Skip to main content

Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...

लेखक vrushali n यांनी शनिवार, 30/08/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, पुन्हा थोडा त्रास देतीये आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो) care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात? जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी? आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते?? आणी आम्ही आणखी काय करु शकतो?

वाचने 54536
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो
How to reach Paytm Level 1: You can write to us at care@paytm.com. You can even reach out to us on Facebook, Twitter or Google+. You can put your grievances on these online pages You can write to us on Paytm.com/help. You can also call us on 1800-1800-1234 हे काय आहे??

In reply to by मार्क ट्वेन

(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो,live chat करता येत नाही

यापुढे एक वेगळे अका० मध्ये दहा हजार अथवा कमी पैसे ठेवून त्यावर एटीएम काढणे. धोका झाल्यास तेवढीच लहान रकम नुकसानीत जाईल. तुमचे आताचे पैसे परत मिळोत.

ग्राहक मंच/NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM मधे पण कम्प्लेंट दाखल केलिये आज

In reply to by vrushali n

NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM ऑनलाईन केली का? हो हे उत्तर असेल, तर सर्वात आधी सर्व पुरावे घेऊन, पोलिस मध्ये तक्रार करा, लिखित बैन्केत तक्रार द्या, पुरावे जपून ठेवा. बैकिन्ग मधील सर्व पासवर्ड बदला, पीन बदला, जास्त गरज नसेल तर तात्पुरते कार्ड ब्लॉक करुन टाका. शक्य असेल तर सर्वाची तारिख्,वेळ व ज्या ज्या व्यक्तिला तक्रारी दिल्या याची नोंद करा. तुमच्या शहरातील "ग्राहक न्यायलय शोधून" तेथे लिखित तक्रार द्या, जेवढा वेळ जाईल तेवढे जास्त नुकसान तुमचे होईल. काळजी घ्या,

मग काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. कार्ड हॅक झालं तरी पीन नंबर शिवाय मर्चंट-मशीनवर स्वाइप होऊ शकत नाही. सिस्टममधल्या घोटाळ्यानं तुम्हाला डेबिट आलं असेल तर पैसे उशिरा का होईना, शहानिशा होऊन परत मिळतील. SBI Card Department ला फोन करुन RM Level च्या ऑफिसरचा फोन नंबर घ्या आणि तक्रार करा, लगेच अ‍ॅक्शन होईल. आणि (नेहमी प्रमाणे इतरांसारखं) पुढे काय झालं ते लिहीण्याचं टाळू नका.

Directorate of Public Grievances, Government of India, URL: http://dpg.gov.in/ या साइटवर तुमची तक्रार थोडक्यात लिहा/ पाठवा. आठेक दिवसांत काम होईल.

In reply to by होकाका

हे फ्रॉड कोणत्या सेक्टर मधे कव्हर होइल? तिथे सायबर क्राइम असा पर्याय दिसत नहिये.बॅंकींग इथे टाकाव काय्?पण बँकेने तर फ्रॉड केल नाहिये.प्लीझ जर माहीती असेल तर सांगाल काय??

In reply to by vrushali n

अर्थातच बँकींग. यामध्ये एक मुद्दा असा आहे की एका नॅशनलाइझ्ड बँकेने तुमच्या वडिलांच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी त्यांचे पैसे का दुसरीकडे वळवले? मग ते paytm असोत वा आणखी कोंणी...

वाल्यांचा असा मेसेज आला आहे Dear Vasanta, We are unable to refund the amount as product has been delivered. Unfortunately, we can not share the beneficiary details to you unless it is asked by your bank or any cyber cell agency.You can also attach the copy of FIR आता आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत

In reply to by vrushali n

तेच तर वर सांगितलं होतं :
SBI Card Department ला फोन करुन RM Level च्या ऑफिसरचा फोन नंबर घ्या आणि तक्रार करा, लगेच अ‍ॅक्शन होईल.

कार्ड ब्लॉक करा. त्या खात्यावरचे उरलेले पैसे दुसर्‍या खात्यावर जमा करा. बँक ओंबुड्समन कडे तक्रार करा. सायबर क्राईम कडे पण तक्रार करा. म्हणजे बेनेफिसिअरी पर्सन चा थोडा फार पाठपुरावा होऊ शकेल. आणि इथुन पुढे ज्या खात्याचं डेबिट कार्ड असेल त्या खात्यावर फक्त गरजेपुरतेचं पैसे ठेवा. बाकी असं होणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तुमचे पैसे परत मिळोत हिचं अपेक्षा. बाकी ह्यात बँक दोषी आढळली तर स्यु करायला विसरु नका.

कार्डाची कॉपी मारून आणि पिन नं मिळवणारा फार पोहोचलेला आहे. याअगोदर कुठे कार्ड वापरले ते आठवून त्याठिकाणच्या घटनाच काही सुगावा लागू देतील. हॉटेलात बिल पेमेंट करणयासाठी वेटरने कार्ड नेले होते का? वेटरने पिन विचारला होता का? त्या पेमेँट आणि डल्ला मारला त्या पेमेंटची वेळ जवळपास असेल.

In reply to by कंजूस

असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

बाबा घरच्या पी.सी वरुन डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करतात , बाकी अजुन ईतर ठीकानी नाही बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल

In reply to by vrushali n

असे लिहून द्यायला तयर आहेत का बँकेचे अधिकारी? जर डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही, तर पेमेंट गेटवे ला हा पर्याय कशासाठी असतो. तक्रार कराच!!

In reply to by vrushali n

आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही, ------ असे कोण म्हणाले ? का बुवा नाही करता येणार ? चौकशी कसली मागे लागेल ? एटीएम स्किमींगचा प्रकार असू शकेल. हे कार्ड एखाद्या स्किमिंग डिव्हाईस लावलेल्या एटीएममधे वापरले गेले असू शकेल. किंवा पिन नंबर वेटरला वगैरे दिला असेल तर. पण तेवढी काळजी जनरली लोक घेतात. जास्त करुन हा टेक्नोलोजी बेस्ड चोरीचा प्रकार वाटतोय. निष्काळजीपणापेक्षा.

In reply to by vrushali n

कोणं म्हणालं की डेबिट वरुन ऑनलाईन खरेदी करता येत नाही म्हणुन? एकतर तुमच्या घरच्या संगणकामधे चांगला अ‍ॅंटीव्हायरस आणि फायरवॉल नसेल, की-लॉगर्स वरुन सुद्धा माहिती चोरता येते. फिजिकल कीबोर्ड ऐवजी व्हर्चुअल की-बोर्ड वापरत चला, धोका बराच कमी होईल. आणि बँक सहकार्य करत नसेल तर तक्रार कराच. कदाचित आतली मिली भगत सुद्धा असु शकेल.

In reply to by vrushali n

बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल
हा काय प्रकार? च्यामारी, आता बँकवालेपण सरकारी नोकरांसारखे बिनबुडाच्या धमक्या द्यायला लागलेत का काय? जर असं करता येत नसेल, तर पेमेंट गेटवेत तो पर्याय का असतो? सगळेच बँकवाले" आमचं डेबीट कार्ड घ्या. बघा, य्यंव होतं नी त्यंव होतं".. "अमुकतमुक बँक डेबीट कार्ड धारकांना ह्या-त्या सवलती".. आणि ते कार्डच मागंमागं धावत येतं अस्या जाहीराती कश्या करतात मग? चांगलं झापडा ह्या असल्या धमक्या देणार्‍यांना..

In reply to by चिगो

धमक्या नसतीलही.. जुन्या पिढीतल्या बँकेलत्या काही लोकांना कार्ड्स, इंटरनेट वगैरे अजुन तितकसं नाही समजत. अज्ञानातुन आलेला सल्ला असण्याची शक्यता जास्त आहे.

त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?

In reply to by vrushali n

काहीही कळले नाही. आधीच बरीच transaction 'करुन ठेवली' म्हणजे काय? आधी बरीच ट्रांझॅक्षंस केलेली असण्याचा या fraud शी काय संबंध ? त्या अधिका-याच्या पत्नीने अमुक लाख 'बुडवले' ?? ..आणि त्या अनुभवावरुन सल्ला दिला म्हणून, चौकशी नको व्हायला म्हणून विसरुन ज? रिटायरमेंटनंतर चौकशीत अडकणे ? जे कार्डधारक खुद्द फसवले गेलेत ते चौकशीत 'अडकतील' कसे ? मला वाटते इथे पूर्ण माहिती आणि चित्र कळत नाहीये. पण असो.

In reply to by गवि

कळले नाही. केवळ चौकशीत अडकायचे नाही म्हणून किंवा अमुक एक व्यक्ती म्हणते म्हणून गेलेले सगळे पैसे बुडले असे म्हणून सोडून द्यायचे? असे काही विसरून कसे जायचे. उलट पाठपुरावा करायला हवा की नेमके काय झाले आहे. आत्ता असे झाले म्हणजे परत कधीतरी होऊ शकतेच. मग तेव्हा परत हेच प्रश्न येतील. पेट्रोल पंपावर कार्ड दिल्यानंतर थोड्या वेळाने अशा पद्धतीने पैसे चोरीला गेले असे मध्यंतरी वाचले होते. नेमकी कुठल्या वर्तमानपत्रात ही बातमी होती हे आठवत नाही पण एसबीआयच्याच कार्ड बद्दल होते. पैसे परत मिळावेत म्हणून शुभेच्छा.

In reply to by vrushali n

खरेच काही कळले नाही. १. डेबिट कार्ड वर खुप ट्रँझक्शन करणे गुन्हा आहे का? २. डेबित कार्ड ऑनलाईन नक्कीच चालते. असे तर नाही ना की तुमचे बाबा बरिच ऑनलाईन Transactions करतात म्हणुन हे चुकीचे Transaction पण तुमच्या बाबांनीच केले आहे असा अर्थ काढला जाईल.

बाबा हा विषय पैसे गेलेत असे समजुन टाळत आहेत( बोलुन परत बाबांना बीपी/शुगर चा त्रास होइल म्हणुन टाळत आहोत) मला हे सगळ माझ्या बहिनीने सांगितलय आज सकाळी ११ वाजता ती त्या बँक अधीकारी सोबत बोललीये,त्यांच्या स्वताच्या बायकोने असेच transaction केलेत आणी एकुन १.७५ लाख बुडवले ,जे कधीच परत मिळाले नाहीत्,आता त्यांनीच अस सांगीतल्यवर आम्हला फरस काही करता येण्यासारख नाहिये(त्यांनी कळकळीनी सांगीतल) बाबांची आता या प्रकरणात पुढे करायची इछा नाहिये... आता मी पण शांत रहायच ठरवल आहे पुढे काळजी घेउत धन्यवाद सगळ्यन्ना

In reply to by vrushali n

त्याने त्याच्या बँकेच्या ग्राहक हिताचे संरक्षण कर ण्यास पुढाकार घेतला पाहिजे. पण तो स्वतःची कातडी वाचवतो आहे.त्याने नक्किच काहितरी घोटाळे करुन ठेवले असणार आणि आता तो ते लपवत आहे. आपल्याला भावनिकरित्या गंडवत आहे. काही झाले तरि आपण तक्रार कराच. जमल्यास आरबीआय गव्हर्नरलाही तक्रार पाठवा व त्यांनाही कळू द्या.

In reply to by इनिगोय

कार्ड होल्डरच्या गहाळपणा शिवाय फ्रॉड होऊ शकत नाही असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

In reply to by इनिगोय

-1 त्यांना अडचणीच्या , मनस्तापाच्या वेळी आपल्याशी शेअर करावंसं वाटलं हेच किती चांगलं आहे. आपण इथे फावला वेळ असतो म्हणूनच येतो. मनातलं काही मोकळेपणी लिहिताना कोणी इतका विचार करु नये.. अगदी आधी सल्ला मदत मागितली आणि नंतर मन बदलले तरी सर्वांचा वेळ वाया गेला असा formal विचार इथे नकोच.. असे माझे मत.

In reply to by गवि

तर हा प्रश्न आला नसता. एकेक गहन पैलू नंतर उघड करुन, `आम्ही पुढे तक्रार करणार नाही' असं म्हटल्यावर, सल्ला देणार्‍यांचा पोपट होतो. त्यामुळे ज्यांनी मनःपूर्वक मदत केली त्यांना `कशाला घेतला त्रास' वाटणं स्वाभाविक आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सल्ला देण्याच्या त्रासा पेक्षा, खरे काय घडले हे न सांगता नुस्तेच "आता तक्रार करणार नाही " असे विधान करुन चर्चा आटोपती घेणे त्रासदायक आहे. हे तर सस्पेंस सिनेमा सारखे झाले. खुनी कोण कळायच्या आधीच लाइट गेले. नक्की काय घडले हे सांगण्याची जबाबदारी पण लेखिकेची आहेच.

In reply to by प्रसाद१९७१

मी नगर ला शिकते,सगळ्या बहीनी दुसरी कडे,आई वडील दुसर्या गावाला आहेत वडीलांनी मी फोन केला तेव्हा जुजबी माहीती दिली,वरुन तुम्ही टेन्शन घेउ नका असेही सांगत होते मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते आता सकाळी बहिनीने जितक सांगीतल तितक मि शेअर केलय ह्या उपर बोलायची वडीलांची इछ्छा नाहीये,तर मी आणखी काय करु शकते

In reply to by संजय क्षीरसागर

+१ आम्हाला हे प्रकरण लावून धरायचं नाही, पण हे हे असं झालं, तुम्ही काळजी घ्या.. असं सांगितलं तर वाचणा-यांना मदतच होईल की. इथे वेगवेगळी विधानं केल्यामुळे 'डेबिट कार्ड आॅनलाईन वापरता येत नाही', 'बरेच व्यवहार केल्यानंतर फसवले गेल्यास तक्रार करणे त्रासाचे ठरू शकते', असे गैरसमज व्हायला वाव आहे. खाली पैसाताईने दिलंय त्याप्रमाणे इतक्या मोठ्या रकमांना फसवले जाऊनही गप्प का बसावंसं वाटलं असेल हाही प्रश्न आहेच.

In reply to by इनिगोय

सहमत.

In reply to by गवि

आपल्याकडे अशा गुन्ह्यांशी मुकाबला करायला काहीही यंत्रणा नाही. पोलीस इतक्या जुनाट पद्धती वापरतात की ऑनलाईन कंप्लेंट दिली तरी पोलीस चौकीत जाऊन लेखी कंप्लेंट द्यावी लागते. मुळात एकदा माझे क्रेडिट कार्ड पर्सबरोबर हरवले तेव्हा क्रेडिट कार्ड कसे वापरायचे यावर मी पोलीस स्टेशनातल्या साहेब लोकांची शिकवणी घेतली होती. त्यामुळेच लोक नाद सोडून देतात. मात्र ४२००० आणि ४५००० या खूपच मोठ्या रकमा आहेत. आणि बँक अधिकार्‍याचे १.७५ लाख जाऊन तो गप्प बसत असेल तर मला (या केसमध्येही) त्याचाच पहिला संशय येईल.

In reply to by गवि

अगदी हेच म्हणायचय.

माझ्या मते लेखिकेच्या वडलांनी काहीतरी मोठी खरेदी केली असणार, ती सांगितली नसेल कींवा लपवायची असेल > ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले मला माफ करा, इथे लिहुन माझी मोठी चुक झाली ह्या उप्पर मला घरचे धुणे चौकात धुवायचे नाही धन्यवाद

In reply to by vrushali n

प्रतिसाद देताना मूळ लेखकाला एखादी बाब शेअर केल्याचा पश्चात्ताप व्हावा ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांना आणखी प्रश्न विचारणं, क्लॅरिटी मिळवणं हे वेगळं आणि वेगवेगळी कनक्लुजन काढून बळीलाच जबाबदार ठरवणे वेगळे. खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच. हे मी माझं मत केवळ सर्वांसमोर म्हणून पाहतोय. बाकी आपण स्वत:चे बेस्ट जज्ज.

In reply to by गवि

खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच.
शतशः सहमत. -(तोंड पोळुन घेतलेला) गणा

In reply to by गणपा

हजारदा सहमत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कधीकधी बोटांतून कीबोर्डावर काहीही घरंगळतं इथे. असोत. लेखिकेच्या दु:खात सहभागी आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या यंत्रणांची बेफिकिरी पाहून आश्चर्ययुक्त संताप वाटला. आपणांस इथे बरेच सल्ले मिळाले आहेतच, पण पोलिसांच्या सायबर सेलकडे तुम्ही तक्रार केलीय का? हा विभाग बराच कार्यक्षम आहे असे मी तरी ऐकलंय.

In reply to by गवि

@ गवि - एक तर मला काही वाईट बोलायचे नव्हते. एकुणच सर्व गोष्टी गोंधळात टाकणार्‍या होत्या. त्यांच्या बाबांनी नेट वर अमाउंट टाकताना २ शुन्य जास्त टाकली असे नाही का होऊ शकत? तुम्ही गोष्टी कशा घडल्या त्याचा क्रम लक्षात घेत नाहीयेत. १.आधी समस्या मांडण्यात आली. त्यात सर्वांनी चांगले सल्ले दिले. माझ्या कडे अधिक काही लिहीण्यासारखे नसल्यामुळे तेंव्हा मी काही लिहीले नव्हते. २. मग त्या बँक अधिकार्‍याची कथा मधेच आली. त्याच्या बायकोने १.७५ लाख अश्याच Transactions मधे गमवले असे लिहीले होते. ह्या वर लोकांनी शंका व्यक्त केल्या. ३. मग डेबीट कार्ड वापरुन नेट वर खरेदी केली तर चौकशी मागे लागेल असे कोणी तरी सांगीतले अशी कथा आली. ४. ४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का? हे जे काही सांगितले गेले आहे ते तुम्हाला तरी पूर्ण वाटते का? एका गोष्टीचा दुसर्‍याशी सबंध तरी आहे असे दिसतो आहे का? एकदा लेखिकेने विषय चालू केल्यावर आणि आधी तरी इतक्या लोकांनी चांगले सल्ले दिल्यावर, अचानक आता काही नाही, मी हा विषय बंद केलाय हे म्हणणे पटते का?

In reply to by प्रसाद१९७१

आधीच आम्ही जवळ्पास ८८००० हजार रुपयांनी नुकसनीत असताना १अशी कथा आली २ उत्कंठा वाढवुन पळु नका अशी भाषा वपरने शोभते काय?मी तुमची उत्कंठा वाढवायला इथे पोवाडा सांगते/गाते आहे काय? इतकी संवेदनहीनतेची नीच पातळी लोक गठु शकतात? मजजवळ transaction ची कॉपी आहे,पण ती इथे कशी डकवावी हे कळत नाहिये ४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का>>>>जर कोणी प्राध्यापक+lay out buisness+पत्नी माध्यमिक शाळेत शिक्षक असेल आणी त्यांना उगाच हाती काही न लागता वरुन नसत्या पोलीस चौकशीच्या भानगडीत पडायचे नसेल तर? जो माणुस आपल्या मुलींना ओपन मधुन खासगी महविद्यलयात MD/BDS पुर्ण फीज भरुन शीकवीत असेल तर त्या व्यक्तीला रकमेवर दोन शुन्य जास्त पड्लेत की कमी हे समजत नसेल काय? माफ करा म्हट्ल तर "उत्कंठा" वाढवुन पळु नका म्हनायचे आणी जे घडल ते सांगीतल कि खुसपट काढायची "ह्या अमकी रक्कम कशी सोडु शकतात्?ढमक्या रकमेची खरेदी केली असेल आणी लपवयची असेल्,कथा सांगत आहेत!!! मजजवळ transaction चे डीटेल्स आहेत्,ते इथे कसे चढवावेत(m s office picture manager मधे आहेत)

In reply to by गवि

आपण फार चांगला मुद्दा मांडलात. तुमच्या प्रतिसादातील प्रत्येक वाक्य आणि शब्द अचूक आहे. "धागा काढलात तर आता प्रतिक्रिया तर येणार", हा व्यक्तिस्वातंत्र्याचा काढलेला फार मोठा चुकिचा निष्कर्ष आहे. "म्हणजे आता पोलिस स्टेशन किंवा कोर्टात गेल्यावर मदत मिळो ना मिळो , मानहानी तर होणारच" ह्या गोष्टीचा पुरस्कार केल्यासारखे झाले. मिपा सारख्या प्रसिद्ध मंचावर (मराठी बांधवांच्या) सहज मनातील विचार मांडावे, अथवा एखादी माहिती विचारावी म्हणून एखादा धागा काढावा आणि नंतर "मदत नको पण प्रतिक्रिया आवर" अशी धागाकर्त्याची अवस्था व्हावी हे केवळ दुर्दैव. There are some souls (though in minority) here who actually relish the fact that they have ensured through their remarks that the person who started the thread is embarrassed, insulted and vows never to write again on this forum. This , they consider as their victory and declare so on this very forum. They are always on the lookout for such 'victories' सं.म. : व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या ह्या प्रकारावर आपली काय प्रतिक्रिया आहे?

In reply to by vrushali n

प्रसाद१९७१ यांच्या मूळ प्रतिसादात असा काही निगेटिव्ह टोन असल्याचे जाणवले नाही. लेखिकेने अपूर्ण माहिती दिलीय, ती पूर्ण द्यावी एवढेच तर म्हणणे होते. आणि मुळात इथे 'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.

In reply to by इनिगोय

'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.
याचा अर्थ एखाद्याच्या तिर्थरुपांवर वैयक्तिक हल्ले करावेत का? ते ही काही ओळख-पाळख नसताना.

In reply to by गणपा

अर्थातच नाही. मोठी खरेदी करून ती सरप्राईज ठेवायची असेल असा अर्थ काढण्याजोगं वाक्य होतं ते. अर्थात नेमकं काय म्हणायचं होतं ते तेच सांगू शकतील.

In reply to by स्पा

स्पाजोबा, गाडी चुकलीय, गणपाने ज्या प्रतिसादाला उद्देशून ते लिहिलंय, तो उडवला गेलाय, आणि तो माझा नव्हता. बेटर लक नेक्ष्ट टाइम.

In reply to by इनिगोय

अजुन एक गंमत बघा. धागा काढताना लिहीले ४३,३५० चे डेबिट पडले नंतर लिहीले ८८०००
मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते
:-)

In reply to by प्रसाद१९७१

३००० हजार bsnl 3g recharge चे कापल्या गेलेत्,अजुन recharge पण झाला नाही आणी रक्कम पण मिळाली नाही,ति किरकोळ अस्ल्याने मी लिहिली नाही आधी रक्कम कापल्या गेल्याचा मेसेज आल्याबरोबर बँकेत जाउन card block केले आणी बँक अधीकारी लोकांशी बोललेत paytm वाल्यांशी आधी इमेल आणी नंतर त्यांनी नं दिल्यावर ते लोक बोललेत कि त्या पैशांचे product deliver झाले आहे आणी FIR/Bank statment दिल्याशिवाय ते लोक आम्हाला काही माहीती देणार नाही त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,मग इतका मनस्ताप करुन घेण्यापेक्शा आणी इतर ठीकाणी सांगितलेल्य करणांमुळे बाबा शांत बसुन आहेत्,आम्ही पोलीसांकडे तक्रार करा म्हटल ,पण त्यांची इछ्छा नाहिये ते त्यांनीच कमवलेले अस्ल्याने त्यांना हव तस करण्यचा पुर्ण अधीकार आहे आणी तुम्ही कोण सांगणारे लोकांनी किती पैसे बुडल्यावर शांत बसावे आणी किती किती पैसे बुडल्यावर हातपाय मारावेत(कदाचीत त्यांना जे पैसे मिळ्णारच नाहीत्,त्यांच्या मगे लागुन मनस्ताप करुन घेण्यपेक्शा तितकेच पैसे कसे कमवता येतील हा विचार करणे योग्य वाटत असेल) to each his own right?

In reply to by vrushali n

फक्त एक गोष्ट क्लिअर कराल का?
त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,
म्हणजे त्या अधिकार्‍याच्या पत्नीचे पैसे असेच कार्ड हॅक होऊन गेलेत (त्याला बुडवले म्हटल्यामुळे आमचा गैरसमज झाला) आता एक साधी शंका आहे, जर कार्डहोल्डरनं कार्ड वापरलंच नव्हतं तर चवकशीचा ससेमिरा कसा लागेल? कुणी किती पैसे सोडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, एकदम मान्य! पण कार्ड वापरलं नाही आणि शंभर रुपये जरी डेबिट झाले तरी आम्ही बँकेच्या नाकी नऊ आणतो म्हणून इंटरेस्ट आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तुमच्या स्पष्टीकरणानं आमचं कार्ड प्रोटेक्ट होईल.

In reply to by प्रसाद१९७१

debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxx care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत गंमतच आहे बाइ लोक पुर्ण वाचायचे कष्टही घेत नाहीत

गडबड असेल तर ती paytm वाल्यांची आहे हे नक्की बाकी माझे वडील कधीही पोलिस स्टेशन ची पायरी न चढल्याने कींवा त्यांचा पोलीसांवर विश्वास नसल्याने मी समजु शकते,बाकी वडीलांच् पण बिसनेस करतांना कधीकधी नुकसान झाले असल्याने त्यांनी हे प्रकरण फारसे लावुन धरले नाही,आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू बाकी काही माहीत नसतांना derogatory नाही लिहील तरी चालेल

In reply to by vrushali n

बॅम्क सुरुवातीला नेहमीच हात वर करत असते. पण हॅकिन्ग झालेले असेल तर ती बॅन्केचीसुद्धा जब्बबदारी आहे. बॅन्केच्या अजून वरच्या ऑफिसरला भेटा आणि बॅन्केविरुद्धच तक्रार करा ग्राहक मंचाकडे. मग ते मदत करतील. मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.

In reply to by कवितानागेश

मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.
हजार रुपयेही खूप झाले माऊली ... मी तर एकदा डी मार्ट मधे विकत घेतलेले प्रॉडक्ट हे एक्पायर्ड आहे लक्षात आल्यावर तत्क्षणी परत केले त्याची किम्मत काहीतरी १२३.६० पैसे होत म्हणुन मला तिथल्या सेल्समॅनेजर ने १२३.०० रुपये परत दिले. तेव्हा मी ६० पैशासाठी भांडलो होतो... आपला हक्काची कमाई, कष्टाची कमाई,हलाल कमाई आहे ... मग एक हलाला तरी का सोडा ? *biggrin* बाकी सदर प्रकरणात आपला एकच सल्ला आहे : तुम्हाला जर तुमच्या बाजुने काहीच चुक नाही ह्याची खात्री असेल तर हे प्रकरण लावुन धरा पोलीसात जा , आर बी आय कडे जा ग्राहक मंचा कडे जा, मीडीयात बोंब ठोका... शेवटी न्याय मिळेलच ... कारण सत्यमेव जयते ! ( अनुभवाचे बोल आहेत हे , मागे एकदा मला १३ हजाराला गंडा बसला होता , जेव्हा पोलीसात जाऊन बोंब ठोकली तेव्हा पै न पै परत मिळाली ) )हां , अर्थात तुम्ही जर गच्छम काळ्या पैशाच्या ईस्टेटीची मालकी बाळगुन असाल तर जाऊन द्या , विषय सोडुन द्या न्याय झाला असे समजुन विसरुन जावा .... कारण कर्मणो गहना गति !! *biggrin*

In reply to by vrushali n

तुम्ही चूक करताय व्रुशालीजी ... तुम्हि भगिनी उच्चपदस्थ अथवा सधन असल्याने ८८,०००/- रुपये भरुन देउ वगैरे मुद्दे विसन्गत आहेत. मूळ प्रश्न पैसे कसे व का गेले ? हा आहे. पोलिस/ सायबर क्राइम अथवा पेटीएम वाले /बॅन्क यांच्या भोंगळ कारभार अथवा त्रुटी याबद्दल नक्कीच चर्चा करणे अथवा दाद मागणे आवश्यक आहे.

मानहानिकारक बरोबर आहे काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले

In reply to by vrushali n

> काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले हे वाक्य मी तुमच्या साठी किवा तुमच्या घरच्यान साठी नाही लिहिले ते त्या बँक वाल्या करता होते जो सांगतो कि डेबिट कार्ड ने online purchas केल्यास प्रोब्लेम होतो निव्वळ लबाड पणा आहे हा त्या बँक वाल्याचा