Skip to main content

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 17/11/2014 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

वाचने 33379
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by पिवळा डांबिस

बेक्कार हसतोय पिडा काकांच्या ह्या वाक्यावर.... :D लोक्स आता तरी धागा पुर्ण वाचून, समजून "मी पयला" लिहित जा!!!!

In reply to by विलासराव

प्र.१ लठ्ठ म्हणजे काय ? प्र.२ लठ्ठालठ्ठी म्हणजे काय ?

अच्छा? म्हणजे मी तिघांमधला एक आहे होय? मला वाटायचे मी लाखांमधला एक आहे! :-P

In reply to by एस

आता मी पयला झालो, पण पिडांकाकांचा प्रतिसादपण उगीच उडाला. ओल्याबरोबर सुकं पण... असो! भारी होता. परत टाका हो! अमुच्यच ना? :-D

In reply to by एस

कशाला परत टाकायचा? ज्या कोणी उडवला असेल तो पुनःप्रकाशित करेलच की!! नायतर मग बघू काय करायचं ते! काय?

विलासराव मोजणी झालेल्या पुणेकरात तुम्ही " पयले " का ?

आप कौनसे नंबर पे आते हो? पहले ३ में या उसके बाद? बाय द वे आम्हाला (पक्षी: मला) लठ्ठ आणि त्यातुन पुणेकर म्हटल्यावर एका व्यक्तिची प्रकर्षाने आठवण झाली आहे...

In reply to by दिपक.कुवेत

कोन बर्र दीपक-काका ? सांगा तरी बरे, तुमच्या डोळ्यासमोर कोण ते ? . . दरम्यान माझ्या बाजूचा म्हणतो, पुणेकर तरी बरे, तिघातला एकच लठ्ठ. नागपूरमध्ये तर दर ऐका नागपूरकरामध्ये तीन लठ्ठ ! असे म्हणतोय.

पुणेकर " लठ्ठ " होत आहेत हे सांगण्यासाठी किंवा लठ्ठ पुणेकरांची संख्या मोजण्यासाठी कुठल्या संस्थेची गरज नाही. संध्याकाळी पुण्यात लागणार्या " वडापाव " च्या गाड्या आणि त्याभोवती उभे असलेले पुणेकर यावरुन ही गोश्ट सहज लक्षात येते.याशिवाय पुण्यात वाढणारी " Hotel " ची दिवसागणिक वाढणारी संख्या यावरुन पुणेकर हे " लठ्ठ " होत आहेत हे दिसतेच आहे.

In reply to by बॅटमॅन

वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय?
हुं, वडापावमधे थोडीच 'शिकरण आणि मटार उसळ' सारखी पोषकमुल्ये मुल्ये कुठे आहेत ? मग बोडी कशी पोसणार ?

In reply to by हरकाम्या

@हरकाम्या पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी फिरायला गेलो होतो तेथे एकाला एक खेटून असलेली हॉटेलं पाहून पुण्यात बायका संध्याकाळी स्वयंपाक करीत नाहीत कि काय अशी एक शंका मनात येऊन गेली ( पण उघड बोलायची हिम्मत झाली नाही--पुण्य नगरी सोडून आठ वर्षे झाली असल्याने वाद घालायची शक्ती आता राहिली नाही)

In reply to by हरकाम्या

खबरदार ! पुण्यातल्या लोकांची अशी निंदा केल्यास अति भयानक मानव संहारक अस्त्रे सोडण्यात येतील.

In reply to by एस

@ते दोन पुणेकरांमागे एक चिंचवडकर>>> =))))) अहो...पण ते ऑलरेडीच लठ्ठ आहेत.. अता तुम्हाला त्यांना गलेलठ्ठ म्हणायचे असेल..तर बघा व्बॉ! :-D

आता कराचं काय !?

In reply to by वेल्लाभट

सोपं आहे....पहिल्या ३ मधेच रहायचा प्रयत्न करायचा!!! (अर्थात तुम्हि पुणेकर असाल तरच हि अट लागू)

बरे झाले घाई-घाईत " मठ्ठ "असे वाचले होते (नसता गदारोळ होता-होता वाचला म्हणायचा!!!) बाकी बॅट्या मोड ऑन "पुण्यात वाढणारी " Hotel " ची दिवसागणिक वाढणारी संख्या यावरुन पुणेकर हे " लठ्ठ " होत आहेत हे दिसतेच आहे. हा निक्शर्ष फारच रोचक आहे बॅट्या मोड ऑफ. बाकी नेहमीप्रमाणे पुणे आणि अ-पुणे असा वळणावर धागा जाईलच.

In reply to by दिपक.कुवेत

"पुणेकरांमध्ये जनजागृती" म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे, मी पगला आहे हे कबूल, पण येवडापन पगला नाय आपन !

This is not funny ... परवाच दिवाळीची खरेदी करायला कपड्यांच्या दुकानात गेलो अन मला साक्षात्कार झाला की आता मलाही स्लिम फिट शर्ट्स बसत नाहीयेत :( ढेरीची गोलाई ४- ५ महिन्यांची वाटायला लागलीये आता ... *dash1* काही तरी केलं पाहिजे राव :( आता परत पळायला सुरुवात केली पाहिजे

In reply to by प्रसाद गोडबोले

>>काही तरी केलं पाहिजे राव आता परत पळायला सुरुवात केली पाहिजे च असं नुसतं म्हणत राह्यलात तर काय्येक होणार नाही गिर्जाकाका!!

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!
हे 'पुणो' कुठे आहे बरं?

In reply to by एस

पुण्यालाच काय सोनं चिकटलंय बघू ना!

In reply to by पैसा

या धाग्यात जर पुणे नसते तर कुणी ढुंकूनही पाहिले नसते. अ‍ॅग्री ऑर नॉट? कल्पना करून पहा, म्हणजे, 'तीन रत्नागिरीकरांमागे एक लठ्ठ!', 'तीन सांगलीकरांमागे एक लठ्ठ!', 'तीन नागपूरकरांमागे एक लठ्ठ!' किंवा अगदी 'तीन मुंबईकरांमागे एक लठ्ठ!'... असे काहीसे शीर्षक असते तर?

In reply to by पगला गजोधर

पुण्यनगरीत एक चहा फुकट मिळवण्यासाठी मला गोवा ते पुणे तीन फेर्‍या मारायला लागल्या. ते पुणेकर स्वतः पण काय खात असतील असं वाटत नै! मग लट्ठ कसे होतील?

In reply to by पैसा

दुसर्‍यांना काय देत नाही म्हंजे स्वत: काय खात नसणार हा समज जरा चुकीचा नै का वाटत? आठवा बरं तुम्ही शन्वारवाड्यावर आणलेली काजूची पाकीटं....किती वेळ तुमच्या डोळ्यासमोर राह्यली ;) झालंच तर कुंदा किती वेळात संपला?

In reply to by पैसा

'चहा फुकट मिळवण्यासाठी गोवा ते पुणे तीन फेर्‍या', मारण्याऐवजी, तिकिटाच्या(जर काढले असेल तर) रकमेत, वर्षभर घरीच तांब्याभर चहा परवडला असता किनै ?

In reply to by पगला गजोधर

त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच
हे मात्र खरं...आख्ख्या महाराष्ट्राचा गाळिव 'अर्क' पुण्यात जमा झाला आहे.. आणि हे सगळे स्वतःला पुणेकरच म्हणवतात ! रच्याकने, हे 'ऐकामाद्वितीय ' काय भानगड आहे ?

In reply to by सस्नेह

पूस्प्गूचाची बाय (तिच्या) सासूबैंच्या धाकानं हल्ली येत नाय इकडं. :-) काय बाय, खरां आसां ना?

In reply to by पगला गजोधर

पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच !
आणि पुण्यातले सगळेच "पुणेकर" ऐकामाद्वितीय??

अरे बापरे...... पुण्याबद्दल हे असले भलतेच काय ऐकायला मिळतय? पूर्वीचं पुणे राहीलं नाही आजकाल?

मी जर पुण्यात कुठला व्यवसाय चालु केलातर तो नक्कीच खाण्याशी संबधीत आसेल.एवढी खादाडी मी इतर कुठे पाहिली नाही.

In reply to by जेपी

@JP, या या तुम्हीपण दुकान टाका पुण्यात, मराठवाड्याचे धपाटे, शेगावची कचोरी, कोल्हापुरी मिसळ, मालवणी फिश, सांगलीची भेळ, धारवाडी पेढे, राजस्थानी कचोरी यांच्या सारखी कैक दुकाने आधीच हैत, त्यात तुमचं पण ऐक दुकान.

होय अगदी एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन हेल्मेट न घालणारे मठ्ठ अस प्रमाण असणार आहे !!! कृपया ह. घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

ह.घ्या.ची काही गरज नाहीये. हेल्मेट न घालणारे फक्त मठ्ठच नसतात तर गाढव, अडेलतट्टू, बिनडोक आणि रा.गां. ही असतात.