✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सत्याचा जय...

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 15:44  ·  लेख
लेख
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
55448 वाचन

💬 प्रतिसाद (218)

प्रतिक्रिया

मग

विटेकर
Mon, 09/08/2014 - 10:40 नवीन
मग कर्माचा सिद्धांत असाच आहे तर माझ्या हातात काहीच नाही का ? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी .. असेच आहे तर मी प्रयत्न करुन तरी काय होणार आहे? टिळकमहाराजांनी त्याचे फार सुंदर विवेचन केले आहे ( गीतारहस्य पृष्ठ २३७ -२४४ पहीली आवृत्ती), ते मूळातूनच वाचावे , मला ते तितक्या अधिकाराने सांगता येणार नाही. कर्म करण्याचे स्वातंत्र्य तुमचे आहे , फळाचे नाही ! विस्तवावर ( अजाणतेपणाने देखील ) पाय पडला की चटका बसणारच ! चुकुन पाय पडला हे लॉजिक तिथे चालत नाही. ईश्वर दयाळू नाही , तो तुमचे कर्मफल तुमच्या पदरात टाकतोच टाकतो ! खरे तर तो काहीच करत नाही , त्याचे तसे कर्तृत्वच नसते . मात्र कर्म निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बुद्धी आणि विवेकाने आपले कर्म निवडावे हे स्वातंत्र्य न वापरता विषयासक्त होऊन कर्म आचरले आणि त्याचे वाईट फळ मिळाले तर त्याला जबाबदार कोण? (मना त्वाचि रे पूर्व संचित केले | तयांसारखे भोगणे प्राप्त झाले ||) आणि कोणते कर्म योग्य आणि कोणते अयोग्य याचे यम - नियम म्हणजेच धर्म ! त्याच्या कक्षेत राहून जे जे कर्म कराल ते " निष्कर्म्य " ( हाच शब्द टिळक महाराजांनी वापरला आहे ) म्हणजे ज्याचे फळ भोगावे लागत नाही असे ! मग अन्याय सहनच करायचा का ? हत्या करुन ही अर्जुनाला पाप का लागत नाही.. त्याचे कारण ही पुन्हा धर्मच ! म्हणून मेलास तर स्वर्गात जाशील , जि़ंकलास पृथ्वीचे राज्य भोगशील. कारण युद्ध करणे हाच क्षत्रियाचा धर्म आहे ! आणि हे कर्म ( युद्ध करण्याचे कर्म)"निष्कर्म्य" आहे. आणि म्हणून अन्याय सहन करणे हे धर्माचे वागणे नव्हे ! नाठाळाच्या माथी हाणू काठी हा धर्म ! देशद्रोही तितुके कुत्ते .. मारुनी घालावे परते .. हा धर्म ! It is wise to be unwise is unwise ! हा धर्म ! याच धर्माच्या कक्षेत राहून जरुर वैभव मिळवावे , पुरुषार्थ करावा, उपभोग घ्यावा ! पण अधर्माचा शॉर्ट्कट वापरून त्याने मिळणारे "क्षणैक" एन्द्रीय सुख भोगायला मिळावे म्हणून त्याचे समर्थन करु नये ! धिस इज क्रिमिनल !
  • Log in or register to post comments

सत्याचा

विटेकर
Mon, 09/08/2014 - 10:53 नवीन
सत्याला कधीच झगडावे लागत नाही ! असत्याचा नेहमीच पराभव होतो ! असत्य फक्त अंधारात आकार धारण करुन भेव दाखवते, सत्याचा प्रकाश पडला की ते दूर पळते. सत्याला नाही पण आपल्याला झगडावे लागते ,सत्याला काही शष्प देखील फरक पडत नाही. एखाद्या मनुष्य डो़क्यावर उभे राहून सूर्य पशिमेकडे उगवतो असे म्हणत असेल आणि आजूबाजूचे देखील त्याच्याच "दृष्टिकोनातून" पाहून तेच म्हणत असतील तर "मी पूर्वेकडेच उगवतो" हे सूर्य येऊन सांगत नाही, त्याला काहीही फरक पडत नाही.. तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते ! झगडावे लागते ते त्याला , ज्याला ही सत्य लोकांना सांगायची इच्छा आहे त्याला ! अन्यथा त्यालाही दोन पर्याय आहेतच , एक डोळे झाकणी करुन डो़क्यावर उभे राहून म्हणणे की हो सूर्य पश्चिमेकडेच उगवतो किंवा त्यांना सत्य उमगेपर्यन्त प्रतिवाद करत राहणे ! (तिसरा पर्याय म्हणजे " चालू द्या" म्हणून आपण आपल्या मार्गाने चालत रहाणे ! हल्ली मी तिसरा पर्याय स्वीकारतो ! स्मायली ) या ही प्रतिसादाला माझा दिस्क्लेमर लागू आहेच !
  • Log in or register to post comments

तुमच्या सारखाच एखादा शहाणा

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 11:41 नवीन
तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते ! उत्तम ! लेखाचा मतितार्थ हाच आहे की "माणसाने विचार करणारा, आपल्या चुका जाणणारा आणि त्यावरून काही शिकणारा शहाणा माणूस बनण्याचा प्रयत्न करावा" ! बस इतकेच बरेच काही करून जाईल !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

सूर्य पूर्वेला उगवतो हे

विजुभाऊ
Tue, 09/09/2014 - 13:12 नवीन
सूर्य पूर्वेला उगवतो हे अर्धसत्य आहे. ते एका फ्रेम ऑफ रेफर्न्स शी बाम्धील आहे. मी उत्तर धृवावर गेलो आणि सूर्य दक्षीणेकडून उगवतो हे सत्य सांगितले तर ते कितीही सत्य असेल तरीही जोवर पहाणारा तेथे येणार नाही तोवर त्याच्यासाठी ते मिथ्यच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मी उत्तर धृवावर गेलो आणि

मदनबाण
Tue, 09/09/2014 - 13:30 नवीन
मी उत्तर धृवावर गेलो आणि सूर्य दक्षीणेकडून उगवतो हे सत्य सांगितले तर इजुभाऊंना उत्तर धृवावर जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! ;) बा द वे खाणं काम बंद झाले ते तिकडे उत्तर धृवावर करणार आहात काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखावरची चर्चा पाहून लेखातले

राजेश घासकडवी
Mon, 09/08/2014 - 12:58 नवीन
लेखावरची चर्चा पाहून लेखातले मुद्दे अधोरेखित झाले. आता विटेकर, संक्षी, इस्पीकचा एक्का आणि झालंच तर पोटे - या सर्वांकडेच सत्य आहे. आणि त्यांनी एकमेकांशी, इतरांशी लढाही दिला. पण त्यांच्यापैकी कोणी जिंकलं का? छे! यावरूनच सिद्ध होतं की सत्याचा विजय नेहमी होत नाही, कधी कधी तर लढा देऊनसुद्धा होत नाीह.
  • Log in or register to post comments

संक्षींचा विजय झाला नाही असे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 09/08/2014 - 13:22 नवीन
संक्षींचा विजय झाला नाही असे खोटेनाटे पसरवू नका. संक्षींचा नेहमी विजय होतो. संक्षी हारा नही, संक्षी हारते नही. (हे "आनंद मरा नही" च्या चालीवर म्हणावे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हार जीत तो आदमी की होती है

प्यारे१
Mon, 09/08/2014 - 13:57 नवीन
हार जीत तो आदमी की होती है जानी. संक्षी आदमी नही, सोच है. सोच को न आप हरा सकते हो, ना मिटा सकते हो. (इथे काही प्रतिसाद येणार आहेत त्यांना मोठं व्हायला सांगूया काय? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हं

विटेकर
Mon, 09/08/2014 - 14:46 नवीन
त्यांना मोठं व्हायला सांगूया काय? कुणाला ? कुणाला? व्य नि केला तरी चालेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नावाच्या यादीत स्वतःचे नाव

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 16:43 नवीन
नावाच्या यादीत स्वतःचे नाव सामील न करताना दाखवलेला विनय पाहून डॉळॅ पानाव्ले ! ;) (आता हा विनय कोण आणि त्याचे नाव यादीत का नाही हे विचारू नये. त्याचे उत्तर मिळेलच असे नाही. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हल्ली इन्फ्लुएन्शल पिपल पण

प्यारे१
Mon, 09/08/2014 - 16:45 नवीन
हल्ली इन्फ्लुएन्शल पिपल पण इझिली इन्फ्लुएन्स्ड होतात हे पाहून आमचे ही ड्वाळे पाणावले. ;) -पळून गेलेला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तिसरा पर्याय

विटेकर
Mon, 09/08/2014 - 14:03 नवीन
तिसरा पर्याय म्हणजे " चालू द्या" म्हणून आपण आपल्या मार्गाने चालत रहाणे ! हल्ली मी तिसरा पर्याय स्वीकारतो ! Wink ) या तिसर्‍या पर्यायात जीत नेहमी माझीच असते !
  • Log in or register to post comments

या तिसर्‍या पर्यायात जीत

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 16:36 नवीन
या तिसर्‍या पर्यायात जीत नेहमी माझीच असते ! हे तुमचं मत झालं. पण... सगळ्या पर्यायांत जीत नेहमी माझीच असते ! हे संक्षींचं मतही तुम्हाला मान्य आहे काय हे पण जाणून घ्यायला आवडेल ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

या धाग्यावर विजयी पावलेल्या

कवितानागेश
Mon, 09/08/2014 - 14:29 नवीन
या धाग्यावर विजयी पावलेल्या आयडीला 'सत्या२०१४' असा एक डुआयडी काढून देण्यात येइल. ;)
  • Log in or register to post comments

छान

विटेकर
Mon, 09/08/2014 - 14:45 नवीन
छानं हं माऊ तै ! इथे लोक अटी-तटीला आलेत आणि तुम्हाला पुरस्काराचे पडलयं ! निऊन घाला तो पुरस्कार बारा गडगड्याच्या विहिरीत ! आणि विजयी " पावलेल्या" ????? केलेत हो तुम्ही "पावन" ! ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ह्म्म

विटेकर
Mon, 09/08/2014 - 14:50 नवीन
एकं सत्य विप्र बहुधा वदन्ति |
  • Log in or register to post comments

या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य

धन्या
Mon, 09/08/2014 - 17:19 नवीन
या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य ब्राम्हण बहुतेक बोलतो" असा असेल तर मग या धाग्यावर हिरीरीने सत्य मांडणार्‍यांपैकी ब्राम्हण कोण आहे हे शोधूया. त्याने प्रतिसादांमध्ये जे सत्य म्हणजे काय लिहिले असेल ते सत्य. आता सत्य काय हे ठरवणं खुप सोपं झालंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

या ओळीचा अर्थ सांग्ण्यासाठी

विटेकर
Mon, 09/08/2014 - 17:23 नवीन
या ओळीचा अर्थ सांग्ण्यासाठी श्री. ब्याट्मन यांना रंगमंचावर बोलाविण्यात येत आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

वल्लीने सांगितलेला अर्थ बरोबर

बॅटमॅन
Tue, 09/09/2014 - 11:51 नवीन
वल्लीने सांगितलेला अर्थ बरोबर आहे. विप्र या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा होतो त्याचबरोबर तो शहाणा, ऋषि असादेखील होतो. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+vipra&trans=Translate&direction=AU आता लबाड ब्राह्मणांनी शहाणपणा 'हायज्याक' केला असे कुणाला म्हणायचे असेल तर चालूद्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

____/\____

प्यारे१
Mon, 09/08/2014 - 17:25 नवीन
____/\____ कुठला ट्रान्सलेटर वापरलेला बे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं

धन्या
Mon, 09/08/2014 - 18:24 नवीन
ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं आठवी ते दहावी शंभर मार्कांचं संस्कृत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हा प्रतिसाद सीरियस असल्यास

प्यारे१
Mon, 09/08/2014 - 18:29 नवीन
हा प्रतिसाद सीरियस असल्यास संस्कृत अवघड आहे असं मानावं लागेल ब्वा आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अर्थ

प्रचेतस
Mon, 09/08/2014 - 19:13 नवीन
बुद्धिमान लोक एकच सत्य विविध प्रकारे सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वल्ली सरांचे शाल आणि श्रीफळ

प्यारे१
Mon, 09/08/2014 - 19:23 नवीन
वल्ली सरांचे शाल आणि श्रीफळ देऊन हार्दिक आभार मानण्यात येत आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 09/08/2014 - 19:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 18:46 नवीन
हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत शिकलेला आमचा एक वर्गमित्र, "तमसोमा ज्योतिर्गमय ।" याचा अर्थ "तुझी आई ज्योतीबाला जाते." असा ठासून सांगत असे ते आठवले :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा हा हा ..

हाडक्या
Mon, 09/08/2014 - 20:07 नवीन
हा हा हा .. बादवे, तुम्ही बॅ. पी. जी. पाटलांच्या बरोबर एकच वर्गात होता की काय ? नाही ते पण त्यांच्या वर्गमित्राच्या बाबतीत हाच किस्सा सांगायचे म्हणून विचारतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अवांतराबद्दल क्षमस्व...

धन्या
Mon, 09/08/2014 - 20:42 नवीन
दुर्दैवाने शालेय पातळीवर संस्कृत खुप वाईट पद्धतीने शिकवलं जातं. साधारण साचा असा असतो: देव शब्द, माला शब्द, आत्मनेपद, परमस्मैपद, सुभाषिते आणि त्यांचा अर्थ रटणे, रामरक्षा घोकणे. एव्हढया माहितीच्या जोरावर दहावीला संस्कृतमध्ये आरामात ७०+ गुण मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तसं मला काही आठवत नाही. पण मी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 22:15 नवीन
तसं मला काही आठवत नाही. पण मी माझ्या मित्राला थोपुवर त्याचा स्त्रोत विचारतो, तुम्ही तुमच्या दुव्याला तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने विचारुन पहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अहो, बॅ. पी. जी. पाटिल आता

हाडक्या
Tue, 09/09/2014 - 19:13 नवीन
अहो, बॅ. पी. जी. पाटिल आता जिवंत नाहीत हो.. लई मोठ्ठा मानूस (रयत शिक्षण संस्थेसाठी).! तो दुवा त्यांच्यावरच्या पुस्तकाचा आहे. त्यांची ओळख करून द्यायची गरज पडु नये म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

विप्र बोले तो विनायक प्रभु

कानडाऊ योगेशु
Sat, 09/13/2014 - 22:53 नवीन
तसेही मास्तरांचे लेख क्रिप्टीकच असतात. ज्याला त्याला त्याच्या बकुबानुसार वेगवेगळे ( भलतेसलते) अर्थ लागु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

छान लेख! लेखात यशस्वी म्हटलंय

नगरीनिरंजन
Mon, 09/08/2014 - 17:44 नवीन
छान लेख! लेखात यशस्वी म्हटलंय त्याच्याजागी श्रीमंत म्हणायचं होतं का?
  • Log in or register to post comments

आयला!

संजय क्षीरसागर
Mon, 09/08/2014 - 22:57 नवीन
अगदी नेमका मुद्दा पकडलास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

प्रामाणिकपणे श्रीमंत होता येत

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 23:15 नवीन
प्रामाणिकपणे श्रीमंत होता येत नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रामाणिकपणे श्रीमंत होण्यात

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 23:11 नवीन
प्रामाणिकपणे श्रीमंत होण्यात काय हरकत आहे ? आणि संभ्रमीत वाक्याच्या मागे लागून गरीब राहण्यात काय अर्थ आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

प्रामाणिकपणे श्रीमंत व्हायला

नगरीनिरंजन
Tue, 09/09/2014 - 18:40 नवीन
प्रामाणिकपणे श्रीमंत व्हायला हरकत नाही आणि बहुसंख्य माणसे प्रामाणिकपणेच श्रीमंत होतात म्हणूनच प्रमोशन कथेवर कै च्या कै असा प्रतिसाद दिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

देवा रे !

विटेकर
Tue, 09/09/2014 - 09:20 नवीन
आता पुन्हा सगळे नव्याने सुरु ! १. सुख म्हणजे काय ? २. यशस्वी कोणाला म्हणावे ? ते कशात मोजावे ? ३. श्रीमन्ती म्हणजे काय ? श्रीमन्त कोणाला म्हणावे ? ४. समाधान कशाला म्हणावे ? ५. प्रामाणिक कोणाला म्हणावे ? ६. चारित्र्य म्हणजे काय ? ७. सत्य कशाला म्हणावे ? का ? ८.सत्य एकच आहे की अनेक ? ९. लोक "जीत " केव्हा "पावतात" ? का ? पुरे की अजून काही ? एकदा प्रश्न निश्चित झाले की मण्थन सुरु करु. कसे ? ६. चारित्र्य म्हणजे काय ? ७.
  • Log in or register to post comments

विरोधाभासांची महाकथा...

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/09/2014 - 14:34 नवीन
खालचे तुमचे स्वतःचे प्रतिसाद वाचा: ====== http://www.misalpav.com/comment/607891#comment-607891 प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी संजय क्षीरसागर - Tue, 02/09/2014 - 07:22 त्यापेक्षा स्वतःपासून करावी! देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणीतून मुक्त व्हावे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन राखावा. ====================== http://www.misalpav.com/comment/608713#comment-608713 लाखमोलाची गोष्ट बोललात! संजय क्षीरसागर - Thu, 04/09/2014 - 07:46 माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात. ===================== इतर विचारी माणसांच्या ध्यानात यातल्या "विचारांची गल्लत" घ्यानात येईलच. तुम्ही ते ध्यानात येण्यापलिकडे गेला आहात हे दिसत आहेच. एक प्रतिसाद लिहून झाला की तो विसरून जाऊन नविन अगदी विरुद्ध प्रतिसाद लिहीणे हे तुमचे सम्यक लक्षण दाखवणारी अनेक उदाहरणे मिपावर विख्रून पडलेली आहेत. ती एकत्र लिहीणे काही कठीण नाही. पण तरीही ती उदाहरणे पाहून तुम्हाला "सोईस्कर अंधत्व" येऊन ते लिखाण न दिसता भलतेच काही "दिसू" लागेल आणि त्याबाबत भरपूर नविन असंबद्ध लिहाल याची खात्री आहेच्च ! भाग २ चे उत्तर लिहीणे विसरणे हे पण त्यातलेच ! शिवाय जसजश्या स्वतःच्या चुका लपविणे अशक्य होत जाते तसतसा भाषेवरचा ताबा सुटत जातो हे ही नविन नाही (आता "आत्मज्ञान झाल्याचा दावा करण्यार्‍याला हे शोभत नाही"... पण असो !) तेव्हा, ह्या "खुदके मनके साथ बातां" करत "जितं मया" म्हणणे चालू ठेवा (आम्ही कोण सांगणार ? तुम्ही चालू ठेवणारच म्हणा) ! ज्याने सगळ्या जगाला शहाणे करून सोडावे असा महात्मा असल्याचा भ्रम आम्हाला तरी झालेला नाही. मी पुरेसा प्रयत्न केला हे समाधान घेऊन तुम्हाला तुमच्याच भरवशावर सोडतो आहे ! सांभाळून रहा !! शुभेच्छा !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@संजय क्षीरसागर/ ई. एक्काजी,

हाडक्या
Tue, 09/09/2014 - 16:18 नवीन
@संजय क्षीरसागर/ ई. एक्काजी, एक प्रश्न - (संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा) (तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!) ;) (ह.घ्या. हे.वे.सां.न.ल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हाडक्याजी

विटेकर
Tue, 09/09/2014 - 17:34 नवीन
हाडक्याजी, (तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!) या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ? (संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा) संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

हा हा हा..

हाडक्या
Tue, 09/09/2014 - 19:21 नवीन
हा हा हा..
या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ?
या प्रश्नाचे उत्तर आम्ही राखून ठेवतो.. ;)
संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...
आमच्या (अशाही दुर्मिळ) अशा प्रतिसादांना बर्‍याचदा आधीच कात्री लागल्याचा अनुभव आहे. म्हणून आधीच आमच्या मनाची तयारी म्हणून ते वाक्य. बाकी जर होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं, तर मग त्रास तर देणारच.! (बाकी इतर उपद्रवी लोकांच्या मानाने आम्ही तसे खिजगिणतीतही नसणार याची कल्पना आहेच तरी पण..) ;) असो, तरी आमच्या प्रश्न क्र. १ चे उत्तर अजूनही सन्मानीय आय्डींनी दिलेले नाही याची नोंद घेतलेली आहे आणि काय ते समजून पण घेतलेले आहे हो .. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

विचारांची गल्लत?

संजय क्षीरसागर
Tue, 09/09/2014 - 18:43 नवीन
माझा प्रतिसाद इतका स्पष्ट आहे की तो लेखनातला गोंधळ दाखवतो. `जिंकले ते सत्य' या भ्रामक विचारातला बाळबोधपणा उघड करतो. त्याविषयी वरच्या प्रतिसादात उत्तरच नाही! शिवाय उधृत केलेल्या माझ्या प्रतिसादात कुठेही विरोधाभास नाही. आणि त्या वाक्यांचा माझ्या उपरोल्लेखित प्रतिसादाशी किंवा लेखाशी काडीमात्र संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वाचनमात्र !

विटेकर
Tue, 09/09/2014 - 12:18 नवीन
हायला .. पेट्लयं सॉलिड ! आता धागा वाचनमात्र होणार !
  • Log in or register to post comments

वा वा काय दणकून बोळे मोकळे

स्पा
Tue, 09/09/2014 - 13:02 नवीन
वा वा काय दणकून बोळे मोकळे होतायेत , जेब्बात :D
  • Log in or register to post comments

किती ते अवांतर!

कवितानागेश
Tue, 09/09/2014 - 15:49 नवीन
मूळ विषय काय होता? ;)
  • Log in or register to post comments

मूळ विषय काय होता?आठवी ते

मदनबाण
Tue, 09/09/2014 - 15:54 नवीन
मूळ विषय काय होता? आठवी ते दहावी शंभर मार्कांचं संस्कृत :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आणि दोन लघुत्तरी 'प्रश्ण' जे

प्यारे१
Tue, 09/09/2014 - 15:55 नवीन
आणि दोन लघुत्तरी 'प्रश्ण' जे ४ पी एच डी चे थिसिस बनले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

२००

कवितानागेश
Tue, 09/09/2014 - 16:20 नवीन
थोडसं श्रीमंतीबद्दल.. "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; याचा मी पाहिलेला अर्थ असा आहे की सुखासीन आणी परावलम्बी श्रीमंतीपेक्षा कणखर, स्वावलम्बी गरिबी बरी. अगदी जवळच्या ओळखीतलं हे उदाहरण आहे, की घरातली मुले १० वर्षाची होईपर्यंत आपले बूट आपली आपण काढत, घालत नसत. घरातली २४ तासाची नोकर असलेली बाई ते करायची. शिक्षणासाठी प्रत्येक विषयासाठी घरीच वेगले शिक्षक यायचे. पण शिक्षण झाल्यावर जेंव्हा नोकरीसाथी बाहेर रहायची वेळ आली तेन्व्हा अत्यंत रडवेल्या स्वरात त्यातला एक मुलगा तक्रार करत होता, की बाहेर जेवायचे हाल होतात, वाढायलापण कुणी नसतं. आपल्या हातानी घ्यावं लागतं..(?) उच्च शिक्षण घेणं कठीण झालं कारण त्यातही 'स्पून फीडिन्ग'ची सवय होती. ज्या वयात ही मुले आपले आपन आपल्य हातानी जेवायला शिकत होती, त्याच वयात आम्ही (तुलनात्मक्रित्या गरीब मुलं) मुंबईतल्या मुंबईत हाफ तिकिट काढून बसेस बदलून सुखरुप सगळीकडे पोचत होतो आणि तसेच घरी परत येत होतो. शिवाय ट्य्शन्साठी पैसे आणि आभ्यास घेण्यासाठी पालकांकडे वेळही नव्हता. त्यामुले आपलीच अक्कल वापरायची सवय लागली. त्यामुळे जी काही तथाकथित कमतरता होती, तिचा आव्हानासारखा उपयोग होउन, आपलीच लायकी वाढवायला उपयोग झाला. अशा वेळेस "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी." हे बरोबरही ठरु शकतं. अर्थात, कायम गरीबच रहावं असा त्याचा अर्थ नाही. पण आपल्याकडे असलेली कमतरता (ती आपोआप आलेली असो, अथवा कर्मभोगामुळे) लक्षात घेउन तरीही पायाखालची जमीन सरकु न देण्यासाठी अशी 'सान्त्वनापर वाक्ये' उपयोगी पडतातच. अर्थात याचा उपयोग तात्पुरता अशक्तपणा घालवायला सलाईन देणे, किंवा तातपुरती शान्त झोप लागायला ट्रॅन्क्विलायझर देणे, इतकाच असू शकतो. त्यावर आयुष्यभर अवलम्बून रहाता येत नाही. पण एक क्षण उसंत घेण्यासाठी, धीर येण्यासाठी आणि पुन्हा लढायला उभं रहाण्यासाठी तरी, 'होतं ते बर्‍यासाठी', 'यातून धडा घे', 'कर्मभोग फिटले म्हण, आणि कामाला लाग', असे शिकण्यासाठी तरी 'नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो' वगरै वाक्य महत्त्वाची ठरतात.
  • Log in or register to post comments

सुंदर प्रतिसाद.

प्रभाकर पेठकर
Tue, 09/09/2014 - 16:26 नवीन
सुंदर प्रतिसाद. माझही तेच मत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचे. ते न बिघडविता श्रीमंत व्हावे. पण श्रीमंत नाही होता आले म्हणून वाईट वाटून घेऊ नये, आरोग्य जास्त महत्वाचे आहे ते तुमच्याजवळ राहणारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ह्येच बोलतो

स्पा
Tue, 09/09/2014 - 16:37 नवीन
ह्येच बोलतो अर्थाचा विपर्यास करून कै च्या कै लेख लिहिलेला वाटला असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा