✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वाहन वेड्यांसाठी: २०१४ मायामी बीच इंटरनॅशनल ऑटो शो

ब
बहुगुणी यांनी
Mon, 11/24/2014 - 12:17  ·  लेख
लेख
गेल्या रविवारी सकाळी समोर राहणाऱ्या Manny ने मला विचारलं 'काही खास करत नसशील तर Auto Show ला येणार का?' तीन वर्षांपूर्वी कार्गो प्लेन्स चा पायलट म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर Manny नेहेमी थोडा मोकळा वेळ मिळाला की गाड्या दुरूस्तीचं काम करत बसलेला दिसतो. कधी त्यांच्या चार गाड्यांपैकी एकीची दुरूस्ती, नाही तर ऑईल चेंज वगैरे मेंटेनन्सचं काम, नाही तर नातेवाईक किंवा मित्रांनी दारात आणून उभ्या केलेल्या गाड्यांची दुरूस्ती. आणि तो एकटा नव्हे तर त्याची साठी उलटलेली बायको नॉर्मा देखील त्याच्या बरोबरीने कम करते. नॉर्माने पाच वर्षांपूर्वी नव्वदीच्या घरातल्या अल्झायमर झालेल्या आपल्या आईला सांभाळण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या शुश्रुषेतून वेळ मिळेल तेंव्हा ती दोनदा कर्करोगाशी सामना देऊन जिद्दीने उभं राहणाऱ्या नवऱ्याला प्रचंड मदत करते. स्वत: Manny जवळच राहणाऱ्या त्याच्या हृदयरोगी आईच्या आजारपणात तिची काळजी घेत असतो. तो सत्तरीचा, तर आई ९२ पूर्ण. तो घरी नसेल तेंव्हा गरज पडली तर नॉर्मा एकटी गाडी jack वर चढवण्यापासून इंजिन काढण्यापर्यंत काम करतांना मी पाहिलंय. मदत करावंसं खूपदा वाटतं, पण मला त्यातलं काहीही ज्ञान नाही हा तोकडेपणा खूपदा जाणवला आहे. असो, तर असा हा Manny मला Auto Show ला चल म्हणाल्यावर मी एका पायावर तयार झालो. त्या भटकंतीचा हा सचित्र रिपोर्ट. सर्व प्रकाशचित्रे माझ्या HTC-1 सेल फोनच्या कॅमेऱ्याने काढलेले आहेत. प्रवेशद्वारासमोर: Entrance २०१५ ची Chevy Camaro LT ही गाडी सोडत काढून भाग्यवान विजेत्याला देण्यात येणार होती. Chevy Camaro LT 2015 Chevy Camaro LT 2015 आत गेल्यावर सुरूवातीलाच ज्यांना भटकणं जड जाईल अशा प्रेक्षकांसाठी भाड्याने स्कूटर्स ठेवल्या होत्या. scooters वालुकाशिल्पः sand sculpture Bill आणि Marianne Knight (thesandlovers.com) या जोडप्याने केलेली आण्कही का।ई वालूकाशिल्पे इथे पहायला मिळतील. 1967 Austin Healey 3000 1967 Austin Healey 3000 1967 Austin Healey 3000 Convertible side view Austin 3000 convertible side view Audi R8 V10 Plus Audi R8 V10 Plus Audi A3 Cabriolet Audi A3 Cabriolet Alfa Romeo 2015 Alfa Romeo 2015 Austin Healey Sprite 1938 Austin Healey Sprite 1938 Art in Auto Mazda 3 Art in Auto Mazda 3 Art in Auto Lamborghini Art in Auto Lamborghini Buick Touring Roadster 1915 (side) Buick Touring Roadster Side View 1915 Buick Touring Roadster Front View 1915 Buick Touring Roadster Bentley Continental GT 2015 Bentley GT 2015 BMW 740Ld X Drive 2015 BMW 740Ld X Drive 2015 BMW S1000 RR BMW S1000 RR BMW 650i Convertible 2015BMW 650i Convertible 2015 Corvette 2015 side view Corvette 2015 side view Corvette 2015 Front View Corvette 2015 Front View Camaro Z28 1969 Camaro Z 28 1969 Camaro Z28 2015, तीच गाडी ४४ वर्षांनंतर Camaro Z28 2015 Chevy Volt -- Chevelle 1963 Chevelle 1963 Corvette Stingray 1967 Corvette Stingray 1967 तीच गाडी, ४७ वर्षांनी,Corvette Stingray 2015 Corvette Stingray 2015 Dodge Charger 2015 --- Dodge Challenger RT Plus 2015 Dodge Challenger  RT Plus 2015 Dodge Challenger RT Plus 2015 Back View Dodge Challenger RT Plus Basic versus total Price Challenger RT Plus Basic versus total Price Manny in Dodge Challenger SXT 2015 -- Fiat Polski 126p 1974 Fiat Polski 126p 1974 Datsun 240 Z 1970 Datsun 240 Z 1970 Ford Mustang 1970 --- Ford Mustang GT 2015 --- Ford Mustang GT Rear View --- Motorcycles Harley Davidson Street --- HD 2 --- HD3 --- HD Trike --- HD Trike Rear View --- Indian Roadmaster --- Indian 2 --- Indian 3 --- Victory 1 --- Victory 2 --- Victory 3 --- Victory 4 --- Hyundai Sonata 2015 --- जॅग्वार आणि रेंज रोव्हर या दोन्ही ब्रँडच्या गाड्या टाटा तयार करतात हे मॅनीला सांगितल्यावर तो हसून म्हणाला, "I know!" या दोन्ही प्रकारच्या गाड्या पहाण्यासाठी लक्षणीय गर्दी होती. Jaguar 2015 F-Type --- Twins could not resist F-Type Jaguar 2015 --- Jaguar F-Type Coupe 2015 --- Another F-Type Jag --- Lexus RC 350 Sport 2015 --- Lexus F Sport --- Maserati Ghibli 2015 --- Mazda MX-5 Miata --- Mercury Cougar KR 7 1968 --- Mini Cooper Hardtop 2015 --- Mini Cooper Convertible 2015 --- Nissan 370 Z 2015 --- Plymouth Fury 1962 --- Porsche Carrera 2015 --- Range Rover Sport 2015 --- --- Scion FR S 2015 --- Shelby Cobra 1965 --- Shelby Cobra 1965 Front View --- VW Super Beetle 1969 --- VW Golf GTI 2015 --- Million Dollar Alley --- इथल्या एका वाक्याने लक्ष वेधून घेतलं: Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel! Lamborghini Murcielago LP640 2015 --- Lamborghini White Lambo white ही भाड्याने मिळेल अशी मौलिक माहिती मिळाली! (over $500 per hour, all inclusive) Lexus LF C2 Concept Car ---
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
14892 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

अप्रतिम

प्रसाद गोडबोले
Mon, 11/24/2014 - 12:38 नवीन
डोळ्याचे पारणे फिटले !! :) पण ह्यात माझी आवडती टेस्ला मऑडेल एस /म्मॉडेल एम / रोडस्टर नाहीये :(
  • Log in or register to post comments

प्रगो

बहुगुणी
Mon, 11/24/2014 - 19:49 नवीन
मी सध्या भारतात असलेल्या मुलाला हाच प्रश्न विचारला, त्याने सांगितलं की सगळ्या कॉन्सेप्ट कार्स आणि टेस्ला नोव्हेंबर २१-३० लॉस एंजेलिस च्या ऑटो शो साठी गेल्या आहेत. तिथली मिपाकर मंडळी जाणार असतील तर टाकतीलच फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

डोळ्याचे पारणे फिटले??

योगी९००
Mon, 11/24/2014 - 13:02 नवीन
डोळ्याचे पारणे फिटले?? मला तर एकबी फोटू दिसत नाही.
  • Log in or register to post comments

मला दिसताहेत ...

प्रसाद गोडबोले
Mon, 11/24/2014 - 13:24 नवीन
मला दिसताहेत ... :D ती यल्लो कलर मधील कॉर्वेट कसली अप्रतिम आहे राव आपला जीव आलाय तिच्यावर ... अन ती डार्क रेड बाईक इन्डीयन अहाहा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

भन्नाट फोटो !!!

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/24/2014 - 13:41 नवीन
भन्नाट फोटो !!! व्ह्रूsssम् व्ह्रूsssम् व्ह्रूsssम् :)
  • Log in or register to post comments

अफाट....!!!!

प्रचेतस
Mon, 11/24/2014 - 13:54 नवीन
अफाट....!!!! काय गाड्या आहेत एकसे एक.
  • Log in or register to post comments

"हातचे राखून" फोटो अपलोडवले

टवाळ कार्टा
Mon, 11/24/2014 - 14:03 नवीन
"हातचे राखून" फोटो अपलोडवले आहेत असे जाता जाता १ निरिक्षण नोंदवतो ;)
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

चिगो
Mon, 11/24/2014 - 14:08 नवीन
कसल्या जबरी सेक्सी गाड्या आहेत.. व्वा.. ह्यातली एकतरी गाडी ह्या जन्मात घ्यायला जमेल का (सोनाटा सोडून ;-) ) ह्या विचारांनी नउस्ते फोटो बघूनच आवंढे गिळतोय.. :-(
  • Log in or register to post comments

कचकावून फोटो

वेल्लाभट
Mon, 11/24/2014 - 14:12 नवीन
जबरदस्स्त... पैसे असते बक्कळ तर आपली आवडती मस्टँग किंवा चार्जर उचलली असती एक. होऊ दिला असता खर्च. काश.
  • Log in or register to post comments

माझी आवड :-

मदनबाण
Mon, 11/24/2014 - 14:40 नवीन
माझी आवड :- Harley Davidson Street Jaguar F-Type Coupe 2015 देवा मला पुढच्या जन्मी शेख बनव म्हणजे "सगळ्या" इच्छा पूर्ण होतील ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
  • Log in or register to post comments

देवा मला पुढच्या जन्मी शेख

टवाळ कार्टा
Mon, 11/24/2014 - 15:03 नवीन
देवा मला पुढच्या जन्मी शेख बनव म्हणजे "सगळ्या" इच्छा पूर्ण होतील !
पुढच्या जन्मापर्यंत तेल संपलेले असेल...शेख बनलात तर उंट हाकायला लागतील...गेलाबाजार त्यापेक्षा business tycoon चा सुपुत्र बनण्याचे बघा....म्हणजे पैसे बाप कमवून ठेवेल...आपण फक्त ते वाढवण्यासाठी IIM मधून कारकून आणायचे...आणि "सगळ्या" इच्छा पूर्ण करायला हवाईला जायचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पुढच्या जन्मापर्यंत तेल

मदनबाण
Mon, 11/24/2014 - 15:42 नवीन
पुढच्या जन्मापर्यंत तेल संपलेले असेल...शेख बनलात तर उंट हाकायला लागतील...गेलाबाजार त्यापेक्षा business tycoon चा सुपुत्र बनण्याचे बघा....म्हणजे पैसे बाप कमवून ठेवेल...आपण फक्त ते वाढवण्यासाठी IIM मधून कारकून आणायचे...आणि "सगळ्या" इच्छा पूर्ण करायला हवाईला जायचे हॅहॅहॅ... पोइंट नोटेड ! ;) देवा टेक माय मॉडिफाईड इच्छा नाउ... आय एम फार टायर्ड ऑफ धिस मध्यम वर्गीय घाम गाळींग पैसा जमविंग लाईफ स्टाईल. सो... आफ्टर कंसिडरिंग माय खरा फेथ ऑन यु प्लीज मेक मी रिचेस्ट शेख {इफ तेल विहीर इज कंप्लीटली फिल्ड } अदरवाइज माय सेंकड ऑप्शन इज मेक मी पुत्र ऑफ रिचेस्ट बिजनेस टायकुन इन नेक्स्ट जन्म. ;) जाता जाता :- A Car Collection Worthy Of A Sheikh

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन

टवाळ कार्टा
Mon, 11/24/2014 - 19:32 नवीन
वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन होती...लगती है "जिन्नाती" मेला होती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन

मदनबाण
Mon, 11/24/2014 - 22:25 नवीन
वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन होती...लगती है "जिन्नाती" मेला होती एकदम सही बोलती... शेख के घर जब लोक आती तो वो उनको अपने बब्बर शेर से मिलाती ! ;) फिटनेस का भी बोहोत खयाल रखती... ऐसा भागती ऐसा भागती की देखने वाला भी हसके मर जाती... ;) जाता जाता :- चला धाग्यावरचे अवांतर आवरते घेतो. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Mon, 11/24/2014 - 22:39 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्तच मस्त गाड्या , सर्वच

गणेशा
Mon, 11/24/2014 - 14:47 नवीन
मस्तच मस्त गाड्या , सर्वच गाड्या आवडल्या. लेक्सस गाडी कधी तरी आपण घेवु शकु का ? या फक्त विचारात ...
  • Log in or register to post comments

मलाही आवडली त्यांची सर्वच मॉडेल्स

बहुगुणी
Mon, 11/24/2014 - 19:55 नवीन
बेस प्राईस ४२,००० डॉलर्स पासून सुरू होते. १०-१५ वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या एखाद्या भारतीयाने 'अमेरिकन ड्रीम' गाठलं म्हणजे काय याची 'लेक्सस' घेणं ही व्याख्या होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अगदी अगदी! माझ्या मैत्रिणीने

रेवती
Mon, 11/24/2014 - 20:46 नवीन
अगदी अगदी! माझ्या मैत्रिणीने,रेणूने हे हामेरिकन ड्रीम गाठले पण गाडी सुरक्षितपणे चालवणे तिला माहित नसल्याने तिच्या ड्रीमला बरेच पोचे आले व खरवडले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

लय भारी गाड्या. धन्यवाद

प्रमोद देर्देकर
Mon, 11/24/2014 - 14:55 नवीन
लय भारी गाड्या. धन्यवाद बहुगुणी.
  • Log in or register to post comments

बर्‍याच गाड्यांची नावे GT ने

प्रसाद१९७१
Mon, 11/24/2014 - 16:24 नवीन
बर्‍याच गाड्यांची नावे GT ने सुरु करतात, त्याचा अर्थ काय असतो. अश्या गाड्या आणि ज्यांची नावे GT ने सुरु होत नाहीत त्यांच्यात फरक काय असतो?
  • Log in or register to post comments

GT

बहुगुणी
Mon, 11/24/2014 - 19:26 नवीन
ग्रँड टूरर (इटालियनः ग्रँड टूरिस्मो) 'लक्झुरियस' पण 'परफॉर्मन्स' देणार्‍या अशा गाड्या असतात या. मी हे ज्ञान पाजळतोय ते अर्थात मॅनीकडून मिळालेलं, परप्रकाशित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

धन्यवाद.

प्रसाद१९७१
Mon, 11/24/2014 - 19:56 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

काय कारी आणि काय बायका, वाह!!

बॅटमॅन
Mon, 11/24/2014 - 16:32 नवीन
काय कारी आणि काय बायका, वाह!!!!!! अंडरटेकरच्या बायकांसारख्या कैक बायका दिसताहेत. मला तशाच हव्यात. ;)
  • Log in or register to post comments

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार!

बहुगुणी
Mon, 11/24/2014 - 19:44 नवीन
टका: हातचं फार काही राखलं नाहीये, एक छोटा व्हिडिओ होता तो टाकतोय खाली: एक जुनी गाडी लक्षात राहिलीय पण नाव आठवत नाही :-( मॅनी ने सांगितलं त्याप्रमाणे ही गाडी १९५०च्या दशकात माफिया तिच्या ट्रंकमध्ये दारूच्या बाटल्यांच्या गोण्या आणि एका वेळी ५-५ मुडदे (!) नेण्यासाठी वापरायचे! बहुतेक ओल्ड्समोबिल कटलॅस?Image removed.
  • Log in or register to post comments

माझा तो प्रतिसाद तुम्हाला

टवाळ कार्टा
Mon, 11/24/2014 - 20:16 नवीन
माझा तो प्रतिसाद तुम्हाला समझ्याच नै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अरे मग सांगा की विस्कटून...

बहुगुणी
Mon, 11/24/2014 - 21:42 नवीन
लाजायचं नाही ;-) (हवं तर व्यनितून सांगा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

योग्य तो प्रश्न व्यनी केलेला

टवाळ कार्टा
Mon, 11/24/2014 - 22:21 नवीन
योग्य तो प्रश्न व्यनी केलेला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

फोटू मस्त आलेत! मला गाड्यांची

रेवती
Mon, 11/24/2014 - 20:32 नवीन
फोटू मस्त आलेत! मला गाड्यांची फारशी आवड नसल्याने जे हातात पडेल ते चालवायचे असे आहे. ;) वरील फोटूमधील मोटरसायकली नाही आवडल्या. कार्स मात्र आवडल्या. लेक्ससचे असे मॉडेल असू शकते याची कल्पना नव्हती. ते आवडले. ल्याम्बोर्गिनी सगळ्या आवडल्या. आमच्या पूर्वीच्या शेजार्‍याच्या बायकोने, जस्टीनने एकदा मोठ्या हौसेने मला विचारले की आमच्या मॅसरेटीमधून तुला चक्कर मारायची असल्यास मी घेऊन जाईन. आता हे काय आहे? विचारताच तिने गराज उघडून एक जुनी गाडी अभिमानाने दाखवली. त्यावर मी नको म्हणाले व नंतर नवर्याला सांगितले की आपण सहसा नव्या गाडीतून चक्कर मारून आणतो पण यांनी तर जुन्या गाडीत बसायला सांगितले, इतकेच नव्हे तर त्यांनी नुकतीच घेतलेली इन्फिनिटी शेजारीच होती त्याबद्दल काही बोलले नाहीत. त्याने तातडीने बॉबला कळवले की बायकोला नाही पण मला तुझ्या मेसरेटीमधून फिरून यायला आवडेल. शिवाय बॉबची जुनी व्हेस्पा मोटर स्कूटर होती त्यावरून मुलगा व नवरा चक्कर मारून आले. तुमचा मित्र आणि त्याची बायको मात्र खरे वाहनाप्रेमी दिसतात.
  • Log in or register to post comments

एकापेक्षा एक कार्स..

यसवायजी
Mon, 11/24/2014 - 20:46 नवीन
एकापेक्षा एक कार्स.. Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel! यावरुन उगाचाच हे आठवलं- Image removed. God drives harley but the devil rides triumph (न्युरेम्बर्गमधील रस्त्यावर काढलेला एक फोटो)
  • Log in or register to post comments

अत्यंत आवडला ! ग्रेट.

खेडूत
Mon, 11/24/2014 - 21:08 नवीन
अत्यंत आवडला ! ग्रेट. स्टायलिंग वेड लागल्यागत करतात! वाखू साठवली आहेच . यावर्षी नाय जमलं तरी पुढच्या वर्षी हजेरी लावण्याची इच्छा आहे . अलीकडेच F- टाइप वर काम करून आल्याने फोटो पाहून बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या . .
  • Log in or register to post comments

गाड्या आवडल्या.

आतिवास
Mon, 11/24/2014 - 21:22 नवीन
गाड्या आवडल्या. अवांतरः 'वाचक वेड्यांसाठी' असं शीर्षक वाचून (!) धागा उघडला होता. पण धागा उघडल्याचं दु:ख झालं नाही.
  • Log in or register to post comments

Harley Davidson Street >>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/25/2014 - 00:05 नवीन
Harley Davidson Street >>> Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख!

पिवळा डांबिस
Tue, 11/25/2014 - 00:15 नवीन
आमच्या आवडत्या एम्-बीझीची नवीन मॉडेल्स नव्हती का तिथे?
  • Log in or register to post comments

२०१५ मॉडेल्समध्ये २०१४ पेक्षा खास वेगळ्या अशा काही दिसल्या नाहीत

बहुगुणी
Tue, 11/25/2014 - 00:21 नवीन
असतील तर त्या बहुतेक तुमच्या जवळच्या शो मध्ये असतील, बघ चक्कर टाकून आणि जमलं तर फोटो टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ओके

पिवळा डांबिस
Tue, 11/25/2014 - 00:36 नवीन
बघतो जमलं तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मस्त गाड्या...

मुक्त विहारि
Tue, 11/25/2014 - 01:06 नवीन
आणि तितकेच सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो ...

खटपट्या
Tue, 11/25/2014 - 02:33 नवीन
हेच म्हणतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मला एक जुनी, पिवळ्याधम्मक

आदूबाळ
Tue, 11/25/2014 - 02:54 नवीन
मला एक जुनी, पिवळ्याधम्मक रंगाची बीटल घ्यायची लय विच्छा आहे...
  • Log in or register to post comments

ही चालेल?

बहुगुणी
Tue, 11/25/2014 - 02:59 नवीन
Image removed. (हलकेच घ्यालच!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बीटल म्हटले की...

मुक्त विहारि
Tue, 11/25/2014 - 05:56 नवीन
लव्ह बग सीरीज आठवते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

डोळ्यांचं पारणं फिटलं एवढचं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/25/2014 - 07:52 नवीन
डोळ्यांचं पारणं फिटलं एवढचं म्हणतो. स्वतःला गाड्यांची प्रचंड आवड असल्यानी धागा प्रचंड आवडला. वा.खु.साठवता येत नाहीये.
  • Log in or register to post comments

Fast and Furious film series . next part

सिरुसेरि
Tue, 11/25/2014 - 12:51 नवीन
Fast and Furious film series ची याद आली . विन डिसेलने आता next part , Miami drift या नावाने काढायला हरकत नाही .
  • Log in or register to post comments

फ्रीमाँट, कॅलिफोर्निया, इथे टेस्ला Model S अशी जन्माला येते!

बहुगुणी
Tue, 11/25/2014 - 23:12 नवीन
मॅनी ने हा खालचा amazing video पाठवला, टेस्ला Model S अशी जन्माला येते! यंत्रमानवांद्वारे अचाट काम होतांना पहा:
  • ३००० कामगार आणि १६० रोबॉट्स,
  • रोबॉट्स द्वारे २०,००० टनांचे अ‍ॅल्युमिनियम चे पत्र्याचे रोल्स उचलणं,
  • लेजर मिलिंग,
  • पॅनेल्स तयार करणं,
  • दर ६ सेकंदामागे प्रत्येक भाग तयार होणं (तीन दिवसांत एक पूर्ण गाडी!),
  • पूर्ण गाडीला रंग देणं,
  • चुंबकीय पट्ट्यांवरून चालणारे 'वाहक' रोबॉट्स,
  • सीट्स आणि काचा दोन्ही बसवणारा रोबॉट
आणि तयार झालेली टेस्ला Model S अशी दिसते: Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा