दिसली समद्यांना ...
आयने हाक मारली, लगीच उटले आज.
शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने.
साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली.
परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले.
गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले.
पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले.
अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी.
गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय. आज तिला कविता म्हणायला सांगू.”
म्या पुडं आले, कविता बराबर बोल्ली.
जाग्यावर जाऊन बसली.
मंग रडू यायलं.
गुर्जींना काई समजना.
मंग खाल मानेनं म्या हळू माज्या रिबनीचं फूल ओडलं.
“ओ गुर्जी, आन्जीची नवी रिबन बगा, कसली लाल हाय...” राज्या म्हन्ला.
समदे आले भवती.
कवाधरनं ती दावत व्हते!
दिसली आता समद्यांना!
* शतशब्दकथा
वाचने
21704
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
छानच!
लै बेस. अन्जी रॉक्स अगेन.
कसली गोड आहे ती! बर्याच
:) वा वा वा मस्तच.
कित्ती गोड.
आवडले.
आंजी रॉक्स...
आवडली.
आन्जी मारतेय शायनिंग.
आवडली कथा.
किती गोड!बर्याच दिवसांनी अाली
निरागस अंजी....
लैच्च भारी!
ब्येस
भारी आयड्या! कथा आवडली.
मस्तच!
छानच...
ए लाल रिब्बिन. खासच!
माझी बाय ती!
आंजी रॉक्स
आंजी मंजी..
सहीच..
खूप आवडली
गोड
आंजीला दोस्त भारी भेटला की !
उगी हा आंजे
ही आंजी म्हणजे फीमेल लंपन
In reply to ही आंजी म्हणजे फीमेल लंपन by बॅटमॅन
लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी
In reply to लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी by प्यारे१
हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने
In reply to लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी by प्यारे१
लंपनचं अनुभवविश्व सीमित?
In reply to लंपनचं अनुभवविश्व सीमित? by आदूबाळ
कुठे लंपन आणि कुठे आन्जी!
In reply to लंपनचं अनुभवविश्व सीमित? by आदूबाळ
+१
आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.In reply to लंपनचं अनुभवविश्व सीमित? by आदूबाळ
हम्म, रैट्ट सार.
In reply to हम्म, रैट्ट सार. by बॅटमॅन
पण!
लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)आवडली
ब्याटमुनी तुमचे विचार करणे
सरस !
फारच निरागस हाय आन्जी...
आमचे
लाललाल रिबन लावलेली आंजी गोड
गोडांबी आंजाक्का !
आभार
लय भारि
चार दिवसांपूर्वीच वाचली होती
हाहा!
आवडली
खूप गोड
किती गोड
अप्रतिम !
क्लास !!
गोड आन्जी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX