✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोसायडन चा किस्सा

स
संचित यांनी
Sun, 11/30/2014 - 00:30  ·  लेख
लेख
पोसायडन गोष्ट तशी ८ वर्षापुर्वीची. मी B.E. II year मध्ये होतो. माझा मित्र विजय , शेंडी लावण्यात तरबेज. डोक्यानी थोडे मंद असे २-४ लोक शोधायचे आणि त्यांची मजा घ्यायची, त्याचा हा नेहमीचा टाईमपास. डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या सुनामीत अडकलेल्या एका जहाजेवर २००६ साली पोसायडन नावाचा सिनेमा आला होता. विजय आणि इतर काही मित्र सोबत रात्री ६-९ चा शो पाहून आलो. होस्टेल च्या खिडकीतून माझ्या रूम वरून मी बघितले तर विजय ४-५ मित्रांना सोबत घेऊन काही सांगत होता. मागे याच चौघांना मी विजयला चक्क "आर्नोल्ड श्वार्झनेगर हा रोबोटिक्स मध्ये मोठे शोध लावणारा न्यूरोसर्जन आहे" आणि "याहू हि कंपनी भारताच्या मालकीची असून ती शम्मी कपूर चा पुतण्या चालवतो" असल्या थापा मारताना ऐकले होते. विजय मित्रांसमोर सिनेमाची स्टोरी सांगत होता "भारतीय तत्वज्ञानावर या पेक्षा कठीण पाश्चात्य चित्रपट शोधून सापडणार नाही. एका जहाजात जहाजातून प्रवास करत असताना मोठी सुनामी येऊन त्यांची जहाज उलटते. आता भर रात्री समुद्रात आधीच लाटा वेगात असताना जहाज अचानक उलटली तर सर्वांचे मरण निश्चित होते. परंतु अनेक भाषांचा जाणकार असलेल्या सिनेमाच्या हिरोला अत्यंत विलक्षण संयोगाने ज्ञानेश्वरांचे बंगाली भाषेतील पसायदान हाती पडते. पोसायडन हा त्याचा बंगाली अपभ्रंश. हिरो हा इतिहासाचा अभ्यास्कर्ता असल्याने त्याच्या ते लगेच लक्षात येते. आता या बुडत्या जहाजातून वाचण्याचा काही उपाय नाही, तेव्हा पाश्चात्य गोष्टींचा क्षणभंगुरपणा लक्षात घेऊन परमेश्वराला सिनेमाचा नायक शरण जातो, आणि पसायदान वाचणे सुरु करतो. पसयादानाशी एकरूप झालेला हिरो हा प्रत्येक ओळ स्वत: वाचत जहाजावरील सर्व लोकांना अर्थ समजावून देत असतो. जहाजावर असलेल्या सर्वांवर आता कमरेपर्यंत आलेले पाणी आता मरणाच्या दाढेत ढकलत असते. आता आयुष्याचे मोजके क्षण राहिले असे वाटत असतानाच, या पसायदानाच्या शेवटी तुकारामांचे काही अभंग येतात..... आणि अचानक चमत्कार ... ज्याप्रमाणे तुकारामांचे अभंग बुडत्या इंद्रयाणीतून परत आले, त्याचप्रमाणे या बंगाली पोसायडनाच्या कृपेने बुडती जहाज आपोआप पाण्यावर येते." इंग्रजी चित्रपटाच्या कधीही मागे न जाणारे ते माझे भोळे मित्र, आपण परत मूर्ख तर नाही बनवल्या जात आहो या शंकेने माझ्या कडे पहात होते. मी हासू न थांबवता आल्याने होस्टेलच्या रूम मध्ये धावत पळालो. टीप: माझा misalpav वरील पहिलाच लेख असून, लेखनात काही चूक झाली असल्यास क्षमस्व.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
कथा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
41255 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

रोफळ

श्रीरंग_जोशी
Wed, 12/03/2014 - 20:26 नवीन
{ मस्तं रे बॅटेशा, पण पीठावर का बरे लोळतोस? - ताईसाहेब फुरसुंगीकर }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही ही ही

बॅटमॅन
गुरुवार, 12/04/2014 - 11:28 नवीन
ही ही ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पोसॉयदॉन.

साती
Wed, 12/03/2014 - 16:00 नवीन
भारीच आहे हे न्यॉनेश्वरांचे पोसॉयदॉन.
  • Log in or register to post comments

येशा मला हसतो

सुनील
गुरुवार, 12/04/2014 - 10:40 नवीन
संस्कृतचे शिक्षक - अर्थ सांगा - एषा: मम हस्ता: विद्यार्थी - येशा मला हसतो. -- (सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी)
  • Log in or register to post comments

माझी लहान बहिण ७-८ वर्षाची

अद्द्या
Fri, 12/05/2014 - 12:57 नवीन
माझी लहान बहिण ७-८ वर्षाची असतानाचा किस्सा आहे . . माझा एक मामा वारला होता . तिसरा दिवस होता . . नेहमी दंगा करणारे आम्ही शांत पाने मोठे सांगतील ते करत होतो . . कारण हा मामा आमच्यात बसून दंगा करणार्यांपैकी होता . . तर . जवळच्याच देवळात ज्ञानेश्वरी पारायण चाललं होतं . आणि दुपारी जेवणाच्या आधी . ३-४ अभंग म्हणून तिथले बुवा शेवटी . . ज्ञानदेव तुकाराम . . चा जप करू लागले . . आणि तेव्हाच . हि लहान शी मुलगी जी आत्तापर्यंत एक शब्द न काढता गप्प जेवत होती . .एक्दम म्हणाली . . "दादा तुकारामाला ज्ञानदेव का म्हणतात हे लोक? त्यांना सगळं माहिती होतं म्हणून? "
  • Log in or register to post comments

हम्मम्

योगी९००
Mon, 12/08/2014 - 12:59 नवीन
वरील किस्सा चांगला आहे पण मध्येच मामा वारला होता वगैरे संदर्भ अनावश्यक वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

Vatican City

टिलू
Fri, 12/05/2014 - 15:28 नवीन
एका पुस्तकात असेच पु.ल. लोकांना गंडवत असतात - इटली हा मूळ 'विठ्ठली' देश होता आणि 'विठूकान्ह' वरुन Vatican City बनले आहे !!
  • Log in or register to post comments

कॅस्पियन = काश्यपियन, रशिया =

अनुप ढेरे
Fri, 12/05/2014 - 15:41 नवीन
कॅस्पियन = काश्यपियन, रशिया = ऋषिय्य आणि ख्रिस्त = कृष्ण असही सांगताना लोकांना ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments

शाळेत असताना एकदा सरांनी

राजाभाउ
Fri, 12/05/2014 - 16:32 नवीन
शाळेत असताना एकदा सरांनी एकाच्या पेपर मधुन उत्तर वाचुन दाखवले होते. असा त्याचा जाहीर पंचनामा करणे क्रुरच होत पण तेन्व्हा तसे काही वाटले नव्ह्ते, तर प्रश्न असा होता कि "दोलकाचा दोलनकाल हा लांबीवर अवलंबुन असतो हे सिद्ध करा" त्या वर उत्तर हे होते दोलक हि एक द्विबिजपत्री वनस्पति आहे, तिला सुचिपर्णि व्रुक्षा सारखि पाने असतात व तीला हात लावला तर पाने टोचतात. त्याचे खोड जाड असते. त्यावर हत्याने घाव घातले असता त्याल जखमा होतात. त्यावर आयोडीन लावले असता जखमा भरुन येतात. आयोडीन हा एक संप्लवनशील पदार्थ आहे म्हणुन दोलकाचा दोलनकाल हा लांबीवर अवलंबुन असतो
  • Log in or register to post comments

(No subject)

शलभ
Mon, 12/08/2014 - 20:16 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

शाळेत असताना परिक्षेत "होमी

चुकलामाकला
Fri, 12/05/2014 - 19:20 नवीन
शाळेत असताना परिक्षेत "होमी भाभा" वर टिप लिहायची होती. कुणीतरी लिहिले," होमी भाभा डबक्यात रहातो. त्याच्यामुळे पोट बिघडते. त्याचा आकार सतत बदलतो. तो एकपेशीय प्राणी आहे." बिचार्याने होमी भाभा" आणि अमिबा यात गफलत केली होती.:):)
  • Log in or register to post comments

+१

राघवेंद्र
Fri, 12/05/2014 - 21:37 नवीन
एकदम मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा