मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अजुनी बसून आहे

विदेश · · जे न देखे रवी...
काव्यरस
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ) अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना उघडे तसेच फेस्बुक लॉगौट.. मन धजेना .. मी फेस्बुकासमोरी फेस्बुक-अॅडिक्ट आहे .. मी हेच सांगताना रुसुनी कधी बसावे मी का इथून उठावे समजूत का पटेना धरसी अजब अबोला तुज मौन सोडवेना .. का पोस्ट मी लिहावी चर्चाहि होत आहे मेजवानी वाचका त्या जाणून उत्सुकाहे काही अटीतटीने कुढता अढी सुटेना कॉमेंट ये स्टेटसला ऐसी स्थिती इथे ना .. हा गूढ काही घाव अन्फ्रेंडचाच रंग कॉपीस खूप वाव करण्यात होत गुंग नावाविना कसा हा बघ पोस्टतो कळे ना .. अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना ........ . ( http://mee-videsh.blogspot.in/2014/11/blog-post.html ) .

वाचने 2627 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सतिश गावडे Sat, 11/08/2014 - 00:07
कशा हो सुचतात इतक्या सुंदर कविता तुम्हाला? अहाहा... काय ती शब्दांची नजाकत. काय ती शब्दांची पखरण... काय ते भाषेचं माधुर्य. काय तो शब्दांचा गोडवा... अहाहा...

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस Sat, 11/08/2014 - 00:37
हेच म्हणतो. वाचता वाचता अंतर्मुख करणारी कविता. आमच्या एका मित्रांनाही अशाच छान छान कविता सुचत असतात.

In reply to by प्रचेतस

नाखु Sat, 11/08/2014 - 09:21
"सुचत" च्या जागी मनात म्हंटलेला शब्द आम्ही ऐकला बरं का!!! वल्लिदा आगे बढो हम तुम्हारे साथ है!

स्वप्नज Sat, 11/08/2014 - 00:47
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये'बद्दल कविता आहे असे वाटले... अजूनी बसून आहे, पण 'यश' येईना असे काहीतरी.. ह.घ्या.विदेशजी..

In reply to by स्वप्नज

सतिश गावडे Sat, 11/08/2014 - 00:51
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये'बद्दल कविता आहे असे वाटले... अजूनी बसून आहे, पण 'यश' येईना असे काहीतरी..
अशा प्रत्ययदर्शी कविता लिहिणारे दुसरे एक कवी मिपावरच आहेत. थोडेसे त्या कवीच्या भावविश्वावरचा पडद बाजूला सरकवला की भांडे दिसेल.