✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पोसायडन चा किस्सा

स
संचित यांनी
Sun, 11/30/2014 - 00:30  ·  लेख
लेख
पोसायडन गोष्ट तशी ८ वर्षापुर्वीची. मी B.E. II year मध्ये होतो. माझा मित्र विजय , शेंडी लावण्यात तरबेज. डोक्यानी थोडे मंद असे २-४ लोक शोधायचे आणि त्यांची मजा घ्यायची, त्याचा हा नेहमीचा टाईमपास. डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या सुनामीत अडकलेल्या एका जहाजेवर २००६ साली पोसायडन नावाचा सिनेमा आला होता. विजय आणि इतर काही मित्र सोबत रात्री ६-९ चा शो पाहून आलो. होस्टेल च्या खिडकीतून माझ्या रूम वरून मी बघितले तर विजय ४-५ मित्रांना सोबत घेऊन काही सांगत होता. मागे याच चौघांना मी विजयला चक्क "आर्नोल्ड श्वार्झनेगर हा रोबोटिक्स मध्ये मोठे शोध लावणारा न्यूरोसर्जन आहे" आणि "याहू हि कंपनी भारताच्या मालकीची असून ती शम्मी कपूर चा पुतण्या चालवतो" असल्या थापा मारताना ऐकले होते. विजय मित्रांसमोर सिनेमाची स्टोरी सांगत होता "भारतीय तत्वज्ञानावर या पेक्षा कठीण पाश्चात्य चित्रपट शोधून सापडणार नाही. एका जहाजात जहाजातून प्रवास करत असताना मोठी सुनामी येऊन त्यांची जहाज उलटते. आता भर रात्री समुद्रात आधीच लाटा वेगात असताना जहाज अचानक उलटली तर सर्वांचे मरण निश्चित होते. परंतु अनेक भाषांचा जाणकार असलेल्या सिनेमाच्या हिरोला अत्यंत विलक्षण संयोगाने ज्ञानेश्वरांचे बंगाली भाषेतील पसायदान हाती पडते. पोसायडन हा त्याचा बंगाली अपभ्रंश. हिरो हा इतिहासाचा अभ्यास्कर्ता असल्याने त्याच्या ते लगेच लक्षात येते. आता या बुडत्या जहाजातून वाचण्याचा काही उपाय नाही, तेव्हा पाश्चात्य गोष्टींचा क्षणभंगुरपणा लक्षात घेऊन परमेश्वराला सिनेमाचा नायक शरण जातो, आणि पसायदान वाचणे सुरु करतो. पसयादानाशी एकरूप झालेला हिरो हा प्रत्येक ओळ स्वत: वाचत जहाजावरील सर्व लोकांना अर्थ समजावून देत असतो. जहाजावर असलेल्या सर्वांवर आता कमरेपर्यंत आलेले पाणी आता मरणाच्या दाढेत ढकलत असते. आता आयुष्याचे मोजके क्षण राहिले असे वाटत असतानाच, या पसायदानाच्या शेवटी तुकारामांचे काही अभंग येतात..... आणि अचानक चमत्कार ... ज्याप्रमाणे तुकारामांचे अभंग बुडत्या इंद्रयाणीतून परत आले, त्याचप्रमाणे या बंगाली पोसायडनाच्या कृपेने बुडती जहाज आपोआप पाण्यावर येते." इंग्रजी चित्रपटाच्या कधीही मागे न जाणारे ते माझे भोळे मित्र, आपण परत मूर्ख तर नाही बनवल्या जात आहो या शंकेने माझ्या कडे पहात होते. मी हासू न थांबवता आल्याने होस्टेलच्या रूम मध्ये धावत पळालो. टीप: माझा misalpav वरील पहिलाच लेख असून, लेखनात काही चूक झाली असल्यास क्षमस्व.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
कथा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
41255 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

मिसळ्पाववर स्वागत !!

खटपट्या
Sun, 11/30/2014 - 00:37 नवीन
मिसळ्पाववर स्वागत !! काहीच चूक झालेली नाही. भन्नाट कीस्सा !!
  • Log in or register to post comments

येवू दे अजून किस्से...

मुक्त विहारि
Sun, 11/30/2014 - 02:13 नवीन
आवडला हा पण किस्सा..
  • Log in or register to post comments

भन्नाट आहे

श्रीरंग_जोशी
Sun, 11/30/2014 - 07:34 नवीन
भन्नाट आहे हा किस्सा.
  • Log in or register to post comments

भन्नाट...येऊ द्या अजुन असे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/30/2014 - 07:38 नवीन
भन्नाट...येऊ द्या अजुन असे किस्से. बाकी बंगाली पोसायदान =))
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा..

स्वप्नज
Sun, 11/30/2014 - 07:55 नवीन
मस्तय किस्सा. पसायदान-पोसायदान..तुमचा मित्र हुशार आहे.. येऊ देत अजून किस्से
  • Log in or register to post comments

भन्नाट किस्सा...

जेपी
Sun, 11/30/2014 - 07:56 नवीन
भन्नाट किस्सा...
  • Log in or register to post comments

किस्सा आवडला

बहुगुणी
Sun, 11/30/2014 - 09:55 नवीन
थोडासा अवांतर तपशीलातला खुलासा: हा चित्रपट मूळच्या The Poseidon Adventure या १९६९ सालच्या कादंबरीवर आधारित आतापर्यंतच्या चित्रपटांपैकी ४था चित्रपट. यातला १९७२ चा The Poseidon Adventure हा disaster films या प्रकारातला एक नावाजलेला सिनेमा. थरारक चित्रपटांची आवड असलेल्यांनी (Tora! Tora! Tora!, Airport, Earthquake आणि Towering Inferno या त्याच दशकातील इतर चित्रपटांच्या पठडीतला)हा चित्रपट जरूर पहावा.
  • Log in or register to post comments

नक्की

संचित
Sun, 11/30/2014 - 10:03 नवीन
मी बघतो आणि माझ्या मित्रालाही पाहायला सांगतो. बघूया त्यावरही काही किस्सा बनला तर..... *pardon* *PARDON* =]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

धन्यवाद

संचित
Sun, 11/30/2014 - 10:07 नवीन
प्रतिक्रीयान्बद्दल धन्यवाद. मूवी, जेपी आपले लेख\प्रतिक्रिया नियमित वाचतो. इथे आपल्या प्रतिक्रिया पाहून छान वाटले.
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
Sun, 11/30/2014 - 10:57 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

बंगालीचा अभ्यास झाला

शरद
Sun, 11/30/2014 - 12:13 नवीन
मस्त. आता बंगालीसारखाच इतर भाषांतील किस्से यावेत. शरद
  • Log in or register to post comments

वामन शेषप्पा अय्यर आणि अम्मा हट्टंगडी

बोका-ए-आझम
Sun, 11/30/2014 - 12:24 नवीन
मस्त किस्सा! अशीच आमच्या प्रोफेसरांनी जयहिंद काॅलेजमधल्या फाडफाड इंग्लिश आणि धाडधाड अज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची मापं काढली होती. त्यांनी सांगितलं की विल्यम शेक्सपिअर हा खरा तामिळ ब्राम्हण. त्याचं खरं नाव वामन शेषप्पा अय्यर आणि त्याची बायको मूळची अम्मा हट्टंगडी. ती तिकडे जाऊन अॅन हॅथवे झाली. त्यांनी सांगितलेला अजून एक भन्नाट किस्सा म्हणजे वेस्ट इंडीजचा विकेटकीपर डेरेक मरे निवृत्त झाला आणि त्याच्या ठिकाणी जेफ दुजाँ आला. हे रामदासस्वामींनी ३०० वर्षे आधी लिहून ठेवलं आहे दासबोधात - मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

संचित
Sun, 11/30/2014 - 12:58 नवीन
डेरेक मरे आणि शेक्सपियर दोन्ही मस्त... अशीच एक अजून थाप: इंग्लंड चे राजपरीवार हे मुळात भारतीय आहे, म्हणून तर ते कुळ पाहून लग्न करतात, त्या सर्वांचा एकच family business असतो, आणि त्यांचे arrange marriage होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

(No subject)

टवाळ कार्टा
Sun, 11/30/2014 - 13:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मरे आणि दुजाँ चा किस्सा कहर

बॅटमॅन
Mon, 12/01/2014 - 18:07 नवीन
मरे आणि दुजाँ चा किस्सा कहर खतरनाक आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अजून एक भन्नाट किस्सा म्हणजे

बोका-ए-आझम
Sun, 11/30/2014 - 13:07 नवीन
अजून एक भन्नाट किस्सा म्हणजे महाभारतातील अर्जुनाचा वाढदिवस ४ जूनला असतो कारण भगवद्गीतेत स्वत: श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलेले आहे - बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!
  • Log in or register to post comments

@व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/30/2014 - 14:11 नवीन
@व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!>>> =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अशाच टाईपचा पुत्रकामेष्टि

सूड
Mon, 12/01/2014 - 00:46 नवीन
अशाच टाईपचा पुत्रकामेष्टि पूर्वी का करत असत त्याचा संदर्भ सांगणारा एक जोक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सांगा की मग

प्रसाद गोडबोले
Wed, 12/03/2014 - 13:52 नवीन
सांगा की मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा हा...

योगी९००
Mon, 12/01/2014 - 10:39 नवीन
हा हा हा... भन्नाट किस्सा....पसायदान .....!!! बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!..!! यावर वि.आ बुवांनी आवाज मासिकात (गंमत म्हणून) अशी टिप्पणी केली होती.. क्रुष्ण अर्जूनाला म्हणतो " बहूनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!..!!" = म्हणजे मी खुप मे महिने पाहीले आहेत आणि तुझा जन्म चार जुनचा असल्याने तुझ्या जन्मवर्षातला मे महिनाही तुझ्या नशिबी आला नाही. वि.आ.बुवांनी त्याच आवाज मासिकात "असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय" चा अर्थ असा गंमतीशीर लावला होता.. " माझी आई घरात आहे. तुझी आई ज्योतीकडे गेली. मृतात्म्यांची आई अमृत प्यायला गेली.." @बोका-ए-आझम : शेक्सपियर आणि दुजा-मरे मस्तच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अगायायायायायायायायायायाया =)

बॅटमॅन
Sun, 11/30/2014 - 14:31 नवीन
अगायायायायायायायायायायाया =)) =)) =)) =)) अतीव आनंद झाला हा किस्सा वाचून. =))
  • Log in or register to post comments

शेंडी लावू !!!

स्पंदना
Sun, 11/30/2014 - 15:21 नवीन
शेंडी लावू !!! आयला खरच!! दुनिया झुकती है!! झुकानेवाला चाहिये!!
  • Log in or register to post comments

लय भारी किस्सा !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/30/2014 - 17:39 नवीन
लय भारी किस्सा ! *ok* मिपावर स्वागत. असेच लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

रोफ्ल भन्नाट सीन

स्पा
Sun, 11/30/2014 - 19:31 नवीन
रोफ्ल भन्नाट सीन =))
  • Log in or register to post comments

यु गॉट मी देअर .

Targat Porga
Mon, 12/01/2014 - 00:01 नवीन
शम्मी कपूर चा पुतण्या .. :-D
  • Log in or register to post comments

किस्सा

नाखु
Mon, 12/01/2014 - 08:47 नवीन
मजेदार आणि उस्फुर्त प्रतीसाद फुलांनी रांगोळी छान सजली आहे. तमसो$मा ज्योतीर्गमयः = तुझी आई ज्योतीबाला जाते. विद्वान स्रवत्र पूज्यते = विद्वानांची किंमत जगात शून्य (मराठी पूज्य) आहे
  • Log in or register to post comments

ओ ते असं पण आहे एक

इरसाल
Wed, 12/03/2014 - 16:24 नवीन
तमसो$मा ज्योतीर्गमयः = तु झोप आई मी ज्योतीकडे जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हाहाहाहाहा

झकासराव
Mon, 12/01/2014 - 10:58 नवीन
हाहाहाहाहा :)
  • Log in or register to post comments

लै भारी..

चिगो
Mon, 12/01/2014 - 11:30 नवीन
भन्नाट किस्सा.. प्रतिसादात आलेले इतर किस्सेपण जबराट..
  • Log in or register to post comments

(No subject)

अजया
Mon, 12/01/2014 - 11:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments

'पसायदान' चं 'पोसायडान'!!

आतिवास
Mon, 12/01/2014 - 11:54 नवीन
:-) 'पसायदान' चं 'पोसायडान'!!
  • Log in or register to post comments

आत्मा म्हणजे अ‍ॅटम.

विजुभाऊ
Mon, 12/01/2014 - 13:45 नवीन
आत्मा म्हणजे अ‍ॅटम. आत्म्याचा नियमः आत्मा नष्ट होत नाही. तो निर्माण करता येत नाही. मात्र एका रूपातून तो दुसर्‍या रुपात जन्म घेत असतो उर्जेच्या अविनाषत्वाचा नियम :उर्जा नष्ट होत नाही ती निर्माण करता येत नाही एका प्रकारच्या उर्जेचे रुपांतर दुसर्‍या प्रकारच्या उर्जेत होते.
  • Log in or register to post comments

लय भारी रे

प्रसाद गोडबोले
Mon, 12/01/2014 - 17:49 नवीन
हसुन हसुन पुरेवाट झाली =)))) संच्या , स्वागत रे मिपावर ! अजुन एका "पात्रं" आलं मिपावर ह्याचा लॉय ऑनंदो झॉला :)) :)
  • Log in or register to post comments

मराठि शाळा ईयत्ता २ री तुकडि अ

पहाटवारा
Tue, 12/02/2014 - 02:32 नवीन
मस्त किस्सा .. यावरुन अस्मादिकांचा मराठि शाळा ईयत्ता २ री तुकडि अ मधला अभीनव शोध आठवला. शाळेत 'अती तेथे माती' चा अर्थ विचारल्यावर - 'जमीनीमधे जितके जास्त खणत जावे, तितकी मातीच माती मिळते' असा लावला होता :) अवांतर : हा किस्सा माहितगारांच्या म्हणींच्या धाग्यावर द्ययचा होता ..पण त्यांच्या धमकीमूळे देता आला नाहि. -पहाटवारा
  • Log in or register to post comments

इंग्लिश राजघराणे हे भारतीय

निनाद मुक्काम …
Tue, 12/02/2014 - 04:50 नवीन
इंग्लिश राजघराणे हे भारतीय आहेत हा विनोद येथे उत्पन्न झाला , बाकी असे किस्से भन्नाट असतात.
  • Log in or register to post comments

बोरीक अ‍ॅसिड आंबट बोरांपासुन

आनन्दिता
Tue, 12/02/2014 - 20:30 नवीन
बोरीक अ‍ॅसिड आंबट बोरांपासुन बनवलेलं असतं!
  • Log in or register to post comments

लिओनार्डोची वंशज

बोका-ए-आझम
Tue, 12/02/2014 - 20:45 नवीन
हा एक प्रत्यक्षात घडलेला किस्सा! आमची एक हुशार विद्यार्थिनी आहे जान्हवी विंची नावाची. तिच्याबद्दल असा गैरसमज कोणीतरी पसरवला होता की ती लिओनार्डो दा विंचीची खापर खापर खापर खापर पणती आहे आणि भारतात आल्यावर त्यांनी आपलं आडनाव बदलून विंची केलं. लोकांनी त्या बिचारीला हैराण करुन सोडलं!
  • Log in or register to post comments

विंची =))

बॅटमॅन
Tue, 12/02/2014 - 23:57 नवीन
विंची =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

दा विंची कोड

योगी९००
Wed, 12/03/2014 - 12:01 नवीन
"दा विंची कोड" हा चित्रपट पंजाबमध्ये सुरुवातीला बिलकूल चालला नाही. पण एका कल्पक थेटरवाल्याने चित्रपटाचे नाव "विंची दा कोड" असे केले आणि त्याच्या थेटरवर चित्रपट पहायला तोबा गर्दी झाली असे ऐकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 12/03/2014 - 13:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

(No subject)

बॅटमॅन
Wed, 12/03/2014 - 13:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

ROFL!

बोका-ए-आझम
Wed, 12/03/2014 - 15:19 नवीन
ROFL! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/03/2014 - 17:47 नवीन
काहीही... ही...ही...ही... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

बोक्या कहर किस्से

अजया
Wed, 12/03/2014 - 13:56 नवीन
बोक्या =)) कहर किस्से =))
  • Log in or register to post comments

मी B.E. II year मध्ये होतो.

प्रसाद१९७१
Wed, 12/03/2014 - 15:28 नवीन
मी B.E. II year मध्ये होतो. माझा मित्र विजय , शेंडी लावण्यात तरबेज. डोक्यानी थोडे मंद असे २-४ लोक शोधायचे आणि त्यांची मजा घ्यायची
अवांतर - तुम्ही वर जी २ उदाहरणे दिली आहेत(याहू आणि अर्नॉल्ड्ची ), ती वाचुन हे डोक्यानी मंद लोक भावी इंजिनीयर आहेत हे वाचून भारताची प्रचंड काळजी वाटू लागली.
  • Log in or register to post comments

वरील प्रतिसाद वाचून एक मिपाकर

बॅटमॅन
Wed, 12/03/2014 - 15:42 नवीन
वरील प्रतिसाद वाचून एक मिपाकर म्हणून रोफलल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

काही कळले नाही. रोफलल्या

प्रसाद१९७१
Wed, 12/03/2014 - 16:01 नवीन
काही कळले नाही. रोफलल्या म्हणजे काय? का हे माहीती नसणे माझ्या मंद बुद्धीचे लक्षण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

र्‍ऑफ्ळ

टवाळ कार्टा
Wed, 12/03/2014 - 16:06 नवीन
र्‍ऑफ्ळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

रोफ्ल

टवाळ कार्टा
Wed, 12/03/2014 - 16:06 नवीन
रोफ्ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लोळ !!

खटपट्या
गुरुवार, 12/04/2014 - 08:53 नवीन
लोळ !! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा