bhag ek
हे कुटुंब ज्या गावात राहते ते गाव छोटे च असून पूर्ण गाव एकमेकांच्या
सुख दुखा:त सहभागी असते. जेव्हा किरण चा अपघात झाला तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी खूप लोक धावले .
लोंकाचा या कुटुंबावर असणारा जिव्हाळा तेव्हा दिसून आला. अर्थात या कुटुंबातील सर्वजन माणुसकी जपणारी आहेत . ग्रामीण भाग असल्यामुळे बर्याच वेळा वीज गायब असते . किरण पोस्टाच्या कामाबरोबर च इतर इलेक्ट्रीक कामे हि करायचा …जेव्हा कधी वीज जायची तेव्हा वीज मंडळाचा कर्मचारी न बोलवता किरण च डीपी वर चढून काम करत असे .शिवाय कोणाचा पंखा बंद असेन , वीज संबधित काही काम असेन तर किरण ते विना मोबदला करत असे. जेव्हा किरण चा अपघात झाला त्या नंतर त्याला पुण्याला हलवायला सांगितले आणि पुण्याला आणत असतानाच त्याचा मृत्यू झाला. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते कि त्या वेळेस रुग्णवाहिके मध्ये गावातील लोक ,किरण ची पत्नी तर होतीच त्या शिवाय अजून एका जीप मध्ये गावातील मंडळी रुग्णवाहिके बरोबर पुण्याकडे येत होती. त्या वेळेस गावाकडे किरण च्या छोट्या दोन मुलांना शेजारील घरातील मंडळी पाहत होती. किरण च्या अपघाताची बातमी मिळाली तेव्हा किरण ची आई , प्रवीण ची पत्नी , प्रवीण ची मुले आणि बहिण,मेव्हणे वगैरे नातेवाईक गावाकडे रवाना झाले होते. त्या वेळेस गावातील दृश्य पाहून थक्क झाले होते . रात्री दोन वाजता पूर्ण गाव किरण च्या घराबाहेर बसले होते. गावकरी मंडळी किरण च्या पत्नीला सोबत करत होते आणि पूर्ण रात्र तिथे च होते. किरणचे शव एका शवागृहात ठेवले गेले होते. शव विच्छेदन झाल्यानंतर दुसर्या दिवशी ताब्यात दिले गेले ,किरण च्या आई ला फक्त अपघाताची कल्पना देण्यात आली होती .
त्या रात्री गावात वीज नव्हती ती दुसर्या दिवशी संध्याकाळीच आली. सर्व गावकरी म्हणत होते कि , पहिल्यांदा असे झाले कि गाव इतका वेळ अंधारात राहिला किरण नाहीये म्हणून च… किरण गेला तो गावात अंधार करून आणि कुटुंबाला अंधारात ढकलुन.
किरण च्या मृत्यू चा धक्का सर्वानांच बसला पण जास्त धक्का होता तो त्याच्या आईला. त्या माउलीचे कुंकू आधी गेले त्यानंतर शेंडेफळ प्रवीण आणि आता किरण. तिचा शोक शब्दात मांडणे कठीण आहे.
किरण गेल्या नंतर सर्वात जास्त फरफट या माउलीची झाली. पुण्यात ती प्रवीण च्या पत्नी सोबत राहते , प्रवीण ची पत्नी कामाला जाते तर तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आणि तिला सोबत पण. आता प्रश्न होता कि गावाकडे किरण च्या पत्नी जवळ कोण थांबणार ? किरण च्या पत्नी चे शिक्षण दहावी पण तिने प्रवीण च्या पत्नी चे पार्लर ती आधी पासून चालवत होतीच ते आणि शिलाई काम हि सुरु केले.
किरण च्या जागेवर तिला रुजू करणार असे आश्वासन पोस्टाच्या लोकांनी किरण च्या अंत विधीच्या वेळेस केले होते . दोन वर्षे उलटली तरीही अजून रुजू करण्यात आले नाहीये , सुरुवातीला दोन महिने घेतले आणि पुन्हा ब्रेक दिला गेला . पार्लर आणि शिलाई यातून फार काही उत्पन्न होत नाहीये, आणि पोस्टाच्या आशेवर गाव पण सोडवत नाहिये. किरण ने पोस्टात कायमस्वरूपी होण्यासाठी परीक्षा दिली होती , तिचा निकाल येण्याआधी च काळाने घाला घातला त्यiमुळे पोस्टात किरण च्या पत्नी च्या जोब चे पण काही होत नाहीये, जर तो कायमस्वरूपी लागला असता पोस्टात तर त्याच्या पत्नीचे काम लवकर झाले असते.
इकडे प्रवीण ची पत्नी बी ए या शैक्षणिक अहर्तेवर वीज मंडळात करार बेसिसवर कामाला आहे . प्रवीण च्या पत्नी सोबत पुण्याला त्या माउलीला थांबायला लागणार त्यामुळे असा तोडगा निघाला कि किरण च्या पत्नी चे वडील तिच्या सोबत गावाला राहतील (तिची आई काही वर्षापूर्वी च गेलीये आणि एक भाऊ त्याच्या पत्नी मुलां सोबत राहतो तर वडिलांनी किरण च्या पत्नी सोबत राहायला काही हरकत नाहीये). पण जेव्हा तिच्या वडिलांना काही कामा निमित्त मुलाकडे जावे लागते तेव्हा या माउलीला पुण्याहून गावाकडे आणि पुन्हा पुण्याकडे असा प्रवास नेहमीच करावा लागतो .
आपल्या काही परंपरा या किती दुख: दायक असतात याचा अनुभव यायला लागला. या घरी गणपती आणि गौरी बसते . परंतु किरण गेल्या नंतर घरात कोणी हि पुरुष नाही फक्त स्त्रिया आणि त्याही अभागी विधवा , त्यामुळे गौरी बसवता येणार नव्हती , कारण शास्त्रात फक्त सवाष्ण स्त्री हि च गौरी चे आवाहन करू शकते असे सांगितले आहे . ब्राह्मणाच्या सांगण्यावरून गौरी कपाटात ठेवण्यात आल्या,कमीत कमी १५ वर्षासाठी,जेव्हा किरणच्या मोठ्या मुलाचे लग्न (त्याचे वय वडील गेले तेव्हा आठ वर्ष ) होईल तेव्हाच गौरी बसवता येतिल. यामुळे प्रत्येक गणपती उत्सवामध्ये जखमेवरची खपली काढली जाते.अजून एक शास्त्रातील पद्धत जी मला खूप खटकते ती म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा वारला कि त्याला पुरताना त्या स्त्री च्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यातील एक मनी नवर्या बरोबर पुरायचा आणि मंगळसूत्र पण दुसर्या एका विधवा स्त्रीनेच तोडायचे.( जेव्हा प्रवीण वारला तेव्हा त्याची पत्नी त्याला पुरत असताना आधीची पूर्ण रात्र आणि पुरायला आणले तोपर्यंत बिचारी रडत होती ती जरा शांत झाली होती तेव्हाच स्वामी जे मृत व्यक्तीचे विधी करत होते त्यांनी सांगितले कि तिच्या गळ्यातले मंगळसूत्र तोडा आणि एक मनी द्या त्यावेळेस पुन्हा एकदा एक कल्लोळ झाला रडारडी चा आणि प्रवीण च्या पत्नी सोबतच इतर स्त्रियाहि भयानक रडल्या होत्या.त्यावेळेस काहीतरी हरवत आहे आपल्या पासून दूर जात आहे अशी जाणीव झाली आणि हेच पुन्हा किरण अंत विधीच्या च्या वेळेस घडले आणि त्याच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडायला घरातलीच स्त्री होती तिथे .... किती भयानक परिस्थिती कल्पना करून पहा. )
एवढे होऊनही नियतीने अजून बरेच काही वाढून ठेवले होते…
क्रमश:
वाचने
4262
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप्रे !!
बापरे...
प्रचंड यश, सत्ता, संपत्ती,
सहमत...
In reply to प्रचंड यश, सत्ता, संपत्ती, by प्यारे१
वाचतोय
दुखद घटना
वाचत आहे...
जालीम उपाय.
धन्यवाद...
In reply to जालीम उपाय. by प्रभाकर पेठकर
ओ काका,
In reply to जालीम उपाय. by प्रभाकर पेठकर
निष्क्रियता आणि प्रयत्नशीलता...
In reply to ओ काका, by प्यारे१
शत प्रतिशत सहमत.
In reply to निष्क्रियता आणि प्रयत्नशीलता... by प्रभाकर पेठकर
दैव /नशीब /शाप वैयक्तिक माझा प्रश्न (यात कुटुंबाचा सहभाग नाहीये)
मी इथे नमूद करू इच्छिते कि
In reply to दैव /नशीब /शाप वैयक्तिक माझा प्रश्न (यात कुटुंबाचा सहभाग नाहीये) by स्वीत स्वाति
'लेबल' लावण्याचे प्रयोजन काय?
In reply to दैव /नशीब /शाप वैयक्तिक माझा प्रश्न (यात कुटुंबाचा सहभाग नाहीये) by स्वीत स्वाति
+१०!
In reply to 'लेबल' लावण्याचे प्रयोजन काय? by प्रभाकर पेठकर
त्यांच्या धडपडीला मदत होईल असे काय करता येईल' ह्यावर उहापोह व्हावा.जे घडलं ते घडून गेलं, भूतकालच्या दु:खद घटनांमधून शिकावं जरूर, पण त्यांतच गुंतून न राहता भविष्य कसं बदलता येईल हे पहाणं आधिक महत्वाचं आहे असं वाटतं. मन हलकं होण्यासाठी लिहा जरूर, पण यातून बाहेर कसे पडलात किंवा त्या दिशेने काय प्रयत्न केले जात आहेत, ते पुढील लिखाणात वाचायला मिळेल अशी आशा आहे.हे दु:ख फार मोठे आहे हे
नक्कीच
In reply to हे दु:ख फार मोठे आहे हे by असंका