Skip to main content

Saint आधी की संत आधी?

लेखक चिगो यांनी बुधवार, 19/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. आजच इथं शिलाँगात एका सेंट पिटर्स नावाच्या शाळेत गेलो आणि डोक्यात सहज एक किडा वळवळला.. संत आणि Saint ह्यातील कुठला शब्द आधी आला? एक शब्द दुसर्‍यावरुन उचलला किंवा रचला आहे का? असल्यास कुठला? मला नेहमीच दोन भिन्न भाषांतील समानार्थी शब्दसाधर्म्याचे कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळेच जेव्हा अहोमियात आई, भात, खेदणे इत्यादी शब्द मराठी शब्दांसारखेच अर्थ असलेले आहेत हे कळलं, तेव्हा त्या भाषेशी सख्य वाढले. "नमस्ते लंडन"मध्ये जेव्हा अक्षयकुमार कोण्या इंग्रजाला मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट्री हे शब्द कसे बनलेत हे ठासून सांगतो, तो प्रसंग मला आवडतो. (भुरभुरत्या केसांच्या, आंग्लाळलेली हिंदी बोलणार्‍या कट्रीनाचाही प्रसंग आवडण्यात लै मोठा वाटा आहे.. ;-) ) हे असले प्रसंग आमच्या उसवत्या देशप्रेमाला भाषाभिमानाची ठीगळं लावतात.. तर मुळ प्रश्न असा, की "सेंट" आणि "संत" ह्यातला कुठला शब्द आधी आला? माझ्यामते सेंट असावा, आणि त्यावरुन "संत" हा शब्द शिक्षणखात्याने उचलला असावा.. "संतपदाला पावते झाले" कींवा "संतपदाची प्राप्ती झाली" म्हणजे नेमके कुणी हे पद दिले? जनमानसाने का? हा प्रश्न विचारण्याचे कारण हे, "सेंट" ही पदवी/उपाधी कॅथलिक चर्च देते, त्याप्रमाणे "संत" पदवी देणारे कुठले धर्मगुरु किंवा राजे असल्याचा उल्लेख कुठे आहे का? म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का? मिपावर अनेक संतसाहीत्य तसेच इतिहासाचे जाणकार आहेत, त्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.. (अवांतर : "ह्या माहितीचे तुम्ही काय करणार" हा प्रश्न विचारणार्‍यांसाठी डिस्क्लेमर. हा प्रश्न "जिज्ञासाकंडूशमनार्थ" विचारला आहे.. ;-) )

वाचने 39111
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का?
त्यांच्याबद्दल ठाऊक नाही पण, साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा हे संत तुकारामांचेच काव्य ना?

In reply to by सुनील

थोडक्यात काय तर, मराठी संत आणि इंग्रजी सेन्ट हे दोन्ही समानार्थी शब्द स्वतंत्रपणे अस्तिवात आले असावेत. एकावरून दुसरा असे नव्हे.

संत शब्द आधी कि नंतरचा हे माहिती नाही. परंतु संत हा शब्द अभंग, हरिपाठ या सगळ्यामध्ये आढळतो. ही हरिपाठा मधील एक अभंगाची सुरुवात. संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असा उल्लेख आढळतो का हे पाहावे लागेल.

saint शब्द लॅटीन sanctus वरून आल्याचे ऑनलाईन संदर्भ दर्शवतात. रेकॉर्डेड दस्तएवजांनुसार संस्कृत दस्तएवजातील "सन्त" शब्दाचा वापर जुना असण्याची निश्चित शक्यता वाटते. असे प्रसंग आलेकी संस्कृत आणि लॅटीन सहसा दोन्ही बाजुचे पंडीत त्यांच्या त्यांच्या भाषेपर्यंतच जाऊन थांबतात. इंडोयुरोपीय भाषात त्यांचे एकसारख्या उच्चारण आणि अर्थांबद्दल जाणून घ्यावयास आवडेल

हिंदू विश्व राष्ट्राचा इतिहास हे श्री पु.ना.ओक यांनी लिहीलेले पुस्तक वाचा...त्यात बरेचसे असे शब्द सापडतील जे संस्कॄत आणि ईग्रजी मधील साम्य दाखवतील... मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट् या शिवाय मला खालील शब्द आठवतात... सिंग = king फलतिईती = fertility क्रुष्णनिती = christnity अवांतर : गंमत म्हणून पु.ल.नी एका लेखात खालीलप्रमाणे लिहीले होते.. इटली या मूळ विठ्ठली देश. "वॅटीकन" हे मूळातच विठू आणि कान्हा यांच्या नावामुळे "विठूकान्ह" असे होते. त्याचे नंतर वॅटीकन असे झाले.

In reply to by योगी९००

सिंग = king
अच्छा म्हणजे सिंग इज किंग इतके जुने आहे तर. पु.ना.ओकांनी अशा अनेक हास्यास्पद गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या मते आंग्ल भाषाच संस्कृतोद्भव आहे. व्हॅटिकन सिटी म्हणजे वेदवटी, लँकेशायर म्हणजे लंकेश्वर आणि जर्मनीतील हॅम्बुर्ग म्हणजे हेमदुर्ग आहे. केवळ असे ओढूनताणून दिसणारे उच्चारातील साम्य असेल तर सगळीकडे हिंदू संस्कृतीच होती हे अनुमान कसे काढता आले हे ते पु.ना.ओकच जाणोत.

In reply to by क्लिंटन

मी सुद्धा चेष्टेतच लिहीले आहे. पु.ना.ओकांनी लिहीलेल्या या पुस्तकातले विचार मला पटले नाहीत. (त्यात त्यांनी रामायण कसे घडले असावे हे लिहीले आहे. ते मात्र आवडले.).

क्रुष्णनिती = christnity
निती शब्दाशीच संबंध दाखवायचा तर unity शब्द अधीक जवळ जातो . christnity मध्ये nity येते ते human - humanity या पद्धतीने येते म्हणून वेगळे असावे. क्रुष्णनिती = christnity मात्र सध्यातरी अतर्क्य वाटते आहे.

In reply to by माहितगार

कितिही अतर्क्य वाटत असले तरीही तेच अंतिम सत्य आहे ... हिंदु धर्म आधी जगभर पसरला होता त्याकाळी मध्यपुर्वेतील एका ब्राह्मणाने चार्वाका सारखे हिंदुधर्माविरुध्द बोलायला सुरुवात केली मग त्याला लोकांनी धर्म बहिष्कृत केले अन त्याला अब्राह्मण म्हणु लागले हाच तो अब्राहम ज्याच्या पासुन ज्यु ख्रिश्चनादी अब्राहमिक धर्मांचा उदय झाला :D

In reply to by प्रसाद गोडबोले

अब्राहम ......हँ हँ हँ सर्व प्रतिसाद वाचल्यावर बँटमन यांना संत उपाधी द्यावी असा ठराव मी मांडतो.

In reply to by योगी९००

या सूचनेला माझे " पुर्ण अनुमोदन " आहे. ( हे अनुमोदन मी कुठलेही उत्तेजक द्रव सेवन न करता दिलेले आहे याची नोंद घ्यावी )

In reply to by टवाळ कार्टा

मिपाच्याच्पहिला सन्ताला पहिला प्रणाम. हायला पण त्या नादात संत संता झाली की !

लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही भाषा एकमेकींच्या 'मेळ्यात बिछडलेल्या' बहिणी आहेत. बॉलीवुडमध्ये पाहिल्यास दिसेल की पोरं हरवतात अन नंतर भेट होते इ.इ. इथे पोरं हरवून मग भेटली, बहिणी-बहिणी असल्याची खात्रीही पटली. फक्त फरक इतकाच की बॉलीवुडात आईही भेटते, इथे आईचा पत्ता नाही, पण दोघींची आई एकच होती हे आता खात्रीलायकपणे ठाऊक आहे. तर लॅटिनमध्ये सेंट हा शब्द दीडदोन हजार वर्षे जुना आहे. संस्कृतात हा शब्द कालिदासाच्या काव्यात सापडतो, म्हणजे इ.स. ५०० च्या अगोदर हा वापरात होता. शिवाय महाभारतातही सापडतो, त्यामुळे अजून ४००-५०० वर्षे मागे जायला अडचण नाही. मनुस्मृतीतही हा शब्द आढळतो. आता दोन्ही भाषांत हा शब्द आहे हे तर सिद्ध झाले. पण यावरून एकीकडून दुसरीकडे तो शब्द गेलाय हे सिद्ध होत नाही. लॅटिनचा प्रभाव असायला भारतात रोमराज्य कधीच नव्हते. (स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा) शिवाय भारतावर ग्रीक वंशाच्या क्षत्रपांनी राज्य केले विशेषतः पश्चिम भागात तरी त्यांनी ग्रीक वा लॅटिन भाषा लादली नाही. रोमन काळात भारताशी रोमन लोकांचा व्यापार असला तरी प्रभुत्व नव्हते. त्यामुळे लॅटिनचा संबंध नव्हता. शिवाय भारत पूर्वेकडे असल्याने बरेच ग्रीक येत, तुलनेने इटालियन येत नसत. दोन्ही भाषा मुळात एकसारख्या असल्याने त्यांतील शब्दही कैक सारखे आहेत हे मेन. ते साधर्म्य या केसमध्ये कॉमन वारशाचा परिणाम आहे, देवाणघेवाणीचा नाही. उदा. मी जातो आणि मैं जाता हूँ या वाक्यांत पाहिले तर असे शब्दप्रयोग मराठीतून हिंदीत गेले की हिंदीतून मराठीत आले? दोन्हीही नाही. संस्कृत-प्राकृतकडून हा कॉमन वारसा दोन्ही भाषांना मिळालेला आहे आणि त्यामुळे स्लाईट फरक होऊन तेच ते शब्द दोन्हीकडे आलेत. संस्कृत अन लॅटिनमध्येही तोच प्रकार आहे.

In reply to by बॅटमॅन

काय करावे आता !!! जरा लोक तारे तोडतायत (अकलेचे) तर आला संदर्भासह स्पष्टीकरण द्यायला! मूळ अवांतरः छान उपयुक्त माहीती, पण चेंगटपणा करून फक्त प्रतिसाद-फुले वाहू नका जरा क्रमशःवाली माला गुंफा जरा! चार माहीतीच्या गोष्टी आम्हाला तरी कळतील!!!

In reply to by बॅटमॅन

मस्त प्रतिसाद. ह्यावरून अरेबिक किंवा इंडो अरेबिक न्यूमरल्स आठवले. जे आज सर्व जगात सर्रास वापरले जातात. उदा. १, २, ३,...,१० हे क्रमांक भारतात तयार झाले व पुढे त्याचा प्रसार अरबांनी केला हे खूप कमी जणांना माहित असेल.

In reply to by प्रचेतस

ते नोटेशन तयार झाले ते भारतात. विशेषतः शून्यवाले. बाकी इतके शोध लावणारे ग्रीक अन रोमन्स शून्याची बस कशी काय चुकले काय माहीत! असो. एक पोकळ सर्कल म्हणजे शून्य अशी जी खूण आज आपण लिखाणात वापरतो, तिचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील शिलालेखात सापडतो. वर्ष आहे इ.स. ८७६. त्या देवळाचे नाव खरेतर 'शून्येश्वर महादेव मंदिर' असे बदलावयास हवे आता.

In reply to by बॅटमॅन

बाकी इतके शोध लावणारे ग्रीक अन रोमन्स शून्याची बस कशी काय चुकले काय माहीत!
ह्याचे अतिषय सुंदर स्पष्टीकरण ( फिलॉसॉफी / मायथॉलॉजी च्या अँगलने ) देवदत्त पटनाईक http://en.wikipedia.org/wiki/Devdutt_Pattanaik ह्यांच्या एका टेड टॉल्क्स मधे ऐकले आहे . बाकी शुन्याचा शोध नक्की कधी लागला असावा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्स रे. पाहतो. तदुपरि शून्याचा शोध दोनेक हजार वर्षांपूर्वी तरी लागला असावा असे म्हणण्यास हर्कत नाही. आर्यभट (इ.स. ४७६ च्या आसपास) त्या संकल्पनेचा उल्लेख करतो, पोझिशनल नंबर सिस्टिमचे काहीसे अस्पष्ट उदा. अगदी उत्तर वैदिक काळातही सापडते. छन्दःशास्त्रकार पिंगल (२०० इ.स.पू. ते २०० इ.स. मध्ये त्याचा काळ धरतात) हाही शून्याचा उल्लेख करतो. त्यामुळे दोनेक हजार वर्षे असावासे वाटते.

In reply to by बॅटमॅन

शून्याचा शोध २००० वर्षांपेक्षाही बहुत जुना दिसतो. सातवाहन आणि क्षत्रपांच्या कित्येक लेखात कालगणना देताना १० (+) २, ४० (+) ४ म्हणजेच १२, ४४ असे क्रमांक आढळतात. अर्थात ह्यातील शून्य हां आकड़ा सध्याच्या देवनागरीतील वर्तुळासारखा नसून ब्राह्मी लिपीत लिहिला जात असे. हे लेख किमान २२०० वर्षे जूने आहेत. बाकी सध्याच्या शून्यासंबंधी तू उल्लेख केलेल्या महादेव मंदिर शिलालेखाबद्दल माहीत नव्हते. अर्थात तो सगळ्यात जुना लेख असू शकतो कारण तेव्हा नुकतीच ब्राह्मी लयास जाऊन देवनागरीला सुरुवात झाली होती.

In reply to by प्रचेतस

 (जालावरून साभार) वरच्या चित्रातील इंग्लिश भाषेतील (European) आकड्यांना "अरेबिक" न्युमरल्स म्हणतात तर अरेबिक भाषेतील आकड्यांना "अरेबिक-इंडिक", "हिंदू-अरेबिक" अथवा "हिंदी" न्युमरल्स असे म्हणतात. शुन्यासह इतर आकडे लिहिण्याची प्रचलित दशमान अथवा स्थानीय मान पद्धत (Positional notation or place-value notation) पद्धत भारतातून अरेबियात आणि तेथून पश्चिमेत गेली हे आता सर्वमान्य झाले आहे.

In reply to by बॅटमॅन

भारतावर ग्रीक वंशाच्या क्षत्रपांनी राज्य केले विशेषतः पश्चिम भागात तरी त्यांनी ग्रीक वा लॅटिन भाषा लादली नाही
ग्रीकांचा लॅटीनशी काय संबंध ? आमच्या ऐकीव माहीती नुसार लॅटीन रोमन साम्राज्यात उदयास/ भरभराटीस आली .... तोवर ग्रीकांचे सारे प्रस्थ संपले होते . जरा अजुन डीटेल मधे लिहि रे ब्यॅटा आमची टाईमलाईन क्लीयर होवुदे ....

In reply to by प्रसाद गोडबोले

(स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)
=))))

In reply to by प्रसाद गोडबोले

रीकांचा लॅटीनशी काय संबंध ? आमच्या ऐकीव माहीती नुसार लॅटीन रोमन साम्राज्यात उदयास/ भरभराटीस आली .... तोवर ग्रीकांचे सारे प्रस्थ संपले होते .
होय, बरोबरे, फक्त ग्रीक वा लॅटिन भाषा भारतात शिरकाव होण्याचा एकमेव पॉसिबल रूट सांगितला इतकेच. त्यातही ग्रीकांनी लॅटिनला हिंगललं नाही हे आहेच म्हणा- यद्यपि रोमनांनी ग्रीक म्हणजे लै भारी असे समजून त्यांन बरेच पेट्रनाईझ केले.

In reply to by प्रसाद गोडबोले

क्षत्रपांना केवळ ग्रीक वंशाचे ठरवणे चुकीचे आहे. मध्य आशियातील ह्या रानटी शकांच्या टोळ्या. ग्रीकांबरोबरच पर्शियन आणि कुशाणांनीही ह्यांना आपल्या प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले. ह्या धर्मविहीन, चंचल टोळ्या जिथे जातील तिथले धर्म आपलेसे करून राहत असत.

In reply to by प्रचेतस

अगदी सहमत. केवळ ग्रीक नव्हतेच, पण काहीजण ग्रीक होते. शिवाय वायव्य भागात इंडोग्रीक राजेही होतेच. त्या 'ग्रेको-लॅटिन' कल्चरशी दूरान्वयानेही संबंध असलेल्या जमातीचा भारतातला व्याप किती होता इतकेच फक्त सांगायचे आहे.

In reply to by बॅटमॅन

ते आहेच. बाकी ह्या क्शत्रपांबद्दल जितके लिहावे तितके कमीच. इतकेच काय शालिवाहन शकाची जी कालगणना आज प्रचलित आहे ती ह्या शकांमुळेच. कुशाणांनी सुरु केलेली ही कालगणना प्रचलित ठेवली ती ह्या क्षत्रपांनी.

In reply to by बॅटमॅन

>>>>> (स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा) लय भारी.... हसणारी स्माइली

In reply to by बॅटमॅन

धन्यवाद, बॅटमॅनराव..
लॅटिनचा प्रभाव असायला भारतात रोमराज्य कधीच नव्हते. (स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)
=)) हे भारीच ! आता एक उपप्रश्न : "संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली? (खरंतर हाच मुळ मुद्दा होता, पण हुकला नेम च्यामारी.. ;-) )

In reply to by चिगो

"संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली?
रोचक प्रश्न आहे. संत हा शब्द जुन्या काळापासून वापरात असला तरी उपाधी म्हणून लावण्याची प्रथा नवीन असावीसे वाटते. पण नक्की माहिती नाही, पाहिले पाहिजे.

In reply to by चिगो

आता एक उपप्रश्न : "संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली? (खरंतर हाच मुळ मुद्दा होता, पण हुकला नेम च्यामारी..
अरेच्चा! हा मूळ प्रश्न होता होय? आणि इथे चर्चा संस्कृत-लॅटीन-ग्रीक-अरब झालच तर पुना ओक इथपर्यंत फिरून आली! ;) माझ्या मते, नावाआधी उपाधी लावण्याची पद्धत मूळातच भारतीय नाही. भारतात उपाधी ही नावानंतर लावतात. म्हणून तुकारामांना "संत तुकाराम" असे म्ह्णीत नसावेत. मात्र त्यांना "तुकारामबुवा" म्हणीत असण्याची शक्यता जास्त.

In reply to by बॅटमॅन

(स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)  अत्याधुनिकैतिहासाचार्य वाघूळगुरुजींचा विजय असो !

लेखात दिलेली अन्य शब्दसाधर्म्याची उदाहरणेही मुळात त्या भाषा एकसारख्या असण्याचाच परिणाम होत. संस्कृत आणि लॅटिनने परस्परांवर प्रभाव टाकलेला नाहीये.

In reply to by बॅटमॅन

आत्ता ! इंडो-युरोपियन प्रोटो-ल्यांगवेज नावाच्या आयीचं आयकून आयकून तिच्या पोरी-नाती-पनती येकसारकं नाय बोलनार क्का ? ;)

धाग्याचं नाव वाचल्यानंतर राम पालाबाबत काही आहे का काय असं वाटलेलं. पण धागालेखकाचं नाव पाहिल्यावर कुतुहल जागं झाअलं नि धागा उघडला. प्रतिसाद वाचून मिळालेल्या माहितीनंतर बॅट्या, वल्ली आणि इतर माहितगारांना (आयडी नव्हे) एक पार्टी लागू झाली. :)

In reply to by प्यारे१

प्रगो, इए नि चिगो ह्यांचं नाव नुसतं माहितगार म्हणून न थांबता विशेषत्वानं घेतोच. ;)

या दोघांना एखादे खापर सापडले की तिकडे खोदून खोदून आख्खे मोहनजोदडो बाहेर येते आणि धाग्याचा गुत्ता करणारे मागच्यामागे पळ काढतात .

मानव आफ्रीकेतूनच भारत आणि युरोपात गेला. काही सरळ गेले काही भारताच्या मध्य आशिया मार्गे गेले. त्या मुळे मानवीय भाषेच्या विकासात अनेक समानार्थी किंवा समान शब्द विभिन्न भाषेत सापडणे साहजिक आहे. त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही. या चर्चा व्यर्थ आहेत.

In reply to by विवेकपटाईत

त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही.
असं कसं असं कसं ? कंची भासा स्रेस्ट यावर वाह व्हयलाच पायजेल येकदा ...

In reply to by विवेकपटाईत

श्रेष्ठपणाची चर्चा व्यर्थ आहे, मात्र जुनी भाषा कुठली ही चर्चा व्यर्थ नाही. तसे वैयर्थ्य काढावयाचे असेल तर कुठल्या ना कुठल्या कलमाखाली प्रत्येक गोष्टच व्यर्थ आहे असे म्हणता येईल.

In reply to by विवेकपटाईत

त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही. या चर्चा व्यर्थ आहेत.
चर्चा व्यर्थ असेलही.. पण श्रेष्ठ-कनिष्ठतेचा प्रश्न कुठून आला? मला कुतूहल वाटले म्हणून हा प्रश्न विचारला.. सहजच : आसामात आधी शैवांचे प्राबल्य होते. १६-१७व्या शतकात श्री शंकरदेवांनी तिथे वैष्णव धर्माचा प्रसार केला. त्यांनी महाराष्ट्रात भरपुर भ्रमण केले आणि "भक्ती चळवळी"चा त्यांच्यावर प्रभाव होता, असे म्हणतात. कदाचित त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मराठीतले समानार्थी शब्द अहोमियात पेरले असावेत. म्हणूनच अख्खा मध्य आणि पुर्व भारत पार केल्यावर आसामात मराठी-समान शब्द आढळतात. किंवा उलटेही असेल. आता ह्यातही लगेच मराठी विरुद्ध अहोमिया येणार का?

मस्त धागा आणि प्रतिसाद!

In reply to by पैसा

पैसा सारखेच म्हणते, स्वाती

भारतीय गणित, संख्या आणि शून्य आणि बक्षाली मॅन्युस्क्रिप्ट यावरचे हे दुवे बघा http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Indian_numerals.html http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Zero.html http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Bakhshali_manuscript.html

वा!मजा अाली . बर्याच दिवसांनी वल्ली अाणि बॅट्याची जुगलबंदी वाचायला मिळाली.माहितीत भर पडली.मस्त धागा,प्रतिसाद सर्वच.

नेहमी प्र्माणे श्री बॅटमन अणि आणि वल्लीशेठ यांचे माहितीपुर्ण प्रतिसाद. बाकी चिगो हे मिस्टर", "मिस" या उपाधी विषयी मला वाटतं मी स्व. राजीव दिक्षीत यांच्याकडुन काहीसे स्पष्टीकरण ऐकले होते.

In reply to by काळा पहाड

मला "संत" ही पदवी "सेंट" सारखी नावासमोर लावण्याबद्दल शंका होती. मी विचारली. तुम्ही तुमचा खेळ खेळु शकता. रच्याकने, देवता आणि deity मध्ये मला फार समानता वाटत नाही.. चालु द्या..

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते सांगा, अलम दुनियेत ते आणि तेच स्रेस्ट हायेत ह्ये समजावून सांगू आपण, हाकानाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

मंग ठरलं तर, तुमीच आक्क्या जगात सर्वस्रेस्ट ! :) (मात्र तुमाला कोणी पर्तीस्पर्दी आसला / निगाला तर तुम्च तुमी सांबाळून घ्या. आमी चाल्लो ;) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मग ठरलं तर, तुमीच आक्क्या जगात सर्वस्रेस्ट !
>>> हिप हिप हुर्रे !!
(मात्र तुमाला कोणी पर्तीस्पर्दी आसला / निगाला तर तुम्च तुमी सांबाळून घ्या. आमी चाल्लो Wink )
इतं मिपावरच येक लई जबरी परतीस्पर्दी हाय त्येवडे सोडले तर बाकी आमाला सांबाळायला जड न्हायीत ... :D

In reply to by काळा पहाड

मूळ शब्द गो तीच झाली आमची गोमाता तीच दूध लै ग्वाड म्हणून लोक गोमातेस म्हणू लागले गोड>गॉड, काही लोक गाईच्या दूधाला म्हणू लागले गोडेओ आणि गोडईई त्यातल्या गो चा लोप झाला डेओ व डेई झाले. आम्ही खेळलो, आता तुमची बारी :)