शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव
(प्रतिमा गूगल डॉक्सवरून साभार)
कुठल्याही कारणाने जर यातील एका घटकाच्या संख्येच्या पिरॅमिडशी असलेल्या प्रमाणाचे संतुलन ढळले तर त्या अधिवासातील जैवविविधता धोक्यात येते आणि पर्यायाने एकूणच संतुलन ढासळून त्या अधिवासाचा, पर्यावरणाचा विनाश होतो.
केवळ लोभापायी मानवाने केलेल्या बेसुमार शिकारीमुळे कित्येकदा केवळ विशिष्ट प्रजातीच्या प्राण्यांची संख्या घटते आणि त्यावर अवलंबून असणारे इतर घटक उपासमारीने मृत्युपंथाला लागतात.
पर्यावरण असंतुलनाचा मानवावर होणारा परिणाम
सर्वात महत्त्वाची आणि प्रत्येकाने कधीही विसरता कामा नये अशी गोष्ट म्हणजे मानव हाही ह्याच पर्यावरणाचा एक अविभाज्य आणि जबाबदार घटक आहे. मानवाचे अस्तित्त्वही इतर कुठल्याही प्रजातीप्रमाणेच निसर्गाच्या संतुलनावर तितकेच अवलंबून आहे आणि पर्यावरणाची झालेली कुठल्याही प्रकारची हानी ही मानवी जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम घडवत असते. शिकारीमुळे हा परिणाम कसा होतो, तर उदाहरण वाघाचे घेऊयात. केवळ शंभर वर्षांपूर्वीपर्यंत भारतात सुमारे एक लाखापेक्षा जास्त वाघ अस्तित्त्वात होते. आज अधिकृत नोंदीनुसार फक्त १३०० च्या आसपास शिल्लक राहिले आहेत आणि काहीच वर्षांमध्ये उरलेसुरलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला वाघांच्या बेसुमार शिकारीमागील कारणे ही निव्वळ मनोरंजनात्मक होती. पण अतिपूर्वेकडील देशांमध्ये असणार्या वाघाच्या अवयवांच्या मागणीमुळे आता वाघांची शिकार करण्याचा हेतू आणि पद्धत दोन्ही बदलले आहेत. ह्यामुळे अजून एक चिंताजनक गोष्ट अशी निर्माण झाली आहे की वाघांच्या शिकारीचे तंत्र बदलले आहे. पूर्वीसारखे जंगल उठवत किंवा बंदुकीच्या गोळीने नव्हे तर लोखंडी वा तारेच्या फासात अडकवून वाघ मारले जातात. ह्या पद्धतीत कितीतरी अधिक क्रौर्य आहे कारण वाघ अडकल्यानंतर सुटण्याची जी जीवापाड धडपड करतो त्यात त्याच्या अडकलेल्या पंजाचे चामडे अक्षरशः सोलून निघते आणि तरीही तो निसटू शकत नाही. निसटलाच तरी अशा पद्धतीने अपंग झालेला असतो की काहीच दिवसांत भुकेने व्याकुळ होऊन मरतो. हे लिहायलाही मला फार भयंकर वाटतेय पण ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे.
वाघांचा वावर संपल्याने जंगलात जाण्याचे भय लोकांना वाटेनासे होते. पर्यायाने जंगलसंपत्तीची, झाडांची बेसुमार तोड होऊ लागते तसेच इतर प्राण्यांच्याही शिकारीला ऊत येतो. थोड्याच काळात तो प्रदेश निर्जीव असल्यासारखा होतो. पावसाचे पाणी साठवण्याची जंगलांची क्षमता संपते, नद्यांना पूर येऊ लागतात, काठावरची गावे-वस्त्या उध्वस्त होतात, वने नष्ट झाल्यामुळे त्यावर अवलंबून असणार्या आदीम मानवी लोकसंख्येचा जगण्याचा आधारच हिरावला जातो. वनांचा पर्यावरणीय दर्जा अधिकृतरित्या घटल्यामुळे पैशाची मस्ती असलेल्या धनदांडग्यांच्या घशात अशा जमिनी पडायला वेळ लागत नाही किंवा सरकारही त्यावर काही करत नाही. आजच्या आर्थिक व्यवस्थेचा एक दोष असा आहे की नफा ही गोष्ट जितकी व्यक्तिगत ठेवता येईल तितकी ठेवायची आणि तो मिळवण्यासाठी होणारे जे काही नुकसान असेल, जी काही जबाबदारी असेल ती मात्र शक्य तितकी समाजावर, सरकारवर ढकलायची. वन्यजीवनावर, जंगलावर अतिक्रमण करणे हा मानवी हक्क आहे असा आरडाओरडा करून जमिनी बळकावायच्या पण जंगलांचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी मात्र घ्यायची नाही.
पर्यावरणवाद्यांवर घेतले जाणारे काही आक्षेप
एक आक्षेप तर वर आलेलाच आहे. शाकाहार वि. मांसाहार, हिंदू वि. मुस्लिम, वगैरे नेहमीचेच. खाली एका प्रतिसादात जे आलेय ते बरोबर आहे. मांसासाठी ज्या जनावरांची वा प्राण्यांची हत्या केली जाते त्यांची पैदासही मुद्दाम केली जाते आणि पर्यावरणसाखळीवर त्याचा अतिताण येणार नाही याची काळजी घेतली जाते. वन्य प्राण्यांची शिकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यांच्या संगोपनासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का असा प्रश्न स्वतःला विचारत नाहीत. जंगलातली एक कोंबडी, एक रानडुक्कर मारल्याने काय बिघडते असा विचार करणार्यांनी त्यांच्यासारखाच विचार करणारे अजून कितीतरी जण आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. तुम्ही एक रानकोंबडं मारलं, तसंच अजून कित्येक जण रानकोंबड्यांची अशीच शिकार करत असतील. यातील एकहीजण त्या रानकोंबड्यांच्या संवर्धनासाठी किंवा अधिवासासाठी प्रयत्न करत नसतो. मग ह्यांना ह्या पशुपक्ष्यांना मारण्याचा नैतिक अधिकार येतोच कसा? माळढोक पक्ष्यांची एकेकाळी मांसासाठी खूप शिकार व्हायची, तोही असाच काहीसा विचार करून. मी एक माळढोक मारल्याने काय बिघडणार आहे? आज सोलापूर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्यात केवळ एक-दोन माळढोक दृष्टीस पडतात तेही नशीब असेल तरच. माळढोकांची ही अवस्था रानकोंबडे, ससे, भेकरे, रानडुक्करे, चितळ, काळवीट ह्या प्राण्यांचीही एक दिवस होणार हे दुर्दैवाने निश्चित आहे. केवळ चारदोनजण माथेफिरू हे पर्यावरणासाठी धडपडणार्या हजारो हातांच्या मेहनतीवर पाणी फिरवत असतात ते असे.
महाराष्ट्रात अरूण बाड्डा किंवा पिंक हेडेड डक हे सुंदर बदक केवळ त्याच्या गुलाबी पिसांच्या हव्यासापोटी कायमचे अस्तंगत झाले.
मासेमारी
ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे ह्या गृहीतकाला छेद देणारा एक प्रकार म्हणजे मासेमारी. कृत्रिम जलाशयांमध्ये केली जाणारी मत्स्यशेती वगळता इतर प्रकारची मासेमारी ही आजकाल इतकी बेसुमार वाढलेली आहे की माशांच्या अनेक प्रजाती एकतर विलुप्त पावल्या आहेत किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनाच्या नावाखाली जपान करत असलेली देवमाशांची कत्तल ही तितकीच निंदनीय आहे. दरवर्षी जगात दहा हजारांपेक्षा जास्त शार्क मासे हे फक्त त्यांच्या कल्ल्यांसाठी मारले जातात कारण त्यांच्या कल्ल्यांना सूप बनवण्यासाठी मागणी आहे. सामन जातीचे मासे बेसुमार मासेमारीमुळे इतके कमी झाले आहेत की त्यांच्यावर अवलंबून असणारे ग्रिझली अस्वलांसारखे अन्य प्राणीही नष्ट होतील की काय अशी भीती वाटू लागली आहे.
ह्या विषयावर खूप काही लिहिता येईल, पण तितका वेळ नसल्यामुळे इथेच थांबतो. जाताजाता, चैतन्य गौरान्गप्रभु ह्यांनी लिहिलेल्या मिपावरच्याच एका अप्रतीम लेखाचा दुवा खाली देत आहे. वाचा आणि विचार करा, तुम्ही काय करता आहात.
http://www.misalpav.com/node/21469
धन्यवाद.
- स्वॅप्स
In reply to हे छान केलेत. दुसर्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१०० by सुबोध खरे
In reply to +१०० by सुबोध खरे
In reply to खूप छान माहितीपूर्ण लेख. by प्यारे१
In reply to अरे वा! by एस
In reply to सुरेख लेख! by दशानन
In reply to ...अंतर्मुख करायला लावणारा लेख...!!!! by विनोद१८
In reply to माणुस निसर्गातला सर्वात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बरं, मग शेवटी तुमचं म्हणणं काय? by पिवळा डांबिस
In reply to बरं, मग शेवटी तुमचं म्हणणं काय? by पिवळा डांबिस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्याIn reply to अभ्यासपूर्ण लेख by सस्नेह
Coastal sand dune habitats have been altered dramatically, with native plants like pīngao (Desmoschoenus spiralis) being replaced by marram grass (Ammophila arenaria) and tree lupin (Lupinus arboreus). Herbaceous hawkweeds (Hieracium species) have taken over some grasslands, reducing them to wasteland, and are spreading into forests and along creeks.न्यूझीलंड सी लायन आणि व्हेलसारख्या स्थानिक सस्तन प्रजातींची कत्तल तर झालीच, पण डुकरे, कुत्री आणि मांजरांसारख्या बाहेरून आणलेल्या प्राण्यांमुळे तिथल्या अपृष्ठवंशीय आणि सरपटणार्या प्राण्यांवर, पक्ष्यांवर भयानक परिणाम झाला.
Since the late 1700s, 54 more mammal species have been brought to New Zealand. Nineteen of these, including two devastating predators (the Indian grey mongoose and the North American raccoon) did not become established in the wild. However, 11 predators successfully became naturalised: three more rodents; three mustelids (ferrets, stoats and weasels); pigs, hedgehogs, possums, dogs and cats. These have had a massive impact on the remaining native birds, invertebrates and reptiles. Forty out of a total 91 land birds are now extinct, with many others in serious decline.असेच एक उदाहरण म्हणजे मॉरिशस बेटावरील डोडो हा उडता न येणारा पक्षी. ह्याबद्दल वरच्या यादीत दुवा दिलाच आहे.
In reply to बरोबर by एस
In reply to अभ्यासपूर्ण लेख by सस्नेह
In reply to माहितीपूर्ण लेख. बहुत धन्यवाद by बॅटमॅन
याला लिमिट योग्य वेळीच घातली नै गेली तर माणसाचेही अस्तित्व टिकणे अवघड आहे.हेच तर आपल्यातल्या काही स्वार्थी लोकांना मान्य करायला जड जातेय.
In reply to झाल्या काही प्रजाती नष्ट, मग by प्रसाद१९७१
In reply to झाल्या काही प्रजाती नष्ट, मग by प्रसाद१९७१
In reply to छान प्रश्न by एस
In reply to पर्यावरणाचे नुकसान होते by प्रसाद१९७१
In reply to हम्म by एस
In reply to तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर by प्रसाद१९७१
In reply to तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर by प्रसाद१९७१
तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर आहे हा मुख्य आक्षेपमाझा लेख नेमक्या कोणत्या गृहीतकावर आधारलेला आहे असे तुम्हांला वाटते?
In reply to प्रिमेस by एस
In reply to १. प्रजाती नष्ट होणे हा by प्रसाद१९७१
१. प्रजाती नष्ट होणे हा पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरण म्हणजे तुम्हाला लहानपणी जे दिसले होते तेच असे नाही. पर्यावरण बदलत रहाते, रहाणार. मानवाला त्या बदलाशी Adjust होत रहावे लागेल.>>>प्रजातींच्या परस्परसंबंधातील अचानक आणि फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या बदलांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते, उत्क्रांतीतील जो प्रजातींचा र्हास होत असतो त्याचा वेग अतिशय म्हणजे अतिशय, काही लाख-कोटी वर्षांच्या कालावधीत घडत असतो. मानवाने केलेल्या बेकायदा आणि अनिर्बंध शिकारीमुळे प्रजाती नष्ट होण्याचा कालखंड हा लाखो वर्षांवरून काही दशकांवर येऊन ठेपला आहे. इतक्या बेसुमार र्हासाची भरपाई नवीन प्रजातींच्या रूपाने पर्यावरण करू शकत नाही कारण उत्क्रांती हे एकमेव साधन त्यासाठी उपलब्ध आहे. मानव हा प्रजाती मारू शकतो, नव्याने निर्माण करण्याइतपत अजून त्याची प्रगती झालेली नाही. पर्यावरण नेहमीच बदलणार, पण त्यातला बदल करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य मानवाने स्वतःच्या हाती घेऊ नये. शेदीडशे वर्षांपूर्वीचेच पर्यावरण मला हवे आहे असे म्हणणे प्रॅक्टीकली शक्य नाहीच. तसे माझे म्हणणेही नाही.
२. मानवानी शिकार केली काय, वाघानी केली काय आणि डायनासोअर नी केली काय. त्यात उच्च/नीच, चांगले/वाईट असे काही नाही.>>>चूक. जोपर्यंत मानवाची लोकसंख्या अतिशय लहान होती आणि शेतीसारख्या उत्पादनक्रियेचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत अन्न मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या शिकारीत आणि वाघ/डायनॅसोर आदींनी केलेल्या शिकारीत फरक नव्हता. मध्य भारतातील एका संस्थानिकाने गेल्या शतकाच्या सुरूवातीला तब्बल १४०० च्या आसपास वाघ केवळ शिकारीच्या हौसेखातर मारले. ह्याचे समर्थन तुम्ही कसे कराल?
३. पर्यावरणात प्रत्येक जातीची भुमीका ठरलेली असते.>>> पण ती प्रजात नष्ट झाली तर थोड्या बदला ने नविन साखळी/पिरॅमिड तयार होतो. आधीची साखळी/पिरॅमिड चांगला आणि नव्याने झालेला वाईट हे गृहितक चुक आहे. तुम्हाला जुन्याची सवय आहे म्हणुन ते तुम्हाला चांगले वाटते. वाघ आता जवळ्जवळ संपले आहेत, मानव आहेच आणि रहाणार.पिरॅमिड नष्ट/निर्माण होण्याचा वेग हा निसर्गनियंत्रित जोपर्यंत आहे तोपर्यंत हा युक्तिवाद ठीक आहे. वरती म्हटल्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शनचे तत्त्व ज्यात अंतर्भूत नाही अशा बेसुमार कृत्रिम कत्तलीतून केवळ सर्वंकष विनाशच मानवाच्याही वाट्याला येईल. मानव आहेच आणि राहणार हा दंभही अशाच गैरसमजुतीतून आलेला आहे. मानवाच्या जगण्याची सर्व साधने ही अंतिमतः निसर्गावरच अवलंबून आहेत. निसर्ग नसेल तर मानव कुठे जाणार?
४. जैवविविधता धोक्यात येते>>> ही सृष्टी तयार झाली ती काही जैवविविधता असावी म्हणुन नाही. जैवविविधता नसेल तर काहीच फरक पडत नाही. अगदी काही वर्षांनी फक्त मानव आणि काही लिमिटेड वनस्पतीसृष्टी राहीली तरी मानव जात राहु शकते. हे टोकाचे उदाहरण झाले. पॉईंट समजुन घ्या.>>>जैवविविधतेचे काहीएक प्रयोजन नाही असे तुम्हांला थोडक्यात म्हणायचे आहे. हा समज चुकीचा आहे. जितकी जैवविविधता जास्त तितका नैसर्गिक निवडीला स्कोप जास्त असतो आणि एकूणच जीवसृष्टी तगून राहण्यासाठी जैवविविधता जितकी जास्त असेल तितकी ती शक्यता जास्त असते हे विविध सांख्यिकी आणि शास्त्रीय मॉडेलनी सिद्ध झालेले आहे.
५. मानवाची लोकसंख्या वाढते आहे, त्यांना रहाण्या, खाण्यासाठी काय करणार. पर्यावरणवादी त्या बाबतीत काहीच का बोलत नाहीत. जर जंगले पाहीजे असतील तर लोकसंख्या कमी करा हा एक च उपाय आहे.दुर्दैवाने सहमत. एकीकडे वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारी नैसर्गिक संसाधने अपुरी पडू लागलेली आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसंख्यावाढीचा वेग अगदीच ऋणात्मक होणेही त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू मृत्युपंथावर नेते हा एक गुंतागुंतीचा पॅराडॉक्स आहे आणि ते गणित सोडवणे, योग्य मेळ घालणे तितके सहजसोपे नाही. गेली कित्येक वर्षे मी यावर विचारमंथन करतो आहे पण यावर कुठलाच रामबाण उपाय नाही अशा निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. लोकसंख्या आहे त्यापेक्षा कमी करण्याला खूप सामाजिक-राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय मर्यादा आहेत ज्यांची विस्तृत चर्चा इथे शक्य नाही. सध्यातरी आहे तो इकोबॅलन्स टिकवून ठेवणे इतकेच आपल्या हाती आहे.
In reply to आता तुम्ही थोडे मुद्देसूद बोलता आहात. by एस
In reply to आणि मानवांची लोकसंख्या by टवाळ कार्टा
In reply to आता तुम्ही थोडे मुद्देसूद बोलता आहात. by एस
In reply to तुमचा लेख चुकीच्या प्रिमेस वर by प्रसाद१९७१
In reply to दुसऱ्या आक्षेपावर १००% सहमत by सनी स्॓आस
In reply to मानवांकडून केली जाणारी शिकार by प्रसाद१९७१
ह्यामागे स्वतःचे वंशसातत्य टिकवणे, वाढवणे हीच मूलभूत प्रेरणा असते. माणसांच्या बाबत मात्र ह्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा हाव, लोभ, क्रौर्य इत्यादी भावनांमुळे इतर प्राण्यांची शिकार करण्याचा स्वभाव दिसतो.मग कसा बरं फरक नाही?
In reply to अरेच्चा... by एस
In reply to नै मियां...मैं तो कबसे by टवाळ कार्टा
In reply to अरेच्चा... by एस
In reply to तुमची मते काही बदलणार नाहीत. by प्रसाद१९७१
In reply to सिद्ध झालेल्यावर पण बोलूच. by एस
In reply to सिद्ध झालेल्यावर पण बोलूच. by एस
वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर काय परिणाम होईल ह्याचे तुम्हांला हवेच असेल तर पुराव्यांसकट सविस्तर उत्तर देईन हवं तर. पण मग तुम्हांला तुमची मते बदलावी लागतील. आहे का तयारी?नक्की बदलीन. पण तुम्ही जे काही वाईट परिणाम झाले ते वाघ नष्ट झाल्यामुळेच झाले हे सिद्ध करायला पाहीजे.
In reply to वाघ नष्ट झाल्यामुळे मानवावर by प्रसाद१९७१
In reply to नक्कीच by एस
In reply to कुठले मुद्धे सोडले मी. काही by प्रसाद१९७१
In reply to हो का? माफ करा हं! by एस
In reply to तुम्ही बेधडक विधाने फक्त करत by प्रसाद१९७१
In reply to उलट्या बोंबा? by एस
In reply to गेल्या १०० वर्षात वाघ आणि by प्रसाद१९७१
In reply to ही तात्पुरती सूज आहे. by एस
In reply to घालू दे की काय घाला घालायचा by प्रसाद१९७१
प्रदुषणात सुद्धा मानवजात शिल्लक राहील.याला म्हणतात झापडे. किती दिवस शिल्लक राहील?
In reply to प्रदुषणात सुद्धा मानवजात by एस
In reply to गेल्या १०० वर्षात वाघ आणि by प्रसाद१९७१
In reply to बादवे तुम्ही तिथे उत्तर by एस
In reply to तिथे कुठे? काय राव चेष्टा by प्रसाद१९७१
तिथे कुठे?http://misalpav.com/comment/615484#comment-615484 इथे उत्तर द्या. मी जसे दिले आहे तसे.
In reply to अरेच्चा... by एस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to काही दिवसांपूर्वी मी काही by मदनबाण
In reply to बर मग? by प्रसाद१९७१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to तुमचे काय म्हणणे आहे? तो पॉवर by मदनबाण
In reply to समजा मेले ते पक्षी तर काय फरक by प्रसाद१९७१
In reply to माणूस जमात संपणं जास्त by प्यारे१
In reply to असहमत. प्राणी पक्षी काय नि by बॅटमॅन
In reply to प्रश्नच नाही. मी माणुस आहे by प्रसाद१९७१
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेलअसा कधी आधी विचार केला नव्हता.. रोचकच.. :) (शिकारीचे समर्थन नाहीच पण हा मुद्दा रोचक आहे.) माणूस विचार करु शकतो म्हणून कदाचित हे एवढे चर्चासत्र सुरु आहे. वाघ कमी होत असताना वाघांनी स्वतःहून काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत स्वतःची प्रजा वाचवायला. वरून एक वाघ दूसर्या नरापासून झालेली म्हणून वाघिणीची इतर पिल्ले जेव्हा मारत सुटतो तेव्हा तो वाघ पण वाघांची संख्या कमी व्हायला तेवढाच दोषीच नाही का?
In reply to हम्म्म.. by हाडक्या
In reply to प्रश्नच नाही. मी माणुस आहे by प्रसाद१९७१
काय माहीती, ह्या आधीपण लाखो वर्षापूर्वी मानव सदृष प्राणी तयार ही झाला असेल पण तो विकसीत होयच्या आधी ह्या वाघ, डायनासोअर नी संपवला असेल
झालेले आहेत आणि संपलेले आहेत. त्यांची यादी इथे सापडेल.
पण "होमो सॅपियन सॅपियन" म्हणजे आधुनिक मानवाने (म्हणजे आपण हो !) नवनविन आयुधे (टुल्स) शोधून काढून जो प्राणीसंहार आणि पर्यावरणसंहार केला आहे / करत आहे त्याला या पृथ्वीच्या इतिहासात तोड नाही !In reply to असहमत. प्राणी पक्षी काय नि by बॅटमॅन
In reply to असहमत. प्राणी पक्षी काय नि by बॅटमॅन
मी माणूस असल्याने माझ्या स्वार्थासाठी मला मानवजात टिकलेली हवी आहे.
मुख्य मुद्दा हाच आहे ! केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण असा नाही आणि नकोच.
कारण, तसे म्हणणार्यांकडून आणि तशी समजूत ठेवणार्यांकडून खरे तर मूळ मुद्द्याचा विपर्यास होतो.
माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहे.
करोडो वर्षांच्या निसर्गाच्या क्रिया-प्रतिक्रियेतून जो परिणाम साधला गेला आहे त्याचा मानवाला मानव बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्या परिणामात मानवाच्या मेंदूच्या ताकदीने तयार झालेल्या साधनांचा उपयोग सुरू होण्याअगोदर आणि विषेशतः खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वीचा मानवाचा सहभाग बराचसा नैसर्गिकरित्या नियंत्रित होता. त्यामुळे "संहार आणि पुर्निर्माण" या चक्रात निसर्गाला सावरायला पुरेसा वेळ मिळत होता.
भाल्याच्या उपयोगाने मानवाने मॅमथ संपवले. त्यातले बहुतेक मांसापेक्षा त्याचे दात आणि हाडांसाठी मारलेले असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. एका बंदूकीने एक माणूस जेव्हा डझनावारी प्रजननक्षम प्राणी काही दिवसांत मारतो तेव्हा कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक क्षमता तेवढ्या वेळात तेवढ्या संख्येने नविन प्राण्यांना जन्म देउन त्यांना प्रजननक्षम बनवण्याइतकी प्रबळ नसल्याने ती प्राणीजात संहाराच्या दिशेने जाते.
हेच समीकरण जंगलतोडीला लागू पडते. तयार व्हायला शेकडो-हजारो वर्षे लागलेले जंगल आधुनीक साधने वापरून मानव काही वर्षांत / दशकांत ऊजाड करू शकतो / करत आला आहे... बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत. मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहे आणि तेथे मुख्यतः निलगिरी सारखी सहजासहजी आग्नीच्या भक्षस्थानी न पडणारी झाडेच का आहेत याबाबत जे पुरावे समोर आले आहेत / येत आहेत तेही रोचक ठरावे.In reply to मी माणूस असल्याने माझ्या by डॉ सुहास म्हात्रे
माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू शकणार नाही, हे सत्यही जाणून घेणे आवश्यक आहेमी कुठे म्हणतोय की एकांडा जगु शकेल. आत्ता १० लाख प्रजाती असतील. समजा त्यातल्या १ लाख शिल्लक राहील्या तर मानव एकटा कुठे रहाणार आहे.
बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींची ठिकाणे आज वाळवंटे आहेत, याचे केवळ "निसर्गात आपोआप झालेला बदल" हेच कारण नसून मानवाने केलेल्या अतीरेकी वनसंहाराच्या कृतीने झालेला निसर्गातील बदल हे कारण असण्याचे पुरावे सापडत आहेत.असे काय पुरावे सापडले आहेत? तुम्हाला काय म्हणायचे की थर चे वाळवंट जंगल तोडीमुळे तयार झाले?
मानवाच्या आगमनापूर्वी बहुतांश पर्जन्यारण्य असलेले ऑस्ट्रेलिया खंड आता बहुतांश वाळवंट का आहेह्याचे काही पुरावे आहेत का? ऑस्ट्रेलिया मधे १७ व्या शतका पर्यंत काही लाखांची पण लोक वस्ती नव्हती. त्या लोकांनी सगले जंगल तोडले असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग टास्मानियात इतके प्रचंड जंगल कसे शिल्लक राहीले?
In reply to माणूस या पृथ्वीवर एकांडा जगू by प्रसाद१९७१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to पण ५० वर्षानी ते पक्षी किंवा by मदनबाण
त्यांना काय वाटेल आणि फरक पडेल ते तेव्हाच कळेल आता कसे कळणार ?असे कसे, तुमच्या खापर पणजोबांच्या वेळी हजारो वाघ होते, आता ते नाहीत. तुम्हाला ( तुमच्या पिढीला ) काय फरक पडला? आता डोडो नाही, मॅमथ नाही तुम्हा/आम्हाला काय फरक पडला?
बाकी इतर प्राणी खपले तरी चालेल पण माणसाला मात्र त्याला हवे तसे वागण्याची मुभा असावी असे आपले मत आहे कायहो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.
In reply to बाकी इतर प्राणी खपले तरी by प्रसाद१९७१
हो जर त्या बाकीच्या प्राण्यांना जपत बसल्या मुळे मानवाला त्रास होस असेल तर त्या प्राण्यांना जपणे ही प्रार्थमिकता होत नाही ( माझ्या मते ). जर लागले तर इतर प्राणी खपवावेत. पुन्हा माझे पहीलेच मत. जे आपण आपल्या आयुष्यात बघितले आहे तसेच पर्यावरण कायम पाहीजे हा अट्टाहास आहे. जैवविविधता ही बकवास आहे. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधे, निवारा, बाकी रॉ मटेरिअल पुरवणार्या काही वनस्पतींच्या प्रजाती शिल्लक राहील्या तरी पुरेसे आहे. साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.वर मला कुणीतरी हेकट म्हणालं होतं. तुम्हीच होतातना?
In reply to धन्य! by एस
In reply to माझ्या हेकटपणाचा दुसर्या by प्रसाद१९७१
In reply to गैरसमज आहे तो by एस
In reply to कुठला त्रास हो, काहीतरीच. by प्रसाद१९७१
हे छान केलेत. दुसर्या