Skip to main content

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 22/09/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?

वाचने 100349
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by इरसाल

शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व होते ,ते फक्त दुजर्नांच्या विरोधात होते, कुठल्या धर्माच्या नाही. महाराजांना सर्वधर्मसमभाव असलेले स्वराज्य अपेक्षीत होते ,ते त्यांनी स्थापन केले, परंतु काही इतिहासकार(?) त्यांनी फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन केले असा दावा करतात, जो अर्थात चूक आहे. राजेंनी मुस्लिम राज्यकर्त्यांना पराजीत केले, म्हणुन ते मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात, या न्यायाने राजे हिंदुविरोधी ठरतात काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात,
जर बाबासाहेब पुरंदर्‍यांबद्दल म्हणत असाल तर त्यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये व्यवस्थित उल्लेख केलेला आहे या लोकांचा. त्यांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते हेही लिहिलं आहे. शिवाजींनी कधीही कुठल्याही इतरधर्मिय प्रार्थना स्थळाला धक्का पोचवला नाही हेही स्वच्छ लिहिलं आहे. केवळ जात बघून एखाद्या इतिहास अभ्यासकाला शिव्या घालणार्‍या बिर्गेडी लोकांना हे समजणार कसं?

In reply to by इरसाल

गई भैंस पानी में! इरसालभौ, सन्माणणीय णेफळे यांणी डोळ्यावर चष्मा लावल्याणे तुमचा उपहास त्यांच्या डोक्यावरूण णिघूण गेला आहे हे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! =))

In reply to by नानासाहेब नेफळे

हे सांगशील का ?? ते तसे दाखविणारा तो पोटार्थी कोण ?? त्याने (पोटार्थी) ते तसे दाखविण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्ण तुला पडला, म्हणजेच तु त्या नाटकावर इतक्या बारकाइने सांगोपांग विचार करू शकतोस याचे मला आश्चर्य नाही वाटले पण चकीत मात्र झालो. बरे तो प्रसंग दाखविल्यामुळे महाराजांच्या सेकुलर प्रतिमेला धक्का बसला, अगदी तुलासुद्धा बसला असे तुझ्या प्रतिक्रियेवरुन जाणवले. तर अशा पोटार्थ्याने लिहीलेल्या व भाकडकथांनी सजविलेल्या नाटकांना तु मात्र न चुकता हजेरी का लावतोस हे सांग आधी.

In reply to by विनोद१८

देशात घटनेचं राज्य आहे, कुण्याही फडतुस पोटभरुने सुपार्या घेऊन इतिहासाची मोडतोड करावी वा तसे आपल्या कलाकृतीतून दाखवायला ही मोगलाई नाही, त्यामुळे मी नाटक का बघितले हा प्रश्न गौण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची केलेली मोडतोड हा ही पोटार्थी व राजकीय हेतुन प्रेरित प्रकार आहे, त्याचाही निषेध केला पाहीजे .परंतु या देशात इतिहासाचा वापर करुन धार्मिक वा जातीय सलोखा बिघडवण्याचे काम ज्या लोकांनी इमानेइतबारे केले, त्यांनीच पेरलेले काटे आज त्यांच्या पायात रुतत आहेत. ब्रिगेडींचा विखार हे त्यांना प्रत्युत्तर आहे, अर्थात त्यांचा मार्ग हा योग्य मार्ग नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

महाराष्ट्रात इतिहासाचा वापर करुन या देशात धार्म्मिक अथवा जातीय सलोखा बिघडवला फक्त बीग्रेडींनी. इतर कोणीही कधीही इतिहासाचा वापर इतर लोकांच्या द्वेषाखातर केलेला नाही. शिवाय इतर कोणीही इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी देवांच्या मुर्ती फोडण्याची कामे केलेली नाहित. स्वातंत्र्यपुर्व काळात मुस्लिम धर्मांधांनी हिंदुंची देवळे फोडली त्याबद्द्ल मी काही बोलत नाही. अफजलखान आणि शाइस्तेखानाने ते पवित्र काम भोसले, मोरे इत्यादी मराठी सरदारांच्या साक्षीनेच केले. मराठी माणूसच जिथे गद्दार झाला होता तिथे त्या धर्मांधांना काय शिव्या घालायच्या म्हणा.

In reply to by नानासाहेब नेफळे

..म्हंजे नेमके काय रे नान्या ?? मी हे नवीनच काहीतरी प्रकरण वाचतोय आज, तु मिपाकरांचे याविषयीचे कुतुहल वाढ्विलेस हे नक्की. केवळ तुझ्यामुळेच आज आम्हा मिपाकरांना या विषयीची अधिक ज्ञानप्राप्ती होइल म्हणजेच आमचे याविषयीचे अज्ञान दूर होइल असे मी छातीठोकपणे समजु शकतो काय, नान्या. ?? तेव्हा याविषयी अधिक सविस्तर टंकण्याचे कष्ट यापुढच्या तुझ्या प्रतिसादात घे. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येउया. त्या कुणा एका फडतूस पोट्भरु व सुपार्या घेणार्या व इतिहासाची मोड्तोड करणार्या माणसाने लिहीलेल्या व तु ते तुझ्या घटनादत्त अधिकारात पाहिलेल्या नाटकाचे नाव रे काय ?? तुझ्यासारखेच मीसुद्धा ते माझ्या घटनादत्त अधिकारात पुन्हा पुन्हा पाहीन म्हणतो, ते तु मला सांगशील काय रे नान्या ?? बरे तुझ्या प्रतिसादातल्या १९वा शब्द नक्की 'मोगलाई' असा वाचावा कि 'मोदीशाही' ??? नान्या, तुझ्यासारख्या विद्वानाने एक भाकड नाटक वारंवार पाहणे हा प्रश्न गौण कसा काय ?? मला वाटते मी विचारलेल्या प्रश्णांना मुद्द्यापासुन न भरकटता उत्तरे द्यावीस.

In reply to by श्रीगुरुजी

ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?
थोडक्यात, मुसलमानांच्या पाटाचं पाणी नानेखानांच्या आडात आलंय.

In reply to by मृत्युन्जय

तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.
त्याच्या तत्वात चूक काय होते. तो प्रखर राष्ट्रवादी होता.

गफलत झाली माफ करा मात्र नजरकैदेत असल्या तरी ते आणि त्यांचे समर्थक संभाजी राजाविरुद्ध कारस्थाने करत होतेच. सोयराबाई संभाजी हयात असतानाच गेल्या तेव्हा त्यांचा प्रश्न येत नाही हे मान्य मात्र त्यांचा म्हणजे राजारामांचा गट अस्तित्वात होताच. संभाजी राजांना अटक झाल्यावर लगेच राजाराम यांचे मंचकारोहण झाले. संभाजी राजे यांना अटक झाली फेब्रुवारी मध्ये (१ फेब १६८९ ) आणि मुघल त्यांना कोकणातून घेवून पुण्याजवळ तुळापुर येथे त्यांची निर्घृण हत्या झाली ११ मार्च १६८९ मध्ये एवढ्या काळात मराठ्यान्नी त्यांना सोडवण्याचा एकही मोठा प्रयत्न केला नाही याचे समाधानकारक कारण मिळत नाही.

In reply to by दुश्यन्त

संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला. इतकेच नव्हे तर रायगड मुघलांच्या ताब्यात जात असताना राजारामांस वाघदरवाजातून पळून जाण्यास मदत केली व् स्वत: युवराज शाहूंसह मुघलांच्या स्वाधीन झाल्या. औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही।

In reply to by प्रचेतस

औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही। अनुमोदन.

In reply to by प्रचेतस

नशीब कोणी अजून असे बोलले नाही, की राजाराम महाराजांनी घडवून आणले वगैरे वगैरे.... हल्ली इतिहास रचणारे चिक्कार इतिहासकर आहेत रे वल्ली.... ;-) ५० पानांचे शिवचरित्र आल्याचे वाचले होते, ज्यास पुरस्कारही (?) मिळाला होता... आता बोल =))

In reply to by प्रचेतस

रायगडाला मुघलांच्या स्वाधीन करणारा सुर्याजी पिसाळच ना? त्याच्यावरुनच देशद्रोह्याला सुर्याजी पिसाळ म्हणण्याची पद्धत पडली ना?

In reply to by प्रचेतस

संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला ?? पण मी तर वाचले आहे की संभाजी राजांबरोबर येसुबाई आणि शाहु पण औरंगजेबाच्या कैदेत होते . कारण त्यांच्या ( येसुबाईंच्या) माहेरी काही कार्यानिमित्त गेले असताना त्यांच्या (येसुबाईंच्या) सख्ख्या भावानेच दगा केला होता . आणि सोयराबाई नजरकैदेत होत्या पण राजाराम नसावेत बहुदा

In reply to by मनीषा

महाराणी येसूबाईंनी संभाजी राजांच्या हत्येच्या आधीच राजारामाला मंचकारोहण करून सुखरूप रायगडाबाहेर काढला होता. आणि स्वतः मात्र शाहूसह रायगडावरच राहिल्या होत्या.

In reply to by पैसा

नक्की? मग त्या रायगडावर का राहील्या असतील? आणि संभाजीच्या मृत्यु आधीच राजारामाला राज्याभिषेक ?

In reply to by मनीषा

इथेच कुठेतरी जेधे शकावलीचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे संभाजीराजे सुटून येऊ शक्त नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच राजारामाला संभाजीराजे हयात असतानाच मंचकारोहण केले. मंचकारोहण हे बहुतेक पूर्ण राज्याभिषेक नसावा, युवराज म्हणून नियुक्ती असे काहीसे असावे असे वाटते. येसूबाई गडावरच राहण्याचे सयुक्तिक कारण असे दिसते की जवळपासच्या इतर सर्व गडांनाच वेढे पडले होते, त्यामुळे रायगड हाच त्यातल्या त्यात सुरक्षित होता. आणि जर फितुरी झाली नसती तर गड आणखी कित्येक दिवस, महिने लढवता आला असता. राजाराम जिंजीकडे जाणार हे ठरले होते. त्यामुळे कोणीतरी जबाबदार माणसाने मराठी प्रदेशात रहाणे आवश्यक होते. तो निर्णय येसूबाईंचाच होता. त्यांना स्वतंत्र शिक्का सुरुवातीपासून होता आणि त्या अनेकदा कारभारही पहात होत्या असे उल्लेख आहेत.

In reply to by पैसा

शकावलीतला उल्लेख असा आहे फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले याचा अर्थ असा कि कैदेतून सुटका करून आदराने एका आसनावर बसवले. तो काही राज्याभिषेक नव्हे, फक्त एक मान्यता अथवा आदराने मुक्तता अश्या अर्थाने ते घेतले पाहिजे.

In reply to by दुश्यन्त

राजाराम सुद्धा रायगडावर होते. त्याना येसूबाईंनी शिताफीने बाहेर काढले आणि मग ते जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे गेले. मंचकारोहण हे येसूबाईंच्या धोरणीपणामुळेच घडल. एवढेच नव्हे तर राजारामाला पळायला अवधी मिळावा म्हणून येसूबाई रायगडावरच राहिल्या. जेणेकरून मोगलांचे लक्ष तिकडेच राहिले. आता संभाजीराजांना सोडवायचे प्रयत्न झाले नाहीत असे हे सगळे बोलणारी मंडळी अप्रत्यक्षरीत्या येसूबाईंना जबाबदार धरत आहेत आणि राजारामावर आरोप ठेवत आहेत असे तुम्हाला वाटत नाही? हंबीरराव मोहिते संभाजीराजांच्या आधीच गेले. त्यांच्यासारखा पराक्रमी सरदार त्यावेळेस कोणीच नव्हता. शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते.

In reply to by पैसा

शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> हे अगदी पटतंय. बातमी पोचली तरी, ती बातमी खरी आहे की नाही, खरंच राजे पकडले गेले आहेत, की नुसतीच आवई उठवली आहे, याची खतरजमा होईपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल.

In reply to by कवितानागेश

विश्वास पाटीलांच्या पुस्तकात असेही लिहिलेय कि धूर्त औरंगजेबाला मराठे उठाव करतील हे माहित होते. म्हणून त्याने बाकीच्या किल्ल्यांचा बंदोबस्त केलाच पण संभाजी महाराजांना जेथे कैदेत ठेवले होते त्याच्या आजूबाजूच्या गावामधील सर्व पुरुष मंडळीना हग्या मार दिला. बैल, घोडे जप्त केले. आणि जनता उठाव करणार नाही याचा पक्का बंदोबस्त केला. संगमेश्वरहून कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना नेहमी बुरखा घालून झाकूनच नेले गेले. जेणे करून कैदी कोण आहे याचा वाटेतल्या लोकांना थांगपत्ता लागू नये.

In reply to by खटपट्या

इतिहास या विषयावर कथाकादंबरीकार त्यांच्या साहीत्यात कल्पनाविलास करत असतात, त्याला खरा इतिहास समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसंन्यास या नाटकात वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक पात्र घुसडले, पूढे तोच इतिहास लोक खरे मानायला लागले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका प्रसिद्ध नाटकात अनेक कल्पनाविलास केले गेले आहेत ,परंतु बरेच लोक त्याला खरा इतिहास मानतात हे दुर्दैव आहे आणि या असल्या मुर्खपणावर आक्षेप घेणार्यांना मुर्खात काढण्याचा महामुर्खपणाही सुप्त धार्मिक अस्मितेच्या नावाखाली चालू असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफ़ळ्यांशी अशतः सहमत. गडकर्‍यांनी राजसंन्यासमध्ये वाघ्या घुसडलं का नाही ते माहीत नाही पण इंदूरच्या होळकरांनी शिवाजी राजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार करायला मदत केली तेव्हा त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक पण उभारले गेले असे काहीसे गोनीदांनी दुर्गभ्रमणगाथेत लिहिल्याचे आठवते. बाकी विश्वास पाटलांनी 'संभाजी' कादंबरीत बरेच लेखनस्वातंत्र्य घेतले आहे. मात्र औरंगजेबाने तेव्हा भौतेक किल्ल्यांना मोर्चे लावले होते हे नक्कीच खरे आहे. मात्र लोकांना हग्या दम दिला हे कल्पित असावे.

In reply to by प्रचेतस

http://www.misalpav.com/node/22418 या धाग्यावर वाघ्याबद्दल भरपूर चर्चा झाली आहे आणि त्यात नाना आणि जागोमोहनप्यारे यांचा भरपूर सहभाग होता. आता या धाग्यावर वाघ्याबद्दल लिहू नये. एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!

In reply to by पैसा

त्या लेखातील खालील वाक्य वाचुन खुप मौज वाटली: य द वे, राष्ट्रवादीचे दोन पराक्रमी पुरुष -आदरणीय भुजबळसाहेब व तटकरेसाहेब यांच्याभोवती तूर्तास त्यांनी केलेल्या काही घोटाळ्याचा फास अडकू पहात आहे. त्यामुळे साहजिकच
जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीवाले बर्‍यापैकी अडचणीत येऊ पहात असतात तेव्हा तेव्हा ते संभाजी ब्रिगेडला 'छ्छू.........' केले जाते आणि ती मंडळी जोमाने एक नवा पुरुषार्थ करायला सज्ज होतात..!

In reply to by पैसा

एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!
वाचनमात्र झालेला धागा 'वर' कसा हो काढायचा पैअक्का? आम्ही काय सम्पाद्क हाय व्हयं?

In reply to by एस

मग दुसरा धागा काढा! हाकानाका! आणि प्यारेकाकांसारख्या जुन्या जाणत्या मिपाकराने इतके अवांतर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वगैरे.. ओ प्यारेकाका अवांतर करण्यासाठी दुसरे पेश्शल धागे आहेत की हो!

In reply to by पैसा

४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते. हे उत्तर संयुक्तिक वाटते........

शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> संयुक्तीक वाटते.

माझे मत असे आहे. कदाचित त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर शिवाजी राजांच्या तोडीचा कुणीही धुरंधर, मुत्सद्दी मराठमंडळात नव्हता. शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. औरंगजेबाच्या अफाट फौजेची भिती मराठ्यांना नव्ह्ती. गनिमी काव्याने त्यांनी सतत मोगली फौजेला हैराण केले होते. त्यामुळे असे वाटते की शिवाजीराजां सारखा विचार करणारा एखादा धोरणी, मुत्सद्दी त्यावेळी कुणी असता, तर संभाजी राजांची कदाचित सुटका होऊ शकली असती. कदाचित प्रयत्न झालेही असतील. पण इतिहासाला ते अज्ञात आहेत.

In reply to by बबन ताम्बे

शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना.......

In reply to by अतुल झोड

तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना ! आपल्या या मताशी सहमत.

In reply to by बबन ताम्बे

असा धोरणी, मुत्सुदी असता तरी सुटका होऊ शकली नस्तीच बहुदा औरंगजेब चांगलाच धूर्तं होता . आग्र्याला गमावलेली संधी त्याने कदापीही हातची जाऊ दिली नसती.

In reply to by मनीषा

ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत, (शहेनशहा) त्यांनी असे दाखवीलेय की शिवाजी महाराजांची सुटका पडद्यामागे राहून औरंगजेबानेच केली. त्यात त्याचे राजकारण होते. शिवाजी राजां सारख्या शूर योद्ध्याचा वापर (त्यांना मुघलांची सरदारकी देऊन) त्याला दक्षिणेत अदीलशाही, कुतुबशाही नष्ट करण्यासाठी करायचा होता. अर्थात कादंबरी प्रकाशित झाल्या नंतर ना. स. इनामदारांवर (या मताबाबत) टीका पण खूप झाली.

In reply to by मनीषा

ना.स.ईनामदारांनी महामहोपाध्याय द.वा.पोतदारांचा दाखला दिला होता असे वृत्तपत्रात वाचल्याचे आठवतेय.

In reply to by मनीषा

माझ्या मते शिवाजी महाराजांनंतर (कदाचित आधी सुद्धा) आपल्याला त्यांच्या तोडीचा धूर्त नेता मिळालेला नाही. त्यांच्या बरोबर काम करणारांमध्ये सुद्धा असं कुणी पासंगाला पुरणारं देखील नव्हतं. अन्यथा एक सेनापती महाराज रागावल्यानंतर एक सेनापती अवघ्या सहा शिलेदारांबरोबर शत्रूवर तुटून पडला नसता. दुसरा सेनापती महाराज रागावले म्हणून सोडून गेला नसता. संभाजी राजांनी महाराजांकडून नुसता रागच घेतला होता का काय असं वाटतं. (वैयक्तिक मत आहे. कुणाच्याही कसल्याही भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही)

In reply to by मनीषा

औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा आणि संभाजीला पकडल्यावर लगेच मारुन टाकण्याची राजकीय समज्/स्वार्थ, आग्र्यात शिवाजी महाराज पकडले गेले तेंव्हा कुठे गेला होता हा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.

In reply to by प्रसाद१९७१

मागच्या अनुभवांवरुन औंरगजेबानं धडा घेतला असेल व त्याची पुनरावॄत्ती टाळण्यासाठी लगेच शिक्षा केली असेल असं मला वाटतं. जाणकार काय तो प्रकाश टाकतीलच.

In reply to by शिद

सहमत... तोवर औरंगजेबाला मांडलिक करून किंवा इतर मार्गाने येऊन मिळालेल्या राजांकडून असे अनुभव नव्हते. ते आपले येउन मिळाले की उगाच प्राण जाय पर वचन ना जाय वगैरे मुर्खपणा उगाळत बसायचे. त्यामुळे आता शिवाजी आपल्या हाताखाली आलाय तर त्याला दक्षिणेत पाय रोवायला वापरून घेऊ असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. पण ऐन दरबारात शिवाजी महाराजांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नजरकैदेत टाकण्यात आले असावे (तेव्हाही महाराजांच्या कर्तुत्वावर त्याचा विश्वास असावा आणि आपण यांना आपल्या बाजूने वळवू अशी आशाही; नाहीतर राजांना तिथल्या तिथे शिक्षा होऊ शकली असती.) तसेच निव्वळ जयसिंगाने दिलेले वचन पाळण्यासाठी राजेंना मारण्यात आले नाही असेही म्हटले जाते. (स्थानबद्ध करून बरेच दिवस झाल्यावरही राजे बधत नाहीत म्हटल्यावर त्यांना ठार करण्यासाठी मारेकरी धाडण्याची योजना रचली जात आहे ही बातमी राजांना कळली आणि मग त्यांनी पळून जाण्याचे ठरवले असे कुठेतरी वाचले आहे.) अर्थात याविषयीचे संदर्भ माझ्यकडे नाहीत त्यामुळे जाणकारांनी खरे खोटे सांगेपर्यंत हे कयास आहेत असेच म्हणावे लागेल.

माहितीपुर्ण धागा ! आमच्या सारख्या साधारण माणसाना विचारात येणार नाही असा मुद्दा बबन ताम्बे यानी मांडला आहे. प्रतिसाद ही माहितीपुर्ण आहेत. या विषयावर अजून चर्चा वाचायला आवडेल.तुळापुर बद्दल अजून काही माहिती उपलब्ध आहे ?

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा साहेब, तुळापूर अतिशय रम्य ठिकाण आहे. संभाजी महाराजांची समाधी, तसेच तीन नद्यांचा संगम, अदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने बांधलेले शिवमंदिर प्रेक्षणीय आहेत. पुणे-नगर हाय वे पासून अगदी जवळ आहे. जाऊन या एकदा.

In reply to by बबन ताम्बे

तुळापूरला समाधी नसून स्मारक आहे. समाधी वढू बुद्रूक येथे आहे. हे वढू बुद्रूक नदीचा पलीकडे. होडीने गेल्यास झटकन जाता येते मात्र गाडीरस्त्याने १५/२० किमी अंतर आहे. राजाचे डोळे मात्र पेडगावच्या बहादूरगडावर काढले. मात्र तेथून त्यांना कोरेगावी नेण्यत आले. राजांना तुळापूरलाच ठार मारले याचा पक्का पुरावा मिळत नाही. कदाचित तुळापूर अथवा वढू बुद्रूक ह्यापैकी कुठल्याही ठिकाणी ठार मारीले असावे मात्र वढू बुद्रूक येथे समाधी असल्याचे पुरावे आहेत. धनकवडीच्या कुळकर्णीच्या १७१९ सालच्या कागदपत्रांत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. पातशहा वढू कोरेगावी येथे येऊन मुक्काम केला. तेथून लष्कर पाठवून सिवाजी राजे पहिलेच गेले होते, त्याचा लेक संभाजी राजे आणिला आणि वढू कोरेगावात मारिला. मग त्याचा लेक शाहू राजा आणि बाईका आपल्या जालीत ठेविली. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार मुअज्जम अर्थात आझमशहाने शाहू राजांची कैदेतून सुटका केली. सुटून आल्यावर वढू बुद्रूक येथे त्यांनी संभाजी राजांचे वृंदावन बांधले. या संदर्भात पेशवे दफ्तरात पुढीलप्रमाणे मजकूर आहे. राजमंडळ वृंदावने: महाराज राजश्री कैलासवासी संभाजी राजे स्वामी. दर जागा मौजे वढू ता| पाबळ प्र| जुन्नर भिकाराम गोसावी व वासुदेवभट बिन शामभट धर्माधिकाररीणो वृंदावनाचे शुषृषेबद्दल देविले आहेत. नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावयास व तुलसी लावावयास व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन छ २२ मोहरम सन समस अशर मौजे मजकूरपैकी इनाम कमीन नूतन ५ बागाईत जमीन १० बहीत जमीन सेत चौसुक वृंदावनानजिक आहे. त्यापैकी .|||. पड जमीन - तीन प्रतीची १| असामी इनाम जमिनी घातली आहे. या वृंदावनासमीप गोविंद मंगोजी हा झाडलोट करून निगा राखत असे म्हणून त्यासही राजश्री शाहूंनी जमीन दान दिली होती. गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मौजे वढू तर्फ पाबळ राणांत आहे तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती.....

In reply to by प्रचेतस

गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी
या नावावरून एक शंका, आपल्याकडे पूर्वीच्याकाळी naming system कशी असावी असा प्रश्न पडतो. इथे नाव हे दक्षिण भारतीय (तामिळी?) लोकांसारखे वाटतेय.. म्हणजे 'तुमचे नाव, वडिलांचे नाव, आजोबांचे नाव, पणजोबांचे नाव' हे असेच होते का ?

In reply to by हाडक्या

नक्की माहीत नाही ब्वा. पण बहुधा शिवकाळात तरी नाव आडनाव अशीच होती. येथे दोन तीन पिढ्यांची नावे देण्यामागचे कारण बहुधा नामसाधर्म्यामुळे इनाम जमिनीत पुढे मागे वारसदारांची अडचण होऊ नये हाच असावा.

In reply to by प्रचेतस

वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले, जाधव, हे लोक मात्र आडनाव लावतायत. तर काही लोक जसे की 'अनाजी दत्तो' असे दोनच शब्द असेलेली नावे वापरतायत तर काही आपण वर उल्लेखल्याप्रमाणे लांब्लचक अगदी पणजोबांपर्यंत नावे लावतायत.. हे पाहून थोडी उत्सुकता वाटली.

In reply to by हाडक्या

साधारण महानुभावी लोकांसारखा ढगो मेघो संप्रदाय अस्तित्त्वात होता. हे त्या संप्रदायावरून दिलेले नाव असू शकेल.

In reply to by आदूबाळ

रा चिं ढेरे यांनी सविस्तर लिहिलंय. हा निसर्गातल्या शक्तींना देव मानणारा संप्रदाय. धरणी आणि पाणदेव. आता 'लज्जागौरी' हे पुस्तक काढून पाहिले तर वर वल्लीने दिलेला उतारा त्यात समाविष्ट आहे. द.वा. पोतदारांनीही ते "ढगो मेघो" असल्याची पुष्टी केली आहे. ढगो मेघो हे त्या संप्रदायाचे गुरूचे पद आहे. हे "ढगो मेघो" पौरोहित्य, लग्ने लावणे इ. कामे करत असत. सध्याची स्थिती माहित नाही. पण मराठेशाही आणि पेशवाईत हा संप्रदाय मुख्यतः महार आणि मांग यांच्यात चालत आलेला होता. हे मातंगी देवीचे उपासक. तांत्रिक संप्रदायात गेल्यामुळे ब्राह्मणातून बहिष्कृत झालेला कृष्णंभट आणि त्याच्या ५ मुलांनी ढगो मेघो संप्रदायाचा स्वीकार केला असा उल्लेख आहे. त्यामुळे तंत्रपूजा काही प्रमाणात या संप्रदायात आली असावी.

In reply to by पैसा

लहाणपणी (७०- ७१ साली) आम्ही पोरेटोरे पाऊस लांबणी वर पडला की लाकडी पाटावर चिखलाचा गोळा थापायचो आणि त्यावर हळद कूंकू टाकून , उदबत्त्या खोचून तो पाट डोक्यावर घेऊन गावात "ढेगुजी मेघूजी पाऊस पडू द्या, आमच्या गावाला पीक येऊ दया" अश्या घोषणा देत फिरत असू त्याची आठवण झाली. ढगो मेघोचा इथे काही संबंध आहे की नाही माहीत नाही. जाणकार प्रकाश पाडू शकतील.

In reply to by प्रचेतस

ऐकीव माहिती नुसार, तुळापुरच्या ग्रामस्थांनी शंभुराजेंच्या विटंबित मृतदेह शिवून, त्यावर वढू येथे शास्त्रोक्त अंत्यसंस्कार केले होते, त्या मुळे एका समुहाचे आडनांव "शिवले" असे लावतात. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. (चुक-भूल देणे घेणे)

In reply to by चौथा कोनाडा

मराठ्यांच्या राजाला अशा प्रकारे मरण यावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आपल्या राजावर या प्रकारे अंत्यसंस्कार कराव्या लागणार्‍या समाजाच्या दु:ख्खी मनःस्थितीची कल्पनाच करवत नाही.

In reply to by चौथा कोनाडा

'शिवले' आडनाव त्या घटनेनंतर पडले ही एक दंतकथा आहे. शिवपूर्वकाळापासून सिवले पाटील आडनावाचे संदर्भ सापडतात.

हायला!!!! मी त्या तुळापुरला जाउन साष्टांग नमस्कार करुन आलो होतो. एवधा मोठा इतिहासप्रपंच आहे होय त्या तुळापुरच्या घटनेमागे? ईतिहासाची आवड नसलेला आनी ईतिहासातुन काहीच धडा न घेतलेला विलासराव....

मला वाटते भोसले घराण्याचा प्रमुख विरोधकांच्या हाती लागण्याचा संभाजी राजांच्या बाबतीतला प्रसंग तसा तीसरा प्रसंग. छ. (शिवाजी महाराजांचे थोरले बंधूही रणांगणावर धारातीर्थी पडले ते मोजले तर चौथा) पहिला प्रसंग शहाजी महाराजांना आदिलशाहीतील अटक मला वाटते हा प्रसंग मुत्सद्देगिरीने सुटला, दुसरा खुद्द छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेला आग्र्याचा प्रसंग चातुर्याने सुटला. पण या दोन्ही प्रसंगी हाती पुरेसा कालावधी होता. संभाजी महाराजांच्या बाबतीत आधीच्या प्रसंगांएवढा कालावधी आणि मोकळीक मिळाली नसावी. दुसरे तर मराठ्यांच्या चातुर्य आणि गनिमी काव्यांशी तो पर्यंत औरंगजेब आणि त्याचे सरदार अगदीच परिचीत असल्यामुळे गाफील न राहण्याबद्दल मोगल अधिक दक्ष राहीले असतील शिवाय संभाजी महाराजांच्या रुपाने मराठ्यांना पुन्हा संधी देण्यास औरंगजेब तयार राहीला नसेल असे होऊ शकते. मोगलांनी असलच कौर्य शीख धर्मांच्या काही प्रमुखांबद्दल दाखवल. शीख धर्मीयांवरच्या प्रसंगांचा पुर्ण इतिहास माहित नाही पण एका प्रसंगात बादशाही करता रस्सी खेच चालू असताना एका मोगल भावाला सुटून जाण्यात शीख समुदायाने मदत केल्याचा मोगल सम्राटास संशय आला असावा. गुरू गोबींद सिंगांची हत्या औरंगजेबाच्या मृत्यू नंतर झाली तरी त्यांचा पाठलाग औरंगजेब असतानाच चालू झालेला असावा. गुरू गोबींद सिंगांच्या बाबतीत त्यांनी स्वतः औरंगजेबास पत्र पाठवले होते आणि औरंगजेबाशी मुत्सद्देगिरीची अथवा तडजोडीची बोलणी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राकडे निघाले होते. पण पंजाबातील मोगल सुभेदाराने गुरू गोबिंदसिंगांच्या मागावर तेथूनच मारेकरी पाठवले होते. एकुण औरंगजेब किंवा त्या पेक्षा त्याच्या सुभेदार आणि सरदारांच्या भूमिका स्वार्थ अथवा वतनांच्या लालसेपोटी अधिक ताठ झाल्या असतील का हे अभ्यासकांनी अभ्यासावयास हवे असे वाटते. मागील आंतरजालीय वाचनाच्या आठवणीवरून संदर्भ न देता लिहितोय या बद्दल क्षमस्व आणि चु.भू. दे.घे.

In reply to by माहितगार

बेरार आणि मराठवाड्यातील काही गावांची ब्रिटीशकालीन गॅझेटीयर्स मध्ये त्या त्या परिसराचा इतिहासकारांनी इतिहास लिहिताना औरंगजेब महाराष्ट्रात असताना मराठा सरदारांनी मराठवाडा आणि बेरार प्रांतास काही स्वार्‍या केल्याची वर्णने आहेत अर्थात त्या स्वार्‍यांचे कालावधींची मला कल्पना नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर आणि रायगडावर दबाव वाढलेला असताना काही मराठा सरदार औरंगजेबाच्या ताब्यातील कमी लक्ष असलेल्या प्रदेशात स्वार्‍या करून औरंगजेबाचे लक्ष दुसरी कडे वळवणे वगैरे अशी काही शक्कल लढवली असण्याची आणि संभाजीराजांवर प्रसंग गुदरला तेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर असतील असे काही झाले असू शकते का ? हि केवळ एक सहज सुचलेली पृच्छा/ शंका आहे कोणताही निष्कर्ष नव्हे .

In reply to by माहितगार

बेरार प्रांती मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता. खुद्द औरंगजेबाचे अत्यंत महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या बर्‍हाणपूरावर स्वतः संभाजीराजांनी धाड घालून भलीमोठी लूट गोळा केली होती. अर्थत हे प्रकार राजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत घडले. मात्र १६८६ साली विजापूरची आदिलशाही आणि १६८७ साली गोळकोंड्याची कुतुबशाही ह्या संपवयावर औंरंगजेब पूर्णांशाने महाराष्ट्रात वळला व राजांचे मराठवाड्यावरील हल्ले आक्रसत गेले. अर्थात लहानसहान चकमकी चालूच होत्या. पण मोठे युद्ध असे कधीच झाले नाही.