Skip to main content

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 04/12/2014 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता. पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे. श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व. आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा? किती वाजता करायचा? खायला-प्यायला काय आणायचे? इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच. तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो. (तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

वाचने 71089
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

अरे बाबा... पुण्यामध्ये चक्क थाळी दिल्या गेली.अज्जून काय हवे? आणि पुण्यात साध्या अर्ध्या घोट चहाला पण "अम्रुततुल्य" असे म्हणतात. त्यामुळे बाहेर गावचे मिपाकर आले की अम्रुततुल्य आणि परदेशातले मिपाकर आले की, थाळी, असा नियमच आहे मुळी. म्ह्णजे बघा, पैसा ताईंना चहा आणि प्रभाकर दादांना थाळी. परग्रहवासीय आले की , थाळी आणि पर्वती, असा जंगी बेत आखतात, असे मागच्या वर्षीच्या "मंगळवारीत" समजले. दुसर्‍या आकाशगंगेतून कुणी आलेच तर, पार हडपसर ते लोणावळा आणि कात्रज ते कोथरूड असे रिक्षाने फिरवतात. (आजकाल आमच्या कळफलकातून "पुणे" असे वाचले की, आपोआप अक्षरे टाइप व्हायला लागतात.अर्थात पुणेकरांना आजकाल ह्या गोष्टीची सवय झाल्याने, ते मनावर घेणार नाहीत,ह्याची १००% खात्री आहे.आता खूद्द आमचाच मुलगा पुण्याला शिकायला असल्याने, तसे आम्ही पण पुणेकरच आहोत.)

In reply to by मुक्त विहारि

त्यामुळे बाहेर गावचे मिपाकर आले की अम्रुततुल्य आणि परदेशातले मिपाकर आले की, थाळी, असा नियमच आहे मुळी.
घोर पक्षपात..

In reply to by खटपट्या

तुम्ही आलात की एक दिवस आपण पुण्याला जावू आणि थाळी हादडू... हाकानाका....

कट्टा छान जमला. वृत्तांतदेखील देखणा आणि फोटोदेखील देखणे. माझा हुकला पण काही महत्वाचे कारण असल्याने यायला जमले नाही. पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत आहे. जेवण फर्मासच दिसते आहे. मथुराचे जेवण खाऊन कित्येक वर्षे लोटली. असो.

झकास व्रुतांत...!! बाकी सर्वच कट्ट्यांना सुडराव उपस्थित असतात हे पाहून आश्चर्य वाटले.

In reply to by योगी९००

बाकी सर्वच कट्ट्यांना सुडराव उपस्थित असतात हे पाहून आश्चर्य वाटले.
तीव्र सहमती ;)

खुप छान कट्टा पण वृत्तांत /फटु अजुन पाहिजेत. रचक्याने:- पुणेरी हाटेलात कांदा कापुन मिळत नाही का? (आता "मुंबई पुणे" चित्रपटातील स्वपनील जोशीच्या स्टाईल मध्ये म्हणा "आमच्या पुण्यात हे असंच असतं.)

In reply to by प्रमोद देर्देकर

कांदा कापायचे वेगळे पैसे लावत असतील...भरोसा नाही कशाचा ;)

In reply to by प्रमोद देर्देकर

आपण कधी स्वयंपाकघरात किंवा मंडईत गेलात तर तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून सांगतो; पानात वाढलेली कांद्याची पात आहे, कांदा नव्हे!!

In reply to by दिपक.कुवेत

बुवांना दिलेल्या शुभेच्छांसाठी माझ्याकडून आपल्याला सुजाता मस्तानी (पेय)लागू हे जाहीर करण्यास मंडळाला आनंद होत आहे!!!!

जाऊ दे त्यांचा त्यांचाच झालेला दिसतोय कट्टा...

In reply to by आशु जोग

अहो मालक, तुम्ही ज्या धाग्यावर प्रतिसाद दिला आहे तो कट्ट्याचा जाहीर धागा आहे. तुमच्या घरी येऊन कटट्याचं आमंत्रण द्यायला हवं असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमचा पत्ता देऊन ठेवा. पुढच्या कटटयाचं आमंत्रण तुमच्या घरी येऊन देऊ.