Skip to main content

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 17/11/2014 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

वाचने 33379
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन हेल्मेट न घालणारे मठ्ठ अस प्रमाण असणार आहे !!! शॅम्पेन आजोबा :काही शंका १) पुण्यात हेल्मेट घालणारे सर्वच जण मठ्ठ नसतात हे कशावरून? २) सर्व लठ्ठ माणसे हेल्मेट वापरतात हे कशावरून? ३) लठ्ठ लोक असणारे पुणे म्हणजे नक्की कोणते पुणे अभिप्रेत आहे. नदिच्या अलिकडचे? ( लाल देवळापर्यन्तच फक्त) की आणखीन नदिच्या अलीकडचे ( लाल देवूळ ते मगरपट्टा व्हाया बंडगार्डन )? नदिच्या पलीकडचे ( डेक्कन ,नळस्टॉप , कर्वेनगर ,कोथरूड , पौड रोड भुसारी कॉलनी सहीत) की मग नदी पलीकडचे हुच्च पुणे ( बाणेर , औंध हिंजेवाडी इ. ) पिंची, हडपसर ,खडकी , विश्रान्त वाडी हे भाग कोणत्या पुण्यात ठेवायचे यावर तज्ञांचे दुमत आहे. ९ बहुतेक हे भाग बारामतीशी सल्लग्न आहेत)

In reply to by विजुभाऊ

अहो विजुभौ उर्फ खापर पणजोबा , तुम्ही आजिबात पुणेकर नाहीत हे ठामपणे सांगू शकतो दर खेपेस मागच्या खेपे पेक्षा पुण्यातील वाहतूकीची आधिक-आधिक लागलेली वाट आणि जागो जागी सहज दिसून येणारी "बाळसेदार" (पिठुळ पोती टाइप) माणसे सहजपणे नजरेस पडतात.. जास्त वेळ भु'गोला' वर वाद घालताना आपण गोल झालोय हेच कळल नसणार !! असो आपल्याला काय बुवा त्याच.. (मस्तानीप्रेमी) माझीही शॅम्पेन

माहीत नाय बा!! आम्ही आपलं आठवड्यातनं तीनदा तरी वजनं उचलायला जातो, दोरीउड्यांचे १५० चा एक असे तीन सेट करतो, घरी येऊन ओटमील खातो. ;)

In reply to by सूड

माझी एक पुणेकर आतेबहीण 'हुजूरपागा' नावाच्या शाळेत जायची, तर तिचा पुणेकर भाऊ तिला आणि तिच्या मैत्रिणींना 'हुजूरपागेतल्या घोड्या' म्हणायचा!

In reply to by सस्नेह

हे समीकरण गैरलागू आहे हो. अट बघा ना, गाढव (मुंबैकर/exमुंबैकर) घोड्यांच्या तबेल्यात (पुण्यात) बांधल्याने त्याचा घोडा (पुणेकर) होत नाही.

पुण्यात दोन दोन बारीक माणसं आहेत ??? कै च्या कै ...

१)सतत खाण्यापेक्षा सतत खाण्याचाच विचार करणं यामुळे लठ्ठपणा येतो. २)जिवाला काहितरी विवंचना असावी. पाच पोळ्या खाल्यास पहिल्या तीन पचतील का या काळजीने दोन पोळ्यांची शक्ती वापरली जाते आणि मेद वाढत नाही. जाणकार आणखी सांगतीलच.

सगळे पुणेकरांवर खार खाउन का असतात देव जाणे ? नसेल झेपत तर नका राहु ना पुण्यात ... कोणीसक्क्ती केलीये का ? बाकी माझ्या माहीती नुसार ही माहीती चुकीची आहे , पुण्यात अजुन तरी ओबेसीटी इतकी तीव्र नाहीये !

In reply to by गौरी लेले

>>> खार खाउन वजन वाढायला लोणच्याचा खार सुद्धा कारणीभूत असतो बहुधा! मला कल्पना नाही. काटा मोडला मागच्या वेळी वजन करायला गेलो तेव्हापासून वजन करत नाही. ;)

In reply to by प्यारे१

लोणच्याच्या खारावर टिप्पणी केलेली होती. >>> पण त्याचा वजन वाढीशी ( विशेषतः पुण्यातल्या ) काय संबंध ?

In reply to by गौरी लेले

पुन्याचं कोन काय बोल्लंय काय तै? आमी खाराचं बोल्लो व्हतो ना! खारामधे लई त्याल, लई मीठ आस्तंय.तेनं कोलेस्टेरॉल वाडतंय आनि वजन पन असं म्हनतेत. आमाला कल्पना नै. आसं म्हनलो. तुमी मूळ पुन्याच्याच का ?

In reply to by गौरी लेले

खारीसारखा बिचारा क्यूट जीव....त्याला खातं का कुणी? हे पुणेकर म्हणजे ना, वाट्टेल त्या कल्पना करतात. तदुपरि-भारतीय संविधानानुसार आम्ही अख्ख्या भारतात कुठेही जाऊयेऊ, पुण्यात रहा वा नका राहू हे कुणी सांगायचं काम नाही. पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर इतका फणकारा असेल तर स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन मग बोला. कसें?

In reply to by बॅटमॅन

पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर इतका फणकारा असेल >>> लेले ... म्हणजे सदाशिव पेठी असतील रे त्या म्हणुन राग आला असेल त्यांना !

In reply to by प्रसाद गोडबोले

>> म्हणजे सदाशिव पेठी असतील रे त्या म्हणुन राग आला असेल त्यांना ! हो तर !! त्या लेले आणि तुम्ही गोडबोले...तुमच्याशिवाय कोण नीट ओळखणार त्यांना! ;)

In reply to by सूड

त्या लेले आणि तुम्ही गोडबोले
पण आम्ही शनिवार पेठेतील आहोत तेही सातार्‍याच्या , त्यातही वरच्या शनिवार पेठेतले ... जमीन आस्मानचा फरक आहे ...अगदी देशस्थ कोकणस्थ इतका फरक आहे ;) :D

In reply to by बॅटमॅन

@स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन मग बोला.कसें?>>> आपल्याला-स्व तंत्र,असे म्हणायचे होते काय??? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/tongue-in-cheek-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

होंय!!!! इतकें असतां स्वतंत्र जागीर करोन घ्यावी, त्यास पेस्तर बोभाट आलियास उपराळा तेणेंगुणें तेथेंच काढतां येईल.

मिपाकरांमधे लठ्ठपणाचं प्रमाण काय आहे ? एकूण आणि पुणेरी मिपाकरांमधे.

In reply to by टवाळ कार्टा

अरे बाप रे! एवढे आहेत? मला माहीतच नव्हतं! :-D

In reply to by कवितानागेश

दु दु is अगोबा, स्पा is just वशाड मेलो !! ;)

पुण्यामध्ये जिमची संख्याही वाढते आहे . पण त्या बद्दल कोण बोलणार नाही .

असं कसं, असं कसं? उगाच नावं का ठेवायची? आता केस विंचरताना, आरशात दोन्ही कान दिसत नाहीत, पॅंट जरा मोठ्या आणाव्या लागताहेत, तर लठ्ठ लठ्ठ म्हणून चिडवू नये कोणी..!! सकाळी फिरायला गेल्यावर उगाच चार दोन बटाटेवडे, घरी आल्यावर चहासोबत उगाच डिशभर पोहे, जेवणात चार पाच पोळ्या, उगाच जरासा भात, बाधू नये म्हणून तूप, संध्याकाळी फिरताना भेळ वगैरे, आणि रात्रीचे थोडेसे जेवण... एवढ्याश्याने कोणी लठ्ठ होतं का?

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!
जर तीन माणसांच्या मागे असलेला माणूस दिसत असेल तर तो खरंच खूप लठ्ठ, नाहीतर कमीत कमी पुढच्या माणसांपेक्षा जास्त उंच असणार ! हे झालं एक साधं विश्लेषण. परतू खरा प्रश्न असे आहेत... १. हे "पुणो" आहे तरी कुठे ??? २. त्या माणसाला तीन माणसांच्या मागे उभे राहण्यास भाग पाडण्याचा अन्याय कोण करत आहे ? त्यालाही इतरांबरोबर पुढे उभे राहण्याचा लोकशाही हक्क असला पाहिजे... मग तो लठ्ठ असो की उंच, काही फरक पडत नाही. इतका अन्याय होऊनही शासन अजून का बरे झोपलेले आहे ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गजोधरांच "णो" ह्या शब्दावर पगल्या सारखं प्रेम आहे. आता हेच बघा ना...संगणकावर बसणो, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो ई. तसचं ते पुणो. आपल्या माणसांना सॉरी मिपाकरांना आपणोच समजून घ्यायचो हो...

In reply to by दिपक.कुवेत

गल्तीसे मिस्टेक हुएला हय. लठ्ठपणा =>जाड बोटे =>मोबैलवर टंकताना होणार्या चुका

In reply to by दिपक.कुवेत

गजोधरांच "णो" ह्या शब्दावर पगल्या सारखं प्रेम आहे. आता हेच बघा ना...संगणकावर बसणो, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो ई. तसचं ते पुणो. आपल्या माणसांना सॉरी मिपाकरांना आपणोच समजून घ्यायचो हो... अक्षरशः खाली पडतोय की काय इतके महाभयंकर हसलो. कंट्रोलच होईना... :-)

पुणेकरांनी पुन्हा सायकली चालवायला घ्याव्यात.नाहीतरी पुणे सायकलींचे शहर म्हणून ओळकह्ले जायचेच.उत्तम व्यायाम होतो.बायकांना,मुलींना तोंडाभोवती तो दहशतवादी स्कार्फ गुंडाळायची गरज नाही.अर्थात त्यासाठी गाड्यांचे प्रमाण कमी करावे लागेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बायकांना,मुलींना तोंडाभोवती तो दहशतवादी स्कार्फ गुंडाळायची गरज नाही.
हेच एखाद्या पुरुषाने म्हटले असते तर "घरातल्या स्त्रियांची आठवण येऊन मन द्रवलं कसं नाही" छाप प्रतिक्रियांचा पाऊस पडला असता. (माईसाहेब व नेफळट नानासाहेबांचा फॅन) बॅटमॅन.

नाय हो खरच म्हणता आहेत ते. गाड्यांमुळे खुप प्रदुषण होते आणि त्यामुळे स्किन, केस खराब होतात ना. म्हणुन बायका बांधतात तसा स्कार्फ. आता दहशदवाद्यांनी केली ही फॅशन फॉलो तर काय बिघडले. (निष्पाप) त्रिवेणी