✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आळस

व
वडापाव यांनी
Tue, 09/02/2014 - 23:23  ·  लेख
लेख
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस. आपण काहीतरी शिकू आणि ती शिकवण आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही हे आळसाला माहित असतं. आपण अस्वस्थ झालो की आळस अशक्त होतो. आणि आपल्या मनातली भिती ही फक्त त्या आळसाच्या अस्तित्वासाठी चालू असलेल्या धडपडीचं प्रतिबिंब असतं. खरंच आपल्याला खरी भिती अशी कधी वाटते का? आपण चुकीच्या बाबींविरोधात नव्याने उभे ठाकतो तत्पूर्वी जो संकोच आपल्याला वाटतो तो आपला आळस असतो. त्याला न जुमानता आपण आपल्या विरोधकाला सामोरे जातो तेव्हा नकळतपणे हृदयाची जी धडधड वाढत जाते, ती आपल्याला मागे ओढणा-या आळसापासून सामर्थ्य द्यायला. धडधड वाढते आपण उत्तेजित झाल्यावर. धडधड वाढते म्हणजे काय तर पंपिग वाढतं हृदयाचं. हृदय आपण न विचारताच आपल्याला शक्तीचा पुरवठा करतं. थोडक्यात आपलं शरीर आपल्याला ग्रीन सिग्नल देतं. आणि ग्रीन सिग्नल मिळाल्यावर भरधाव अॅक्सलरेट करून विरोधकाला तुडवण्याऐवजी बहुतांश वेळी आपण चक्क रिव्हर्स गिअर टाकून पळून जातो. का? उत्तर एकच. दिशाभूल. आळसानं आयत्या वेळी केलेली दिशाभूल. वाढलेली धडधड हा ग्रीन सिग्नल नसून तो आपल्या शरीराचा आपल्या संभाव्य कृतीला दर्शवलेला विरोध असल्याचं आपल्या मनात ठासवलं जातं. कारण आळस कृतीला घाबरतो. पण शरीर कधीच कृतीला घाबरत नाही. आपण कितीही थकलेलो असलो तरी ते पंपिग करत राहतं. नव्या कृती शोधत राहतं. खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे. त्या करण्यापेक्षा न करण्यावर जास्त भर असतो माणसांचा. कारण काय तर आळस. मनाप्रमाणे कृती करण्यासाठी आधी विचार करावा लागतो, जिथे विचार करण्याचाच आळस केला जातो तिथे ऐच्छिक कृती घडण्याची अपेक्षा कोण ठेवणार! या आळसावर क्षणिक मात करता आलीच, तर त्या एका क्षणात सगळं काही साध्य करण्याच्या उद्देशाने मनाची आणि शरीराची लगबग सुरू होते. आळसावर, संकोचावर मात करून जेव्हा नव्याने काहीतरी कराल, तेव्हा स्वतःला निरखून पाहा. तुमची हालचाल जलद असेल, कारण संकोचाचा प्रभाव वाढायच्या आत तुम्हाला कार्य तडीस न्यायचं असतं. अभ्यास, सराव, निरीक्षण, आकलन, विचार अशा महत्त्वाच्या आघाड्यांवर जिंकल्यानंतर आळसाला जाणवतं की मनाची खूपच घुसमट होत्येय. अनुभवाच्या भुकेने ते व्याकूळ झालंय. जास्त ताणलं तर बंड होऊ नये, म्हणून आलतू फालतू आघाड्यांवर तो दुय्यम कृतींना जिंकू देतो. मग आपण व्हिडीओ गेम्स खेळतो, सहलीला जातो. गाडी, बाईक भरधाव चालवतो, सिग्नल तोडतो, धावती ट्रेन पकडतो, थोडक्यात जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो. या आळसाला हरवण्याचं साधन आहे तुमची घाई. तोच एक आशेचा किरण आहे, ज्याला योग्य दिशेकडे परावर्तित करायचा अवकाश आहे, आळस नामशेष होऊन तुम्ही जिंकलात म्हणून समजा. - © कौस्तुभ अनिल पेंढारकर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वावर
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
4280 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

प्रतिसाद देणारच होतो

एस
Tue, 09/02/2014 - 23:32 नवीन
पण लय आळस आलाय. :-O
  • Log in or register to post comments

माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस

कवितानागेश
Tue, 09/02/2014 - 23:42 नवीन
माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)
  • Log in or register to post comments

खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु

विजुभाऊ
Wed, 09/03/2014 - 12:17 नवीन
खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे. पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा. त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आराम हा राम आहे. -चाचा नेहरु.

प्यारे१
Tue, 09/02/2014 - 23:50 नवीन
आराम हा राम आहे. -चाचा नेहरु.
  • Log in or register to post comments

आराम हा राम आहे.

सोत्रि
Wed, 09/03/2014 - 00:38 नवीन
आराम हा राम आहे.
हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का? - (छिद्रान्वेषी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आमच्या शाळेत लिहिलेलं असलंच

प्यारे१
Wed, 09/03/2014 - 12:43 नवीन
आमच्या शाळेत लिहिलेलं असलंच काहीतरी. नीट आठवत नाही. आठवून बघायचा प्रयत्न आळसामुळं टाळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मी वर पाण्चटपणा उगीच केलाय.

कवितानागेश
Wed, 09/03/2014 - 09:43 नवीन
मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी) पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)
  • Log in or register to post comments

खरं तर रोजच्याच आयुष्यात

बॅटमॅन
Wed, 09/03/2014 - 12:23 नवीन
खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.
एकच नंबर!!!! पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.
  • Log in or register to post comments

छान

समीरसूर
Wed, 09/03/2014 - 12:26 नवीन
अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.
  • Log in or register to post comments

विचारांशी सहमत

अभिरुप
Wed, 09/03/2014 - 13:59 नवीन
विचारांशी सहमत.........एकदम सुंदर लेख.
  • Log in or register to post comments

आज जाम कंटाळा आला आहे...

मुक्त विहारि
Wed, 09/03/2014 - 14:51 नवीन
जरा आराम करावा, असे मी रोज म्हणतो...
  • Log in or register to post comments

>>या आळसाला हरवण्याचं साधन

सूड
Wed, 09/03/2014 - 14:52 नवीन
>>या आळसाला हरवण्याचं साधन आहे तुमची घाई. ये बात कुछ हज़म नहीं हुई, बाकी लेख बर्‍यापैकी जमलाय.
  • Log in or register to post comments

मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी)

दिपक.कुवेत
Wed, 09/03/2014 - 15:23 नवीन
हे अगदी पटतंय :D बाकि लेख एकदम आशावादि वाटला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा