Skip to main content

सत्याचा जय...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 04/09/2014 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 55899
प्रतिक्रिया 218

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बरेच मुद्दे सारखे असूनही सांगण्याच्या पद्धतीमध्ये घोळ होत असल्यानं काही मुद्दे समजत नाहीत. त्यामुळं तावातावानं भांडण होत आहे असा भास होतो आणि त्यामुळंच लफडी होतात.

In reply to by प्यारे१

बरोबर आहे... पण सांगण्याच्या पद्धतीतला घोळ होत नाही, पद्ध्तशीरपणे केला जातो... कारण "माझं कधीच चुकत नाही" असे सतत म्हणणार्‍याला "माझे चुकले म्हणण्याचे धैर्य नसते"... त्यापेक्षा घोळ करणे जास्त सोईचे वाटते... अर्थात असे करणे असत्याचे आचरण असते हे विसरले जाते, हे वेगळेच म्हणा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चालायचं. समजा एक रॅट रेस आहे. त्यामध्ये जिंकून देखील रॅट रॅटच राहणार ना? रॅट रेस च्या बाहेर आलेलं उत्तम त्यापेक्षा. -नौसौ चुहे खाऊन बाहेर पडलेला प्यारेबोका. :)

In reply to by प्यारे१

झालं, केलं एक रुपक "ऑन द फ्लाय" तयार, तथाकथित रॅट रेसमध्ये भाग न घेता कसे आपले "छानसे कारकून राहून मस्तपैकी साहेबाची गुलामी करावी" याच्या समर्थनार्थ ! :) ;)

सगळे प्रतिसाद वाचून आणि उलट सुलट मते ऐकून माझे पूर्वीचेच मत अधिक ठाम झाले आहे. चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !! वेगेवेगळी उदाहरणे देऊन लोक आपल्या अप्रामाणिकपणाचे समर्थन देत आहेत झालं ..! अप्रामाणिकपणाचे फळ चांगले असूच शकत नाही. मना सांग पा रावणा काय झाले | अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले || कर्माचा सिद्धांत नाकारणे म्हणजे स्वतःचीच घोर फसवणूक आहे. प्रत्येक मनुष्य आपआपल्या कुवतीनुसार प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावत असतो ( विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डो़क्याएवढा ! ) एका गावात एका शेतकर्‍याकडे एक लंगडा घोडा होता. लोक म्हणत , हा मूर्ख इसम आहे , उगाचच लंगडा घोडा पोसतो आहे. एका सुगीच्या हंगामात साथीच्या रोगामुळे गावातील सारे बैल आजारले , या शेतकर्‍याने लंगड्या घोड्याच्या साह्याने वेळेवर पेरणी करुन घेतली. लोक म्ह्णाले , वा! हा हुषार आहे , बघा , घोडा कसा कामाला आला. पुढे काही दिवसातच शेतकर्‍याचा तरुण मुलगा त्या लंगड्या घोड्यावरुन पड्ला, त्याचा पाय मोडला .. लोक म्हणाले , या मूर्खाला अक्कल नाही ,कशाला लंगडा घोडा पाळावा ? तरुण पोरं आता झाला की नाही आडवा! पुढच्याच आठ दिवसात त्या राज्यावर परचक्र आले आणि गावात सक्तीची सैन्य- भरती आली , गावातील सारी तरुण पोरे सक्तीने सैन्यात नेली ... फक्त एक सोडून !! लोक म्हणाले .. बघा बघा.. लंगडा घोडा कसा कामाला आला !!! अप्रामाणिक मनुष्य अशाप्रकारे जेव्हा भौतिक प्रगती करत असतो तेव्हा त्याचे कर्म त्याला मस्त हसत असते ! तुम्ही - आम्ही आपल्या बुद्धीनुसार त्याचे अन्वयार्थ लावत असतो कारण आमची कुवत तेव्हढीच असते ! आणि "जानामि पुण्यं नच में प्रवृत्ती.." या न्यायाने त्या अप्रामाणिक माणसाच्या यशाची उदाहरणे देऊन आमच्या करु घातलेल्या पापाची भलामण करत असतो ! बुडत्याला तेव्ह्ढाच काडीचा आधार ! श्री वरदानंद भारती एक सुंदर उदाहरण द्यायचे - आपले कर्मफल हे एका मोठ्ठ्या कणगीत भरुन ठेवलेले असते. वरुन आपण जे काही करत असू त्याचे बरे - वाईट फल ते साठत जाते आणि खालून त्याचे फळ आपण काढून घेत असतो. वरु न जे टाकतो आहे त्याचे फळ लगेच खाली मिळत नाही... मधे जे भरलेले आहे ते अगोदर खाली सरकत राहील. सध्या वाईट कर्म करत असू तर त्याचे लगेच वाईट फळ मिळनार नाही ! पापाचा घडा भरल्याशिवाय त्याचे फळ मिळणार कसे ? तो घडा भरेपर्यन्त रावणाने सुद्धा अनिर्बन्ध राज्य केले. व्यासांनी शांतिपर्वात दोन्ही हात वर करून ओरडून ( होय, ओरडूनच ) सांगितले की बाबांनो.. धर्माने वागा रे ! उर्ध्वबाहो.... ( वल्लीशेट , तेव्हढा श्लोक पूर्ण करा हो.. आता आठवत नाहीये ! ) तेव्हा मी सांगून काय शष्प फरक पडणार आहे ? अस्तु . नेहमी प्रमाणेच... माझे डिसक्लेमर , माझी मते माझ्याजवळ , तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे , मी प्रतिवाद करेनच असे नाही आणि माझे मत बदलेल असेही नाही !

In reply to by विटेकर

>>> सगळे प्रतिसाद वाचून आणि उलट सुलट मते ऐकून माझे पूर्वीचेच मत अधिक ठाम झाले आहे. चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !! संपूर्ण सहमत ! कर्माचे फल कधी ना कधीतरी मिळतेच. अर्थातच चांगल्या कर्माचे चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्माचे वाईटच! "The game of life is a game of boomerangs. Our thoughts, deeds and words return to us sooner or later with astounding accuracy."

In reply to by श्रीगुरुजी

चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !! याला कोणाचाच आक्षेप असण्याचा प्रश्न नाहीच. प्रामाणिक माणूस हे सत्यही जाणून असेल की अप्रामाणिक/चरित्रहीन माणसे त्यांला आपणहून त्याचा हक्क ताटात वाढून त्यांच्यापूढे ठेवणार नाहीत... कारण तो प्रामाणिक माणसांचा गुणधर्मच नाही, किंबहुना ते तसे करत नाहीत म्हणूनच त्यांना अप्रामाणिक/चरित्रहीन म्हटले जाते. तसेच, आपल्या हक्कांकरिता संघर्ष करायला मागे राहण्याला काय म्हणतात हे प्रमाणिक माणसाला सांगण्याची गरज नाही. तेव्हा, अगदी सर्वस्व पणाला नाही लावले तरी प्रामाणिकपणे, आपली अक्कलहुशारी कामाला लाउन आपल्या हक्कांचे जमेल तेवढे रक्षण करावे... आणि अपयश आले तर त्याला भ्रामक वचनांच्या मागे लपवू नये... कारण तो अप्रामाणिकपणा होईल ! त्यापेक्षा अपयश का आले हे प्रामाणिकपणे समजावून घेउन, यशासाठी भविष्यात काय सुधारणा करायला पाहिजे हा विचार करावा. कारण, अप्रामाणिकपणापुढे हार मानणे आणि वरवर "मी मनातून आनंदी आहे" असे म्हणणे यापेक्षा दुसरा अप्रामाणिकपणा विरळा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अर्थातच चांगल्या कर्माचे चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्माचे वाईटच!
भारतातले ९९.९९ टक्के नगरसेवक, आमदार, खासदार अगदी मजेत वयाच्या ८०-९० वर्षा पर्यत खुटखुटीत जगत आहेत. तुमचे म्हणणे जर खरे असेल तर ते पुण्य करत असणार आणि आमच्या सारखी माणसे पापे करत असणार.

