अजुनी बसून आहे
काव्यरस
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..
मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..
का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..
हा गूढ काही घाव
अन्फ्रेंडचाच रंग
कॉपीस खूप वाव
करण्यात होत गुंग
नावाविना कसा हा
बघ पोस्टतो कळे ना ..
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना ........
.
( http://mee-videsh.blogspot.in/2014/11/blog-post.html )
.
वाचने
2627
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अप्रतिम कविता !!!
In reply to अप्रतिम कविता !!! by सतिश गावडे
+१
In reply to +१ by प्रचेतस
छान छान कविता सुचत
..
In reply to .. by स्वप्नज
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये
In reply to शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये by सतिश गावडे
?
In reply to ? by स्वप्नज
हिंट देउ का ? . . उडनमांडी
In reply to हिंट देउ का ? . . उडनमांडी by खटपट्या
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to .. by स्वप्नज
आईच्या गावात...नेमके हेच
हाहाहाहाहा ! एक नंबर्र !
हाहा!
आभार !