मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बडबड गीत

भिंगरी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एक बडबड गीत ............. बरं का ग मंदा काय झालं एकदा, ताई आमची चिरत होती खसाखसा कांदा . कांदा राहिला हातात विळी गेली बोटात विळी वरुन उठली, नाचत सुटली. धक्क्याने मोराम्ब्याची बरणीच फुटली. हाय हाय हाय काचेवरती पाय. काच गेली पायात आता करू तरी काय? बाबा हसले खो खो खो आई हसली खी खी खी ताईला आले रडू आईने दिला लाडू ---------------------------------------- आणि हे 'बेताल बरबाद गीत' ............. बऱ का गं जनता काय झालं एकदा मंत्री आमचे मोडत होते पटापटा कायदा. कायदा राहिला बुकात शिक्षा झाली कोकणात. हाय हाय हाय माझ्या पोराचे काय? पत गेली आता करू तरी काय? पदावरून उठले भांडत सुटले धक्क्याने मेंदुवरचे नियंत्रण सुटले. 'बाबा' हसले खो खो खो 'आई'(कोणाचीतरी)हसली खी खी खी. मंत्र्यांना आले रडू जनतेने द्यावा झाडू.

वाचने 5738 वाचनखूण प्रतिक्रिया 22

भिंगरी Wed, 07/23/2014 - 16:41
कृपया मिपाकरांनी वरील शीर्षक 'बेताल बरबाद गीत' असे वाचावे बाय मिष्टेकसे च्युक हो गई (धाग्यावरील लेखन दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का? नाहीतर माझी नेहमीच चूक होते आणि मग भिंगरीची भोवरी होते)

In reply to by पिलीयन रायडर

भिंगरी गुरुवार, 07/24/2014 - 13:16
या मिपाकरांना भिंगरी बद्दल काय शंका आहे? मी ताईच आहे दादा नाही. ताई की दादा अशी शंका कधी येते माहिती आहे ना? *shok*

भिंगरी Wed, 07/23/2014 - 22:57
अहो ते बडबड गीत माझे आहे असं मी म्हटलंच नाही. हे तर किती जुनं आहे. त्यावरून विडंबन केलं. पण मूळ गीत माहित असावं म्हणून संदर्भासाठी दिलं मी चोर नाही

पाषाणभेद गुरुवार, 07/24/2014 - 04:03
मजा आली वाचून. (पण कोणतेही आईबाबा मुलीच्या पायात काच गेली म्हणून हसणार नाही. एखाद धबाका देतील पाठीत पण नंतर लगेच त्यावर उपचार करतील.)

भिंगरी Tue, 03/31/2015 - 09:01
आता हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत्.पुन्हा एकदा विडंबण करण्याची तयारी करा रे कुणीतरी.