Skip to main content

(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 31/07/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत. नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात. पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !! त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले तर झाले असे प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो. करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ? मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :) तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच वाचायला आवडेल

वाचने 33752
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

आता मात्र भुते इथून पळ काढणार दुसऱ्या धाग्यावर .मला वाटलं ४४० वेळा घुंगरुं वाजवणार खविस (भुताचा एक प्रकार .अंगावर मोठे केस असतात ,हातातली घुंगरूवाली काठी आपटत जातो ,जाण्यायेण्याच्या वाटेत झोपल्यास उठवतो .बाकी त्रास देत नाही ).

In reply to by धन्या

काहीका असेना पण एकदा जस्ट फॉर द सेक ऑफ डॉक्युमेन्टेशन , ही लिस्ट काढलीच पाहिजे ! आपल्या पुर्वजांची कल्पना शक्ती किती भन्नाट होती ते पाहु !! बाकी माझी आवडती २ भुते - वेताळ आणि चेटुक ह्यापैकी वेताळ म्हणजे झाँबी सेम टु सेम लूक्स , आणि चेटुक म्हणजे हॅरीपॉटर मधील डॉबी सेम ! बाकी मी लोकांना सांगुन थकलो की हे दोघे मला वश आहेत पण लोक विष्वासच ठेवायला यतार नाहीत , आता अशा सगळ्या अविश्वासु माणसांवरच एकेक करुन सोदावे म्हणतो ह्यांना ! *biggrin*

१)कोणाची काही इच्छा बाकी राहिल्यावर ती पुरी करण्यासाठी प्रासंगिक करार भुते होतात .मृत्यूच्या जागी कधीकधी इतरांना दिसतात असे म्हणतात .पण त्यांच्या असण्यामुळे युअरोपात काही वाडे (कासल) आणि राजस्थानातले एक गाव ओस पडले आहे .दिसण्यापलीकडे त्रास नसतो . इतर प्रकार : २)मुंजा . ३)ब्रह्मराक्षस . ४)खवीस . ५)हडळ ६)डाकिण . ७)जखिण . ८)पिराचे भूत ९)वेताळ . हे सर्व ऐकिव प्रकार आहेत आणि असणे आणि मानणे यात नेहमीच शंका निघतात .परंतू वास्तुशास्त्राच्या झटक्याने घरे विकली जात नाहीत तसेच या भुतांच्या झटक्याचे आहे .जनप्रवादापुढे हार मानावी लागते हे मात्र खरे आहे . धनु लग्न ,धनु राशींच्या लोकांस कधीकधी भूत दिसू शकते पण यांना त्रास देत नाही असे म्हणतात . संतमंडळी . पिराच्या जागा रानात कुठे असल्यास आजुबाजूस करंगळी वर करायला जाऊ नये . भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे .असो . उगाचच बाऊ नको .हलकेच घ्या .:-)

In reply to by कंजूस

पिराची जागा असलेले रान कसे ओळखावे? मी लहानपणी ज्या रानात गुरे वळायचो, त्या रानात बहूतेक पिराची जागा नसावी. नाही तर वर केलेली करंगळीच काय उरलेली बोटेही देव आणि धर्म यावर वाद घालायला उरली नसती.

In reply to by कंजूस

भूतांचे आणखी काही प्रकार (विशेषतः सिंधुदुर्गातले)
  • देवचार
  • चकवा
  • राष्ट्रोळी
  • आग्यावेताळ (वेताळाचा उपप्रकार)

In reply to by सूड

@दुदु नागोबा पिऊन गेला असेल आणि अगोबासाठी शिल्लक राह्यलं नसेल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> =)) यमकात मारले..की मारण्यात यमक आले!? *blum3*

In reply to by कंजूस

>>भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे . म्हणजे स्पावड्याला आता देव दिसणार? *shok*

भूतावळीच्या मागोव्यावर सोनेरी हाडं आणि म्हातारा झोंबी कुणा म्हणावे जारण-मारण-८ फेर्‍यात अडकलेला.... भूतबाधा- एक गंडवणे महाराष्ट्रातील भूतांबद्दल माहिती हवी मी केलेली काही प्लॅन्चेट- मधुबाला ......

हाकामारी म्हणून एक प्रकार असतो. हाकामारी गोड व प्रेमळ आवाजात एखाद्याला ३ वेळा हाक मारते. त्याला भुलून जर कोणी त्या हाकेला ओ दिली तर झालं मग त्याचं कल्याण. कोणाला आहे का अनुभव हाकामारीचा??

In reply to by अधिराज

मला पुषकळ्वेळा आलाय. माझ्या बर्‍याच मित्रमैत्रिणींना पण आलाय. अर्धवट झोपेत असताना अशा हाका ऐकू येतात.

कोणाला आहे का अनुभव हाकामारीचा??
प्रत्येक विवाहीत पुरूषाला असेल हा अनुभव. (पळा.......)

In reply to by बॅटमॅन

ह्यावरुन , भारतभ्रमणाच्या वेळेस , रामदास स्वामी नक्कीच साऊथ इंडीयात फिरुन आले नसणार असे एक अनुमान काढत आहे *biggrin*

लग्नाच्या वेळी चकवा असतो .एक चांगलं भूत मागून हाका मारतं "सावधान ,सावधान !"पण गडी आपला फुडंच धावतो .ही आयुष्यात एकच बरोबर वेळ येते मागे वळून मागेच धावण्याची .मग बसतो टैब बडवत नाही चुकलो कप्पाळ बडवत . बाकी स्पा भूत दिसल्यानंतर येते सिध्दी .तिथे फुरंगटून बसला नाहीस तर दिसतो देव .

हा एक किस्सा मित्र कसार्याला राहणारा , एके रात्री अचानक त्याचे जवळचे नातेवाईक अपघातात दगावल्याने त्याला नाशिक ला जावे लागले. कसारा घाटातून जाताना ,त्याला काहीतरी साईड मिरर मध्ये हलताना दिसले, त्याने निट पहिले तर एक मळकट कपडे घातलेली व्यक्ती डोकं वेंगावत जवळ जवळ गाडीच्या स्पीड ला (साधारण ६० च्या) धावत येत होती, थोडा वेळाने तो म्हातारा अगदी त्याच्या बाजूला आला , ह्याने गाडी तशी दामटवली ... बराच वेळ तो म्हातारा त्याला दिसत होता , आणि नंतर गायब झाला :)

आमचे एक गुरुजी कसारा -इगतपुरी भागातले .त्यांच्याकडे भुतांच्या छान छान ! गोष्टींची पोतडी होती स्पा.त्या सांगण्यावरून एक मजेदार किस्सा झालेला पाचवीत असतांना .सांगेन कधीतरी .कसारा घाटात बरेच अपघात होऊन त्यातली काहींची भुते वाट पाहत असतात आपली वळणावळणावर .त्यांना काहीतरी सांगायचं असतं पण ऐकून कोण घेतोय ? मी जेव्हा गडावरच्या गुहेतून सकाळी खाली गावात येतो तेव्हा गाववाले मला वरपासून खाली पाहतात पाय उलटे वगैरे नाहीत ना ?