Skip to main content

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 04/12/2014 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता. पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे. श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व. आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा? किती वाजता करायचा? खायला-प्यायला काय आणायचे? इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच. तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो. (तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

वाचने 71031
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

कट्ट्याला शुभेच्छा. (दुचाकीवाल्यांनो - हेल्मेट घालून जारे बाबांनो.)

कोथरूड ठरवा ठिकाण इकडे लई लोकं हायती

मी उपस्थिती लावलेला कट्टा शनिवारवाड्यात झाला होता. पुणे महानगराच्या विविध कोपर्‍यांतून व शेजारच्या गावांतून कट्टेकरी आले होते. सोयीचे ठिकाण म्हणून शनिवारवाडा चांगला पर्याय आहे.

मी आहे . स्थान/ वेल कलवावे. पेठकर याना भेटण्याची तीव्र इच्छा आहे, श्री मु वि याना भ्रमन ध्वनी व्य नि केला आहे

In reply to by मुक्त विहारि

धागा तूच काढलास ना रे विहार्या? सौदीत अडक्लास म्हणजे ? सांग त्या शेखला-कट्टा आहे, जावेच लागेल!

अरेच्चा..... पेठकरकाका कधी आलात इकडे?

५ आणि ६ काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य होणार नाही. :-( पण कट्ट्याला शुभेच्छा! :-) पुढच्या कट्ट्याला अवश्य हजेरी लावणार...

नेहमी सगळे कट्टे पुण्यातच का? बंगलोर ला कुणी मिपाकर आहेत का? इकडे पण करा न एखादा कट्टा.

पेठकर साहेब वेळ आणि जागा तुम्हीच नक्की करा. कारण वेळ कमी आहे. दुपारी एक ते पाच सोडून इतर वेळ असल्यास दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी येऊ शकेन.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आत्ताच अर्ध्या तासापूर्वी पुण्यात आगमन झाले आहे. (थोर राजकारण्यांप्रमाणे....आत्ताच आगमन झाले आहे वगैरे वगैरे). उद्या (शनिवार, दिनांक ६) माझ्यासाठी सोयीचे आहे. कट्टा माझ्याच घरी व्हावा. जास्तीत जास्त सद्स्यांनी हजेरी लावावी. सहकुटुंबही यावे ही आग्रहाची विनंती. माझे कुटुंब आहेच. माझा भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०५८३००५. संध्याकाळ पर्यंत इथेच ह्या धाग्यावर प्रत्येकाने आपली उपस्थिती कळविली तर जेवणाची व्यवस्था करायला मला सोपे जाईल. उद्या दत्तजयंती आहे व्हेज - नॉन व्हेज कळावावे. माझा कुठलाही उपास नसतो. अवश्य येणे करावे ही आग्रहाची विनंती.

In reply to by हाडक्या

नाही!!! कोपराने खणणारी माणसं *&^%$# असतात. मी आपलं डायरेक विचारतोय. "यज्ञकर्म"ला जायला जमलं नाही, निदान काकांच्या घरी तरी जेवू म्हटलं :)

चेन्नई ला कोणी मिपाकर आहेत का ? असल्यास मिपाचा चेन्नई कटटा करता येइल .

In reply to by प्रसाद भागवत १९८७

प्रभाकर काका स्थळ कळवा ना पुण्यात काका... हा व्यवसाय कधीपासून.... जर्रा अगोदर कळ्ळं अस्तं ना तर मी सुद्धा माझ्यासाठी स्थळासाठी विचारणा केली असती.

ओळख होईल आणि मिपा वरील हरहुन्नरी, विद्वान व्यक्तिमत्वे प्रत्यक्ष पहाता येतील.

मी येनार आहे. पण कुठे आणि किती वाजता ते निश्चित करा.

संभाजी पार्क आणि राजधानी (व्यनितून सुचविल्याप्रमाणे) मला सोयीचे आहे. वेळ संध्याकाळी ५.३० सुद्धा चांगली आहे. सतिश गावडे आणि मुवी अंतिम शिक्कामोर्तब करतीलच.

कट्टा जोरदार होउ द्या. मी कलकत्त्यात आहे, उद्या रात्री परतणार त्यामुळे कट्टा हुकणार. यावेळी योग नाही, पुन्हा कधीतरी साक्षी

केव्हा: उदया (शनिवारी) किती वाजता: संध्याकाळी साडे पाच वाजता ठिकाण: संभाजी पार्क (पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व नाटयगृहाच्या बाजूची बाग) स्नेहभोजनाचे ठिकाण: राजधानी (सध्या तरी. प्रत्यक्ष गप्पांमध्ये पुनर्विचार होऊ शकतो.) ओळख: पुर्व-ओळख आवश्यक नाही. कट्टयाला हजेरी लावल्यानंतर मिपाकरांशी ओळखी होतील. होणारा खर्च: तुझा तू माझा मी संपर्क: सतिश गावडे किंवा वल्ली यांना व्यनि करावा. आगंतुक उपस्थिती: चालेल. ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. *येताना काही खादयपदार्थ आणल्यास हरकत नाही. मात्र त्यासाठीचे पैसे मिळणार नाहीत. खादयपदार्थ स्वखर्चाने आणावेत. **कुटुंबातील इतरांना कट्ट्याला घेऊन येण्यास हरकत नाही. मिपाकर इतर मिपाकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना "एक्स्ट्रा एक्स्टेंडेड फॅमिली" समजतात. ***काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास सतिश गावडे किंवा वल्ली यांना व्यनि करावा.

In reply to by सतिश गावडे

चापान्याची यवस्था नीट करा. नायतर गेल्या येळंसारखं करताल आनी मंग पैसाताय वर्षभर टोमणा मारीत बसल.

In reply to by खटपट्या

पैसातायच्या नुकत्याच झालेल्या पुने वारीत जंगली म्हाराज रोडवरंच (म्हनजे जंगली म्हाराज रोडवरच्या हाटेलात, रोडवर नाय) च्याय पाजन्यात आलेली हाये. आमच्याकडे फोटो हायेत. त्यामुले पैसाताय आता काय बोलूच शकत नाय. *lol*

In reply to by सतिश गावडे

पैसातायच्या नुकत्याच झालेल्या पुने वारीत जंगली म्हाराज रोडवरंच (म्हनजे जंगली म्हाराज रोडवरच्या हाटेलात, रोडवर नाय) च्याय पाजन्यात आलेली हाये. आमच्याकडे फोटो हायेत. त्यामुले पैसाताय आता काय बोलूच शकत नाय. Lol
काय ग्यारंटी नाय. तरीबी पुन्याला नावं ठिवायला त्या कमी कर्नार नाय. तवा फोटु टाका इथं. पुडंमागं आमच्यावर हल्ला झाल्यास या फोटुंची ढाल करता यील.

In reply to by एस

पुणेकरांना नवे ठेवणे हा इतर पुणेकरांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.(त्यात आम्ही पण आलोच.) उलट आमच्या अशा नावे ठेवण्याने, पुणेकरांची सहनशक्ती वाढतच असणार.(थिंक पॉझीटीव्ह.)

In reply to by एस

फोटोचा पुरावा ठेवल्यामुळेच सध्या तोंड बंद ठेवावे लागत आहे. तरी पुणेकर आहेत. पुन्हा संधी देतीलच बोलायची!

In reply to by पैसा

तुमच्या आगामी एका तरी पुणे वारीत आपण चहा घेऊ असे आश्वासन देत आहे. ("तुम्ही बसा हं, मी आलोच चहा घेऊन!" - टाईप) ;-) (हे कळाले तर तुम्ही एकतर खरे पुणेकर तरी आहात किंवा पुणेकरांचे आदरातिथ्य एकदातरी अनुभवलेले आहात.)

In reply to by एस

पुणेरी आदरातिथ्य चांगलेच माहिती आहे हो! मात्र एक गोष्ट कोणाच्या लक्षात आलेली दिसत नाही. पुण्याचा हा एवंगुणविशिष्ट स्वभाव म्हणजे आमच्या रत्नांग्रीच्या मधल्या आळीतून पाणी घालून पात्तळ करून पुण्याला निर्यात झालेला आहे. पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज आमच्या रत्नांग्रीचेच. तेव्हा, "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी" हे लक्षात असो द्यावे. कसें!!

In reply to by पैसा

पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज आमच्या रत्नांग्रीचेच.
साफ चूक. पेठा शिवकाळापासून आहेत. रत्नांग्रीवाले पेशवाईत आले. पुणेकर नसलो तरी इतिहासातल्या चुका खपत नाहीत. :D

In reply to by बॅटमॅन

अरेच्चा. तरीच बुवा नेहमी "आमच्या अमुक पेठेत आमच्या तमुक पेठेत" म्हणतात. आदय पेशवे बुवांच्या आजोळचे. *lol*

In reply to by बॅटमॅन

मी शन्वारवाड्याबद्दल एकही शब्द बोललेला नाहीये. तसंच रत्नांग्रीकर शिवकाळात पुण्याला गेले की पेशवाईत याबद्दलही काहीही बोललेलं नाहीये. तेव्हा तुमचे चूक बरोबर तुमच्याकडेच ठेवा! श्रीवर्धनातले घराणे सगळ्या पेठांत रहात असले तर तुम्हालाच माहिती!

In reply to by पैसा

सर्वच पेठीय पुणेकर हे मूळचे रत्नांग्रीकर असे घाऊक विधान आपणच केलेत की ओ. तस्मात तुमची चूक पदरात घ्या, तिलाही आपलं म्हणा.

In reply to by बॅटमॅन

मी शन्वारवाडा आणि भट याबद्दल काय बोल्ले का? पेठेतल्या एवंगुणविशिष्ट लोकांबद्दल बोल्ले. श्रीवर्धनची भट मंडळी पण हा स्वभाव राखून होती असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय?

In reply to by पैसा

शन्वारवाडा अन भट यांबद्दल मीही बोलतच नाहीये. श्रीवर्धनाचा उल्लेख पेठेतल्या एवंगुणविशिष्ट लोकांच्या आगमनाची नांदी म्हणूनच आला होता फक्त. तदुपरि त्या स्टेरिओटैपचे पूर्वज तिकडे होते/आहेत हे मान्यच आहे. फक्त तो घाऊकपणास आक्षेप होता. बाकी चालू द्या. (किंचित ओशीडीप्रेमी) बॅटमॅन.

In reply to by पैसा

आम्ही तरी शनिवारवाडा आणि भट यापैकी काहीतरी बोललो का? आम्ही फ़क्त पुण्याचं मूळचं पाणी श्रीवर्धनी इतकंच बोललो. :P

In reply to by प्रचेतस

त्यापेक्षा अगोदर बघावयाचे जाहले तर पुणक विषयाचे पाणी बदामीस, तर त्याहीपेक्षा अगोदर पहावयाचे जाहल्यास प्रतिष्ठानपुरी जावोन पोचते. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

आफ्रिकेतही इथिओपियाच्या आसपास जाऊन पोहोचते असे वाचल्याचे स्मरते. (च्यायला म्हणजे आपण सगळे हबश्यांचे वंशज का काय?)

In reply to by तिमा

चर्चा भरकटायला लागली = > प्रतिसाद उजवीकडे जातात की प्रतिसाद उजवीकडे जातात = > चर्चा भरकटायला लागली ह्या दोहों पैकी कोणती कॉज -इफ्फेक्ट रीलेशनशीप बरोबर आहे हे अद्याप अभ्यासले गेले नाहीये ... :D तदुपरी कॉलिंग संपादक्स ....