"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.
हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...
जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत.
नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात.
पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो
मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !!
त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले
तर झाले असे
प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो.
करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे
रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ?
मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :)
तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही
तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच
वाचायला आवडेल
वाचने
33751
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता मात्र भुते इथून पळ काढणार
भूताचे एकुण प्रकार किती व
In reply to आता मात्र भुते इथून पळ काढणार by कंजूस
@भूताच्या प्रत्येक
In reply to भूताचे एकुण प्रकार किती व by धन्या
किती मार्कांचा प्रश्न आहे
In reply to भूताचे एकुण प्रकार किती व by धन्या
भूताचे एकुण प्रकार किती व कोनते? भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल
In reply to भूताचे एकुण प्रकार किती व by धन्या
१)कोणाची काही इच्छा बाकी
पिराची जागा असलेले रान कसे
In reply to १)कोणाची काही इच्छा बाकी by कंजूस
पिरा चे भूत....हाहाहा
In reply to १)कोणाची काही इच्छा बाकी by कंजूस
आयला, भूत'पण'??????????
In reply to पिरा चे भूत....हाहाहा by स्वप्नांची राणी
संमंध नावाचे पण भूत असते असे
In reply to १)कोणाची काही इच्छा बाकी by कंजूस
भूतांचे आणखी काही प्रकार
In reply to १)कोणाची काही इच्छा बाकी by कंजूस
@आग्यावेताळ >>>
In reply to भूतांचे आणखी काही प्रकार by बाळ सप्रे
दु दु राहिलं काय
In reply to @आग्यावेताळ >>> by अत्रुप्त आत्मा
आज नागपंचमी आहे, दुदु नागोबा
In reply to दु दु राहिलं काय by बॅटमॅन
सांभाळा!
In reply to आज नागपंचमी आहे, दुदु नागोबा by सूड
@दुदु नागोबा पिऊन गेला असेल
In reply to आज नागपंचमी आहे, दुदु नागोबा by सूड
>>भूत दिसणे ही देव दिसण्याची
In reply to १)कोणाची काही इच्छा बाकी by कंजूस
आजी म्या धन्य झाहलो
In reply to >>भूत दिसणे ही देव दिसण्याची by सूड
बाईच देवी
In reply to आजी म्या धन्य झाहलो by स्पा
घ्या, स्पाची कथा मूळ पदावर!
In reply to आजी म्या धन्य झाहलो by स्पा
आता मी असं वाचतेय......
माझा आवडता भुताचा इडियो देवुन
भुतांनी भुतांचा भुतांसाठी
रेल्वेच्या लांबच्या प्रवासात
हाकामारी म्हणून एक प्रकार
मला पुषकळ्वेळा आलाय. माझ्या
In reply to हाकामारी म्हणून एक प्रकार by अधिराज
कोणाला आहे का अनुभव
ख्याक
In reply to कोणाला आहे का अनुभव by शिद
अॅक्च्युअली बरोबरे. कारण
In reply to कोणाला आहे का अनुभव by शिद
अगदी
In reply to अॅक्च्युअली बरोबरे. कारण by बॅटमॅन
'कल्याण' चा अर्थ कन्नड/तमिळादि भाषांत लगीन
In reply to अॅक्च्युअली बरोबरे. कारण by बॅटमॅन
(No subject)
In reply to कोणाला आहे का अनुभव by शिद
लग्नाच्या वेळी चकवा असतो .एक
माझा सगळ्यात आवडता भूताचा
हा एक किस्सा
बाप्रे !!!!
In reply to हा एक किस्सा by स्पा
आमचे एक गुरुजी कसारा -इगतपुरी