(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.
हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...
जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत.
नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात.
पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो
मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !!
त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले
तर झाले असे
प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो.
करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे
रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ?
मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :)
तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही
तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच
वाचायला आवडेल
प्रतिक्रिया
खिक्क
चार्ट कुठे आहेत?
दंगा करायला नवा धागा? मी पण,
आल्या रे आल्या स्मायल्या
केला की नै चिमित्कार!
भूते उद्धरु शकतात का?
ते 'होली घोस्ट' असतील.
नायतर आत्ता कलियुगात उद्धार
काय तरी मेलं, आयजीच्या जीवावर
कळ्ळं!!!
इथे स्मायलीवाल्यांना रजा .दोन
☠
हे सूक्ष्मरूपातले भूत आहे काय
हम्म...शक्यता नाकारता येत
@दोन हाडके आडवी वरती ४४०वोल्ट
ह्म्म
हे भूत मात्र खरेच गोड आहे!
अहाहा
सही रे
मस्तच!
आता मात्र भुते इथून पळ काढणार
भूताचे एकुण प्रकार किती व
@भूताच्या प्रत्येक
किती मार्कांचा प्रश्न आहे
भूताचे एकुण प्रकार किती व कोनते? भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल
१)कोणाची काही इच्छा बाकी
पिराची जागा असलेले रान कसे
पिरा चे भूत....हाहाहा
आयला, भूत'पण'??????????
संमंध नावाचे पण भूत असते असे
भूतांचे आणखी काही प्रकार
@आग्यावेताळ >>>
दु दु राहिलं काय
आज नागपंचमी आहे, दुदु नागोबा
सांभाळा!
@दुदु नागोबा पिऊन गेला असेल
>>भूत दिसणे ही देव दिसण्याची
आजी म्या धन्य झाहलो
बाईच देवी
घ्या, स्पाची कथा मूळ पदावर!
आता मी असं वाचतेय......
माझा आवडता भुताचा इडियो देवुन
भुतांनी भुतांचा भुतांसाठी
रेल्वेच्या लांबच्या प्रवासात
हाकामारी म्हणून एक प्रकार
मला पुषकळ्वेळा आलाय. माझ्या
कोणाला आहे का अनुभव
ख्याक
अॅक्च्युअली बरोबरे. कारण
अगदी
Pagination