✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चारोळ्या

प — प्रमोद देर्देकर, Wed, 12/10/2014 - 15:55
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता. बाटली रिकामी ग्लास घरंगळलेला, टेबलावरचा थेंब केव्हाचाच सुकलेला. ढग विखुरलेले पाऊस थांबलेला, कुंदाळ हवेत मी गारठलेला. काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.

प्रतिक्रिया द्या
10599 वाचन

💬 प्रतिसाद (54)

चारोळ्या छान.

प्रचेतस
Wed, 12/10/2014 - 16:31 नवीन
चारोळ्या छान. पण ह्याला हायकू म्हणता येणार नाही. ते तीनच ओळींचं असतं म्हणे.
  • Log in or register to post comments

काडी काडी करुन तिनं घरटं

यसवायजी
Wed, 12/10/2014 - 19:14 नवीन
काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं. असं चालेल का? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चालायला पाहीजे.

प्रचेतस
Wed, 12/10/2014 - 19:17 नवीन
चालायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हायकू

पिवळा डांबिस
Wed, 12/10/2014 - 23:29 नवीन
टेक्निकली बरोबर आहे. पण शेवटची ओळ ही अगदी लहान आणि पंचलाईन असावी. उदा. "काडी काडी करून घरटं बांधलं, मेहनत तिची जाणून थांबला वाहता वारा." अस काहीसं, पटतं का बघा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

एक एक करून

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 16:34 नवीन
एक एक करून त्याने जिल्ब्या पाडल्या आलेच नाही कोणी प्रतिसाद घेऊन जमलंय का? :)
  • Log in or register to post comments

एकेक करुन त्याने

सूड
Wed, 12/10/2014 - 19:05 नवीन
एकेक करुन त्याने जिल्ब्या पाडल्या दणकून गेलेच नाही कोणी प्रतिसाद तिथे लिहून!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नियम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/10/2014 - 19:37 नवीन
प्रतिसादाच्या जिल्ब्या टाकल्याच पाहिजेत प्रत्येक धाग्यावर. म्हणुन मौन माझं. छ्या. जमलं नै वाटतं. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आवडेश

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 20:40 नवीन
आवडेश :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे

प्रमोद देर्देकर
Wed, 12/10/2014 - 16:39 नवीन
होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे या चारोळ्याच जर जमलं तर या धाग्यातुन हायकु हा शब्दच काढुन टाका ना अगदी शिर्षकासकट आणि चारोळ्या ठेवा. @ ट. का. तु आलास की माझ्यासाठी प्रतिसादाला खीक :))
  • Log in or register to post comments

ते मी अभिप्राय घ्यायला आलोय

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 16:40 नवीन
ते मी अभिप्राय घ्यायला आलोय :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

धरला मी तांब्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/10/2014 - 19:16 नवीन
धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट!
  • Log in or register to post comments

खाली वाकून पाहिलं

सूड
Wed, 12/10/2014 - 20:15 नवीन
खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट!
yukk!! *bad*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवांच्याकडे किती तांबे

प्यारे१
Wed, 12/10/2014 - 20:29 नवीन
=)) बुवांच्याकडे किती तांबे (तांब्याचं अनेकवचन) आहेत? बाकी ते सुनिल शेट्टीचं गाणं हाय्हुकू हायहुक्कू हाय हाय चा नि हायकूचा काही संबंध आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हान्गाशी !!

खटपट्या
Wed, 12/10/2014 - 22:59 नवीन
हान्गाशी !! याला म्हणतात दणकट चारोळी. यासाठीच आम्ही बुवांचा फॅन आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आमचे एक दणकट मित्रसुद्धा

सतिश गावडे
Wed, 12/10/2014 - 23:31 नवीन
आमचे एक दणकट मित्रसुद्धा बुवांच्या "अशा" चारोळ्यांचे फॅन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अंदाज आला "दणकट मीत्राचा".

खटपट्या
Wed, 12/10/2014 - 23:40 नवीन
अंदाज आला "दणकट मीत्राचा". चारोळी वाचली की हसुनहसून पोट "साफ" झालं पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

निव्वळ अप्रतिम

प्रचेतस
गुरुवार, 12/11/2014 - 09:03 नवीन
+१ ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही. येऊ द्यात बुवा अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ह्याच त्या वास्तववादी आणि

खटपट्या
गुरुवार, 12/11/2014 - 09:28 नवीन
ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या.
मला तर त्यांच्या चारोळ्यांचा खूप गुण आलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो हो वल्लीशेट आताशा मला

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 12/11/2014 - 10:00 नवीन
हो हो वल्लीशेट आताशा मला समजयल लागलंय तुम्हे जे वास्तववादी आणि प्रत्ययकारी वगैरे कायसं म्हणताय ते. काय तो निरागसपणा खाली वाकुन पहाण्यातला आणि काय तो वास्तववादीपणा/ प्रत्ययीपणा जिलबी नीट पडेल याचा आमचं गुर्जी लईच भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धरला मी तांब्याटाकलं त्यात

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/10/2014 - 23:41 नवीन
धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट ! हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जबरा..

मुक्त विहारि
Wed, 12/10/2014 - 23:55 नवीन
एक नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एकदम सुपडा साफ

खटपट्या
गुरुवार, 12/11/2014 - 00:18 नवीन
एकदम सुपडा साफ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

खतरनाक कन्व्हर्शन.

सतिश गावडे
गुरुवार, 12/11/2014 - 00:33 नवीन
खतरनाक कन्व्हर्शन. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अगागागागा खल्लास की ओ एकदम.

प्रचेतस
गुरुवार, 12/11/2014 - 09:03 नवीन
अगागागागा =)) खल्लास की ओ एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आरं कुट नेउन ठिवलाय ह्यो धागा

स्पंदना
गुरुवार, 12/11/2014 - 06:12 नवीन
आरं कुट नेउन ठिवलाय ह्यो धागा? ऑ?
  • Log in or register to post comments

धागा परसदारी सापडेल अपर्णा

अजया
गुरुवार, 12/11/2014 - 07:14 नवीन
धागा परसदारी सापडेल अपर्णा ^_~ चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? =))
  • Log in or register to post comments

किंवा साहित्यांगण ते परसदारही

सस्नेह
गुरुवार, 12/11/2014 - 07:20 नवीन
किंवा साहित्यांगण ते परसदारही चालेल *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आमचेबी दोन शबूद

सस्नेह
गुरुवार, 12/11/2014 - 07:24 नवीन
राॅकेल प्यालो डिझेल प्यालो तेव्हा नाही मेलो अर्धी बाटली दारू प्यालो चंद्रावर गेलो...
  • Log in or register to post comments

जबरदस्त....

मुक्त विहारि
गुरुवार, 12/11/2014 - 11:01 नवीन
खतरनाक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अगागा अया अया धाग्याचं पार

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 12/11/2014 - 08:53 नवीन
अगागा अया अया धाग्याचं पार भरीत करुन टाकलंय की! हसुन हसुन वाट लागली. आणि काय वो गुर्जी काय हे असं शिष्याच्या धाग्याचं भरीत करतांव, मग बघा हं ते दक्षिणा म्हणुन.......हॅ.. हॅ.. .हॅ.. आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय! बरं आता ट.का ची चारोळी अशी होवु शकेल. "त्याने जिल्ब्या पाडल्या एकेक करुन कोणीच नाही आलं प्रतिसाद घेऊन"
  • Log in or register to post comments

@वल्ली

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/11/2014 - 22:56 नवीन
@वल्ली ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही.>>> :-/ कळ्ळं..कळ्ळं..! :-/ दबा धरुन बसतो हत्ती दिसली तोफ की देतो बत्ती! अता मी या कविता लिवणार नै बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! Image removed. ================================ इस्पीकचा एक्का @हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? >> Image removed. ================================ अजया @चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? >> Image removed. ================================= @आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय!>>> Image removed. ह्या ह्या ह्या Image removed. ===================================== एक तांब्या वरती आला नि दर्दुकाकांचा धागा हाय ज्याक झाला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!!

सतिश गावडे
गुरुवार, 12/11/2014 - 23:15 नवीन
बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! बुवांच्या घरची उलटीच खुण बत्तीला तोफ ते नै देणार !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/11/2014 - 23:22 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

असं नका करू ओ बुवा. आम्हा

प्रचेतस
Fri, 12/12/2014 - 06:07 नवीन
असं नका करू ओ बुवा. आम्हा रसिकांवर हां घोर अन्याय आहे. मला तुमच्या ह्या कविता आणि चारोळ्य़ा खूप खूप आवडतात. तेव्हा न लिहिण्याचा निर्णय मागे घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असोच्च असो!

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/12/2014 - 07:20 नवीन
असोच्च असो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१११ मी ही सॉरी,

खटपट्या
Fri, 12/12/2014 - 08:36 नवीन
+१११ मी ही सॉरी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हेच आणि असेच म्हणतो.

सतिश गावडे
Fri, 12/12/2014 - 08:37 नवीन
हेच आणि असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माझे दोन पैसे!

भाते
गुरुवार, 12/11/2014 - 20:08 नवीन
धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे. .…. अन लेख टंकाळलाया नवी लेखनिक पाहिजे आहे. अरे, बोलवा नवी… (जाऊदे, मिपाकर पुढचे समजुन घेतील!) :)
  • Log in or register to post comments

एका अज्ञात कवीची कविता

सतिश गावडे
Fri, 12/12/2014 - 08:42 नवीन
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचं टमरेल रिकामंच दिसतंय तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल पोटात जेव्हा ह्ळूच आतल्या आत पीठ पडले बस्स इतकेच.. ---- परवा संडासाच्या भिंती चाचपडताना भिंतीवरच्या रेघोट्या हाताला जाणवल्या छन्न झालं एकदम पूर्वी कसे छान कुंथत होतो अता कुंथूनही न होईलसे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला भिंतीवरचे चित्र सापडले उघडेनागडे काढलेले लवकर करा नाहीतर चड्डीतच होईल असे त्याखाली लिहिलेले. बघता बघता कां कोण जाणे पोटच डचमळले पटकन बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने पोटात गुरगुर होते ग्यासेस वाढतात बस्स इतकेच.. मग मी हापिसच्या कमोडमध्ये जातो पण चाळीतल्या संडासाची सर आजही येत नाही बस्स इतकेच.. ---- हम्म.. पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. इतकेच...
  • Log in or register to post comments

कहर !!

खटपट्या
Fri, 12/12/2014 - 08:50 नवीन
कहर !!Image removed. गुरुपेक्षा शिष्य सवाई !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अज्ञाताचा..

नाखु
Fri, 12/12/2014 - 09:21 नवीन
प्रवास "ज्ञान" मिळेपर्यंत असाच चालू राहू दे. हा.मु.ओसाडवाडी खु: ता:मुरमाड जि:फलाणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

विडंबन आवडले, पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 12/12/2014 - 10:21 नवीन
विडंबन आवडले, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अय्यय्यो..... लैच हुच्च

टवाळ कार्टा
Fri, 12/12/2014 - 10:24 नवीन
अय्यय्यो..... लैच हुच्च \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अ चांगला नीट ज्ञात असताना...

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/12/2014 - 11:16 नवीन
अ चांगला नीट ज्ञात असताना... असे आपणच म्हणू शकता, हे आज उलगडले! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाव घ्यायला लाजू नका.. स. गा.

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/12/2014 - 11:18 नवीन
नाव घ्यायला लाजू नका.. स. गा. :-D घ्या ना नाव!!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आचरट आणि शिवराळ

विटेकर
Fri, 12/12/2014 - 11:23 नवीन
आचरट आणि शिवराळ प्रतिसादांची लांब माळ तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ... . . . . छ्या ... वाण नाही पण गुण लागलाच !
  • Log in or register to post comments

तांब्या आणि रिकामा माळ

सतिश गावडे
Fri, 12/12/2014 - 11:58 नवीन
तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ...
हा अनुभव मी वर्ष घेतला आहे. मात्र तांब्याच्या ऐवजी टमरेल असायचं. पुढे कामानिमित्त गाव सोडले तरी विकांताला गावी जात असल्याने आठवडयातून दोन दिवस मोकळ्या माळरानावर मोकळे व्हायचा अनुभव घेत असे. पुढे दीड वर्ष हिरव्या नोटांच्या देशात काढून परत आल्यावर मात्र उघडयावर बसताना अवघडल्यासारखे वाटू लागले आणि लागलीच गावी शौचालय बांधले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

ख्या ख्या ख्या...

मदनबाण
Fri, 12/12/2014 - 14:26 नवीन
ख्या ख्या ख्या... :D

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
  • Log in or register to post comments

कहर

दिपक विठ्ठल ठुबे
Fri, 12/19/2014 - 11:13 नवीन
चारोळी ची पार आरोळी करून टाकली...
  • Log in or register to post comments

नसलेल्या देवा!

पैसा
Fri, 12/19/2014 - 12:09 नवीन
अरे नसलेल्या देवा! पीत वाङ्मय ते हेच का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा