ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
लेखनप्रकार
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू.
अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक!
खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती. इतकी अप्रतिम कविता `दुर्बोध' म्हणून उपेक्षित राहिली असती.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |
(गाण्यात न घेतलेली दोन कडवी अशी आहेत)
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |
_________________________________
या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची. त्यावेळी होत असलेली मनाची असह्य अवस्था ग्रेस या कवितेत अत्यंत कलात्मकरित्या मांडतो.
एक स्त्री की जी मैत्रिणीच्या वयाची, (त्यात) स्वत:चा प्रियकर असलेली आणि तरीही (स्वत:शी) आईचं नातं जडलेली!
अत्यंत जीवघेणी असह्यता, आणि तरीही सहज पार करता येईल असं दु:ख पण नात्याच्या मर्यादा, अशी बेहद्द गुंतागुंतीची स्थिती.
सामान्य व्यक्तीच्या जीवनात असं दु:ख असंभव, तरीही ‘दु:ख’ ही भावना सगळ्यांना समान (मग कारण काहीही असो). असाह्यता केवळ बेजोड, पण ‘आपल्यासाठी केवळ कल्पना’ म्हणून, (किमान संवेदनाशिल व्यक्ती) तरी ती बेदखल करु शकत नाही. आणि समजा कुणी केली, तर मग कविता कशी समजणार ?
तर असा हा अप्रतिम काव्यविषय आणि ग्रेससारख्या चिंतनशील, सौंदर्यवादी आणि प्रतिभावंत कवीची रचना, केवळ लाजवाब!
____________________________________
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
नादमय शब्दयोजना कशी असावी आणि तीही प्रचलित मराठीसारख्या (ज्ञानेश्वरांच्या नाही), नाद-दुर्लभ भाषेत, याचा प्रत्यय देणारं शब्दसंयोजन ‘पाऊस निनादत होता’ !
आणि त्यापूर्वी येणारा तो शब्द, ‘रिमझिम’ !
आणि तो शब्द जिच्याशी जोडलायं ती कमालीची लक्षवेधी ओळ ‘ती गेली तेव्हा’ !
पहिल्या ओळीतच नादमय शब्दसंयोजन, लयीचा अत्यंत नाजूक हेलकावा आणि सर्वांचा मिळून एक चित्रदर्शी परिणाम :
‘ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता’!
रसिकमनाला खेचून घेईल अशी सुरुवात.
आणि लगेच तिच्या (ओलसर) केशकुंतलांची मेघांशी केलेली रुपकात्मक सरमिसळ! जस्ट मॅडनेस!
‘मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता’
त्यावर कहर म्हणजे (ती प्रियकराकडे निघाल्यानं) स्वत:च्या मनाची झालेली गुंतागुंत सोडवायचा अत्यंत लाघवी प्रयत्न... ‘हा सूर्य सोडवित होता’ !
काय कमाल प्रतिभा आहे या माणसाची, निव्वळ थक्क होऊन जावं!
______________________________________________
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
मग पुन्हा मनाचा कोंडमारा आणि काय लाजवाब अभिव्यक्ती, ‘ घनव्याकुळ मीही रडलो’. कसे सुचत असावेत शब्द या प्रतिभावंताला? ‘घनव्याकुळ’.
स्वत:चा शब्द तरीही अर्थाशी ईमान, काव्यविषयाशी एकसंधता आणि पावसाच्या माहौलशी एकरुपता!
एका शब्दात सगळा परिणाम एकवटण्याची किमया, रसिकाला स्वत:च्या प्रगल्भ अनुभवाच्या खोलीशी नेण्याची ताकत.
आणि दुसर्या ओळीत सामाजिक उपहासाचं किती नाजूक भान,
‘त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता’
कवीच्या दु:खाशी जे समरुप होऊ शकत नाहीत अशा सावध (खरं तर असंवेदनाशील) लोकांना, असे विचार म्हणजे केवळ पाचोळा!
______________________________________
पुन्हा एकवार तीच जीवाची घालमेल, पण मांडणीची बेतहाशा नज़ाकत :
‘अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे’
आता ती आई राहिली नाही त्यामुळे बालपण संपलं. घरापासून अंगण दूर झालं!
‘खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता’
आता या आयुष्याच्या बद्ध चौकटीत (मिणमिणत्या) कंदीलासारखी एकाकी अवस्था!
__________________________________
स्वत:च्या आणि आईच्या वयातलं अंतर, मोहाचा भुलावा आणि नात्याचा तोल, ग्रेस काय बहारीनं जपतोयं. एकदा असं ही वाटून गेलं की बंध पार करावा :
‘तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती’
.... पण अचानक :
‘शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’
नातं ही केवळ मान्यता आहे हे कुणाही प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तीला कळतं, पण तो अर्थबोध जरी शब्दातून वगळला तरी उरलेल्या शब्दातून पुन्हा अर्थ उगवतोच!
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’
काय कमालीची संयत मांडणी आहे.
____________________________
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
आता मी असाच मोठा होईन आणि कोरडाच वाढत राहीन. आईपासून (त्या गहिर्या नात्यापासून) तुटण्याचं दु:ख आता असं काही गोठलंय की पुन्हा गहिंवर यावा असं काही घडणार नाही.
काय कमालीचं वर्णन आहे व्याकुळतेचं ‘मज आता गहिंवर नाही’
आणि शेवटच्या ओळी तर काय कहर आहेत!
‘वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता’
म्हणजे ज्या आईची सामाजानं अवहेलना करु नये, तिची लज्जा झाकली जावी म्हणून मी कृष्ण झालो, तिला सर्वतोपरी झाकायचा प्रयत्न केला (ते नातं सावरतांना आता अशी काही असहायता आलीये की) मीच... सर्वस्वी निर्वस्त्र झालोयं.
____________________________
संदीप खरेच्या ओळी आहेत :
तू जो समझा अपना था, वो लम्हओंका सपना था,
हमने दिलको समझाया, अब हमको समझाए कौन ।
दिवानोंकी बातें हैं, इनको लबपर लाए कौन,
इतना गहेरा जाए कौन, खुदको यूं उलझाए कौन ।
वाचने
43806
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
वाटलच होतं.
In reply to वाटलच होतं. by काउबॉय
Howcome u are so predictable ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15In reply to Howcome u are so predictable ? by मदनबाण
गायमुला !!!
गायमुला!!! मदनबाणबुवा भाषांतरशास्त्री +D . +D . +Dअरे वा
In reply to अरे वा by स्पा
तरी हाईट म्हणजे हृदयनाथांनी ती कविता
In reply to तरी हाईट म्हणजे हृदयनाथांनी ती कविता by संजय क्षीरसागर
आँ?
In reply to आँ? by पैसा
सहमत
In reply to सहमत by मराठी_माणूस
तुम्ही (सुद्धा) प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही
In reply to तुम्ही (सुद्धा) प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही by संजय क्षीरसागर
मिस्टर
रसग्रहण आवडले.
In reply to रसग्रहण आवडले. by प्रचेतस
विषयाचं गम्य नसल्यानं एखाद्याची काहीही अवहेलना होऊ शकते
हं!
In reply to हं! by स्पंदना
हा कमालीचा नाजूक विषय आहे
सुंदर रसग्रहण
संक्षी सरान्च्या रसग्रहणामुळे
हृदयनाथांनी >>
In reply to हृदयनाथांनी >> by सुहास..
केवळ सहानुभूती म्हणून आणि वरवरचं लिहित नाही पण एक गोष्ट नक्की
जब्बरदस्त मांडणी.....
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
`आपल्याला उंची गाठता येत नाही
रसग्रहण आणि संक्षींचे
सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन
In reply to सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन by अत्रुप्त आत्मा
तुम्ही पूर्ण कविता दिलीत तर संदर्भ लागेल
In reply to तुम्ही पूर्ण कविता दिलीत तर संदर्भ लागेल by संजय क्षीरसागर
अरे हो, आणि दोन ओळीत संगती अशी आहे :
छान रसग्रहण
पूर्ण कविता वाचल्यावर आता
धन्यवाद!
एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर
In reply to एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर by अविनाशकुलकर्णी
याविषयी सविस्तर चर्चा
In reply to याविषयी सविस्तर चर्चा by संजय क्षीरसागर
सर, माझे चार पैसे
In reply to याविषयी सविस्तर चर्चा by संजय क्षीरसागर
आपण दिलेल्या लिंक वर आपण एक गोष्ट मान्य केलि आहे
In reply to याविषयी सविस्तर चर्चा by संजय क्षीरसागर
आपण दिलेल्या लिंक वर आपण एक गोष्ट मान्य केलि आहे
आधी ही एकदा !
In reply to आधी ही एकदा ! by सुहास..
ते गदिमांसारख्या प्रासादिक रचना करणार्या थोर कवीचं गाणं आहे
" ती हात आणी अंगठा दाखविणारी
सुरुवातच आपण अशी केलिय
In reply to सुरुवातच आपण अशी केलिय by काउबॉय
संजयजी ते बेशर्त स्वीकृति वगैरे ठीक आहे
लिहायची पद्धत आवडली. सगळंच
कवितेचे रसग्रहण आवडले.....
रसग्रहण आवडले.
लिखाण बरं झालंय.
सोहळा संपन्न करतो!
In reply to सोहळा संपन्न करतो! by संजय क्षीरसागर
सलाम....
In reply to सोहळा संपन्न करतो! by संजय क्षीरसागर
जिओ!!!
संजय जी
In reply to संजय जी by मारवा
मारवाश्री!
In reply to मारवाश्री! by संजय क्षीरसागर
@लिहा ना इथे, आनंद वाटेल. >>>
In reply to संजय जी by मारवा
दुव्याबद्दल आभारी.
In reply to संजय जी by मारवा
लिंक आवडली!
संजय जी
In reply to संजय जी by मारवा
सुरेख शब्दान्कन
In reply to संजय जी by मारवा
वा!व्यासंग करावा तर असा
In reply to संजय जी by मारवा
मारवाश्री!
In reply to संजय जी by मारवा
मारवा >> __/\__
In reply to संजय जी by मारवा
मान गये
In reply to संजय जी by मारवा
मारवाजी...
In reply to संजय जी by मारवा
सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व
In reply to संजय जी by मारवा
काय अप्रतिम प्रतिसाद आहे! __/
ग्रेस च्या काही लिंका काही अपुर्ण आहेत
मारवा हा आयडी दोघे तिघे जण
In reply to मारवा हा आयडी दोघे तिघे जण by प्यारे१
मागे एकदा कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला.नाही हो खर म्हणजे सत्य नेमक उलट आहे. मागे एकदा गंमत म्हणुन आणि मारवा ही प्रतिमा डाचत असल्याने वेगळ्या फ्रेश पर्स्पेक्टीव्ह साठी कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता. पण झाल काय तो जरा जास्त च गंभीर होउन गेला. माझ्या मुळातल्या उथळ उनाड स्वभावाला काहे सुट नाही झाला. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इमानदारी ला ही जाच व्हायला लागला म्हणुन तो बंद करुन एकदाचा सुटलो त्यातुन आणि आज जाहीर करुन अजुन मोकळा झालो.मारवासाहेब अभ्यासपुर्ण
खजिना!!!!!
In reply to खजिना!!!!! by जव्हेरगंज
सहमत!
मारवाजी
हा धागा जरा वर काढावा
In reply to हा धागा जरा वर काढावा by अत्रन्गि पाउस
खरच धन्यवाद!