गेल्या रविवारी सकाळी समोर राहणाऱ्या Manny ने मला विचारलं 'काही खास करत नसशील तर Auto Show ला येणार का?'
तीन वर्षांपूर्वी कार्गो प्लेन्स चा पायलट म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर Manny नेहेमी थोडा मोकळा वेळ मिळाला की गाड्या दुरूस्तीचं काम करत बसलेला दिसतो. कधी त्यांच्या चार गाड्यांपैकी एकीची दुरूस्ती, नाही तर ऑईल चेंज वगैरे मेंटेनन्सचं काम, नाही तर नातेवाईक किंवा मित्रांनी दारात आणून उभ्या केलेल्या गाड्यांची दुरूस्ती. आणि तो एकटा नव्हे तर त्याची साठी उलटलेली बायको नॉर्मा देखील त्याच्या बरोबरीने कम करते.
नॉर्माने पाच वर्षांपूर्वी नव्वदीच्या घरातल्या अल्झायमर झालेल्या आपल्या आईला सांभाळण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या शुश्रुषेतून वेळ मिळेल तेंव्हा ती दोनदा कर्करोगाशी सामना देऊन जिद्दीने उभं राहणाऱ्या नवऱ्याला प्रचंड मदत करते. स्वत: Manny जवळच राहणाऱ्या त्याच्या हृदयरोगी आईच्या आजारपणात तिची काळजी घेत असतो. तो सत्तरीचा, तर आई ९२ पूर्ण. तो घरी नसेल तेंव्हा गरज पडली तर नॉर्मा एकटी गाडी jack वर चढवण्यापासून इंजिन काढण्यापर्यंत काम करतांना मी पाहिलंय. मदत करावंसं खूपदा वाटतं, पण मला त्यातलं काहीही ज्ञान नाही हा तोकडेपणा खूपदा जाणवला आहे.
असो, तर असा हा Manny मला Auto Show ला चल म्हणाल्यावर मी एका पायावर तयार झालो. त्या भटकंतीचा हा सचित्र रिपोर्ट. सर्व प्रकाशचित्रे माझ्या HTC-1 सेल फोनच्या कॅमेऱ्याने काढलेले आहेत.
प्रवेशद्वारासमोर:

२०१५ ची Chevy Camaro LT ही गाडी सोडत काढून भाग्यवान विजेत्याला देण्यात येणार होती.
Chevy Camaro LT 2015

आत गेल्यावर सुरूवातीलाच ज्यांना भटकणं जड जाईल अशा प्रेक्षकांसाठी भाड्याने स्कूटर्स ठेवल्या होत्या.

वालुकाशिल्पः

Bill आणि Marianne Knight (thesandlovers.com) या जोडप्याने केलेली आण्कही का।ई वालूकाशिल्पे इथे पहायला मिळतील.
1967 Austin Healey 3000

1967 Austin Healey 3000 Convertible side view

Audi R8 V10 Plus

Audi A3 Cabriolet

Alfa Romeo 2015

Austin Healey Sprite 1938
![]()
Art in Auto Mazda 3

Art in Auto Lamborghini

Buick Touring Roadster 1915 (side)

1915 Buick Touring Roadster Front View

Bentley Continental GT 2015

BMW 740Ld X Drive 2015

BMW S1000 RR

BMW 650i Convertible 2015
Corvette 2015 side view

Corvette 2015 Front View

Camaro Z28 1969

Camaro Z28 2015, तीच गाडी ४४ वर्षांनंतर

Chevy Volt

Chevelle 1963

Corvette Stingray 1967

तीच गाडी, ४७ वर्षांनी,Corvette Stingray 2015

Dodge Charger 2015

Dodge Challenger RT Plus 2015


Dodge Challenger RT Plus Basic versus total Price

Manny in Dodge Challenger SXT 2015

Fiat Polski 126p 1974

Datsun 240 Z 1970

Ford Mustang 1970

Ford Mustang GT 2015

Ford Mustang GT Rear View

Motorcycles
Harley Davidson Street

HD 2

HD3

HD Trike

HD Trike Rear View

Indian Roadmaster

Indian 2

Indian 3

Victory 1

Victory 2

Victory 3

Victory 4

Hyundai Sonata 2015

जॅग्वार आणि रेंज रोव्हर या दोन्ही ब्रँडच्या गाड्या टाटा तयार करतात हे मॅनीला सांगितल्यावर तो हसून म्हणाला, "I know!" या दोन्ही प्रकारच्या गाड्या पहाण्यासाठी लक्षणीय गर्दी होती.
Jaguar 2015 F-Type

Twins could not resist F-Type Jaguar 2015

Jaguar F-Type Coupe 2015

Another F-Type Jag

Lexus RC 350 Sport 2015

Lexus F Sport

Maserati Ghibli 2015

Mazda MX-5 Miata

Mercury Cougar KR 7 1968

Mini Cooper Hardtop 2015

Mini Cooper Convertible 2015

Nissan 370 Z 2015

Plymouth Fury 1962

Porsche Carrera 2015

Range Rover Sport 2015


Scion FR S 2015

Shelby Cobra 1965

Shelby Cobra 1965 Front View

VW Super Beetle 1969

VW Golf GTI 2015

Million Dollar Alley

इथल्या एका वाक्याने लक्ष वेधून घेतलं:
Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel!
Lamborghini Murcielago LP640 2015

Lamborghini White

ही भाड्याने मिळेल अशी मौलिक माहिती मिळाली! (over $500 per hour, all inclusive)
Lexus LF C2 Concept Car

मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
डोळ्याचे पारणे फिटले !! :)
पण ह्यात माझी आवडती टेस्ला मऑडेल एस /म्मॉडेल एम / रोडस्टर नाहीये :(
प्रगो
In reply to अप्रतिम by प्रसाद गोडबोले
मी सध्या भारतात असलेल्या मुलाला हाच प्रश्न विचारला, त्याने सांगितलं की सगळ्या कॉन्सेप्ट कार्स आणि टेस्ला नोव्हेंबर २१-३० लॉस एंजेलिस च्या ऑटो शो साठी गेल्या आहेत.
तिथली मिपाकर मंडळी जाणार असतील तर टाकतीलच फोटो.
डोळ्याचे पारणे फिटले??
डोळ्याचे पारणे फिटले??
मला तर एकबी फोटू दिसत नाही.
मला दिसताहेत ...
In reply to डोळ्याचे पारणे फिटले?? by योगी९००
मला दिसताहेत ... :D
ती यल्लो कलर मधील कॉर्वेट कसली अप्रतिम आहे राव आपला जीव आलाय तिच्यावर ... अन ती डार्क रेड बाईक इन्डीयन अहाहा ...
भन्नाट फोटो !!!
भन्नाट फोटो !!! व्ह्रूsssम् व्ह्रूsssम् व्ह्रूsssम् :)
अफाट....!!!!
अफाट....!!!!
काय गाड्या आहेत एकसे एक.
"हातचे राखून" फोटो अपलोडवले
"हातचे राखून" फोटो अपलोडवले आहेत असे जाता जाता १ निरिक्षण नोंदवतो ;)
जबरदस्त..
कसल्या जबरी सेक्सी गाड्या आहेत.. व्वा..
ह्यातली एकतरी गाडी ह्या जन्मात घ्यायला जमेल का (सोनाटा सोडून ;-) ) ह्या विचारांनी नउस्ते फोटो बघूनच आवंढे गिळतोय.. :-(
कचकावून फोटो
जबरदस्स्त...
पैसे असते बक्कळ तर आपली आवडती मस्टँग किंवा चार्जर उचलली असती एक. होऊ दिला असता खर्च. काश.
माझी आवड :-
माझी आवड :-
Harley Davidson Street
Jaguar F-Type Coupe 2015
देवा मला पुढच्या जन्मी शेख बनव म्हणजे "सगळ्या" इच्छा पूर्ण होतील ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
देवा मला पुढच्या जन्मी शेख
In reply to माझी आवड :- by मदनबाण
पुढच्या जन्मापर्यंत तेल संपलेले असेल...शेख बनलात तर उंट हाकायला लागतील...गेलाबाजार त्यापेक्षा business tycoon चा सुपुत्र बनण्याचे बघा....म्हणजे पैसे बाप कमवून ठेवेल...आपण फक्त ते वाढवण्यासाठी IIM मधून कारकून आणायचे...आणि "सगळ्या" इच्छा पूर्ण करायला हवाईला जायचे ;)
पुढच्या जन्मापर्यंत तेल
In reply to देवा मला पुढच्या जन्मी शेख by टवाळ कार्टा
पुढच्या जन्मापर्यंत तेल संपलेले असेल...शेख बनलात तर उंट हाकायला लागतील...गेलाबाजार त्यापेक्षा business tycoon चा सुपुत्र बनण्याचे बघा....म्हणजे पैसे बाप कमवून ठेवेल...आपण फक्त ते वाढवण्यासाठी IIM मधून कारकून आणायचे...आणि "सगळ्या" इच्छा पूर्ण करायला हवाईला जायचे
हॅहॅहॅ... पोइंट नोटेड ! ;)
देवा टेक माय मॉडिफाईड इच्छा नाउ... आय एम फार टायर्ड ऑफ धिस मध्यम वर्गीय घाम गाळींग पैसा जमविंग लाईफ स्टाईल. सो... आफ्टर कंसिडरिंग माय खरा फेथ ऑन यु प्लीज मेक मी रिचेस्ट शेख {इफ तेल विहीर इज कंप्लीटली फिल्ड } अदरवाइज माय सेंकड ऑप्शन इज मेक मी पुत्र ऑफ रिचेस्ट बिजनेस टायकुन इन नेक्स्ट जन्म. ;)
जाता जाता :- A Car Collection Worthy Of A Sheikh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China
builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन
In reply to पुढच्या जन्मापर्यंत तेल by मदनबाण
वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन होती...लगती है "जिन्नाती" मेला होती =))
वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन
In reply to वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन by टवाळ कार्टा
वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन होती...लगती है "जिन्नाती" मेला होती
एकदम सही बोलती... शेख के घर जब लोक आती तो वो उनको अपने बब्बर शेर से मिलाती ! ;)
फिटनेस का भी बोहोत खयाल रखती... ऐसा भागती ऐसा भागती की देखने वाला भी हसके मर जाती... ;)
जाता जाता :- चला धाग्यावरचे अवांतर आवरते घेतो. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
=))
In reply to वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन by मदनबाण
=))
=))
=))
मस्तच मस्त गाड्या , सर्वच
मस्तच मस्त गाड्या , सर्वच गाड्या आवडल्या.
लेक्सस गाडी कधी तरी आपण घेवु शकु का ? या फक्त विचारात ...
मलाही आवडली त्यांची सर्वच मॉडेल्स
In reply to मस्तच मस्त गाड्या , सर्वच by गणेशा
बेस प्राईस ४२,००० डॉलर्स पासून सुरू होते.
१०-१५ वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या एखाद्या भारतीयाने 'अमेरिकन ड्रीम' गाठलं म्हणजे काय याची 'लेक्सस' घेणं ही व्याख्या होती.
अगदी अगदी! माझ्या मैत्रिणीने
In reply to मलाही आवडली त्यांची सर्वच मॉडेल्स by बहुगुणी
अगदी अगदी! माझ्या मैत्रिणीने,रेणूने हे हामेरिकन ड्रीम गाठले पण गाडी सुरक्षितपणे चालवणे तिला माहित नसल्याने तिच्या ड्रीमला बरेच पोचे आले व खरवडले. ;)
लय भारी गाड्या. धन्यवाद
लय भारी गाड्या. धन्यवाद बहुगुणी.
बर्याच गाड्यांची नावे GT ने
बर्याच गाड्यांची नावे GT ने सुरु करतात, त्याचा अर्थ काय असतो.
अश्या गाड्या आणि ज्यांची नावे GT ने सुरु होत नाहीत त्यांच्यात फरक काय असतो?
GT
In reply to बर्याच गाड्यांची नावे GT ने by प्रसाद१९७१
ग्रँड टूरर (इटालियनः ग्रँड टूरिस्मो) 'लक्झुरियस' पण 'परफॉर्मन्स' देणार्या अशा गाड्या असतात या.
मी हे ज्ञान पाजळतोय ते अर्थात मॅनीकडून मिळालेलं, परप्रकाशित!
धन्यवाद.
In reply to GT by बहुगुणी
धन्यवाद.
काय कारी आणि काय बायका, वाह!!
काय कारी आणि काय बायका, वाह!!!!!! अंडरटेकरच्या बायकांसारख्या कैक बायका दिसताहेत. मला तशाच हव्यात. ;)
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार!
टका: हातचं फार काही राखलं नाहीये, एक छोटा व्हिडिओ होता तो टाकतोय खाली:
एक जुनी गाडी लक्षात राहिलीय पण नाव आठवत नाही :-( मॅनी ने सांगितलं त्याप्रमाणे ही गाडी १९५०च्या दशकात माफिया तिच्या ट्रंकमध्ये दारूच्या बाटल्यांच्या गोण्या आणि एका वेळी ५-५ मुडदे (!) नेण्यासाठी वापरायचे! बहुतेक ओल्ड्समोबिल कटलॅस?
माझा तो प्रतिसाद तुम्हाला
In reply to अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार! by बहुगुणी
माझा तो प्रतिसाद तुम्हाला समझ्याच नै :)
अरे मग सांगा की विस्कटून...
In reply to माझा तो प्रतिसाद तुम्हाला by टवाळ कार्टा
लाजायचं नाही ;-) (हवं तर व्यनितून सांगा.)
योग्य तो प्रश्न व्यनी केलेला
In reply to अरे मग सांगा की विस्कटून... by बहुगुणी
योग्य तो प्रश्न व्यनी केलेला आहे ;)
फोटू मस्त आलेत! मला गाड्यांची
फोटू मस्त आलेत! मला गाड्यांची फारशी आवड नसल्याने जे हातात पडेल ते चालवायचे असे आहे. ;) वरील फोटूमधील मोटरसायकली नाही आवडल्या. कार्स मात्र आवडल्या. लेक्ससचे असे मॉडेल असू शकते याची कल्पना नव्हती. ते आवडले. ल्याम्बोर्गिनी सगळ्या आवडल्या. आमच्या पूर्वीच्या शेजार्याच्या बायकोने, जस्टीनने एकदा मोठ्या हौसेने मला विचारले की आमच्या मॅसरेटीमधून तुला चक्कर मारायची असल्यास मी घेऊन जाईन. आता हे काय आहे? विचारताच तिने गराज उघडून एक जुनी गाडी अभिमानाने दाखवली. त्यावर मी नको म्हणाले व नंतर नवर्याला सांगितले की आपण सहसा नव्या गाडीतून चक्कर मारून आणतो पण यांनी तर जुन्या गाडीत बसायला सांगितले, इतकेच नव्हे तर त्यांनी नुकतीच घेतलेली इन्फिनिटी शेजारीच होती त्याबद्दल काही बोलले नाहीत. त्याने तातडीने बॉबला कळवले की बायकोला नाही पण मला तुझ्या मेसरेटीमधून फिरून यायला आवडेल. शिवाय बॉबची जुनी व्हेस्पा मोटर स्कूटर होती त्यावरून मुलगा व नवरा चक्कर मारून आले. तुमचा मित्र आणि त्याची बायको मात्र खरे वाहनाप्रेमी दिसतात.
एकापेक्षा एक कार्स..
एकापेक्षा एक कार्स..
Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel!यावरुन उगाचाच हे आठवलं-
God drives harley but the devil rides triumph(न्युरेम्बर्गमधील रस्त्यावर काढलेला एक फोटो)
अत्यंत आवडला ! ग्रेट.
अत्यंत आवडला ! ग्रेट. स्टायलिंग वेड लागल्यागत करतात!
वाखू साठवली आहेच .
यावर्षी नाय जमलं तरी पुढच्या वर्षी हजेरी लावण्याची इच्छा आहे .
अलीकडेच F- टाइप वर काम करून आल्याने फोटो पाहून बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या . .
गाड्या आवडल्या.
गाड्या आवडल्या.
अवांतरः 'वाचक वेड्यांसाठी' असं शीर्षक वाचून (!) धागा उघडला होता. पण धागा उघडल्याचं दु:ख झालं नाही.
Harley Davidson Street >>>
Harley Davidson Street >>>
सुरेख!
आमच्या आवडत्या एम्-बीझीची नवीन मॉडेल्स नव्हती का तिथे?
२०१५ मॉडेल्समध्ये २०१४ पेक्षा खास वेगळ्या अशा काही दिसल्या नाहीत
In reply to सुरेख! by पिवळा डांबिस
असतील तर त्या बहुतेक तुमच्या जवळच्या शो मध्ये असतील, बघ चक्कर टाकून आणि जमलं तर फोटो टाका.
ओके
In reply to २०१५ मॉडेल्समध्ये २०१४ पेक्षा खास वेगळ्या अशा काही दिसल्या नाहीत by बहुगुणी
बघतो जमलं तर...
मस्त गाड्या...
आणि तितकेच सुंदर फोटो.
हेच म्हणतो ...
In reply to मस्त गाड्या... by मुक्त विहारि
हेच म्हणतो ...
मला एक जुनी, पिवळ्याधम्मक
मला एक जुनी, पिवळ्याधम्मक रंगाची बीटल घ्यायची लय विच्छा आहे...
ही चालेल?
In reply to मला एक जुनी, पिवळ्याधम्मक by आदूबाळ
(हलकेच घ्यालच!)
बीटल म्हटले की...
In reply to ही चालेल? by बहुगुणी
लव्ह बग सीरीज आठवते....
डोळ्यांचं पारणं फिटलं एवढचं
डोळ्यांचं पारणं फिटलं एवढचं म्हणतो. स्वतःला गाड्यांची प्रचंड आवड असल्यानी धागा प्रचंड आवडला. वा.खु.साठवता येत नाहीये.
Fast and Furious film series . next part
Fast and Furious film series ची याद आली . विन डिसेलने आता next part , Miami drift या नावाने काढायला हरकत नाही .
फ्रीमाँट, कॅलिफोर्निया, इथे टेस्ला Model S अशी जन्माला येते!
मॅनी ने हा खालचा amazing video पाठवला, टेस्ला Model S अशी जन्माला येते!
यंत्रमानवांद्वारे अचाट काम होतांना पहा:
आणि तयार झालेली टेस्ला Model S अशी दिसते: