Skip to main content

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 20/08/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 52654
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

In reply to by बाळ सप्रे

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती. शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.

In reply to by धन्या

अंदाज व्यक्त केलेला आहे. हत्या झाल्यावर ज्यांनी गांधींची हत्या केली त्यांनीच दाभोलकरांनी केली असे तारे आपल्या एका मंत्र्यांनी तोडले होते त्याला पारावरच्या गप्पाही म्हणवत नाही

In reply to by मंदार दिलीप जोशी

श्री. मंदार आणि बाळ. आपल्या भावना पोहोचल्या. यात दाभोळकरांना ग्लोरीफाय केलेय म्हणजे नक्की काय केले आहे ते कळाले नाही. तुम्ही या धाग्यावरच्या सगळया प्रतिक्रिया वाचल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय की फक्त धाग्याचे शीर्षक वाचून प्रतिसाद दिला आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by धर्मराजमुटके

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती. शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.

In reply to by मंदार दिलीप जोशी

नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर व्यक्तिमत्व होतं. त्यांना ग्लोरीफाय करायला त्यांच्याएवढ्याच ताकदीचा माणूस पाहिजे. इथे आपण बहुतेक सगळे बोलघेवडे आहोत. (कुणी खरंच कृतीशील कार्यकर्ता असेल तर क्षमस्व).

In reply to by असंका

नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर व्यक्तिमत्व होतं.>> थोडीशी सुधारणा सुचवतो. माझ्या माहितीतल्या अनेकांना हत्या झाली तेव्हा दाभोलकरांची झाली म्हणून काहीही सोयरसुतक नव्हतं. इतर कुठल्याही हत्येनंतर यावी तशीच प्रतिक्रिया होती. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात थोर व्यक्तिमत्व होतं असं म्हणा. आणि मोठं करायला किंवा ग्लोरिफाय करायला फार काही करावं लागत नाही. अहो मिडियाने हर्षद मेहतालाही मोठं केलं होतं. अर्थातच हर्षद मेहता हे शेअर मार्केटच्या क्षेत्रातलं थोर व्यक्तिमत्व होतंच म्हणा :D

In reply to by मंदार दिलीप जोशी

जोशी साहेब, अगदीच चुकीच्या तुलना करु नका. असे केल्याने आपल्या बुद्धीच्या मर्यादा उघड होतात. नरेंद्र दाभोलकर जे काम करत होते ते प्रामाणिक होतं. त्या कामामध्ये दुसर्‍या कुणालाही गोत्यात आणण्याची काही गरज/ इच्छा/ हेतू नव्हते. त्यामुळे असोच्च!

In reply to by प्यारे१

त्या कामामध्ये दुसर्‍या कुणालाही गोत्यात आणण्याची काही गरज/ इच्छा/ हेतू नव्हते.>> तुमच्या बुद्धीच्या मर्यादा हे खरं मानून चालण्यात आहेत. हिंदूधर्म निर्मूलन समिती असं नाव ठवलं नाहीतर तेच करायचं बाकी होतं फक्त.

In reply to by मंदार दिलीप जोशी

हिंदू धर्म असा संपणार नाही त्यामुळं त्याबद्दल काळजी करु नये. ८०% हिंदूंच्या देशात ८०% अंधश्रद्धा असतात वगैरे गणित दाभोलकरांनी मांडलेलं होतं. मी दाभोलकर समर्थक नाही मात्र हर्षद मेहताबरोबर तुलना अगदीच चुकीची होती हे आपण देखील मान्य करायला हरकत नाही. बाकी काही लोकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न नक्की झाला. अर्थात कायदा केल्यानं सगळ्या गोष्टी संपतात वगैरे भोळेपणा आपण कराल असं वाटत नाही. उलट कायदा केल्यानं त्या कायद्याच्या विरोधी गोष्टी करणारांना अधिक फायदा होण्याची शक्यता जास्त वाटते. (सोनोग्राफीचं उदाहरण आहेच) मुळात कायद्याची अम्मलबजावणी बर्‍याचदा होत नसल्यानं तर अजिबातच काळजीचं कारण नाही.

In reply to by मंदार दिलीप जोशी

लोक डॉ. दाभोलकरांबद्दल चांगलं बोलत आहेत तर तुमचा एव्हढा जळफळाट का होत आहे?

In reply to by धन्या

माझा कुठे जळफळाट होतोय? लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा आहे फक्त.

In reply to by मंदार दिलीप जोशी

मग लोक जर एखादया मृत व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या मनातील गरळही ओकू नका. अगदीच लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा असेल तर डॉ. दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती, त्याने समाजाचे कसे नुकसान झाले हे लिहा. नुसते कळफलक बडवून अंदाज व्यक्त करण्यापेक्षा हे करुन दाखवा.

In reply to by धन्या

मग लोक जर एखादया मृत व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या मनातील गरळही ओकू नका.>> कृपया वय्यक्तिक बोलू कहा. तुमचे गटारवजा तोंड बंद करा आधी - असे मी म्हणू शकतो पण म्हणणार नाही ;) अगदीच लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा असेल तर डॉ. दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती, त्याने समाजाचे कसे नुकसान झाले हे लिहा. नुसते कळफलक बडवून अंदाज व्यक्त करण्यापेक्षा हे करुन दाखवा. >> अंदाज व्यक्त करु नको? का म्हणून? मात्र हा सल्ला चांगला आहे. कधीकाळी रिकामटेकडा झालो तर दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती हे नक्की लिहेन.

In reply to by मंदार दिलीप जोशी

कृपया वय्यक्तिक बोलू कहा. तुमचे गटारवजा तोंड बंद करा आधी - असे मी म्हणू शकतो पण म्हणणार नाही
गिरे तो भी टांग उपर. चालू दया तुमचे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

धन्या/मंद्या लढ तु !! *BRAVO*

In reply to by मंदार दिलीप जोशी

औचित्यभंग!!संपादक मंडळावर विसंबून मी आपल्याला खालील उत्तर देऊ इच्छितो-
माझ्या माहितीतल्या अनेकांना हत्या झाली तेव्हा दाभोलकरांची झाली म्हणून काहीही सोयरसुतक नव्हतं.
माझ्या माहितीतल्या अनेकांना तसे ते होते. आम्हाला स्वतःला होते. आणि आपल्या वाक्यावरून असे वाटते, की आपल्या माहितीतीलही काही जणांना या गोष्टीचे सोयरसूतक होते. पण मुळात या वाक्याचे महत्त्व ठरेल ते याने, की आपल्या माहितीत कोण लोक येतात. इथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी, की सहसा आपण आपल्या समविचारी लोकांमध्ये रहाणे प्रीफर करतो. त्यामुळे जेव्हा आपण म्हणता की माझ्या माहितीतील अनेकांना, तेव्हा त्याचा खरा अर्थ हा की आपल्या स्वतःला (-त्याचे काही सोयरसूतक नव्हते). आता हा वैयक्तिक विषय झाला. आपल्या दृष्टीने ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण आमच्यासारखे आपण दु:खी नाहीत.
त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात थोर व्यक्तिमत्व होतं असं म्हणा.
"त्यांच्या क्षेत्रात" हे वेगळे म्हणावे लागत नाही. काही क्षेत्रे सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतात. त्यांचे कार्य अशा स्वरूपाचे होते. आणि आपण मिडीयाचा उल्लेख वर प्रथमच केला आहेत. इतका वेळ तुम्ही इथल्या सदस्यांना सांगत होतात त्यांना ग्लोरीफाय करू नका म्हणून. माझा प्रतिसाद त्या अनुषंगाने होता. रच्याकने , हर्षद मेहेता हा थोर होता असे आपले प्रामाणिक मत आहे का? हर्षद मेहेताचा उद्देश होता की व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या आहेत तोवर स्वतःचा फायदा करून घेणे. त्याच्या जवळ जे गेले ते सर्व पस्तावले.

In reply to by असंका

माझ्या ऑफिसमधे सगळे समविचारी नाहीत. तिथे तर कुणाला काहीच पडलेली नव्हती. "काय चाल्लंय पुण्यात कठीणे" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. म्हणजे गटारात पडून एखादा सायकलस्वार मेल्यावर जशी प्रतिक्रिया येईल तशीच. रच्याकने , हर्षद मेहेता हा थोर होता असे आपले प्रामाणिक मत आहे का?>> त्याच्या क्षेत्रात थोर. दाभोलकर कसे त्यांच्या कंपूत थोर होते. तसाच.

In reply to by मंदार दिलीप जोशी

आपल्या ऑफीसमध्ये सगळे समविचारी नाहीत हे ऐकून वाईट वाटले. अशा संस्था , आणि नैसर्गिक रीत्या तिथे काम करणारे लोक नावारूपाला येणे जरा अवघड असते. सहसा लोक आपल्यासंबंधीच्या अशा गोष्टींना अपमानास्पद मानून चारचौघात सांगणे टाळतात, म्हणजे तार्कीक दृष्ट्या वागणारे. दाभोळकरांच्या संघटन कौशल्याला आपण कंपूबाजी म्हणत आहात? गटारीत पडून सायकलस्वार मेला असे आपण कधी स्वत: पाहिले आहे का? हे तर्कसंगत वाटत नाही! आपल्याला तर्कसंगत न वागता केवळ चिखलफेक करायची आहे का? श्रद्धांजलीच्या धाग्यावर येऊन हे सगळे बोलणे हे आपल्या दृष्टीने योग्य आहे का?

In reply to by असंका

आपल्या ऑफीसमध्ये सगळे समविचारी नाहीत हे ऐकून वाईट वाटले. अशा संस्था , आणि नैसर्गिक रीत्या तिथे काम करणारे लोक नावारूपाला येणे जरा अवघड असते. >> काय पण समज आहे हो तुम्हाला. भन्नाटच. काम करणार्‍यांकडे कामाच्याबाबतीत लागणारी हुशारी आणि टीमवर्क, तसेच कंपनीच्या भल्याचा विचार असणे असणे महत्वाचे असते. तुमच्या माहितीसाठी...आमचे ऑफिस दिवसागणिक प्रगती करत असून अस्मादिकांना नुकतीच पदोन्नती मिळालेली आहे. तेव्हा काळजी नसावी. सहसा लोक आपल्यासंबंधीच्या अशा गोष्टींना अपमानास्पद मानून चारचौघात सांगणे टाळतात, म्हणजे तार्कीक दृष्ट्या वागणारे.>> वरची कमेंट वाचा. तुमची वैचारिक दिवाळखोरी समजेल. दाभोळकरांच्या संघटन कौशल्याला आपण कंपूबाजी म्हणत आहात? >> हो. गटारीत पडून सायकलस्वार मेला असे आपण कधी स्वत: पाहिले आहे का? हे तर्कसंगत वाटत नाही! >> पेपर वाचत चला. याहून अतार्किक पण सत्य बातम्या असतात. नुसता संध्यानंद वाचत असणार तुम्ही. आपल्याला तर्कसंगत न वागता केवळ चिखलफेक करायची आहे का?>> चिखलफेक आणि सत्यकथन यातला फरक सम्जून घ्या. मी सत्य बोलत आहे. सांगितलेना, श्रद्धांजलीच्या धाग्यावर येऊन हे सगळे बोलणे हे आपल्या दृष्टीने योग्य आहे का?>> योग्य-अयोग्यचा प्रश्नच नाही इथे. सत्य कथन करणे हे महत्वाचे आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

वैचारीक दिवाळखोरी हा आपला माझ्यावरचा वैयक्तिक हल्ला होता. मीही अनवधानाने वैयक्तिक बोललो होतो. त्याबद्दल माफी मागून एवढीच विनंती करतो, की कृपया माझे जे चुकेल ते तसेच दाखवा, जशास तसे करत बसलो, तर सगळेच आंधळे होऊ. पदोन्न्ती बद्द्ल हार्दिक अभिनंदन. दाभोळकरांच्या संघटनेचा संघर्ष हा विशेष भाग होता. त्यांचे कामच प्रस्थापित विचाराविरूद्ध निर्भिडपणे जाऊ शकणार्‍यांना एकत्र आणायचे असे होते. त्यांनी असे लोक एकत्र आणले. त्यांना बळ दिले. धाडस दिले. साधा मनातल्या मनात विचार करून बघा, दाभोळकर म्हणून तर जाऊच दे, एक कार्यकर्ता होणं पण किती अवघड आहे. आणि असे अगणित लोक, त्यांनी बांधले. कंपू म्हणालात म्ह्णून त्यांची किंमत कमी नाही होत.

In reply to by मंदार दिलीप जोशी

मी ही दिलगीरी व्यक्त करतो. शब्दाला शब्द वाढत गेला. माझंही म्हणणं एव्हढंच होतं की मृत व्यक्तीच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक चर्चा नको. डॉ. दाभोलकरांचे विचार सार्‍यांनाच पटतील किंवा पटायला हवेत असं काही नाही. मात्र ती चर्चा वेगळ्या धाग्यावर करता येऊ शकते.

In reply to by मंदार दिलीप जोशी

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती. शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.
१०८ % सहमत!!!! दाभोळकरांची हत्या ही नक्कीच त्यांच्या कार्यामुळे घडलेली नाही. "अंनिस" मधल्या आर्थिक भानगडी आणि "एका" प्रॉपर्टीचे वाद त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेले आहेत!!! काही राजकीय व्यक्तींचा देखील यात हात असू शकतो. तसेच त्यांचा खुनी सापडू नये.. व "मूळ" कर्त्या'चे नाव समोर येऊ नये.. म्हणून सर्वांचीच धडपड चालू आहे. अर्थात या हत्येचा फायदा मात्र 'अ‍ॅक्ट' पास होण्यासाठी मात्र पुरेपूर करवून घेता आला. खर्‍या खुन्याविषयी अज्ञान असणार्‍या आणि दाभोळकरांवर श्रद्धा असणार्‍या लोकांनी बोम्बा मारू नये म्हणून लगेच "पद्मश्री" पण बहाल केला गेला. पण याचा अर्थ दाभोळकरांना "शहीद" किंवा "महात्मा" अश्या पदव्या देण्याची गरज आहे, असे वाटत नाही. काही वर्षांपूर्वी हिन्दु- धर्माच्या नावाने आणि परंपरांच्या नावाने खडे फोडणार्‍या दाभोळकरांना मात्र शेवटी हिन्दु धर्मानुसार "अग्नी" देण्यात आला. रूढी-परम्परांविषयी प्रचन्ड चीड असणार्‍या दाभोळकरांना अंनिस'वाल्यांनी आणि कुटुम्बियांनी शेवटी अग्नि देण्यापेक्षा पारशी धर्मानुसार एखाद्या विहिरीत टाकून किमान भूतदया तरी दाखवायला हवी होती... किंवा रूढीविरुद्ध मुलाचे नाव "हमीद" ठेवून आपल्या पाखंडी'पणाचे गोडवे लोकांना गायला लावणार्या दाभोलकरांना "हमीद"ने एखाद्या कबरीत तरी दफन करायला हवे होते. कदाचित दाभोळकरांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणार्‍यांना हे खूप आततायी वाटू शकतं. पण या फक्त "होऊ शकलं असतं" अश्या शक्यता वर्तवल्या आहेत!!!

In reply to by धन्या

जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे. ग्रेट. Smile
हाहाहा हं .. हं.. .. धन्या.. असं तुम्हाला वाटतंय.. पण तसं नाहीये... "खरा खुनी" कोण आहे... हे पोलिस आणि सीबीआय या खात्यांपैकी काही जणांना माहित आहे. परन्तु दुर्दैवाने ते ओपन करण्याची मुभा त्यांना नाही. "प्लॅन्चेट" या प्रकाराबद्दल पॉझिटीव्हली बोलल्यावर डॉ. विजय भटकरांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली गेली.. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नन्तर आपले शब्द फिरवावे लागले. तीच गोष्ट "मृत्यूनन्तरचा प्रवास" यावर पी.एच डी. केलेल्या पुण्यातील वक्त्या- "मेधा खाजगीवाले" यांची. हं हं... शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की!!!! :)

In reply to by मृगनयनी

शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की!!!!
जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात लोक कळत नाही. जीव जातो म्हणजे आत्मा फक्त शरीराचा त्याग करतो असंच म्हटलंय ना धर्मशास्त्रांमध्ये? एव्हढं कशाला घाबरतात लोक मग? ते आत्मा, मृत्यूनंतरचे जग वगैरे व्याख्याने देण्यापुरतंच असतं असं दिसतंय. :)

In reply to by धन्या

जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात लोक कळत नाही. जीव जातो म्हणजे आत्मा फक्त शरीराचा त्याग करतो असंच म्हटलंय ना धर्मशास्त्रांमध्ये? एव्हढं कशाला घाबरतात लोक मग? ते आत्मा, मृत्यूनंतरचे जग वगैरे व्याख्याने देण्यापुरतंच असतं असं दिसतंय.
धन्या.. हा धड जोक'ही नाहीये.. किंवा कुठला "सटायर" मारलाये.. असंही वाटत नाहीये.. किंवा नॉर्मल पटण्याजोगं स्टेटमेन्टही नाहीये... असो.. :)

In reply to by मृगनयनी

ते उपहासात्मक वाक्य होतं. एका बाजूला "आत्मा नष्ट होत नाही" हे वाक्य आणि दुसर्‍या बाजूला "शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की" हे वाक्य, केव्हढा विरोधाभास आहे हा.

In reply to by धन्या

ते उपहासात्मक वाक्य होतं. एका बाजूला "आत्मा नष्ट होत नाही" हे वाक्य आणि दुसर्‍या बाजूला "शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की" हे वाक्य, केव्हढा विरोधाभास आहे हा.
:) आत्मा जेव्हा शरीरात असतो.. तेव्हा तो "जीव" असतो. त्याच्यामुळे शरीर "स-जीव" बनते. नॉर्मल केसेस'मध्ये जेव्हा वृद्धपणी आत्म्याला त्याने धारण केलेले शरीर आता सोडून जायची वेळ आली आहे.. याची जाणीव होते.. तेव्हा हळूहळू त्यास विरक्ती येऊ लागते.. व स्व-शरीराबाबतची आसक्ती कमी होऊ लागते. जेव्हा मृत्यू येतो.. तेव्हा "आत्मा" शरीर सोडून जातो. व त्याने धारण केलेले शरीर "नि-र्जीव" बनते. जेव्हा हा "जीव" उर्फ "आत्मा" जेव्हा शरीरात असतो..तेव्हा चुकीच्या वेळेस शरीर सोडून जाण्याची त्याची इच्छा नसते. पण काही कारणास्तव "त्या" आत्म्याने धारण केलेल्या शरीराद्वारे केलेल्या कृत्यामुळे दुसर्‍या कुणाची तरी इच्छा ही "त्या" आत्म्याचे शरीर नष्ट करण्याची असेल.. तेव्हा त्या आत्म्यास त्याचे स्व-शरीर नष्ट होईल.. असे भय वाटते...व त्यासाठी- म्हणजे आत्म्याने ईश्वरी संकेतानुसार धारण केलेल्या आपल्या शरीर-माध्यमातून आत्मा आपले शरीर वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पर्यायाने त्या "आत्म्याला" त्या "शरीरात" अजून काही दिवस / महिने / वर्षे राहण्याची इच्छा असते. आणि असे प्रयत्न तो जेव्हा करतो.. तेव्हा त्यास "जीव वाचवणे" असे म्हणतात. नॉर्मली शरीराच्या आत असलेल्या आत्म्याला "जीव" किंवा "प्राण" असे म्हणतात. आणि आत्म्याला कोणतेही कार्य करण्यासाठी एका माध्यमाची- शरीराची आवश्यकता असते. आणि धारण केलेल्या शरीरावर आत्म्याचे बायडिफॉल्ट प्रेमही असते. पण शरीर जर्जर झाल्यावर किंवा काही कारणास्तव छिन्न-विछिन्न झाल्यावर आत्मा त्यात राहू शकत नाही. आत्मा अमरच असतो.. शाश्वतच असतो.... तो फक्त धारण करतो- ती शरीरे नश्वर असतात. आणि आत्म्याने पुन्हा नवीन शरीर धारण करण्याच्या क्रियेला "पुन्हा जन्म घेणे " असे म्हणतात.

In reply to by मृगनयनी

पुस्तकाचे नाव "आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन" असे आहे आणि ते इथे मिळू शकते.

In reply to by बबन ताम्बे

आपण नक्की फुले, शाहु, आगरकरांच्या महाराष्ट्रात रहातोय का?
आगरकर नाही हो ...आंबेडकर !!

हसावे की रडावे कळत नाही! ज्या माणसाच्या पाठीशी उभे रहायला पाहिजे त्याच्या प्रथम स्मृतीदिनी त्याच्याच विषयी इतके गरळ? खरेच काही माहित आहे का दाभोळकरांबाबत किंवा त्यांच्या कामाबद्द्ल? काहीही बोलायचे का? आणि भलामण कोणाची? तर त्या बुआबाजी करणार्‍या बाबा/बुवा/बापू यांची? उद्वेग आलाय अगदी!! :(

In reply to by मनिष

एक लक्षात घ्या : दाभोळकर कधीच जगन्मान्य वक्तिमत्व नव्हते , ते , त्यांची मते , त्यांची संस्था कायमच वादग्रस्त होते . दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन ते ग्लोरीफाय झाले हे विवादस्पद का होईना पण सत्य आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन ते ग्लोरीफाय झाले हे विवादस्पद का होईना पण सत्य आहे .
हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न पटणार्‍यांनी लावलेला आहे. माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना हे माहिती आहे की डॉ. दाभोलकर हे एक अतिशय साधे आणि समाजाच्या भल्याची कळकळ असनारे व्यक्तिमत्व होते.

In reply to by धन्या

हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न पटणार्‍यांनी लावलेला आहे.
ह्यावरुनच कळते की दाभोळकरांची मते न पटणारा एक मोठ्ठा वर्ग अस्तित्वात होता / आहे ! मी वरच म्हणालो की दाभोळकर हे कधीच जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते ! . क्यु.ई.डी खुन झाल्यामुळेच अंनिस वाल्यांना टी आर पी मिळालाय ... नॅचरल डेथ मधे आत्ता पर्यंत विसरुनही गेले असते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

मी वरच म्हणालो की दाभोळकर हे कधीच जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते !
मान्य आहे की ते जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते. मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय वाटेल ते बरळणे कितपत योग्य आहे?

In reply to by धन्या

मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय वाटेल ते बरळणे कितपत योग्य आहे?
हे मात्र मान्य ! अगदी १००% सहमत ! मरणान्तिनि वैराणि !मतभेद जिथल्या तिथे ! दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा अन कोणताही पुरावा नसताना त्याचे खापर हिंदुत्वावादी संस्थांच्या माथ्यावर फोडणार्यांचा ह्या इथे जाहीर निषेध करुन मी माझे चार शब्द संपवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा अन कोणताही पुरावा नसताना त्याचे खापर हिंदुत्वावादी संस्थांच्या माथ्यावर फोडणार्यांचा ह्या इथे जाहीर निषेध करुन मी माझे चार शब्द संपवतो !>> मान्य. मीही हेच बोलून थांबतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

कदाचित आपण म्हणता ते सत्यही असेल. पण आपण एक सांगा की श्रद्धांजलीच्या धाग्यावर बोलायला TRP वगैरे गोष्टी योग्य आहेत का? आपण एक वेगळा धागा का काढत नाही?

दाभोळकरांच्या मतांविषयी अनेक मते असू शकतात. परंतु ते प्रामाणिक व स्वच्छ चारित्र्याचे होते याविषयी दुमत नाही. त्यांची हत्या झाली हे अत्यंत दुर्दैव आहे. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचा खून सनातन किंवा जातपंचायतवाल्यांनी नक्कीच केला नसावा. सुपारी किलर पाठविणारे हे सामान्यतः पुढारी, माफिया गुंड, लॅण्ड माफिया इ. पैकी असतात. सनातन किंवा जातपंचायतवाल्यांकडे असे शार्प शूटर असण्याची शक्यता कमी आहे. साधना साप्ताहिकाच्या शनिवार व सदाशिव पेठेत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रॉपर्ट्या हे एक कारण असावे. पुण्यात तसे लॅण्डमाफिया पुष्कळ आहेत. किंवा २०१४ मधील निवडणुकांवर डोळा ठेवून भाजप/संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्यासाठी तसेच सनातनवर बंदी आणण्यासाठी सत्ताधार्‍यांपैकीच कोणीतरी यामागचा मास्टरमाईंड असावा. सुरवातीला संशयाची सुई सनातनवर नेण्यात त्यांना यश मिळाले होते. परंतु सनातनविरूद्ध कणभरही पुरावा सापडलेला दिसत नाही. पोलिसांना व सत्ताधार्‍यांना खुनी व मास्टरमाईंड नक्की माहित असावा व सत्ताधार्‍यांच्या पाठबळामुळेच इतके दिवस खुनी सापडत नसावेत.

In reply to by कवितानागेश

>>> सरकार बदललं की मारेकरी सापडतील. अशीच आशा करू या. पण काय आहे, की सर्व पक्षातल्या नेत्यांचं एकमेकांबरोबर साटंलोटं असतं, त्यामुळे मारेकरी सापडतीलच अशी पूर्ण खात्री वाटत नाही. सरकार बदलले तरी नवीन सत्ताधारी पक्ष मारेकर्‍यांना न पकडण्याच्या बदल्यात आधीच्या सत्ताधार्‍यांकडून काहीतरी किंमत वसूल करेल आणि बाकी जनता दरवर्षी २० ऑगस्टला अजूनपर्यंत मारेकरी न सापडल्याचा निषेध करत राहील.

दाभोळकरांची मते न पटणारे लोक आहेत.. त्यांची मते अत्यंत तीव्र सुद्धा असतील.. पण ती मांडण्यासाठी हाच धागा का निवडला असावा? श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय लिहावे ह्याचे भान ठेवले असते तर बरे झाले असते. शिवाय नुसतीच ब्लॅंकेट विधानं करण्यापेक्षा नक्की काय पटलं नाही हे "एखाद्या वेगळ्या लेखात" लिहीलं असतं तर हीच चर्चा तिथे करता आली असती.. धर्म, आत्मा न मृत्यु असल्या गप्पा मारायच्या आधी साधे काही मॅनर्स लक्षात ठेवले असते तर.. असो.. दाभोलकरांना विनम्र श्रद्धांजली..