Skip to main content

हेल्मेटसक्ती

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 13/11/2014 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

वाचने 137491
प्रतिक्रिया 360

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दुभाजक ओलांडून देखील अभ्य़ंकर वा पेंडसे यांच्या सारख्याना उडवले गेले पण दुभाजक बरेच काम करून जातात. चिंचवड येथील बिग बझार समोर शक्य असताना पादचारी बिनदिक्कतपणे महामार्ग ओलांडून दुचाकी व चारचाकी यांच्या चालकांच्या उरात धडकी भरत असत. आता इथे इतके उंच कुंपण करण्यात आले आहे की पादचारी भुयारी मार्गाचा वापर झक मारीत करतात. आजही दंड करण्यापेक्षा वहातुक पोलिसानी मनात आणल्यास झेब्रा क्रॉसिंगवर लोक गाड्या आणणार नाहीत. पण आपल्याकडे दंड ही एक अर्थव्यवस्था झाली आहे. विशेषत: १५ जानेवारी नंतर ३१ मार्व पर्यंत दंड उद्दीष्ट ठरविण्यात येते. हे एक ओपन सिक्रेट आहे. लोकाना चौकात मार्गदर्शन करण्यात वहातुक पोलिसाना काडी इतका रस नाही. त्यांना दंडाचे राज्य हवे आहे .मी अनेक पोलिसांशी बोलून पाहिले पण " काय करायचंय ...लोक कधी सुधारणार नाहीत !" असे संवाद होतात.पोलिसाना खरेच इतका हेलमेट या विषयात रस असेल तर ही मोहिम दोन तीन वर्षे त्यानी लावून धरली पाहिजे पण ती मुळातच कायद्याचे भूत नाचवत कोणाच्या तरी " आदेशाने" गाजते आहे. सध्या तरी हेलमेट विक्रीत काही फरक नाही असे विक्रेते म्हणत असले तरी त्यात फरक आजमावला जाईल. ते इप्सित साध्य झाले की पोलिसांच्या उत्साह परत मालवाहू गाड्याकडे वळेल. ये जो पब्लिक है वो सब जानती है ! आपले स्वयंशिस्तीचे स्वप्न भारतातही पुरे होईल. शास्ता तत्र दुर्लभः

In reply to by चौकटराजा

सहमत हेल्मेटसक्ती ऐवजी वाहतूक नियम पाळण्याची, खड्डेविरहीत रस्ते असण्याची, रस्ते पुरेसे रूंद व समपातळीत असण्याची सक्ती हवी. पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा. दुचाकीचालक आधीच खड्ड्यांमुळे व अरूंद आणि उंचसखल रस्त्यांमुळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात आता हेल्मेटसक्तीची भर. बुरे दिन आ गये!

In reply to by श्रीगुरुजी

पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा. दुचाकीचालक आधीच खड्ड्यांमुळे व अरूंद आणि उंचसखल रस्त्यांमुळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात आता हेल्मेटसक्तीची भर. बुरे दिन आ गये!
समजा असे झालेच...तरी पुणे तर मग पुणेकर दुचाकी (की "गाडी"??) नियमांनुसार चालवायला सुरु करतील?? :)

In reply to by श्रीगुरुजी

पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा.
श्रीगुरुजी यांच्या या प्रतिसादाला +१ *good*

पुणेकर हे पुणेकर आहेत. त्याना फक्त त्यानीच स्वयंप्रेरणेने लागुकेलेले नियमच लागु होतात. उदा: सवाईला वडापाव खायचा असतो , दगडूशेठ हे हलवायाचे नाव नसून गणपतीचे नाव आहे.

दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे ...... :) तुमचे निरिक्षण म्हणजे नेमके कोणते निरिक्षण ? अआणि त्याच्यावर विसंबुन कायदा बदलायचा ?

In reply to by hitesh

चिंचवड ते शिवाजीनगर या मार्गावर बसने मी २२ वर्षे प्रवास केला आहे. त्या मार्गाची अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. दुभाजक नव्हते तेंव्हा जवळ जवळ रोज एक दुचाकीवाला सापडत असे अपघातात. आता ते प्रमाण नगण्य आहे. या रत्यावरून वहान चालवणे हा एक आनंद झालेला आहे. अपघाताची तीन मूल कारणे अशी त्यावर डोकटरेट केलेल्या दं सिं, पसरेचा यानी सांगितली आहेत. एस टी ओ म्हणजे स्पीड , टर्न व ओव्हरटेक. स्पीडब्रेकर ( नीट केलेले), टर्न इंडीकेटर्स व दुभाजक या तीन साधनानी अपघाताचे प्रमाण कमी झालेले आहे. आमच्या निरिक्षणावर विसंबून कायदा करावा असा दुराग्रह आमचा नाही.

In reply to by चौकटराजा

आमच्या एमबी बी एस च्या पुस्तकातही अपघात कारणे प्रतिबंध इ बाबत चार गोष्टी दिल्या आहेत. अपघात टाळायला चार उपाययोजना कराव्या लागतात. १. एनविरॉनमेंट ... इथे या शब्दात रस्ते वगैरे गोष्टी येतात. २. टेक्नॉलॉजी ... म्हणजे वाहन सुस्थितीत असणे वगैरे ३. पर्सनल प्रॉटेक्शन डिवाइस .. बेल्ट , हेल्मेट इ ४. लिगल कंट्रोल .... कायदे इ या चारही गोष्टी वेगवेगळ्या फ्याक्टरकडुन केल्या जातात.. त्या एकमेकांवर अवलंबुन ठेउन करायच्या नसतात. म्हणजे सरकार रस्ते करत नाही व टाटा मोटर टायरची क्वालिटी बदलत नाही , तर ते लोक त्यांचे काम करत नाहीत म्हणुन मीही माझे काम करणार नाही , हे हेल्मेट न वापरण्याचे कारण होऊ शकत नाही. डिवायडर वगैरे क्र १ मध्ये सुधारणा केल्याने आले हे लक्षात आले असेलच.. म्हणजे सरकार या घटकाने काहीतरी सकारात्मक काम केले हेच तुम्ही मान्य करताय ना ? मग तुमची ड्युटी क्र. ३ ला विरोध का ?

In reply to by hitesh

अनेकांचा हेलमेट ला विरोध नाहीच . ते वापरायचे कधी याचे स्वातंत्र्य चालकाला असले पाहिजे. आता एक उदाहरण वेगळे देतो.ते " निरोध " वापरण्याचे. निरोध वापरा म्हणजे एडस होण्यास प्रतिबंध होईल असा प्रचार सरकार करू शकते ते वापरण्याची सक्ती करू शकत नाही. कायद्याने अशा कित्येक गोष्टी सक्तीने करता येणारच नाहीत. उदा विमा उतरवणे हे कायद्याने बंधनकारक करता येणार नाही. आयुर्विम्याला पर्याय नाही अशी जाहिरात करता येईल. गायी extinct झाल्या तरच गोवध बम्दी करता येईल . माझ्या हेलमेट घालण्याने माझे रक्षण होणे महत्वाचे नाही ते माझ्या मागे बसलेल्या " दुसर्‍या" चे रक्षण करू शकते की नाही हे महत्वाचे. यासाठी तर एस टी च्या ड्रायव्हरची मद्य चाचणी घाट सुरू होताना करतात. प्रवाशांची नाही. थोड्क्यात आतला मेंदू त्याची प्रवृती बदलण्याची ताकद हेल्मेट मधे नाही. ती फारशी कायद्यातही नसते ती संस्कारातच असते. माझी एक खात्री आहे की एरवी हेल्मेट टाळणारे हायवे वर बर्‍याच वेळा हेल्मेट वापरीत असतील.

In reply to by चौकटराजा

>>माझी एक खात्री आहे की एरवी हेल्मेट टाळणारे हायवे वर बर्‍याच वेळा हेल्मेट वापरीत असतील. होय माझेही तेच निरिक्शण आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जे चालक आणि ज्या चुका दुसऱ्या चा जीव घेण्याला कारणीभूत आहेत त्यांना पहिली फाशी सारखी कठोर शिक्षा देण्याचं कायद्यात प्रावधान करा आणि नंतर हेल्मेट सक्ती


जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / एखादा जवळचा मित्र अपघातातग्रस्त होत नाही आणि 'हेल्मेट असते तर...' असा प्रश्न पडण्याइतका मार लागत नाही (आणि अशा पेशंटच्या वेदना आपल्याला "अनुभवण्यास" लागत नाहीत) तोपर्यंत हेम्लेट वापरणे हे ऐच्छीक असावे.. सरकार कोण नियम करणार किंवा याचा फायदा, त्याचा फायदा वगैरे प्रश्न पडतात. एखादी केस जवळून पाहिली किंवा जीवावरचे थोडक्यात निभावले की असे प्रश्न पडत नाहीत. हेल्मेट हे सेकंड नेचर होवून जाते. "मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही.

In reply to by मोदक

"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही. आणि "मी नेहमी हेल्मेट वापरतो पण त्याची लोकांवर सक्ती करू नका" असे म्हणणारे "आयजीच्या जीवावर बायजी उदार" चा प्रयोग करत आहेत.

एक (कु)शंका. शीखांना सुद्धा हेल्मेट सक्ती करणार का? त्यांना पगडीमुळे हेल्मेट घालणे अवघड असावे. पण अपघातात पगडी डोक्याचा बचाव करू शकणार नाही. मग त्यांचं काय करायचं? का इथेही धर्माच्या आधारावर वेगळे नियम?

In reply to by श्रीगुरुजी

शिखांचे पगडी अशी बांधलेली(त्यात असलेले पेड) असते ते जरी दुचाकी वरुन पडले तरी डोक्याला मार लागत नाही.चेहरा वाचविण्यासाठी ते वायज़र लावतात

हम भारतीय सर पर हेलमेट पहने न पहने पर मोबाइल में स्क्रीन गार्ड और बॉडी कवर जरुर लगाते हैं। सर फट जाये खून की नदिया बह जाये पर मोबाइल को खरोंच तक नहीं आनी चाहिए ! !!! व्हौटस अप वरुन साभार

हेल्मेटसक्ती असावी का? नसावी. कारण... डोकं नसलेल्यांना त्याची गरज पडणार नाही. धन्यवाद!

एकेक प्रतिसाद वाचून खूप करमणूक झाली. पण धाग्यावरचे बहुतेक पुणेकर प्रतिसाद फक्त पुरूषांनी दिलेले दिसताहेत. पुणेकर भगिनी का गप्प आहेत अजून? की १. हा कायदा स्कूटी या वहानाला (?) लागू नाहिये? २. हा कायदा फक्त पुरूष चालकांनाच लागू होणारे? ३. जर तोंडावरून फडकं गुंडाळलेलं असेल तर हेल्मेटची सक्ती नाही असं काही कायद्यात आहे का? ४. "पुरूष, तुम लडो, हम हमारा फडका संभालते है", अशी काही भूमिका आहे? ५. आपले पुरुष उगाच हा येडपट वाद घालताहेत हे बघून भगिनी सुज्ञपणे मूक राहिल्यात? असं करू नका. तायांनो, आयांनो, आणि बायांनो, सुदिन सुवेळ पकाकाकांनी हा गोंधळ मांडलाय, तुम्ही विचार मांडायाला या!!!! :)

हेल्मेटच्या व्याख्या नीट केली आहे का कायद्यात? कारण मागे दिल्लीला एकदा एका स्कूटरवाल्याला डोक्यावर प्लास्टीकची परडी उपडी ठेऊन एका हाताने परडी व दुसर्‍या हाताने त्याची स्कूटर चालवताना याची देही याची डोळा बघितल्यानंतर अशी हेल्मेट्सक्ती नको रे बाबा म्हणावसं वाटलं होतं. दुसरी गोष्ट, हेल्मेटचं थोडंसं सिगरेट, तंबाकूसारखं आहे. त्यावर अशी सरसकट बंदी का बरं येत नाही? उत्तर सगळ्यांना माहीतच आहे.

सरकारला मधुनच एकदम नागरिकांच्या सुरक्षिततेचे भरते येते.एक कायदा केला की आपण मोकळे असा यांचा यात सांसद, आमदार, मंत्री सगळे आले. आता तर एकाने म्हणे हेल्मेट सक्तीला विरोध करणार्‍याना कोर्टाचा अवमान केल्याशी शिक्षा व्हावी असा पब्लिक क्राय पिटीशन केला आहे म्हणे. त्याच माणसाने २००८ साली कोर्टानेच मुंबईच्या फलाटांची उंची वाढवावी असा आदेश देउनही तो आदेश भारत सरकारने कचर्‍यात टाकला आहे, याबद्द्ल भारत सरकार विरूद्धच असा दावा दाखल करावा. जनेतला फक्त उत्तर दायित्व आहे प्रशासनाला नाही ही कसली भंपक लोकशाही ? अनेकांचे प्राण सरकारच्या दुर्लक्षामुळे गेले आहेत यात सरकारला काय विकृत आनंद मिळतो कळत नाही.

Motor Vehicles Act, 1988 च्या Section 129 नुसार हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे गुन्हा आहे. या अर्थाने पुणेकर कायद्याचा विरोध देखील करत आहेत. अधिक इकडे :- Motor Vehicles Act, 1988 Section 129 in The Motor Vehicles Act, 1988 Penalties under MVA { क्रमांक १८ पहा}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }

In reply to by मदनबाण

पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर घेतात त्यानी दोन गोष्टी लक्षात घ्याव्या. १. पुण्यात सार्वजनिक वहातुक मुंबईएवढी चांगली नाही . व विकसित ही नाही. त्यामुळे सक्तीचा जास्त विरोध पुण्यात होतो. २. नुकताच मी मुम्बईस गेलो होतो व साधारण अर्धा तास क्रॉफर्ड मार्केट समोर उभा राहून निरिक्षण केले तर जवळ जवळ निम्मे दुचाकीस्वार हेलमेट विना होते. व पोलीस शांतपणे पहात होते. मुंबईत सगळीकडे हेलमेट सक्तीचे केल्यास पिलियन व रायडर दोघांचे हेल्मेट्स गाडीवर घातल्यास गाडीची पार्किम्ग मधील रुंदी वाढून आणखी अनवस्था प्रसंग मुंबईकरांवरही ओढवेल. व हेल्मेट स्वतः बरोबर न्यायचे झाल्यास लोकल गर्दीत कसे घुसता येईल याचा विचार पुणेकरांवर फालतू टीका करण्यापूर्वी करावा. आमचा एम व्ही कायदा १९८८ बरोबर २२ वर्षे संबध आला आहे. त्यातील सर्वच प्रोव्हीजन अमलात आणावयाच्या झाल्यास पुणेकर व मुंबईकराना एव्हरेस्टवरच रहायला जावे लागेल.

In reply to by चौकटराजा

पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर घेतात त्यानी दोन गोष्टी लक्षात घ्याव्या. गंमतच आहे,जर महाराष्ट्रातल्या इतर शहरात लोक हेल्मेट घालुन कुठलीही कारणं आणि इतर सबब न सांगता प्रवास करु शकतात तर पुणेकरांनाच या गोष्टीच वावडं का आहे ? कायदा हा समान असल्याने पुणेकर आणि बिन पुणेकर हा विचारच चुकीचा आहे. पुण्यात सार्वजनिक वहातुक मुंबईएवढी चांगली नाही . व विकसित ही नाही. त्यामुळे सक्तीचा जास्त विरोध पुण्यात होतो. हेल्मेटचा आणि सार्वजनिक वाहतुकीचा काय संबंध ? नुकताच मी मुम्बईस गेलो होतो व साधारण अर्धा तास क्रॉफर्ड मार्केट समोर उभा राहून निरिक्षण केले तर जवळ जवळ निम्मे दुचाकीस्वार हेलमेट विना होते. व पोलीस शांतपणे पहात होते. मुंबईत सगळीकडे हेलमेट सक्तीचे केल्यास पिलियन व रायडर दोघांचे हेल्मेट्स गाडीवर घातल्यास गाडीची पार्किम्ग मधील रुंदी वाढून आणखी अनवस्था प्रसंग मुंबईकरांवरही ओढवेल. व हेल्मेट स्वतः बरोबर न्यायचे झाल्यास लोकल गर्दीत कसे घुसता येईल याचा विचार पुणेकरांवर फालतू टीकाकरण्यापूर्वी करावा. चांगल निरिक्षण केलेत,पोलिसांना हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्‍या पकडायचे हेच एक काम उरले आहे,आधिच त्यांच्यावर ताण जास्त आहे त्यात ह्याची भर ! बाकी मी सुद्धा निरिक्षण करतो बरं का... आणि माझ्या देखत अनेक दुचाकी स्वारांना हेल्मेट न घातल्यामुळे पकडले आहे, तर मी स्वतः हेल्मेट घालुन प्रवास करतो तरी सुद्धा लायसन्स, पीयुसी आणि गाडीची कागदपत्रे पडताळण्यासाठी अनेकवेळा थांबवले आहे,अगदी पावसाळ्यात सुद्धा. इतके वर्ष मी हेल्मेट वापरतोय आणि ते घेउन कुठेही प्रवास करताना मला त्रास झाला नाही. बँक, मॉल, मंडई, इं अनेक ठिकाणी हेल्मेट न्यायला त्रास झालेला नाही. बाकी पुणेकरांपेक्षा ट्रेनच्या प्रवासाचा जास्त अनुभव मुंबईकरांनाच आहे... त्यामुळे रेल्वेच्या प्रवासात इतक्या वेगवेगळ्या वस्तु घेउन जाताना मी पाहिले आहे त्यापुढे हेल्मेट काय चीज आहे ? आमचा एम व्ही कायदा १९८८ बरोबर २२ वर्षे संबध आला आहे. त्यातील सर्वच प्रोव्हीजन अमलात आणावयाच्या झाल्यास पुणेकर व मुंबईकराना एव्हरेस्टवरच रहायला जावे लागेल. नवलं आहे... इतका संबंध असुन सुद्धा फालतु कारणे देणे चालुच आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

In reply to by मदनबाण

इतका संबंध असुन सुद्धा फालतु कारणे देणे चालुच आहे.
नसेलच मानायची गोष्ट एखादी तर कारणं मिळतच जातात व्यक्तीला....

पुण्यात सार्वजनिक वहातुक मुंबईएवढी चांगली नाही . व विकसित ही नाही. त्यामुळे सक्तीचा जास्त विरोध पुण्यात होतो. हेल्मेटचा आणि सार्वजनिक वाहतुकीचा काय संबंध ?
मुळातच पुण्यातील सार्वजनिक वहातुक अतिशय बेभरवशी आणि भोंगळ आहे त्यामुळेच कात्रज्-कोथरूड्-आनंदनगर-सिंहगड रस्ता ते चाकण्-रांजण्गाव्-तळेगाव (मावळ)असा प्रवास अत्यंत नाईलाजाने दुचाकीवर करावा लागतो हे नजरेआड करून चालणार नाही. अगदी बहुचर्चीत "बस्-दिन (का दीन)" दिवशी प्रशासन चिंचवड(वाल्हेकरवाडी)तून थेट भोसरीपर्यंत बस देऊ शकले नाही. तस्मात पुण्यात दुचाकी हे कुटुंब वाहन आहे आणि हेल्मेट सक्ती हाच (फक्त्)त्यावरील उपाय नाही. ईतके प्रवाशी उपलब्ध असताना पिएम्पील कायम तोट्यातच का ? याचा कधीही कुणीही का विचार केला नाही? का सगळीकडेच सार्वजनिक वहातुक तोट्यात आहे?

In reply to by नाखु

>>>ईतके प्रवाशी उपलब्ध असताना पिएम्पील कायम तोट्यातच का ? याचा कधीही कुणीही का विचार केला नाही? फालतू कारणांवरून गोंधळ घालणे इतके साधे कारण आहे हो... आठवा, जेव्हा एसी वोल्व्हो सुरू केल्या तेव्हा त्यांचा दर जवळपास तिप्पट ठेवण्यात आला होता (जे अर्थातच योग्य होते) पण अतिशहाण्या पुणेकरांनी आंदोलने करून तो दर साध्या पीएमटीच्या दराजवळ आणायला लावला. हळूहळू एसी बंद, फुटलेल्या काचा न बदलणे, दरवाजे खराब होणे, पुढचा थांबा सांगणारी यंत्रणा बंद होणे वगैरे होत आता ती वोल्व्हो म्हणजे जरा बरी पीएमटी इतकाच अर्थ राहीला त्याला. तुम्हाला आहे त्या पब्लिक ट्रान्सपोर्टने जायला नको वाटते - केवढी ती गर्दी, गाड्या मेंटेन केल्या जात नाहीत धूर सोडतात वगैरे कारणे लगेच सुरू. नव्या चांगल्या सोयीच्या गाड्यांना जास्त भाडे पण भरायला नको, लगेच सामान्यांना वंचित ठेवले वगैरे ओरड सुरू. डबल ढोलकी बडवणे यापलीकडे काही जमते का या आंदोलन छाप लोकांना? असेल की तिथे भ्रष्टाचार, मान्य आहे. पण सगळं नीट होईपर्यंत मी बसने जाणार नाही हा हट्ट झाला. जोवर त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत तोवर ते सुद्धा काही सुधारु शकणार नाहीत. मग कोंबडी आधी कि अंडे असा प्रश्न उभा रहातो ना. साधी अपेक्षा आहे, एवढे जर जबाबदार हुशार वगैरे असाल की यंत्रणेला अक्कल शिकवू शकता तर आधी स्वतः तसे नीट वागून तर दाखवा. साधे नियम पाळता न येणारे पुणेकर उगाच परिवहन कायद्याविरोधात आंदोलने करतील तर त्याला गंभीरपणे घेण्याची काही गरज नाही असे माझे स्पष्ट मत आहे, उलट अशा वेळेस हे कायदे तिप्पट आक्रमक आणि कडक पद्धतीने राबवले गेले पाहिजेत असं मला वाटतं. (१०३, ११०+२ ने ५ एक वर्षे आणि २४ नंबरने तितकीच वर्षे प्रवासाचा अनुभव असलेला) थॉर माणूस

आपल्याकडे कसलाही कायदा करताना त्याच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष शक्यता लक्षांत घेत नाहीत. अमुक कायदा अमेरिकेत झालाय मग आपणही तो करू. असे बरेच तज्ञ सुचवीत असतात. आय एम व्ही कायदा हा ही असाच. पुण्यात सार्वजनिक वहातुक व्यवस्था बरोबर नाही. सबब दुचाकीचा वापर अटळ. सबब दुचाकींची संख्या जास्त. सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्‍या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी. पण दुसर्‍या बाजूने विचार केला तर दुचाकींची संख्या इतर जिल्हा ठिकाणांच्या मानाचे जास्त सबब " वसुली" ची शक्यता जास्त. म्हणून नांदेड मधे हेलमेट सक्ती, अमरावतीत हेलमेट सक्ती अशा बातम्या येत नाहीत. कारण ही सक्ती पुण्यातच उकरून काढली जाते. त्याचे कारण वर सांगितले आहे. आता टोलला कोल्हापुरात विरोध होतो पुण्यात नाही म्हणून कोल्हापुरवाले अतिशहाणे आहेत असे पुणेकरानी म्हणायचे का ? तिथे पराकोटीचा विरोध होतो याला काही युक्त असे कारण असेलच की नाही ? आता आय एम व्ही कायद्याबाद्द्ल. यातील वाहन नोंदणी ची प्रोसेस पाहू. यात आर टी ओ इन्स्पेक्टरने डीलर कडे जाउन कायद्याने स्वत" गाडीचे हेड टेल लॅम्प , इंडीकेटर चेक करून पहाणे , चासीसचे ट्रेसिंग फॉर्म २० वर स्वत: घेणे अपेक्षित आहे. असे जर कायदा पाळावयाचे ठरविले तर एक इन्स्पेक्टर ८ तासांच्या कार्यकाळात सुमारे ३५० दुचाकी कशा तपासून पाहील बरे. सबब हे तपासून न पहाण्यासाठी तो पैसे खातो व दोन मिनिटात गाडी रजिस्टर होण्यासाठी होकाराची सही करतो. यातील गाळा पार " वर" पर्यंत अधिकाराच्या प्रमाणात मिळत असतो. आज प्रत्येक माणसाने किमान थर्ड पार्टी विमा तरी उतरवला पाहिजे असा नियम आहे. तरीही साधारणपणे गाडी जुनी झाली की तो गायब होतो. हे पोलिसाना माहीत आहे. पण त्यात पोलिसाना विमा कंपनी " गाळा" देत नसावी म्हणून त्याची तपासणी होत नाही. दुसरे एक उदाहरण घ्या. नंबर प्लेटचे . मला किती वेळा असे वाटते की मला जर पोलिसानी रीतसर कमिशन दिले तर एका दिवसात ९० टक्के बेकायदेशीर नंबर प्लेटच्या केसेस मी त्याना एखाद्या चौकात दाखवू शकेन. बहुतेक सार्‍या नंबर प्लेट आय एम व्ही मधे वर्णन केल्या प्रमाणे नसतातच. पोलिसानी खरेच मनात आणले तर दिवसाला लाखो रूपयांच्या पावत्या एकेका चौकात फाडल्या जाउन शकतात( पावत्या फाडणे हा खास आर टी ओ तील शब्द)पण आपले वहातुक पोलिस कसे एकाच कोपर्‍यात टोळके करून उभे रहातात. ते सर्वानाच दिसते आहे. कायद्याने काही उत्तरदायित्व सरकारवर आले की ते कायद्याला कसे धुडकावून लावते याचे उदाहरण म्हणजे ३५० दुचाकीच्या रजिस्ट्रेशन साठी के आर टी ओ इन्सपेक्टर हे आहे. याधी मुंबईचे फलाटांविषयक कोर्टाचा अव्हेर कसा केला गेला आहे हे उदाहरण यापूर्वी या धाग्यात आले आहेच.

@नाद खुळा मुळातच पुण्यातील सार्वजनिक वहातुक अतिशय बेभरवशी आणि भोंगळ आहे त्यामुळेच कात्रज्-कोथरूड्-आनंदनगर-सिंहगड रस्ता ते चाकण्-रांजण्गाव्-तळेगाव (मावळ)असा प्रवास अत्यंत नाईलाजाने दुचाकीवर करावा लागतो हे नजरेआड करून चालणार नाही. फक्त पुण्यातच नव्हे तर ठाण्यात देखील { टीएमटी } सार्वजनिक वहातुक अतिशय बेभरवशी आणि भोंगळ आहे त्यामुळे दुचाकी किंवा रिक्षा या शिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही.ठाण्यात ४० हजारा पेक्षा जास्त रिक्षा या विना-परवाना धावत आहेत, आणि या वरुनच सार्वजनिक वाहतुकीचे ३-१३ कसे वाजले आहेत याचा अंदाज यावा.मला वाटत ही सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी सार्वजनिक वहातुक व्यवस्था असावी. ठाण्यातली ही सार्वजनिक वहातुक ठाण्याच्या लोकसंख्येला देखील अपुरी आहे, त्यामुळे खाजगी बस चे पेव सुद्धा पसरले आहे.बेस्ट टीएमटीला टेक ओव्हर करणार अशी बातमी येताच टीएमटीवाल्यांचा लगेच विरोध होतो. कित्येक वर्षापासुन टीएमटी बेस्ट मधे विलीन केली जावी अशी मागणी आहे,पण मागणी होताच त्याला कडाडुन विरोध केला जातो,त्यामुळे नागरिकांचे हाल कुत्रा सुद्धा खात नाही. संदर्भ :- टीएमटी के 'बेस्ट' में विलय की मांग तेज { साल -२०१० } अनियमिततेमुळेच टीएमटी तोटयात? { साल -२०१२ } टीएमटीच्या बेस्ट विलीनीकरणाचे पुन्हा वारे {साल २०१४ } टीएमटी बस सेवा 'बेस्ट'मध्ये विलिन होणार {साल २०१४} टीएमटी ‘बेस्ट’ होण्यास सेनेचा खोडा {साल २०१४ } {मिपा वाचणारे कोणी मोठे प्रभावी व्यक्तिमत्व असेल तर त्यांनी ठाण्यात पूर्णपणे बेस्ट वाहतुक सुरु करुन ठाणेकरांना रोजच्या प्रवासाच्या चिंतेतुन मुक्ती द्यावी ही विनंती.} @ चौकट काका सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्‍या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी. अजिब तर्क आहे, रस्ता लहान असो वा नसो दुचाकी स्वाराला त्यांच्या समतोल ठेवण्याच्या क्षमतेवरच वाहन हकावे लागते, मध्यंतरी माझ्या नेहमीच्या हायवे वर एक उड्डानपुल लागतो त्यावरुन जात होतो तेव्हा अचानक पेव्हर ब्लॉकचा एक तुकडा माझ्या बाईकच्या टायरखाली आला होता, माझ्या पुढे ट्रक असल्याने मला तो पटकन दिसला नाही, मी जवळपास ताशी ५५-६० च्या वेगात होतो आणि पडता पडता वाचलो. त्यामुळे रस्ता लहान असो वा हायवे तुमचा " तोल" सांभळेच महत्वाचे असते. महणून नांदेड मधे हेलमेट सक्ती, अमरावतीत हेलमेट सक्ती अशा बातम्या येत नाहीत. कारण ही सक्ती पुण्यातच उकरून काढली जाते. त्याचे कारण वर सांगितले आहे. ही फक्त पुण्यातच नाही तर अगदी राजधानी दिल्ली मधे तर महिलांना सुद्धा करण्यात आलेली आहे.हैद्राबाद मधे आहे,तर बेळगाव मधे सुद्धा ती आहे.त्यामुळे फक्त पुणेकरांवरच ती लादली गेली आहे असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. संदर्भ :- दिल्लीत महिलांना हेल्मेट सक्ती लवकरच हेल्मेट सक्ती ऑक्टोबरपासून दुचाकी स्वारालाही हेल्मेटसक्ती Govt mulls making helmets compulsory on all roads पिलीयन रायडरला फक्त हायवे वर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. वाहन चालवणारा जर जिवंत राहिला तर त्याचे कुटुंब जगु शकेल ! आत्म सुरक्षतेला महत्व हे द्यायलाच हवे, आणि त्यासाठी काहीही कारणे देणे हे नक्कीच सुज्ञपणाचे लक्षण नाही. हा व्हिडीयो ७:४० पासुन पुढे पहावा... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

In reply to by मदनबाण

सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्‍या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी. अजिब तर्क आहे वरील तर्क अजब नाही. तोल सांभाळण्याची क्रिया माणसाचे अंतर्मन अपोआपच करीत असते. मधे कित्येक महिने गाडी चालविली नाही तरी काही फरक पडत नाही.मेंदू एका क्षणात ते कौशल्य पुन्हा प्रापत करतो. आता गाडी घसरण्याची कारणे पहा. १. रस्ता पुरेसा खरबरीत नसणे २. गाडीचा टायर अति मुलायम होणे ३. रस्ता पाण्याने ओला असणे. ४. रस्त्यात वाळू असणे ५. रस्त्यावर तेल पडलेले असणे. ६ रस्त्यावर पातळ चिखल झालेला असणे. ७, अचानक खड्डा येणे. स्पीड ब्रेकर येतो आहे या कडे चालकाचे लक्ष नसणे. यासाठी आटो गिअर गाड्यासाठी अशा जागी कमी वेगाने गाडी चालविणे व गिअर गाड्यासाठी किमान एक गिअर खालचा घेउन वहान हाकणे आवश्यक आहे. वेग गुणीले वरील स्थीती यांमुळे रोड ग्रीप कमी होऊन गाडीचे व रत्याचे नाते तुटते व गाडी घसरते. जे लोक पावसाळ्यात आपल्या कौशल्यात बदल करतात त्याना ही गाडी सटकण्याची भिति कमी वाटते असा माझा स्वता: चा अनुभव आहे. आता पिलीयन रायडरला फक्त हायवे वर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे या मागचे तर्क्ट काय असावे हे समजावून सांगाल काय ? का पिलियन सीटवर शहरसीमेत अमृत प्राशन करण्याची सोय आय एम व्ही कायदा १९८८ ने केली आहे ?

In reply to by चौकटराजा

सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्‍या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी. तुम्ही जी घसरण्याची कारणे दिली आहेत त्याचा आणि रस्ताच्या रुंदीचा काय संबंध ? जी कारणे दिली आहेत ती कुठल्याही रस्त्याला लागु पडतील त्याचा लांबी-रुंदी काहीही संबंध नाही आणि म्हणुन मी अजिब तर्क आहे असे म्हंटले आहे. बाकी दिलेला व्हिडीयो पाहिलात का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

In reply to by मदनबाण

आपल्याला "बॉटलनेक" हा शब्दप्रयोग माहीत असेल. जेंव्हा चार लेन ची रूंदी दीड लेन पर्यंत कमी होते त्यावेळी अगदी आपसुकच सर्व वहानांचा वेग त्याठिकाणी कमी होतो. कोणत्याच वहानाला दुसर्‍या लेन मधे प्रवेश न घेण्या इतके ट्राफिक झाले की बोटल नेक नसतानाही गाड्यांचा वेग कमी होतो. बॉटलनेक चे उदा. पुण्यातील खडकी येथील नदीकाठचा चौक. किंवा सी ओ ईपी चा चौक. या चौकात गाडी घसरली असे होणारच नाही. स्पीडच इतका की आपोआप दोन्ही पाय टेकत माणूस गाडी हाकतो. बंगलोर मधे तर पाच पाच लेन फुल्ल्ल भरलेले असतात. की बेदरकार पणे नागमोडी जात शेवटच्या लेनला जाणेच दुरापास्त आहे. मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी मार लागणार कोठून ? पहाटे रात्री अपरात्री प्रवास करायचा असेल तर हेल्मेट आपणहून घालणेच श्रेयस्कर. मी दिलेल्या कारणात रस्त्याबरोबर वेग हे एक परिबळ आहे. त्याचा विचार करताना रस्ता रूंद आहे ही अरुंद हे माप त्या रत्याची प्रत्यक्ष रूंदी हे नसून त्यावर वेगाने गाडी हाकण्यास मोकळी जागा उपलब्ध किती असे आहे. मुळात वेग, ओव्हरटेक व वळण या तीन वर चालकाचे लक्ष हवेच . हेलमेट विषय महत्वाचा पण दूरचा.

In reply to by चौकटराजा

मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी मार लागणार कोठून ? मी परत तेच सांगतोय, परत एकदा अजुन सोप्पे करुन सांगतो :- अपघात हा सांगुन होत नाही, त्याला कोणतेही निमित्त्य चालते. वेग कमी असो वा जास्त,रस्ता रुंद असो वा महामार्ग अपघात कधीही आणि कोणत्याही कारणाने होउ शकतो. ज्या हेल्मेटमुळे तुमच्या कवटीत असलेला मेंदु जबर मार बसण्या पासुन वाचु शकतो ते वापरणे हे सरकारने बंधन कारक करावे ही वेळ यावी यातच आपल्या देशात व्यक्तीगत सुरक्षते बाबत असलेला कमालिचा उदासिनपणा दिसुन येतो. जाता जाता :- सर सलामत तो पगडी पचास ! ही म्हण आपल्या ठावुक असेलच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

In reply to by मदनबाण

तुमच्या कवटीत असलेला मेंदु
"म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो त्यांच्या" असं लिहा आधी. नाहीतर पुणेकर या कंपल्शन वर पण भडकतील.

In reply to by काळा पहाड

"म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो त्यांच्या" असं लिहा आधी. नाहीतर पुणेकर या कंपल्शन वर पण भडकतील. किंवा पुणेकर पोलिसांनी पाटी बनवावी... मेंदु गुढघ्यात असणार्‍यांना दंड आकारण्यात येणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सहा वर्षांनंतरही तेच प्रश्न! गेली सहा वर्षे काय करत होता? वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर :(

हेल्मेट ची सक्ती असावी की नाही या पेक्षा आपण दुचाकी स्वार हेल्मेट घातले तर कसा सुरक्षित राहू शकतो या बद्दल का नाही चर्चा करत? मान्य आहे की पोलीस या बाबतीत नीट वागत नाही, पण आपण शेवटी आपली सुरक्षा आणि हीत पहावे

In reply to by फोटोग्राफर243

हेलेमेट सक्तीला विरोध करणारा प्रत्येक माणूस हेलमेटने दुचाकी स्वाराची सुरक्षितता वाढते हे मनोमन स्वीकार करणारा असतोच.पण नाक्यावरच्या मंडईत कोथिंबीरीची गड्डी आणायला गेलो व हेलमेट घालायला विसरलो तर पोलिस पकडतील का याचा घोर नको म्हणून ही सारी चर्चा. हेलमेट बरोबरच एक विशिष्ट प्रकारचा सुरक्षा पोषाख असतो तो खांदे गुढगे, हातात खास प्रकारचे कातडी ग्लोव्हज ही मिळतात जे अधिक सुरक्षा देतात. असा पोषाख जे ऑटोमोबाईल कंपन्यामधे कामाला आहेत किंवा आमच्या सारखे होते त्यांच्या परिचयाचा आहे. पण शेवटी सारी सावधानता ही सापेक्ष असते.आयुष्यातील क्षणाक्षणाचा विमा आपण उतरवू शकत नाही . .आपण किती जगावे कधी मरावे याचा पक्का हिशेब कुणालाच मांडता येत नाही. मरण तर हेलमेट घातलेल्या क्रिकेटरला पोटात चेंडूचा जबरी मार बसूनही येते. हेलेमेटची सक्ती करताना परदेशी लोक ते गाडीत कुठे लपवितात. याचा अभ्यास झालाच पाहिजे. प्रत्येक दुचाकीला ज्या प्रमाणे २ आरसे ,हॉर्न टर्न इंडीकेटर्स कंपल्सरी असतात तसे ते दोन हेल्मेट्स हा ही गाडीचाच भाग झाले पाहिजेत.त्याचा परिंणाम गाडीचे वजन किती वाढते, लांवी किती वाढते वा रुंदी किती वाढते याचा सर्व विचार करून दुचाकी वहाने डिझाईन झाली पाहिजेत. त्याचे पार्किंग व्यवस्थेवर काय विपरित परिंणाम होतात हे ही पाहिले पाहिजे. चारचाकी ला बेल्ट सक्तीचा केला आहे त्यात गाडीच्या वजनात व अवकाशात फारसा फरक होत नाही. दोन हेलमेट्स व दुचाकी यांचे नाते कार- बेल्ट एवढे सोपे नक्कीच नाही. हेलमेट वापरा तरच नोकरीवर या असे काही कम्पन्या करतात असे आवाहन सर्व लहान मोठ्या कंपन्याना केल्यास बरेच लोक हेल्मेट वापरू लागतील. मग ते तपासण्याचा भार व कारण पोलिसाना रहाणार नाही.

महाराष्ट्रामध्ये हेल्मेट ची सक्ती फक्त पुण्यात आहे का ? की सर्व शहरांमध्ये आहे ? आणि अंमलबजावणी पुण्यात होते ?

धन्य ते पुणे आणि धन्य ते पुणेकर... असो, एकूणच पुर्वी सारखे पुणे राहिले नाही आत्ताशा.... माझा मित्र त्याच्या भावाला घेवून येत होता.मोटरसायकलचा वेग जास्त न्हवता, पण गाडी घसरली.मित्राच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने, मित्र वाचला पण त्याचा भाऊ मात्र कोमात गेला आणि एक ८-१० दिवसांत मित्राचा भाऊ देवाघरी गेला. असो, एका वाक्यात सांगायचे तर, प्रत्येक मनूष्य आपापली अमुल्य वस्तू सांभाळायचा जीवापाड प्रयत्न करतो.

सकाळमधील बातमी २०१४ मध्ये दुचाकीच्या अपघातात २१९ जणांचा बळी गेला. त्यापैकी २१८ जणांनी हेल्मेट परिधान केले नव्हते; तर गतवर्षी २०१५ मध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २४० दुचाकीस्वारांपैकी २३९ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याची बाब समोर आली आहे. आता तरी हेल्मेट वापरा लोकहो..!!

In reply to by मोदक

संपूर्ण राज्यात हेल्मेटसक्ती करणार आहेत असे पेपरात होते आज. तसे लवकर घडावे अशी सरकारास प्रार्थना.

हेलमेट नक्की वापरा हेलमेट खर्चात कपात म्हणून कृपया रस्त्यावरील विक्रेत्यांकडून हेलमेट घेऊ नका, दर पाच वर्षांनी हेलमेट बदला विनंती समाप्त -बाप्या

In reply to by मोदक

one fall??? हेल्मेट बदलणे सोडा, हेल्मेट आपल्याला योग्य आहे कि नाही हे सुधा न बघता निव्वळ वापरायचे म्हणून वापरतात. ते खरे तर असे असायला हवे कि गालांवर घट्ट बसेल आणि डोकं डावी-उजवीकडे हलवलं तर हेल्मेट दुग्दुग्णार नाही. बरेच लोक दुसर्याचे हेल्मेट डोक्यावर 'लावतात' आणि बाहेर पडतात. प्रत्यक्षात अपघात झाल्यावर त्याचा उपयोग होत नाही कारण धक्का बसल्यावर एक तर ते उडून तरी पडते नाही तर चेहऱ्याभोवती सरकते आणि इजा होते. मी एका गृहस्थाना ओळखतो, ते गेली २० वर्षे एकाच हेल्मेट वापरतायत, त्यात कुठल्याही प्रकारचा बदल न करता.......

कुणीतरी असे हेल्मेट शोधा जे घातल्यावर उन्हाळ्यातही थंड वाटेल आणि घाम येणार नाही तसेच त्याच्या वजनाने सर्व्हाईकल स्पॉन्डेलिसीस होणार नाही. बाकी सर्व ठिक आहे. जे मोटरसायकल चालवत नाहीत ते पब्लीक लिटीगेशन अ‍ॅप्लीकेशन करुन हेल्मेटची सक्ती करवतात. स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ?

In reply to by नितीनचंद्र

नितीनचंद्रजी, एवढ्यातच मी कॅप्टन जॅक स्पॅरो ह्यांच्या धाग्यावर काही अनुभव मांडले, माझ्या ओळखीतल्या तीन-चार जणांचे अपघात, त्यात दोन जणांचा मृत्यु, दोघांचे डोके फुटून कित्येक दिवस आयसीयुत काढावे लागले, एका नवविवाहितेला दात गमवावे लागले. ह्या सर्व प्रकरणांत रस्त्यांचा, वाहतूकीचा, सरकारच्या कडून होणार्‍या कुठल्याही हलगर्जीचा संबंध नव्हता. झालेल्या अपघातांची तीव्रता फक्त हेल्मेट न घातल्याने भयंकर वाढली. पैकी जे दोघे जीव वाचले त्यांना तात्काळ मदत उपलब्ध झाली म्हणून, अगदी १०-१५ मिनिटात ते ऑपरेशन टेबलवर होते. भयंकर ट्रॅफिकमधे हे शक्य असते काय? आपल्याच जीवाशी खेळ करुन दुसर्‍यांवर दोष देणे यापेक्षा उद्वेगजनक काय असावे? हेल्मेटसारख्या जीवरक्षक बाबींवर जर आपल्याला चर्चा करायला लागत असेल तर 'हे मुसलमानांविरूद्ध षडयंत्र आहे म्हणून पोलिओ डोस देउ नका' असे म्हणणार्‍या पाकिस्ताण्यांमधे आणि 'हेल्मेटसक्ती ही विशिष्ट लोकांचे स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी आहे' असे म्हणणार्‍या आपल्यात काय फरक राहिला? जे मोटरसायकल चालवत नाहीत ते पब्लीक लिटीगेशन अ‍ॅप्लीकेशन करुन हेल्मेटची सक्ती करवतात. ह्याने त्या मोटरसायकल न चालवणार्‍यांना काय फायदा पोचत असावा?

In reply to by नितीनचंद्र

स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ? बर्र चला ती सरकारची जबाबदारी. आपण मोदींचा राजीनामा मागू. पण स्पीडब्रेकर न समजल्याने होणारा अपघात थांबणार आहे का? हेल्मेट घातले असेल तर अपघाताची तीव्रता "जीवघेणा" वरून "गंभीर" पर्यंत जरी कमी झाली तरी हेल्मेटसक्तीचा उद्देश साध्य होणार नाही का?

पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत अजून २-३ आठवडे चालेल. त्यानंतर सर्व काही थंड होईल. एका ठराविक कालावधीनंतर हेल्मेटसक्ती करण्याचा कीडा कोणाच्या तरी डोक्यात वळवळतो व नंतर २-३ आठवडे पोलिस व हेल्मेट उत्पादकांची चांदी झाल्यावर सर्व थंड होते. यावेळीही तसेच होणार आहे. रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे, ड्रेनेजची वर आलेली झाकणे रस्त्याच्या पातळीत करणे, वाहतुकीच्या नियमांची सक्ती करणे अशी अपघात करणारी एकापेक्षा एक दादा कारणे असताना त्याविषयी चकार शब्द न काढता हेल्मेटसक्तीचे भूत सुरू झाले आहे. घराचे छप्पर गळून घरात पाणी गळत असताना छप्पर दुरूस्त करून वॉटरप्रुफिंग न करता घरात वावरताना रेनकोट व छत्री वापरणे सक्तीचे करणे आणि वरील कारणांबद्दल कणभरही उपाययोजना न करता हेल्मेटसक्ती करणे यात फारसा फरक नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ते अमेरिकेत, शिंगापुरात सगळीकडे चांगले रस्ते, वाहतूक, नियम पाळणारी जनता असुन लोक तिकडे सक्ती न करताही हेल्मेट का हो घालतात? त्यांना त्या समस्या नाही जाणवत ज्या तुम्हाला जाणवतात?

In reply to by तर्राट जोकर

त्याला कारण इथे गाड्या फार वेगात धावतात. सरासरी वेग = ३० मैल तशी (५०किलो मीटर?). या वेगात गाडी वरून पडल्यावर कपाळ मोक्ष ठरलेला आहे. बर वाचलात तर वैद्यकीय खर्च सुधा भरपूर असतो. आणि जोवर डाक्टर सर्तीफिकेत देत नाही तोवर कामावर घेत नाहीत. मग पैसे मिळत नाहीत.इन्शुरन्स नावाचा भस्मासुर सगळीकडे मागे लागलेला असतो. एकदा अपघात झाला कि पुढचे ५ वर्ष प्रिमियम ढगात. २१ वर्ष वयाच्या पोराचा प्रिमियम सध्या कमीत कमी २००० पौंड आहे. लोकांची कमाई सरासरी १0०० ते १5०० पौंड असते २५ ते ३० च्या वयात (पोरं स्वतःच्या घरात मूव होतात १८ व्या वर्षी हे विसरू नका, घराचे भाडे इत्यादी खर्च आहेतच). आणि एकदा का डेंजरस ड्रायवर चा स्टीकर चिकटला, कि सगळीकडेच त्रास होतो. कधी कधी प्रोफाईल चांगले म्याच होत असले तरी डिसक्वालिफाइड ड्रायवर आहे म्हणून नोकरी मिळत नसल्याची उदाहरणे बघितली आहेत कारण बर्याचदा नोक्रीवरची कामे करताना गाडी चालवत लांब लांब जावे लागते. ड्रायवर चा पगार परवडत नाही प्रत्येक वेळी. रात्री बेरात्री पोलिसाने जर थांबवला आणि रेकोर्ड वर असले कारनामे असतील तर त्यांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी देखील बायस्ड असते. तात्पर्य : एखाद्याने हेल्मेट न घालणे हि इथे किरकोळ गोष्ट आहे, पण एखाद्याने नियम तोडणे, शिस्त न पाळणे हा परमोच्च गुन्हा आहे. आणि त्याची फळे पुढची ४-५ वर्षे भोगावी लागतात.

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

आपल्याकडे ५० रुपये दिले कि पोलिस सोडतो, इन्शुरन्स वाला सर्तीफिकेत देतो, टी सी जागा देतो, थोडक्यात केलेल्या चुकीला पटकन माफी मिळते. त्यामुळे चूक करणे हा 'हक्क' होतो.

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

ह्यात खरा प्र्कार आहे तो जोर्दार बाम्बू बसण्य्याचा आहे. जो पर्यन्त शिक्षा होत नाहि किन्वा होण्यचि खात्रि नाहिये तो पर्यन्त हे असेच चालु रहाणार. बाहेरच्या देशात तो बाम्बू चान्ग्लाच बसतो त्यामुळे आप्सूक नियम पाळ्ले जातात.

In reply to by तर्राट जोकर

ते अमेरिकेत, शिंगापुरात सगळीकडे चांगले रस्ते, वाहतूक, नियम पाळणारी जनता असुन लोक तिकडे सक्ती न करताही हेल्मेट का हो घालतात? त्यांना त्या समस्या नाही जाणवत ज्या तुम्हाला जाणवतात?
तिकडे रस्ते उत्कृष्ट असतात व मोटारसायकली अत्यंत पॉवरफुल असतात. मोटारसायकलस्वार अत्यंत वेगाने (ताशी ६०+ मैल) गाड्या चालवितात. त्यामुळे हेल्मेट सक्तीचे असते. अमेरिकेत एका मोठ्या दुकानात (सॅम्स क्लब) मी आपली ल्यूना विकायला ठेवलेली पाहिली होती. किंमत ४९९ डॉलर्स लावली होती. तिथे पाटी लावली होती की या गाडीसाठी हेल्मेटची गरज नाही. अर्थात जी गाडी ताशी २० मैलापेक्षा जास्त वेग गाठू शकत नाही त्या गाडीला हेल्मेट कशासाठी हा विचार असावा.

In reply to by श्रीगुरुजी

२० मैलाने चालणार्‍या लुनाला एखाद्या ६० + मैलाने जाणार्‍या गाडीने धडक दिली तर लुनाचालक चित्रगुप्तासमोर काय युक्तीवाद करेल?

In reply to by मोदक

ती ल्यूना फक्त अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्येच चालवायला परवानगी होती. ती गाडी चालवायला वाहन परवान्याची गरज नव्हती. काँप्लेक्समध्ये इतर गाड्यांना ताशी १०-१५ मैलाची वेगमर्यादा होती. या सर्व गोष्टींमुळे हेल्मेटची गरज नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

आता पुण्याचे उदाहरण घेऊ. पुण्यातल्या बहुतेक सर्व रस्त्यातून ताशी २० मैलाच्या पुढचा वेग गाठणे अत्यंत दुर्मिळ आहे. बस, कार, ट्रकसारख्या मोठ्या गाड्यासुद्धा यापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करणे (ते सुद्धा विशेषत: शहरातील रस्त्यांवर) योग्य नाही. उद्यापासून हेल्मेटसक्तीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन आहे ही एक आशादायक गोष्ट आहे.