✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दर्शनता!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 11/05/2014 - 22:54
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी. सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे, काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे. विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको. कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही, कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही! काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे! भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!! काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी, कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी. धडा कधी हा संपत नाही कैसे मजला मी सांगू??? समजो तेंव्हा तसे बापडे चला आज येथे थांबू. :) ================================= अतृप्त..

प्रतिक्रिया द्या
6636 वाचन

💬 प्रतिसाद (26)

चांगलीय !! आवडली !!

खटपट्या
गुरुवार, 11/06/2014 - 03:06 नवीन
चांगलीय !! आवडली !!
  • Log in or register to post comments

विषय शब्द तो साचा साधा

स्पंदना
गुरुवार, 11/06/2014 - 04:03 नवीन
विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको. धन्य!! अगदी असेच म्हणेन.
  • Log in or register to post comments

वा गुरूजी आज चांगलीच मारलीय

पाषाणभेद
गुरुवार, 11/06/2014 - 07:47 नवीन
वा गुरूजी आज चांगलीच मारलीय तुम्ही मजल. :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद हो पा.भे.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/06/2014 - 08:33 नवीन
धन्यवाद हो पा.भे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

सुरेख कविता ओ गुर्जी.

प्रचेतस
गुरुवार, 11/06/2014 - 08:50 नवीन
सुरेख कविता ओ गुर्जी.
  • Log in or register to post comments

हे कडवे..

नाखु
गुरुवार, 11/06/2014 - 08:53 नवीन
विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.
मिसळपाव धोरण मध्ये ठळक अक्षरात लावावे म्हणजे "ट्"ला "ट" जिलब्यांपासून मिपाकर आणि जिल्बी कवीही वाचतील. मूळ अवांतर. बुवांचे स"कस" काव्या बद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अगदी असेच म्हणतो.

बॅटमॅन
Fri, 11/07/2014 - 14:57 नवीन
अगदी असेच म्हणतो. एक नंबर ओ आत्मूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बुवा....१२०-३०० चांगलंच रंगलंय...मजा आली

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/06/2014 - 09:05 नवीन
पान खाये बुवा हमारो....सांवली सूरतिया, होट लाल लाल..... ;-)
  • Log in or register to post comments

दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी

विवेकपटाईत
गुरुवार, 11/06/2014 - 09:15 नवीन
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी. आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद हो पा.भे.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/06/2014 - 09:17 नवीन
धन्यवाद हो पा.भे. :)
  • Log in or register to post comments

पाभेंच्या आभाराचा सपाटा लावलाय का ओ गुर्जी?

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/06/2014 - 09:52 नवीन
सगळीकडे पा भे? आँ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गोंधळाचे राजकारण!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/06/2014 - 10:44 नवीन
गोंधळाचे राजकारण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या

सूड
गुरुवार, 11/06/2014 - 11:15 नवीन
तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये. :)
  • Log in or register to post comments

+१

स्पा
गुरुवार, 11/06/2014 - 13:08 नवीन
तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये
=)) बरीच बरीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/06/2014 - 13:32 नवीन
@तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये. >>> अगदी बरोब्बर! आपल्या प्रतिसादावरूनंही तेच सिद्ध होतय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच

सूड
गुरुवार, 11/06/2014 - 14:11 नवीन
>>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच सिद्ध होतय! बर्‍याला बरंच म्हणतो हो, 'चांगल्या' कविता, 'चांगल्या' पाककृती यावरचे प्रतिसाद तुमच्या नजरेतून निसटलेले दिसतायेत. तेवढंच कशाला, तुमच्या भावविश्वाच्या धाग्यावरचेही प्रतिसाद नजरेखालून घातलेत तर असं सिद्ध करत बसायची वेळ यायची नाही पुढल्या वेळी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अपेक्षित !

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/06/2014 - 15:18 नवीन
अपेक्षित ! . . . . . . वाह्व्वा! . . . . . धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मस्त !

मदनबाण
गुरुवार, 11/06/2014 - 11:17 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik
  • Log in or register to post comments

आवडली कविता!

अजया
गुरुवार, 11/06/2014 - 13:53 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments

आवडली

psajid
गुरुवार, 11/06/2014 - 14:37 नवीन
खूप छान कविता ! आवडली एकदम !
  • Log in or register to post comments

सुंदर !!!!

सतिश गावडे
गुरुवार, 11/06/2014 - 21:07 नवीन
सुंदर !!!!
  • Log in or register to post comments

कविता आवडली...

मुक्त विहारि
Fri, 11/07/2014 - 15:02 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments

झक्कास ।।।

सुर्या गार्डी
Fri, 11/07/2014 - 23:41 नवीन
झक्कास ।।।
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पैसा
Sat, 11/08/2014 - 11:24 नवीन
कविता आवडली. मात्र दर्शनता या शब्दाशी जरा अडखळलले. दर्शनीयता, दर्शनीय, दृश्यात्मकता, दृश्य असे काही म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments

@ मात्र दर्शनता या शब्दाशी

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/08/2014 - 11:40 नवीन
@ मात्र दर्शनता या शब्दाशी जरा अडखळलले. दर्शनीयता, दर्शनीय, दृश्यात्मकता, दृश्य असे काही म्हणायचे आहे का? >>> नाही..! सदर काव्यातल्या पहिल्या ओळीचा थोडा आधार घेतो आणि सांगतो. @दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, >>> दर्शनता ..,म्हणजे मी माझ्या नजरेनी एखाद्या गोष्टीकडे/विषयाकडे..(सदर विषयाच्या अनुषंगानी पहायचं झालं तर..मला उमगलेल्या काव्य..या विषयाकडे..) कसा पाहतो??? ती दृष्टी..म्हणजे दर्शनता! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

क्या बात .. क्या बात .. क्या

गणेशा
गुरुवार, 11/13/2014 - 13:26 नवीन
क्या बात .. क्या बात .. क्या बात. सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे, काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे. काव्य आवडले खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा