळीतले आउट॰ सुरु करतो. शिवाय कमिशनचे घोडे पुढे पळतच असते. पुढे आणखी गुजरातमधून गूळ, तेल, मप्र॰चा गहू आणि कर्नाटकातली चणाडाळ थोक भावात हडपसरच्या कोठीत येऊन पडू लागते. पुपो॰जाते नदीपात्रात आणि गिऱ्हाइकाला कात्रजचा घाट दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हो. ते आहेच!

रेवती
Sat, 12/13/2014 - 21:01 नवीन
हो. ते आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मोदक साहेब

सुबोध खरे
गुरुवार, 12/11/2014 - 18:56 नवीन
मोदक साहेब बहुतांशी अशा ठिकाणी कामावर ठेवताना त्यांना कसे वागायचे याचे व्यवस्थित प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे अशा तर्हेचे "हं, आटपा लवकर" सारखे आगाऊ वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही.( बर्याच वेळेस ते त्या पार्टीतील लोकांकडून जड बक्षिसी साठी केलेले "कर्तव्य"असते.) त्यामुळे अशा कारणासाठी त्याला आर्थिक दंड झाला तरी मला मुळीच वाईट वाटणार नाही. मी गायकवाड साहेबाना स्पष्ट शब्दात सांगितले कि तुमच्या कर्मचार्याने माझ्या संध्याकाळचा पार विचका केला याची किंमत काय? मी जर माझ्या दवाखान्यातील रुग्णांना पुढे मागे करून( आज नको उद्या या इ. इ.) येथे कुटुंबाबरोबर एक संध्याकाळ आनंदात घालवायला आलो असता तिचा विचका कुणी केला आणि फक्त सोर्री म्हणाले तर चालेल काय? हि तेथे नीट न वागणाऱ्या वेटरला समज देणे आवश्यक आहेच. आपण आपल्या पत्नीसाठी एखादा ड्रेस शिवायला दिलात आणि त्या शिंप्याने त्याची वाट लावली तर आपण फक्त त्याचिं क्षमा याचना ऐकून गप्प बसता कि त्याला तो सुधारून व्यवस्थित करून द्यायला भाग पाडता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वस्तू घेतांना त्याची किंमत,

पाषाणभेद
गुरुवार, 12/11/2014 - 11:07 नवीन
वस्तू घेतांना त्याची किंमत, दर्जा आदींची तुलना करणे, दोन दुकांनांमधील भाव तपासणे हे ग्राहक हक्कात मोडते. याविरूद्ध एखाद्या दुकानदाराने बेजबदार वर्तन केल्यास त्यास फौजदारी खटला दाखल करता येतो याची जाणीव करून द्यावी. बर्‍याच जणांच्या प्रतिक्रीया चांगल्या आहेत. बाकी आमच्या साडी खरेदी करण्याचे प्रसंग आठवले.
  • Log in or register to post comments

योगीराज!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 12/11/2014 - 12:21 नवीन
बायकांबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....
बायकोबरोबर खरेदीला जाणं हा आनंद सोहळा आहे. किती तरी अँगल्सनं, तिला काय खुलून दिसेल हे पाहाण्याची ती संधी असते. स्त्री विश्वात कायकाय नव्या फॅशन्स आल्यात तेही कळतं. प्रश्न खरेदीचा कमी आणि तिच्या सहवासात वेळ घालवण्याचा जास्त आहे. मी तर तिच्याबरोबर खरेदीची एकही संधी सोडत नाही. जोपर्यंत दोघांना पटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही खरेदी करत नाही, पण एकमत व्हायचा आवकाश की (मग किंमत काहीही असो), खरेदी करतोच. अमक्या टॉपवर कोणती लेगीन घ्यायची, तमक्या ड्रेसचं मिक्स अँड मॅच कसं बघायचं, स्पेशल दुपट्टा कुठून रंगवून घ्यायचा, अनोख्या रंगांच्या साड्यांची मोहमयी दुनिया आणि त्यावरचे अनेकविध प्रकारे डिजाइन केले जाणारे ब्लाऊज, तिच्यासाठी घेतलेल्या स्ट्रेचबल जीन्स आणि त्यावरचे दिलकष टी शर्टस... आणि या सगळ्या खरेदी नंतर, त्या आनंदात तिच्याबरोबर निवांतपणे केलेला श्रमपरिहार. एकसोएक आयम आहेत तिच्याबरोबर केलेल्या खरेदीचे. मग सरते शेवटी जेंव्हा दोघांनी मिळून खरेदी केलेली परिधानं लेवून ती आपल्याबरोबर एखाद्या समारंभाला येते तेंव्हा तिचं ते खुललेलं रुप, बस देखते रहो!
  • Log in or register to post comments

_/\_

योगी९००
गुरुवार, 12/11/2014 - 12:30 नवीन
प्रयत्न केला जाईल...!! प्रश्न खरेदीचा कमी आणि तिच्या सहवासात वेळ घालवण्याचा जास्त आहे. या वाक्याला मनापासून सलाम...!! कदाचित असे वागलो तर मॉलमध्येच एक खोली घ्यावी लागेल. पण एकमत व्हायचा आवकाश की (मग किंमत काहीही असो), खरेदी करतोच. लुटले जाण्याची शक्यता आहे... अमक्या टॉपवर कोणती लेगीन घ्यायची, तमक्या ड्रेसचं मिक्स अँड मॅच कसं बघायचं, स्पेशल दुपट्टा कुठून रंगवून घ्यायचा, अनोख्या रंगांच्या साड्यांची मोहमयी दुनिया आणि त्यावरचे अनेकविध प्रकारे डिजाइन केले जाणारे ब्लाऊज, तिच्यासाठी घेतलेल्या स्ट्रेचबल जीन्स आणि त्यावरचे दिलकष टी शर्टस... आणि या सगळ्या खरेदी नंतर, त्या आनंदात तिच्याबरोबर निवांतपणे केलेला श्रमपरिहार. क्या बात है...दिल गार्डन गार्डन हो गया...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही,

संजय क्षीरसागर
गुरुवार, 12/11/2014 - 12:41 नवीन
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

योगीराज, ज्यांना जमत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा!

संजय क्षीरसागर
Fri, 12/12/2014 - 10:17 नवीन
तुम्हाला प्रतिसाद आवडला याचा अर्थच तुमच्याबाबतीत काही चांगलं घडण्याची शक्यता निर्माण झालीये. आणि कधी हवं असेल तर घरी येऊन पाहा, दृष्ट लागावी अशी रिलेशन्स आहेत. संपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आणि आता पहिला मुद्दा किती योग्य होता ते पण पाहा!

संजय क्षीरसागर
Fri, 12/12/2014 - 11:24 नवीन
दुकानदार त्याचं वैफल्य आपल्यावर काढतोयं त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही. ही कान्ट हँडल हिज बिझीनेस, दॅटस ऑल! अशाच प्रकारे (जगात) सगळीकडे चाललेलं असतं. कुणी कशानं आणि कसं उसळेल याचा नेम नसतो. तुम्ही भिडस्त आहात त्यामुळे प्रत्युत्तर देत नाही, काही हरकत नाही. मी बिनधास्त टोलवतो! कारण दुसर्‍यांची जळजळ आपल्यावर घ्यायचं काही कारण नाही! एकदा आपला हेतू क्लिअर असला की कुणाला जुमानायचा काहीएक संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी सगळ्यात पहिल्यांदा हेच

कवितानागेश
Fri, 12/12/2014 - 11:31 नवीन
मी सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगितले होते त्यांना. मॉल मध्ये दुकानाच्या भाड्यानीच दुकानदार गांजलेले असतात, म्हणून त्यांची टाळकी सटकलेली असतात. तुम्ही माझाच मुद्दा का रिपिट करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

शक्यव्च नाही!!

स्पंदना
Fri, 12/12/2014 - 03:55 नवीन
शक्यव्च नाही!! मी सांगतो ना? मुर्खासारख काही निवडु नको. मी म्हणतो तेच चांगल दिसेल. उगा बोगद्यात शिरु नको. घ्यायची अक्क्ल आहे का? अस म्हणत फकत आपलीच निवड लादायची आणि वर दोघांच्या संमतीने म्हणायच. का ब्वा? ज्याने कपडे घालायचे त्याने स्वतः काही आवडल म्हणुन का नाही घ्यायच काही? का नाही कधी मधी मित्रांबरोबर जाउन थोडी खरेदी करायची? स्वतः साठी म्हणुन का नाही जगायच? बाहेर जगाला सांगायला जरी "आम्ही बरोबरच खरेदीला जातो" असलं तरी त्यात दबावशास्त्रच जास्त जाणवत. मी म्हणतो तेच घालायच, तेच खायच अन तसच वागायच हे करण्यासाठी कायम बरोबर असण महत्वाच असत. त्यामानाने मला योगी ९०० परवडले. साधेसुधे, "अग ठरव ना तुझ तू" म्हणणारे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अगागागा!

पैसा
Fri, 12/12/2014 - 08:52 नवीन
आमच्याकडे पण एकमत असतं! फक्त माझं एकच मत! नवरा कधीतरी आईने नेसली आहे तशी साडी घे वगैरे म्हणतो, पण तसा तो स्वतःचे कपडे पण आणायचा आळस + निरुत्साह दाखवतो त्यामुळे मी खरेदीला कधीच त्याला बरोबर नेत नाही. त्याचं मत कधी नसतं याचा मला वैताग येतो बरेचदा, पण आता काय करणार? (तशी मी पण सगळ्या अँगल्सने सुंदरच दिसते बरं का! पण तसं कधी चारचौघात सांगेल तर शपथ!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको

स्पंदना
Fri, 12/12/2014 - 10:56 नवीन
तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको देऊ। मला विचारशील तर आम्हा दोघांचा मिळून संसार आहे। कुणा एकट्याचा नव्हे। जशी मी त्याच्यावर अवलंबून आहे तितकाच् तो माझ्यावर। आणि हो बघा माझी पसंती म्हणून आम्ही दोघेही मिरवत नाही। बैल बेंदराला काढावा तसा मी त्याला मिरवत नाही अन बघा कशी सुन्दर दिसते ते तो कधी मिरवत नाही। चार चौघात चर्चा करायला तो काही बाजार नाही। संसार आहे। जेंव्हा लोक अगदी खाजगी गोष्टी सुद्धा चव्हात्यावर मांडतात ना तेंव्हाच् त्या नात्याला एकच "मी"एवहढीच् बाजू आहे ते लक्ष्अत येते। दोघे ही कधी स्वतंत्र कधी मिळून निर्णय घेऊ शकतात अं त्या निर्णयाचा आदर राखतात तो संसार!!बाकी सारी दडपशाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक

vikramaditya
Sun, 12/14/2014 - 14:31 नवीन
बॉस आपल्या ज्युनियर्सना सांगतो... I am always ready for discussion... we will discuss and come to "MY" conclusion. Ok?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

संवाद असा असेल का?

vikramaditya
Sun, 12/14/2014 - 22:33 नवीन
श्री: अग, चल, शॉपींगला जायच ना? सौ: आत्ता? श्री: हो, गेल्या महिन्यात तु म्हणाली होतीस ना? सौ: बरं चला. श्री: हे आपले छान आहे ना? आपले विचार नेहेमी कसे जुळतात ना? सौ: हं.. सौ: गेल्या महिन्यात मी म्हणाले की साडी घ्यायची.. श्री: छे! छे! अग आज लेगीन्ग्स घ्यायची आहेत. सौ: काsssssय? श्री: मी बघुन ठेवली आहेत. शनिवारी पिकनिकला तु कोणता टॉप आणि लेगीन्ग्स घालायची ते पण मी ठरवले आहे. आहे की नाही मी मनकवडा? सौ: असेल... श्री (प्रचंड खुश होवुन): नंतर बाहेरच जेवुया. सौ: हो, माझी मैत्रीण सांगत होती की एक नवे चायनीज हॉटेल आहे तिथे जावुया. श्री : अग वेडी की काय तु? मी आधीच माझ्या मित्राच्या हॉटेलात टेबल बुक केले आहे. ओके? सौ: नेहेमीप्रमाणे तुम्ही म्हणाल तसे. श्री(अति प्रचंड खुश होवुन): जानेमन, मी सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी कश्या सोप्या केल्या आहेत. तु फक्त खुशीत राहायचे. आपल्या ह्याच एकमताने वागण्यामुळे लोक आपल्याला आदर्श जोडपे म्हणतात ना? सौ: अच्छा? शक्यता आहे. (इति लेखनसीमा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya

हाहाहाहा!

पैसा
Mon, 12/15/2014 - 00:15 नवीन
*LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya

बेक्कार टोलावलाय.

प्यारे१
Sun, 12/14/2014 - 21:31 नवीन
बेक्कार टोलावलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

योगी आहात, जमले तुम्हाला. गुड

टीपीके
Sat, 12/13/2014 - 01:10 नवीन
योगी आहात, जमले तुम्हाला. गुड. आम्हाला कधी जमते बघू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

२००+

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/11/2014 - 19:52 नवीन
२००+
  • Log in or register to post comments

धागा वाचून होईतोवर २००

आतिवास
गुरुवार, 12/11/2014 - 19:57 नवीन
धागा वाचून होईतोवर २०० प्रतिसाद झालेसुद्धा :-)
  • Log in or register to post comments

अजून चितळेंकडे जाण्याचा योग

खटपट्या
Fri, 12/12/2014 - 00:05 नवीन
अजून चितळेंकडे जाण्याचा योग आला नाही. (एका मोठ्या आनंदाला मुकतोय मी) अजुन एक धाडसी विधान, "माझी बायको मला साड्या आणि ड्रेस मटेरीयल घ्यायला घेउन जाते आणि मि सांगीतलेल्याच साड्या आणि ड्रेस घेते" (कीतीही खोटे वाटले तरी वरील विधान सत्य आहे. माझा रंगांचा चॉइस चांगला आहे असे तीचे मत)
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Fri, 12/12/2014 - 13:52 नवीन
आपलं बी असचं हाय... सर्व प्रथम मीच बायडीला सल्ला देतो की साड्या निवडण्याची घाई करु नकोस ! नाही पसंत पडत असेल तर बाजुच्या दुकानात जाऊ,पण जो पर्यंत पसंत पडत नाही तो पर्यंत काहीही घेण्याच्या भानगडीत पडू नकोस. आमच्या तिर्थरुपांकडुन मी आत्मसात केलेल्या अनेक गुणांपैकी साडीची खरेदी हा एक. :) आत्ता पर्यंत घेतलेल्या साड्यांपैकी प्रत्येक साडी तिला पसंत पडली आहेच, पण बाकीच्या स्त्रींयांनी या खरेदीचं भरभरुन कौतुक केल्यामुळे साडीच्या खरेदीला माझ्या मताची नोंद घेउन, माझ्या पसंतीची साडी घेणे तिला अत्यावश्यक झाले आहे... एव्हढेच नव्हे तर कुठल्या समारंभाला जावयाचे असेल तर... १० वेळा मला ३-४ वेळा वेगवेगळ्या साड्या दाखवुन यातली कुठली ? असं विचारंण हे नित्याच झालं आहे. ;) जाता जाता :--- काही काळा पूर्वी वारली प्रिंटची मस्त साडी घेतल्यावर आणि तिचे तिच्या मैत्रिणी आणि इतर स्त्रीवर्गाने कौतुक केल्यावर आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आठवते आहे.. ;) Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

या फोटोमधे आहेत त्या कोण ?

खटपट्या
Fri, 12/12/2014 - 22:53 नवीन
या फोटोमधे आहेत त्या कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुमची वहिनी. माझी सून.

रेवती
Fri, 12/12/2014 - 23:59 नवीन
तुमची वहिनी. माझी सून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

(No subject)

खटपट्या
Sat, 12/13/2014 - 01:36 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तुमची वहिनी. माझी सून.

मदनबाण
Sat, 12/13/2014 - 09:41 नवीन
तुमची वहिनी. माझी सून. हॅहॅहॅ... आज्जे ते मॉडल हाय बरं का... माझा काय बी रिलेशन नाय बाँ ! ;) असं मॉडल आमच्या नशिबी कुटं ! हाय ते सॅंपल "सहन" करुन दिवस काढायचे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

भाग्यवान अहात बाणराव तुमच्या

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/13/2014 - 09:58 नवीन
भाग्यवान अहात बाणराव तुमच्या कडे मॉडेल तरी आहे. आम्हाला नुसते फोटु पाहुन उसासे टाकत गप्प बसावे लागते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

असं मॉडल आमच्या नशिबी कुटं !

मदनबाण
Sat, 12/13/2014 - 10:07 नवीन
असं मॉडल आमच्या नशिबी कुटं ! हे वाचलं नाय का तुमी ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आयमाय स्वारी.

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/13/2014 - 10:13 नवीन
आयमाय स्वारी. मॉडेल बघण्याच्या नादात वाचायच राहुनच गेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अच्छा! असे आहे काय? बघतेच आता

रेवती
Sat, 12/13/2014 - 21:03 नवीन
अच्छा! असे आहे काय? बघतेच आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चितळेच्या दुकानासमोर मोठी

कंजूस
Fri, 12/12/2014 - 04:55 नवीन
चितळेच्या दुकानासमोर मोठी रांग बाकरवडीसाठी. प्रत्येकाला एक किलोच देणयात येते. एक गिऱ्हाईक "तीन किलो." गडी "एक किलोच मिळेल." गि॰ "आमचं कुत्रं दुसरं काय खातच नाही."
  • Log in or register to post comments

हा हा हा

रुस्तम
Fri, 12/12/2014 - 11:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

. . .

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/12/2014 - 12:21 नवीन
+D . +D . +D . आम्ही जास्त हुशार आहोत... आमच्या कुत्र्याला असल्या वाईट सवयी लागू दिल्या नाहीत :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मला सोबत नेले आणि दुकानदार

गवि
Fri, 12/12/2014 - 05:51 नवीन
मला सोबत नेले आणि दुकानदार जर्रा काही चुकीचे वागला बोलला तर मी तिथे सीन ऊर्फ इतर लोकांचे मनोरंजन फुकट करीन या अनुभवसिद्ध भीतीमुळे बर्‍याचदा माझे कपडेदेखील आमचे कुटुंबच डायरेक्ट खरीदून घरी घेऊन येते. फक्त वादावादी परवडली..पण त्याहीपुढे जाऊन आपला पती दुकानदाराला बिझनेस मॉडेल,त्याच्या व्यवसायाचे उर्वरित भवितव्य, तो खरोखर टिकवायचा असेल तर काय मूलभूत करावे लागेल वगैरे डोस पाजण्यात षॉपिंगपेक्षा दुप्पट वेळ खातो याची तिला जास्त धास्ती असते.
  • Log in or register to post comments

अरे बापरे..

चिगो
Mon, 12/15/2014 - 17:08 नवीन
फक्त वादावादी परवडली..पण त्याहीपुढे जाऊन आपला पती दुकानदाराला बिझनेस मॉडेल,त्याच्या व्यवसायाचे उर्वरित भवितव्य, तो खरोखर टिकवायचा असेल तर काय मूलभूत करावे लागेल वगैरे डोस पाजण्यात षॉपिंगपेक्षा दुप्पट वेळ खातो याची तिला जास्त धास्ती असते
अरे देवा !! =)) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अप्पा ब. चौकात पुस्तके खरेदी

टिल्लू
Fri, 12/12/2014 - 07:19 नवीन
अप्पा ब. चौकात पुस्तके खरेदी करतांना असाच उर्मट अनुभव आला. एका तळ/भुमीगत? दुकानात गेलो, मी एकटाच गिर्‍हाइक होतो, दोन-तिन पुस्तके घ्यायची होती, एक पुस्तक मागितले, काही हा नाही हू नाही, फोनवर बोलत बोलत ५-१० मि. नी आणुन दिले. तरी मी ते दुर्लक्ष करुन अजुन एक दुसरे पुस्त्क मागितले, परत तसाच अनुभव, पुस्तकाबद्द्ल वा आणखी काही माहिति विचारली तर चक्क दुर्लक्ष आणि फोनवर बोलणं चालू, हाताखलचा पोरगापण एक्दम 'बि़जी'. आला राग घेतलेले पुस्तक तसेच ठेवले आणि गेलो निघुन, त्याच्या "काय झालं?" ह्या प्रश्नाला दुर्लक्ष करुन :)
  • Log in or register to post comments

"..काय झालं" इतके दोन शब्द

गवि
Fri, 12/12/2014 - 07:37 नवीन
"..काय झालं" इतके दोन शब्द तुमच्याशी बोलला? ..नवखा असेल. तुम्हीही भाग्यवानच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिल्लू

फोनवर बोलून झालं का? असं

खटपट्या
Fri, 12/12/2014 - 08:33 नवीन
फोनवर बोलून झालं का? असं विचारायला पाहीजे होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फोन करून विचारा, मग सांगतो.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/12/2014 - 12:23 नवीन
फोन करून विचारा, मग सांगतो. असं म्हणायला पाहिजे होतं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

"काही नाही, वाचून झालं" अस

टिल्लू
Fri, 12/12/2014 - 13:57 नवीन
"काही नाही, वाचून झालं" अस तोंडापर्यंत आलेलं वाक्य तसच गिळलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

योगीजी, पुढच्या वेळेस जाताना

कवितानागेश
Fri, 12/12/2014 - 11:22 नवीन
योगीजी, पुढच्या वेळेस जाताना शक्यतो जिथे तरुण मुलं-मुली वस्तू/कपडे दाखवायला आहेत अशा ठिकाणी जा. त्यान्च्याशी सरळ मराठीत गप्पा मारायला सुरुवात करायची. मला आजपर्यंत अशा लोकांचा फार चांगला अनुभव आलाय. आपल्याला हवा असलेला प्रकार, रन्ग, पोत, आणि बजेट त्यांना सांगायचे समजावून... तेच नीट मदत करतात.
  • Log in or register to post comments

योगीश्री, यानिमित्तानं दोन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील

संजय क्षीरसागर
Mon, 12/15/2014 - 11:02 नवीन
ज्यांची इथल्या लेखनावर कुठे ना कुठे गोची झालीये ते स्कोर सेटल (पक्षी, उपमर्द) करायच्या, प्रतिक्षेतच असतात, मग विषय काहीही असो. त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नसावी की या प्रकारात, उपमर्द होण्याऐवजी ते उघडे पडतात. हे त्या दुकानदारासारखंच आहे, तो स्वतःचं फ्रस्ट्रेशन कस्टमरवर काढतोयं तर इतरेजन प्रतिसादातून व्यक्त होतायंत, पण मूळ कारण एकच आहे आणि ते लक्षात आलं की त्यामागची मानसिकता उघड होते. सारांश काय? वैफल्यग्रस्त दुकानदार आपल्यावर राग काढत असेल तर त्याचा आपल्या आनंदात असण्याशी (जसे तुम्ही फोनवर गेम्स खेळत होतात), काहीएक संबंध नाही. आणि आपलं आपल्या पत्नीशी सुरेख नातं आहे, तिच्या सहवासाचा आनंद आपण लुटू शकतो (किंवा द अदर वे, ती तुमच्या सहवासात रमते) ही कल्पना ज्यांना असह्य होते, ते स्वतःचं फ्रस्ट्रेशन प्रतिसादातून व्यक्त करतात. जसा दुकानदाराच्या फ्रस्ट्रेशनचा आपल्याशी संबंध नाही, तद्वत, वैफल्यग्रस्त प्रतिसादांचा आपल्या रिलेशनशिपशी दूरान्वयेही संबंध नाही. संपादित
  • Log in or register to post comments

राग..

योगी९००
Mon, 12/22/2014 - 09:41 नवीन
वैफल्यग्रस्त दुकानदार आपल्यावर राग काढत असेल एका गोष्टीचा राग दुसर्‍यावर निघणे natural आहे. असे बरेचदा घडते. पण म्हणून कोणी prospects / customers वर राग काढणे म्हणजे अतीच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अन्याय सहन करु नका

चेतन677
Mon, 12/15/2014 - 19:58 नवीन
तुम्ही दुकानदाराला सडेतोड उत्तर द्यायला हवे होते....आणि दुकानदारासाठी गिर्‍हाईक म्हणजे देव असतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा