शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव
शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव
शिकार करणे किंवा शिकार होणे हा प्राणिमात्रांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. अगदी प्रागैतिहासिक काळी जेव्हा उत्पादनाची शेतीसारखी साधने मानवाला ज्ञात नव्हती तेव्हा मानवाचा अस्तित्त्वसंघर्ष हा प्रामुख्याने दोन कौशल्यांवर आधारीत होता - हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजेच शिकार आणि (कंदमुळे वगैरे) गोळा करणे. निसर्गातील इतर प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूत आणि मानवाच्या हेतूत एक मोठा फरक हा होता की प्राण्यांसाठी शिकार हे अन्न मिळवण्याचे साधन होते, तर मानवासाठी शिकार अन्नप्राप्तीबरोबरच मनोरंजनासाठी केला जाणारा खेळही होता. मनोरंजनाच्या ह्याच हव्यासापायी मानवाने अगणित प्राण्यांना, पक्ष्यांना नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर ढकलले. खाली एक यादी केवळ उदाहरणासाठी देत आहे.
इसपू ९९५० - Cuvieronius नामक आजच्या हत्तींसारख्या दिसणारे प्राणी नामशेष झाले.
इसपू ९६८० - श्रब ऑक्स (Euceratherium) ह्या गव्यासारख्या एका प्रजातीचा अंत झाला.
इसपू ९१३५ - Pleistocene South American Jaguar ह्या मार्जारकुलातील प्राण्याचा शेवटचा दिवस ठरला.
इसपू ९०८० - Pygmy mammoth अतिशिकारीमुळे नामशेष झाला.
इसपू ८७६० - Columbian mammoth ह्या अजून एका सस्तन प्राण्याचा अंत झाला.
इसपू ७२९० - Cyprus dwarf hippopotamus ही पाणघोड्याची जमात मानवाकडून संपवली गेली.
इसपू ६९१० - Steppe bison ह्या गव्याच्या प्रजातीची शेवटची घटका ठरली.
इसपू ५३७० - Megatherium americanum ह्या हत्तीच्या आकाराच्या प्राण्याचे अस्तित्त्व पृथ्वीवरून शिकार्यांनी पुसून टाकले.
इसपू ५०२० - Sardinian giant deer हा रेनडिअरसदृश्य प्राणी नामशेष झाला.
इसपू ४८६६ - Irish elk ह्या हरीणवर्गीय महाकाय प्राण्याची शेवटची शिकार केली गेली.
इसपू २५५० - Bennu heron ह्या पक्ष्याचे अस्तित्त्व पुसले गेले.
इसपू १७८० - Woolly mammoth ह्या मॅमथ कुलातील शेवटच्या प्रजातीचा अंत झाला.
इसपू १०० - Syrian elephant ही हत्तींची एक जात हस्तिदंताच्या हव्यासापायी संपवली गेली.
इस ४५० - Meiolania ह्या कासववर्गीय प्राण्याचे अस्तित्त्व मानवी संपर्कानंतर केवळ तीनशे वर्षांतच कायमचे संपुष्टात आले.
११ वे शतक - Moa-nalo ह्या उडू न शकणार्या बदकांच्या प्रजातीचा अतिशिकारीमुळे र्हास झाला.
१४ वे शतक - Koala lemur ह्या प्राण्याच्या प्रजातीने शेवटचा श्वास घेतला.
१५ वे व १६ वे शतक - Haast's eagle ह्या गरुडाच्या प्रजातीचा अंत त्याच्या नैसर्गिक भक्ष्य असलेल्या Moa ह्या पक्ष्याच्या अतिशिकारीमुळे झाला.
इस १६२७ - Indian Aurochs ही गवासदृश्य प्रजाती पृथ्वीतलावरून हद्दपार झाली.
इस १६६२ - Dodo ह्या उडू न शकणार्या पक्ष्याचे अस्तित्त्व मॉरीशस बेटावर रहायला आलेल्या रहिवाश्यांमुळे संपुष्टात आले.
इस १७६८ - Steller's sea cow नामक प्रजाती मांस व कातड्यासाठीच्या बेसुमार शिकारीमुळे नष्ट झाली.
इस १८०० - Bluebuck हा देखणा आफ्रिकन प्राणी युरोपियन शिकार्यांकडून कायमचा संपवला गेला.
इस १८२६ - Mauritius Blue Pigeon या पक्ष्याचे अस्तित्त्व शिकारीमुळे कायमचे संपले.
१८ वे शतक - Great Auk, Sea Mink, Falkland Islands wolf, Quagga, Hokkaido wolf, Atlas Bear, Eastern Elk... अजूनही कित्येक प्राणी-पक्षी संपले.
२० वे शतक - Pig-footed bandicoot, Honshū wolf, Newfoundland wolf, Passenger pigeon, Carolina parakeet, Ukrainian wild horse, Kenai Peninsula wolf, Desert Rat-kangaroo, Mogollon Mountain wolf, Thylacine, Bali tiger, Cascade Mountain wolf, British Columbia wolf, Texas wolf, Barbary lion, Caribbean Monk Seal, Mexican grizzly bear, Caspian Tiger, Javan tiger, Indian Cheetah...
२१ वे शतक - Pyrenean Ibex, Baiji Dolphin, Liverpool Pigeon, Eastern Cougar, Western Black Rhinoceros, Japanese River Otter, Formosan clouded leopard... मानवाची प्रगती चालूच आहे.
शिकारीस विरोध का?
मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे ज्यातून दर वर्षी हजारो-लाखो पशुपक्षी मारले जातात. त्यापैकी कित्येक हे जखमी होतात आणि वेदनेने तळमळून शेवटी आपला प्राण सोडतात कारण त्यांच्या शिकार्यांकडे एकतर अचूक नेम साधण्याचे कौशल्य नसते किंवा जखमी झालेल्या शिकारीचा माग काढत त्या दुर्दैवी प्राण्याची तडफड संपवण्याइतपत धाडस नसते. शिकार्यांना शिकारीतून कोणता आनंद मिळतो हे माहीत नाही. पण त्यांच्या सावजांच्या वाट्याला मात्र येतात त्या प्राणांतिक वेदना, अन्न न मिळवू शकल्याने भुकेने तडफडून मृत्यू, कुटुंबाची वाताहत, मातापित्यांवर अवलंबून असलेल्या पिलांच्या जगण्याचा आधार हिरावला जाणे. अगदी ज्यांच्यावर वन्यजीवनाचे संरक्षण करायची जबाबदारी आहे त्या शासकीय किंवा इतर संस्थादेखील पैशासाठी शिकारीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करताना दिसतात ही दुर्दैवाची बाब आहे.
शिकार ही किती क्रूर असू शकते हे खालील काही उदाहरणांवरून दिसून येईल.
प्राण्यांवर शिकारीचा काय परिणाम होतो? शिकारीच्या दरम्यान जीवाच्या आकांताने केलेली धडपड ही कदाचित त्यांना कधीकधी निसटून जायला मदतही करते. पण त्या अनुभवाचा कल्पना करता येणार नाही इतका ताण त्यांच्यावर पडतो. शिकार्यांचा आरडाओरडा, एकाचवेळी अनेक माणसांनी घेरून प्राण्याला एकटे पाडणे, बंदुकीच्या आवाजासारखे अनोळखी आवाज, कळपापासून तुटून एकाकी पडल्याची भावना, माद्यांमध्ये आपल्या पिल्लांनाही वाचवण्याची असलेली आस, ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की वन्यजीव हे अतिताणामुळे एकतर तेथील प्रदेश सोडून सुरक्षित प्रदेशात आसरा घेण्याचा प्रयत्न करतात - जे दिवसेंदिवस संकुचित होत चाललेल्या त्यांच्या अधिवासाच्या आकारामुळे अशक्यप्रायः होते, किंवा अपत्यांच्या सुरक्षिततेची खात्री नसल्यामुळे प्रजनन लांबणीवर टाकतात. आपसूकच अस्तित्त्वाच्या लढ्यात मानवी हस्तक्षेपाच्या क्रौर्यापुढे हतबल असलेले हे दुर्दैवी जीव हरणार हे स्पष्ट होते.
पर्यावरण संतुलनावरील विपरीत परिणाम
पर्यावरणात प्रत्येक प्रजातीची एक भूमिका ठरलेली आहे. भक्ष्य-भक्षक ह्या जीवसाखळीच्या पिरॅमिडसारख्या रचनेत सूक्ष्मजीव आणि वनस्पती, त्यांच्यावर अवलंबून असणारे तृणभक्षी प्राणी, त्यावर गुजराण करणारे मांसभक्षक प्राणी ह्यांचे एक विशिष्ट स्थान असते आणि त्यांच्या संख्येचा त्यात खूप महत्त्वाचा वाटा असतो. यातील एका प्रजातीने दुसर्या प्रजातीचा भक्ष्य म्हणून वापर करणे हे प्रथमदर्शनी क्रूर जरी वाटले तरी त्यातून प्रत्येक प्रजातीच्या संख्येवर योग्य तेवढे नियंत्रण राहत असते. उदा. तृणभक्षी प्राण्यांची संख्या अपरिमित वाढली तर त्याचे कारण वरच्या पातळीतील मांसभक्षी प्राण्यांचा झालेला विनाश हे असू शकते. आपापसातील निसर्गनियंत्रित संघर्ष हे उत्क्रांतीचे सर्वात महत्त्वाचे कारण आणि साधन आहे.
(प्रतिमा गूगल डॉक्सवरून साभार)
कुठल्याही कारणाने जर यातील एका घटकाच्या संख्येच्या पिरॅमिडशी असलेल्या प्रमाणाचे संतुलन ढळले तर त्या अधिवासातील जैवविविधता धोक्यात येते आणि पर्यायाने एकूणच संतुलन ढासळून त्या अधिवासाचा, पर्यावरणाचा विनाश होतो.
केवळ लोभापायी मानवाने केलेल्या बेसुमार शिकारीमुळे कित्येकदा केवळ विशिष्ट प्रजातीच्या प्राण्यांची संख्या घटते आणि त्यावर अवलंबून असणारे इतर घटक उपासमारीने मृत्युपंथाला लागतात.
पर्यावरण असंतुलनाचा मानवावर होणारा परिणाम
सर्वात महत्त्वाची आणि प्रत्येकाने कधीही विसरता कामा नये अशी गोष्ट म्हणजे मानव हाही ह्याच पर्यावरणाचा एक अविभाज्य आणि जबाबदार घटक आहे. मानवाचे अस्तित्त्वही इतर कुठल्याही प्रजातीप्रमाणेच निसर्गाच्या संतुलनावर तितकेच अवलंबून आहे आणि पर्यावरणाची झालेली कुठल्याही प्रकारची हानी ही मानवी जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम घडवत असते. शिकारीमुळे हा परिणाम कसा होतो, तर उदाहरण वाघाचे घेऊयात. केवळ शंभर वर्षांपूर्वीपर्यंत भारतात सुमारे एक लाखापेक्षा जास्त वाघ अस्तित्त्वात होते. आज अधिकृत नोंदीनुसार फक्त १३०० च्या आसपास शिल्लक राहिले आहेत आणि काहीच वर्षांमध्ये उरलेसुरलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला वाघांच्या बेसुमार शिकारीमागील कारणे ही निव्वळ मनोरंजनात्मक होती. पण अतिपूर्वेकडील देशांमध्ये असणार्या वाघाच्या अवयवांच्या मागणीमुळे आता वाघांची शिकार करण्याचा हेतू आणि पद्धत दोन्ही बदलले आहेत. ह्यामुळे अजून एक चिंताजनक गोष्ट अशी निर्माण झाली आहे की वाघांच्या शिकारीचे तंत्र बदलले आहे. पूर्वीसारखे जंगल उठवत किंवा बंदुकीच्या गोळीने नव्हे तर लोखंडी वा तारेच्या फासात अडकवून वाघ मारले जातात. ह्या पद्धतीत कितीतरी अधिक क्रौर्य आहे कारण वाघ अडकल्यानंतर सुटण्याची जी जीवापाड धडपड करतो त्यात त्याच्या अडकलेल्या पंजाचे चामडे अक्षरशः सोलून निघते आणि तरीही तो निसटू शकत नाही. निसटलाच तरी अशा पद्धतीने अपंग झालेला असतो की काहीच दिवसांत भुकेने व्याकुळ होऊन मरतो. हे लिहायलाही मला फार भयंकर वाटतेय पण ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे.
वाघांचा वावर संपल्याने जंगलात जाण्याचे भय लोकांना वाटेनासे होते. पर्यायाने जंगलसंपत्तीची, झाडांची बेसुमार तोड होऊ लागते तसेच इतर प्राण्यांच्याही शिकारीला ऊत येतो. थोड्याच काळात तो प्रदेश निर्जीव असल्यासारखा होतो. पावसाचे पाणी साठवण्याची जंगलांची क्षमता संपते, नद्यांना पूर येऊ लागतात, काठावरची गावे-वस्त्या उध्वस्त होतात, वने नष्ट झाल्यामुळे त्यावर अवलंबून असणार्या आदीम मानवी लोकसंख्येचा जगण्याचा आधारच हिरावला जातो. वनांचा पर्यावरणीय दर्जा अधिकृतरित्या घटल्यामुळे पैशाची मस्ती असलेल्या धनदांडग्यांच्या घशात अशा जमिनी पडायला वेळ लागत नाही किंवा सरकारही त्यावर काही करत नाही. आजच्या आर्थिक व्यवस्थेचा एक दोष असा आहे की नफा ही गोष्ट जितकी व्यक्तिगत ठेवता येईल तितकी ठेवायची आणि तो मिळवण्यासाठी होणारे जे काही नुकसान असेल, जी काही जबाबदारी असेल ती मात्र शक्य तितकी समाजावर, सरकारवर ढकलायची. वन्यजीवनावर, जंगलावर अतिक्रमण करणे हा मानवी हक्क आहे असा आरडाओरडा करून जमिनी बळकावायच्या पण जंगलांचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी मात्र घ्यायची नाही.
पर्यावरणवाद्यांवर घेतले जाणारे काही आक्षेप
एक आक्षेप तर वर आलेलाच आहे. शाकाहार वि. मांसाहार, हिंदू वि. मुस्लिम, वगैरे नेहमीचेच. खाली एका प्रतिसादात जे आलेय ते बरोबर आहे. मांसासाठी ज्या जनावरांची वा प्राण्यांची हत्या केली जाते त्यांची पैदासही मुद्दाम केली जाते आणि पर्यावरणसाखळीवर त्याचा अतिताण येणार नाही याची काळजी घेतली जाते. वन्य प्राण्यांची शिकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यांच्या संगोपनासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का असा प्रश्न स्वतःला विचारत नाहीत. जंगलातली एक कोंबडी, एक रानडुक्कर मारल्याने काय बिघडते असा विचार करणार्यांनी त्यांच्यासारखाच विचार करणारे अजून कितीतरी जण आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. तुम्ही एक रानकोंबडं मारलं, तसंच अजून कित्येक जण रानकोंबड्यांची अशीच शिकार करत असतील. यातील एकहीजण त्या रानकोंबड्यांच्या संवर्धनासाठी किंवा अधिवासासाठी प्रयत्न करत नसतो. मग ह्यांना ह्या पशुपक्ष्यांना मारण्याचा नैतिक अधिकार येतोच कसा? माळढोक पक्ष्यांची एकेकाळी मांसासाठी खूप शिकार व्हायची, तोही असाच काहीसा विचार करून. मी एक माळढोक मारल्याने काय बिघडणार आहे? आज सोलापूर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्यात केवळ एक-दोन माळढोक दृष्टीस पडतात तेही नशीब असेल तरच. माळढोकांची ही अवस्था रानकोंबडे, ससे, भेकरे, रानडुक्करे, चितळ, काळवीट ह्या प्राण्यांचीही एक दिवस होणार हे दुर्दैवाने निश्चित आहे. केवळ चारदोनजण माथेफिरू हे पर्यावरणासाठी धडपडणार्या हजारो हातांच्या मेहनतीवर पाणी फिरवत असतात ते असे.
महाराष्ट्रात अरूण बाड्डा किंवा पिंक हेडेड डक हे सुंदर बदक केवळ त्याच्या गुलाबी पिसांच्या हव्यासापोटी कायमचे अस्तंगत झाले.
मासेमारी
ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे ह्या गृहीतकाला छेद देणारा एक प्रकार म्हणजे मासेमारी. कृत्रिम जलाशयांमध्ये केली जाणारी मत्स्यशेती वगळता इतर प्रकारची मासेमारी ही आजकाल इतकी बेसुमार वाढलेली आहे की माशांच्या अनेक प्रजाती एकतर विलुप्त पावल्या आहेत किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनाच्या नावाखाली जपान करत असलेली देवमाशांची कत्तल ही तितकीच निंदनीय आहे. दरवर्षी जगात दहा हजारांपेक्षा जास्त शार्क मासे हे फक्त त्यांच्या कल्ल्यांसाठी मारले जातात कारण त्यांच्या कल्ल्यांना सूप बनवण्यासाठी मागणी आहे. सामन जातीचे मासे बेसुमार मासेमारीमुळे इतके कमी झाले आहेत की त्यांच्यावर अवलंबून असणारे ग्रिझली अस्वलांसारखे अन्य प्राणीही नष्ट होतील की काय अशी भीती वाटू लागली आहे.
ह्या विषयावर खूप काही लिहिता येईल, पण तितका वेळ नसल्यामुळे इथेच थांबतो. जाताजाता, चैतन्य गौरान्गप्रभु ह्यांनी लिहिलेल्या मिपावरच्याच एका अप्रतीम लेखाचा दुवा खाली देत आहे. वाचा आणि विचार करा, तुम्ही काय करता आहात.
http://www.misalpav.com/node/21469
धन्यवाद.
- स्वॅप्स

वाचने
57423
वाचनखूण
प्रतिक्रिया
127
हे छान केलेत. दुसर्या
In reply to हे छान केलेत. दुसर्या by डॉ सुहास म्हात्रे
+१००
In reply to +१०० by सुबोध खरे
चांगले मुद्दे आहेत.
In reply to +१०० by सुबोध खरे
तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण..
खूप छान माहितीपूर्ण लेख.
In reply to खूप छान माहितीपूर्ण लेख. by प्यारे१
अरे वा!
In reply to अरे वा! by एस
मस्त माहितीपुर्ण लेख.
सुरेख लेख!
In reply to सुरेख लेख! by दशानन
+१
...अंतर्मुख करायला लावणारा लेख...!!!!
In reply to ...अंतर्मुख करायला लावणारा लेख...!!!! by विनोद१८
माणुस निसर्गातला सर्वात
In reply to माणुस निसर्गातला सर्वात by डॉ सुहास म्हात्रे
बरोबर
धन्यवाद स्वॅप्स ह्या
बरं, मग शेवटी तुमचं म्हणणं काय?
In reply to बरं, मग शेवटी तुमचं म्हणणं काय? by पिवळा डांबिस
ख्यिक्क
In reply to बरं, मग शेवटी तुमचं म्हणणं काय? by पिवळा डांबिस
छ्या, छ्या ! मिपावर लई
माणसा सारखा स्वार्थी आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्याधन्यवाद!
अभ्यासपूर्ण लेख
In reply to अभ्यासपूर्ण लेख by सस्नेह
बरोबर
In reply to बरोबर by एस
पर्यावरणाचा पिरॅमिड आणि
अभ्यासपूर्ण लेख
In reply to अभ्यासपूर्ण लेख by सस्नेह
शिकारीबरोबरच औद्योगीकरण,
माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद
In reply to माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद by बॅटमॅन
+१
झाल्या काही प्रजाती नष्ट, मग
In reply to झाल्या काही प्रजाती नष्ट, मग by प्रसाद१९७१
(No subject)
In reply to झाल्या काही प्रजाती नष्ट, मग by प्रसाद१९७१
छान प्रश्न
In reply to छान प्रश्न by एस
पर्यावरणाचे नुकसान होते
In reply to पर्यावरणाचे नुकसान होते by प्रसाद१९७१
हम्म
In reply to हम्म by एस
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर
In reply to तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर by प्रसाद१९७१
+1
In reply to तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर by प्रसाद१९७१
प्रिमेस
In reply to प्रिमेस by एस
१. प्रजाती नष्ट होणे हा
In reply to १. प्रजाती नष्ट होणे हा by प्रसाद१९७१
आता तुम्ही थोडे मुद्देसूद बोलता आहात.
In reply to आता तुम्ही थोडे मुद्देसूद बोलता आहात. by एस
आणि मानवांची लोकसंख्या
In reply to आणि मानवांची लोकसंख्या by टवाळ कार्टा
पण...
In reply to आता तुम्ही थोडे मुद्देसूद बोलता आहात. by एस
प्रतिसाद आवडला.
In reply to तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर by प्रसाद१९७१
दुसऱ्या आक्षेपावर १००% सहमत
In reply to दुसऱ्या आक्षेपावर १००% सहमत by सनी स्॓आस
ठीक आहे, पण...
ज्या प्रजातींच्या
मानवांकडून केली जाणारी शिकार
In reply to मानवांकडून केली जाणारी शिकार by प्रसाद१९७१
असहमत!
लेख आवडला.
माहितीपूर्ण लेख..
खरेच तुम्हाला जसे आत्ता आहे
हम्म
अरेच्चा...
In reply to अरेच्चा... by एस
नै मियां...मैं तो कबसे
In reply to नै मियां...मैं तो कबसे by टवाळ कार्टा
ही: ही: ही:
In reply to अरेच्चा... by एस
तुमची मते काही बदलणार नाहीत.
In reply to तुमची मते काही बदलणार नाहीत. by प्रसाद१९७१
सिद्ध झालेल्यावर पण बोलूच.
In reply to सिद्ध झालेल्यावर पण बोलूच. by एस
अहो वाघ कधीच नष्ट झाले.
In reply to सिद्ध झालेल्यावर पण बोलूच. by एस
वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर
In reply to वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर by प्रसाद१९७१
नक्कीच
In reply to नक्कीच by एस
कुठले मुद्धे सोडले मी. काही
In reply to कुठले मुद्धे सोडले मी. काही by प्रसाद१९७१
हो का? माफ करा हं!
In reply to हो का? माफ करा हं! by एस
तुम्ही बेधडक विधाने फक्त करत
In reply to तुम्ही बेधडक विधाने फक्त करत by प्रसाद१९७१
उलट्या बोंबा?
In reply to उलट्या बोंबा? by एस
गेल्या १०० वर्षात वाघ आणि
In reply to गेल्या १०० वर्षात वाघ आणि by प्रसाद१९७१
ही तात्पुरती सूज आहे.
In reply to ही तात्पुरती सूज आहे. by एस
घालू दे की काय घाला घालायचा
In reply to घालू दे की काय घाला घालायचा by प्रसाद१९७१
प्रदुषणात सुद्धा मानवजात
In reply to प्रदुषणात सुद्धा मानवजात by एस
नक्की राहील. फारच प्रदुषण
In reply to गेल्या १०० वर्षात वाघ आणि by प्रसाद१९७१
बादवे तुम्ही तिथे उत्तर
In reply to बादवे तुम्ही तिथे उत्तर by एस
तिथे कुठे? काय राव चेष्टा
In reply to तिथे कुठे? काय राव चेष्टा by प्रसाद१९७१
तिथे कुठे?
In reply to अरेच्चा... by एस
हा नविन शिकारीसाठी हाकारा की
काही दिवसांपूर्वी मी काही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to काही दिवसांपूर्वी मी काही by मदनबाण
बर मग?
In reply to बर मग? by प्रसाद१९७१
तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर by मदनबाण
समजा मेले ते पक्षी तर काय फरक
In reply to समजा मेले ते पक्षी तर काय फरक by प्रसाद१९७१
माणूस जमात संपणं जास्त
In reply to माणूस जमात संपणं जास्त by प्यारे१
असहमत. प्राणी पक्षी काय नि
In reply to असहमत. प्राणी पक्षी काय नि by बॅटमॅन
प्रश्नच नाही. मी माणुस आहे
In reply to प्रश्नच नाही. मी माणुस आहे by प्रसाद१९७१
हम्म्म..
In reply to हम्म्म.. by हाडक्या
वर
In reply to प्रश्नच नाही. मी माणुस आहे by प्रसाद१९७१
काय माहीती, ह्या आधीपण लाखो
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेलझालेले आहेत आणि संपलेले आहेत. त्यांची यादी इथे सापडेल. पण "होमो सॅपियन सॅपियन" म्हणजे आधुनिक मानवाने (म्हणजे आपण हो !) नवनविन आयुधे (टुल्स) शोधून काढून जो प्राणीसंहार आणि पर्यावरणसंहार केला आहे / करत आहे त्याला या पृथ्वीच्या इतिहासात तोड नाही !In reply to असहमत. प्राणी पक्षी काय नि by बॅटमॅन
@ बॅटमॅन,
In reply to असहमत. प्राणी पक्षी काय नि by बॅटमॅन
मी माणूस असल्याने माझ्या
मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे.मुख्य मुद्दा हाच आहे ! केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण असा नाही आणि नकोच. कारण, तसे म्हणणार्यांकडून आणि तशी समजूत ठेवणार्यांकडून खरे तर मूळ मुद्द्याचा विपर्यास होतो. माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे. करोडो वर्षांच्या निसर्गाच्या क्रिया-प्रतिक्रियेतून जो परिणाम साधला गेला आहे त्याचा मानवाला मानव बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्या परिणामात मानवाच्या मेंदूच्या ताकदीने तयार झालेल्या साधनांचा उपयोग सुरू होण्याअगोदर आणि विषेशतः खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वीचा मानवाचा सहभाग बराचसा नैसर्गिकरित्या नियंत्रित होता. त्यामुळे "संहार आणि पुर्निर्माण" या चक्रात निसर्गाला सावरायला पुरेसा वेळ मिळत होता. भाल्याच्या उपयोगाने मानवाने मॅमथ संपवले. त्यातले बहुतेक मांसापेक्षा त्याचे दात आणि हाडांसाठी मारलेले असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. एका बंदूकीने एक माणूस जेव्हा डझनावारी प्रजननक्षम प्राणी काही दिवसांत मारतो तेव्हा कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक क्षमता तेवढ्या वेळात तेवढ्या संख्येने नविन प्राण्यांना जन्म देउन त्यांना प्रजननक्षम बनवण्याइतकी प्रबळ नसल्याने ती प्राणीजात संहाराच्या दिशेने जाते. हेच समीकरण जंगलतोडीला लागू पडते. तयार व्हायला शेकडो-हजारो वर्षे लागलेले जंगल आधुनीक साधने वापरून मानव काही वर्षांत / दशकांत ऊजाड करू शकतो / करत आला आहे... बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत. मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे आणि तेथे मुख्यतः निलगिरी सारखी सहजासहजी आग्नीच्या भक्षस्थानी न पडणारी झाडेच का आहेत याबाबत जे पुरावे समोर आले आहेत / येत आहेत तेही रोचक ठरावे.In reply to मी माणूस असल्याने माझ्या by डॉ सुहास म्हात्रे
माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू
In reply to माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू by प्रसाद१९७१
थोडे वाचन वाढवा. सगळेच पुरावे
पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा by मदनबाण
त्यांना काय वाटेल आणि फरक
बाकी इतर प्राणी खपले तरी
In reply to बाकी इतर प्राणी खपले तरी by प्रसाद१९७१
धन्य!
In reply to धन्य! by एस
माझ्या हेकटपणाचा दुसर्या
In reply to माझ्या हेकटपणाचा दुसर्या by प्रसाद१९७१
गैरसमज आहे तो
In reply to गैरसमज आहे तो by एस
कुठला त्रास हो, काहीतरीच.
In reply to कुठला त्रास हो, काहीतरीच. by प्रसाद१९७१
मानवपण त्याच जीवनाचा भाग आहे