मग कर्माचा सिद्धांत असाच आहे तर माझ्या हातात काहीच नाही का ? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी .. असेच आहे तर मी प्रयत्न करुन तरी काय होणार आहे? टिळकमहाराजांनी त्याचे फार सुंदर विवेचन केले आहे ( गीतारहस्य पृष्ठ २३७ -२४४ पहीली आवृत्ती), ते मूळातूनच वाचावे , मला ते तितक्या अधिकाराने सांगता येणार नाही. कर्म करण्याचे स्वातंत्र्य तुमचे आहे , फळाचे नाही ! विस्तवावर ( अजाणतेपणाने देखील ) पाय पडला की चटका बसणारच ! चुकुन पाय पडला हे लॉजिक तिथे चालत नाही. ईश्वर दयाळू नाही , तो तुमचे कर्मफल तुमच्या पदरात टाकतोच टाकतो ! खरे तर तो काहीच करत नाही , त्याचे तसे कर्तृत्वच नसते . मात्र कर्म निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बुद्धी आणि विवेकाने आपले कर्म निवडावे हे स्वातंत्र्य न वापरता विषयासक्त होऊन कर्म आचरले आणि त्याचे वाईट फळ मिळाले तर त्याला जबाबदार कोण? (मना त्वाचि रे पूर्व संचित केले | तयांसारखे भोगणे प्राप्त झाले ||) आणि कोणते कर्म योग्य आणि कोणते अयोग्य याचे यम - नियम म्हणजेच धर्म ! त्याच्या कक्षेत राहून जे जे कर्म कराल ते " निष्कर्म्य " ( हाच शब्द टिळक महाराजांनी वापरला आहे ) म्हणजे ज्याचे फळ भोगावे लागत नाही असे ! मग अन्याय सहनच करायचा का ? हत्या करुन ही अर्जुनाला पाप का लागत नाही.. त्याचे कारण ही पुन्हा धर्मच ! म्हणून मेलास तर स्वर्गात जाशील , जि़ंकलास पृथ्वीचे राज्य भोगशील. कारण युद्ध करणे हाच क्षत्रियाचा धर्म आहे ! आणि हे कर्म ( युद्ध करण्याचे कर्म)"निष्कर्म्य" आहे. आणि म्हणून अन्याय सहन करणे हे धर्माचे वागणे नव्हे ! नाठाळाच्या माथी हाणू काठी हा धर्म ! देशद्रोही तितुके कुत्ते .. मारुनी घालावे परते .. हा धर्म ! It is wise to be unwise is unwise ! हा धर्म ! याच धर्माच्या कक्षेत राहून जरुर वैभव मिळवावे , पुरुषार्थ करावा, उपभोग घ्यावा ! पण अधर्माचा शॉर्ट्कट वापरून त्याने मिळणारे "क्षणैक" एन्द्रीय सुख भोगायला मिळावे म्हणून त्याचे समर्थन करु नये ! धिस इज क्रिमिनल !

सत्याला कधीच झगडावे लागत नाही ! असत्याचा नेहमीच पराभव होतो ! असत्य फक्त अंधारात आकार धारण करुन भेव दाखवते, सत्याचा प्रकाश पडला की ते दूर पळते. सत्याला नाही पण आपल्याला झगडावे लागते ,सत्याला काही शष्प देखील फरक पडत नाही. एखाद्या मनुष्य डो़क्यावर उभे राहून सूर्य पशिमेकडे उगवतो असे म्हणत असेल आणि आजूबाजूचे देखील त्याच्याच "दृष्टिकोनातून" पाहून तेच म्हणत असतील तर "मी पूर्वेकडेच उगवतो" हे सूर्य येऊन सांगत नाही, त्याला काहीही फरक पडत नाही.. तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते ! झगडावे लागते ते त्याला , ज्याला ही सत्य लोकांना सांगायची इच्छा आहे त्याला ! अन्यथा त्यालाही दोन पर्याय आहेतच , एक डोळे झाकणी करुन डो़क्यावर उभे राहून म्हणणे की हो सूर्य पश्चिमेकडेच उगवतो किंवा त्यांना सत्य उमगेपर्यन्त प्रतिवाद करत राहणे ! (तिसरा पर्याय म्हणजे " चालू द्या" म्हणून आपण आपल्या मार्गाने चालत रहाणे ! हल्ली मी तिसरा पर्याय स्वीकारतो ! स्मायली ) या ही प्रतिसादाला माझा दिस्क्लेमर लागू आहेच !

In reply to by विटेकर

तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते ! उत्तम ! लेखाचा मतितार्थ हाच आहे की "माणसाने विचार करणारा, आपल्या चुका जाणणारा आणि त्यावरून काही शिकणारा शहाणा माणूस बनण्याचा प्रयत्न करावा" ! बस इतकेच बरेच काही करून जाईल !! :)

In reply to by विटेकर

सूर्य पूर्वेला उगवतो हे अर्धसत्य आहे. ते एका फ्रेम ऑफ रेफर्न्स शी बाम्धील आहे. मी उत्तर धृवावर गेलो आणि सूर्य दक्षीणेकडून उगवतो हे सत्य सांगितले तर ते कितीही सत्य असेल तरीही जोवर पहाणारा तेथे येणार नाही तोवर त्याच्यासाठी ते मिथ्यच असेल.

In reply to by विजुभाऊ

मी उत्तर धृवावर गेलो आणि सूर्य दक्षीणेकडून उगवतो हे सत्य सांगितले तर इजुभाऊंना उत्तर धृवावर जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! ;) बा द वे खाणं काम बंद झाले ते तिकडे उत्तर धृवावर करणार आहात काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

लेखावरची चर्चा पाहून लेखातले मुद्दे अधोरेखित झाले. आता विटेकर, संक्षी, इस्पीकचा एक्का आणि झालंच तर पोटे - या सर्वांकडेच सत्य आहे. आणि त्यांनी एकमेकांशी, इतरांशी लढाही दिला. पण त्यांच्यापैकी कोणी जिंकलं का? छे! यावरूनच सिद्ध होतं की सत्याचा विजय नेहमी होत नाही, कधी कधी तर लढा देऊनसुद्धा होत नाीह.

In reply to by राजेश घासकडवी

संक्षींचा विजय झाला नाही असे खोटेनाटे पसरवू नका. संक्षींचा नेहमी विजय होतो. संक्षी हारा नही, संक्षी हारते नही. (हे "आनंद मरा नही" च्या चालीवर म्हणावे)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हार जीत तो आदमी की होती है जानी. संक्षी आदमी नही, सोच है. सोच को न आप हरा सकते हो, ना मिटा सकते हो. (इथे काही प्रतिसाद येणार आहेत त्यांना मोठं व्हायला सांगूया काय? ;) )

In reply to by राजेश घासकडवी

नावाच्या यादीत स्वतःचे नाव सामील न करताना दाखवलेला विनय पाहून डॉळॅ पानाव्ले ! ;) (आता हा विनय कोण आणि त्याचे नाव यादीत का नाही हे विचारू नये. त्याचे उत्तर मिळेलच असे नाही. :) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हल्ली इन्फ्लुएन्शल पिपल पण इझिली इन्फ्लुएन्स्ड होतात हे पाहून आमचे ही ड्वाळे पाणावले. ;) -पळून गेलेला. =))

तिसरा पर्याय म्हणजे " चालू द्या" म्हणून आपण आपल्या मार्गाने चालत रहाणे ! हल्ली मी तिसरा पर्याय स्वीकारतो ! Wink ) या तिसर्‍या पर्यायात जीत नेहमी माझीच असते !

In reply to by विटेकर

या तिसर्‍या पर्यायात जीत नेहमी माझीच असते ! हे तुमचं मत झालं. पण... सगळ्या पर्यायांत जीत नेहमी माझीच असते ! हे संक्षींचं मतही तुम्हाला मान्य आहे काय हे पण जाणून घ्यायला आवडेल ! :)

In reply to by कवितानागेश

छानं हं माऊ तै ! इथे लोक अटी-तटीला आलेत आणि तुम्हाला पुरस्काराचे पडलयं ! निऊन घाला तो पुरस्कार बारा गडगड्याच्या विहिरीत ! आणि विजयी " पावलेल्या" ????? केलेत हो तुम्ही "पावन" ! ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

एकं सत्य विप्र बहुधा वदन्ति |

In reply to by विटेकर

या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य ब्राम्हण बहुतेक बोलतो" असा असेल तर मग या धाग्यावर हिरीरीने सत्य मांडणार्‍यांपैकी ब्राम्हण कोण आहे हे शोधूया. त्याने प्रतिसादांमध्ये जे सत्य म्हणजे काय लिहिले असेल ते सत्य. आता सत्य काय हे ठरवणं खुप सोपं झालंय. :)

In reply to by विटेकर

वल्लीने सांगितलेला अर्थ बरोबर आहे. विप्र या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा होतो त्याचबरोबर तो शहाणा, ऋषि असादेखील होतो. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+vipra… आता लबाड ब्राह्मणांनी शहाणपणा 'हायज्याक' केला असे कुणाला म्हणायचे असेल तर चालूद्या. ;)

In reply to by धन्या

हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत शिकलेला आमचा एक वर्गमित्र, "तमसोमा ज्योतिर्गमय ।" याचा अर्थ "तुझी आई ज्योतीबाला जाते." असा ठासून सांगत असे ते आठवले :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा हा हा .. बादवे, तुम्ही बॅ. पी. जी. पाटलांच्या बरोबर एकच वर्गात होता की काय ? नाही ते पण त्यांच्या वर्गमित्राच्या बाबतीत हाच किस्सा सांगायचे म्हणून विचारतोय. ;)

In reply to by हाडक्या

दुर्दैवाने शालेय पातळीवर संस्कृत खुप वाईट पद्धतीने शिकवलं जातं. साधारण साचा असा असतो: देव शब्द, माला शब्द, आत्मनेपद, परमस्मैपद, सुभाषिते आणि त्यांचा अर्थ रटणे, रामरक्षा घोकणे. एव्हढया माहितीच्या जोरावर दहावीला संस्कृतमध्ये आरामात ७०+ गुण मिळतात.

In reply to by हाडक्या

तसं मला काही आठवत नाही. पण मी माझ्या मित्राला थोपुवर त्याचा स्त्रोत विचारतो, तुम्ही तुमच्या दुव्याला तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने विचारुन पहा :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो, बॅ. पी. जी. पाटिल आता जिवंत नाहीत हो.. लई मोठ्ठा मानूस (रयत शिक्षण संस्थेसाठी).! तो दुवा त्यांच्यावरच्या पुस्तकाचा आहे. त्यांची ओळख करून द्यायची गरज पडु नये म्हणून. :)

In reply to by विटेकर

तसेही मास्तरांचे लेख क्रिप्टीकच असतात. ज्याला त्याला त्याच्या बकुबानुसार वेगवेगळे ( भलतेसलते) अर्थ लागु शकतात.

In reply to by नगरीनिरंजन

प्रामाणिकपणे श्रीमंत होण्यात काय हरकत आहे ? आणि संभ्रमीत वाक्याच्या मागे लागून गरीब राहण्यात काय अर्थ आहे ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रामाणिकपणे श्रीमंत व्हायला हरकत नाही आणि बहुसंख्य माणसे प्रामाणिकपणेच श्रीमंत होतात म्हणूनच प्रमोशन कथेवर कै च्या कै असा प्रतिसाद दिला होता.

आता पुन्हा सगळे नव्याने सुरु ! १. सुख म्हणजे काय ? २. यशस्वी कोणाला म्हणावे ? ते कशात मोजावे ? ३. श्रीमन्ती म्हणजे काय ? श्रीमन्त कोणाला म्हणावे ? ४. समाधान कशाला म्हणावे ? ५. प्रामाणिक कोणाला म्हणावे ? ६. चारित्र्य म्हणजे काय ? ७. सत्य कशाला म्हणावे ? का ? ८.सत्य एकच आहे की अनेक ? ९. लोक "जीत " केव्हा "पावतात" ? का ? पुरे की अजून काही ? एकदा प्रश्न निश्चित झाले की मण्थन सुरु करु. कसे ? ६. चारित्र्य म्हणजे काय ? ७.

In reply to by संजय क्षीरसागर

खालचे तुमचे स्वतःचे प्रतिसाद वाचा: ====== http://www.misalpav.com/comment/607891#comment-607891 प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी संजय क्षीरसागर - Tue, 02/09/2014 - 07:22 त्यापेक्षा स्वतःपासून करावी! देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणीतून मुक्त व्हावे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन राखावा. ====================== http://www.misalpav.com/comment/608713#comment-608713 लाखमोलाची गोष्ट बोललात! संजय क्षीरसागर - Thu, 04/09/2014 - 07:46 माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात. ===================== इतर विचारी माणसांच्या ध्यानात यातल्या "विचारांची गल्लत" घ्यानात येईलच. तुम्ही ते ध्यानात येण्यापलिकडे गेला आहात हे दिसत आहेच. एक प्रतिसाद लिहून झाला की तो विसरून जाऊन नविन अगदी विरुद्ध प्रतिसाद लिहीणे हे तुमचे सम्यक लक्षण दाखवणारी अनेक उदाहरणे मिपावर विख्रून पडलेली आहेत. ती एकत्र लिहीणे काही कठीण नाही. पण तरीही ती उदाहरणे पाहून तुम्हाला "सोईस्कर अंधत्व" येऊन ते लिखाण न दिसता भलतेच काही "दिसू" लागेल आणि त्याबाबत भरपूर नविन असंबद्ध लिहाल याची खात्री आहेच्च ! भाग २ चे उत्तर लिहीणे विसरणे हे पण त्यातलेच ! शिवाय जसजश्या स्वतःच्या चुका लपविणे अशक्य होत जाते तसतसा भाषेवरचा ताबा सुटत जातो हे ही नविन नाही (आता "आत्मज्ञान झाल्याचा दावा करण्यार्‍याला हे शोभत नाही"... पण असो !) तेव्हा, ह्या "खुदके मनके साथ बातां" करत "जितं मया" म्हणणे चालू ठेवा (आम्ही कोण सांगणार ? तुम्ही चालू ठेवणारच म्हणा) ! ज्याने सगळ्या जगाला शहाणे करून सोडावे असा महात्मा असल्याचा भ्रम आम्हाला तरी झालेला नाही. मी पुरेसा प्रयत्न केला हे समाधान घेऊन तुम्हाला तुमच्याच भरवशावर सोडतो आहे ! सांभाळून रहा !! शुभेच्छा !!! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@संजय क्षीरसागर/ ई. एक्काजी, एक प्रश्न - (संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा) (तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!) ;) (ह.घ्या. हे.वे.सां.न.ल )

In reply to by हाडक्या

हाडक्याजी, (तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!) या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ? (संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा) संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...

In reply to by विटेकर

हा हा हा..
या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ?
या प्रश्नाचे उत्तर आम्ही राखून ठेवतो.. ;)
संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...
आमच्या (अशाही दुर्मिळ) अशा प्रतिसादांना बर्‍याचदा आधीच कात्री लागल्याचा अनुभव आहे. म्हणून आधीच आमच्या मनाची तयारी म्हणून ते वाक्य. बाकी जर होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं, तर मग त्रास तर देणारच.! (बाकी इतर उपद्रवी लोकांच्या मानाने आम्ही तसे खिजगिणतीतही नसणार याची कल्पना आहेच तरी पण..) ;) असो, तरी आमच्या प्रश्न क्र. १ चे उत्तर अजूनही सन्मानीय आय्डींनी दिलेले नाही याची नोंद घेतलेली आहे आणि काय ते समजून पण घेतलेले आहे हो .. :D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा प्रतिसाद इतका स्पष्ट आहे की तो लेखनातला गोंधळ दाखवतो. `जिंकले ते सत्य' या भ्रामक विचारातला बाळबोधपणा उघड करतो. त्याविषयी वरच्या प्रतिसादात उत्तरच नाही! शिवाय उधृत केलेल्या माझ्या प्रतिसादात कुठेही विरोधाभास नाही. आणि त्या वाक्यांचा माझ्या उपरोल्लेखित प्रतिसादाशी किंवा लेखाशी काडीमात्र संबंध नाही.

हायला .. पेट्लयं सॉलिड ! आता धागा वाचनमात्र होणार !

In reply to by कवितानागेश

मूळ विषय काय होता? आठवी ते दहावी शंभर मार्कांचं संस्कृत :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

थोडसं श्रीमंतीबद्दल.. "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; याचा मी पाहिलेला अर्थ असा आहे की सुखासीन आणी परावलम्बी श्रीमंतीपेक्षा कणखर, स्वावलम्बी गरिबी बरी. अगदी जवळच्या ओळखीतलं हे उदाहरण आहे, की घरातली मुले १० वर्षाची होईपर्यंत आपले बूट आपली आपण काढत, घालत नसत. घरातली २४ तासाची नोकर असलेली बाई ते करायची. शिक्षणासाठी प्रत्येक विषयासाठी घरीच वेगले शिक्षक यायचे. पण शिक्षण झाल्यावर जेंव्हा नोकरीसाथी बाहेर रहायची वेळ आली तेन्व्हा अत्यंत रडवेल्या स्वरात त्यातला एक मुलगा तक्रार करत होता, की बाहेर जेवायचे हाल होतात, वाढायलापण कुणी नसतं. आपल्या हातानी घ्यावं लागतं..(?) उच्च शिक्षण घेणं कठीण झालं कारण त्यातही 'स्पून फीडिन्ग'ची सवय होती. ज्या वयात ही मुले आपले आपन आपल्य हातानी जेवायला शिकत होती, त्याच वयात आम्ही (तुलनात्मक्रित्या गरीब मुलं) मुंबईतल्या मुंबईत हाफ तिकिट काढून बसेस बदलून सुखरुप सगळीकडे पोचत होतो आणि तसेच घरी परत येत होतो. शिवाय ट्य्शन्साठी पैसे आणि आभ्यास घेण्यासाठी पालकांकडे वेळही नव्हता. त्यामुले आपलीच अक्कल वापरायची सवय लागली. त्यामुळे जी काही तथाकथित कमतरता होती, तिचा आव्हानासारखा उपयोग होउन, आपलीच लायकी वाढवायला उपयोग झाला. अशा वेळेस "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी." हे बरोबरही ठरु शकतं. अर्थात, कायम गरीबच रहावं असा त्याचा अर्थ नाही. पण आपल्याकडे असलेली कमतरता (ती आपोआप आलेली असो, अथवा कर्मभोगामुळे) लक्षात घेउन तरीही पायाखालची जमीन सरकु न देण्यासाठी अशी 'सान्त्वनापर वाक्ये' उपयोगी पडतातच. अर्थात याचा उपयोग तात्पुरता अशक्तपणा घालवायला सलाईन देणे, किंवा तातपुरती शान्त झोप लागायला ट्रॅन्क्विलायझर देणे, इतकाच असू शकतो. त्यावर आयुष्यभर अवलम्बून रहाता येत नाही. पण एक क्षण उसंत घेण्यासाठी, धीर येण्यासाठी आणि पुन्हा लढायला उभं रहाण्यासाठी तरी, 'होतं ते बर्‍यासाठी', 'यातून धडा घे', 'कर्मभोग फिटले म्हण, आणि कामाला लाग', असे शिकण्यासाठी तरी 'नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो' वगरै वाक्य महत्त्वाची ठरतात.

In reply to by कवितानागेश

सुंदर प्रतिसाद. माझही तेच मत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचे. ते न बिघडविता श्रीमंत व्हावे. पण श्रीमंत नाही होता आले म्हणून वाईट वाटून घेऊ नये, आरोग्य जास्त महत्वाचे आहे ते तुमच्याजवळ राहणारच आहे.

In reply to by कवितानागेश

ह्येच बोलतो अर्थाचा विपर्यास करून कै च्या कै लेख लिहिलेला वाटला असो

In reply to by स्पा

एका वाक्यात सारांश! आणि विपर्यास होण्याचं कारण म्हणजे जेते इतिहास लिहीतात ही गोष्टच लक्षात घेतली नाही! त्यामुळे `जे जिंकले ते प्रामाणिक' असं ठरवून, (सत्याचा) संघर्षाशिवाय विजय नाही हा निष्कर्ष काढला. ती चूक लक्षात आणून दिल्यावर मला विचारलेला पहिला प्रश्न संपला! मग `तुम्हाला इतके प्रतिसाद का द्यावे लागतात?' या प्रश्नाचं उत्तर द्या असा घोषा लावला. आणि त्यावरनं काय सिद्ध करायचं तर `सत्याचा आपोआप विजय होत नाही!' (संपादित)

In reply to by कवितानागेश

@माऊ ताई - तुम्ही दिलेल्या उदाहरणाच्या अगदी उलटी उदा बघण्यात आली आहेत. ८० च्या दशकात इंपाला सारखी गाडी घरात आणि नोकरचाकर असताना अजिबात न बिघडलेली आणि आयुष्यात भरपुर कष्ट केलेली ( ते कष्ट भाकरी मिळवण्यासाठी नव्हते, २-४ कोटीची गाडी मिळवण्यासाठी असतील ) २ व्यक्तीमत्व बघितली आहेत. या उलट गरीब मुले सुद्धा थोडे पैसे आल्यावर माजलेली आणि गर्भश्रीमंताचा आव आणणारी बघितली आहेत. तो त्या त्या माणसाचा गुणधर्म.

In reply to by प्रसाद१९७१

होय. तशीही उदाहरणं पाहण्यात आहेत. पण मूळात आपल्यातली कमतरता ओळखून त्यातून मार्ग काढावा का? आणि कसा काय काढता येइल? याबद्दल चर्चा सुरु आहे. काही श्रीमन्त लोक त्यांच्यापेक्षा श्रीमन्तांकडे बघून पुढे जायचा मार्ग काढतात. काही लोक आहे त्यात 'गर्भश्रीमंताचा आव' आणतात. किंवा क्वचित 'समाधानी' असल्याचे नाटक करतात. पण ते स्वत्;ला फसवणं आहे हे ओळखत नाहीत..... त्याबद्दलच मूळ चर्चा आहे. :)

पुर्वी मिपावर धाग्याचा ट्यार्पी वाढवण्यासाठी सुपार्‍या दिल्या घेतल्या जायच्या. सध्याचा रेट काय आहे?

नवीन आलेले प्रतिसाद " नवीन " असे लाल लेबल लावून का दिसत नाहीत या धाग्यावर ? संबन्धित अधिकारी इकडे लक्ष देतील काय ?

48 laws of Power रोंबर्ट ग्रीन Marathi अनुवाद सत्ता Shailaja madam वाचा सगळी हरामखोरी काउन्टर हरामखोरी नो फिलोसोफी प्रैक्टिकल ओनली कोळुन प्याल

In reply to by बॅटमॅन

वा, वा ! अनेकांच्या धाग्याला पंख लावण्याच्या अनेक मोहिमांनंतर आणि संमंच्या अनेकदा अनेक प्रतिसाद उडविण्याच्या/इकडून तिकडे नेण्याच्या अथक प्रयत्नांनंतरही धाग्याने व्दिशतक गाठले, हे पाहून ग्लब्लून आले ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

द्विशतकी धाग्याबद्दल अभिनंदन! काही विशिष्ट विषय मिपावर काढले की "शतक-द्विशतक होणार 'निछ्छित'" या सत्याचा मात्र नेहमीच जय होतो बरे का ;)