✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गाढव ऐकेना, गाढव समजेना

स — संजय क्षीरसागर, गुरुवार, 09/18/2014 - 22:58
गाढव ऐकेना, गाढव समजेना गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना. गाढव ऐकेना ऽऽ । _______________________ डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई फुकटचा घेतला कुणी गावात रे? काय गाढवाला नै ऐडिया? आयडी जाईल नको गमजा. होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग, ढिंगटांग-ढिंगटांग ढींग । गाढव ऐकेना ऽऽ । ________________________ हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे नको पडू उताणा इथे-तिथे रे हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे. आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून, कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे. आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।

प्रतिक्रिया द्या
17674 वाचन

💬 प्रतिसाद (87)

=))

सुहास..
गुरुवार, 09/18/2014 - 23:02 नवीन
=)) =)) ही मस्त काव्य-जुगलबंदी चालु आहे ...

या असल्या स्कोर सेटल करणार्

किसन शिंदे
गुरुवार, 09/18/2014 - 23:04 नवीन
या असल्या स्कोर सेटल करणार्‍या धाग्याची तुमच्याकडून अपेक्षा नव्हती संजयजी.

किसनश्री

संजय क्षीरसागर
गुरुवार, 09/18/2014 - 23:36 नवीन
जो आयडी गेला तरी `ना खंत ना खेद' इतकी फालतू स्टेक आहे, त्यामागच्या व्यक्तीला कसा जोडा हाणावा अशी अपेक्षा आहे?
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मुळात जोडा हाणावाच कशाला हा

किसन शिंदे
गुरुवार, 09/18/2014 - 23:55 नवीन
मुळात जोडा हाणावाच कशाला हा प्रश्न पडतोय मला संक्षी साहेब. समोरच्याने पातळी सोडली तरी आपण सोडू नये असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यासारख्या सूज्ञ माणसाने एका गाढवाच्या नादी लागून असलं काही लिहिणे माझ्यासारख्याला पटले नाही. साॅरी!! आणि हे लिहिताना मला तुमचे जुुने चांगले लेख आठवताहेत.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझ्या विरोधात जर सतत लेखन होत असेल

संजय क्षीरसागर
Fri, 09/19/2014 - 00:25 नवीन
आणि जे पोस्टवर जमत नाही म्हणून तिथे जाऊन स्कोर सेटल असतील तर माझी बाजू मांडायला लेखनाशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. तुम्हाला माझं चांगलं लेखन स्मरतंय याचा आनंद आहे पण तशा लेखनाची अपेक्षा करतांना सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

बेशर्त स्विकृती

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 09/19/2014 - 09:44 नवीन
सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.
ही अपेक्षा इतरांकडून करण्यापूर्वी त्याच्या १% विचार तुम्ही स्वतः केलात तर असे का होते हे समजून यायला हवे. मिसळपाववर इतके सदस्य आहेत पण दरवेळा तुम्हीच का टार्गेट होतात? कारण इतर कोणीही सदस्य अन्य सभासदांच्या बुध्दीवर/ विचारशक्तीवर/ आकलनशक्तीवर कमेन्ट करत नाही.बाकी काहीही माणूस एकवेळ सहन करेल पण सतत आपली अक्कल काढली गेल्यास ते मात्र कोणीच सहन करणार नाही. अर्थात तुमच्यासारख्या महान विद्वान तत्ववेत्त्याला काय बोला?असे लोक समाजात असतात आणि मिसळपावही त्याच समाजाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे असे लोक तिथेही अ॑सणारच ही बेशर्त स्विकृती मात्र कधीच केली आहे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,

संजय क्षीरसागर
Fri, 09/19/2014 - 12:46 नवीन
तो कृपया दूर करा. आता याच पोस्टचं उदाहरण पाहा. मी आपणहून कधीही कुणाची कुरापत काढत नाही. या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!) वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा. म्हणजे बाकी सर्वांनी मला कॉर्नर करा आणि मी मात्र मोठेपणा घ्या. आता यांच्या गर्दभलीलांना टाळ्या पिटणारे कोण तर ज्यांना स्वतःच्या पोस्टवर (माझा) प्रतिवाद करता आलेला नाही ते सगळे! मग मी जर म्हटलं `गाढवावर बसून युद्ध जिंकता येत नाही, थोडा तरी प्रामाणिकपणा ठेवा', तर पुन्हा अपमान केल्याचा रुसवा. तर सारांश काय? मी कधी कुणाच्या वाटेला जात नाही पण संगनमत आणि कंपूबाजीनं कुणी मला घेरण्याचा प्रयत्न केला तर, मी एकटा पुरेसा आहे. अर्थात, माझा आयडी परावलंबी असला तरी अपमानापुढे त्याची मला किंमत नाही.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

वैध मार्गानं मी प्रकरण

बाळ सप्रे
Fri, 09/19/2014 - 13:26 नवीन
वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा.
मलाही तोच सल्ला योग्य वाटतो.. आपल्या हिरिरीने एखाद्या मुद्द्याच्या प्रतिवाद करण्याच्या गुणाचं कौतुक वाटतं. वैयक्तिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष हाच उपाय सर्वोत्तम वाटतो. शेवटी अशा वादात जय पराजय नसतो. काथ्याकूटात काय घ्यायचय काय सोडायच ते प्रत्येक जण आपापलच ठरवणार .
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे

सूड
Fri, 09/19/2014 - 14:38 नवीन
तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे. तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही सवाई आहात, पुरुन उरणारे आहात तर मग येवढा काव्यप्रपंच कशासाठी? तुम्ही चिडावेच अशासाठी जर सगळं चाललंय हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिडलायेत हे दाखवून त्यांचे प्रयत्न यशस्वी केलेत. हल्लीच वाचण्यात आलेलं वाक्य: Keep smiling - it makes people wonder what you've been up to..
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकून

सुहास..
Fri, 09/19/2014 - 15:11 नवीन
↩ प्रतिसाद: सूड

गैरसमज आहे, पण कुणाचा आणि कोणता?

होकाका
Sat, 09/20/2014 - 01:05 नवीन
हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,
का हो पण, सगळेच जण का हो तुमच्याच बद्दल हे असे गैरसमज पसरवतायत?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संजु काका किसन काका म्हणताय्त

जेनी...
Fri, 09/19/2014 - 00:38 नवीन
संजु काका किसन काका म्हणताय्त ते मलाहि पटतय ... वर आणखी एक गोष्ट ... कि तुम्ही हाणलेला जोडा गाडवाने पळ्वुन नेला तं तुम्ही दुसर्या जोड्याचे काय बरे कर्णार ?? हाणायचेच आहे तर जोडे हाणा ... फक्त जोडा नको ... :-/
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आणि हो हि वरची पोस्ट लिहिताना

जेनी...
Fri, 09/19/2014 - 00:39 नवीन
आणि हो हि वरची पोस्ट लिहिताना मला तुमचे दंगे घातलेले लेख आठवतायत बरं का !! ...
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 09/18/2014 - 23:05 नवीन
=))

(No subject)

आनन्दिता
गुरुवार, 09/18/2014 - 23:06 नवीन
=))

और आंदो

काउबॉय
गुरुवार, 09/18/2014 - 23:15 नवीन
मज्या आहे

+१

पैसा
गुरुवार, 09/18/2014 - 23:47 नवीन
+१
↩ प्रतिसाद: काउबॉय

गाढवावर सलग दुसरा धागा

धन्या
गुरुवार, 09/18/2014 - 23:16 नवीन
गाढवावर सलग दुसरा धागा :( शेवटी व पू काळेंनी लिहीलंय तेच खरं. "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणे सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणे सांगता येत नाही. "

1++ :)

काउबॉय
गुरुवार, 09/18/2014 - 23:57 नवीन
मग गाढवाला वाटले की ते कवी झाले मग त्याने कविता लिहली का अथवा त्याकवितेवर कोणी कोणी हजेरी लावली यावर नो कमेंट्स.
↩ प्रतिसाद: धन्या

अखेरचा हा तुला दंडवत च्या

सूड
गुरुवार, 09/18/2014 - 23:20 नवीन
अखेरचा हा तुला दंडवत च्या चालीवर म्हणायचं का?

चाफा बोलेना रे मेल्या..

गवि
गुरुवार, 09/18/2014 - 23:27 नवीन
चाफा बोलेना रे मेल्या.. :-) दंडवत कुठला हिते?
↩ प्रतिसाद: सूड

आयला!!

सूड
गुरुवार, 09/18/2014 - 23:38 नवीन
मी तर जीवलगा राहिले दूर घर माझे, शिट्टी वाजली आणि डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवला अशा तीन चालीवर म्हणून पाह्यलं !!
↩ प्रतिसाद: गवि

__/\__

गवि
गुरुवार, 09/18/2014 - 23:45 नवीन
__/\__ मी हाय कोली , एकविराआई तू डोंगरावरी आणि दिवस तुझे हे फुलायचे .. हे नाही केलेस वाट्टे.. ;-)
↩ प्रतिसाद: सूड

सुखकर्ता दुखहर्ता

पैसा
गुरुवार, 09/18/2014 - 23:49 नवीन
सुखकर्ता दुखहर्ता नायतर दत्ता दिगंबरा या हो कसे वाटेल?
↩ प्रतिसाद: गवि

झालंच तर स्वकुलतारक सुता, नाथ

सूड
Fri, 09/19/2014 - 00:01 नवीन
झालंच तर स्वकुलतारक सुता, नाथ हा माझा हे पण ट्राय करायला हरकत नाही
↩ प्रतिसाद: पैसा

'स्वकुलतारक सुता' हे शब्द

बॅटमॅन
Fri, 09/19/2014 - 12:47 नवीन
'स्वकुलतारक सुता' हे शब्द बाकी 'ओ मेरी जोहर जबी' च्या चालीवर फिट्ट म्हंटा येतात बगा.
↩ प्रतिसाद: सूड

ब्याट्या हे मी " पदोपदी अपार

विजुभाऊ
Sat, 09/20/2014 - 15:54 नवीन
ब्याट्या हे मी " पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा.." या चालीवर म्हणून बघितले
↩ प्रतिसाद: सूड

पदोपदी अपार असती पुण्याच्या

धन्या
Sat, 09/20/2014 - 16:24 नवीन
पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा..
ही नेमकी काय भानगड आहे? अमच्या सोसायटीत दिवाळीनंतर जवळपास महिनाभर रोज सकाळी प्रदक्षिणा धन्य होत असते. झोपेचे खोबरे होते पार.
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दत्ता दिगंबरा या हो! भारी आयडीया आहे.

संजय क्षीरसागर
Fri, 09/19/2014 - 00:56 नवीन
गाढव खिंकाळले का हो? स्वतःची बसली, स्वतःला हो | आयडीची वाट लागली हो आता लागा कामाला हो | झक अशी मारली का हो? बावळ्या लपूनी पाहातो हो | फुंकले किती तू उकिरडे बहुविध उपद्व्याप केले जनाचे खाऊन उष्टे-माष्टे शेपूट हलते का पाहे पुढचा कुठला आयडी रे? पुरता पोपट झाला हो |
↩ प्रतिसाद: पैसा

जल्लां मस्त लिवतांय ओ, आनी

सूड
Fri, 09/19/2014 - 00:58 नवीन
जल्लां मस्त लिवतांय ओ, आनी येक लिवाच!!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हाण्तिच्या ... वन्मोअर जोडा

जेनी...
Fri, 09/19/2014 - 01:00 नवीन
हाण्तिच्या ... वन्मोअर जोडा =))
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जेनी, असं कितीही जुळवता येईल!

संजय क्षीरसागर
Fri, 09/19/2014 - 01:19 नवीन
याला कामकाज बहुत ओझी वाहातो कुठ पर्यंत आयडी जौंदे नाही खंत गाढवा नांवे अनंत आता याची करुणा येऊ द्या हो याला बाहेर जाऊं द्या हो |
↩ प्रतिसाद: जेनी...

तोडीस तोड आहे काव्य,संक्षी!!

अजया
Fri, 09/19/2014 - 10:38 नवीन
तोडीस तोड आहे काव्य,संक्षी!!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हसती सूज्ञ तुला सारे, आप्त

होकाका
गुरुवार, 09/18/2014 - 23:55 नवीन
हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे
=))

चांगलंय !!

खटपट्या
Fri, 09/19/2014 - 00:15 नवीन
चांगलंय !!

संक्षी, तुम्ही कोणाला

यशोधरा
Fri, 09/19/2014 - 01:05 नवीन
संक्षी, तुम्ही कोणाला उद्देशून लिहिताय वगैरे माहित नाहीये, पण विडंबनं खरंच मस्त आहेत!

ओ थॅक्स! अँड धिस वन फॉर द अ‍ॅप्रिसिएशन .

संजय क्षीरसागर
Fri, 09/19/2014 - 01:47 नवीन
पेटला प्रतिसाद वणवा गाढवा कैसा सोसावा वेड लागेल नैतर काय लॉगीन नको करायाला आयच्या गावात गेला हो स्वामी याला वाचवा हो बावळ्या कुठे खेटतो हो डाँकी फंकी झाला हो झाला दिगंबर पाहा हो स्वामी याला वाचवा हो |
↩ प्रतिसाद: यशोधरा

जाऊंद्या ओ संक्षि, कायतरी

स्पा
Fri, 09/19/2014 - 07:58 नवीन
जाऊंद्या ओ संक्षि, कायतरी लेखमाला सुरु करा पाहु

@जाऊंद्या ओ संक्षि>>> सर...

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/19/2014 - 08:35 नवीन
@जाऊंद्या ओ संक्षि>>> सर... <--- हे र्‍हायलं की रे पां डुब्बा! Image removed. @कायतरी लेखमाला सुरु करा पाहु>>> याला मात्र +++१११
↩ प्रतिसाद: स्पा

बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय

धन्या
Fri, 09/19/2014 - 08:31 नवीन
शहाण्याच्या शहाणपणाला शहाण्याच्या शहाणपणाला गाव हे सारं हासतंय गाव हे सारं हासतंय हॉ आ हॉ आ हॉ आ हॉ आ बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय * कुठल्या गाण्याच्या चालीत म्हणावे हे माहीती करुन घेण्यासाठी व्यनि करावा.

बुगु बुगु वाजतय ची चाल

काउबॉय
Fri, 09/19/2014 - 12:29 नवीन
वाटते आहे
↩ प्रतिसाद: धन्या

ह्या ह्या ह्या.

धन्या
Fri, 09/19/2014 - 13:39 नवीन
ह्या ह्या ह्या. भलतेच राव हुशार तुम्ही. :) रच्याकने, तुम्ही गुरे राखायला/वळायला/चारायला जायचेत काय?
↩ प्रतिसाद: काउबॉय

राखनार्या सोबत भरपूर उण्डार्लो असल्याने....

काउबॉय
Fri, 09/19/2014 - 14:05 नवीन
मिटू लिस्टन ओवर वाइड स्पेक्ट्रम... असे म्हणु शकता :)
↩ प्रतिसाद: धन्या

बाव्चळ्ळेत सगळे

जेनी...
Fri, 09/19/2014 - 08:46 नवीन
बाव्चळ्ळेत सगळे =))

__/\__ एक नंबर संक्षी!!

अनुप ढेरे
Fri, 09/19/2014 - 09:16 नवीन
__/\__ एक नंबर संक्षी!!

एका कोपऱ्यात पडलेल्या

कंजूस
Fri, 09/19/2014 - 09:21 नवीन
एका कोपऱ्यात पडलेल्या डबड्याने उधळलेलं गाढव पाहिलं. मी इकडे पडून आहे असं उधळायला आणि खिंकाळायला मिळालं तर किती मजा येईल? पुढे ---

तिथला प्रतिसाद इथे चोप्य पेस्त

जेपी
Fri, 09/19/2014 - 09:46 नवीन
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

पन त्ये गाडाव ग्येलं कुटं ?

धन्या
Fri, 09/19/2014 - 09:49 नवीन
पन त्ये गाडाव ग्येलं कुटं ?
↩ प्रतिसाद: जेपी

आता नवा आयडी काय घ्यावा असा विचार करतंय!

संजय क्षीरसागर
Fri, 09/19/2014 - 10:46 नवीन
पण गाढवानं काहीही सोंग घेतलं तरी तोंड उघडलं की समजणारच.
↩ प्रतिसाद: धन्या

संक्षींचा स्ट्राईक रेट

सौंदाळा
Fri, 09/19/2014 - 11:05 नवीन
संक्षींचा स्ट्राईक रेट निराकार गाढवापेक्षा जास्त आहे. निराकार गाढव : २८ संक्षी : नॉट आउट ४०
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा