Skip to main content

Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...

लेखक vrushali n यांनी शनिवार, 30/08/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, पुन्हा थोडा त्रास देतीये आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो) care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात? जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी? आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते?? आणी आम्ही आणखी काय करु शकतो?

वाचने 54536
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

पहिल्यांदा हे ठरवा, लेखिकेला सहानुभूती हवीये का सल्ला? सल्ला हवा असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर द्यायला हव्यात. सहानुभूती हवी असेल तर सल्ल्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात, सल्ला घेतला असेल तर शेवटी काय झालं हे इथे कळवणं ही किमान जवाबदारी आहे कारण त्याचा सर्वांना उपयोग होईल. आणि सहानुभूती हवी असेल तर स्वतःची चूक नसतांना फटका बसला इतपत बाजू स्पष्ट असायला हवी. लेखिकेनं फायनली घेतलेला स्टँड असाय :
ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले
सगळे धाग्यात इंटरेस्टेड आहेत कारण धाग्याचं शीर्षकंच भन्नाट आहे (Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत). आणि अशी वेळ कुणावरही येऊ शकते म्हणून सगळे इथे जमलेत. It is that simple! आता तो उलगडा करायला, झालेल्या नुकसानाची शहानिशा करायला कार्डहोल्डरच तयार नाही. इथपर्यंत काही हरकत नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. पण ...
त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?
यामुळे धागा गोंधळात गेलायं. इथे व्यक्तीस्वातंत्र्य, धागा काढून पश्चात्ताप वगैरे मुद्दे गैर लागू आहेत. अगदी साधी गोष्ट आहे, कार्डहोल्डरनं ट्रन्झॅक्शस केली होती का नाही? विषय संपला!

In reply to by संजय क्षीरसागर

सहमत आहे. आधी किती का वैध ट्रान्झॅक्शन करेना, त्याचा कार्डच्या अवैध वापराशी काय संबंध? "कर नाही त्याला डर कशाला" या तत्त्वाप्रमाणे चौकशी झाली तर प्रॉब्लेम काय आहे? प्रस्तुत बँक मॅनेजरचा सल्ला - अ‍ॅट बेस्ट - चुकीचा आहे हे वर अनेकांनी लिहिलंच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

शत प्रतिशत सहमत. मदत करण्याच्या हेतूने आलेल्या प्रतिसादांचा अशा त-हेने वेगळा अर्थ काढून काय साध्य झाले? सुहास पाटील यांच्या प्रतिक्रियेबाबतही तसंच. जर झालेल्या ट्रान्झॅक्शन्सचे लिखित पुरावे हातात असतील तर नेटाने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवता येतेच. मिळवलेली आहे. नियमित ट्रान्झॅक्शन्स करणा-या व्यक्तीला तर अधिकच जाणीवपूर्वक पाठपुरावा करणे शक्य आहे. ज्या बँकांचे उल्लेख इथे केलेत, त्या नावाजलेल्या, प्रतिष्ठा जपणा-या नक्कीच आहेत, अशावेळी 'त्यांच्या फेसबुक पेजवर झालेला प्रकार पोस्ट करणे' एवढा साधा उपायसुद्धा लागू पडू शकतो. संक्षींनी म्हटल्याप्रमाणे सल्ला हवाय, तर तो लागू पडला का, हे सांगणे हे ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांच्यासाठी आवश्यक नाही का? मुदलात लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने, हे तरी मान्य करायला हरकत नसावी..

In reply to by इनिगोय

लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने
जर लेखिका म्हणतेयं त्याप्रमाणे कार्डहोल्डर ट्रॅन्झॅक्शन्स घरच्या डेस्कटॉपवरनं करत असेल आणि हा फटका कार्ड हॅकिंगमुळे (म्हणजे कार्ड त्यांच्या ताब्यात असतांना) बसला असेल तर मी हे काम प्रोफेशनल असाईन्मंट म्हणून घ्यायला तयार आहे! सगळ्या फॅक्टस वर्णन केल्याप्रमाणे असतील तर पैसे नक्की परत मिळतील.

In reply to by संजय क्षीरसागर

अगदी. अगदी. पैसे परत मिळालेच पाहिजे!

In reply to by संजय क्षीरसागर

याहू वर इमेल केला आहे तुम्ही काही करु शकलात तर बघा,बाकी व्य.नी तुन बोलुया

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी , आपला प्रतिसाद वाचुन उत्सुकता निर्माण झाली ... आपला फायनान्शीयल क्राईम डीटेक्शन मधे काही अनुभव आहे काय ? मागे , ह्या धीच्या जॉब मधे , मी जॉब / लॉटरी वगैरेंशी संबंधीत फ्रॉड डिटेक्ट/ प्रेडीक्ट करायची मॉडेल बनवत होतो :)

In reply to by मृत्युन्जय

माझ्याकडे पेपर्स आल्यापासनं चार तासाच्या आत ही प्रगती आहे :
पण बाबा relax आहेत, कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना

In reply to by संजय क्षीरसागर

जरी सायबार क्राइम वाले असे म्हणत आहेत की हॅकींग झाले नाही,तरीही तुम्ही एक बाब बघितली का?बाबांनी जेव्हा जेव्हा रिचार्ज केलेत्,त्याच्या दुसर्याच दिवशी मोठया रकमा काढल्या गेल्यात हा प्रत्येक वेळेस योगयोग असु शकतो की paytm चा कोणी व्यक्ती असु शकतो,अस बाबांनी मला आत्ता फोन वर सांगीतल आहे (रच्याकने मी मला जितकी तुट्पुंजी माहीती मिळतेय्,मी लगेच इथे क्रिकेट मॅच च्या प्रत्येक ओव्हर सारखी लगेच अपडेट करतेय...मला वाट्तेय मी पुर्ण माहीती निघाल्याशिवाय इथे जास्त काही बोलु नये हे उत्तम)

सदर लेखिकेने रीअल टाईम ट्रान्साक्शन रेकॉर्ड्स बँकेकडे मागावेत. म्हणजे पैसे कोणी काढले, कशासाठी काढले ह्या गोष्टींचा उलगडा होईल.

असो! आमचे काही शब्द वाया गेले, हरकत नाही. इतर कोणालातरी कामी येतीलच. पण, हा प्रकार पुन्हा घडू नये ही आशा.

To make online shopping safer, the RBI has made it mandatory, from 1st August onwards, for all online transactions to have an extra level of authentication. The ‘extra’ level, is a password that you will have to enter after entering your credit/debit card details while making online payments. You will require this ‘extra password’ for transacting on any website in India. This new technology is called VBV – Verified by Visa or MSC – MasterCard SecureCode. All you have to do is log on to your bank’s website, register your card for Verified by Visa (or MasterCard SecureCode) and get your password. Each bank has its own process for card registration. So, hop on to your bank’s website and register now:

सगळा धागा आणि प्रतिक्रिया वाचल्या. खरं तर एकंदरीतच कधी कुणी कुणाची उगाच मापं काढु नयेत हा संकेत आहे.. वास्तव जगात..आभासी जगात..कुठेही.. त्यात आपल्याला सगळंच माहिती नसतं हे एक कारण आहे.. आणि माहिती असलं तरी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. त्यामुळे कुणी लेखिकेला / त्यांच्या वडिलांना अर्धवट माहितीवर काही बोलणे चुकच आहे.. पण लेखिकेला एकच मुद्दा सांगावा वाटतो की ही जी काही अर्धवट माहिती लोकांकडे आहे, ती तुम्हीच दिली आहेत.. आधी सल्ला मागितलात तेव्हा तो सगळ्यांनी मनापासुन दिला.. पण मग जेव्हा तुम्ही एक एक माहिती द्यायला सुरवात केलीत त्यामुळे इथे गोंधळाचे वातावरण तयार झाले असे दिसते. लोकांनी गोंधळ उडाल्यास सुद्धा भाषा जपुन वापरावी ही तुमची अपेक्षा गैर नाही, पण अपेक्षा दुहेरी असतात.. तुम्ही सुद्धा गोंधळात पडणारी माहिती द्यायला नको होती ही लोकांची अपेक्षा गैर नाही. (मलाही बँक मॅनेजरच्या बायकोने पैसे "बुडवले" हे समजलेलं नाही. बाकि प्रतिसादात तुमचे मराठी उत्तम आहे असे दिसते.. मग तुम्हाला नक्की "बुडवले" असंच म्हणायचं आहे का? कारण तुमच्या वडीलांच्या ह्या परिस्थितीची तुलना तुम्ही सतत त्या बाईंच्या परिस्थिती सोबत करत आहात.. आणि तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे..) दुसरं असं की आधी तुम्हाला ८८०००/- ही रक्कम जास्त वाटली आणि स्वतःला वडिल आणि बहीणी कडुन जुजबी माहिती असतानाच वडिलांना काहीतरी मदत व्हावी ह्या हेतुने तुम्ही इथे धागा काढलात. आणि आता तुम्ही "मनस्ताप होण्यापेक्षा जाऊ देत ८८०००/-" असा पवित्रा घेतला आहेत. मुळात ८८०००/- जाऊ देत असे म्हणु शकणारी मंडळी इथे कमीच असतील.. आम्हाला १००/- जरी विनाकारण गेले तरी बँकेत जाउन पाठपुरावा करण्याची सवय आहे.. शिवाय ह्या प्रकरणात तुमच्या वडीलांची काहीच चुक नाही, तुम्हीच म्हणताय त्या प्रमाणे एवढा शिकला सवरलेला माणुस दोन शुन्य जास्त टाकली वगैरे चुका करणार नाही.. तर त्यांना हे ही कळत असेलच की बँकेच अधिकारी जे सांगत आहेत (की चौकशी तुमच्याच मागे लागेल..) ते तद्दन खोटे आहे.. तरीही ते हा सल्ला मान्य करत आहेत हे गोंधळात पाडणारे नाही का? चौकशी मागे केव्हा लागते? जेव्हा तुम्हीच काही तरी गुन्हा केलाय असं पोलीसांना वाटतं.. पण असं मुळात होईलच कशाला? जो माणुस असे काही गफले करेल आणि ट्रान्झॅक्शन लपवु पाहिल, तो पोलीस स्टेशनात जाउन तक्रारी कशाला करत बसेल? शिवाय तुम्ही म्हणताय तसं तुमच्या कडे पुरावे आहेतच.. अशा वेळेस तुमच्या "जाउ देत" ह्या स्टॅण्ड ने लोक हैराण झाले तर नवल काय? { तुम्हाला "चौकशी मागे लागेल" म्हणजे "आपल्यालाच खेटे मारावे लागतील" असे मह्णायचे आहे का? कारण चौकशी मागे लागणेचा अर्थ वेगळा होतो } मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच (आमची गाडी चोरीला गेली तेव्हा आम्ही पहिल्यांना तक्रार नोंदवुन ठेवली.. कारण गाडी कुठे चोर्‍या करायला वापरल्या गेली तर ती तेव्हा आमच्याकडे नव्हती ह्याचा पुरावा..) अशावेळी मागे हटणे मी समजु शकत नाही.. अर्थातच तुमच्या वडीलांचे पैसे आहेत.. त्यांनी काय करावं हा त्यांचाच प्रश्न आहे... तुम्ही केवळ वडीलांना मदत व्हावी ह्या हेतुने धागा काढलात.. मिपाकरांना तेवढे जवळचे समजलात हे ही चांगलेच आहे.. तुम्हाला नंतर अजुन वेगवेगळी माहिती मिळत गेली आणि सरते शेवटी तुम्ही गप्प बसण्याचा निर्णय घेतलात. त्याचाही आदर आहेच. मिपा आपलंच आहे... धन्यवाद...

In reply to by पिलीयन रायडर

आधीचे व्यवहार, पोलिसांचा ससेमिरा वगैरे लागत नाही. FIR फक्त फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यापुरता असतो. FIR चा अर्थ इतकाच की तक्रार जेन्युईन आहे. पुढची सगळी कामं पोलीस, बँक आणि पेमंट ऑपरेटरच्या मागे लागून करुन घ्यायला बांधिल असतात. फक्त तीन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात : १) कार्ड, कार्डहोल्डरच्या ताब्यात होतं २) कार्डहोल्डरला फोन-पीन आला नाही, आणि ३) रक्कम खात्याला डेबीट झालीये. बास! मग सगळी जवाबदारी बँक आणि पेमंट गेट वे ऑपरेटरची आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

हो मग तेच तर म्हणतेय मी.. ह्यात आपल्याच मागे चौकशी लागली असं कसं होईल?

In reply to by प्रसाद१९७१

प्रसादराव, तुमचा आमचा नि सरांचा प्रॉब्लेम हाच आहे. (एका लायनीत बसवत नाही, शक्यच नाहीये ते ;) ) सांगतो ते 'कसं' सांगतो हे फार फार महत्त्वाचं असतंय. आपल्या (मी माझं सांगतो) लक्षात येत नाही बर्‍याचदा.

In reply to by प्रसाद१९७१

शब्दच तर महत्वाचे असतात ना भाऊ..!! आत्ता त्या टेन्शन मध्ये असणार.. त्यामुळे त्यांच्यावर लोक का शंका घेत आहेत हे लक्षात न घेता त्यांना राग येत असेल.. म्हणुन गोड गोड..! (अर्थात कुणी त्यांच्या वडीलांवर घसरलं तर त्यांना राग येणारच..) पण ह्या रागा लोभापेक्षा सुद्धा त्यांच्या वडिलांचे पैसे मिळणं आणि असं नेमकी कसं झालं ह्याच उत्तर शोधुन खबरदारी घेणं हे जास्त महत्वाचं आहे.. खरं तर इथे सल्ले देताना लोक "आपल्यासोबत सुद्धा असं होऊ शकतं" ह्या विचारानी जास्तीत जास्त चर्चा घडवुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.. त्यामुळे संभाव्य धोक्यांची माहिती मिळु शकते.. त्यामुळे सिरियसली.. होऊ दे चर्चा...

In reply to by प्रसाद१९७१

कोणाच्याही मूळ जेन्युइन मदतीच्या हेतूबद्दल कधीच शंका नव्हती. पिरा यानी संयतपणे लिहून उदाहरणानेच बरेच काही दाखवून दिले. उत्तम.

In reply to by गवि

हो पण आता धागाकर्तीच्या वैयक्तिक प्रश्नांबद्दलची चर्चा खुप झाली. त्यांनी अर्धवट माहिती दिली की खोटी याबद्दल अशी खुलेआम चर्चा करण्यात काही हशील आहे असे वाटत नाही खास्करुन जेव्हा धागाकर्तीने इथे कोणालाही फसवलेले नाही, तिचा कोणाचीही थट्टा करण्याचा अथवा त्याला लुबाडण्याचा हेतु नव्हता, धागाकर्ती स्वतः बास झाले आता सांगत आहेत. अगदी खरे सांगु का इथे मला काय वाटते आहे? एखाद्या मुलीची अब्रु लुटली गेली आहे आणि गल्लीतले लोक "तिनेच फूस लावली असेल हो" किंवा "दिवसाढवळ्या असे कसे होउ शकते" किंवा " पोलिसात तक्रार केली नाही म्हणजे नक्कीच काहितरी काळेबेरे आहे" किंवा "ती कपडे थोडे असेतसेच घालायची म्हणा" असली काहितरी विधाने करत आहेत. बास झाले ना आता. गपा की. या विषयाच्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी, काय उपाय असु शकतात यावर चर्च करा वाटल्यास. धागाकर्ती, तिचे वडील, बँक मॅनेजरची बायको या वैयक्तिक गोष्टी कशाला? खासकरुन धागाकर्तीलाच ते आता नको असताना.

In reply to by मृत्युन्जय

इथे मी असतो तर त्या बँक वाल्याला आधी धरला असता ८८००० हि काय फुकट नाही. पण ठीक आहे विषय बन्द.

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे >तसेच त्या बँके अधिकार्‍याच्या बाइकोसोबत झाले मला असे म्हणायचे होते(ते काका बाबांचे चांगले मित्र आहेत) बाकी तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच मला हे पटलेले आहे,बाबांना convince करुन तक्रार करा असे सांगणे महत्त्वाचे झाले आहे आणी सं.क्षी. सर फारश्या कटकटकीतुन न जाता आपले पैसे मिळु शकत असेल तर क्या कहने!! बाकी कोणाला अधीक उने बोलले गेले असल्यास क्षमस्व

In reply to by vrushali n

ताई, तुम्ही सतत त्या बँक मॅनेजरचा उल्लेख करत आहात आणि सांगत आहात की ते तुमच्या वडीलांचे चांगले मित्र आहेत. पण इथे आलेल्या प्रतिक्रिया वाचुन हे तरी नक्की समजले असेल ना की एक बँक मॅनेजर असुन त्यांनी दिलेला सल्ला अगदी चुकीचा आहे. तुम्ही थोडावेळ मैत्री बाजुला ठेवा आणि विचार करा की एखादा बँक मॅनेजर असा सल्ला का देत असेल? अगदी त्यांच्या बायकोचे १.७५ लाख गेले तरी कुणी स्वस्थ कसं बसु शकतं? आपण स्वतः त्याच बँकेत मोठ्या पदावर असुनही? ह्यात वरकरणी तुमच्या वडीलांची काहीच चुक, हलगर्जी / निष्काळजीपणा दिसत नाही.. मग नक्की का स्वस्थ बसा? आणि ८८०००/- ही काही सामान्य रक्कम नाही.. आणि तुम्हाला अर्थात थोडा पाठपुरावा करावा लागणारच.. वडीलांच्या वतीने तो तुम्ही करु शकता. पण संक्षी म्हणतात तसं हे पैसे परत मिळु शकतात.. तुम्ही हा मुद्दा सोडु नये.. मिपावर ह्या प्रश्ना संबधित क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत.. त्यांची मदत जरुर घ्या..

In reply to by पिलीयन रायडर

पिराताईंशी आणि संक्षीजींशी पुर्णपणे सहमत.. प्रश्न "कर नाही त्याला डर कशाला" ह्याचा असावा. ज्यांनीपण सल्ले दिलेत, त्यांनी कळकळीने, मनापासून सल्ले दिलेत. मला अजूनही कन्फ्युअजन आहे ते हे, की त्या बँक अधिकार्‍याच्या पत्नीने पैसे "बुडवले" की तिचे पैसे "बुडले"? जर पैसे बुडले असतील तर एवढे पैसे (१.७५ लाख रुपये) बुडूनही गप्प बसण्याचा निर्णय घेणे आणि तसाच सल्ला दुसर्‍याला देणे, नक्कीच संशयास्पद आहे.. आणखी एक गोष्ट, काहीही कारण नसतांना लोक उगाचच पोलिसांबद्दल गैरसमज करुन बसतात आणि फैलवतात. माझ्या पोलिसांशी आलेल्या संबंधावरुन (पुर्वीचा किंवा आताचा) तक्रारीची बाबतीत मलातरी कधीच वाईट अनुभव आला नाहीये. तेव्हा, आपलं नाणं खणखणीत असेल तर घाबरायची गरज नाही, हेच सांगतो..

नुकतेच बाबांकडुन कळले आहे की आमच्या जावयाने पोलीस तक्रार करा असे सांगीतल्या बरोबर लगेच काल पोलीसांकडे गेलेत( मी डोक फोडुन सांगुनही एकत नव्हते,आणी म्हने जावयाच म्हणन कसटाळायचे?)पुरुष प्रधान संस्कुती ती हीच!!! असो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे घरच्या p c ला access असणारे लोक कमी आहेत,आणी बाबा सगळ्या शकयता पडताळुन बघताहेत बघु आता काय होइल ते पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना

In reply to by vrushali n

पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन
येवढ्या लगेच रीलॅक्स होवु नका . अ‍ॅपलची अजुन बरीच प्रॉडक्ट आहेत बाजारात *blum3* बाकी आयफोन हाच सर्व पापांचे मुळ कारण आहे ! आयफोनखिलं पापमुलम ! *biggrin*

In reply to by vrushali n

हा प्रतिसाद वाचुन मनात काही बेसिक प्रश्न आले आहेत, पण आधीच भाषेच्या वापरा मुळे मार खाल्या मुळे आता विचारणार नाही. पण मला मारणार्‍यांनी तरी विचार करावा की मला जे प्रश्न पडत होते ते चुकीचे होते का?

१ तासाअधी

शंभरी पुर्ण झाली. आता १०१ % खात्यात पैसे जमा झाल्याची बातमी येइल.

माझ्या बाबांच्या बाबतीत एक प्रकार घडला होता. सांगलीला एटीएम मधून रात्रीचे पैसे काढताना कार्ड आणि पैसे एटीएम मध्येच अडकले. थोड्या वेळ विचार करुन बाबा घरी आले. दुस-या दिवशी सकाळी बँकेत तक्रार नोंदवायला गेल्यावर बँकवाले 'असे कसे कार्ड सोडून घरी गेलात म्हणून तुमचीच चूक आहे' म्हणून टाळाटाळ करत होते. आता रात्रीच्या वेळी जर एकट्या माणसाला एटीएम बाहेर राखण करत बसणे सोईचेहि नव्हते. मुख्य म्हणजे बँकेला कार्ड आणि पैसेहि मिळाले नव्हते. शेवटी पोलीस तक्रार केली. थोड्या दिवसांनी (२ महीन्यांनी) पाठपुरावा करून पैसे परत मिळवले. अर्थात पोलीसांना चौकशी करणे, उलटे अर्थ काढणे आणि बँकेने कार्ड वापरायच्या सूचनांची अंमलबजावणी न करणे या आरोपांमूळे थोडा त्रास झाला. पण यात आपली काही चूक नाही या एका गोष्टीवर बाबांचा आत्मविश्वास टिकून होता. सरकारी नोकरीत आयुष्या काढणा-या माणसाला उतारवयात संगणक, अ‍ॅन्ड्रॉईड, एटीएम अश्या गोष्टींचा सामना करणं थोडं जडच जातं. पण समजून घेतल्यावर भीड चेपली जाते. काळजी करू नका. तुमच्या बाबांचेही पैसे बुडणार नाहीत याचा त्यांना विश्वास द्या.

In reply to by अकिलिज

माझे बाबा पण आत्ता इंटरनेट वरुन खरेदी करायला शिकलेत वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल(एक तर अ‍ॅपल फोन आहे असे सायबर क्राइम वाले पोलीसांना म्हणत आहेत)

In reply to by vrushali n

आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
हा परिच्छेद वाचून 'पुन्हा' बरेच प्रश्न पडलेत, पण आता विचारत नाही. कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.

In reply to by vrushali n

इंटरनेटवर 'one time pin' वापरायची सोय असते. तो नंबर फोनवर येतो आणि १० मिनिटे व्हॅलिड असतो. ही पद्धत सेफ आहे.

In reply to by कवितानागेश

नेट बँकींग नाही,पैसे डिरेक्टली डेबीट कार्ड मधुन वळते झालेत्,त्यात one time pin ची गरज नसते,फोन वर डिरेक्ट transaction च मेसेज येतो

वाचतिये. नस्ते उपद्व्याप मागे लागले की चिडचिड होते अगदी! मलाही माझ्या कार्डांची काळजी वाटायला लागलीये. संक्षीच्या उपायांना यश येवो आणि तुमचे पैसे परत मिळोत.

वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
ए अरे हे काय चाल्लंय? कुणीतरी "इस्कटून" सांगेल का नक्की काय चाल्लय ते? डोक्याचं दही झालंय.

In reply to by काळा पहाड

तपास सुरु आहे. योग्य वेळी माहिती देण्यात येईल. (धागाकर्तीस डिस्क्लेमर: आपली कुठल्याही प्रकारची चेष्टा करण्याचा कोणताही हेतू नाही.)

४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे
कोणाला अटक होयची असेल तर होऊ दे की. तुम्ही FIR करणे गरजेचे आहे. त्या शिवाय पैसे परत मिळणार नाहीत.

येत्या काही दिवसांत फायनल कळेल ते सांगते श्री किसन शिंदे धागा असल्या कारणांसाठी द्वीशतकी किंवा शतकी व्हावा,तेही अख्खे घरचे धींडवडे निघुन असे मलातरी वाटत नाही, जितकी छटाक माहीती होती ती सांगितली ही माझी मोठी चुक होती,आता पुर्ण तपास झाल्यावार इथे माहीती देइल(बाबा पोलीसांकडे आधी जायला इछ्छुक नव्हते,आता झालेत्,सायबर वाल्यांच व्हरडीक्ट काय आहे,ते तपास करत आहेत्,शेवटी पैसे परत मिळतात की नाही हे सांगते नक्की

In reply to by vrushali n

इथे मला वाटत नाही तुमच्या घरचे धिंडवडे निघाले आहेत कदाचित कोणालाच असा वाटत नसावे. पण पैसे मिळाले कि नक्की सांगा. आता प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे कि जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर फार वाइट वाटेल इथे आलेल्या सगळ्यांना

आणी कमाल आहे ,म्हणे प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे >की लोकांनी आमची इज्जत काढलीये प्रतीसादक उवाच १ धागा शतकी झाला की पैसे परत मिळतील अशी बातमी येइल्, २ कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील. ३ ह्यांनीच मोठी खरेदी केली आणी लपवायची आहे ४ कोणी इतके पैसे सोडतात का? ५ कथा सांगत आहेत ६" उत्कंठा" वाढवुन पळुन जात आहेत अजुन काही राहीले असेल तर सांगा बुवा

In reply to by vrushali n

हो. वृषाली काकू, मला वाटतंय की तुम्ही एक्तर खोटं बोलताय किंवा तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे. इथे बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत. पण तुमच्या सगळ्या पोष्ट पाहिल्या तर भडक आणि दुसर्‍यावर सरळ सरळ आरोप वगैरे करणार्‍या आहेत. बाकी लोकाना ष्टोर्‍या ऐकण्यामध्ये ईंटरेस्ट असतो, तुमचे पुरूष प्रधान संस्कृती बद्दलचे उच्च विचार आणि तुमची प्रत्येक पोष्ट्बद्दल होणारी जळजळ आणि किटकिट ऐकण्यात नाही. आणि खरं सांगायचं तर लोकांनी जी काही इज्जत वगैरे काढलीय असं तुम्ही म्हणताय, ते तुमच्या पोष्ट, तुमचं सामान्यज्ञान आणि तुमचा अ‍ॅटिट्युड वगैरे बघता त्यात काही नवल नाही. खरं तर लोकांनी इतकं ऐकून घेतलय हेच नवल. तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत. तुमच्या पोष्टवरून असं दिसतय की तुमच्या घरातीलच कुणी तरी तुमच्या पिताश्रींना चुना लावून आयफोन की काय तो विकत घेतलेला आहे. आणि म्हणूनच तुमचे पिताश्री एफ.आय.आर. करायला का-कू करताहेत. (कारण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे अटक तर होणारच वगैरे). तेव्हा ही सोंगं बंद करा आणि तुमची कापडं तुमच्या घरीच धुवा. तुम्हाला इतके डिटेल पोष्ट लिहायला वेळ आहे, तर घरच्यांच्यावर उपकार करा आणि तो वेळ जरा कारणी लावा आणि अभ्यास करा.

In reply to by काळा पहाड

मी एकही वाक्य तुम्हाला उद्देशुन बोललेले नसताना इतक चिडुन बोलयचे काय कारण आहे? तुम्ही मला अथवा माझ्या वडीलांना ओळ्खता काय? नाही तर त्यांच्यवर असे आरोप लावायचे कारण कळु शकेल काय? मिसळपाव वर असे व्यक्तीगत आरोप असलेले वाक्य चालतात काय? मी आधीच माफ करा,माझी चुक झाली म्ह्ट्ल्यावर ,आमचेपण मागेपुढे असेच नुकसान होउ शकते,ते टाळण्यासाठी अशा बाबी वर चर्चा व्हायला हवी असे का म्हणत होतेत मी जेव्हा तुमचे पुरूष प्रधान संस्कृती म्हटल तेव्हा ते कौतुकाने म्हटल होत(आम्ही सांगुन एकत नव्हते,रसीक नी एकदा म्हट्ल्याबरोबर तक्रार करायला गेलेत म्हणुन) बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत> त्या प्रतीसादांना मी मजकडुन प्रामाणीक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे,मी सं.क्षी सरांना सगळे इमेल पण पाठवलेत्,मग पुढचा तपास सायबर क्राइम का करेनात तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत >तसेच आम्हीपण इथे कोणाकडे पाणी भरत नाही,मग श्री प्रसाद ह्यांना असे आरोप का करावसे वाटलेत? बाकी माझ्या अभ्यासाची काळजी घेण्यास मी समर्थ आहे,काळजी नसावी,धन्यवाद्,लक्षात ठेवुन अभ्यासाची काळजी घेतल्यबद्दल क्रुपया मी तुम्हाला उद्देशुन काहीही बोललेले नसतांना आणी तुम्हाला ह्या केस मधले शेंडा न बुड माहीत नसतांना व्यक्तीगत आरोप टाळावेत धन्यावाद

In reply to by vrushali n

कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.
यात तुमच्या घरच्या लोकांची इज्जत काढण्यासारखं काय होतं हे कृपया विस्कटून सांगाल का?

In reply to by किसन शिंदे

मलाही हेच कळत नाहीये. प्रत्येक प्रतिसादाचा आणि वाक्याचा रोख धागाकर्तीच्या घरच्यांना मानहानीकारक आहे असे का वाटते आहे? कोणी इतके पैसे सोडते का? हा प्रश्न खरंच पडला मला (आणि इतरांनाही). म्हणून तसे सांगितले. यात पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत एवढीच इच्छा होती. इथले अनेक प्रतिसाद तळमळीने फक्त पैसे परत मिळावेत यासाठीच होते. तुम्ही न घाबरता तक्रार करा, पैसे परत मिळतील असा धीर देणारे होते. यात अपमान कुठे केला गेला हे नाही कळले.

In reply to by मधुरा देशपांडे

+११११

In reply to by मधुरा देशपांडे

+११११

In reply to by किसन शिंदे

जर तुम्ही खवट पणे ते नाही वाक्य म्हटलत; तर मी चुकले

सो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ..... पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन आता मला सांगा की हे हॅकींग नाहीतर दुसरे काय? बाबांनी स्वतः कोणाला पिन व इतर details तर नाही ना दिले?

In reply to by योगी९००

मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते,ज्या व्यक्तीला सगळ माहीत आहे,असे लोक कमी असतील सहज सापडु शकतील ना,मग ते त्या paytm चे का असेना कदाचीत known devil is better than unknown असे त्यांना वाटले असावे आणी बाबांना हे समधान की बाबांनी कुठल्याही suspicious email/phone entertain केले नाही,म्हणजे त्यांची कसलीच चुक नाही,आणी आता अश्या व्यवहारांना अटकाव होउ शकेल ना? जर त्यांनी suspicious email/phone entertain केले असते तर त्यांच मन त्यांना नक्कीच खात असत अस मला वाटत बाबांनी अजुन कोणालाही स्वताहुन पिन व इतर details दिले नाहीत

In reply to by vrushali n

मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते जबरदस्तीने जर कोणी तुमचा पासवर्ड / पिन घेतला तर त्याला हॅक म्हणतच नाहीत... known devil is better than unknown आम्हाला तर ओळखीचा चोर जीवानिशी मारी हेच माहित आहे. बाकी हॅकर घरचा असो वा बाहेरचा त्याला पोलिसांपर्यंत घेऊनच जा..८८००० ही काही कमी रक्कम नाही आहे. त्यातून आम्हा सर्वांना पिन / पासवर्ड कसे सांभाळावेत हे सुद्धा कळेल.

आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू हे वाचले असतेत ना आधी तर धपाधप सल्ले पाडले नसतेत तुम्ही. आणी हो माझ्या मनात तुमच्या सम्स्येविषयी बिलकुलही शंका नाही. जे झाले ते योग्य नाही पण पब्लिक देत आहे ना सल्ले सगळे स्वीकारयलाच हवे असे नाही.११५ प्रतिसादात ५ वाकडे असतील पण ११० तिकडे आहेत त्यांचा मान ठेवा .

In reply to by इरसाल

मला खरच कळत नव्हत कोण खवट बोलतोय्,कोण ह्या क्या फेक रही म्हणतोय मला जे genuine वाटलेत्,त्यांना मी खरच प्रमानीक पणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय(अर्थातच मलाच छ्टाक माहीती असताना,त्यामुळे काही कच्चे दुवे नक्कीच राहिले असतील्,हे मी नाकारत नाही)

अरे बापरे.. खुप काही झालय की ह्या धाग्यावर... कुणी तरी व्यवस्थित प्न नंबर वापरुन खरेदी केली आहे.. आता जर एखाद्या फोल्डर मध्ये सगळी माहिती लिहुन ठेवली असेल तर ती कुणीही वापरु शकतं.. आणि मग हे कसं प्रुव्ह करणार की ती खरेदी तुम्ही केलेली नाही तर कुणा दुसर्‍याने केली आहे..? (हा मी सिरियस प्रश्न विचारत आहे..) परत घरतल्या कॉम्पुटर वरुन ही माहिती चोराला मिळली तर असा अ‍ॅक्सेस कुणाकुणाला आहे.. अर्थातच जवळच्याच व्यक्तिंना.. मग तुमचे वडील रिलॅक्स कसे? उलट जास्तच वैतागले असायला हवेत कारण अशा केस मध्ये डायरेक्ट अटक वगैरे पर्यंत जाता येत नाही.. ऑनलाईन खरेदी केली तर ऑर्डर कुठल्या तरी पत्त्यावर मागवावी लागते ना? मग जो काही अ‍ॅपलचा फोन मागवला आहे तो नक्की कोणत्या पत्त्यावर मागवलाय हे तरी शोधता येईल का? तुमच्या घरच्याच पीसीला वापरुन हे काम केलं असेल तर काही हिस्टरी मध्ये वगैरे जाऊन बघता येईल का की कोणत्या आयडीने खरेदी झाली? समजा दुसरा पीसी वापरला असेल तर त्याचा आयपी वगैरे शोधणे शक्य असते का? मुळात इअतकी महत्वाची माहिती एका फोल्डर मधे लिहुन ठेवुन तो पीसी बाहेरच्या रुम मध्ये ठेवला.. ती माहिती कुणी तरी घेतली आणि वापरुन मोकळा पण झाला... आता मला ८८०००/- का सोडावे लागणारेत हे समजतय.. आणि हो.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात.. (मलातरी तसं वाटतं.. अर्थात मी जाणकार नाही... योग्य लोक सांगतीलच काय ते..)

.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात
नक्कीच असतात त्यांना जो पासवर्ड, पीन वगैरे जातो तो Encrypted असतो, कोणी ऐरागैरा तो शोधु शकत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

त्या paytm वाल्याच्या जेव्हा लक्षात आले की रक्कम मोठी आहे,तेव्हा त्यांनी नं दिला,तेव्हा तो व्यक्ती बाबांना असे बोलला की " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी" ह्याचा अर्थ आत्ता आम्ही लावत बसलोत

In reply to by vrushali n

" सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी"
असं लोक स्वतःच्या कंपनीबद्दल बोलतात? कस्टमर सोबत? डायरेक्ट? आणि केवळ मोठी रक्कम आहे म्हणुन कंपनीमध्ये फ्रॉड आहे असा निष्कर्ष पण काढतात? आणि तो लागलीच बोलुन दाखवतात? ऐकावं ते नवलच होत चाललय आता...

In reply to by पिलीयन रायडर

जेव्हा ४३३५० वाला मेसेज आला,तेव्हा १ तासात आम्ही इमेल केली के तो व्यवहार आमचा नाही थांबवा लगेच,तर हे लोक तीन दिवसांनी इमेल पाठवुन म्हणतात,we are sorry product is delivered,plz sent bank statment or through cyber cell बाबांनी त्याला काहीतरी माणुसकी ठेवा,तुम्ही लगेच का कार्यवाही केली नाही? फोन न क देत नाहीतल्,फोन असता तर लगेच हे थांबवता आल असत ना? आम्ही आता काय करायच अस म्हट्ल्यावर तो ओशाळुन असे बोलला आत्ता त्य वाक्याचा अर्थ शोधत आहोत आम्ही