Skip to main content

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 22/09/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?

वाचने 100350
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय?
ऐतिहासिक साधनांत त्याचे उल्लेख नाहीत. संभाजीराजांना पकडून आणल्याचे उल्लेख समकालीन पुराव्यांत बहुत करून फारसी साधनांतले आहेत. मराठी साधनांतील उल्लेख हे तदनंतरच्या राजाराम महाराजांच्या कालखंडांतील बखरींमध्ये आले आहेत. उल्लेख जास्ती नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघलांची तेव्हा कोल्हापूरपर्यंत फौज असून तिथे छावणीच केली होती शिवाय पन्हाळा आणि खेळण्याला मोर्चे लावले होते. अडचणीची बाब होती ती कोल्हापूरपासून संगमेश्वरपर्यंत जाण्याची. ह्या वाटेत निबीड अरण्ये, दुर्गम घाटवाटा, खोल दर्‍या असे अडथळे होते. हा प्रदेश शिर्क्यांचा. इथेच गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानास वाट दाखवली. खानाने राजांवर अचानक झडप घातली. यावेळी राजांजवळ फारसे सैन्य नव्हते. तशाही स्थितीत राजे संगमेश्वराजवळच्या नावडी गावात मुंडण करून व वेष पालटून लपून बसले. तिथेही लढाई होऊन राजांचे सेनापती म्हाळोजीराजे घोरपडे कामी आले. खानाने राजांच्या पायांतील सोन्याच्या तोड्यांवरून राजांस ओळखले व तसेच मळेघाट चढून कोल्हापूर गाठले. हा वघड टप्पा खानाने केवळ २/३ दिवसांत पार केला. पुढे कोल्हापूरला मुघलांची मोठी फौज असल्याने मराठा सैन्याला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करता आला नाही. ह्याच वेळी खुद्द रायगडालाही झुल्फिकारखानाने मोर्चे लावले होते. कोल्हापूरला पोचल्यानंतरही खानाने फौजेला लगेच पुढची चाल देत बहादुरगड गाठला व पुढचा दुर्दैवी प्रकार घडला.

In reply to by मोगा

तेच ना औरंगजेबाने प्रेमळ पित्याप्रमाणे संभाजीराजांचा सांभाळ केला. त्यांच्या दासीपुत्रांना मोठ्या मानाने इस्लाम मधे स्थान दिले. राजांच्या दासींपासून झालेल्या कन्यांचे निकाह मुसलमान मुलांबरोबर मोठ्या सन्मानाने आणि आजाच्या मायेने लावले. हो ना! मोगली मोगा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे ! इस्टेटीत वाटणी टाळायला मस्तानीच्या मुलाला हिंदू ब्राह्मण्मानले नाही... अगदी म्हाभारताचाच कित्ता गिरवला. हिडिंबापुत्राला क्षत्रिय राजकुमाराचा दर्जा दिला नाही. पण लढाईच्यावेळेला मात्र पानपतावर समशेरबहाद्दूर आणि कुरुक्षेत्रावर घटोत्कच लढायला आणि मरायला पुढे ! ... पेशव्याचा ब्राह्मण वंश खुंटला व फक्त मस्तानीचा मुसुलमान वंश आजही सुरु आहे , असे ऐकले , खरे आहे का ?

In reply to by मोगा

स्वतः औरंगजेब आणि त्याची मुलं आपापल्या भावंडांना इस्टेटीचा न्याय्य वाटा मिळावा म्हणुन उपोषणाला बसली होती हा इतीहास आहे.

In reply to by अर्धवटराव

इस्टेटीसाठी खुले आम द्वंद्व खेळ्णं हे तर सर्वच राजा / पुत्राना अलाउड होतं - सर्वच धर्माच्या ! पण कर्तव्य / धर्म असली भुतं उभी करून कुणाला बिनल्ग्नाचा ठे, कुणाला जंगलात पाठव , कुणाची मुंजच नाकार ... असे करणारे दांभिक तत्वद्नान आम्हाला तरी आवडत नाही. .... ते काही का असेना , मस्तानी मुसलमान होती म्हणून आज बाजीरावाचा मूळ अंश शिल्लक आहे , हे वास्तव आहे. ती किंवा तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !

In reply to by मोगा

हे सगळे आता नाकारायचे असं ठरलंय ना तुमचं? तुम्ही तिकडे जाणार असं गेली साडेतीन युगं ऐकतोय. तिकडे काय better package आहे ते सांगा की.

In reply to by मोगा

सर्व जग एकाच रंगात रंगवावे, आणि कोणि ऐकत नसल्यास सरळ रक्ताचा लाल रंग फासावा... हे कर्तव्य कित्ती उदात्त आहे.

In reply to by मोगा

@तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !>> आणि आता कशावरूण अली...हस्सन्/हुस्सेन होणार नाही म्हणे!? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/silly-face-tongue-hanging-out-smiley-emoticon.gif

In reply to by मोगा

हो का मोगा! मग सगळ्यांना इस्टेटीत वाटा मिळाला का त्या मुसलमान सरदारांच्या घरात का बेदखल केले गेले? तुमच्याकडे प्रेमळ औरंगजेबाने रेकॉर्ड दिले असेलच ना!

In reply to by मोगा

नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे
मोगॅम्बो, पेशवे भंपक. बाळाजी विश्वनाथांनी व पहिल्या बाजीरावांनी आपल्या पराक्रम व बुद्धिने शिवाजीराजांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत वाढविले. मस्तानीला बाजीरावांच्या आई गोपिकाबाईचा जास्त विरोध होता. बाजीरावांनंतर नानासाहेबांनाच पेशवेपद मिळाले असते. समशेरबहाद्दरला पेशवेपद कसे काय मिळेल. जेष्ठ पुत्र नानासाहेब असतांना. पानिपतमध्ये झालेले मराठ्यांचे नुकसान माधवराव पेशवेंनी आपल्या 10 वर्षाच्या कारर्कीदित भरून काढले. माधवरावानंतर पेशव्यांमध्ये पराक्रमी व बुद्धिवान पेशवा नसल्यामुळे तसेच सरदारांच्या वतनाच्या हव्यासापायी मराठ्यांच्या साम्राज्याची अधोगती सुरू झाली.

In reply to by सर्वसाक्षी

हो. तेच ते. शिवाजी राजांना यांना तुमच्या पुत्रास वतन देऊ असे म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. शिवाजी राजेंच्या मृत्युनंतर ह्यांची वतनाची लालसा परत जागृत झाली.

या विषयावर संजय सोनवणी यांची त्यांच्या फेबु खात्यावर एक मोठी अभ्यासपूर्ण पोस्ट आहे . त्याचा सार असा की महाराजांच्या सुटकेचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत आणि मंत्री मंडळाकडे तेवढी इच्छाशक्ती पण नवती . इच्छुकांनी ती पोस्ट शोधावी

In reply to by प्रचेतस

अमोलजी, तुम्हाला या विषयात इंटरेस्ट दिसतोय. आगे बढो... तेंव्हा खूप वाचा, खूप विचार करा... इतिहासाचे अभ्यासक कुरंदकर, शेजवलकर आणि इत्यादिंचे विचार वाचा... केवळ इंटरनेटवर ब्लॉग उपलब्ध आहे म्हणुन सोनवणींसारख्यांचे लिखाण वाचून आपले मत बनवू नका हो! हे कळकळीने सांगतोय!! याउप्पर तुमची मर्जी....

In reply to by कवितानागेश

थोर इतिहासकार सोनवणी म्हणतात "युद्ध झाले नाही. किरकोळ चकमक झाली. ती देखाव्यापुरती असु शकेल"...अर्थात हि त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. मोगलाकडील साकी मुस्तैद,खाफीखान,मनुची व शहाजीराजे कैफियत मात्र संगमेश्वरी लढाई झाली,ति देखिल संभाजीराजे याना खानाची बातमी कळताच पुढे येऊन खानास संभाजीराजे,कवी कलश,सरनौबत मालोजी घोरपडे,संताजी घोरपडे आदिनी चढाई केली व धुमश्चक्री सुरु झाली,,परंतु या धुमश्चक्रीत सरनौबत पडले,कवी कलश जखमी झाले व मोगल सैन्य संख्येने जास्त होते,आणी संभाजीराजे यानाच पकडण्याचे आदेश होते,त्यामुळे मोगल सैन्यानी महाराज व कलश हे हाती लागताच तेथुन निसटले,यातुन संताजी व इतर सैन्य माघे राहिले ते वरकड रायगडी गेले,परंतु पळुन गेले असा अस्सल साधनात कुठेच उल्लेख नाही, तसेच संभाजी महाराजासमवेत सरनौबत मालोजी,कवी कलश,संताजी,आदी सह फक्त थोडकेच सैन्यच होते,व मोगल मात्र संख्येने जास्त होते.त्यामुळे बळ कमी पडले,परंतु लढाई झाली असे समकालीन सर्व इतिहासकारानी नोंद करुन ठेवलेले आहे संभाजीराजे अप्रिय असते तर त्यांची फौज औरंगजेबाला एवढी जड गेली असती का? त्रयस्थ व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया पहा १३ नोहेंबर १६८८ ला इंग्रज अधिकार्याने इंग्लंड ला हिंदुस्तान च्या अस्थिर स्थितीबद्दल कळवले तो म्हणतो "दक्खनेतील स्थिती अस्थिर झाली आहे सर्व मोगली ठाणी,किल्ले यांची व्यवस्था बिघडली आहे. मराठ्यांनी किल्ले मजबूत ठेवून परतीचे हल्ले केले आहेत. अनेक ठिकाणी आपल्या प्रदेशात त्यांनी मोगलांचा पराभव केला आहे. जंजिरा ते पोर्ट नोव्हा चा प्रदेश अजूनही संभाजीच्या सैन्याकडे आहे" संभाजीराजे अप्रिय झाले होते म्हणून त्यांना मोगलाकडून सोडण्यास कोणी गेले नाही हे तुणतुणे पुनःपुन्हा वाजवणाय्रांनी शंभूराजे सतत नऊ वर्षे अहोरात्र औरंगजेबाच्या अफाट फौजेविरूढ लढले ते जनमानसाच्या आणि सैन्याच्या पाठिंब्याशिवाय काय ? संभाजीराजांच्या हत्येनंतर चवताळून उठलेल्या मराठ्यांनी ठिकठिकाणी मोगली छाव्णायांवर हल्ले केले, रायगड पायथा,कराड, फलटण येथे मोगलांना पराभूत केले

डॉ. कमल गोखले यांनीं शंभूराजांवर "शिवपुत्र संभाजी" नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहीला आहे.

पुढच्या महिन्यात ५ तारखेला मुंबईत असला तर पार्ल्याला एक पूर्ण दिवसाचा अभ्यासवर्ग आहे.... सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील :) .

In reply to by सुहास झेले

सभागृहातील आसन संख्या (केवळ १५०) मर्यादित असल्याने या परीपत्रकाद्वारे आपणास सुचित करण्यात येत आहे की आपण खालील व्यक्तींशी लवकरात लवकर संपर्क साधून आपली नावनोंदणी आणि जागा निश्चित करावी हे विनंती. वि.सु. : कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि विषय सोबत जोडले आहेत. पराग लिमये ...(अंधेरी/ विलेपारले) ९९८७५६५७३८ अमोल मांडके ...(कांजुरमार्ग आणि दादर) ९००४६५७६६३ संजय तळेकर ...(चारकोप आणि बोरीवली) ९८२०२३८१७७

In reply to by सुहास झेले

अरेरे !! एवढ्या सुन्दर कार्यक्रमाला मुकणार !! तुनळीवर चित्रिकरण पाह्ता येइल अशी आशा करतो !!

In reply to by खटपट्या

तिथे ते अपलोड होत नाही, पण काही आठवड्यात कार्यक्रमाची डीव्हीडी विक्रीसाठी उपलब्ध होते (रुपये १५०)...

In reply to by काळा पहाड

जनसेवा समितीचुया कार्यक्रम असेल तेव्हा त्या विक्रीला ठेवल्या जातात... मी सांगेन उपलब्ध झाल्यावर. हव्या असतील तर एक कॉपी पाठवून पण देईन... काळजी नसावी :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपक्रमाला का कार्यक्रम पुण्याला झाला तर?? पळा आता....एक्का साहेब आले

श्री संजय सोणवणी यांनी याआधीच ही शंका आणि त्याला पूरक असे लेखन करून ठेवले आहे. नेटवर शोधल्यास मिळू शकेल. सोयराबाई यांची महत्वाकांक्षा (आपला मुलगा राजाराम छत्रपती व्हावा) आणि त्याना इतर दरबारी /सरदार यांची साथ होती. अंतर्गत राजकारणामुळे संभाजी महाराजांची सुटका होऊ शकली नाही. संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न जाणेवपूर्वक झाले नाहीत यासाठी सोयराबाई-राजाराम यांच्या बाजूच्या सर्व सरदार/ दरबारी यांची मान्यता होती असे मानायला वाव आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

खिक्क्क... विषप्रयोगानंतरच्या दुसऱ्या कटानंतर राजांनी सोयराबाईंना नजरकैदेत ठेवले होते. त्यातच त्यांच्या मृत्यु झाला. (१६८३/८४) मग सोयराबाईसाहेबांनी राजांना कैदेतून सोडवायला जाण्याचा प्रश्नच कुठे येतो?

In reply to by प्रचेतस

:). असले इतिहास अभ्यासक असले की प्रश्नच मिटला. एकुणात गण्याने फसवले, भावाने वार्‍यावर सोडले पण तरीही दोष मात्र इतरांचा असा काहिसा काही थोर इतिहास तोडफोड्यांचा दावा आहे आणि जो पुर्णपणे मुर्खपणाचा आहे.

In reply to by मृत्युन्जय

कुणीतरी स्वतःला शाहीर म्हणवायचे, भाटगिरी करणारे त्यांना इतिहासकार म्हणणार. त्यापेक्षा इतिहास अभ्यासक म्हणवुन घेणारे निदान तत्वाशी तरी प्रामाणिक आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

बाकी तुम्ही मुद्द्यांचा प्रतिवाद न करता इतरांवर लांच्छन लावण्यात पटाईत आहात.

In reply to by नानासाहेब नेफळे

आमच्या गल्लीतला दुसरीतला शेंबडीचा पोरगा सुद्धा इतिहासाचे पुस्तक वाचताना स्वत:ला इतिहास अभ्यासक म्हणवुन घेतो. हे नव इतिहासवादी आणि तो पोरगा यांमध्ये फारसा फरक नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. बाकी सध्या भाटांची संख्या वाढली आहे हे मात्र खरे. अवांतरः तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. (आजकाल या दांभिक लोकांना त्यांचेच अनुयायी क्रिटीकली घ्यायला लागलेत हेहीनसेथोडके)

In reply to by नानासाहेब नेफळे

शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. अवांतरः आईन्स्टाइन म्हणे सगळ्या जर्मन शासन पुरस्कृत शासकीय समित्यांपासुन नेहमीचे दूर राहिला. अण्वस्त्रे निर्बुद्ध लोकांच्या हाती लागण्याला त्याचा असलेला कडाडुन विरोध त्याने शासनाला सहकार्य न करुन जाहिर केला. थोडे वेगळे उदाहरण आहे. पण बघा त्यातुन काही बोध घेता आला तर,

In reply to by मृत्युन्जय

अशा लोकांमुळं फारसं नुकसान होणार नाही असं बर्‍याच जणांना वाटतं. पण पहा नायजेरिया, सोमालिया इत्यादी देशांकडे. देश किती खाली जाऊ शकतो याची हे देश उदाहरणे आहेत. या लोकांचं असंच चालू दिलं तर हा देश सुद्धा तिथेच पोचेल. आणि त्याची या लोकांना ना खंत असेल ना खेद. वर आणि समतेसाठी सर्व समाजाला या पातळीवर आणणं गरजेचं होतं वगैरे जातीयवादी पोपटपंची पण बोबड्याकडून ऐकावी लागेल.

In reply to by मृत्युन्जय

क्रुपया धाग्याचा विषय कोण इतिहास संशोधक आहे अथवा नाही हा नाहीय. आम्हा पामरांच्या ज्ञानात काही भर पडेल या हेतूने हा धागा लिहीला आहे. आपल्या जवळ धाग्यातील विषयाला धरून काही माहीती असेल तर क्रुपया आमच्या ज्ञानात भर घालणे.

In reply to by मृत्युन्जय

>>> शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. + १ नानांनी पुन्हा एकदा माती खाल्ली.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. खंडणी, दांडगाई, दंगेधोपे, जातीय विद्वेष पसरवून समाजात दुफळी माजविणे हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या किळसवाण्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग २०-२५ वर्षात जन्मले हे निव्वळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्व महान ऐतिहासिक व्यक्तींचे दुर्देव. आपल्याच पक्षाचे सत्ताधारी असल्याने व सर्व सत्तास्थानावर आपलेच जातभाई असल्याने हे नवइतिहासकार शासकीय मान्यताप्राप्त कसे होतात व त्यांच्या गलिच्छ व असत्य बरळण्याला शासन कशी मान्यता देते हे लोकांनी पाहीले आहे. बादवे, खंडणी, भ्रष्टाचार, दांडगाई इ. व्यवसायांवर आपले पोट भरण्यापेक्षा जनतेला शिवचरीत्र सांगून पोट भरणे कितीतरी चांगले.

In reply to by श्रीगुरुजी

शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे. ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?

In reply to by श्रीगुरुजी

त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. शिवराज्याभिषेकाच्या वेळी रामदास स्वामी अचानक प्रकट होतात आणि राजांना आशिर्वाद देतात हा प्रसंग एका नाटकात एका पोटार्थीने दाखवला होता,अशी कोणतीच घटना इतिहासात घडली नसताना दाखवण्याचे प्रयोजन काय हे पोटार्थी सांगत नाहीत. अर्थात महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला मुस्लिमविरोधी बनवण्याचा हा खटाटोप होता व त्याचा सोशिओपॉलिटीकल लाभ उठवायचा यांचा प्रयत्न नेहमीच चालू असतो .अशा पोटार्थींच्या भाकडकथांना इतिहास मानणारे खरे मुर्ख.

In reply to by नानासाहेब नेफळे

एका नाटकात नाटक म्हणजे काय असते ते माहिती आहे ना तुम्हाला नेफळे? नसेल तर आधी ते माहिती करुन घ्या. काही पोटार्थी तर सध्या पिसाळा आणि गण्या हरामी नव्हते हे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांच्याइतके दुर्दैवी पोटार्थी तेच.

In reply to by मृत्युन्जय

ऐतिहासिक विषयातले नाटक आणि काल्पनिक विषयावरचे नाटक यातला फरक समजतो का मृत्युंजय? उद्या मी समर्थांवर नाटक लिहिले आणि त्यात समर्थांना मुस्लिम साधू म्हणुन दाखवले तर 'आर्टीस्ट लिबर्टीच्या' नावाखाली मला सूट देणार का?

In reply to by नानासाहेब नेफळे

घाशीराम कोतवला नाटक आठवतं का नेफळे साहेब? सिनेमॅटिक लिबर्टी हा प्रकार कळतो का आपल्याला? जवळ जवळ सग्ळ्या ऐतिहासिक / पौराणिक नाटकात / चित्रपटात ती घेतली जातेच. बाकी भवानी तलवारीबद्दल आपले काय मत आहे?

In reply to by मृत्युन्जय

सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला प्रत्येकालाच सूट आहे, परंतु ऐतिहासिक विषयात जास्त लिबर्टी नको. उदा:- अफजलखानाचा वध या प्रसंगात खानाचे शिवाजींशी झालेले संभाषणाचा पुरावा नाही ,परंतु प्रसंगानुरुप संवाद घातले तर ठीक आहे. शिवराज्याभिषेकात रामदास स्वामी उपस्थीत असल्याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे ती घटना घुसडणे ही इतिहासाची मोडतोड आहे व अशी मोडतोड करण्यासाठी काही धार्मिक संघटनाही तथाकथीत इतिहासकारांना(?) फूस लावत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

भवानी तलवारीविषयी काय मत आहे
हा गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवलेला आहे. अशा कुठल्याही घटनेची नोंद नाही. नैतिकता निर्भयता निती या तत्वाने सामान्य माणुसही सर्वाच्च पदी पोचतो याचे शिवाजी उदाहरण आहे, परंतु सगळे समर्थकृपेने आणि देवांच्या कृपेने घडले , त्यामुळेच राजे स्वराज्य निर्मिती करु शकले ,असा समज पसरवून राजांच्या अंगभुत गुणांचे महत्व कमी करण्याचा व पर्यायाने प्रयत्नवादा वर विश्वास असणार्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न पोटार्थींकडून केला गेला असण्याची शक्यता आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

आजचे पोटार्थी स्वतःच्या मतानुसार नसती लिबर्टी घेउन प्रसंगांचे निराळेच अर्थ लावुन नविन इतिहास लिहुन पिसाळ आणी गण्यासारख्या हराम्यांना निर्दोष ठरवण्याच्या भानगडीत आहेत हे तुम्हाल खुपत नाहिसे दिसते. ज्याने स्वतःच्या बहिणीला आणी मेव्हण्याला विकले तो कसला आलाय निर्दोष म्हणा. त्याची लायकी दिसतेच, अश्या लोकांना काय म्हणतात ते ही सगळ्यांना माहिती आहेच. असो. समर्थ रामदास महाराजांचे गुरु असल्याने त्यांचे आशिर्वाद नेहमीच महाराजांच्या पाठीशी होते. ते राज्यरोहणाप्रसंगी उपस्थित होते की नव्हते ते गौण आहे.

In reply to by मृत्युन्जय

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते
इतिहासात याला कोणताही भक्कम आधार नाही, शिव समर्थ भेट 1673ला झाल्याचा एक पुरावा आहे, परंतु तो समकालीन नाही ,पेशवेकालीन आहे. त्यामुळे समर्थ शिवाजींचे गुरु नव्हते असा निष्कर्ष काढता येतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

चूक, मुळात शिवकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच हिंदु राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द महाराजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. तथाकथित इतिहास मोडतोडक तसे करताना दिसत नाहित. स्वतःला पाहिजे तेवढेच निष्कर्ष काढणे याला सिलेक्टिव्ह रीडिंग म्हणतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

जल्लां काय कल्लां नाय. रामदासस्वामींना नमस्कार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी कसे ठरतात? खर्र सांगा. तुम्ही आयुष्यात कधीच कोणत्या देवळात गेला नाहीत का एखाद्या देवाला नमस्कार केला नाही. बरोबर ना!

In reply to by पैसा

काथ्याकुटात एका पार्टी ने दुसऱ्या पार्टी चे विरुद्ध मत मेगा बायटि चर्चे नंतर सपशेल मान्य केले असा दाखला मिपा च्या इतिहासात आहे का यावर कोणि इतिहास संशोधक संशोधन करेल काय ?

In reply to by पैसा

हेच की महाराज फक्त हिंदू संतांचे आशिर्वाद घ्यायचे असे दाखवणे, वास्तवात रामदासांच्या धार्मिक भूमिकेशी शिवाजींना काही देणं घेणं नव्हतं. शिवाजी हे राजकीय व्यक्तीमत्व होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

कोण म्हणतोय असं की महाराज फक्त हिंदूना नमस्कार करत म्हणून? महाराजांनी कित्येक मशिदी दर्ग्यांना नेमणुका दिल्याचे पुरावे आहेत. अफझल्याच्या दर्ग्याला सुद्धा सगळी व्यवस्था लावून दिली होती. ते कोण नाकारतोय का? मग तुम्हीच असे एकांगी का विचार करताय? बादवे, मोगलाई हा शब्द वाचून अगदी काळजात कालवाकालव झाली हो! ते एक असोच. निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!

In reply to by पैसा

निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो! महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(

In reply to by नानासाहेब नेफळे

महाराजांनी समर्थ रामदासांना नमस्कार केला म्हणजे ते मुस्लिम्द्वेष्टे कसे झाले ब्वॉ. म्हणजे उद्या आम्ही देहु ला जाउन डोके टेकवुन आलो की धर्मांध झालो की काय?

In reply to by मृत्युन्जय

राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध लढले, म्हणुन ते मुस्लिम विरोधक कसे ठरतात? स्वराज्य संस्थापक राजे होते, हिंदवी स्वराज्य हा कल्पनाविलास कुणाचा ब्वॉ? मुंबईतल्या परप्रांतियांना विरोध बहुतांशी मराठी माणसे करतात, बहुसंख्य परप्रांतिय हिंदु आहेत, याचा अर्थ मराठी माणुस हिंदूद्वेष्टा ठरतो काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

तुम्ही तुमचीच वाक्ये प्रश्नरुपात का टाकता आहात? नाही म्हणजे असे मी तरी कुठे लिहिलेले दिसत नाही म्हणुन विचारले.

In reply to by पैसा

अस हेकलिंग करुन मी घाबरणार नाही. मिपावरील सन्मान्य धुरंदर हे मान्य करतील की शिवरायांनी ज्याची बोटे तोडली तो कोन होता, ज्याचा कोथळा काढला तो कोण होता, ज्याच्या मागे हात धुवुन लागले तो कोण होता,मग ते त्यांच्या विरुध्ध नव्हते असे कसे म्हणता तुम्ही ;)