Skip to main content

Abandoned

लेखक स्पा यांनी बुधवार, 23/07/2014 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
कलादालन विभाग सुरु नसल्याने येथेच फटू टाकत आहे फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते :) १.fgf . २.fgf . ३.fgf . ४.fgf . ५.fgf . ६.fgf . ७.fgf . ८.fgf . ९.fgf . १०.fgf . ११.fgf . १२.fgf . १३.fgf . १४.fgf . १५.fgf . १६.fgf . १७.fgf

वाचने 32351
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

फारच सुंदर. ३,१०,१३,१७ अधिक आवडले. तिसर्‍या फोटोतला अगदीच अस्थानी वाटणारा, शाईसारखा सांडलेला निळा रंग सर्रीअल इफेक्ट देऊन जातो. १७ क्रमांक तर एक पेंटिंग आहे. जा.जा. वर मयूरी गुप्ते यांनी म्हटल्याप्रमाणे मुम्बई बंदरातले विशेषतः रे रोड नजीकचे वापरीत नसलेले माल फलाट, अनंत काळपासून एखाद्या रेलगाडीची वाट पहात असलेले धुरकटलेले सिग्नल, अस्ताव्यस्त आणि व्यर्थ पसरलेले सुस्त रूळ- एक अजगर ऊन खात पडलेला असावा तसे दिसणारे-, चैतन्यहीन, प्रयोजनहीन. अस्तित्वहीन मात्र नव्हेत. उलट हे सुस्त, निद्रिस्त जगत् एखाद्या परीकथेतल्या शापित सृष्टीप्रमाणे कधीही जिवंतजागृत होऊन आपल्यासमोर धडधडू लागेल असे वाटते. सुंदर.

अरे, हे काय! अक्खा प्रतिसाद गायबच झाला. आता हे चोप्यपस्ते. फारच सुंदर. ३,१०,१३,१७ अधिक आवडले. तिसर्‍या फोटोतला अगदीच अस्थानी वाटणारा, शाईसारखा सांडलेला निळा रंग सर्रीअल इफेक्ट देऊन जातो. १७ क्रमांक तर एक पेंटिंग आहे. जा.जा. वर मयूरी गुप्ते यांनी म्हटल्याप्रमाणे मुम्बई बंदरातले विशेषतः रे रोड नजीकचे वापरीत नसलेले माल फलाट, अनंत काळपासून एखाद्या रेलगाडीची वाट पहात असलेले धुरकटलेले सिग्नल, अस्ताव्यस्त आणि व्यर्थ पसरलेले सुस्त रूळ- एक अजगर ऊन खात पडलेला असावा तसे दिसणारे-, चैतन्यहीन, प्रयोजनहीन. अस्तित्वहीन मात्र नव्हेत. उलट हे सुस्त, निद्रिस्त जगत् एखाद्या परीकथेतल्या शापित सृष्टीप्रमाणे कधीही जिवंतजागृत होऊन आपल्यासमोर धडधडू लागेल असे वाटते. सुंदर.

आता खूप चांगले क्यामेरे सामान्य लोकांच्या हातात आल्याने पूर्वी सारखी " ३६ मधले १६ च आले" ही सिचवेशन संपतीय.त्यात फटू शॉप व तत्सम एडीटर मधे बरेच काही सुधारता येते. ( मिपावरच्या बर्याच लोकांचे फटू शाप शी वाकडे आहे असे दिसते मात्र) .आताच्या या स्थितीत सन्सेट,फुलपाखरे, फुले ई विषयाचा वीट यावा इतके काही पहायला मिळते. त्या मुळेबुवांचे फटू सहित पत्रकारिता धागे, इस्पिक एक्क्कांचे संस्कृति दर्शन धागे असे थीमॅटिक फोटो प्रत्यय देणारे वाटतात. त्या सारखाच हा प्रयत्न आहे. हे स्थळ माझ्या अंदाजाने ठाकुरली जवळ असावे. प्रयत्न उत्तम आहे.

In reply to by चौकटराजा

हे मुळेबुवा कोण बुवा ? असा प्रश्न पडू नये म्हणून 'त्यामुळे बुवांचे ' असे वाचावे.

कल्पना आणि बहुतेकसे फोटो आवडले. काही चित्रांमधला खरखरीत पोत, उदा घड्याळ, गियर, यंत्रांचं मोडकं मेट्रीक्स फारच आवडलं. पण उदा क्र १ आणि ३ या चित्रांमधला हिरवा रंग फार भडक वाटला. कदाचित तो थोडा फिकट करून किंवा चित्रं काळीपांढरी करून बहुतेक अधिक भावतील.

लै म्हणजे लै म्हणजे लैच जबरदस्त फोटो़ज आहेत, दोस्ता.. साला, लेन्सा आमच्याकडंबी आहे, पन अशी नजर पाहीजे ना राव.. नजरेत आणि कॅमेरॅत मज्जा आहे राव तुमच्या..