Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on गुरुवार, 07/31/2014 - 14:19
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत. नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात. पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !! त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले तर झाले असे प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो. करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ? मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :) तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
  • 33689 views

प्रतिक्रिया

Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 14:22

Permalink

वर्णपट भूताने गायब केले काय?

वर्णपट भूताने गायब केले काय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 14:25

Permalink

तुमच्या या अनुभवावरुन माझी

तुमच्या या अनुभवावरुन माझी खात्री पटली आहे की जगात भूते आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 14:27

Permalink

स्पावड्या म्हणतोय तर भुते

स्पावड्या म्हणतोय तर भुते असणारच. स्पावड्या इथे तर जमतील भुते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 14:33

In reply to स्पावड्या म्हणतोय तर भुते by बॅटमॅन

Permalink

स्पावड्या इथे तर जमतील भुते.

स्पावड्या इथे तर जमतील भुते.
त्या म्हातारीचं जाऊदया. स्पावडयालाच कुणी एकटयाने रात्रीच्या निरव शांततेत पाहीला तर तो भूत भूत म्हणत ओरडत सुटेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/31/2014 - 14:34

In reply to स्पावड्या इथे तर जमतील भुते. by धन्या

Permalink

:D

:D
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 14:37

In reply to स्पावड्या इथे तर जमतील भुते. by धन्या

Permalink

निरवच कशाला, सरव शांतता असली

निरवच कशाला, सरव शांतता असली तरीही हेच म्हणू हाकानाका ;) पायजे तर फॉर अ चेञ्ज वर्तमानही म्हणू ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/31/2014 - 14:33

Permalink

?

?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 14:36

In reply to ? by मुक्त विहारि

Permalink

मुविकाका, इतक्या प्रामाणिक

मुविकाका, इतक्या प्रामाणिक अनुभव कथनांवर आपल्यासारख्या जेष्ठ सदस्याने प्रश्नचिन्ह उभे करावे ही खचितच चांगली गोष्ट नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 14:38

In reply to मुविकाका, इतक्या प्रामाणिक by धन्या

Permalink

+१

नैतर काय! एक मिपाकर म्हणून शरम इ.इ. वाटल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/31/2014 - 14:41

In reply to +१ by बॅटमॅन

Permalink

+७८६

अगदी अगदी , नास्तिक कुठचे :D
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 14:45

In reply to +७८६ by स्पा

Permalink

+७८६

नास्तिक कुठचे? अर्थात मध्यवर्ती ठिकाणाकडचे. :D (च्यायला स्मायल्या लौकर सुरू करा राव.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 14:55

In reply to +७८६ by स्पा

Permalink

मी लहानपणी जे काही भूतांबद्दल

मी लहानपणी जे काही भूतांबद्दल ऐकले आहे त्यावरुन भूते नास्तिकांना सुद्धा झपाटत असावेत असे मला वाटते. शहरातून आमच्या गावाला जाणारा रस्ता एका वापरात नसलेल्या एका विहीरीच्या बाजूने जातो. या रस्त्यावर विहिरीला चिकटून एक ओढा जातो. पावसाळ्यात जरा पाऊस जास्त झाला की आमच्या काळ नदीला पूर येतो आणि मग हा रस्ता बंद होतो. एकदा पूरात एक प्रेत वाहत आले आणि ते विहिरीला अडकून तिथेच राहीले. गावकरी म्हणतात की त्या विहीरीत आधी जीव दिलेल्या दोन बायांनीच त्या व्यक्तीचा जीव घेतला. खरं खोटं माहिती नाही. मात्र अंधार पडल्यानंतर मी अगदी मोटारसायकलवर असलो तरीही राम राम राम राम म्हणत मोटारसायकल जोरात पळवतो. मोटारसायकल आता इथे बंद पडली तर काय करायचे या भीतीने ती दोन तीन मिनिटे जीव घाबरा होतो. एरव्ही सगळीकडे "देव नाही" असं बेंबीच्या देठापासून बोंबलत फीरणारा मी त्या विहीरीच्या बाजूने जाताना मात्र राम नामाचा जप करतो. राम असेल नसेल, "रामाचे नांव घेतले की भूते दूर पळतात" ही लहानपणाची शिकवण खुप आधार देते तेव्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/31/2014 - 15:00

In reply to मी लहानपणी जे काही भूतांबद्दल by धन्या

Permalink

अजूनही दिवा आणि ठाणे यामधला

अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/31/2014 - 15:04

In reply to अजूनही दिवा आणि ठाणे यामधला by स्पा

Permalink

'मंदा पाटणकरचे हात' आठौली.

'मंदा पाटणकरचे हात' आठौली.
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Sat, 08/02/2014 - 00:23

In reply to 'मंदा पाटणकरचे हात' आठौली. by प्रचेतस

Permalink

मंदाने घाबरवले

खरोखरचं मंदा पाटणकर प्रकरणाने घाबरवलेच होते. आता त्याहून भयंकर प्रकार होतात पण मन कोडगे झाल्याने त्याचे काहीच वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सतीश कुडतरकर on Tue, 06/09/2015 - 17:48

In reply to अजूनही दिवा आणि ठाणे यामधला by स्पा

Permalink

अजूनही दिवा आणि ठाणे यामधला

अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात>>>>>>> त्यासाठी नाही. वर मुब्रादेवीच देऊळ आहे म्हणून ओरडत असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 07/31/2014 - 15:05

In reply to ? by मुक्त विहारि

Permalink

प्रश्नचिन्ह उभं करायचा अधिकार

प्रश्नचिन्ह उभं करायचा अधिकार काय तुम्हाला?? कधी अनुभव घेतलाय का अमावस्येच्या रात्री करी रोडच्या रस्त्यावर?? उगाच घेतला कळंफलक लागले बडवायला!!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/31/2014 - 14:42

Permalink

अरे देवा !!

अरे देवा !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 14:45

Permalink

अरे भुता!

अरे भुता!
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 07/31/2014 - 14:47

Permalink

कंपूबाजांनी कंपूबाजांकरीता

कंपूबाजांनी कंपूबाजांकरीता काढलेला धागा. ;) (पळा...नाहीतर भुतं मागे लागतील)
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 07/31/2014 - 14:54

Permalink

नववारी नेसलेली म्हातारी बाई

नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती काय पण स्साला नशीब आहे.. अंधेरी रातोमें, सुनसान सडकोपर आणी म्हातारी बाई? चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/31/2014 - 14:57

In reply to नववारी नेसलेली म्हातारी बाई by यसवायजी

Permalink

>>चिकनी हडळ असती तर मजा केली

>>चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :)) चिकनी हडळ? लॉल्स !!
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on गुरुवार, 07/31/2014 - 15:04

In reply to नववारी नेसलेली म्हातारी बाई by यसवायजी

Permalink

मस्त विषय दिलात.

नेहमी भुतिण म्हणुन एखादी नउवार नेसलेलीच बाई का दिसते? आय मीन एखादी मिनी स्कर्ट घातलेली, शॉर्ट घातलेली अथवा बिकिनीवाली नवयौवना का दिसत नाही? तेच भुतबाबा बाबद. नेहमीच पांढरी आकृती, अरे बर्मुडा वाला किंवा स्युट वाला भुत का दिसत नाही कोणाला? पाहायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 07/31/2014 - 15:58

In reply to मस्त विषय दिलात. by केदार-मिसळपाव

Permalink

पुणे-मुंबैपण 'सेफ' राहिलं

पुणे-मुंबैपण 'सेफ' राहिलं नाही आजकाल. असले स्कर्ट वगैरे घालून हडळी फिरायला लागल्या तर, इथल्या 'पाशवी शक्ती' जीव नकोसा करुन सोडतील की त्यांचा. त्या घाबरतात ह्या भुत्यांना.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 15:00

Permalink

यावरुन आमच्या आवडत्या गायक

यावरुन आमच्या आवडत्या गायक बंधूंचे एक गाणे आठवले:
सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी नदीकाठाची गरम वाळू, भूत खुशाल लागलं खेळू किंचाळी फोडली, तिथंच पडली, खबर दिलिया शीतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी
पांडया वाचलास रे बाबा. त्या म्हातारीने तुला करीरोडच्या पुलावर उताणी पाडलं असतं तर रे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 07/31/2014 - 15:03

Permalink

म्हातारी भुताने वेळेवरतीच

म्हातारी भुताने वेळेवरतीच निभावले म्हणतो मी .तरण्या भुताने शेवटची ट्रेन विचारली असती तर काय झाले असते अशी 'कल्पना' सुध्दा करवत नाही .आणि स्टेशनच्या पाट्यांवर छोकरी रोड कसे काय येते ?रात्री असे प्रसंग कुण्या एकट्या तरुणावर येवू नयेत अशी 'आशा' करूया सर्व आस्तिक आणि नास्तिकजनहो .स्पावर तरी नकोच नको .बिचाऱ्याचे चित्त विचलित व्हायचे (टैबमधून हो)एखाद्या रात्री . तसं आम्ही आख्खं रेल्वेटाईमटेबल सांगायच्या तयारीत आहोत कुणी तरूण भूतीणीने रात्री माटुंग्याच्या झेड ब्रिजवर गाठून विचारलं तर .आणि नंतर मागेवळूनही सांगू उद्या वेस्टन झोनचं शिकवेन .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/31/2014 - 15:06

Permalink

रायगडावर रात्री १२ च्या पुढे

रायगडावर रात्री १२ च्या पुढे फिरताना आमचे एक मित्र ' ए मला मध्ये येऊ द्या रे, बाजूने जाताना भीती वाटते' असे भेदरलेल्या चेहर्‍याने आम्हास म्हणत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 07/31/2014 - 15:59

In reply to रायगडावर रात्री १२ च्या पुढे by प्रचेतस

Permalink

अशा वेळेसच नविन मित्र भेटतात.

अशा वेळेसच नविन मित्र भेटतात. कम्पू वाढतो. :) पण, १२च्या आधीदेखिल असे मित्र जवळपास येउ शकतात. फक्त आपल्या या अश्या १२वाजलेल्या अन्धश्रद्धांमुळे आपण त्यांना ओळखत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 16:08

In reply to रायगडावर रात्री १२ च्या पुढे by प्रचेतस

Permalink

लोक काय काय लक्षात ठेवतात

लोक काय काय लक्षात ठेवतात ब्वा! =)) (खरी वाटली ना अ‍ॅक्टींग? ;) ) बाकी हल्ली त्या राणीवशातून येऊ शकणार्‍या भुतांपेक्षा 'ह्या' माणसांचीच भीती जास्त वाटायला लागलीय.
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on गुरुवार, 07/31/2014 - 15:32

Permalink

येकदा बघा असं झालं, रातीचं

येकदा बघा असं झालं, रातीचं दिड वाजलं व्हतं. धोंडूबाबांचं किरतान व्हतं लांब मित्राच्या वस्तीवर ते आयकून आमच्या वस्तीवर परत येत हुतो सायकल दामटत दामटत, अशी मस्त हवा सुटल्याली व्हती, लय रोमन्टेक वाटत व्हतं. म्या बी तोंडानं एक झ्याक गाणं गुणगुणत चाललो व्हतो. थोडा रस्ता कापल्यावर पुढं आलो, तर काय बघतो. एक तरणी पोरगी सायकलच्या दिशेनं बघून हात करत होती, थांबण्यासाठी. आजपत्तूर कुठल्या पोरीनं माझ्याकडं ढुकुन्बी बघितलं नव्हतं आन हि चक्क मला लिफ्ट मागत व्हती! म्या लय म्हणजे लय खुश झालो. तिच्यापर्यंत लवकर पोचण्यासाठी सायकलचा वेग वाढवला. पन बाबौ, जसजसा तिच्याजवळ जायला लागलो तसतशी हवा लईच गार वाटाया लागली आन तिचं रूप बी येगळचं दिसाया लागलं. तिचं तोंड पांढरं फटक दिसत व्हतं, आन हे लांब सुळ्यागत दात भायेर आलेलं. डोळ्यातून हिरवा लाईट येत होता. तेवढ्यात तिच्या पायाकडं लक्ष गेलं तर त्ये बी उलटे ना वो! म्या मनात म्हटलं ह्ये काय साधं परकरण नाय गडया, चला सटका इथनं पटकन. माझी तंतरली व्हती, पन कसचं काय ,सायकल आता लय जड झाली व्हती, पायडल मारायला लई तरास होत व्हता. तिच्यासाठी मी सायकल थांबवत नाय बघून ती लय चिडली आन मला पकडायला सायकलबरुबर पळू लागली. ती लैच भेसूर हासत व्हती. मग मला काय बुद्धी झाली आन मी मनातल्या मनात धोंडूबाबाचा धावा चालू केला, मग ती तशीच हवेत गायब झाली हाळूहाळू. तसाच घरला आलो,त्दोन दिवस तापानं फनफनलो व्हतो. आई म्हनत व्हती बाळा आता तरी शाना हो, पोरी बाळीच्या मागं नगं जात जाऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 07/31/2014 - 16:03

Permalink

भुताच्या गोष्टी सांगायचा तास

भुताच्या गोष्टी सांगायचा तास सुरू झाला काय ?हैत दोन चार . माझी बी येक हाय . बेवडे आणि वेडे यांना भुतं तरास देत न्हाईत .
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/31/2014 - 16:05

In reply to भुताच्या गोष्टी सांगायचा तास by कंजूस

Permalink

साहेब तुमच्याकडे तर पोतडीत

साहेब तुमच्याकडे तर पोतडीत भरभरून किस्से असतील, येउंद्यात
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 07/31/2014 - 16:03

Permalink

भूताला असा मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा जड

भूताला असा मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा जड अस्वल बनवता येईल का की जो भूताला स्वतःलाही घाबरवेल?
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on गुरुवार, 07/31/2014 - 16:10

In reply to भूताला असा मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा जड by कवितानागेश

Permalink

भूत कशालाबी घाबरत नाय, त्ये

भूत कशालाबी घाबरत नाय, त्ये फक्त देवगनाच्या मानसाला घाबरतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 16:36

In reply to भूत कशालाबी घाबरत नाय, त्ये by अधिराज

Permalink

म्हणजे अजय देवगणच्या

म्हणजे अजय देवगणच्या कुटुंबाच्या वाटेला भूते जात नाहीत का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 16:56

In reply to म्हणजे अजय देवगणच्या by धन्या

Permalink

राजूचाचा बघायला हवा. :)

राजूचाचा बघायला हवा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Fri, 08/01/2014 - 15:04

In reply to म्हणजे अजय देवगणच्या by धन्या

Permalink

असं कसं...असं कसं???

देवगणांच्या अजयला येथे भुत प्रत्यक्ष दिसलं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 07/31/2014 - 17:08

In reply to भूत कशालाबी घाबरत नाय, त्ये by अधिराज

Permalink

ओ, देवगणाच्या माणसाला दिसत

ओ, देवगणाच्या माणसाला दिसत नाय. राक्षस गणाच्या माणसाला दिसलं तरी भ्या दाखवत नाय आणि माणूस गणाच्या माणसाला भ्या दाखवतं!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Fri, 08/01/2014 - 14:59

In reply to ओ, देवगणाच्या माणसाला दिसत by यशोधरा

Permalink

तसं नै ओ तै, देवगनाच्या

तसं नै ओ तै, देवगनाच्या मानसाला घाबरतं, म्हनून एखाद्या मनुश गनाच्या मानसाच्या बरुबर देवगनाचा मानूस असल तर त्यालाबी काही धोका नस्तो, भूतापासून.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 08/01/2014 - 15:01

In reply to तसं नै ओ तै, देवगनाच्या by अधिराज

Permalink

पण मनुष्यगणाच्या माणसाला भूत

पण मनुष्यगणाच्या माणसाला भूत दिसतं म्हणतात, त्याचं काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Fri, 08/01/2014 - 16:14

In reply to पण मनुष्यगणाच्या माणसाला भूत by सूड

Permalink

आवो मनुश गनाला दिसतंच कि,

आवो मनुश गनाला दिसतंच कि, दिसतय आन तरास बी देतय. पन जर त्याच्या बरुबर देवगनवाल्याची शिकुरिटी आसल तर त्याला भूत दिसू शकल, ,पन तरास नाय देवू शकनार.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/31/2014 - 16:05

Permalink

कोण म्हणतं आंम्ही नाही म्हणून

कोण म्हणतं आंम्ही नाही म्हणून.......?????????????? ;) थांबा दावितोच चिमित्कार आता!Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/31/2014 - 16:06

In reply to कोण म्हणतं आंम्ही नाही म्हणून by अत्रुप्त आत्मा

Permalink

धौती आत्मा

धौती आत्मा
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/31/2014 - 16:16

In reply to धौती आत्मा by स्पा

Permalink

गवती पांडू!

गवती पांडू! LLLLLLLLLLLLLLuuuuuuuuu Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/31/2014 - 16:25

In reply to गवती पांडू! by अत्रुप्त आत्मा

Permalink

संत्रस्त आत्मा !! ळॉळ्स

संत्रस्त आत्मा !! ळॉळ्स
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/31/2014 - 16:35

In reply to संत्रस्त आत्मा !! ळॉळ्स by सूड

Permalink

सुडुक खात्मा... !

सुडुक खात्मा... ! Image removed. बोल्स्....... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 07/31/2014 - 16:13

Permalink

स्पाकाकांना पण TRP ची भुल

स्पाकाकांना पण TRP ची भुल पडली तर. येउ द्या!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/31/2014 - 16:42

In reply to स्पाकाकांना पण TRP ची भुल by कवितानागेश

Permalink

त्यांना ट्यार्पी नाय तर

त्यांना ट्यार्पी नाय तर वाहव्वा लागते (चार लोकांची).
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/31/2014 - 16:44

In reply to त्यांना ट्यार्पी नाय तर by प्रचेतस

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/31/2014 - 16:46

In reply to त्यांना ट्यार्पी नाय तर by प्रचेतस

Permalink

मेल्यांनो..

वाचतांय हां मी !!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com