Skip to main content

Saint आधी की संत आधी?

लेखक चिगो यांनी बुधवार, 19/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. आजच इथं शिलाँगात एका सेंट पिटर्स नावाच्या शाळेत गेलो आणि डोक्यात सहज एक किडा वळवळला.. संत आणि Saint ह्यातील कुठला शब्द आधी आला? एक शब्द दुसर्‍यावरुन उचलला किंवा रचला आहे का? असल्यास कुठला? मला नेहमीच दोन भिन्न भाषांतील समानार्थी शब्दसाधर्म्याचे कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळेच जेव्हा अहोमियात आई, भात, खेदणे इत्यादी शब्द मराठी शब्दांसारखेच अर्थ असलेले आहेत हे कळलं, तेव्हा त्या भाषेशी सख्य वाढले. "नमस्ते लंडन"मध्ये जेव्हा अक्षयकुमार कोण्या इंग्रजाला मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट्री हे शब्द कसे बनलेत हे ठासून सांगतो, तो प्रसंग मला आवडतो. (भुरभुरत्या केसांच्या, आंग्लाळलेली हिंदी बोलणार्‍या कट्रीनाचाही प्रसंग आवडण्यात लै मोठा वाटा आहे.. ;-) ) हे असले प्रसंग आमच्या उसवत्या देशप्रेमाला भाषाभिमानाची ठीगळं लावतात.. तर मुळ प्रश्न असा, की "सेंट" आणि "संत" ह्यातला कुठला शब्द आधी आला? माझ्यामते सेंट असावा, आणि त्यावरुन "संत" हा शब्द शिक्षणखात्याने उचलला असावा.. "संतपदाला पावते झाले" कींवा "संतपदाची प्राप्ती झाली" म्हणजे नेमके कुणी हे पद दिले? जनमानसाने का? हा प्रश्न विचारण्याचे कारण हे, "सेंट" ही पदवी/उपाधी कॅथलिक चर्च देते, त्याप्रमाणे "संत" पदवी देणारे कुठले धर्मगुरु किंवा राजे असल्याचा उल्लेख कुठे आहे का? म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का? मिपावर अनेक संतसाहीत्य तसेच इतिहासाचे जाणकार आहेत, त्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.. (अवांतर : "ह्या माहितीचे तुम्ही काय करणार" हा प्रश्न विचारणार्‍यांसाठी डिस्क्लेमर. हा प्रश्न "जिज्ञासाकंडूशमनार्थ" विचारला आहे.. ;-) )

वाचने 39111
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

इतरांना केवळ माहितीने गार करणारा तो माहितगार हा समास सार्थ ठरवलात बघा. (प्रेरणा: एका श्लोकात समोरच्याचा बोर्‍या वाजवणारा कवी म्ह. भास्करभट्ट बोरीकर- गाळीव इतिहास बाय पु.लं.)

In reply to by बॅटमॅन

इतरांना केवळ माहितीने गार करणारा तो माहितगार हा समास सार्थ ठरवलात बघा.
गार हा शब्द आईस एज मध्ये गोर पासून तयार झाला असावा म्हणून एस्कीमोही गेर शब्द वापरतात म्हणे माहितगेर चे मग गार गार माहितगार झाले असावे ! :)

In reply to by बॅटमॅन

सल्ला देऊन "गार" करणारा तो सल्लागार किंवा गार (पार फाफल्यावर) झाल्यावर सल्ला देणारा तो सल्लागार या धर्तीवर वरील शब्द्-उकल रोचक आणि स्प्रुहणीय आहे.

In reply to by माहितगार

आणि गोडईई त्यातल्या गो चा लोप झाला डेओ व डेई झाले. कुणा फिरंग्याला वाटले की एतद्देशीय लोक बोबडे बोलतात म्हणून डेई चं झालं, डेअरी! मेरा देश महान!

आता तुकारामाचं पुष्पक विमान यायचं बाकी आहे.परदेशियांनी "आम्ही तुमच्याकडूनच सर्व शिकलो"असं एकदा प्रमाणपत्र मोदींच्या हस्ते भारतात पोहोचवलं की धाग्याची इतिश्री. अजूनही मूढ जन सर्वाचा उगम पामिरच्या पठारावर झाला असं समजून आहेत बिच्चारे.एकदा मिपाकटट्यावर या म्हणजे शमज्यावून शांगू.

In reply to by कंजूस

हा जो बहुमोल प्रतिसाद आपण दिलाय, तो माझ्यासाठी आहे का? असल्यास, इतके ग्गोड गैरसमज नका ठेऊ हो इतरांच्या अज्ञानाबद्दल. उगाच शुगर-बिगर वाढायची तुमची..

शून्याच्या शोध माया (मेक्सिकोवाले) संस्कृतीत सुद्धा लागला होता. ते लोक बेस २० पद्धत वापरत. maya numerals शून्यासाठी शिंपल्याचं चित्र वापरत असत. एक ते एकोणीस आकडे टींब आणि रेषा वापरून दाखवत असत. मी जेव्हा फिरायला म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा जगातले जवळ जवळ सगळेच शोध माया संस्कृतीने लावल्याचा साक्षात्कार तिथल्या गाईडने करून दिला. :) थोडक्यात काय 'माझीच लाल' संकृती सगळीकडे सारखीच !

संस्कृत आणि इतर युरोपियन भाषांमधली समानता शास्त्रीय पध्द्तीने शोधण्याचे काम १७८६ मधे भाषाशास्त्री Sir William Jones नी सुरु केले होते.त्याच्या ही आधी १७६८ मधे फ्रेंचविद्वान व ख्रिस्तीधर्म प्रचारक Gaston-Laurent Coeurdoux नी ह्या भाषासमानते बद्दल French Academy कडे काही नोंदी नमुद केल्या होत्या.त्यच्याही मागे जऊन बघितले तर गोव्यातला ख्रिस्तीधर्म प्रचारक Thomas Stephens चे १५८३ मधले एक पत्र उपलब्ध आहे ज्यात त्यानी ह्या समानतांचा उल्लेख केलाय.ह्या सर्वाची परीणीती पुढे the theory of Indo-European linguistics मधे झाली. ज्यामधे प्रसिध्द जर्मन भाषाशास्त्री Franz Bopp नी १९व्या शतकात केलेला भाषांच्या व्याकरणाचा तुलनात्मक अभ्यास मैलाचा दगड मानला जातो.खाली काही समान शब्द दिलेत - Root Sanskrit Word | Median Word in Latin,Greek,Arabic | English Word Gau (meaning Cow) Bous (G) Cow Matr (meaning Mother) Mater (L) Mother Jan (meaning Generation) Genea (G) Gene Aksha (meaning Axis) Axon (G) Axis Navagatha Navigationem (L) Navigation (meaning Navigation) Sarpa (meaning Snake) Serpentem (L) Serpent Naas (means Nose) Nasus (L) Nose Anamika (means Anonymous) Anonymos (G) Anonymous Naama (means Name) Nomen (L) Name Manu (means First Human) ?? Man/Men/Human Ashta (meaning Eight) Octo (L) Eight Barbara (meaning Foreign) Barbaria (L) Barbarian Dhama (meaning House) Domus (L) Domicile Danta (meaning Teeth) Dentis (L) Dental Dwar (meaning Door) Doru Door Dasha (meaning Ten) Deca (G) Deca Madhyam (meaning Medium) Medium (L) Medium Kaal (meaning Time) Kalendae (L) Calendar Kri (meaning To Do) Creatus (L) Create Mishra (meaning Mix) Mixtus (L) Mix Ma (meaning Me/My) Me (L) Me Pithr (meaning Father) Pater (L) Father Bhrathr (meaning Brother) Phrater (G) Brother Loka (meaning Place) Locus (L) Locale Maha (meaning Great) Magnus (L) Mega Makshikaa (meaning Bee) Musca (L) (Meaning Fly) Mosquito Mrta (meaning Dead) Mortis (L) Murder Na (meaning No) Ne No Nakta (meaning Night) Nocturnalis (L) Nocturnal/Night Paad (meaning Foot) Pedis (L) Ped as in Pedestrial Pancha (meaning Five) Pente (G) Penta, Five Parah (meaning Remote) Pera (G) Far Patha (meaning Path) Pathes (G) Path Raja / Raya (meaning King) Regalis (L) Royal Sama (meaning Similar) Similis (L) Similar Sapta (meaning Seven) Septum (L) Seven Sharkara (meaning Sugar) Succarum Sugar/Sucrose Smi (meaning Smile) Smilen (L) Smile SthaH (meaning Situated) Stare (L) (meaning To Stand) Stay Svaad (meaning Tasty) Suavis (L) Sweet Tha (meaning That) Talis (L) That Tva (meaning Thee) Dih Thee Vachas (meaning Speech) Vocem (L) Voice Vahaami (meaning Carry) Vehere (meaning to Carry) (L) Vehicle Vama/Vamati (meaning Vomit) Vomere (L) Vomit Vastr (meaning Cloth) Vestire (L) Vest Yauvana (meaning Youth) Juvenilis (L) Juvenile Narangi (meaning Orange) Naranj Orange Pippali (meaning Pepper) Piperi (G) Pepper Chandana (meaning Sandalwood) Santalon (G) Sandalwood Chandra (meaning Moon) Candela (L) (meaning light/torch) Candle Chatur (meaning Four) Quartus (L) Quarter Nava (meaning New) Novus (L) Nova – New Kafa (meaning Mucus) Coughen Cough Mithya (meaning Lie) Mythos (G) Myth Thri (meaning Three) Treis (G) Three Mush (meaning Mouse) Mus (L) Mouse Maragadum (meaning Emerald) Smaragdus (L) Emerald Srgalah (meaning Jackal) Shagal (Persian) Jackal Man (meaning Mind) Mens (L) Mind Upalah (meaning Precious Stone) Opalus (L) Opal Vrihis (meaning Rice) Oriza (L) Rice Upalah (meaning Precious Stone) Opalus (L) Opal Barbar (meaning stammering) Barbaros (G) Barbarian Jaanu (meaning knee) Genu (L) Knee Sunu (meaning Offspring) Sunu (German) Son Ghas (meaning eat) Grasa (German) Grass Samiti (meaning Committee) committere (L) Committee Sama (meaning Same) Samaz (Proto Germanic) Same Lubh (meaning Desire) Lubo (Latin and Proto Germanic) Love Agni (meaning Fire) Ignis (L) Ignite Hrt (meaning Heart) Herto (Proto Germanic) Heart Yaana (meaning journey, wagon) Wagen (German) Van,Wagon Nara (meaning Nerve) Nervus (L) Nerve,Nervous Prati per (L) per Prati Shat (percent) per centum (L) percent हुश्श दमलो राव लिहुन! बॅटमॅन साहेब, वल्ली साहेब आम्हाला पण तुमच्यात घ्या की...इतिहास अम्हाला सुध्दा फार्फार आवडतो...

In reply to by पामर

सगळं रामायण लिहिलं पण नेमकं मुद्द्याचं विसरलो..संत व saint हे दोन शब्द व्युत्पती शास्त्रामधे (Etymology) मधे छद्म-आत्मीय (False cognates) मानले जातात. छद्म-आत्मीय शब्द म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषांमधील एक सारखे किंवा एकाच अर्थाचे पण वेगवेगळे उपत्ती केंद्र असलेले शब्द. saint हा शब्द लॅटीन Sancus ह्या प्राचिन रोमन देवतेच्या नावावरुन आलेला आहे असे मानतात. ह्याचा अर्थ पवित्र,इतरांपेक्षा वेगळा, देवाची सेवा करणारा असा आहे तर संत हा शब्द संस्कृत शब्द 'सत्'वरुन तयार झाला मानतात म्हणुन त्याचा अर्थ 'परमात्म्याची अनुभुती झालेला' असा होतो. जगातल्या वेगवेगळ्या संबंध नसलेल्या भाषांमधले हे छद्म-आत्मीय शब्द मानवाच्या समान विकसित झालेल्या मेंदु चा व त्यामुळे विकसित झालेल्या भाषिक कौशल्याचा परिणाम मानला जातो. ह्या विषयावर दोन भाषाशास्त्रींच एक पुस्तक आहे The Sants: Studies in a Devotional Tradition of India,Karine Schomer; W. H. McLeod (1987). ह्यात कदचित काही अजुन महिती मिळु शकेल.

In reply to by पामर

असे प्रतिसाद वाचले की मिपावर असल्याचं सार्थक झाल्यासारखे वाटते. यावर स्वतंत्र लिखाण वाचायलादेखिल आवडेल आपलं.

In reply to by पामर

मानवाच्या समान विकसित झालेल्या मेंदु चा व त्यामुळे विकसित झालेल्या भाषिक कौशल्याचा परिणाम मानला जातो.
saint आणि संत करता लागू असू शकेल ?

In reply to by माहितगार

मानवाची भाषा ही खुप जटिल व इतर प्राण्यांच्या मानानी खुपच अत्याआधुनिक म्हणावी लागेल. ईतकच नाही तर मानवानी इतर मानव समुहाची भाषा सुद्धा शिकुन घेण्याची क्षमता विकसित केलीये ही गोष्ट आपण सहज सोडुन देतो.मानवाचे भाषिक कौशल्य पराकोटीचे विकसित झाले आहे. तरिही मानवी भाषेमधे काही समान धागा सापडतोच! Etymology मधे False cognate(खोटे सजातीय)शब्दांचा एक खास वर्ग आहे ज्याला नवजात-बालकांची भाषा (Lallname)म्हणतात. मानवी बाळं जन्माला आल्यावर काही विशिष्ट आवाज काढतात जे जगाच्या पाठीवर कुठेही खुपच सारखे असतात हे निरिक्षण रशियन भाषाशास्त्री Roman Jakobson नी १९६२ मधे नोंदवलं.त्यालाच तो mama and papa class म्हणतो.जगातल्या बहुतेक सर्व प्राचीन व प्रचलीत भाषांमधे मा,माँ,ममा,ममी,मातृ,मदर इ. शब्द आई साठी व पा,पापा,अप्पा इ.शब्द वडिलांसाठी वापरले जातात. ह्यात अजुन एक गम्मत आहे.बाळांच्या बोलण्यात येणारे शब्द दरवेळी सारखेच मानले जातिल असे नाही. उदा.जुन्या जापानी मधे आईला पापा म्हणतात आणि स्लाविक मधे आजी ला बाबा म्हणतात तर ज्योर्जियन भाषेत वडिलांना मामा म्हणतात व आई ला डेडे !!

In reply to by पामर

क्षमा असावी, मानवाच्या काही नैसर्गीक उच्चारणांमुळे समान उच्चारणे समान गोष्टींसाठी होऊ शकतील नाही असे नाही. परंतु saint आणि संत ही एक सारखा अर्थ विशीष्ट एकसारखी उच्चारणे नैसर्गीकपणे होऊ शकतील या बद्दल खूपच अधिक साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

आपण थोडं याकडे वेगळ्या मार्गानी बघुयात. हे सुत्र बघुयात- अ आणि ब हे दोन शब्दांचे उच्चार व अर्थ दोन्ही साधारण समान आहेत पण त्यांची मूळ संकल्पना किंवा व्युत्पतीच्या दृष्टीकोनातुन ते वेगवेगळे आहेत तर ते एकमेकांचे false cognate (खोटे सजातीय) शब्द आहेत. काही भाषाशास्त्री मानतात की अतीप्राचीन काळी एकच भाषा असावी व मानवाच्या स्थलांरतरा मुळे सध्याच्या सर्व भाषा तयार झाल्या असाव्यात. त्याला theory of Nostratic languages म्हणतात.पण हा जरा वादाचा विषय आहे. आपण जगातील ईतर भाषांमधील false cognate (खोटे सजातीय) शब्द बघु - १.English मधला aye जापानी च्या hai (はい) व चायनीज च्या hai (係) शी अफाट जुळतो. २.पैशाच्या थैलीसाठी फ्रेंचचा caisse व ईटालियन cassa हे तामिळच्या कासु शी जुळतात. ३.तामिळमधे वडीलांसाठीचा अप्पा (அப்பா) शब्द कोरियन अप्पा (아빠) शी तंतोतंत जुळतो. ४.अरेबिक मधला 'मी' साठीचा अना (أنا) हा भारतातल्या आदिवासी गोंड जमाती पण वापरतात! ५.आफ्रिकेतल्या घाना अदिवासींच्या गा-भाषेमधे बा म्हणजे ये इकडे! तो कानडी बा (ಬಾ) शी जुळतो. ६.मँडेरिन चायनीज मधे 'she is' साठी वापरतात ता-शी (她是) आणि आयरिश मधे म्हणतात ताह-शी (tá sí)! ७.रशियनमधे आजी साठीचा बाबा (баба) शब्द जापानीमधे बाबाच आहे (祖母/ばば) ८.English मधला मारणे या अर्थीचा बीट शब्द रशियनमधे (бить) पण वापरतात ९.ऑस्टेलियाच्या उत्तर क्विंन्स्लॅण्ड प्रांतामधल्या मुळनिवासींच्या Mbabaram (बाबाराम) भाषेत कुत्र्याला 'डॉग'च म्हणायचे.(ती आता लुप्त भाषा झाली आहे) जिचा English शी कधीही संपर्क आला नाही! *आंतर जालाचे आभार!

In reply to by पामर

saint आणि संत हा मुख्य विषय आहे. अपवादावरून नियम सिद्धकरण्याच्या प्रयासात मुख्य विषय भरकटून काही तार्कीक उणीवा तर आल्या नाहीएत ना अशी साशंकता वाटते. नाण्याच्या दुसर्‍या बाजूंचा आपणच शोध घेऊन पहा. आपल्या अर्ग्यूमेंट मधील तार्कीक उणीवांच्या संदर्भाने सवडीने मांडणी करेन.

In reply to by पामर

याला म्हण्टात नॉलेज! मुद्दा सोडून सगळं सांगितलंत तरी लोक टाळ्या वाजवतायत बघा आधीच.... ;-) (कृ. ह. घ्या. हो.) बाकी अप्रतिम माहितीकरता धन्यवाद!!

In reply to by पामर

व्यक्तीशः मला 'सन्त' शब्दाची व्युत्पत्ती 'नत' (स्+नत = नम्रता दर्शवणे) पासून आला असण्याची शक्यता वाटते. वृद्ध/ज्ञानी व्यक्तींना मान देण्यासाठी नत होणे हि मानवी परंपरा जुनी असावी. लॅटीन मध्येही senatus (वेगळ्या अर्थाने) असा शब्द आहे आणि senex हा शब्द वृद्ध व्यक्तींसाठी वापरला जात असावा असे दिसते.

In reply to by माहितगार

मी संस्कृत भाषेस सहज क्रेडीट देणार्‍यांपैकी नाही, पण saint विरुद्ध सन्त शब्दजोडीत माझ्याकडून क्रेडीट संस्कृतला !

दंतपासुन डेंटल शब्द आलाय हे मला डेंटिस्ट असून माहिती नव्हतं!

In reply to by कपिलमुनी

dent बद्दल चांगला प्रश्न विचारलात. एटीमॉनलाईनवर येथे तपासला खालील प्रमाणे व्याख्या दिली आहे. मुख्य म्हणजे लॅटीनच कनेक्श्न दिल नाहीए (लॅटीन मध्न लोप पावला ही शक्यता राहतेच तरीही) प्रोटो इंडो युरोपीयन म्हणजे संस्कृत +लॅटीनचा संयोग असल्याचा जो अविर्भाव दोन्ही भाषा समर्थकात असतो तो पुन्हा तपासण्यास अशा अधीक उदाहरणांची गरज आहे. dent early 14c., "a strike or blow," dialectal variant of Middle English dint (q.v.); sense of "indentation" first recorded 1560s, apparently influenced by indent. donate आणि दानत हे शब्द पहा 'नत' हा शब्द सध्याच्या प्रोटो युरोपीयन शब्द यादीत मला दिसला नाही (चुभूदे.घेणे) माझे मत तो एक प्रोटो इंडो युरोपीयन शब्दच आहे. प्रोटो इंडो युरोपीयन 'नत' म्हणजे मुलत शिकारीसाठी जाळे टाकून शरण आणणे असे काही असावे. (या 'नत/नेट' शब्दाने पुढे बर्‍यापैकी वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांती केली आहे त्या संबंधाने स्वतंत्र लेख सवडीने निहीण्याचा मनोदय आहे. माझे व्युत्पत्तींबद्दलचे लेखन काही माहिती माझा स्वतचा कॉपीराईट राखण्यासाठी हातची राखूनच करत आहे नत/नेट हिच उच्चारणे का आणि कशी आली ते माहिती देत नाहीए पण ती मला बर्‍या पैकी खात्रीशीर गवसली आहेत असे वाटते)

संतांच्या वचनांचा / सुवास (सेंट) सर्वत्र दरवळला म्हणून संत प्रथम व सेंट नंतर. आता हा saint वेगळा व तो scent वेगळा असे आम्हास समजवू नये. काय समजलें :)

(सेंट मारुन पंत आणी संत ची बेमालुम भुमिका करणारा )जेपी

माझ्या मताशी सहमत असे काही संदर्भ खाली देतोय, कदाचित तिकडुन काही अधिक माहिती मिळु शकेल- 1.Gandhi's Experiments with Truth: Essential Writings by and about Mahatma Gandhi edited by Richard L. Johnson, page 290 2.Performing the Sacred: Song, Genre, and Aesthetics in Bhakti By Jacqueline Jones, page 7(footnote) 3.The Sants: Studies in a Devotional Tradition of India edited by Karine Schomer, W. H. McLeod, page 3 4.Saints and Virtues,Hawley, John Stratton, University of California Press, ISBN 9780520061637, page 57 आपल्याला ह्या उलट मत असलेले जर काही संदर्भ सापडले तर कृपया शेअर करा मला नक्की आवडेल!

एक स्त्रोत असे हि सांगतो कि जेव्हा सर्व जग मागासले होते तेवा आपल्याकडे नालंदा तक्षशिला सारखी विश्वविद्यालये होती जेथून सर्व ठिकाणचे(अरब, चीन, रशिया) सारख्या देशांमधली मुले येऊन शिकत असत. त्यावेळी प्रत्येक देशातील शिकलेल्या लीकांनी त्यांच्या प्रदेशातीला बोलीभाषेत अनेक संस्कृत शब्दांची भर घातली आणि व्यापारानिमित्त अरब युरोपीय देशात गेले आणि त्यांनी संस्कृतचा त्या देशात प्रसार केला. त्यातूनच लॅटिन, ग्रीक सारख्या तत्कालीन युरोपीय भाषांचा उगम आणि विकास झाला. आणि भारतातील सर्व भाषांचे उगम हि संस्कृत भाषाच असल्याचे तुम्हाला माहित असेलच. म्हणूनच संत हा मुळात संस्कृत त्यानंतर प्राकृत आणि पर्यायाने मराठीत आलेला शब्द हाच सेंट या शब्द पेक्षा पुरातन असावा.

In reply to by जे एस सर्वेश्वर

सर्वेश्वरकाका, तुमची प्रतिक्रिया वाचताना मला पु.ना.ओकांची पुन्हा पुन्हा आठवण येत होती! दरवेळी जगातल्या प्रत्येक गोष्टीं मागे ओधुन ताणुन महान प्रचीन भारतीय संस्कृती कशी असते हे फार लहानपणापासुन मला पडलेलं कोड आहे त्यावर काही अजुन प्रकाश टाकु शकाल काय?

साला परिस्थिमुळे खूप आवडणार्या इतिहास विषयापासून दूर गेलो त्याचा आज खर्या अर्थाने पश्चाताप होतोय ब्याटम्यानराव, वल्लीशेठ मले तुमचा शिष्य करून घेतव का?