Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 11/05/2014 - 22:54
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी. सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे, काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे. विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको. कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही, कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही! काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे! भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!! काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी, कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी. धडा कधी हा संपत नाही कैसे मजला मी सांगू??? समजो तेंव्हा तसे बापडे चला आज येथे थांबू. :) ================================= अतृप्त..

Submitted by खटपट्या on गुरुवार, 11/06/2014 - 03:06

Permalink

चांगलीय !! आवडली !!

चांगलीय !! आवडली !!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 11/06/2014 - 04:03

Permalink

विषय शब्द तो साचा साधा

विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको. धन्य!! अगदी असेच म्हणेन.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 11/06/2014 - 07:47

Permalink

वा गुरूजी आज चांगलीच मारलीय

वा गुरूजी आज चांगलीच मारलीय तुम्ही मजल. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/06/2014 - 08:33

In reply to वा गुरूजी आज चांगलीच मारलीय by पाषाणभेद

Permalink

धन्यवाद हो पा.भे.

धन्यवाद हो पा.भे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 11/06/2014 - 08:50

Permalink

सुरेख कविता ओ गुर्जी.

सुरेख कविता ओ गुर्जी.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 11/06/2014 - 08:53

Permalink

हे कडवे..

विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.
मिसळपाव धोरण मध्ये ठळक अक्षरात लावावे म्हणजे "ट्"ला "ट" जिलब्यांपासून मिपाकर आणि जिल्बी कवीही वाचतील. मूळ अवांतर. बुवांचे स"कस" काव्या बद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 11/07/2014 - 14:57

In reply to हे कडवे.. by नाखु

Permalink

अगदी असेच म्हणतो.

अगदी असेच म्हणतो. एक नंबर ओ आत्मूस.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 11/06/2014 - 09:05

Permalink

बुवा....१२०-३०० चांगलंच रंगलंय...मजा आली

पान खाये बुवा हमारो....सांवली सूरतिया, होट लाल लाल..... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 11/06/2014 - 09:15

Permalink

दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी

दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी. आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/06/2014 - 09:17

Permalink

धन्यवाद हो पा.भे.

धन्यवाद हो पा.भे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 11/06/2014 - 09:52

In reply to धन्यवाद हो पा.भे. by अत्रुप्त आत्मा

Permalink

पाभेंच्या आभाराचा सपाटा लावलाय का ओ गुर्जी?

सगळीकडे पा भे? आँ??
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/06/2014 - 10:44

In reply to पाभेंच्या आभाराचा सपाटा लावलाय का ओ गुर्जी? by माम्लेदारचा पन्खा

Permalink

गोंधळाचे राजकारण!

गोंधळाचे राजकारण!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 11/06/2014 - 11:15

Permalink

तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या

तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 11/06/2014 - 13:08

In reply to तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या by सूड

Permalink

+१

तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये
=)) बरीच बरीये
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/06/2014 - 13:32

In reply to तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या by सूड

Permalink

@तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या

@तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये. >>> अगदी बरोब्बर! आपल्या प्रतिसादावरूनंही तेच सिद्ध होतय! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 11/06/2014 - 14:11

In reply to @तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

>>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच

>>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच सिद्ध होतय! बर्‍याला बरंच म्हणतो हो, 'चांगल्या' कविता, 'चांगल्या' पाककृती यावरचे प्रतिसाद तुमच्या नजरेतून निसटलेले दिसतायेत. तेवढंच कशाला, तुमच्या भावविश्वाच्या धाग्यावरचेही प्रतिसाद नजरेखालून घातलेत तर असं सिद्ध करत बसायची वेळ यायची नाही पुढल्या वेळी !!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/06/2014 - 15:18

In reply to >>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच by सूड

Permalink

अपेक्षित !

अपेक्षित ! . . . . . . वाह्व्वा! . . . . . धन्यवाद!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 11/06/2014 - 11:17

Permalink

मस्त !

मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 11/06/2014 - 13:53

Permalink

आवडली कविता!

आवडली कविता!
  • Log in or register to post comments

Submitted by psajid on गुरुवार, 11/06/2014 - 14:37

Permalink

आवडली

खूप छान कविता ! आवडली एकदम !
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 11/06/2014 - 21:07

Permalink

सुंदर !!!!

सुंदर !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 11/07/2014 - 15:02

Permalink

कविता आवडली...

मस्त..
  • Log in or register to post comments

Submitted by सुर्या गार्डी on Fri, 11/07/2014 - 23:41

Permalink

झक्कास ।।।

झक्कास ।।।
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 11/08/2014 - 11:24

Permalink

कविता आवडली

कविता आवडली. मात्र दर्शनता या शब्दाशी जरा अडखळलले. दर्शनीयता, दर्शनीय, दृश्यात्मकता, दृश्य असे काही म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 11/08/2014 - 11:40

In reply to कविता आवडली by पैसा

Permalink

@ मात्र दर्शनता या शब्दाशी

@ मात्र दर्शनता या शब्दाशी जरा अडखळलले. दर्शनीयता, दर्शनीय, दृश्यात्मकता, दृश्य असे काही म्हणायचे आहे का? >>> नाही..! सदर काव्यातल्या पहिल्या ओळीचा थोडा आधार घेतो आणि सांगतो. @दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, >>> दर्शनता ..,म्हणजे मी माझ्या नजरेनी एखाद्या गोष्टीकडे/विषयाकडे..(सदर विषयाच्या अनुषंगानी पहायचं झालं तर..मला उमगलेल्या काव्य..या विषयाकडे..) कसा पाहतो??? ती दृष्टी..म्हणजे दर्शनता! :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 11/13/2014 - 13:26

Permalink

क्या बात .. क्या बात .. क्या

क्या बात .. क्या बात .. क्या बात. सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे, काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे. काव्य आवडले खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6636 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com